माझा आधीचा आयडी dineshvs (म्हणजे दिनेश विश्वनाथ शिंदे ) असा होता.
सध्याचे नाव मायबोलीकरानी ठेवलेले !!!
खरे तर नलिनीने दादा म्हणायला सुरवात केली. (तसे मला मायबोलीकर, मामा, मामा ठाकूर पण म्हणतात ) निनाविने, दिनेशदा केले.
मला माझा आयडि खरा जुई ठेवायचा होता. (मला हा शब्द फार आवडतो, म्हणजे जाईजुई फुलांच्या सुगंधामुळे) पण मला सुरुवातीला देवनगरीत टाईप करायला जमायचे नाही , जुयी असा शब्द लिहला गेला म्हणुन जुयी.
माझ खर नाव नीता , आमच्या अहोंनी नाव ठेवले निताक्षी , पण त्या वेळेला दोन्ही नावाने आय डि ओपन करायला जमलेच नाही.
लहानपणी घरी सगळे मला बावळट म्हणायचे. नंतर मित्र पण बावळट म्हणु लागले. हळुहळू मी पण स्वताला बावळट समझु लागलो. नंतर मायबोलीवर वाचायला लागलो तेव्हा इथे एक बावळट्ट भेटली. आपल्यासारख कोणीतरी आहे म्हणुन खुप्प आनंद झाला व मी मायबोलीवरचा बावळट झालो.
>> आम्हाला कसलं सूचतंय डोंबल ! आमच्या पिताश्रींनी ठेवलेले हे आमचे लाडके नाव. भरवशाच्या म्हशीची म्हण त्याकाळात नसावी नाहीतर मातोश्रींनी धडगत केली नसती त्यांची. पुढे मायबोलीबोलीवर मिशन खलनिग्रहणाय हातात घ्यावे लागले ,तेव्हा पुनः एकदा आमच्या नावाचा विचार केला, तेव्हा आमच्या पिताश्रींची दूर्दृष्टी बघून आम्ही विस्मयचकित, स्तिमित इत्यादी झालो
मी जुन्या मायबोलीवर डेट्रॉईटकर ह्या लांबलचक नावाने होतो.
आता डेट्रॉईट सोडलं, म्हणून तो आय.डी. सुद्धा सोडला.
नंतर काही दिवस माझ्या अद्याक्षराचा आर्जे (RJ) असा आय.डी. घेतला होता.
देवनागरीकरण झाल्यावर माझ्या नावाचा आय.डी. मिळाला म्हणून मग तोच घेतला.
पण अजुनही कंपुमधले आर्जे ह्याच नावाने ओळखतात.
टोणगा | आमच्या पिताश्रींनी ठेवलेले हे आमचे लाडके नाव.
प्रिय श्री टोणगा, मला आपली दिवसातून एकदा तरी आठवण येते. माझ्या हाताखाली काम करणारे दिवसातून एकदा तरी असे काम करतात की, तो अमुक अमुक म्हणजे भरवशाच्या म्हशीचा "माबो आयडी" आहे असे म्हणावेच लागते.
---------------------------------------------------------- गौतम७स्टार | राजधर्म, तुमच्या नावाचा अर्थ कुणीकडे दिसला नाही?
काही खास अर्थ नाही. माझे खरे नाव "धर्मराज" आहे. मात्र मी इतका सुदैवी की मला कुठेही तोच आयडी सहज मिळून जातो. त्यामुळे फक्त क्रम उलट सुलट केला आहे. तसेही "राज" हे आता चलनी नाव आहे.
----------------------------------------------------------
अजून काही आवडलेले आयडी :
दीपूर्झा : अगदी झपूर्झा च्या तालावर !
माझे आईने ठेवलेले ''अरुंधती'' नाव मला खूप आवडते, पण कधी वापरता यायचे नाही. पिताश्रींनी जन्माअगोदरच मुलगी झाली तर काय नाव ठेवायचे हे निश्चित केले होते आणि तशीच नोंद हास्पिटलाच्या रजिस्टरमध्येही केली. मग अरुंधती नाव मनातच राहायचे. आता माबोवर तेच नाव धारण केले आहे.
Submitted by अरुंधती कुलकर्णी on 7 April, 2010 - 14:32
माझं "चिमुरी" हे माझ्या एका मैत्रिणीने ठेवलेलं टोपण नाव.. हे नाव तस माझ्या मैत्रिणींमधे फारसं कोणाला माहित नाही आणि माहित असेल तरिही मला या नावाने कोणी हाक मारत नाही.. फक्त जिने ठेवलयं तीच मला या नावाने हाक मारायची (मारायची असं लिहिलय कारण सध्या आमचा जास्त संपर्क नाहिये ).. खरं तर "चिमुरी" या शब्दाला काहिच अर्थ नाहिये.. तिला विचारलं तर म्हणे की तिला आवडतं, पण ह्या शब्दाची निर्मिती कुठे झाली हे तिलाही माहित नाहिये जेव्हा माबो खूप दिवस वाचल्यानंतर इथे एक आय डी घ्यावा असं ठरलं तेव्हा इथले हट्के आय डी बघुन आपणही एक असाच आय डी घ्यावा असं वाटलं.. म्हणुन मग मी "चिमुरी"
माझ नाव नयना! पुर्वी माबो इंग्रजी मधे अस्ताना नयना_मोरे असाच आय डी होता. पण एकदा बॉसला मला मराठी/ हिन्दी टायपिंग कसे येते हे माबोवर लॉग इन करुन दाखवले. तेव्हा (युपी वाल्या) त्या बॉसला मी माबोवर असते हे माहीती झाले म्हणुन आय डी चेंज केला. आर्य स्त्री ला संबोधतांना 'आर्या' म्हणतात म्हणुन 'आर्या' नाव घेतले. (बॉसचे किस्से/ फजिती टाकता येतील हाच हेतु... )
खर्या नावाने आयडी घ्यायचा नाही हे नक्कीच ठरवलं होतं. आणि जसे 'आगाऊ' आहोत तसेच स्वतःच जाहिर केल्यावर काम सोपं होतं!! या आयडीचे अनेक फायदे आहेत - कुठल्याही धाग्यावर जाउन बिनधास्त मतपिंक टाकता येते. शब्द जरा कमी-जास्त लागला तर लोक समजून घेतात आणि म्हणतात जाउद्या नाहीतरी आगाउच आहे! उगीचच काव्यात्म, गोड, मधाळ आयडी घ्यायचा आणि जहरी टीका, टोमणे मारायचे, खुसपटे काढायची त्यापेक्षा हे बरे!
मी आधी कुलदीप १३१२ ह्या नावाने इथं वावरत होतो. माझ्या नावातले पहिली २ अन् आडनावातली पहिली २ अक्षरं घेऊन हा आयडी तयार झाला त्यालाच १३१२ हे आकडे ही चिकटवले. पहिल्या पहिल्यांदा लोकांना कुलदीप म्हणजे पंजाबी वाटला... (काहींना पवार ही आठवला :फिदी:)
नंतर माबोवरच्या सोईमुळे आयडी देव नागरीत करता येणार होता... त्याच सुमारास मी एका गहन अन् गंभीर ? च उत्तर I do I do असं देण्याऐवजी Do I? असं दिलं आणि मग त्या चुकीच्या उत्तराची आठवण रहावी म्हणून इथं डुआय हा आयडी घेतला!
माझा एकही डूप्लीकेट आयडी नाही! आहे तो फक्त हाच - डुआय
मी हा आयडी घेताना फक्त ऐवढाच विचार केला की माझा आयडी लिहायला सोपे जावे. म्हणून मी बी हा आयडी घेतला. लांबलचक आणि लिहायला अवघड आयडी मला घ्यायचा नव्हता. नावानीही घ्यायचा नव्हता.
माझे आईवडील तिरुपती बालाजीचे भक्त, त्यानी माझं नाव तिरुपती ठेवलं व लहान भावाचं नाव व्येंकटेश ठेवलं. पुढे मी ७ वर्षाचा होईस्तोवर गावातली लोकं मला तिरुपती म्हणुन हाक मारत. पण इतर माडिया मित्राना हे नाव जरा अवघड वाटु लागलं. माडीयामधे बांडु नाव फार प्रचलीत आहे, मग गावातील काही लोकं मला बांडु म्हणायची. ७ वर्षाचा होईस्तोवर गावात मला तिरुपती/तिरपतग्या/बांडु नावानी हाक मारत.
पुढे ७ वर्षाचा झाल्यावर शाळेत नाव घालायचे होते. तेंव्हा आमच्या गावातील शिक्षकानी माझं परत एकदा बारसं केलं व मधुकर म्हणून नोंद केली.
>>सावंतांच्या राखीचा कुठलाही
>>सावंतांच्या राखीचा कुठलाही फोटो चालेल... >>
जाऊदे राम, राखी आता
जाऊदे राम, राखी आता दुसर्याकोणाची तरी होऊ घातलीये (बिच्चारा), तुम्हांला अंमळ उशीरच झालाय.
राखी आता दुसर्याकोणाची तरी
राखी आता दुसर्याकोणाची तरी होऊ घातलीये (बिच्चारा), <<
परत स्वयंवर???? (प्रचंड घाबरलेली बाहुली...)
बाकी दुसर्याची राखी हा पण चांगला आयडी आहे नाही का?
त्या कोण कॅनडाच्या होऊ
त्या कोण कॅनडाच्या होऊ घातलेल्या वराने पळ काढलाय कां?
कुठल्या जगात रहातेस.. ते लग्न
कुठल्या जगात रहातेस.. ते लग्न मोडून जुनं झालं आता..
'संचाह्यामा' वाचत नाहीस का?
अरे पण तिचं दुसरं स्वयंवर
अरे पण तिचं दुसरं स्वयंवर होणारे असं टाइम्स मधे वाचल!
राम राखीचा मानलेला भाऊ आहे. पण कपूरांचा राम हां
अगं, भारतात नाहीये मी,
अगं, भारतात नाहीये मी, त्यामुळे कित्ती कित्ती मिस करतेय मी.
आता ह्या वारीत सगळे अपडेट्स घ्यावेच लागतील. 
आडो- धागा सांगीतल्याबद्दल
आडो- धागा सांगीतल्याबद्दल थँक्यु गं.

वाचते आहे. मस्तय
माबोवेमास्तरांनाही काही गोष्टी करता येत नाहीत हे पाहून छान वाटलं
मी मुलगी झाली तर तिचं नाव ठेवणार होते म्हणुन हा आयडी घेतला होता.
माझा आधीचा आयडी dineshvs
माझा आधीचा आयडी dineshvs (म्हणजे दिनेश विश्वनाथ शिंदे ) असा होता.
सध्याचे नाव मायबोलीकरानी ठेवलेले !!!
खरे तर नलिनीने दादा म्हणायला सुरवात केली. (तसे मला मायबोलीकर, मामा, मामा ठाकूर पण म्हणतात ) निनाविने, दिनेशदा केले.
मला माझा आयडि खरा जुई ठेवायचा
मला माझा आयडि खरा जुई ठेवायचा होता. (मला हा शब्द फार आवडतो, म्हणजे जाईजुई फुलांच्या सुगंधामुळे) पण मला सुरुवातीला देवनगरीत टाईप करायला जमायचे नाही , जुयी असा शब्द लिहला गेला म्हणुन जुयी.
माझ खर नाव नीता , आमच्या अहोंनी नाव ठेवले निताक्षी , पण त्या वेळेला दोन्ही नावाने आय डि ओपन करायला जमलेच नाही.
लहानपणी घरी सगळे मला बावळट
लहानपणी घरी सगळे मला बावळट म्हणायचे. नंतर मित्र पण बावळट म्हणु लागले. हळुहळू मी पण स्वताला बावळट समझु लागलो. नंतर मायबोलीवर वाचायला लागलो तेव्हा इथे एक बावळट्ट भेटली. आपल्यासारख कोणीतरी आहे म्हणुन खुप्प आनंद झाला व मी मायबोलीवरचा बावळट झालो.
आपल्याला हे नाव कसे सुचले >>
आपल्याला हे नाव कसे सुचले
>> आम्हाला कसलं सूचतंय डोंबल ! आमच्या पिताश्रींनी ठेवलेले हे आमचे लाडके नाव. भरवशाच्या म्हशीची म्हण त्याकाळात नसावी नाहीतर मातोश्रींनी धडगत केली नसती त्यांची. पुढे मायबोलीबोलीवर मिशन खलनिग्रहणाय हातात घ्यावे लागले ,तेव्हा पुनः एकदा आमच्या नावाचा विचार केला, तेव्हा आमच्या पिताश्रींची दूर्दृष्टी बघून आम्ही विस्मयचकित, स्तिमित इत्यादी झालो
मी जुन्या मायबोलीवर
मी जुन्या मायबोलीवर डेट्रॉईटकर ह्या लांबलचक नावाने होतो.
आता डेट्रॉईट सोडलं, म्हणून तो आय.डी. सुद्धा सोडला.
नंतर काही दिवस माझ्या अद्याक्षराचा आर्जे (RJ) असा आय.डी. घेतला होता.
देवनागरीकरण झाल्यावर माझ्या नावाचा आय.डी. मिळाला म्हणून मग तोच घेतला.
पण अजुनही कंपुमधले आर्जे ह्याच नावाने ओळखतात.
मला वाटते की जसे बाजारात
मला वाटते की जसे बाजारात मुला-मुलींची १००० नावे असे पुस्तक मिळते, तसे आयडी साठी १००० नावे असे पुस्तक काढून विकण्यास हरकत नाही.
राजधर्म, तुमच्या नावाचा अर्थ
राजधर्म, तुमच्या नावाचा अर्थ कुणीकडे दिसला नाही?
टोणगा | आमच्या पिताश्रींनी
टोणगा | आमच्या पिताश्रींनी ठेवलेले हे आमचे लाडके नाव.
प्रिय श्री टोणगा, मला आपली दिवसातून एकदा तरी आठवण येते. माझ्या हाताखाली काम करणारे दिवसातून एकदा तरी असे काम करतात की, तो अमुक अमुक म्हणजे भरवशाच्या म्हशीचा "माबो आयडी" आहे असे म्हणावेच लागते.
----------------------------------------------------------
गौतम७स्टार | राजधर्म, तुमच्या नावाचा अर्थ कुणीकडे दिसला नाही?
काही खास अर्थ नाही. माझे खरे नाव "धर्मराज" आहे. मात्र मी इतका सुदैवी की मला कुठेही तोच आयडी सहज मिळून जातो. त्यामुळे फक्त क्रम उलट सुलट केला आहे. तसेही "राज" हे आता चलनी नाव आहे.
----------------------------------------------------------
अजून काही आवडलेले आयडी :
दीपूर्झा : अगदी झपूर्झा च्या तालावर !
पण राजधर्म आणि धर्मराज हे
पण राजधर्म आणि धर्मराज हे विरुद्धार्थी शब्द आहेत, असे तुम्हाला वाटत नाही काय?
टोणगा | पण राजधर्म आणि
टोणगा | पण राजधर्म आणि धर्मराज हे विरुद्धार्थी शब्द आहेत, असे तुम्हाला वाटत नाही काय?
जो "राज" धर्माने वागेल तोच खरा "धर्मराज" !!!
बावळट | लहानपणी घरी सगळे मला
बावळट | लहानपणी घरी सगळे मला बावळट म्हणायचे.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ही म्हण खरीच आहे म्हणायची !!!

आय डी ष्टोरीज मस्त आहेत!
आय डी ष्टोरीज मस्त आहेत!
माझे आईने ठेवलेले ''अरुंधती'' नाव मला खूप आवडते, पण कधी वापरता यायचे नाही. पिताश्रींनी जन्माअगोदरच मुलगी झाली तर काय नाव ठेवायचे हे निश्चित केले होते आणि तशीच नोंद हास्पिटलाच्या रजिस्टरमध्येही केली. मग अरुंधती नाव मनातच राहायचे. आता माबोवर तेच नाव धारण केले आहे.
मस्त कारणं आहेत एकेकाची आय डी
मस्त कारणं आहेत एकेकाची आय डी घेन्याची!!
माझं "चिमुरी" हे माझ्या एका मैत्रिणीने ठेवलेलं टोपण नाव.. हे नाव तस माझ्या मैत्रिणींमधे फारसं कोणाला माहित नाही आणि माहित असेल तरिही मला या नावाने कोणी हाक मारत नाही.. फक्त जिने ठेवलयं तीच मला या नावाने हाक मारायची (मारायची असं लिहिलय कारण सध्या आमचा जास्त संपर्क नाहिये
).. खरं तर "चिमुरी" या शब्दाला काहिच अर्थ नाहिये.. तिला विचारलं तर म्हणे की तिला आवडतं, पण ह्या शब्दाची निर्मिती कुठे झाली हे तिलाही माहित नाहिये
जेव्हा माबो खूप दिवस वाचल्यानंतर इथे एक आय डी घ्यावा असं ठरलं तेव्हा इथले हट्के आय डी बघुन आपणही एक असाच आय डी घ्यावा असं वाटलं.. म्हणुन मग मी "चिमुरी" 
माझ नाव नयना! पुर्वी माबो
माझ नाव नयना! पुर्वी माबो इंग्रजी मधे अस्ताना नयना_मोरे असाच आय डी होता. पण एकदा बॉसला मला मराठी/ हिन्दी टायपिंग कसे येते हे माबोवर लॉग इन करुन दाखवले. तेव्हा (युपी वाल्या) त्या बॉसला मी माबोवर असते हे माहीती झाले म्हणुन आय डी चेंज केला. आर्य स्त्री ला संबोधतांना 'आर्या' म्हणतात म्हणुन 'आर्या' नाव घेतले. (बॉसचे किस्से/ फजिती टाकता येतील हाच हेतु...
)
वर दिल्याप्रमाणे माझं नाव आणि
वर दिल्याप्रमाणे माझं नाव आणि आयडी एकच आहे !
राजधर्म, माझे नुसते पायच नाही
राजधर्म,
माझे नुसते पायच नाही रे. बरच काही दिसत होत पाळण्यात.
खर्या नावाने आयडी घ्यायचा
खर्या नावाने आयडी घ्यायचा नाही हे नक्कीच ठरवलं होतं. आणि जसे 'आगाऊ' आहोत तसेच स्वतःच जाहिर केल्यावर काम सोपं होतं!! या आयडीचे अनेक फायदे आहेत - कुठल्याही धाग्यावर जाउन बिनधास्त मतपिंक टाकता येते. शब्द जरा कमी-जास्त लागला तर लोक समजून घेतात आणि म्हणतात जाउद्या नाहीतरी आगाउच आहे! उगीचच काव्यात्म, गोड, मधाळ आयडी घ्यायचा आणि जहरी टीका, टोमणे मारायचे, खुसपटे काढायची त्यापेक्षा हे बरे!
आगाऊ | खर्या नावाने आयडी
आगाऊ | खर्या नावाने आयडी घ्यायचा नाही हे नक्कीच ठरवलं होतं.
आयडी घेतेवेळी आपल्या मनात विचार पक्का असला की मग पुढे सारेच सोपे आणी सुगम होऊन जाते.
मी आधी कुलदीप १३१२ ह्या
मी आधी कुलदीप १३१२ ह्या नावाने इथं वावरत होतो. माझ्या नावातले पहिली २ अन् आडनावातली पहिली २ अक्षरं घेऊन हा आयडी तयार झाला त्यालाच १३१२ हे आकडे ही चिकटवले.
पहिल्या पहिल्यांदा लोकांना कुलदीप म्हणजे पंजाबी वाटला... (काहींना पवार ही आठवला :फिदी:)
नंतर माबोवरच्या सोईमुळे आयडी देव नागरीत करता येणार होता... त्याच सुमारास मी एका गहन अन् गंभीर ? च उत्तर I do I do असं देण्याऐवजी Do I? असं दिलं आणि मग त्या चुकीच्या उत्तराची आठवण रहावी म्हणून इथं डुआय हा आयडी घेतला!
माझा एकही डूप्लीकेट आयडी नाही! आहे तो फक्त हाच - डुआय
मी हा आयडी घेताना फक्त ऐवढाच
मी हा आयडी घेताना फक्त ऐवढाच विचार केला की माझा आयडी लिहायला सोपे जावे. म्हणून मी बी हा आयडी घेतला. लांबलचक आणि लिहायला अवघड आयडी मला घ्यायचा नव्हता. नावानीही घ्यायचा नव्हता.
व्वा, मस्त बीबी आहे. माझे
व्वा, मस्त बीबी आहे.
माझे आईवडील तिरुपती बालाजीचे भक्त, त्यानी माझं नाव तिरुपती ठेवलं व लहान भावाचं नाव व्येंकटेश ठेवलं. पुढे मी ७ वर्षाचा होईस्तोवर गावातली लोकं मला तिरुपती म्हणुन हाक मारत. पण इतर माडिया मित्राना हे नाव जरा अवघड वाटु लागलं. माडीयामधे बांडु नाव फार प्रचलीत आहे, मग गावातील काही लोकं मला बांडु म्हणायची. ७ वर्षाचा होईस्तोवर गावात मला तिरुपती/तिरपतग्या/बांडु नावानी हाक मारत.
पुढे ७ वर्षाचा झाल्यावर शाळेत नाव घालायचे होते. तेंव्हा आमच्या गावातील शिक्षकानी माझं परत एकदा बारसं केलं व मधुकर म्हणून नोंद केली.
आईवडिलांनी हे ठेवले नव्हते,
आईवडिलांनी हे ठेवले नव्हते, आणि अॅडमिननी ठेवू दिले, म्हणून स्वतःच ठेवून घेऊन समाधान करून घेतले.
(बघा बघा, इतक्या पोस्टस पडल्या, पण अॅडमिनचे आभार मानतंय का कुणी? मी मानले! :फिदी:)
Pages