बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूलांसाठी पावभाजी वा दाबेली करताना, त्यात लाल भोपळा वा पिकलेले केळे घालावे म्हणजे त्याचा ठसका लागत नाही. मूलाना साधारणपणे हाताने खाता येईल असे पदार्थ असावेत. तसेच ते आकाराने लहान असावेत.
मिनी ईड्ली ( रंगीत असावी ), छोटे बर्गर्स, रोल्स वगैरे चालतील. पॉप् कॉर्न पण मुले आवडीने खातात. एखादे सरबत जरूर असावे पण ते एअरेटेड नसावे.
फ्रुट सलाड, आईसक्रीम आणि केक असावा.
रिटर्न गिफ्ट्साठी, वेगवेगळ्या वस्तू ठेवून, लॉटरी किंवा गाढवाला शेपूट लावणे अशी स्पर्धा ठेवावी. पण सर्वाना गिफ्ट मिळेल असे पहावे.

कृपया मेनु सुचवा...

सतिशचे साधारण दहा मित्र (आणी मैत्रीणी) घरी येणार आहेत. साधारण संध्याकाळी सहाच्या सुमारास. तर काय काय करता येइल (मला जास्त कठीण काही करता येणार नाहीत. चटकन होणारे आणी तरीही पोटभरीचे असे काही हवे. माझ्याकडे कामवाली नाहिये नंतरचा राडा पण मलाच काढायचा आहे हे लक्षात घेऊन सांगा प्लीज Happy आणि फक्त व्हेज मेनु हवाय.

--------------
नंदिनी
--------------

१. पाव-भाजी, दहिभात, गाजराचा हलवा / आईस्क्रिम
२. ब.वडा, चटणी, पुलाव, गुलाबजाम / रसमलाई etc.

सध्या एवढेच .... Happy

सोप्यात सोप्पं..
इडली सांबार चटणी आणि जोडीला अजून एक दोन पदार्थ.
हे बनवायला पण फार वेळ जात नाही, पोटभर , पुरवठयाला मस्त आणि शिवाय राडाही कमी. Happy
पुरवठयाला मस्त >> म्हणजे जास्त लोकांसाठी जास्त करायला फार कष्ट होत नाहीत.
----------------------
एवढंच ना!

हो त्यातही इडल्या कोपरेवाले शेट्टीके दुकानसे ऑर्डर करायच्या हा का ना का Wink

आशु, मी आयुष्यात कधी इडल्या केल्या नाही आहेत. Happy आणि इडल्या उकडायला किती वेळ जाईल??

सिंड्रेला. माझा नवरा मला तेच करू देत नाहिये ना... जे काय बनवायचे ते घरात बनव. अशी सक्त ताकीद आहे.
--------------
नंदिनी
--------------

अशी सक्त ताकीद आहे >>> आणि तू चक्क ऐकुन घेतेस Wink

तुझ्याकडे मोठा साचा असेल म्हण्जे मोठ्या इडल्यांचा १६ किंवा २० चा तर होतील भराभरा. नाहीतर एका घाण्याला प्रत्येकी १५-२० मिन लागतातच. एकच साचा असेल तर त्या जरा निवल्यावर काढून मग साचा जरा स्वच्छ करुन परत लावायचा म्हणजे थोडा वेळ जाइल. मी एकदा सोप्प्या म्हणुन पॉटलक साठी इडल्या केल्या होत्या, लै वेळ लागतो.

आशु, no offense Happy

अगं, इडलीचं तयार ओलं पीठ बाहेर मिळतं... जरा चौकशी कर.. २० रु. ला पाव किलो वगैरे असते.. १ किलो पण पुरेल..मग त्यात फक्त पाणी आणि चवीला मीठ घालून भराभर इडलीचा कुकर लावायचा.. पाहुणे यायच्या आधी अर्धा तास फक्त.. मायक्रोवेव्ह असेल तर प्रश्नच नाही. इडल्याही गरम करु शकशील तू नंतर. सांबार अन चटणीही तू आधी करुन ठेवशील्..म्हणजे पाहुणे आल्यावर स्वयंपाकघरात तू अडकून न पडता त्यांनाही तुला वेळ देता येईल. Happy
----------------------
एवढंच ना!

आशु, अगं १० माणसासाठी किती वेळा कूकर लावू?? त्यात माझा इडली कूकर १२ साच्याचा आहे. Happy सिंड्रेला, काय करणार? कधीतरी ऐकून घ्यायचे नाटक करावे लागतं.. Happy
--------------
नंदिनी
--------------

पावभाजी किंवा मिसळपाव जमेल का? सोप्पं पडेल.
................................
माझे जगणे होते गाणे...

छोले-पुरी आणि बिर्याणी किंवा पुलाव. छोले आधीच करून ठेवता येतील.
................................
माझे जगणे होते गाणे...

किंवा रगडा पॅटीस...
आधीच करुन ठेवता येइल. वेळेवर गरम करायचं काम राहिल फक्त.
-सुरुचि

२० रु. ला पाव किलो वगैरे असते >>>>
२० रु. किलो अस्त.. अगदी रिलायन्स आऊटलेट बाहेर पण. Happy

उपमा येतो का? तो कर भरपूर आणि कढई मिडीयम असेल तर दोनदा कर.. एक किलोचा करून ठेव अन आयत्या वेळी गरम कर.. Happy अगदी कोथिंबीर, खोबरं वगैरे पेर..
जोडीला शेवयाची खीर येत असल्यास कर.. किंवा फ्रुटसॅलड/गाजरहलवा..

नंदिनी, मस्त पै़की झणझणीत पावभाजी कर ना. (झणझणीत केलीस की लोकं थोडी कमीच खातील Wink ) पावभाजी बरोबर ब्रेड असल्याने मस्त पोटभरणीचं होतं.

बरोबर ढोकळा कर हवं तर. पचायलाही हलका होतो आणि रेडिमेड मिक्स वापरून पटकन होईल. वाफवायला साधारण १५,१६ मिनीटं. ह्याबरोबर जस्त पुलाव, मसालेभात, बिर्याणी पैकी काहीतरी कर. आणि शेवटी काहीतरी गोड. खीर खूप सोप्पी आहे. किंवा फ्रूट सॅलड.

आणखी एक सोपा मेनु : भरपूर भाज्या घातलेला पास्ता, गार्लिक ब्रेड आणि गरम ब्राउनीवर गारेगार आईसक्रीम!

मुली, नंदिनी भारतात आहे. तिला हे सगळं सहजपणे मिळेल?

मिळालं तरी देसी चवीला चटावलेल्या लोकांना पास्ता आवडेल का ? Happy

नंदिनी, इडल्या नकोच करुस. पाव-भाजी, पुलाव, सॅलड आणि गार-गार रसमलई. पूढल्या आठवड्यात तुझ्या मित्र-मैत्रिणींना बोलाव आणि बाहेरुन काहीही आणायचं नाही अशी नवर्‍याला ताकीद दे Proud

त्याला मेन्यूही तूच लिहून दे आणि तू मस्तपैकी पार्लरला जाऊन बस.

नको तेव्हढ्या वेळात तो बाहेरुन आणेल. त्याच्यावर नजर ठेवायला घरीच थांब गं.

सायो, भारतात, तेही मुंबईत (किंवा जवळपास) सगळं मिळतं! आजकाल नागपुरात पास्ता, पास्तासॉस, मोझ्झरेला, पारमेजा(झा)न मिळायला लागलंय तर नंदिनीला तर नक्कीच मिळु शकेल.

ओके, असेल. असेल. तिकडे जाऊन हे असं काही खाण्यात इंटरेस्ट नसतो त्यामुळे शोधलंही जात नाही.

अरे बापरे, आजकाल नवर्‍याची ताकीद एकून घेतली जाते? Happy छे! काळ बदलला. आइसक्रीमचा परीणाम शेवटी झालाच. Happy
नंदीनी, हलकेच घे गं.
सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे पाव भाजी बेस्ट नी आइस्क्रीम. ज्यास्तीत ज्यास्त दोन तीन भांडी होतील घासायला(एक कूकर, एक मोठे पातेले नी एक तवा ब्रेड भाजलेला,खायला use n throw).
सगळी माणसे गेल्यावर जरा फ्रेश होते म्हणून जायचे नी नवरा घासेल तो पर्यन्त भांडी.(राजा घासशील ना जरा.. असे म्हणून जायचे) Happy
ता.क.: बरे ही टीप माझी नाही तेव्हा स्वताच्या हातोटीवर वापरावी. विषयांतर झालेच नको असताना.

तेव्हा स्वताच्या हातोटीवर वापरावी >> Rofl अशी हातोटी ज्यांना असते त्यांना बाई नसताना, दुसरी काही मदत नसताना , दहा माणसांच जेवण घरी करण्याची वेळ येत नाही Happy

मने, नंदिनी दिवा घ्या हां...

>>जे काय बनवायचे ते घरात बनव
lol मग तू कर ना बनवाबनवी. थोडे बनव, जे बनवायचे ते घरातच बनवले म्हणायचे. जे बाहेरुन आणले ते घरात नाही बनवले. Wink

अशी हातोटी ज्यांना असते त्यांना बाई नसताना, दुसरी काही मदत नसताना, दहा माणसांच जेवण घरी करण्याची वेळ येत नाच्व >>> माझ्या आईतर्फे मोठ्ठे अनुमोदन Happy

लालु, फारच बनेल आहेस की तू Wink

शूनू, बरोबर ग एकदम. ते लक्षात नाही आले. तुझा point perfect हां. शेवटी काय experience counts! Happy

काय गं तुम्ही! १० म्हणजे काही जास्त नाही आणि रोज रोज थोडंच करायचं आहे? काही खास पदार्थांची मागणीही केलेली नाही. Proud

पोटभरीचं, सोपं आणि आधी करुन माहित आहे असं किंवा हमखास जमणारं काहीही.

सर्वाच्या सूचनासाठी आणि सल्ल्य्यासाठी धन्यवाद.
शोनू. अगं लग्न झाल्यापासून एकदाही मी धड स्वयंपाक केला नाहिये अस नवर्‍याच म्हणण (धड म्हणजे उकडीचे मोदक, पुरण पोळी दोन तीन भाज्या आणि मसालेभात कोशि.बीर इत्यादि इत्यादि..) यवढं सगळं करायच् म्हणजे मला चार दिवसाची सुट्टीच काढायला हवी किंवा सासूबाईना आग्रहाचे आमंत्रण द्यायला हवे. Happy त्यामु़ळे एकदातरी कायतरी व्यवस्थित कर असं तुणतुण्>न आहे. आपण पण काय... एकदाच त्याच्या मित्राना खाऊ घातले की दोन ते तीन महिने तेच ऐकवायचं.. (कित्ती केले होते मी त्या दिवशी) म्हणून घरी बनवणार आहे. आणी जरा हटके मेनू हवाय.

मृण्मयी. अगं मी १४ फेबला पास्ता आणी सॅलड / आईस्क्रीम हाच मेनो ठेवला होता(दोघासाठीच हां) त्यामुळे ते नकोच आणी इथे बहुतेकाना पास्ता वगैरे चालेल की नाही माहित नाही.

छोले टिक्की किंवा कटलेट आणि शेवयाची खीर हा मेनु कसा आहे??
--------------
नंदिनी
--------------

छोले टिक्की किंवा कटलेट आणि शेवयाची खीर हा मेनु कसा आहे?? >>
मेनु छान आहे पण पोटभर होईल का ??

Pages