बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिने टोमॅटो पुर्‍या कधीच केल्या नाहीत गं, म्हणून. Happy

मनुरुची, कोबीची भाजी करता येईल...कोबी, गाजर बारीक चिरुन, थोडे मटार, हिरवी मिरची, कडिपत्ता.
तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहोरी आणि थोडी उडीद दाळ, मिरची, कडिपत्ता, हिंग, हळद घाल...मग कोबी, गाजर, मटार, मिठ घाल. शिजल्यावर वरतुन खोबरे, कोथिंबीर पेर. एकदम सोपी भाजी आणि एकदम मस्त लागते. भाजी थोडी कच्ची ठेवल्यार अजुन छान वाटते.

धन्यवाद मंजू, लालू...
विरजण तर चांगल असत, म्हणजे रोजच्या दह्याला काही प्रॉब्लेम नाही, पण हो, मी कधी कधी थोडस दुध उरल तर सायीत टाकते.. त्यामुळेच अस होत असेल का? हे एवढ ताक फेकायला जिवावर येत.
आणी एक, पटकन हव असेल तर सायीच डायरेक्ट ताक करता येत?????

पटकन हव असेल तर सायीच डायरेक्ट ताक करता येत?????

तुला नुसती साय घुसळून म्हणायचं आहे का? नुसती साय घुसळली तर त्याचं क्रिम/मलई तयार होईल. आपण दह्याचं ताक करतो त्यामुळे जेव्हा विरजण लावतो तेव्हा दुधावर्/सायीवर काहीतरी प्रक्रिया करतो म्हणून त्याचं दही तयार होतं आणि ते दही घुसळल्यावर त्याचं ताक तयार होतं....

उद्या मुलिच्या प्रीस्कुलमध्ये इन्डियन खाऊ संगितला आहे...प्लीझ लवकर काहितरी छान सुचवता का? <थ्क्.क्स>

मुरमुर्‍याचे लाडू आणि पालक पुर्‍या? (ऍलर्जी वगैरेची भानगड नाही.)
..............
बंद असावे उगाच चरणे, मंद असावी भूक जराशी Proud

इन्स्टं इड्ली किंवा तांद्ळाची बनव सोबतtomato ketchup/डाळीची चटनी...
खमंग ढोकळा(सपक्).....गाजराच्या वड्या पण चालतील

पालक पुर्‍या? (ऍलर्जी वगैरेची भानगड नाही.)
मृ. ग्लुटन ची ऍलर्जी असलेल्या मुलांना चालणार नाही ना हे जर कणकेच्या किंवा मैद्याच्या पुर्‍या असतील तर.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
I'm not dumb. I just have a command of thoroughly useless information -
CALVIN & HOBBES QUOTES

हो गं हो!!! थँक्यु रुनी!!!
निषादच्या डेकेअरमधे घेऊन गेले होते. मुलांनी आवडीने खाल्लं. (ग्लुटेन ऍलर्जी नव्हती कुणाला. म्हणून हे डोक्यात आलं नाही.) अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, हाय प्रोटीन्स्ची ऍलर्जी, नट (हे तर हमखास) आणि मधाची ऍलर्जी असणारी पिल्ल होती.
..............
'खाना खजान्या चरणी' कैसे जडले हो चित्त, वजनकाटा खवचट मज वाकुल्या की दावी!! Proud

दिवाळसणासाठी मिक्स मेनू (म्हणजे बेक्ड व्हेज. करणार म्हणून पूर्ण काँटिनेंटल पदार्थ नकोत.) सुचवा.
मी बेक्ड व्हेजिटबल, दिनेशजींचे कॉर्न पालक, पाइनॅपल राईस, साधे पराठे, वगैरे करणार आहे. आता तुम्हाला साधारण मेनू कळला आहे. तर please expand and help.

आणि हो .......ओल्या नारळाच्या करंज्या ताज्या ..त्याच दिवशी करणार आहे.तर सुचवा मेनू!

मि दिवाळी फराळ सथि कहि लोकना बोलवत आहे.त्या सोबत कहि तरि पोटभरीचं असं सुचवा.
(दिवाळी फराळ ---चिवडा,शंकरपाळे,चकल्या ,शेव ,गुलाबजाम) या बरोबर काय करु.पाव भाजि चालेल का.पहिले करुन ठेवता येइल अस सुचवा.
थन्क्स्.

या सर्व पदार्थांबरोबर एखाद्या दह्याचा पदार्थ चांगला लागतो. दहिवडे, खमंग काकडी वगैरे. तसेच जलजिरा किंवा खारी लस्सी चांगली लागते. सोबत एखाद्या फळांच्या फोडी ठेवाव्यात. फळांचे चाट पण चालेल.

.

नारळाच्या कोळातले पोहे, दहि पोहे पण सूचवीन. खजुराचे सार पण चांगले. या सगळ्यामूळे तेलकट पदार्थांचा त्रास होत नाही.

थन्क्स लवकर महिति दिलित

बार्बेक्यू पार्टीला कबाब, प्याटीस, टीक्का या व्यतिरीक्त काय करता येईल?

लाजो
अननस, प्लम, अंजिर ही फळे ग्रिल करता येतील. अननसा बरोबर आइसक्रीम अन बाकींच्यावर थोडे व्हिप्पड क्रीम किंवा मस्कार्पोने चीझ घालून द्यावं. छोटे पापलेट किंवा ट्राउट मासे चटणी भरून फॉइलमधे गुंडाळून ग्रिल करता येतील. असपॅरॅगस ग्रिल करून त्यावर थोडे ऑ ऑ घालून मस्त लागते. बागेत च्या स्लाइसेस जरासा ग्रिल करुन त्यावर टॉमेटो-बेसिल्-ऑ.ऑ. मीठ -मिरपूड असं घालता येईल.

वरील फळांबरोबर पीच पण ग्रील करता येइल. त्यावर ब्रॉउन सुगर टाकून वरती व्हीप क्रीम टाकून मस्त लागते.
कोलंबी हिरवा मसाला लावून नी रोसमेरी लाकूड आणून मस्त ग्रील होते. कोल च्या एवजी मी रोसमेरी ग्रील वूड आणून मटण shank मस्त चार तास ग्रील केले होते. त्यासाठी माझ्याकडे मोठा बंद करून ठेवायला ग्रील वापरला होता.

शोनू आणि मनू अगदी ठांकू बरका... दोघींच्या आयडियाज छान आहेत... विकएंडसाठी अत्ताच तयारी करून ठेवते.

१०-१५ लोकान्चे पॉट लक आहे. सर्वजण पन्जाबी आहेत. योग्य डीश सुचवाल काय ?

तुम्हाला काय आणायला सांगितले आहे ते कळले तर सुचवता येईल, म्हणजे मेन डिश, साईड डिश इ.

काही दिवसांपूरवी आम्ही १५-२० लोकांचं पॉटलक केलं. तोच तो मेनु कंटाळवाणा झाला म्हणून देशी-चायनीज पदार्थ केले.
हाका नूड्ल्स
वेज मंचुरिअन
चिली पनीर
चायनीज फ्राईड राईस
कॉर्न सूप
असा बेत होता. नॉनव्हेज नको होतं. पण ह्यात चिली चिकन, चिकन फ्राईड राइस, गोभी मंचुरीअन वगैरे ऍड करता येईल.

..............
मनाच्या बाटलीचं बुच मी काढलं
चकलीनंतर कवितेचं कडबोळं पाडलं!!! Proud

कुठलापण पदार्थ चालणार आहे.

खेकडा भजि आणि पाटवडि मस्त वाटेल.

ऑ.ऑ. म्हणजे नक्की काय? शतावरी आणि कोवळा वाटाणा मीही आणला आहे. पण माहिती नाही ग्रिल कसे करतात त्याला.. घरी ग्रिल कसे करता येईल.

ऑ.ऑ.: ऑलिव्ह ऑइल.. (म्हन्जी अळवाचे त्याल न्हाय Proud )

पॉट लक साठी

फ्रोझन स्ट्रॉबेरी अन फ्रोझन ब्लू बेरी थोड्या kir, cointreau, DiSaranno अशा liquer मधे बुडवून ठेवाव्यात ( वेगवेगळ्या ). फ्रीजमधे दहा बारा तास तरी ठेवाव्यात.
Masacarpone cheese थोडी पिठीसाखर घालून त्यात चमचा भर liquer घालून फेटून घ्यवां
मग शॅम्पेन फ्लूट किंवा ट्रायफल पुडिंगचे कप्स असततील तर त्यात आलटून पालटून फळं अन चीझचे थर लावावेत. सगळ्यात वर चीझचा थर यावा. त्यावर चमचाभर फळांमधली liquer घालावी अन एखादा पुदीन्याचं पान लावावं.

एकदम फेस्टिव्ह दिसतं. अन करायला सोप्पं. चीझ मिळालं नाहीतर व्हिप्पिंग क्रिम आणुन ते व्हिप करून ही वापरता येईल. कूल व्हिप मात्र वापरू नये Happy

Hello Friends
१५ जणांना Dinner/Luch साठी बोलवायचय, खालचा मेनु विचारात आहे

Starter:??????
Main Dish: पाव-भाजी
Side Dish 1: ?????
Side Dish 2: ?????
Rice Dish: ?????
Sweet Dish: जिलेबी वा शेवया खीर
Dessert: Ice-Cream

ह्या मेनु साठी Starter/Appetizer काय कराव? मला आणखी एक-२ Side Dish ही सुचवाल का please.

Rice Dish: साठि व्हेज पुलाव मनात होत पण पाव-भजीत ही सार्‍या भाज्या येतात ना शिवाय पुलावात ही मटार दिसतात आणी पाव भाजीत ही म्हणुन रद्द same for व्हेज-बिर्यानी. Sad Happy

Pages