मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहिच

Biggrin

कालचा स्लीप ऑफ टंग:
आलेल्या पाहुण्याना "या आता पटकन जेवायला, भीक लागली असेल ना" Sad
नशीब त्यांच्या लक्षात नाही आले.

पने _/\_ ग बाए... मी नाही येणाराता तुझ्या घरी किती जरी प्र्माणे बोलावलेस तरी Proud

पनू.............. Rofl

पने.. Lol

आलेल्या पाहुण्याना "या आता पटकन जेवायला, भीक लागली असेल ना" >> भाभीजी भैयाकडचे होते का लोक्स Proud

होय रे दीप्या. पण फक्त माझ्या बहिणीच्या लक्षात आले. कावळीण आहे पक्की.
वर्षे तू बिंधास्त ये. असे नाय होणार आता. नविन वेंधळेपणा करू दोघी मिळून Happy

पने...:हाहा:

निंबुडा Rofl ::हहगलो:

हा माझ्या लहानपणीचा किस्सा आहे. आई च्या घरी फोन T.V. च्या जवळ आहे. एकदा T.V. चालू असताना मला एका मैत्रिणीचा फोन आला. मी T.V. चा volume कमी केला होता. दुसर्‍या दिवशी त्या मैत्रिणी ने मला विचारले "काय गं! काल T.V. वर काय पाहत होतीस? कसलातरी "धोक्याचा संदेश" होता ना? मग गाणे गाऊन का देत होते तो "धोक्याचा संदेश"?"
मला काही बोधच होईना! मी विचारले की "तु नक्की किती वाजता फोन केला होतास?". तिने वेळ सांगितल्यानंतर माझी tube पेटली. तिने फोन केला तेव्हा "बोक्या सातबंडे" चे title song चालू होते. (ज्यांना ज्यांना हे title song माहीत आहे त्यांनी त्यांनी "बोक्या सातबंडे" ऐवाजी "धोक्याचा संदेश" असे गाऊन बघावे.) Happy

पनूडे Rofl

ताजा ताजा वेंधळेपणा.... [म्हणून जास्त वेळ नेटावर घालवू नये असे थोरामोठ्यांनी सांगितलंय...]

एकाच वेळी २-३ वेगवेगळ्या ब्लॉग्जच्या विंडोज खुल्या होत्या.... एका ब्लॉगवरील पोस्टला लिहायची कॉमेंट मी चुकून दुसर्‍या ब्लॉगला लिहिली.... मग अर्र च्च्च.....क्षण झाला.... मग पुन्हा त्या ब्लॉगला स्पष्टीकरण देताना मी ज्या ब्लॉगसाठी ही कॉमेंट देत होते त्या ब्लॉगरचे नाव लिखाणात व माझ्या सॉरीनाम्यात आले.... आणि ती कॉमेन्ट सेन्ड केल्यावर लक्षात आले की आपण पुन्हा चुकीचे नाव दिले.... ते नाव अजून तिसर्‍याच ब्लॉगरचे होते..... एकाच वेळी ३-३ ब्लॉग वाचत असण्याचा व घोर घोर वेंधळेपणाचा हा परिणाम बरं!!!! Proud

पनु Happy

मी एकदा जीमेलच्या चॅट विंडो मध्ये माझा नीरज नावाचा भाऊ online दिसला म्हणून त्याच्याशी बोलायला लागले. मला कळेना की हा manufacturing company त असुनही दिवसाचा नेट वर कसा? विचारलं तर म्हणे आजकाल च आम्हालाही नेट मिळालंय ऑफिसात. म्हटले बरंय्..मग जरा बाकी काय चाल्लय वगैरे गप्पा झाल्या. नागपूरची चक्कर कधी वगैरे ही बोलुन झाले. पाचेक मिनिटाने "अजुन काय" वर माझी गाडी आल्यावर म्हणाला काही खास नाही, मागच्या आठवड्यात साखरपुडा झाला अन पुढ्च्या महिन्यात लग्न आहे. मी अवाक!! मला वाटले मी सारखी "अजुन काय" म्हणून विचारतेय म्हणून हा चिडून म्हणत असेल्..मग मात्र मी ही खेचणे चालू केले..तुला कोण देणार मुलगी, तुझ्या होणार्‍या बायकोचा फोटोही दाखवला नाहीस घरी कुणाला अन डायरेक्ट लग्न करतोय म्हणजे नक्कीच मुलगी चकणी असणार वगैरे.. पहिले तर माझ्या २-३ कमेंट्स ना काही उत्तरच नाही..मग आलं ते "तू काय बोलतेय मला काही कळत नाहीय.." मी ही चिडून म्हटले की मलाही काही कळत नाहीये तु असा काय विचित्रपणा करतोय ते..
मग ५ सेकंद शांततेत गेले आणी माझ्या डोक्यात प्रकाश पडला....मी जीमेलच्या चॅट विंडो ला maximize करुन बघितले तर कळले की मी नीरज नावाच्याच माझ्या एका जुन्या पण सिनिअर कलिग शी बोलत होते Lol Lol आणि तो ही नागपुरचाच असल्याने पहिल्या २-३ मिनिटात काही घोळ लक्षातच आला नाही..
मग मात्र मला मेल्याहून मेल्यासारखे झाले. तोही हसला..its ok वगैरे म्हणाला..मग आम्ही जरा नॉर्मल गप्पा मारल्या. पण तिथे थांबेल तर ना..
बोलता बोलता त्याने त्याच्या साखर्पुड्याचे फोटो पाठवले..मी मुलीकडे पाहिले तर मला चेहरा जरा ओळखीचा वाटला, माझ्या एका मैत्रिणीसारखा. म्हणून म्हटले की ती अमुक तमुक तुझ्या बाय़कोची कुणी बहीण वगैरे आहे का? आता पुन्हा आश्चर्यचकित होण्याची पाळी त्याची होती, तो म्हणाला " अगं तु कशी ओळखते तिला? ती माझ्या बायकोची नसून माझीच चुलतबहीण आहे"!! हाहाहा.. जणू काही त्या दिवशी मला त्याला पटवून च द्यायचे होते की मी किती यड्चाप आहे ते!!

रवीवारी काम करू नये. एक महत्त्वाची मेल चुकून दुसर्‍याच माणसाला सीसी केली. सोमवारी त्याचे लाजीरवाणे एक्स्प्ल्नेशन द्यावे लागले. माय ब्रेन इज टर्निन्ग टू भुजिया.

पने Lol

होता है ,होत है ....
अश्वीनीमामी मी तर म्हणतो ,शनीवारी ही काम करू नये !

सगळेच Rofl

कालचा किस्सा

LG कस्टमर केअरला फोन केला. इंल्गीशमधे बोलण्यासाठी १ नंबर प्रेस्स केला. आणि मराठीतुन बोलायला सुरुवात केली. चांगले ३-४ वाक्य नॉनस्टॉप बोलल्यावर तिकडुन आवाज आला "मॅडम प्लिज हिंदीमे बता सकते है?"
परत सगळे हिंदीत रिपीट... फोन ठेवल्यावर लक्षात आले, आपण "१" म्हणजे इंग्लीशमधे बोलणे अपेक्षीत होते Sad

वर्षे तुझे बोलणे संपल्याशिवाय तू त्याला मधे बोलायची संधी दिलीसच कशी ते सांग आधी Proud

काल शुभंकरोतीच्या शेवटी चक्क "दीप्याला पाहुन नमस्कार" म्हणाले. मग देवाला नाक घासून नमस्कार केला आणि शुभंकरोती पुन्हा रीपीट केले Biggrin

पनू Lol

Pages