न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे, तुझं दु:ख त्या फोटोतल्या स्नो सारखं गोठव बाई जरा. बाराकरांवर अवेळी पावसासारखं बरसतंय सकाळपासून Proud

मी फोन केला तर "अई गं पडला रे फचिन पडला...." "अहो पडला पडला काय उचला त्याला...आजकालची पिढी म्हणजे....." "कित्ती बै तो स्नो...केस सगळे पांढरे दिसायला लागले माझे..." "आता डब्यात काय स्नो भरुन न्यायचा की काय..." अशी वाक्ये ऐकु आली. मग मी ठेवुनच दिला फोन.

Lol सिंडे, काय चुनचुनके फोटो टाकत्येस ग. असो, कुणाची दृष्ट न लागता आमचं एवेएठि मस्त पार पडलं खायला अगणित पदार्थ आणि जोडीला गॉसिप्स, सॉरी- गप्पा. हसून हसून गाल दुखायला , लागले.
उपस्थित यशस्वी कलाकारांपैकी: अजय(अ‍ॅडमीन)-सहकुटुंब, झक्की, परदेसाई, अनिलभाई-सहकुटुंब, स्वाती-सहकुटुंब, अमृता-सहकुटुंब, रुनी-सहकुटुंब, मैत्रेयी-सहकुटुंब, माणूस-बाईमाणूस, स्वाती_आंबोळे, सायो, फचिन, चमन, नयनीश,
कुणी राहिलं तर नाही ना?

सगळे ट(ल)पून बसलेत वृत्तांत वाचायला/ऐकायला. फोनाफोनी सुरू झाली का आतल्या गोटातले वृत्तांत ऐकायला? मी कोणाला बरं फोन करावा? Proud

मृ, तुझ्याबद्दल गॉसिप्स नाहीयेत तेव्हा कुणालाही कर;). सिंडीचा फोन मध्ये येऊन गेला. मला वाटलेलं अचानक येऊन सरप्राईज द्यायचा तिचा प्लॅन असावा.

वृत्तांत जमला तर लिहेन. पण रुमाल टाकत नाहीये. तेव्हा ज्याला शक्य असेल त्याने लिहा.
चिनूक्स चे आभार, राजमलाई पाठवल्याबद्दल.

>>मृ, तुझ्याबद्दल गॉसिप्स नाहीयेत
मग काय फायदा फोन करण्याचा? घोर निराशा केलीत! Proud

सायो, डबे आले होते का? किती भरले? कशानं? रुमाल नको टाकूस पण येवढं सांगण्यापुरती चिंधी टाक. Proud

जीटीजी दण्यक्यात पार पडल. बडबड करुन आणि हसुन हसुन खरच तोंड दुखु लागल. खूप मज्जा आली. Happy बाकि उद्या.. घरी पोचल्यावर. मी अजुन बारातच Happy इन्टंट माहेरी. Wink

अरे, वृत्तांत कुठाय? सकाळ पासुन ७-८ वेळा येऊन गेलो, माझं "बिपाशाले लुगडं" पार पाठ झालं पण वृत्तांताचा अजुन पत्याच नै Proud

नुसती वाईन नव्हती, ग्लुवाईन होती. गेल्या गेल्या रुनीने ती देऊन उपस्थितांचं स्वागत केलं.

अरे पाहू रे किती वाट चाललंय. विनय, वृत्तांत टाकणार होतात ना? मैत्रेयी, तू ही लिही की.

गेले दोन महिने करायचं करायचं म्हणून गाजत असलेलं एवेएठि एकदाचं येऊन ठेपलं. मी आदल्या दिवशी मैत्रिणीकडेच राहिले होते. सकाळी त्यांनी एवेएठि जायचा माझा प्लॅन 'आपण बाहेर जेवायला जाऊ, मजा करु' वगैरे म्हणून हाणून पाडायचा प्रयत्न केला पण तो असफल ठरला नी मला त्यामुळे निघायला अंमळ उशीरच झाला. लोकं IST समजून येणार की इथल्या पद्धतीप्रमाणे वेळेत हजर होणार काही कळायला मार्ग नव्हता. पार्किंग लॉटमध्येच मला स्वाती_आंबोळे आणि स्वाती भेटल्यावर जरा जिवात जीव आला. हॉलमध्ये रुनी,नितीन, फचिन, चमन, नयनीश, देसाई, अनिलभाई वगैरे मंडळी हजरच होती. अ‍ॅडमिन ही ४/४.५ तास गाडी हाकून सहकुटुंब सगळ्यांच्या आधीच आले होते. टेबलं मांडून झाली होती. रुनी लोकांची वाट पहात आलेल्यांचं स्वागत चवदार्,गरम गरम ग्लुवाईनने करत होती. सगळ्यांनी आणलेली खादाडी कुठे कशी मांडावी ह्यावर गंभीर चर्चा झाली.
मायबोलीवरची कंपुगिरीची सवय असल्याने सगळे टेबलाच्या आसपासच छोटे छोटे कंपु करुन गप्पा मारत होते. कदाचित लांब बसलो तर जेवण संपेल नी काहीच पदरी पडणार नाही ही भितीही असावी मनात. दोनतीन वेळा कुणीतरी 'चला, बसून गप्पा करुयात' असं म्हटलं खरं, पण त्याचाही सोयीस्करपणे अनुल्लेख करण्यात आला. मायबोलीवर हल्ली 'बायपोलर डिसॉर्डर' कशी वाढत चाललीये ह्यावरही बर्‍याच जणांनी चिंता व्यक्त केली. माजी अ‍ॅडमिन खुद्द हजर असल्याने कुणाची तक्रार करायला आजतरी विपु गाठायची गरज नव्हती म्हणून काही आयडींनी मनातली मळमळ तिथेच मोकळी केली.
परदेसाईंनी आणलेली 'पापलेट आमटी' खाऊन अमृता इतकी तृप्त झालेली होती की काय बोलावं हे तिला सुचत नव्हतं. त्याच भरात 'मी आता झक्कींसारखी वर जायला मोकळी' हे तिने डिक्लेअर केलं. त्यावर स्वाती _आंबोळेनी तिला डोळ्यांनीच झापलं. झककी मागेच उभे होते पण नशिबाने त्यांनी ऐकलं नाही. वयाचा परिणाम असावा बहुतेक. मधेच भाई एक भिंत पकडून माणसाला आपले वेगवेगळ्या पोझ देऊन फोटो काढायला लावत होते. कुणाला दाखवायचे होते कोण जाणे. तरी बरं त्यांची सौ नी लेकही हजर होत्या.
माणसाला 'एकट्या माणसाने करायचे उद्योग' हा बीबी आता बंद करणार का, अशी सामूहिक विचारणाही करुन झाली. त्याची बायको पहिल्यांदाच इतक्या नमुन्यांना भेटली असावी. आज काही माणसाचं खरं नाही असा विचार माझ्या मनात येऊन गेला. तसंच फचिनचं सगळ्यांनी अभिनंदन केलं आणि तो ही नम्रतेने ते स्विकारत होता. त्यालाही आता माणसाचा सल्ला घे, असं उगाचच भोचकपणे सुचवलं गेलं.
अ‍ॅडमिनच्या घरातला सुतार पक्षाचा त्रास आताही होतोय का अशी प्रेमळ चौकशीही सगळ्यांनी केली त्यावर 'मी माझा प्रॉब्लेम मांडला तर त्यावर रॉबीन पक्षी आणि झक्की यांचा संबंध जोडून लोकांनी ललित समजून मजाच करायला सुरुवात केली' अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

खादाडी उरकल्यावर स्वातीने शब्दवेध (what's the good word) करता चिठ्ठ्या करुन आणल्या होत्या. तो खेळ खेळायला सुरुवात केली. ३,४ जणांचे गृप पाडले गेले. अमृता, किरण्,नी चमनच्या गृपला चंट, आयटम, माल असे चावट शब्दच सारखे येत होते. का कोण जाणे? ;). तर माणूस्, नयनीश नी नितीन नियम धाब्यावर बसवून नुसते कल्ला करत होते. काहीही शब्द आला की रुनीचा नवरा 'गुगल' गुगल' ओरडायचा. त्यांच्या गृपला 'अनारसा' शब्द होता बहुतेक तर माणुस 'दिवाळी' हा क्लू देऊन सारखा पोटावरुनच हात फिरवत होता. मला आपलं वाटलं 'फराळ खाऊन पोट बिघडलं' असा काही शब्द आहे की काय. Proud
ह्यानंतर आणखी दोन तीन गेम खेळून झाले. अनिलभाईंनी उभ्या उभ्या विनोद सांगून झाले. त्यानंतर विनयनेही उ उ वि ची एक झलक दाखवली. चमनही ह्यावेळी बर्‍याच तयारीनिशी आला होता. त्याने सांगितलेला एक खेळही खेळून झाला. स्वातीने(आंबोळे) आपल्या मधुर आवाजात एक दोन गाणी म्हटली. तोवर सहा वाजत आले होते . हळूहळू सगळ्यांना घरी जायचे वेध लागले. नी खादाडी वाटप, आवरा आवरी, स्वच्छता होऊन मंडळी पांगली.
हायलाईटसः
१: अ‍ॅडमिन सहकुटुंब आल्याने एवेएठिला चारचांद लागले.
२:जमल्यावर आपण कुणाबद्दलही वाईट बोललो तरी आपण त्या व्यक्तीची आठवण काढत असतो, म्हणजे ते चांगलंच- इति परदेसाई
३: डिसीच्या मेगा गटगला भरपूर मंडळी येणार असतील तर एक मोठ्ठी बस करुन जाणं फायद्याचं होईल असा ठरावही पास करण्यात आला.

बाकीच्यांचे रसभरीत वृत्तांत येतीलच, तोवर हा खपवून घ्या.

मायबोलीवरची कंपुगिरीची सवय असल्याने सगळे टेबलाच्या आसपासच छोटे छोटे कंपु करुन गप्पा मारत होते. >>>>>. Rofl

माणसाला 'एकट्या माणसाने करायचे उद्योग' हा बीबी आता बंद करणार का, अशी सामूहिक विचारणाही करुन झाली. >>>>> Lol

आणि हो.. अनारश्यावर पांढरा पांढरा रवा असतो हं.. नविन माहीती मिळाली. Lol
रवा हा क्लु होता. अनारश्यासाथी

Pages