बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मने, अभिनंदन ग. तरीच इकडे दिसत नाहिस हल्ली. Happy

ए आम्ही वालाच्या आमटीला बिरडं म्हणतो ग. तू वालाची उसळ म्हणते आहेस का? नाहितर दोन दोन आमट्या होतील. आगाऊ सल्ला वाटला न? का एकाच जेवणात सगळी सुग्रणता दाखवणार आहेस? Happy

मसालेभात आणि भरली वांगी दोन्ही एकदम? मसाला दोघांनाही सारखाच असतो न? परत एकदा आगाऊपणा. Happy

बरं ग जावईबापूंना एकदम खूष करून टाकणारस दिसतय. बघ हो नाहितर त्यांच्या कडून तुझ्या अपेक्षा नेहेमी असाच स्वयंपाक आपल्याला मिळेल अशा होतील. Happy

अग आर्च आगवुपणा कसला आलाय. ते वालाचे बिरडंच म्हणतेय मी. आमटी नाही.
अग आतापर्यन्त चिकन्,मटण,मासे नी बरेच काय काय बनवून झालेय प्रत्येक nj trip मध्ये.(काय आहे ना लग्न इतके पुढे ढकललेय ना तेव्हा हे चालणार आता...त्यात would be in-laws पण इथेच असल्याने बघू काय एवढे जेवण छान करते नी ते केल्याशिवाय कसे कळणार असे झालेय. ):). असो.

बरे आता मेनु विषयी, मला पण तो मसाला मसाला पदार्थ खूप झालय असे वाटतेय मग दुसरी भाजी करु तरी काय? खरेच काही दुसरी भा़जी करायची गरज आहे का? कोणी सुचवाल का?

(आशा आधीच वाढवू नको असे सल्ले मिळालेत(मैत्रींणीचे/घरच्यांचे) भरपूर माझे हे सर्व करणे बघून पण मी सांगून टाकलेय 'त्याला' माझे नोकरीचे तास ज्यास्त कधी कधी नी वेळा वेगळ्या असणार आहेत पण जमेल तसे मी आवडीने करेन सर्व तर तो 'हो'हो' हरकत नाही म्हणालाय. आता बघुया). Happy

मनुस्विनी, हार्दिक अभिनंदन!

तुझा मेनू वाचुन मलाच टेंशन आलय. तू खूपच पदार्थ करत्येस अस वाटतय. बघ गोडाचा एखादा पदर्थ जसे आमरस शिरा कमी करता येतोय का? त्या ऐवजी जेवण झाल्यावर कुल्फी देता येइल आणि ती तुला आधी पण करून ठेवता यइल. तूरीच्या आमटी ऐवजी मस्त गोडं वरण कर. सुरुवातीला गरम गरम वरण भात आणि त्यावर तूपाची धार... अगदी झक्कास. त्यातून मसाले भात असल्यावर आमटीची गरज नाही अस मला वाटत. तु आधीच खूप पदार्थ करत्येस पण हवीच असेल तर बटाट्याची भाजी टिपीकल मराठी जेवणात फिट्ट बसते. भरल्या वांग्या ऐवजी वांग्याचे काप शॅलो फ्राय करून ठेवता येतील म्हणजे वड्यांचा प्रश्ण सुटला. साधेसे म्हणणारीला लाव फ्राय करायला. बघ पटतय का.

फार खपून सगळ करू नकोस. तुला 'त्यांच्या' बरोबर बोलायला शक्ती तर उरली पाहिजे ना? नाहीतर थकून जाशील गं एवढ सगळ करता करता...

all the best!

मनुस्विनी, अभिनंदन!! मला काय वाटते बघ हं, पटलं तर..उकडीचे मोदक आणि आमरस शिरा + दोन प्रकारचे भात खूप हेवी होईल. करायलाही आणि खायलाही. Happy आणि त्यात जर ते डाएट कॉन्शस असतील तर? साजुक तुपात भिजलेले उकडीचे मोदकच खरं तर ४-५ खाल्ले तरी जड होतं. मला वाटतं तू आमरस शिरा किंवा निवर्‍या यातले एकच कर.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क्या मौसम आया है क्या मौसम आया है
गीत गाए नदीया बूँदो मे है सरगम..!!

मनुस्विनी अभिनंदन. Happy तुझ्या नवर्‍याची चंगळ आहे. तू इतके मस्त मस्त पदार्थ बनवत असतेस. Happy

मला तातडीची मदत हवी आहे. उद्या ५ जणाना बोलवायचे ठरले आहे. त्यातले ३ वयस्कर आहेत आणि १ गरोदर आहे. इथे ऊनपण खूप आहे. त्यामुळे मसालेदार, तिखट काही करता येणार नाही. थोडा हलका पण तरिही पार्टीला चालेल असा मेनू सुचवा. आणि आज जरा तयारी करता येईल असा. त्यातले ४ जण चपातीच खातात. भात जवळ जवळ नाही. पण इथल्या हवेत त्या आधी करून ठेवणे शक्य नाही. मला नान हा एक पर्याय बरा वाटतो. कृपया मला लवकर लवकर सांगाल का? आणि हो, मांसाहारीपण चालेल.

नान गरोदर बाईला शक्यतो नको. कारण खाता खाताच ते बर्‍याचदा वातड होतात.
Happy
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क्या मौसम आया है क्या मौसम आया है
गीत गाए नदीया बूँदो मे है सरगम..!!

आशु हो गं. मी तिच्यासाठी नान नाही करणार. त्यात यीस्टपण असते ना. एकासाठी गरम गरम फुलके किंवा चपात्या करणे अवघड नाही. पण बाकी मेनू काय करावा ते सुचत नाहिये. पार्टी म्हटली की, सगळे मसालेदार पदार्थच आठवतात. Sad

मेथीचे पराठे आधी करुन ठेवता येतील. त्याबरोबर टॉमेटोचं सार, फुग्या मिरचीचं रायतं, फ्लावर - वटाण्याची भाजी, लेमन राइस किंवा पुळीयोगरे ( टॅमरिंड राइस ) असं चालेल का. सार, भाजी आधीच करून ठेवता येइल. फुग्या मिरच्या परतून ठेवता येतील. आयत्या वेळी मीठ अन दही मिसळायचं.
गोड प्रकार डोहाळकरणीच्या आवडीने करता येइल.
लाडू अन बर्फी चांदीच्या वाटीत झाकून ठेवून तिला एकच उचलायला सांगता येइल Happy

शोनू धन्यवाद. मेनू छान वाटतो आहे. लेमन राइस चालेल. चिंच चवीला घातलेलीपण चालत नाही. बाकी बरचसं आज करण्यासारखे आहे. Happy

नमस्कार ,
माला पूराणपोळी कशी करावी..हे कोणी सान्गेल का? प्लिझ.....

पुढच्या सोमवारी आमच्या घरी लघुरुद्र आहे. १५ जणांसाठी साबुदाणा खिचडी करायची आहे. किती साबुदाणा लागेल आणि दाण्याचे कुट?
गोड म्हणून पेढा द्यावा का? की आणखी काही? ( उपासाला चालेल असे )
..........................................................................
You are not what you think you are; but what you think,you are.

थन्क्स runi... अग मनगाळागौरी ला पूराण लागताच ना.

दोहालेजेवन- मेनु हवाय - १० बाय् का येनार आहेत. शाकाहारि/ नान् वेज कहिहि चालेल.

मेघना,
उपासाला चालेल आणि पोटभरीचं असं गोड हवे असेल तर छान दाट रबडी ठेवू शकतेस किंवा मसाला दुध.

हाय मनुस्विनी, जेवणाचा बेत कसा झाला? would be ना नक्किइच आवडला असेल..

जेवन मस्त झाले. हो नक्केच आवडले would be ना. आदल्या दिवशी ऑफीसमधून येवून एकटीने जे रात्री १२:३० ला बिरडं (जवळपास १ lbs)साफ करायला सुरुवात केली ते ३:०० ला वगैरे संपले. त्याबरोबर बाजूला मोदकासाठी चोव शिजत होता. चटण्या त्यानंतर.
(बिरडं हा प्रकार ५-६ माणसासाठी कधीही ठेवणार नाही हा खडा लावलाय. ते म्हणतात ना 'वाट लगेली थी') Happy

.

हे 'बिरड' काय प्रकार आहे कोणी सांगेन का इथे ??

****************************
Biggrin Biggrin Biggrin Biggrin

कडवे वालाची साले काढलेली उसळ

उसळीची कशी बर सालं काढणार? Happy

 
 
==============
बजे सरगम हर तरफ से | ताल कदमो पे छाये जाये |
लब पे जागे गीत ऐसा | गूंजे बनकर देश राग||

वालाची साल काढायची आणी मग उसळ करायची त्याला बिरड म्हणतात
तसच उडीद आणी मुगाचे पण करतात ते जरा जास्त वेळखाउ आहे

रविवारी सगळे मिळून १५ जण जेवायला बोलावले आहेत काय मेनु करावा सुचवाल का? माझा मेनु असा होता मसाले भात, सोलकदी,पनीर कङयी,श्री़खड्,पुरी, पाटवड्या
+ भाजी कसा आहे? अजुन काय भाजी करु?

नीता

रविवारी सगळे मिळून १५ जण जेवायला बोलावले आहेत काय मेनु करावा सुचवाल का? माझा मेनु असा होता मसाले भात, सोलकदी,पनीर कङयी,श्री़खड्,पुरी, पाटवड्या
+ भाजी कसा आहे? अजुन काय भाजी करु?

नीता

बाकी सगळ्या मेनु ला पनीर कढाई विसंगत वाटेल, फ्लॉवर ची रस्सा भाजी, भरली वांगी, पालकाची पातळ भाजी, फरसबी किंवा भेंडिची सुकी भाजी चालेल का?

चालेल. २ भाज्या १ कोशिबीर करीन + बाकीचा मेनू आहेच.

वरती लिहीलेल फुग्या मिरच्यांच रायत कस करायच?

सिमला मिरचीला तेल लावून, गॅसवर भाजून नंतर झाकून ठेवायचं. गार झाली की साल काढून बारिक तुकडे करायचे किंवा कुस्करून घ्यायचं. दही, मीठ, साखर, तिखट आणि शेंगदाण्याचा कूट (नसला तरी चालतं) घालून वरून हिंग मोहरी किंवा हिंग जीर्‍याची फोडणी द्यायची. चिरलेली कोथिंबीर घालायची. सि. मि. भाजायची नसेल तर बारिक चिरून, तेलात खमंग परतून घेतली तरी चालते. ओला नारळ घालून आणखी चव येते.
असंच परतून भोपळ्याचं, भेंडीचं (फोडी तळून), वांग्याचं (पातळ कापट्या तळून) आणि उकडलेल्या बटाट्याचं रायतं करता येतं. एकदा वांग्याच्या रायत्यात लोणचं मसाला घालून पण खाल्लंय मैत्रीणीकडे. छान लागलं.

तांबड्या भोपळ्याचं ना ? उकडलेल्या बीट रुटच्या लहान लहान फोडींचं पण छान लागतं असच रायतं.
.
नीता, मला जेवायला बोलावले असेल तर भोपळ्याचं रायतं आणि शोनुने सजेस्टल्याप्रमाणे फ्लॉवर-मटारची रस्सा भाजी व बाकी सर्व मेनु चालेल Happy

Pages