बेत काय करावा?

Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40

पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हाय सास,
कशी झाली तुझी लंच्/डिनर पार्टी ..अग मझ्याकडे पन १५ जण डिनर ल येणार आहेत्..तु काय मेनु केल होता त्याची आइडिया देउ शकते क??म्हणजे मला सोप जाईल...

दिपाली

मॢ.व शानू ,

तुमच्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद...
तुमच्या रेसिपी , सजेशन्स मी वाचलेत ..खुपच चांगल्या (बेस्ट) सुगरिणी आहात बाई तुम्ही...
रिअली ग्रेट!!!!

दिपाली

दिपाली, शोनूची आयडीया तर आणखी मस्त आणि सोपी. तळायची पण कटकट नाही.
थँक्यु! पण खरंच सांगते, सुगरण वगैरे काही नाही. खायला हवंय तर करावच लागतं अशी स्थिती आहे. करुन खाऊ घालणारं आजुबाजुला कुणी नाही. तेव्हा मग त्यातल्या त्यात शॉर्टकट शोधते. म्हणजे मग उरल्या वेळात ऊंडारायला मोकळी! Proud

माझ्या कडे १४ जन डिनर ला येणार आहेत.मला काहि मेनु सुचवा सोपा.

..

मराठी जेवण चालणार असेल तर मिसळ पाव, खिमा पाव, वडा पाव असा मेनू ठेवता येईल. गोड 'शाही तुकडा' केला तर सगळी ब्रेड वर आधारित थीम होईल.

स्नॅक्स टाइप चालणार असेल तर भेळ, शेवबटाटापुरी , रगडापॅटीस, फालुदा असा मेनु ठेवता येईल. व्हेज्-नॉनव्हेज फ्रँकी करता येतील.

मेक्सिकन पद्धतीचा मेनू चालणार असल्यास चिकन- टोर्टिया सूप, चिकन न बीन्स चे टाको , एंचिलाडा अन tres leches cake किंवा flan करता येईल. सोबत मार्गारीटा ! घरी guacamole अन साल्सा करता येईल. सगळ्यांच्या रेसिपी epicurious /food network अशा ठिकाणी सहज सापडतील.

मासे खाणार्‍यांसाठी पापलेट किंवा बांगडे भाजलेले, कोलंबीची बिर्यानी, सोडे-वांगी अशी सुकी भा़जी, पोळ्या, सोलकढी, साधा भात असा बेत करता येईल.

नाहीच तर मग ग्रॅड स्टूडंटचा जगप्रसिद्ध बेत करता येईल -कॅन्ड छोले किंवा राजमा, विकतचे नान, चिकन ड्रमस्टिकची चिकन करी, फ्रोझन्-मिक्स्-व्हेजी चे पाकीट घालून व्हेज राईस, स्टोनीफिल्डचे दही अन त्यात अगदी हौशी असल्यास बुंदी, आइसक्रीम अन चॉकलेट सॉस ! हाय काय अन नाय काय...

मराठी जेवण चालेल शाकाहारि हव आहे.अणि लवकर होईल अस पहिजे.

:).

अगदी शोनू.
युनिव्हर्सिटीत असतांना तर त्या छोले/राजमाने असला वैताग आणला होता. युनिव्ह सोडल्यावर पण मी जवळ जवळ वर्ष दीड वर्ष हा प्रकार केला/खाल्ला नाही.

मिसळ पाव , वडा पाव , शिरा असा बेत करता येईल. सगळे प्रकार अगोदर करून ठेवता येतील . आयत्या वेळी मिसळ,कट, फरसाण , कांदा वगैरे डिश मधून घालून देणे अन वडा-पाव असेम्बल करणे ही कामं राहतील. इथेच एक खोबर्‍याच्या वड्यांची रेसिपी आहे ती पण सोपी आहे.

Hi Dipali
I am really sorry, i did not reply you ealier .....माझी Party Post-पोन्ड झाली आहे आणी आज आत्ता एक नवी Party ठरलिय Sunday Dinner साठी काही (६-८) जण येत आहेत which was not planned

मी Sunday साठी:

starter: चाट with soft drink
श्रीखंड
पुर्‍या
बटाटा रस्सा भाजी
दाल तडका
गाजर शिमला राईस
साधा सलाड: कोणत्या भाज्यांचा ते ठरत नाही आहे (रायत्यात दही येत जे श्रीखंडात ही येतच म्हणुन रायता नाही)

आमच्या कडे येणारे Friends South चे आहेत म्हणुन हा मेनु मनात येतोय. मला आणखी एक भाजी/उसळ Dry Curry करायची आहे कोणती करु सुचत नाही आहे.

आयत्या वेळी धावपळ होतेय. उद्या एकी कडे Pot-luck ला जायचय त्या साठी ही काही तरी करायचय. परवा हा मेनु.

Dipali जर तुमची Party झाली नसेल तर हा मेनु बघा तुम्हाला कसा वाटतो.

शोनो मृ यांनी दिलेले मेनु कुठे आहेत? तळण नसलेला मेनु काय आहे Please सांगाल का?

starter-- दहि वडा चाट

पाव भाजी ,पुलाव्, गुलाब जामुन या सोबत अजुन कहितरि साईड डिश सुचवा.

Thanks Sas...

अग माझ्याकडची पार्टी postpond झाली सो नो प्राब्लेम...
तुला पुरीबरोबर ड्राय भाजी मसाला छोले करता येइल....

Njoy ur Party....

बाय

काल मी केलेला बेत, ठरवलेल्या बेतात थोडा बदल केला

Starter: पापडी चाट
Main Dish: मसुराची उसळ (आख्खे मसुर ,महाराष्टियन पध्द्तीने)
Side Dish: दाल तडका
Side Dish: बटाटा भाजी (Dry ,महाराष्टियन पध्द्तीने पण तेल जरा कमी घातल)
Rice Dish: Indian Fried Rice
Salad/Raita Dish: काकडी रायता
Bread Dishe: पुर्‍या, महाराष्ट्रियन पोळ्या
Sweet Dish cum Dessert: Simple Fruit Salad

सोपा मेनु, काही भिजवाव वै. लागत नाही मसुर लगेच शिजतात.

शुक्रवारी रात्री श्रीखंड चक्क्या साठी दही बाधंल , दुसर्‍या दिवशी श्रीखंड केल (४ वाट्या झाल) पण मी आणी नवर्‍यानेच ते फस्त केल. त्यामुळे Sweet Dish Change करावी लागली. Happy

मसुर लगेच शिजतात >>> आख्खे मसुर ? माझ्या आणि इतर बर्‍याच लोकांचा अनुभव असा की अख्खे मसुर शिजता-शिजत नाहीत Sad

Indian Fried Rice >>> म्हणजे पुलाव की मसाले भात ?

Indian Fried Rice >>> म्हणजे पुलाव की मसाले भात ? >>>> नाही नाही महाराष्टियन पध्द्तीने... म्हणजे फोडणीचा भात... Proud Light 1

हो, आख्खे मसूर न भिजवताही लगेच शिजतात, कुकरमध्ये.

किती शिट्ट्या घ्याव्या लागतात ?

ऍडमा, वर दाल तडका दिसले म्हणुन विचारले कुठल्या पद्धतीचा भात Uhoh

१ शिटी झाली की हीट कमी करुन ५ मिनिटे ठेवायचे, मग बंद करायचा गॅस. भाताबरोबर पण शिजतात गं.

हे शिजतात इतक्या कमी वेळात ? आता मला माझे दात अशक्त झालेत की काय अशी शंका येतेय Wink

lol, हो. हेच ते. Lol
पाणी घाल हां भांड्यात नक्की! Wink

काय गरीबाची थट्टा करता Sad करुन बघते परत. तरी पण नाय शिजले तर तुला पाठवते प्याक करुन Wink

पाणी घाल हां भांड्यात नक्की! >>
लालू Rofl

सिंडे तासभर जरी भिजवले तरी चालतं.

शोनु, फार हसु नकोस, पडशील Wink

शोनु..:फिदी:
सिंड्रेला, मसुर जरा गरम पाण्यात तासभर भिजवले की लगेच शिजतात.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी

सास,
मला दाल तडका ची रेसिपी सांगशील का??माझा दाल तडका ढाब्यावर असतो तसा आवडतो ,पण मला तसा जमत नाहि...
कुणाला महिती असेल किंवा लिंक सांगु शकाल का??

मसुर लगेच शिजतात, मी दाल तडक्या साठी तुरिची डाळ व मसुर दोन्हि एकाच वेळेस कुकर मध्ये लावले, वरण करण्या साठी जितक्या शिट्ट्या घेतो तितक्याच घेतल्या. Happy

Indian Fried Rice म्हणजे फोडनिचा भातच Happy

मी तेलात मोहरी (Optional), जिर, बारिक चिरलेला कांदा, बारिक चिरलेली हिरवी मिरची, असल्यास कढीपत्ता, हळद, धणे पुड, तिखट घालायच व शिजवुन थंड कतुन मोकळा केलेला भात घालायचा Fried Rice Ready Happy

अधिक चवी साठी वरुन कोथिंबीर व लिंबाचा रस घालायचा

दाल तडका:

यात मह्त्वाच काय तर वरणावर लाल लाल फोडणीचा तर दिसण.
तेलात हिंग, मोहरी, जिर, बारीक चिरलेला कांदा, हव असल्यास लसुन, बारीक चिरलेली मिरची, बारीक चिरलेला टमेटो, हळद, धणे पुड, तिखट घालुन फोडणी करायची व शिजलेली दाळ टाकायची (न घोटता that is mash न करता)

वरिल दोन्ही पदार्थात चवीनुसार मीठ ही घालायच :)...सोपा मेनु Happy

हो! लालु नी सांगितल त्या प्रमाणे मसुर भाता बरोबरही होतात.

अख्खे मसुर, मुग आणी चवळी हे लगेच शिजतात भिजवले नाही तरी चालत (भाता बरोबरही होतात) ...पण शिजविण्या आधी जर अर्धा एक तास भिजवेले तर छान फुलतात. ३०-४० मिनटात पाण्यातच आकाराने वाढलेले दिसतात Happy

wel123,

पाव-भाजी सोबत वर जे Suggestions दिले आहेत त्या प्रमाणे Brown Rice वा दहीभुत्ता करता येईल.

माझ्या मनात खालचे options आहेत:

Starter: पालक (वा कांदा/मिरची ई)पकोडे/सुजी ढोकळा/भेळ/पापडी चाट
Main Dish: पाव-भाजी
Side Dish 1 : दही वडे (गोड-आंबट, तिखट-आंबट)
Side Dish 2/Rice Dish : Indian Fried Rice (फोडणिचा भात :))
Side Dish 3 : तळलेला / भाजलेला पापड
Siweet Dish : बर्फि / केक
Salad Dish: बारिक चिरलेला कांदा, टमाटा, कोथिंबीर लिंबाच्या फोडि आणी काकडिच्या चकत्या (पाव-भाजी वर बारिक चिरलेला कांदा टमाटा, कोथिंबीर, लिंबाचा रस छान लागतो बरेच लोक prefer ही करतात)
Dessert: Ice-cream/फालुदा/मस्तानी

Pages