बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Thanks Sas
खुप छान मेनु सुचवलास. सुजी ढोकळा कसा करायचा.

सास, 'सुजी ढोकळा Instant रेसीपी मी पाककृती विभागात टाकली' हे वाक्य रेसिपीचे पोस्ट एडिट करुन तिथे लिहिता आले असते. Happy 'संपादन' लिन्क दिसते आहे ना पोस्ट खाली? ती वापरुन पोस्ट एडिट करता येते.

माझ्याकडे उद्या ९ जण ब्रंचला यायचे आहेत. साबुदाणा खिचडी करणार आहे. त्या बरोबर अजून एक स्टार्टर आणि गोड प्रकार काय करता येईल?

साबुदाणा खिचडी बरोबर भोपळ्याचं किंवा बटाट्याचं रायतं आणि ओलानारळ -हिरवी मिरचीची चटणी. स्टार्टर साठी : वाटल्या डाळीच्या करंज्या / बटाट्याच्या कव्हरमधल्या ओल्यानारळाच्या कचोर्‍या/ आळुवड्या /तळलेला बटाट्याचा किस. शेवटी फ्रुट क्रीम, फ्रुट सॅलड, नारळाची वडी, रिकोटाचीझचे लाडु

धन्यवाद, शक्यतो तळायचे पदार्थ नको आहेत. आळुवडीच मी पण प्लान करत होते. बेक करत येईल अस काय करू शकते?

हांडवो बेक करतात. सुरळीच्या वड्या : न तळावा लागणारा पदार्थ. सँडविच ढोकळा, मुगाचे अप्पे असं काही.

बेक्ड आलु टीक्की !!! ही माझ्या कल्पनेतली आयडीया आहे बरं का...तुम्ही केलीच आणि चांगली झालीच तर तापमान, वेळ अशा माहित्या इथे टाकालच Happy

सिंडे, उसळीत पण बटाटे. किती बटाटे खायचे पाहुण्यांनी?? वेगवेगळ्या खोल्यांत बसावं लागेल ना!!! Proud

उसळ तुझ्या आयडीयेतली कल्पना आहे का ? खिचडी करणार आहे ना ती ? खाणं झालं की fire alarm वाजवुन द्यायचा, आपोआप सगळे मोकळ्या हवेत पळतील Wink

सिन्ड, अग सा खि ला तिकडे विदर्भ साईड ला उसळ म्हणतात! माझा नवरा असाच मला कन्फूज करायचा:)

मै,
मराठवाड्यातपण उसळ म्हणतात साबुदाणा खिचडीला Happy मी स्वतःच आधी कन्फ्युज व्हायचे त्याला कोणी खिचडी म्हणले की Proud

उसळीला काय म्हणतात मग ? खिचडी ? Wink

नाही गं मैत्रेयी, विदर्भात साबुदाण्याची 'खिचडी' म्हणतात. दिघ्यांकडे तरी! Happy

मुलाच्या वाढदिवसाला शाळेत खाऊ वाटायचा आहे. लाडू मागच्या वर्षीच झाले. चॉकलेट, केक, किंवा मिठाई चालत नाही. सुकामेवा ठरवत होते पण २/३ जणांनी आधीच वाटला.. फळ सगळेच वाटतात... वेगळ काही सुचवा प्लीज. पॅक करुन वाटता येईल असे.
आणी मोठ्या प्रमाणात सोलकढी करायची आहे. नारळाच दुध घरी काढण बर होईल की टिन मधल वापराव? कोणत cost effective होईल?

विदर्भात इतकी वर्ष मी काढलीत कध्धीच साबुदाण्याच्या उसळीला खिचडी म्हंटल्याचे ऐकले नाही. पिठल्याला पण बेसन म्हणतात नाहीतर चुन. कोथिंबीरीला सांभार/संभार! दिघे विदर्भात अपवाद असावेत Happy मृ दिवे!!!!!

शोनू, कसले पटापट मेनू सांगतेस गं.. असे वाटते तु महिन्याचे ३० दिवस वेगवेगळ्या देशातील अन्नाच्या चवी चाखत असतेस. कसं जमतं हे सर्व!!!! ये पण तू चिनी मेनू कधी लिहिले नाहीस..

मैत्रीयी, तुझे सासर विदर्भातले.. म्हणजे तू पण वर्‍हाडी झालीस तर. ग्रेट!!!!

सगळ्यांना धन्यवाद, मी हा बेत केला होता. येणारी सगळी नॉन महाराष्ट्रीयन होती आणि त्यांना साबूदाणा खिचडीच हवी होती.
१. साबूदाणा खिचडी + दही
२. आळूवडी + चिंचगूळ चटणी.
३. सॅन्डवीच ढोकळा + तळलेल्या हिरव्या मिरच्या.
४ नारळाच्या वड्या
५ मठरी (दुकानातून आणली)
६. चहा/ कॉफी

सुरभी
ड्राय फ्रूट्सचा फज कर. छान होतो. एकेका तुकड्याला रॅप करता येते चॉकोलेटसारखे.

सुरभी ही पहा फजची रेसिपी
पौष्टिक फज
अवलोकन संपादन
लागणारा वेळ:
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
२०० ग्रॅम काळा खजूर, प्रत्येकी ५० ग्रॅम - काजू, पिस्ते, बदाम व बेदाणे. ३/४ चमचे मिल्क पावडर. अर्धा चमचा साजुक तूप. ५/६ मारी बिस्किटांचा चुरा(बारीक पावडर नव्हे.)

क्रमवार पाककृती:
काजू, पिस्ते, बदाम मिक्सरमधून अर्धे बोबडे ग्राइंड करून घ्या. खजूर स्वच्छ धुवुन घ्या. कोरडा करा. खजुरातील बिया व नाके काढून टाका.
नॉन स्टिक पॅनमध्ये अर्धा चमचा साजुक तूप घालून त्यावर साफ केलेला खजूर घालून १ मिनिट छान परतून घ्या. त्यानंतर १ मिनिट झाकण ठेवा. गॅस बंद करा.
खजूर मऊ झालेला असेल. तो थंड होण्याआधी पटकन काजू,बदाम,पिस्ते(हे भरड वाटलेले), बेदाणे, मिल्क पावडर, मारी बिस्किटांचा चुरा हे सर्व घालून हे मिश्रण छान मिक्स करा. हळूहळू हाताने मळून घ्या. चटके बसतील पण .....!
त्या मळलेल्या गोळ्याच्या पोळपाटावर/जाड प्लॅस्टिकवर लोळ्या(दांड्या) करून घ्या. या लोळ्या फ्रिजमध्ये ठेवा. गार झाल्यावर छोटे छोटे तुकडे करा.

अधिक टिपा:
करायला खूप सोपा व अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. व ड्राय फ्रूट्स चे प्रमाण थोडे कमी जास्त झाल्यास पदार्थ बिघडत नाही. एकादा इन्ग्रेडियंट नसला तरी चालते. अर्थातच खजूर हा मुख्य इन्ग्रेडियंट आहे.

MMM, छान वाटतोय हा फज.. उद्या करुन बघते. मुलांना आवडेल.
मी असच खजुराचा रोल करायचे., फक्त मिल्क पावडर न घालता. काळा सिडलेस खजुर घेतला तर वाफ ही द्यावी लागत नाही तो मऊच असतो (बिचारा )

मला साधारण २० लोकासाठी एक पदार्थ न्यायचा आहे. स्नॅक किंवा मेन डिश काहीही चालेल. ९०%लोक अमेरिकन आहेत. प्लिज सुचवा. सामोसे सोडून. मला सकाळी ७ ला घर सोडावे लागते हे क्रुपया लक्षात ठेवावे. कमी तिखट छोले कसे काय वाटेल?

उकडलेल्या बटाट्याची उपासाची भाजी नेता? मी काही दिवसांपूर्वी नेली होती. सगळी जनता अमेरिकन. खूप आवडली.(नशीबानं कुणाला शेंगदाण्याची ऍलर्जी नव्हती.) आधल्या रात्री करून ठेवली तरी चालु शकतं. गार देखिल वाईट लागत नाही. अमेरिकन ग्रोसरीच्या दुकानात त्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी मिळत असल्यामुळे गेल्या आठवड्यात मला पण त्यांच्याचपैकी कुणीतरी स्वतः केलेली ही भाजी चाखायला मिळाली. Happy

इडली अन चटणी पण आवडीने खातात मंडळी. दोन्ही आदल्या रात्री करुन ठेवता येतील. आयत्यावेळी इडल्यांवर थोडं पाणी शिंपडून मायक्रोवेव्ह करायच्या १-२ मिनिटं.

उद्या जेवायला ५ जण येणार आहेत.
१ गरोदर बाई, १ वयस्कर जोडपे आणि १ ५ वर्शाची मुलगी.
बेत काय करावा?ईकडे मेथी मिळत नाही.
माझा बेत
पुरी
वाटाणा उसळ
काकडी ची कोशिम्बीर
पालक्/झुक्किनी/बटाटा भजी
पुलाव
टोमाटो चे सार
बासुन्दी

खुप जड होइल का?दुसरे कही सुचवु शकेल क कोणी?

सोबत खोबर्‍याची चटणी आणि कुठलेही ताजे लोणचे असावे. तसेच वरणभातही असावा.

तुमच्या सगळ्या सुचनाबद्द्ल आगावु धन्स!!!

समोश्यात आणि आलु-मटर भाजीत, दोन्हीकडे बटाटा. त्यापेक्षा कचोरी चाट किंवा पापडी चाट करता येईल का? थंडीच्या दिवसात सूप, सार किंवा कढी ठेवता येऊ शकते. एखादी कोरडी पालेभाजी किंवा मेथी-मलई-मटर, भरलेल्या मिरच्या, वांग्याचं भरीत, दाल्-मखनी किंवा तडका दाल, असं काही ठीक वाटतंय का? मटकी, मुगाची उसळ म्हणजे छान मराठी मेनु. त्याबरोबर आलु-पालक, आलु-मेथी, भरीत वगैरे जाईल. मग जीरा राईस ऐवजी फिक्कासा मसाले भात. गोडाला गरमागरम शिरा? (उसळ मुगाची नसेल तर मुगाचा शिरा)
मला लिहीतानाच भूक लागली! Happy

मला साधारण ५० मोठि लोकं आणि २० लहान मुले अशांसाठि मेनु सुचवा. बहुतेक मुले ५ वर्षाच्या आतली आहेत.

मुलिचा पहिला वाढदिवस आहे, जमल्यास रिटर्न गिफ्ट पण सुचवा.

आणि ते थिम वगैरे पन सांगा, .......... फार प्रश्न ना? काय करु पहिला Bday आहे.

धन्यवाद
RZ

पाव भाजि किवा दाबेलि,
दहि वडा,
पुलाव , गुलाब जामुन
बघा कसा वाट्त आहे मेनु

Pages