बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक फुग्या मिरची चं रायतं. हिर्व्या फुग्या मिर्च्यांचे छोटे चौकोनी तुकडे करावेत ( १/२ इंच डाइस ). थोड्या तेलावर फक्त हिंग अन मोहरीची फोडणी करायची अन त्यावर मिरचीचे तुकडे परतायचे. अगदी मऊ शिजवू नयेत. जरासे कुरकुरीत राहिले पाहिजेत. परतून झाले की मीठ घालून सारखं करून गार झाल्यावर फ्रिज मधे ठेवता येतं ४-५ दिवस. पाहिजे तेंव्हा रूम टेम्परेचर ला आलं की दही घालून नीट मिसळुन घ्यायचं. आधी करून ठेवता येण्या सारखा प्रकार असल्याने आयत्यावेळी फार श्रम पडत नाहीत.

नमस्कार,

गणपतीला सन्ध्याकाली २५-३० जणाना बोलावलेय. वीक डे असल्याने मेनु अगदि सुट्सुटित थेवायचा आहे. मीसल-पाव, पुलाव,रायता,आळुवडी, खोबर्यचि वडी, मोदक अनि लहान मुलाना मकरोनि-चीझ अस विचार करतेय.

मीसळ्-पावाला काहि दुसरा पर्याय सुचवा जानकर मन्डली..फार मसालेदार होइल का मीसळ्-पाव? सुटि घेने शक्य नसल्यने सगले पदार्थ १-२ दिवस करत येतिल किन्वा त्यन्ची पुर्वतयारी तरी करता आली पाहिजे.

उपमा, वाटली डाळ, आळुवडी (फ्रोझन ना ?) खोबर्‍याची वडी, मोदक आणि लहान मुलांना काय ते. रवा भाजुन, भाज्या/कोथींबीर चिरुन, डाळ भिजवुन-बारीक करुन अशी तयारी करुन ठेवता येईल. खोबर्‍यच्या वड्या आधी करणार असाल.

स्वाती, गणपतीच्या निमित्ताने बोलावत असशील तर मिसळ-पाव नको. पुलाव (किंवा मसालेभात) बरोबर एखादी भाजी/उसळ केली आणि चपात्या करुन देणारे कोणी असेल तर विकत आणता येतील. बाकीचा मेनू ठीक वाटतो आहे. मुले सुद्धा हे जेऊ शकतील, हवं तर साधा भात/वरण ठेव. गणपतीच्या दिवशी मॅकरोनी जरा विचित्र वाटते म्हणून. पण येणारी मुले काय खातील हे तुलाच माहित तेव्हा तू ठरव.
सिन्ड्रेला, वाटली डाळ अनंत चतुर्दशीला करतात गं. एरवी चालेल, पण आल्या दिवशीच त्याला वाटेल घालवत आहेत की काय.. Happy Light 1
काही वेळा मेनू ठरवताना प्रसंगाला खूप महत्व द्यायला लागतं. हा तसाच एक दिवस आहे.

जिरा राईस, दाल तडका, तळलेला पापड

तुपात तळलेल्या बटाटा क्युब्स ची ओलसर भाजी (सॉस बनवताना त्यात काजु आणि कसुरी मेथी टाकायची, व मिक्सर मधुन पेस्ट बनवुन घ्यायची) थोडी तिखट

खिर

Apple cider

हो, मलाहि मकरोनी जर विसन्गतच वाटतेय..खोबरर्याचि अनि आळुची वडी आधिच्या वीकएन्ड्लाच करणार आहे. ऑफिसमधिल बहुतनशी नोन्-महाराश्त्रिअन आहेत त्यामुळे त्याना अस्सल म्हराथमोळे पदार्थ खायचे आहेत म्हनुन मिसळ्-पाव मनात आले...:)

भरली वान्गी आनि अजुन एखादि भाजी करत येइल. जोडीला मसालेभात.

तुपात तळलेल्या बटाटा क्युब्स ची ओलसर भाजी (सॉस बनवताना त्यात काजु आणि कसुरी मेथी टाकायची, व मिक्सर मधुन पेस्ट बनवुन घ्यायची) थोडी तिखट>>> माणूस, तुम्ही सुचवलेला बेत (जिरा राइस, दाल तडका वगैरे.) आवडला. पण बटाटा क्युब्स ची ओलसर भाजीची सविस्तर कृती देऊ शकाल का?

मला वाटले संध्याकाळी फक्त आरतीसाठी लोक येणार त्यांना नाष्ट्यासाठी काही करायचे आहे. म्हणुन वाटली डाळ Happy
.
माणसा, घरी लोक आले तर वरण्-भातावर बोळवण करतात काय ? जीरा-राईस-दाल तडका असे नाव दिले तरी शेवटी तो वरण्-भातच Wink

सन्ध्याकलि आरतीला ७:३० ला बोलवणार म्हणजे पोटभरीचे जेवणच बरे वाटते.

वीक डे असल्याने किती लोक येतिल ह्याच अन्दाज करायलहि तसे अवघड वाटतेय.

नाह!

In this combination, attractiveness, smell of food counts a lot.

Take the baasmati rice, while cooking add some pure ghee. garnish it with some coriander leaves. Same with dal, you get these kashmiri round red chillis, they look really good with the tadaka daal.

खिरी मधे थोडे केशर आणि बकीचे dry fruites टाकुन चव आणि looks आणता येतील.

@tvjoshi

बटाट्याच्या साली काढुन, खाता येतील अश्या आकाराचे चौकोणी तुकडे करायचे. panner cubes असतात ना, तसे.
Fry them in ghee until cooked and they have got that reddish layer

नंतर तेलात किंवा तुपात, जिरे, एखादे तमालपत्र, आणि एक दोन फुले/फळे टाकायचे. हिरव्या मिरच्या, आले लसणाची पेस्ट, नंतर कांदा टाकायचा, हे सगळे निट लाल भाजल्यावर काजु, कसुरी मेथी, काजु शिजल्यावर टॉमॅटो.

हे सगळे निट शिजले की, थोडे थंड झाल्यावर मिस्कर मधुन काढ,

नंतर परत थोडे तेल तापवायचे, त्यात परत किंचीत जिरे टाकुन मग वर मिक्सर मधुन काढलेला मसाला परतुन घ्यायचा. हळद, काळा मसाला मिठ वैगेरे आता टाकुन किंचीत भाजुन घ्या.

नंतर तळलेली बटाटे ह्यात टाकायचे, एक दोन मिनीट शिजुन द्यायचे, झाली भाजी तयार. Happy
वाटले तर थोडे पाणी टाकायचे.

तुपामुळे आणि वासामुळे पोट गच्च भरते.

एका डिश मधे Strawberries, cherries अजुन एक हिरव्या रंगाचे फळ असते, नाव विसरलो त्याचे ते ठेवायचे.

ह्या मेनु बरोबर apple cider अजुन चव वाढवतो, व ज्यांना wine ची हुक्की आली असेल, त्यांची तहान देखील cider ने संपवता येते Happy

Plus, i'll sugest you prepare the masala a in day advance, so that next day there wont be any cooking smell in the house when guests arrive. However fry the potatoes on that day, so it adds little flavor in the air. Happy

sorry, i wont keep cherries, the color clashes with strawberries and also at the end of the dinner, the plate wont be empty. it'll have those cherry seeds in it.

However i'll make sure that the kheer and papad is there.

स्वाती, गणपतीच्या दिवशी प्रसादाचं जेवण म्हणून मिसळ पाव अगदीच विसंगत वाटतंय. मिसळ अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ असला तरी त्यात कांदा लसूण असतो.
मसालेभाताबरोबर टोमॅटोचं सार करता येईल. बरोबर मोदक, रायता, अळूवडी वगैरे पदार्थ आहेतच, तेवढीच डिश माझ्या मते पुरेशी होईल. सकाळी टोमॅटोचं सार करून फ्रिजमध्ये ठेवायचे, आयत्या वेळी फोडणी देऊन उकळी काढता येईल.
.
तेलात किंवा तुपात, जिरे, एखादे तमालपत्र, आणि एक दोन फुले/फळे टाकायचे.
माणसा, फुल म्हणजे लवंग आणि फळ म्हणजे काळी मिरी का? कळलं नाही नीटसं.....

मसालेभाताबरोबर मठ्ठा मस्त वाटतो आणि सोबत पुरी आणि बटाट्याची भाजी, श्रीखंड आणि काकडीची कोशिंबीर....टिपीकल मराठी मेनु Happy
लहान मुले पुरी, श्रीखंड, भाजी आवडीने खातील.
श्रीखंड, भाजी, ताक, मसाले भाताची तयारी आदल्या दिवशीच करता येईल...पुरी बाहेरुन मागवता येईल आणि एन वेळी मसाले भात आणि कोशिंबीर..मसाले भातावर मस्त खोबरं, कोथिंबीर आणि लिंबु...तोंडाला पाणी सुटलं...मोदक, अळूवडी आहेच अजुन सोबतीला Happy

खरच मस्त आहे हा मेनु... तसे पहिल्यान्दाच एवढ्या लोकान्चे करायला थोडे टेन्शन येतेय. तुमचे अभिप्राय खुप मोलाचे आहेत..तुम्हा सगळ्याना धन्यवाद!

मला माझ्या मुलाच्या एक वर्शाच्या वाढदिवसाला २० जण बोलवायचे आहेत्.मोठे १३ जण आणि ३-५ वयोगटातील ७ मुले.मदतीला कोणी नाही.मुलाकडे पण बघुन एकटिने सगळे करता येइल अणि आदल्या दिवशी तयारी करून ठेवता येइल असा बेत हवा आहे.परवाच एका वाढदिवसाला भाज्या घालून उपमा आणि दहीवडे झाले आहेत्.तेव्हा हे सोडून काही सान्गा प्लीज.

इडली चटणी ( यात वेगवेगळ्या स्वादाच्या रंगाच्या इडल्या ) सांज्याच्या पोळ्या, रगडा पॅटिस.
हे सगळे प्रकार आदल्या दिवशी सवडीने करता येतील. इडल्या फक्त परत मायक्रोवेव्ह मधे गरम करायच्या. रगडा गरम करायचा, आणि पॅटिस फक्त तव्यावर गरम करायचे. रगड्यासाठी गोड व तिखट चटणी वेगळी करायची म्हणजे मोठी माणसे चवीपमाणे तिखट खातील.
पॅटिस साठी जर मोठे बटाटे मिळाले तर त्याच्या अर्धा इंच जाड कापा करून तश्याच शॅलो फ्राय करायच्या.

एक प्रश्न आहे. कुठे टाकावा कळले नाही म्हणून इथे विचारते. क्रुपया योग्य जागी हलवावा.
मी जेव्हा सायीला विरजण लावते तुप करायला, तेव्हा लोणी तर चांगल निघत; पण ताक मात्र कडू लागत, ताज असल तरीही. अस आधी होत नव्हत, दुध तेच आहे, पद्धत तिच आहे, (आणि करणारी व्यक्ति सुद्धा :स्मित:)

इडली करणे अवघड आहे कारण माझ्याकडे पात्र नाही.रगडा पाटीस छान आहे.मला व्हेज कटलेट + केचप ,पाईनअपल शीरा आणि आम्बा लस्सी असा १ बेत सुचला आहे. हा कसा वाटतो? व्हेज कटलेट ऐवजी पालक पुर्‍या आणि टोमाटो पुर्‍या देखील करता येतील. शिवाय वेफर्स, चीप्स वगैरे असेलच.अजून काही सुचते आहे का?पाईनअपल शीरा कसा करतात हे माहिती आहे का कुणाला?

इडल्या थेट डब्यात उकडुन चौकोनी तूकडे करता येतील.
अननसाच्या शिर्‍याची कृति मी लिहिली होती.
पालक पुर्‍या आणि टोमॅटो पुर्‍या केल्या तर हळद घालुन पिवळ्या आणि नुसते मिठ मिरी घालुन पांढर्‍या पुर्‍या करता येतील. या लाटुन थोडा वेळ पसरून ठेवायच्या. मग टोचे मारुन कडक तळायच्या. मग या आदल्या दिवशी करुन ठेवल्या तरी चालतील.
याबरोबर गोड तिखट चटण्या द्याव्यात.

सुरभि-माझेही आधी हेच व्हायचे. त्यावर उपाय- साय जमा करायला सुरवात केली की लगेच थोडं दही घालायचं- मग पुरेशी साय हळूहळू जमल्यावर, फ्रिजमधून काढून परत एकदा विरजण लावून, दुस-या दिवशी लोणी काढून तूप कढवायच. ताक कडू लागत नाही.

रैना, पण मग ती साय दुसर्या कशाला लागत असेल तर वापरता येत नाही ना आधी दही घातल असल की. मी अगदी पुर्वी पासून अगदी शेवटी दही घालते, पण हे कडू ताक प्रकरण आताच सुरु झाल. एवढ ताक टाकून द्यायला लागत.

सुरभी, कधी कधी दुधाचाच दोष असू शकतो, त्यासाठी ठराविक कारण असं काही देता येत नाही. विरजण लावायच्या पद्धतीत बदल करून पहायचा.. दूध normal temparature ला असतानाच फक्त साय (थोडंही दूध नको) काढून लगेच फ्रिजमध्ये भांडं ठेवायचं, त्यावर दुसर्‍या दिवशीची, त्यावर तिसर्‍या दिवशीची असं करत ढवळाढवळ न करता साय साठवून बघ. पुरेशी साय जमली की मग एकदमच विरजण्यापुरतं दूध घालून आवश्यक तेवढं गरम कर आणि विरजणापुरेसं दही घालून चमच्याने सावकाश पण भरपूर ढवळ आणि झाकून विरजणासाठी ठेव.
बघ काही फरक पडतो का..

विरजणाचाही दोष असू शकतो. विरजणासाठी जे दही घालते आहेस ते कसं आहे बघ.

पालक पुरी, टोंमॅटो पुरी आणि मेथी पुरीची रेसिपी हवी आहे. इथे आधीच कुठे असेल तर लिंक दिलीत तरी चालेल.

-प्रिन्सेस...

ग्अग्ण्पती साटी एबनआ कादआ ल्अस्णइचइ बाजि सुचअवा

वरील वाक्याचे "मराठीत" भाषांतर :- गणपतीसाठी एक बिना कांदा-लसणाची भाजी सुचवा Happy

मनुरुची, देवनागरीत कसे लिहावे ह्यासाठी इथे मदत मिळेल.

प्रिंसेस, पालक पुरीसाठी थोड्या तेलात (गरम करून) हिंग, तीळ, ओवा, पालक आणि आलं-लसूण्-हिरवीमिरची (वाटून) परतायची. हळद, तिखट मीठ घालायचं. हे मिश्रण मिक्सरमधून काढून ह्यात मावेल इतकी कणीक घालून मळायचं. वरून पाणी घालावं लागत नाही. गरम तेलात पुर्‍या तळायच्या. मेथीला असंच सगळं, फक्त पानं खुडून (तेलात न परतता टाकली तरी चालतात.) टॉमॅटॉ पुर्‍या कधी केल्या नाहीत.
लालू, रागवू नकोस गं! पुर्‍यांचा नवा बीबी उघडेन नंतर! Happy

धन्यवाद मृण आणि लालु Happy

लालु तू का रागावतेय?
-प्रिन्सेस...

ती रागवंत नाही गं! मी आपलं उगीच म्हंटलंय!

Pages