न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०
ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.
१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०
वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा
>> मी काकु नाही असं सांगावं
>> मी काकु नाही
असं सांगावं लागणं हीच पहिली खूण बरं रुनी.
जसं आंटी मत कहो ना म्हणावं
जसं आंटी मत कहो ना म्हणावं लागतं ना, तस्संच.
मग रुनीला आजपासुन आंटी
मग रुनीला आजपासुन आंटी म्हणुया का??
रुकाकू / रुकाकी कसं वाटतं?
रुकाकू / रुकाकी कसं वाटतं?
हायला लगेच बायकांच्या पोष्टी
हायला लगेच बायकांच्या पोष्टी आल्या... काकु म्हणा, आज्जी म्हणा, पणजी म्हणा, अजून काही म्हणा पण ते आंटी नको.

कोणाला काही पुस्तक हवी का, माझ्या विपुत लिहा.
सायो तुझी पुस्तक आणतेय.
फचिन तुला पुस्तक मिळणार नाहीत. मागच्या वर्षी घेतलेली पुस्तकं तू अजून वाचली नाहीयेत आणि परत पण दिलेली नाहीयेत.
रुनावती, लोकांनी तिरामिस्सु
रुनावती, लोकांनी तिरामिस्सु हाणायला सुरुवात केली की सांग मला. मग मी इकडे विकत घेऊन त्याच्वेळी खाईन.
०१)अनिलभाई -- २ किंवा ३ (१/२
०१)अनिलभाई -- २ किंवा ३ (१/२ सबवा)
०२)फचिन- १ शाकाहारी - ज्यूस, सोडा, पाणी, झिप लॉक... (१/२ सबवा)
०३)स्वाती_आंबोळे - छोले किंवा पांढर्या वाटाण्यांची उसळ
०४)परदेसाई (पापलेट आमटी), टेबल क्लॉथ्स
०५)झक्की - रंपा, पेपर प्रॉडक्ट्स : प्लेट्स, नॅप्किन्स, बाउल्स, चमचे, ग्लासेस
०६)मैत्रेयी - २ मोठे, २ लहान - व्हेज भाजी-पनीर बटर मसाला, आणि स्टोव्ह, पातेली वगैरे
०७)वैद्यबुवा - २ मोठे, १ लहान, नॉन व्हेज करी (चिकन), पोळ्या, लाडु
०८)अमृता - २ मोठे, १ लहान (दही वडे), २ शाकाहारी, १ दोन्ही
०९)सायो- १ - शाकाहारी- मसालेभात आणि रायता/कोशिंबीर.
१०)चमन - राजमलाई
११)रूनी पॉटर - २ मोठे (१ शाकाहारी, १ मिश्रहारी) - ग्लु वाईन + तिरामिसु
१२) विकु-- ???
१३) स्वाती - २ मोठे (२ मिश्रहारी ) - चिकन अॅपटायजर
१४) अर्चना दिक्षीत (अॅना) -- ????
१५) सागर + सोनाली (२ मिश्रहारी ) --चिज आणि खारवलेली बिस्किटे
हॉल चे भाडे - सुट्टे पैशे आणा घरटी सुमारे ४ डॉ. काँट्रिब्युशन
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०
जिपिएस मधे पत्ता घालताना ४७ फ्रॅन्कलिन टाका. ४३- ४५ असे काही येत नाहे मॅप वर. ते कम्युनिटीचे क्लबहाउस असल्याने मेलबॉक्स वगैरे नाही . तर ४७ नंबर च्या घराला लागूनच क्लबहाउस चे पार्किंग दिसेल. तिथेच छोटा प्ले एरिया, पूल आणि आपले सूप्रसिद्ध क्लबहाउस दिसेल
अॅना,विकु,चमन येताहेत ना?.
अॅना,विकु,चमन येताहेत ना?.
अॅनाचे नक्की नाही असे ती
अॅनाचे नक्की नाही असे ती पार्ल्यावर म्हणाली होती, विकु आणि चमनला फोन करायला हवा. त्यांचे नंबर आहेत का?
माझ्याकडे नाहीत.
माझ्याकडे नाहीत.
चमन आज शिट्टीत बागडत होता.
चमन आज शिट्टीत बागडत होता. विकु पण काल परवा कुठे कुठे बागडताना दिसत होते.. त्यांन मेल टाकुन पहा.
चमनचा नंबर फचिन कडे आहे.
चमनचा नंबर फचिन कडे आहे. त्याला सांगायला हव फोन करायला. आताच विकुंना मायबोलीवरून मी मेल केली, पण वाचायला हवी त्यांनी आज.
चला मंडळी, आता भेटु उद्या
चला मंडळी,
आता भेटु उद्या सकाळी..
चमन येतोय असं मला म्हणाला तरी
चमन येतोय असं मला म्हणाला तरी खरं... त्याला फोन करून विचारतो..
चला मंडळी उद्या भरपूर धमाल
चला मंडळी उद्या भरपूर धमाल करा, गप्पा करा गॉसिप करु नका, स्नो मधे खेळा आणि (स्वत:च्या) शर्टाच्या बाहीला नाक पुसा. पुणेकर कोणी असतील ते मलमलचा रुमाल आणतीलच. फोटो काढा. वृत्तांतात पेशल जागा ठेवलीये मी फोटोंसाठी
>> गप्पा करा गॉसिप करु नका हे
>> गप्पा करा गॉसिप करु नका
हे मला कळलं नाही. या दोन गोष्टी निराळ्या असतात का?

चला उठलात कि नाही??? आम्ही
चला उठलात कि नाही??? आम्ही निघु अर्ध्या तासात. आम्च्याआधी पोहचा म्हणजे झाल
चला निघा लवकर. मी पोचेन १२
चला निघा लवकर. मी पोचेन १२ पर्यंत.
मंडळी भरपूर खा, प्या, मजा
मंडळी भरपूर खा, प्या, मजा करा! गॉसिप कराच करा
पेशल बीबींच्या नंबरांची देवाणघेवाण करा
आणि लगे हाथ वृ पण टाका. (मला संध्याकाळी ताजा-ताजा वृ मिळायची सोय मी केलेलीच आहे
)
भरपूर फोटो पण काढा. फोटोंच्या वेळेस ढकलाढकली, मारामारी करू नका..तसही ह्या वेळेस पग्या नसल्याने शक्यता कमीच आहे
एकंदरीत जीवाचं बारा करा!!!
आज अनुक्रमे पहाटे ५ वाजता आणि
आज अनुक्रमे पहाटे ५ वाजता आणि सकाळी ७ वाजता घेतलेले मैत्रेयीच्या कॉम्प्लेक्समधले फोटो:


मैत्रेयीच्या कॉम्लेक्समधले?
मैत्रेयीच्या कॉम्लेक्समधले?
झाली का तयारी? मैत्रेयी,
झाली का तयारी? मैत्रेयी, तुमच्या कम्युनिटीहॉलात लॅपटॉप घेऊन ये. आणि कुणालातरी बसव धावतं वर्णन लिहायला.
सिंडीने तिच्या खिडकीतून
सिंडीने तिच्या खिडकीतून घेतलाय वाटतं हा फोटू !

मस्त सनी आहे इथे! दुपारपर्यन्त सुमारे ४५ डि. से.
मैत्रेयी फ्लोरिडाला गेलीये
मैत्रेयी फ्लोरिडाला गेलीये आणि आज तिचं आणि मृचं खाजगी गटग आहे म्हणे. मृ सकाळपासून काकडलीये, ४५ म्हणजे टू मच.
सिंडे, काहीतरी जळल्याचा वास
सिंडे, काहीतरी जळल्याचा वास येतोय हो इथपर्यंत.
मैत्रेयीला मगरीची भजी खायला
मैत्रेयीला मगरीची भजी खायला नेतेय. नंतर एअरबोटराइडला जाऊ. कम्युनिटी हॉलाच्या दाराचं कुलूप बघून मंडळी कुठे जातील एवेएठीला?
चमन आणि सँटी रस्ता चुकले
चमन आणि सँटी रस्ता चुकले
गटग ला जाता न आल्याने मी माझा
गटग ला जाता न आल्याने मी माझा फोटो पाठवत आहे
गटग सुरु:
गटग सुरु:
झालंय गटग सुरू तिथे... काय
झालंय गटग सुरू तिथे... काय गोंधळ घालतायत हे बाराकर...
मी सँटीला फोन केला तर "काय रे पोचलास का गटग ला??" "नाही नाही आत्ताच पोचलो गटगला " अश्या टाइपचं बोलण झालं आमचं...
अजय द वेबमास्टर पण पोचले की तिथे...
Pages