न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Whose line is it anyway सारखा एखादा खेळ खेळा. धावतं समालोचन ऐकायला फोन करीन. Proud

तयारी सुरु झाली का?..

०१)अनिलभाई -- २ किंवा ३ (१/२ सबवा)
०२)फचिन- १ शाकाहारी - ज्यूस, सोडा, पाणी, झिप लॉक... (१/२ सबवा)
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + गोड पदार्थ
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अ‍ॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
१६) २ कारट्या + २ मुली --

विनय, यात फक्त तुमच्या लिखाणावर प्रश्न येणार का तुमच्या लिखाणावर लिहिलेले प्रतिसाद पण वाचायचे ? नि तुमच्या रंगिबेरंगी पानावरचे किती वाचायचे?
वरील चार धाग्यांपैकी कोणत्या धाग्यावर किती मार्कांचे प्रश्न? म्हणजे ऑप्शनला टाकता येईल. पासिंग कितीला? २५ / १०० लाच ठेवा.
तर अशी सगळी माहिती लवकर लिहा. म्हणजे मग अभ्यास त्याप्रमाणे करता येईल. हो, उगाच डोके जास्त झिजवायला नको. सवय नाही. काटकसर करावी म्हणतात.

मैत्रेयी, तुझा फोन नंबर संपर्कातुन पाठवशील का?? हरवलोच जर चुकुन तर फोन तरी करता येइल...
सकाळी लवकरात लवकर म्हणजे निदान ९ ला तरी मला निघायलाच हव नाही?

अरे मी २-३ लोकांना माबोवरून ईमेल केलीय फोन नं बद्दल. अमृता तुलाही केली आहे. आता आणखी ईमेल्स करता येत नाहियेत ! Sad ज्यांना फो नं मिळाला नाहिये त्यांनी कृपया मला इथून ईमेल टाका, मी रिप्लाय करून फो नं कळवेन.

मै, आणखी तासभर थांबून मग संपर्कातून इमेली करता येतील. एका वेळी चारच करता येतात.
-सदस्य- मदतसमिती

आपआपले पदार्थ वाढायला लागतील तसे मोठे चमचे, पळ्या पण घेऊन जायला हव्या. गेल्या वेळी कुठले बरं पदार्थ छोट्या प्लॅस्टीकच्या चमच्याने घ्यावे लागले. त्यामुळे वेळ लागला वाढून घ्यायला. अशा वेळी इतका वेळ काय करतेय म्हणून लाइनीत मागचे लोक वैतागून बघतात! Proud
-सदस्य-भोचकसमिती Proud

मैत्रेयी
तुझा नंबर मागच्या झक्कींकडच्या जीटीजीला होता तोच आहे की बदललाय, तोच असेल तर माझ्याकडे आहे.

हुश्श्य मिळाले एकदाचे मस्करपोने चीज, ३-४ ठिकाणी हिंडल्यावर. नेहमी होल फुड्स मध्ये मिळते म्हणून मी निवांत आणि तिथे गेल्यावर भरवशाच्या म्हशीला टोणगा, पण मिळाले एकदाचे. यावेळी सगळ्यांना तिरामिसु खायला मिळेल.

०१)अनिलभाई -- २ किंवा ३ (१/२ सबवा)
०२)फचिन- १ शाकाहारी - ज्यूस, सोडा, पाणी, झिप लॉक... (१/२ सबवा)
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्‍या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + तिरामिसु
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अ‍ॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अ‍ॅना) -- ????
१५) सागर + १ (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
१६) २ कारट्या + २ मुली --

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

बहुतकांना फो नं. आणि सूचना कळवल्यात. ज्यांना फो नं मिळाला नाही त्यांनी ईमेल टाका मला. किंवा इथे लिहा .
वि सू :
जिपिएस मधे पत्ता घालताना ४७ फ्रॅन्कलिन टाका. ४३- ४५ असे काही येत नाहे मॅप वर. ते कम्युनिटीचे क्लबहाउस असल्याने मेलबॉक्स वगैरे नाही . तर ४७ नंबर च्या घराला लागूनच क्लबहाउस चे पार्किंग दिसेल. तिथेच छोटा प्ले एरिया, पूल आणि आपले सूप्रसिद्ध क्लबहाउस दिसेल Happy

लास्ट बट नॉट लीस्ट Happy : हॉल चे भाडे - सुट्टे पैशे आणा Happy घरटी सुमारे ४ डॉ. काँट्रिब्युशन येईल बहुतेक.

रुनि, माणसाबरोबर माझ्यासाठी तिरामित्सु पाठव Happy माणसा, तू सोमवारी स्टॅमफर्ड स्टेशनला माझा नवरा भेटेल त्याच्याकडे तिरामित्सु दे आणि त्याला सांग शिंगोळे आहेत Proud

उद्या प्लेन्स बरोमधे स्नो ट्युबिंग मॅरेथॉन (AKA स्टॅरेथॉन) आहे (म्हणे) Proud

Pages