मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पने .. पाय कुठेत तुझे Uhoh तु एव्हडा वेळा देवाला नमस्कार करतेस.. मी तुलाच करते आता.. तुला नमस्कार केला की देवाला पोहचेच.. Proud

निबंध: म. ज्योतिबा फुले.

...असे होते थोर समाज-सुधारक निळु फुले.

असं कुणी लिहलंय का?

गिरीश, निळू फुले जिवंत असताना आणि त्यांचे खलनायकपट गाजत असताना तरी नक्क्क्की नाही!!!! Proud

"ते कुत्र्याचं पिल्लू बघ कसं हरणासारखं धावतंय 'तुगडुक तुगडुक तुगडुक तुगडुक '(????????). - इति माझी एक मैत्रिण!!

Lol

ते कुत्र्याचं पिल्लू बघ कसं हरणासारखं धावतंय 'तुगडुक तुगडुक तुगडुक तुगडुक '(????????)>>>
हाइइट्ट Lol

माझे पण कुत्रे लहान बालिका होते तेव्हा लोक तुम्हारा खरगोश म्हणून हसत असत. त्यात त्यांचे फ्लॉपी कान
ते खरेच दुड्कत असत. आता लै गंभीर झालेत व नीट चालतात.

कुत्रा प्रेमी मोड ऑफ वेंधळा मोड चालू.

परवा दिल्ली हून येताना पाण्याच्या बाट्लीचे झाकण अगदी हल्के उघडे राहिले एक फोन थोडासा भिजला.
लगेच चालू करून पाहिला तर कामातनंच गेलेला.

रच्याकने, फोनमध्ये पाणी गेल्यास ताबडतोब त्याची ब्याटरी काढून टाकावी व फोन सुकल्यावर वापरावा. अन्यथा शॉर्ट सर्किट्स होऊन फोन कामातून जातो.

पहिले मी टोण्गा नाही. ती वेगळीच हस्ती आहे. कोमातून दिसत असेल तर तुम्ही कोम्यात आहात हे नक्की...

मी एक जीन्स खिशात मोबाईल असताना भिजवली होती. मोबाईलचा पार कचरा. दुरुस्तीसाठी गेल्यावर दुकानदार म्हणे विकून टाका. माझ्या आशा पल्लवीत झाल्या. मी म्हटले कितीला जाईल? तर २०० रु म्हणाला. मोबाईल घरीच आहे अजुन Sad
नवरा अजुन विचारतो, मोबाईल भिजवलास ना व्यवस्थित? कपड्यांवर डाग राहिले तरी चालेल पण मोबाईल स्वच्छ निघाला पाहीजे.

तर २०० रु म्हणाला. मोबाईल घरीच आहे अजुन

म्हणजे २०० ही मिळले नाहीत अन मोबाईल बिनकामाचा पडून. याला म्हणतात गाढवही गेले अन ब्रम्हचर्यही.

मोबाइलला २०० बरे सांगितले. मला टीव्ही ला ५०० सांगितले होते. Proud

Lol

पने Lol

>> तू टिव्ही जीन्सच्या खिशात ठेवून भिजवला होतास ?
>> कपड्यांवर डाग राहिले तरी चालेल पण मोबाईल स्वच्छ निघाला पाहीजे
Rofl

आज आंघोळीसाठी चष्मा घालून बाथरूममध्ये गेलो आणि पाणी घ्यायला सुरुवात केली. काच धूसर झाल्यावर लक्षात आले...

टोणगिणीला (इथे दुसरा कुठलाही पर्यायी शब्द सहन केला जाणार नाही (तिच्याकडून :फिदी:)) फुलटॉस मिळाला !!

Pages