मायबोलीकरांच्या वापरावयाच्या नावांची कथा

Submitted by राजधर्म on 6 April, 2010 - 12:00

माबोवर अतिशय सुंदर आणि अर्थपूर्ण नावे (सभासदाचे नाव) आढळतात. आपल्याला हे नाव कसे सुचले हे जाणून घ्यायला आवडेल.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ह्या धाग्या कडे दुर्लक्षच झालं २-३ दिवसांपासुन.
वेबमास्तर , Lol
पग्या, हवा गेल्या पेक्षा एखादा अत्यंत उर्मट टोणगासदृश टग्याशी मिळता जुळता आयडी(फक्त आयडीच) वाटतो.

भारी वाटलं एक एक आयडींचे उगम वाचुन. माझा पहिला आयडी naynishv होता. माझा पहिला याहु चा इमेल आयडी पण हाच आहे त्यामुळे सहजच हा आयडी घेतला गेला. नंतर आयडींचं मराठीकरण झालं तेव्हा वैद्यबुवा हा आयडी घेतला. ह्या आयडीघेण्या मागे सुद्धा केदारच जवाबदार आहे. एकदा त्यानी दगडु तेली मसाल्यालाच्या चर्चेला वैतागुन मला "वैद्यबुवा, हा तेल्या मेला तरी मसाल्यारुपी उरणार आहे इथे" असं म्हणाला ते लक्षात होतं आणि मग वैद्यबुवा हाच आयडी घेतला.
हुड, इथे कधी येणार आहेस? आम्हाला सगळ्यांनाच उत्सुकता आहे तु नेमका कोणत्या चोरांचा (वाचा: टोणग्यांचा) राजकुमार आहेस ते.

माझ्या नावाची म्हणजे नाव-वडिलांचं नाव- आडनाव या गाडीची याच क्रमाने.. आद्याक्षरे आहेत ही.
इतपत सांगितिक आद्याक्षरे मिळण्यासाठी आजी आजोबा (बाबांचे नाव त्यांनी ठेवले), त्यावेळेला ध अक्षर काढून देणारा ज्योतिषी आणि माझे आईबाबा, माझ्या जन्मानंतर नी अक्षर काढून देणारा ज्योतिषी यांचे आभारच मानले पाहिजेत. Happy

माझ्या आधीच्या आयडीबद्दल मी काहीही सांगणार नाही. विचारू नये.. Wink

आमचे हे मला प्रेमानी 'मो' म्हणून हाक मारतात आणि मायबोलीची ओळख त्यांनींच करुन दिली म्हणून त्यांच्याकरता हा आयडी Blush

आपुन का फंडा एकदम सिंपल है...

जुना आयडी himscool होता.. नावातील आणि आडनावातील हिम आणि कुल वापरुन बनवलेला.... द्विरुक्ती होतीये पण त्याला नाविलाज आहे..

माझा याहूचा आयडी पण तोच आहे... आणि आता त्याचेच मराठीकरण करुन टाकले आहे...

जरा डोकं लावून मराठी आयडी थंडहिम वगैरे घ्यायला पाहिजे होता... पण मग हा कोण नविन थंड माणूस असा आरडाओरडा लगेच चालू झाला असता....

अरे वा! मस्तच धागा आहे हा.. Happy
माझ्या खर्‍या नावाचा आयडी इथे मिळाला नाही मला, (ते पण बर्‍याच वर्षापुर्वी) आणि आडनावासकट मिळाला असता पण तसा नको होता, म्हणून माझ्या नावरस 'दक्षिणा' या नावाने इथे आयडी घेतला... Happy
आता विचार केला की बरं वाटतं खर्‍या नावाने आयडी मिळाला नाही ते... Happy

मी माझ्या भाचीला चिंगी म्हणायचे.. लग्नानंतर अहो ना पण आवडलं म्हणुन मग त्यांना मलाच चिंगी म्हणायला सुरु केलं .. म्हणुन मी चिंगी..blush.gif

माझा याहू आयडी nandini2911 असा होता. कारण नंदिनी देसाई च्या कॉम्बिनेशनम्धे काहीच उपलब्ध नव्हते. तोच आयडी गूगलवर आला आणि तोच आयडी मायबोलीवर देखील.

मायबोलीचे देवनागरीकरण झाले तेव्हा मराठी नंदिनी असा सुटसुटीत आयडी घेतला आणि साजिरादानी दिलेल्या दमामुळे २९११ कॅन्सल करून टाकले. आता माझा वाढदिवस कुण्णाच्याच लक्षात राहत नाही Sad

काय मजा आहेत आयड्यांच्या एक एक. आधी माझा 'गंगी' असा होता कारण लेक तेव्हा अनेकदा 'गाढवाचं लग्न' बघायची आणि त्यातली सविता म्हापसेकरची गंगी तिला आवडायची. तिला विचारले मी प्रिटंड नाव काय घेऊ तिने गंगी सांगितले. पण त्या नावाने मला उगीचच गंगी या पात्रासारखे ढालगज वाटायला लागले आणि मी माझा आय डी बदलला. हे माझ्या दिवंगत आजीचे नांव आहे.

लोकांच्या कल्याणा संतांच्या विभुती असे आपल्या राखी सावंत ने बोलल्याचे ऐकले होते, आणी मायबोलीवर पापी लोकांची पापे खुप वाढायला लागली आहेत अशी खुद्द अ‍ॅडमीन ने तक्रार केलेली ....म्हणुन तुमच्या सर्वांच्या पापनिर्दालनासाठी तुम्हा सर्वानी राम नामाचा थोडा तरी जप करावा या सदहेतुने मि 'राम' हा आयडी घेतला... या आयडी चा आणी माझ्या चारीत्र्यवान आयुश्याचा काहीही संबंध नाही हे जाणकार ( आयला !!!!! हा आयडी पण लै भारी आहे यार) माबोकरांच्या लक्षात आले असेलच..

गौतम७स्टार | गौतम७स्टार = गौतम + सात + तारा = गौतम + सातारा,
चमकला शुक्रतारा, जावळी, सांगली, सातारा हे बर्‍याच रिक्शांवर वाचलयं !
--------------------------------------------------------

चिंगी | मी माझ्या भाचीला चिंगी म्हणायचे.. लग्नानंतर अहो ना पण आवडलं म्हणुन मग त्यांना मलाच चिंगी म्हणायला सुरु केलं .. म्हणुन मी चिंगी..

माझ्या एका भाचीला टोपणनाव आहे "चिऊचिंगी". नवीन आयडीसाठी एकदम झकास !!

वाव मस्तच एकदम...

आता आमच्या सारखे लोक्स काय सांगणार?? आईबाबांनी दुर्मिळ नाव ठेवलेय बहुतेक.. त्यामुळे माझ्याच नावाचा आयडी देवनागरीकरण झाल्यावर लगेच मिळाला.

मी मायबोलीवर सुरवात केली ती माझे मन या आयडीने. तेव्हा 'माझे मन तुझे झाले' हे गाणे सतत गात असे Happy पण मायबोलीचे व्यसन नव्हते त्यामुळे काही दिवसातच पासवर्ड विसरुन गेले. अ‍ॅडमिनने पासवर्ड पाठवला पण तरीही लॉगीन करता येईना म्हणुन मग मुलीचे नाव घेतले 'अ‍ॅशबेबी'.... (अजुनही दक्षिणा मला बेबेच म्हणते Happy ) मुलगी माबोकरीण झाल्यास तिला कदाचित हा आयडी हवासा वाटेल म्हणुन मग मी देवनागरीकरणानंतर माझ्याच नावाचा आयडी घेतला. (तिने मात्र 'अ‍ॅशबेबी' आयडीकडे ढुंकुनही पाहिले नाही.)

माझ्या नावाचा आय डी आधीच कोणीतरी घेतला होता Sad
मग माझ्या नावासोबत माझा माथाडी कामगाराचा बिल्ला नंबर जोडला Proud

तोषा Lol

नाव माणिक असले तरी सगळे मित्रमैत्रिणी माणक्या म्हणूनच हाक मारतात पहिल्यापासून.. त्या सगळ्या मित्रांसाठी हा आयडी Happy

जल्मल्यापासून झुरळापासून पालीपर्यन्त अन शाळेत त्रास देणार्‍या टोणग्यान्पासून घरात पिताश्रीन्पर्यन्त सार्‍यान्ना घाबरतच आलो. घाबरवण्यात जन्म गेला त्यान्चा, पण वन्शपरम्परागत भिक्षुकिशिवाय मागे काहि सोड्ले नाहि. भिक्षुकितही अनुल्लेख आणि हेटाळणीशिवाय पदरी फार काही पडायचे नाहि. मग रानाभिमदेवि थाटात बोम्बी आयुष्यात आलि अन सारे पालटूनच गेले. महिषासुरमर्दिनीच म्हना. दक्षिणा म्हणून किडूकमिडूक भिक दिल्यागत झोळित पडत होते, ते आता वट्ट अधपाव काजू बदाम खारका साजुक तुपाच्या शिर्‍यासकट पडू लागला. लोक बोम्ब्या भट म्हणू लागले. बोम्बीने आणि तिच्या बापाने खडसावून सान्गितल्याप्रमाणे पूजेआधीच बोम्बा मरून दक्षिणा टेकवा असे सान्गण्याचा हा परिणाम. आता लोक म्हणतात बोम्ब्या हलकट आहे. माजला आहे. बोम्बा ठोकून आधिच दक्षिणा मागतो. पण रुपयांचा धूर करून हजारो रुपयान्च्या पैठण्या नेसून पूजा सान्गतानाहि कुचाळक्या करणार्‍या अनुल्लेखशिरोमणी बायकान्ना असेच पाहिजे. आताशा दक्षिणेत इतके काजू-बदाम मिळतात कि ते खाऊन बोम्बीचे बोचके झाले आहे. ती जेव्हा ओरडते, तेव्हा बोचक्याला भोक पाडून त्यातले कुत्रे तोंड बाहेर काढून वचावचा भुन्कल्याचा भास होतो. पण तिचा अधिकारच आहे तो.

आदरार्थी बहुवचन... त्या बाहुल्या बघून मी नतमस्तक झालेय.. (अशी घडी क्वचितच येते तेव्हा आदर करून घेणे.. न जाणो हिचं डोकं कधी फिरेल... असं कोणतरी खुसखुसतंय तिकडे!)

नीधप... धन्यवाद....
विनम्रतेने मान झुकवून डोळ्यांची उघडझाप करणारी बाहुली असते का?>>>> सावंतांच्या राखीचा कुठलाही फोटो चालेल... तिची विनम्रता, शालीनता आणी त्या सुंदर डोळ्यांच्या पापण्यांची अप्रतीम उघडझाप... आहाहा....

आधी साधं सरळ राम म्हणलं तर गडी कायच्या काय बोलायला लागला... आता राम्या रे आवर आता म्हणायची वेळ आणली.. (दिवे घेशीलच! Wink )

Pages