बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही पोटभर्/जेवणवजा वाटत नाहीये. स्टार्टर्स म्हणून ठेवलंस तर ठीक आहे.

नंदिनी, आमच्याकडे पण १४ ला हाच मेनु! Happy फूड अँड वाइन मॅगझीनमधून नवी रेसिपी वाचून. Proud
पुळीओगरे (त्यात फक्त भात शिजवून आयत्या मसाल्यात मिसळला की झालं. MTRचा मसाला चांगला आहे.), दहीबुंदी आणि वडा सांबार कसं वाटतंय? सगळं आधीपासून करून ठेवता येतं.

काय बेत केलास नंदिनी शेवटी? अन भांडी कोणी घासली ?

सर्व काही पुढच्या आठवड्यावर ढकललय.. Happy बघू आता.
--------------
नंदिनी
--------------

नंदिनी,तुझा बेत पुढे ढकलला आहेस म्हणून एक सजेशन...

तू दिनेशदांचे काठी कबाब करू शकतेस... सोबत डेझर्ट म्हणून मस्तानी किंवा फलूदा....
सगळंच आधी करुन ठेवता येण्यासारख आहे....... रोल्स बटर पेपर किंवा सिल्व्हर फॉईल मधे गुंडाळून द्यायचे. भांडी घासायला पण कमी. काय ते फक्त १०-१२ ग्लास धुवायला लागतील...

दिनेशदांचे काठी कबाब <<< आणि ते कबाब संपले की या बीबीवर नवीन रेसिपी कोण लिहिणार ? Happy

काय रे मिलिंदा... अरे नंदिनी ला व्हेज मेन्यू हवाय...

नंदिनी,
नुसती टिक्की-कटलेट पोट्भर/कंप्लिट मेनु नाही वाटते.
नुसत्या टिक्की ऐवजी छोले -टिक्की एकत्र सर्व्ह कर शिवाय बरोबर अजुन एखादी चॅट डिश/दही वडा /पनीर -सिमला मिर्ची टिक्का/ एखादा राइस पण अ‍ॅड कर.
शेवयाची खीर ऐवजी फालुदा (खीर विथ आइस क्रीम) किंवा गाजर का गरम हलवा विथ आइस क्रीम बघ जमतय का.
(किंवा केशरी भात केलास तर स्वीट डिश पण होइल आणि राइस पण, तरीही फालुदा आणि चॅट काँबिनेशन बर्‍याच नॉर्थ इंडियन पार्टिज मधे पाहिलय, इट वर्क्स वेलः))

मँगो राईस पण चांगला option आहे. क्रुती ईथे नसेल तर टाकते मी Happy

itsme मँगो राईसची recipe टाका ना

दिनेशदांचे काठी कबाब <<< आणि ते कबाब संपले की या बीबीवर नवीन रेसिपी कोण लिहिणार ? >> मिलिंदा... Lol

DJ, पनीर -सिमला मिर्ची टिक्का ची रेसिपी योग्य जागी टाक नं.

शनिवारी पंधरा मंडळी जेवायला यायची आहेत. सगळे भारतीय आहेत अन जवळपास दोन-तीन महिने ( पहिल्यांदाच ) भारताबाहेर रहात आहेत.

कोल्हापुरी मटण ( पर्टू झिंदाबाद ) , मिर्ची का सालन, बारक्या मद्रासी कांद्यांचे सांबार, नान, टॉमेटॉची कोशिंबीर असा मेनू आहे. तर याबरोबर गोड पदार्थ काय करता येईल? मी आइसक्रीम संडे म्हणत होते . पण ते काही तिकडच्या स्वारीला फारसं आवडलं नाही.

काहीतरी आखुड शिंगी बहुदुधी टाइप सुचवा लवकर. आधी करायचं म्हटलं तरी आज किंवा उद्या संध्याकाळीच वेळ मिळेल थोडासा.

रसमलई चे पॅटीज विकत आणून घरी आटवलेल्या दुधात घातलेस उद्या संध्याकाळीच तर मुरतील शनिवार पर्यंत.
मला पण शनिवारी २० जणांसाठी कोशिंबीर न्यायची आहे. माझा विचार होता की बारीक चिरलेला कोबी + टोमॅटो + काकडी अशी करावी. पण यात नाविन्य म्हणून एखादं फळ जाइल का? कोणतं? शक्यतो मला दही घालायचं नहिये कारण करून न्यायची आहे.
प्राजक्ता

गुजा? गाजर हलवा? किंवा शोनूचं बव्हेरीयन ब्लू?

अग फ्रूट रायता का नेत नाहीस?

प्राजा, डाळिंबाचे दाणे घाल मिळाले तर. छोटी द्राक्षे किंवा द्राक्षांचे तुकडेही चालतील.

ह्म्म १५ लोकांसाठी गुलाबजाम -शक्य नाही. बव्हेरियन ब्लू ( लालूचं ) चालेल कदाचित.
प्राजा - डाळिंबाचे दाणे चालतील, गोड अन ग्रॅनि स्मिथ सफरचंदं बारीक चिरून घालता येतील.

सो मु शि कर. एकदम ऑथेंटिक आयटम होतो.

सोप्प मुगाचा शिरा. डाळ २ तास भिजवुन, कोरडी करुन गुलाबी रंगावर भाजून घ्यायची. त्याचा रवा काढायचा. मी कॉफी ग्राइंडरमधे करते. हा रवा भरपूर तूप घालुन भाजून घ्यायचा. बाकी कृती रव्याच्या शिर्‍यासारखी. बाकी स्वयंपाक करता करता एकीकडे डाळ भिजवणे, निथळणे, भाजणे होउन जाते. (कित्ती बै मी चटपटीत Proud )

पण अजून १ सांगा की समजा डाळिंबाचे दाणे/द्राक्षे/सफरचंदं असं काही घातलं तर वरून फोडणी चालेल का? की चव बिघडेल?
प्राजक्ता

अगदी सोप्पी शेवयांची खीर.

प्राजा, चव नाही बिघडणार. मी घालते. आधी फोडणी घालून मग फळं मिसळ हवं तर.

शोनू, ट्रायफल पुडिंग. हलकं, दिसायला छान, आणि पटकन होणार. पाऊंड केक विकत आणायचा. त्यावर ऑरेंज ज्युस टाकायचा, त्यावर जेलोचा लेअर, त्यावर फळांचा लेअर, त्यावर थोडे रेसिन्स आणि खजुराचे पिसेस. असे लयेर्स दिल्यावर आयत्या वेळी प्रत्येक प्लेटवर हेवी क्रिम फेटून किंवा कूल व्हीप घालायच. मोठ्या पारदर्शक काचेच्या बोलमध्ये अरेंज करायच. मुलंसुधदा आनंदाने खातात. पण ते पॅकेटमधल पुडिंग किंवा कस्टर्ड अजिबात घालायच नाही.

प्राजा,
लालु म्हणते तसं डाळिंबाचे दाणे आणि बारीक कापलेले ग्रीन अ‍ॅपल पण घाल, मस्त लागते चव .
फोडणी देणार नसशील तर बरीक कापलेला पुदीना, चाट मसाला, लिंबु टाकून मस्त होतं सॅलेड .( मी बारीक चिरलेली कोबी, काकडी, रंगीत सिमला मिर्ची(कच्ची), पुदीना, कोथिंबिर, ग्रीन अ‍ॅपल, डाळिंबाचे दाणे, चिमुट भर काळी मिरी पवडर, लाल तिखट, चाट मसाला, आणि लेमन ज्युस घालून करते सॅलेड.)

मला पण डिनरचा मेन्यु सुचवा. येत्या आठवड्यात एका पंजाबी नवदांपत्याला जेवायला बोलावलय. सोबत मुलाचे आई वडिल पण असतिल. हे लोक रांचीला रहातात, त्यामुळे त्यांच्या जेवणात पंजाबी-बिहारी असे पदार्थ असतात. पुर्ण्पणे शाकाहारी. मला माझा सुगरणपणा दाखवणे आवश्यक आहे. Happy
गावाकडे त्यांना बोलावले होते त्यावेळी कढी - पकोडे, आलु गोबी, मटर पनीर, सलाड, भात व फुलके केले होते. आता माझी पाळी आहे. काय करावं?
अजुन एक परवा त्यांच्याचकडे होळीला गेले होते, त्यावेळी छोले, पकोडे (मेथी, कांदा, शेपु इ.), दहीवडे, पापडीचाट व मी बनवलेला पुलाव असा बेत होता.
नक्की कधी जेवायला येतिल हे माहित नाही. बहुतेक एक दिवस अगोदर कळेल. वीकडेज मध्येच येतिल असा अंदाज आहे. हे चार व घरचे चार असा आठ जणांचा स्वैपाक करायचा आहे. तसेच माझा लेक ९ महिन्यांचा आहे, त्यामुळे त्याला सांभाळुन ऑफिसचे आलेलं भयानक काम सांभाळुन सगळं करायचय, म्हणुन थोडा सोपा मेन्यु सांगा प्लिज. तसे एक मुलगी आहे मदतीला दिवसा, ती थोडीशी वरवर्ची मदत करेलच...

अल्पना,
पनीरमसाला,भेंडी फ्राय, राजमा,कोशिंबीर, जीरा राइस आणि फुलके.
यातलं राजमा, पनीर मसाला याची बरीच तयारी आदल्या दिवशीच करता येईल, शिवाय, साहित्यही घरात उपलब्ध असेलच. त्यामुळे, बरे पडेल.
................................
माझे जगणे होते गाणे...

अरे त्या नन्दिनीच काम झाल का? १० जणान्च?
पावसॅम्पल वगैरे फारच सोप्प! ढोपरभर पाणी घालून तिखटजाळ रस्साभाजी, वरणभाताचा कुकर, जोडीला लिम्बू/साजुप तुप असल की बास! Happy

Pages