बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पालक कबाब or कोथिम्बिर वडी कसे वाटतील as a Starter?

Thanks Sag

पालक काबाब छान वाटतय कधि करुन नाहि पाहिल मि आता इथे रेसिपि शोधते Happy
मला कोथिम्बिर वडी एवढि खास जमत नाहि, शिवाय कोथिम्बिर निवडायला वेळ हि लागेल ना? :)...अजुन options मिळाले तर छान होईल Happy

मी इथल्या रन्गी यान्नी दिलेल्या पधतीने केले होते.. छान होतात्..
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/126213.html?1155310405

ते कोथिम्बिर निवडायचे एवढे लक्शात नाही आले..मी जरा नवीनच आहे स्वयपाकात..अजुन काही सुचले तर नक्की सागेन.

सास
भाताचा एक प्रकार सुचवते....ब्राऊन राईस - हा भात दिल्ली राईस चा करायचा.
भर्पूर कांदा(उभा पातळ कापलेला) खूप जास्ती वेळ परतायचा. अगदी जळेपर्यंत ..पण जाळायचा नाही. त्यावर तांदुळ टाकून परतून घे. दुप्पट पाणी घालून अगदी फडफडीत कर. वरून खूप कोथिंबीर . काही मसाला नको. कांद्यामुळे चव वास आणि रंग सुंदर येतो. पटकन होतो. दुसरा काही पदार्थ करता करता कांदा परतत ठेवायचा.कारण कांदा परतायलाच जरा वेळ लागतो.
भाजणीचे वडे ही साईड डिश कशी वाटते?तिथे जर भाजणी(थालिपिठाची) मिळत असेल तर पहा.
खूप कांदा ,कोथिंबीर, बारीक कापलेली हिरवी मिरची ,थोडा काळा मसाला + आपले नेहेमीचे तिखट मीठ + थोडे तेल असे सगळे घालून त्यात थोडे आंबट दही पण घाल. याने छान चव येते. मुख्य म्हणजे हे वडे प्लॅस्टिकवर तिळात थापायचे. व डीप/शॅलो फ्राय(आवडीप्रमाणे) करायचे. सर्व्ह करताना तिळाची बाजू वर ठेवायची. तीळ छान कुर्कुरीत होतात व दिसते छान. मध्ये एक भोकही पाड म्हणजे वडा मधे कच्चा रहाणार नाही.

पाव-भाजी असताना फार हेवी आप्टायझर नकोत. मसाला पापड आणि मसाला काजु ठेवता येतिल. पापड आधी भाजुन/तळुन ठेवायचे. वरती घालायचा मसाला, का.न्दा, कोथि.न्बीर इ इ चिरून बोल मधे ठेऊन द्यायचे. ज्याला हवे तसे करून घेतील. थोडी मेहनत वाचेल. पापड सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ठेवता येतिल.

मसालेदार पदार्थ खल्ल्यावर पुलाव पेक्शा दही बुत्ती करता येइल. मद्रासी प्र्कारे न करता, हि.न्ग, हळद,मोहरी, कढीपत्त्याची फोडणी घालुन दही बनवून ठेवता येइल. वरून बारिक चिरलेला का.न्दा, कोथि.न्बीर घालुन छान लागतो हा भात.

Thanks a lot Friends

पालक काबाची रन्गी यांची रेसिपि मस्तच आहे पण पुन्हा बटाटा रिपिट होईल ना. पाव-भाजित ही बटाटा main आहे. Happy

हा भाताचा प्रकार सहीच वाटतोय. दिल्लि राईस इथे मिळाला तर चांगल होईल पण दिल्ली राईस हा ब्राउन राईस आहे का? दुसरा ब्राऊन राईस वापरला तर? की कांद्या मुळे भाताला ब्राउन रंग येतो म्हणुन नाव ब्राउन राईस?
कित्त्ति शंका ना?

दही बुत्ती हा प्रकार ही मी केला नाही कधी. हा पन छानच वाटतोय. २ राईस dishes ठेवता येतिल Happy

मी काल एक प्रकार करुन पाहिला: चिप्स चाट

tortilaa chips/strips
दही
कांदा: बारिक चिरलेला
कोथींबीर: बारिक चिरलेली
मीठ, तिखट, जिरे पुड (हवी असल्यास साखर): चवी नुसार
Tomato Ketup: चवी नुसार
पुदिना चटणी, चिंच चटणी : चवी नुसार (नसेल तरी चालेल)
भुजिया शेव: चवी नुसार (नसेल तरी चालेल)

दही फेटुन त्यात मिट, तिखट, जिरे पुड, साखर घातल.
चिप्स प्लेट मध्ये रचले व त्यावर दही, केचप,कांदा, कोथिंबीर घातल व शेव भुरभुरली..झाली चिप्स चाट तयार. Happy

दह्यात मिरी पाउडर पण घालु शकतो चवी प्रामाणे. चाट मसाला असेल तर तो हि भुरभुरता येतो अधिच चवी साठी. Happy

As a starter हा प्रकार करण्याचा विचार आहे.

पापड मिळाले तर पापड पण ठवता येतिल. पुण्यात माझी पाव-भाजीची एक ठरलेली restaurant होती, तिथे पाव-भाजी बरोबर भाजलेला पापड serve करातात.....पाव-भाजी, पापड, काकडिच्या स्लाईज, लोणच (कैरिच वा मिक्स), बारिक चिरलेला कांदा लिंबाची फोड अशी पाव-भाजीची चमचमीत प्लेट असायची. आजही पाव-भाजी बरोबर पापड लागतो. Happy

पावभाजीला साईड डिश म्हणजे दही वडा किंवा दही पकोडी. अर्थात दही भात केला नाही तर. वडा किंवा पकोडी आदल्या दिवशी करून ठेवता येईल.

थँक्स गिव्हींग च्या पॉट लक साठी देसी व्हेज डिश कुठली नेता येईल?
१५-२० जणं आहेत आणी माझ्याकडे देसी व्हेज पदार्थाची डिमांड झाली आहे, मी सोडून बाकी सर्व नॉन देसी आहेत. बाकी मेनु टिपिकल आहे म्हणजे टर्कि, पम्कीन पाय वगैरे. तर काय नेता येइल आणी बाकी मेनु बरोबर सूट होइल?

मॅश्ड पोटेटोज ऐवजी छानशी उकडलेल्या बटाट्याची भाजी, किंवा दाण्याचा कूट घातलेली उपासभाजी, भोपळ्याचं किंवा बुंदीचं रायतं, एखादा मसालेभात, टोमॅटो भात किंवा पुलाव. (थँक्स्गिविंगला सगळेच तांदुळ घातलेला गंबो करतात असं नाही. तेव्हा भाताचा प्रकार चांगला जाईल.) क्रॅनबेरी सॉस ऐवजी कैरीचा मेथांबा घेऊन जाता येईल. किंवा मक्याचा उपमा.

सास
दिल्ली राइस म्हणजे कोणताही बासमती ...लांब दाण्यांचा....जो शिजवल्यावर छान मोकळा फडफडीत होतो. असा भात होऊ शकणारा कोणताही तांदूळ घे. आणि हो ....कांद्यामुळे भात ब्राऊन होतो(ब्राऊन तांदूळ घेण्याची गरज नाही...).........शंका बरोबर आहे!!!.

मृ, थॅक्स, मी पण भाताचा एखादा प्रकार न्यायचा विचार करत होते, पण नक्कि कळत नव्हत कि बाकी मेनु बरोबर कसा वाटेल.
बहुतेक पुलाव किवा टोमॅटो राईस नेइन.

मैत्रिणिंनो प्लीज मदत करा. २४ मोठी माणसे आणि ११ लहान मुले यांच्यासाठी ४ स्टार्टर्स आणि ४ मेन सुचवा. केक आणि अजुन एक गोड करणारच आहे (मुलाचा वाढदिवस) पण हाताशी वेळ अगदी कमी आहे. कारण थिसिस लिहतेय, वाढदिवसाच्या आदल्या दिवशी मागच्या अंगणात लँडस्केप पुर्ण करायचाय.

फ्रेंच रोल मिळाला तर त्याचे पातळ स्लाईस करुन त्यावर वेगवेगळे पदार्थ घालुन छान स्टार्टर्स होतात. चीज, मेयॉनीज, उकडलेल्या भाज्या, अंडी, असे अनेक पदार्थ वापरता येतात. स्लाईसना तेल वा बटर लावून जरा भाजुन घ्यायच्या, व त्यावर ओले सारण घालायचे.
छोले भिजवून उकडुन त्यात तिखट मीठ घालुन त्यात कांदा व टोमॅटो मिसळायला.
फळांची कबाब तर इथे नेहमीच सूचवले जातात.

मेन साठी, गोड पॅनकेक्स, इडली चाट, पिज्झा ( पातळ बेस व चौकोनी तुकडे करुन ) रोस्टेड पोटॅटो, वगैरे प्रकार आहेतच.

मुगाची डाळ व तांदूळ एकत्र मिक्सरमधे रवाळ दळून घ्यायचे. मग त्याच्या नेहमीप्रमाणे म्हणजे उडदाची डाळ वगैरे घालुन उपमा करायचा. त्याचे लाडु करायचे ( हे आदल्या दिवशी करता येते ) आयत्यावेळी हे लाडू वाफवून घ्यायचे. गार वा गरम कसेही चांगले लागतात. तूप आणि खोबर्‍याच्या चटणी बरोबर खायचे.

भाग्या, स्टार्टर्स सुचवतेय...

चीज्-पायनॅपल्-चेरी स्टीक्स, फिंगर चीप्स (फळांच्या किंवा भाज्यांच्या), छोटे साबुदाणे वडे/बटाटे वडे/भाजणीचे वडे, आलू टीक्की, स्प्राऊटेड चाट, ढोकळा/मिनी इडली, सुरळीच्या वड्या.

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

अगदी लहान नसतील मुले तर

छोटे पिझ्झा बेस ४-६ इन्च व्यासाचे तयार मिळाले तर ते आणायचे. नाहीतर मोठे आणून त्यातनं कापून काढायचे. मग छोट्या बाउल मधे पिझ्झा सॉस, किसलेलं चीझ अन चालत असल्यास पेपरोनी स्लाइसेस, ऑलिव्हस, मश्रूम्स, फुग्या मिरच्या असल्या गोष्टी ठेवाव्यात. पिझ्झाबेस वर सॉस घालून झाला की कूकी कटर ठेवून वेगवेगळ्या आकारात चीझ घालता येईल. ऑलिव्स, व इतर टॉपिंग्स घालून चित्रं काढता येतील. प्रत्येकाने स्वतःचा पिझ्झा सजवला की मग तोच बेक करुन त्या त्या मुलाला द्यावा. मुलं अगदी आवडीने करतात अन खातात सुद्धा.

सगळ्या मुलांना एक एक ऍप्रन द्यावा म्हणजे कपडे कमी खराब होतील. ( तीच त्यांची गूडी बॅग गिफ्ट )..

( http://www.michaels.com/art/online/displayProductPage?productNum=gc0495 )

दिनेशदा, मंजू आणि शोनू धन्स.
शोनू, तुझी आयडीआ माझ्या मुलीच्या वाढदिवसाला, डिसेंबर मध्ये नक्किच वापरीन. ती आणि तिच्या मैत्रिणी- दे आर अ क्रिएटीव्ह लॉट. मुलाचे काही मित्र सध्यातरी सगळं सांडवून अंगाला लावून घेतील.
दिनेशदा, फ्रेन्च रोल म्हणजेच बागेत का? त्याचे काप करून टॉपिंग्ज घालण्याचा विचार केलाय.

आता आदल्या दिवशी सुट्टी घेतेय, तर हा मेनू कसा वाटतोय? प्लीज मत द्या. मोठ्या माणसांपैकी ४-५ अगदी वयोवृद्ध आहेत. मुले ३-१३ या गटातील आहेत.

स्टार्टर्स-
कॉकटेल समोसा (१०० चा पॅक फ्रोझन मिळतो) ,
बागेतचे काप, वेगवेगळे टॉपिंग्ज घालून,
कपकेक्स, वेगेवेगळ्या रंगाचे आयसिंग करुन
पॉपकॉर्न
कॉर्न चिप्स, सालसा, सावर क्रीम आणि अव्हाकॅडो बरोबर

मेनः
छोले
बटाट्याची मराठी भाजी, थोडी हिरवी मिरची घालून
पनीर, गोभी, लाल आणि हिरव्या मिरच्या, गाजराचे काप आणि फरसबी घालून मिश्र भाजी
पोळ्या
पुलाव

साईड्स:
बुन्दी रायतं
स्प्राऊटेड चाट

गोड:
रसमलाई (वेळ मिळाला तर) किंवा खीर
केक

भाग्य, मुलांना फ्रोझन सामोसा का देतेस... चालतं का दिलेलं? तू चीज कुठला वापरणार आहेस?

फिंगर चीप्स (फळांच्या किंवा भाज्यांच्या), >>>>>> मंजूडी : म्हणजे नक्की काय गं? जरा सविस्तर सांग बघू ........... Happy

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी

अ.आ., तुमच्या स्मायलीला मला वेगळाच वास का बरे येतो आहे??? Wink

चीप्स म्हणजे काही तळण वगैरे नाही. फळांचे किंवा भाज्यांचे ज्युलियन स्टाईलमध्ये किंवा उभेउभे तुकडे करायचे, डिशमध्ये कल्पक पद्धतीने ठेवायचे, चाट मसाला भुरभुरवायचा आणि खायला द्यायचे... Happy फळांमध्ये अननस, पीच, प्लम, नासपती, सफरचंद इ. प्रकारची फळं वापरता येतात. भाज्यांमध्ये काकडी, गाजर वगैरे....
---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

प्लीज दोन हटके vegetarian appetizers सुचवा thanks giving च्या पार्टीसाठी.

धन्स मंजू ........... वेगळा वास वगैरे काही नाही, चटकन लक्षात आलं नाही म्हणून विचारलं हो .......... Happy

हे म्हणजे fruit plate सारखंच झालं की. बरोबर ना?

~~~~~~~~~~~~~~
देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी

हम्म् बरोबर.... फक्त स्टायलिश नाव...... जसं की 'दिवा महाराष्ट्राचा' मध्ये भाकरीचं इंग्रजी नाव 'हँडमेड बाजरा रोटी' असं दिलंय.... Happy

---------------------------------------------
उपास-तपासाच्या मी विरोधात आहे, पण 'फराळाच्या' नाही.... Happy

आर्च,
*ओल्या नारळाचं (काजु, मीठ, लिंबु, साखर, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालून) सारण भरलेल्या बटाट्याच्या कचोर्‍या; खजुराच्या चटणीबरोबर.
*कोथिंबीर्-पुदिन्याची चटणी लावून ग्रिल केलेला टोफु
*फ्लावरच्या वड्या
*उकडलेले बाळ बटाटे - पुळीओग्रेच्या मसाल्यात घोळवून
* रिकोटाचीज -पालक बॉल्स
* खिमा भरलेली अंडी
*खिम्याच्या रुमालीवड्या
*नेहमीच्या रुमालीवड्या

मृ, thanks ग. तोफू घरी अवनमध्ये ब्रॉईल करून नेले तर चालेल का? जरा रेसिपी सांग बरं काही वेळा माझे तुट्तात तुकडे. मी फर्म तोफू आणते तरी.

उकडलेले बटाटे नुसते घोळवायचे? नंतर बेक वगैरे नाही करायचे?
हे दोन्ही प्रकार छान वाटले. ते घरच्या पार्टीला तर मस्तच आहेत.

एका ठिकाणी वेस्टर्न एपिटायझर्स करून आणायला सांगितली आहेत. त्यासाठीपण सांग न काहीतरी. रिकोटा चीज पालक बॉल्सची रेसिपी देतेस?

उकडलेले बाळ बटाटे - पुळीओग्रेच्या मसाल्यात घोळवून >>> आणि काठीला लावुन ग्रिल केले तर छान (लागतील असे मला वाट्टे Wink )

आर्च, तोफुचे फार बारिक तुकडे न करता साधारण एका मध्यम आकाराच्या ब्रेडचे २ उभे तुकडे जेव्हडे मोठे होतील तेव्हडे मोठे (आणि तेव्हड्या जाडीचे) तुकडे कर. चटणी लावून कुकीशीटवर एक बेकिंग पेपर घालून त्यावर हे तुकडे लावून ठेव. वर थोडं ऑ. ऑ. शिंपड. आणि खायला द्यायच्या अर्धा तास आधी ३५० वर प्रत्येक बाजुनी १० मिनिटं बेक कर. ५०० वर १-२ मिनिट ब्रॉइल केलं तर छानच. वर चाट मसाला किंवा ब्रेड डिप करण्याचा मसाला शिंपड. (हवं तर '४ चीज ब्लेंड' शिंपड ब्रॉइल करण्याआधी.)

कढईत तेल गरम करून त्यात पुळीओग्रे मसाला घालून परत. कढीपत्ता पब घाल. उकडलेले बटाटे (टोचून) ह्यात घाल. झाकड ठेवून एक वाफ येऊ दे. ब्रॉइल केले नाहीत कधी. पण आयडीया छान आहे. मस्त खमंग लागतील.

रिकोटा चीज पालक बॉल्सची रेसिपी दुपारपर्यंत टाकते.

हलो फ्रेंड्स,

१५-२० जणांसाठी डिनर ला(सगळे पुरुष लोक आहेत) मी पावभाजी व तांदुळाची खीर करावं अस योजलं आहे.तरी त्याबरोबर आणखी काय करता येइल जेणेकरुन सगळे पोटभर होइल्.कोथिंबीर वड्या कश्या वाटतील??नवीन पण करायला सोप नि सहज उपलप्ध असलेल्या साहित्यापासून काय डिशेस आहेत, कुणी सुचवाल का???

धन्यवाद...

फलाफल मिक्स आणुन त्याचे गोळे तळायचे. दहीवड्यासारखे आलं मिरची लावलेल्या अंबट-गोड दह्यात घालायचे. वरून चटण्या. खूप पटकन मस्त दहीवडे होतात.

कॉस्टको मधे तयार फलाफल मिळतात- ते पण छान लागतील.

पंधरावीस जणांसाठी पावभाजी म्हणजे बराच वेळ पाव भाजत बसायला लागणार- त्याऐवजी पाव अर्धे चिरून त्यावर थोडं लोणी लावून थोडी भाजी पसरवायची - ( अगदी जराशीच ) अन मग ते सगळे पाव एकदम ओव्हन मधून भाजून काढायचे. मला वाटतं ३५०-३७५ वरती पाचेक मिनिटं पुरतील.

Pages