न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्या बेब(बेवडा बहाद्दर) कंपनीचं एवेएठी इतकं उत्तम पार पडल्याबद्दल अभिनंदन! Proud बेब्जनी समोसे, उसळ, तिळगूळ, चिकन, पापलेट, वाईन, वोडका इत्यादीच्या सेवनानंतरही टक्क जागं राहून (चावट) शब्दांचे खेळ खेळले! म्हणूनच बहुतेक सिंडीनं मला, 'मृ आपल्यासारख्या भाबड्या बायकांनी जायलाच नको' असं सांगून ठेवलं असावं. Proud

मृ, तुझ्या शब्दांचा खेळ खेळायचा राहिलाच ग. असो, तू इकडेच टाक बरं ते शब्द.

'मृ आपल्यासारख्या भाबड्या बायकांनी जायलाच नको' >>>> Lol आता बेब्ज एवढे प्यायलावर स्लीप ऑफ टंग होणारच की. मुळात हेतू वाईट नव्हता काई. Wink

आपण जायच्या आतच ती संपली असं वर कुणीतरी कन्फेस केलंय बघ. म्हणजे बाप्यांनी आल्या आल्याच बाटल्या तोंडाला लावल्या.

मृ, Proud

त्यावरून आठवलं, त्या भमे फेम झक्कींच्या कडच्या ए वे ए ठि चे फोटू माणसाकडे आहेत म्हणाला. माणसा, शक्य असेल तर या लेटेस्ट फोटोंबरोबर तेही पाठवशील का रे, माझे डाउनलोड करायचे राहिले होते तेव्हा. अजून कोणाकडे असतील त्यांनी पाठवले तरी चालतील Happy

आता रहावत नाहीये.. माझी बाजु पण मांडायलाच हवी Proud

सकाळी ७ ला उठुन पण निघायला ९:३० झाले. नवरोबा इतर वेळी जास्त वेळ झोपू नये अशी बडबड करुन मला नेहेमी उठवतो आणि जेव्हा खरच सकाळी उठायची गरज असते तेव्हाच बरोब्बर त्याची झोप पूर्ण होत नाही.
त्यामुळे उठा उठा करुन निघायला अंमळ उशिरच झाला. आता ३ तास ड्राइव्ह म्हंटल्यावर गॅस, हवा(टायरची) बघण गरजेच होतच. त्यामुळे जर उशिर झाला तर इतक काय ते बोलाव?? मराठीत म्हणतात ना, बेटर सेफ दॅन सारी.. Proud

तर मैत्रेयीच्या हॉल शोधायच शिक्रेट तिने शेअर केल्यामुळे आणि हूडांनी आकाशातुन यायचा मार्ग दाखवल्यामुळे आम्ही न चुकता १ वाजता पोचलो. पोहोचताच... 'हे बघा आले एकदाचे ' अस सगळ्ळे म्हणाले फक्त झक्कींनी प्रेमाने तीळाची वडी देउन स्वागत केल. अजय आणि भावनाला बघुन आश्चर्याचा धक्का बसला. आत येतानाच बोस्टन वरुन ह्यावेळी कुणी येणार नाहीये अशी किरणला माहिती दिल्यामुळे जरा जास्तीच बसला.

हाय हॅलो झाल्यावर पार्लाकाकुंच सॉलीड गॉसिप चालु होत ते परत चालु झाल आणि मी त्यात सहभागी झाले. सगळ्यांचे समोसे खाण चालु होत हे माझ्या जरा उशिरा लक्षात आल मग लगबगीने जाउन समोसा घेतला. वाईनही आमच्या आधीच आलेल्या अल्कोहोलीक लोकांनी बहुदा संपवली होती मला तर दर्शन पण झाल नाही...

नयनीश ला बघुन... हेच का नक्की वैद्यवुबा?? अस वाटल.. नयनिश परत आयडी बदल बघु. Happy वैद्यबुवा म्हंटल्यावर देसाईंसारख कुणीतरी मिडलएज डोळ्यासामोर येत Proud

पापलेट आम्टी खाल्यावर मी जे काही बोल्ले तो पाप्लेट आमटीचा परीणाम समजावा.. मला बहुदा ती चढत होती. पण झक्कींनी मला आता कुणीही काहीही बोल्ल तरी काहीही वाटत नाही अस आणि अजुन बरच काहीस किर्तनात सांगुन चुगली करणार्‍यांच तोंड बंद केल. Wink

नंतर सगळे खाण्यात आणि गप्पात मग्न होते. तेवढयात माझ्यासमोर एक पोरगेलेसा बारीकसा उंच मुलगा आला. 'मी कोण सांग पाहु' मी म्हणाले 'तु फचिन तर नव्हेस??' गप्पा मारता मारता त्याने तुझे दहीवदे सिंड्रेला पेक्षा छान आहेत अशी कबुली माझ्याजवळ दिली. Proud

सगळे खाउन 'पिउन' तृप्त होउन बसल्यावर शब्दवेध खेळ चालु केला. स्वातीने काढलेले शब्द भारीच सोपे होते. तरी देसाईंच्या गृपला ओळखता आले नाहित. मग अजय ह्यांनी एकेक झाकडु शब्द शोधुन काढले. त्याच वर्णन आधीच खूप झाल आहे. 'हु अ‍ॅम आय?' खेळायला पण मजा आली. भाईंचे आणि विनय ह्यांचे ऊ.ऊ.वि. मस्तच. नयनिश आणि स्वातीने सुरेख गाणी म्हंटली. बाराकरांनी कोरस पण दिला तर स्वातीला पुढे गाववलच नाही.
Wink
'राजमलई खाल्ली तुम्ही??' हे मी म्हंटल्यावर रुनीने मोठ्या मनाने तिची राजमलई मला दिली आणि वर 'अग काही नाही, फक्त रावळगाव आहे' अस सांगुन माझा उत्साह कमी केला. मसाला पान खाउन पुन्हा मन तृप्त झाल. मधे कुणीतरी कॉफी आणुया अस सुचवल पण नंतर सगळेच विसरुन गेले किंवा सगळ्यांना घरची आठवण येउ लागली.सहा वाजलेले आणि मला अजुनही आरामत बसलेल चालल असत पण सगळे भराभरा जाउन झिपलॉक भरु लागले म्हणुन मला काही उरणार नाही अस वाटुन मी पण उठले.

आवराआवरी करुन सगळे भराभर बाहेर पडले सुद्धा..

अर्ध्या लोकांना आधी भेटलो पण नसताना सगळे ओळखु तर आलेच, वर आपण त्यांना आधी नक्किच पाहिलय अस फक्त मलाच वाटल कि तुम्हाला पण???? Happy

देसाईंसारख कुणीतरी मिडलएज डोळ्यासामोर येत <<< अजून यौवनात मी Proud
(तिकडे फक्त अडीज चंद्र होते.. कोण कोण ते ओळखालच)...

स्वातीने काढलेले शब्द भारीच सोपे होते. तरी देसाईंच्या गृपला ओळखता आले नाहित <<<< Sad

(आम्ही या खेळाचे Rabbit होतो, आणि गिनी पिग सुध्दा..) Wink

ए काहीपण काय स्वाती.. मला एकच मिळाली राजमलई आणि ती पण रुनीच्या खिशातुन.. तु कुणातरी दुसर्‍याला दिली असशील.

अमृता!! << तू पापलेटच्या आमटीबरोबर 'राजमलाई' खाऊन सगळ्या पापलेटांचा अपमान केलास Angry

स्वाती... तू राजमलाई भावनाला दिल्याचे मी प्रत्यक्ष या दोन डोळ्यांनी आणि दोन भिंगातून बघितले.

(वयोवॄध्द वाटलो तरी ) Proud

देखा!! सच आखीर सामने आही गया... Happy
देसाई पापलेटांबरोबर नाही कै... मी नंतर दुसर्‍यादिवशी घरी येताना खाल्ली.. ती पण किरण बरोबर शेअर करुन.

>> स्वाती... तू राजमलाई भावनाला दिल्याचे...

ओह, असं झालं होय! इतकं काय ते मेलं! नाही लक्षात रहात एकेकदा.
आता वय झालं ना (विनयचं)!! Proud

आणखीन एक ... 'आता वाजले कि बारा जाउ द्याना घरी' हे गाण ऐकल्यानंतर झक्कींनी 'सातच्या आत घरात च काय झाल?' असा निरागस प्रश्न विचारला Lol

सर्वांना फोटो पाठवले आहेत. (सचीन आणि चमन सोडुन, तासाभराने पाठवतो तुम्हाला)

http://www.flickr.com/photos/sagari/sets/72157623161272981/show/

ईमेल ने पाठवलेल्या लिंकने व्यक्तींचे फोटो दिसतील... बाकीच्यांना आम्ही कश्याकश्यावर ताव मारला त्याचे Happy

आताच पाहिले फोटो, झक्कास बरका!!! अरे त्या आमटीतल्या पापलेटाची काय डिटेल्स दिसतयात! धन्य तु आणि तुझा क्यॅमेरा!

Pages