मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोणगा: तुमची रेल्वे प्रवास धास्ती वाचून मला माझे काका, बाबा डोळ्यांसमोर आले. रेल्वे प्रवासात त्यांनी आठवणीने रेल्वेचे तिकिट मुद्दाम स्वतःकडे ठेवलेले असते (काकू, आईला सांगून की माझ्याकडेच बरं आहे तिकिट वगैरे;-)) आणि जेव्हा टीसी येतो तेव्हा ते असे काही नर्व्हस होतात की सर्व खिसे चाचपतील, उलटे-पालटे करतील, पण तिकिट काही सापडणार नाही. मग अशा वेळी एवढा काळ स्थितप्रज्ञतेचा आव आणणार्‍या काकू, आई कसेबसे हसू दाबत त्यांना मार्गदर्शन करतात : त्या उजव्या खिशात ठेवलंय तुम्ही तिकिट, रुमालाच्या घडीच्या मागे बघा बरं...... मग एकदाचे तिकिट सापडले की त्यांच्यासकट टीसी, कंपार्टमेन्ट्मधील इतर लोक सुटकेचा नि:श्वास टाकतात. तरी ते तिकिट चेक होऊन टीसी अंतर्धान पावेपर्यंत काका-बाबा यांच्या जीवात जीव नसतो! बिचारे घाम पुसत असतात Proud

एकदा मी तिकीट रात्रिचे बुक केलेय म्हणुन निवांत ऑफिस मधेच होतो. संध्याकाळी कॉफि प्यायला म्हणुन बाहेर पडल्यावर सहज तिकीटावर नजर टाकली नि हताश पणे त्यच्याकडेच पाहत बसलो... Sad नेहमी रात्रीच्या ट्रेन चे बुकींग करनारा मि, त्यावेळेस रात्रीचं बुकींग मिळालं नाही म्हनुन हुतात्माचे (६.०० वाजताचे) बुकींग केलेले आणि हे मला ५.५५ ला ऑफिसमध्ये कळ्ळे.. Sad

मला कोणी धीर देईल का?
सेम पिंच टोणगा...
मलाही नेहमी असेच अनसिक्युर्ड फिल होते... Uhoh टिसी येइल नि काहीतरी कारण सांगुन पैसे उकळेल म्हणुन.

त्यावेळेस रात्रीचं बुकींग मिळालं नाही म्हनुन हुतात्माचे (६.०० वाजताचे) बुकींग केलेले आणि हे मला ५.५५ ला ऑफिसमध्ये कळ्ळे.. >>> आणि मी अख्खी ट्रेन तुझ्यासाठी अजिबात हलु दिली नाही , तु येऊन तुझी तशरीफ त्या बाकड्यावर टाकेपर्यंत त्या ट्रेनच एकही चाक जागेवरुन कुठे जाऊ दिलं नव्हतं हे मात्र विसरलास मल्ली तु . Proud

मल्ल्या Lol

मी मुळी एसेस्सी होइपर्यन्त रेल्वेच पाहिली नव्हती. त्यामुळे त्या संस्कृतीची माहिती नाही. एक तर चालत्या गाडीत तक्रार कुठे करता येते ते माहीत नाही. प्लॅटफोर्मवर उतरून तक्रार करावी /मदत मिळवावी तर तोपर्यन्त गाडी निघून जाते. मुळात त्या प्लॅटफॉर्मवर कोणते ऑफिसर कुठे आहे तेही कळत नाही. छशिटला तर कोणत्या खिडकीत कोनते तिकीट मिळते ते कळत नाही. हल्ली तुम्ही कोनतेही तिकीट काढून प्रथम वर्गात बसले तर टी सी येऊन फरक भरू जागा असल्यास सीट अथवा बर्थ देतो. या भरोशावर एकदा एका जनशताब्दीत बसलो. खालचे तिकीट काढून फर्स्ट क्लासात. टीसीची वाट पहात. अपग्रेड करण्यासाठी. शेजारचा प्रवाशी बरीच रेल्वे 'घडलेला' होता. त्याने सांगितले अपग्रेड करन्याची सोय नीही . तुम्हाला पहिल्या स्थानकापासून पूर्ण भादे फर्स्ट क्लासचे आणि वर दन्ड भरावा लागेल. मग मी त्याला सांगितले ' आम्ही नेहमी अपग्रेड करतो वगैरे. त्याने सांगितले. जनशताब्दीचे रुल्स बाकी गाड्यापेक्षा वेगळी आहेत त्यात अपग्रेडेशनची सोय नाही. पूर्ण भाडे + दन्ड भरावा लागेल. मी आपला घाबरून टीसीची वाट पहात होतो. चालत्या गाडीतून उतरू तर शकत नव्हतो. गम्मत म्हनजे शेवट पर्यन्त टीसी आलाच नाही. पण प्रवास मात्र एन्जॉय करता आला नाही. सतत दडपण होते.

काही लोक टीसीला 'मॅनेज' करून काही लाच त्याला देऊन अधिकृत तिकीट न घेता कमी पैशात प्रवास करतात. पण टीसी बदलल्यावर पुढचा टीसी मात्र साग्रसंगीत दन्ड वसूल करतो.

या बाबत अन्उभव कृपया लिहावेत काही लोक रेल्वेत एकदम सराइत असतात.

बस मध्ये कंदक्तर ड्रायव्हर सोबत असतात त्यामुळे एक मानसिक सुरक्षितता वाटते. पन दिल्लीसारख्य ठिकाणी बसने कसे जाणार?

टोणगा मी सहमत आहे तुमच्याशी.

थोडं विषयांतर होईल पण ऐनवेळी गरज लागली तर बससारखे अथॉरिटी पर्सन्स रेल्वेत खूप सहज उपलब्ध होत नाहीत. Sad माझा स्वत:चा अत्यंत वाईट अनुभव रेल्वेचा... कोल्हापूरहून सह्याद्री एक्सप्रेस रात्री सुटते १० च्या आसपास. कोल्हापूर जंक्शन नाही. रात्री १० ला कोल्हापूरातून एकच ट्रेन सुटते आणि ओरिजिनेशन असल्याने ट्रेन आधीच लागून राहीलेली असते. माझं घर स्टेशन पासून लांब असल्याने मी अर्धातास आधीच स्टेशन वर येऊन बसले होते. माझ्या डब्यात बॅग ठेवून मी खाली उतरून बाकड्यावर बसले ते ही स्नॅक्स स्टॉलच्या समोर. रेल्वे (स्नॅक्स स्टॉलच्या) मागे होती. माझा चेहरा रेल्वेकडे होता. २ डब्यांच्या दरवाज्यात दोन माणसे उभं राहून गैरप्रकार करत होती. आणि त्यांचं लक्ष सगळं माझ्याकडेच होतं. अख्ख्या स्टेशनवर मी एकटीच मुलगी होते बाकी तुरळक गर्दी होती. माझं धाबं दणाणलं. एक क्षण उठून रिक्षा करून सरळ घरी जावं असा विचार केला, पण त्यातूनही वेगळा अर्थ उमटला असता म्हणून मी उठून सरळ स्नॅक्स सेंटर वाल्याशी सर्वं पदार्थांचे रेट विचारत वेळ घालवला, डब्याच्या दिशेने पाहिलं ते थेट गाडी सुटतानाच. मध्येच ती दोन माणसं मिळून निघून जाताना ही पाहिलं होतं. Sad

असे प्रकार बसमध्ये घडत नाहीत, अगदीच घडले तर यूनिट छोटं असल्याने पब्लिक त्यांना यथेच्छ मार देऊन शिक्षा करू शकतं.

अंतर थोडं असेल, सहज शक्य असेल तर; निदान एकटं प्रवास करणार्‍या स्त्रियांनी तरी बसचाच पर्याय निवडावा.

शिवाय अगदी फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा रिझर्वेशन नसलेले लोकही घुसतात तेही रात्री. टीसी एकदा चेकिन्ग झाले की जो गायब होतो तर ऐन वेलेला उगवत नाही. रेल्वे पोलीसांचा पुन्हा हद्दीचा तमाशा असतोच. त्यात पुन्हा रेल्वे सुर्क्षा बल आणि रेल्वे पोलीस ही वेगवेगळी खाती आहेत आणि त्यांची कामेही वेगवेगळी आहेत.

शिवाय अगदी फर्स्ट क्लासमध्ये सुद्धा रिझर्वेशन नसलेले लोकही घुसतात तेही रात्री. टीसी एकदा चेकिन्ग झाले की जो गायब होतो तर ऐन वेलेला उगवत नाही.
हे स्लिपर च्या बाबतीतही घडले आहे बर्‍याचदा.. Sad

मी तर कित्येकदा सह्याद्रीने प्रवास केला आहे. काही वर्षांपुर्वी सह्याद्रीवर मध्यरात्री दरोडे पडले दोनेक वेळेला त्यानंतर बंदुकधारी पोलिस नेमले तैनातीला. ते पोलिस रात्री सगळ्या खिडक्या बंद करायचा फतवा काढत येतात... ते पण डुलत... Sad
असे डोलकर काय डोंबल संरक्षण करणार प्रवाश्यांचं?

ह्याला पण वेंधळेपणा म्हणूया का >> नको Proud मग लोक वेंधळेपणाच्या नावाखाली काही पण पोस्टतील इथे .. Wink

आताच लेकाचा फोन होता.

तो : "आई वाइट बातमी"

मी : " काय पेपर पुर्ण लिहुन नाही का झाला" Uhoh

तो : "झाला ग.. चांगला गेला पेपर. पण सायन्सचा पेपर उद्या (शनीवार) एवजी सोमवारी आहे"

मी: "असे कसे एन वेळी परिक्षेचे टाइमटेबल बदलतात Uhoh , आपण तर रविवारच्या वाढदिवसाच्या पार्टीची दवंडी देवुन बसलो Angry .. मी आज हाल्फ डे रजा पण घेतली तुझा अभ्यास घ्यायला Sad "

तो: "आज मित्राला म्हणालो... चला उद्याचा पेपर झाला की सुटलो.. तर त्याने सांगितले.. उद्या सुट्टी आहे , सोमवारी आहे पेपर.. मीच टाइमटेबल चुकीचे लिहीले होते"

मी : Angry

वर्षे... परत एकदा चेक करुन घे टाईम टेबल... नाहितर सोमवारी अजुन एक पोस्ट पडेल इथे... 'लेकाचा पेपर शनीवारी झाला आणि मला वाटल आजच आहे' Proud

परत एकदा चेक करुन घे टाईम टेबल... >>> आधी तेच केले ग जो Happy

तिसरीत असताना बाबा अभ्यास घ्यायचा.. म्हणजे फक्त एकाच परीक्षेला घेतलेला.. मी मस्त गावाला निघुन गेले.. घेतोय तर घेउ दे अभ्यास म्हणत .. रात्री उशीरा पर्यंत गणिताचा अभ्यास घेतला बाबाने.. दुसर्‍या दिवशी लेकाने फोन करुन सांगितले. .. "आज सायन्सचा पेपर होता... मी चुकीचे टाइमटेबल सांगितले बाबांना..."

त्या वेळी मात्र मी चिडले नव्हते.. खुप हसले होते Rofl

आजच मला माझ्यातील एका वेंधळेपणाचा इतक्या वर्षांनी साक्षात्कार झाला [हा देखील अजून एक वेंधळेपणा!]
की एखादा सबटायटल्स सहित माहिती/ कळत असलेल्या भाषेतील पिक्चर लागला तरी तो पिक्चर मी 'वाचत वाचत' बघते..... म्हणजे डायलॉग्ज कळत असले तरी........ बाकी लोक्स पिक्चरचा आनन्द घेताहेत न मी संवाद वाचत आहे.... सवय! Wink आणि इतकी वर्षे हे माझ्या लक्षातच आले नव्हते! Proud

नमस्कार मंडळी...
कॉलेज च्या वेळचा किस्सा आठवला....

कॉलेज ला असताना सुरुवातीला सायकल वर जायचे...काही दिवसांनी नवीन गाडी घेतली.. पहिल्या दिवशी अगदी ऐटीत घेऊन गेले.
लेक्चर संपल्यावर सवयी प्रमाणे सायकल शोधत होते अर्धा तास...नंतर गाडीची किल्ली बघितल्यावर लक्षात आलं कि आज सायकल नाही..गाडी आणलीये..:)

लोकहो एक लक्षात आलं का , बाप बनल्यापासुन मल्लीचा वेंधळेपणा कमी झाला आहे .
की मायबोली समजुन तो भलतीकडेच कुठे किस्से पोस्टतोय . Proud

घ्या! माझाही एक किस्सा! ऑफिस मधला....
एके दिवशी सकाळ पासून एका ठराविक मेल आयडी कडून मला वारंवार व्हायरस चे मेल्स येत होते. त्या मेल मध्ये प्रत्येक वेळी एक .zip फाईल असायची. मेल बघूनच
व्हायरस चा मेल आहे हे कळायचे आणि मी shift + del करून टाकायचे. (अशा प्रकारची .zip फाईल unzip केल्यास बर्‍याचदा एक .exe फाईल असते जी run करू गेल्यास computer ची screen अचानक धरणीकंप झाल्याप्रमाणे हादरू लागणे, लाल-निळे-पिवळेधम्मक रंग अचानक screen वर थैमान घालू लागणे, मध्येच एखादा msg box अवतीर्ण होणे व काही केल्या बंद न होणे अशा प्रकारचे वात्रट चाळे सुरु होतात. computer restart शिवाय ते थांबत नाहीत. कधी कधी computer च्या hard-disk ला हानी पोचवू शकणारे व्हायरस सुद्धा त्यात असू शकतात. सर्वांना हे माहीत असेलच.)
त्या दिवशी त्या मेल आयडी ने मला अगदी हैराण करून सोडले होते. lunch नंतर मी आणि माझी टीम लीडर (T.L.) माझ्या मशीन वर एका महत्त्वाच्या issue वर काम करत होतो आणि अचानक पुन्हा त्याच आयडी कडून तसाच मेल परत आला. सोबत पुन्हा एक .zip फाईल attachment. आता मात्र माझा patience संपला. मी तावातावाने त्या मेलच्या reply बटनावर click केले आणि मेल ला reply म्हणून एक msg खरडला आणि विजयी मुद्रेने बाजूला बसलेल्या माझ्या T.L. कडे पाहीले. तर ती हसून हसून वेडी व्हायची शिल्लक होती. मला कळेचना की हिला झाले तरी काय! माझा प्रश्नार्थक चेहरा बघून ती हसण्यावर कसाबसा ctrl करत मला म्हणाली की "जरा देख तुने क्या लिखा है" असं म्हणून पुन्हा खी खी चालू झालं तिचं. मी गोंधळून माझ्या computer screen कडे पाहिलं आणि माझा चेहरा बघण्यासारखा झाला. मी जे लिहिलं ते हे होतं:
"हा हा हा! तुम्हारा बहुत बडा पोपट हुआ है| मैंने तो तुम्हारा झिप खोला ही नही"
(ha ha ha! tera bahut bada popat hua hai. maine to tumhara zip kholaa hi nahi).

निंबुडा Rofl

Rofl

Rofl

Rofl

Pages