न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या दहीवड्यांचा पण फोटो नाहिये त्यामुळे डब्बल निषेध!!!! बाकिचे फोटो ठीक आहेत Proud सायोचा राइस कुकर छानच दिसतोय Wink

माणसा, मला काही फोटू माझ्याकडे सेव्ह करता येतील का ? आत्ताच तुला ईमेल टाकलीय.
पण फोटो खरच सुन्दर आलेत !! धन्यवाद !!

हायला.. माणसा तिरामिसू चा फोटो पण नाही?? ये तुमने ठिक नही किया....

तू दहीवडे नक्की नेले होतेस ना?? >> नाही, मी लोणच नेलेल Proud

पदार्थांचे फोटोज मस्त आलेत.
सकाळी सकाळी खाण्याचे पदार्थ आणि एकही पदार्थ खाउ शकत नाही. Sad

अरे चारच आणले होते Wink २ अमृताने झारा अन एस व्ही एस च्या नावाने खाल्ले आणि उरलेले २ किरणने खाल्ले Wink

रच्याकने, फोटो मस्तच आलेत.

सागर, फोटु फारच मस्त!!!! सिनिअर लोकांचे (उदा: फचिन, परसेसाई, झक्की, भाई) त्यांच्या काळी सापडणारे कृष्ण्-धवल फोटु पुन्हा डकवून तू त्यांना नॉस्टॅल्जिक केलं असलं पाहिजेस.

पदार्थांचे फोटो फारच तो. पा. सो. तिरामिस्सु आणि दहीवडे खरंच आले होते का? (कळायला मार्ग नाही! :P) समोसे, बटाटवडे, कर्‍या सगळंच झकास दिस्तंय.

उपवधु मुलांचे वेगळे आणि चांगले फोटु निघाल्यामुळे सोय झाली. योग्य स्थळं सुचवता येतील.
Proud

>>माझ्या दहीवड्यांचा पण फोटो नाहिये त्यामुळे डब्बल निषेध!!!

खाण्याच्या पदार्थांचे फोटो तू येण्याआधीच काढुन झाले होते..कारणं लोकांनी तुमची वाट न पाहता खादाडी सुरु केली होती Lol

अग बाई कस्स बरोब्बर ओळ्खलस ग... Proud

नयनिशच्या चिकनचा आणि अजयनी आणलेल्या साखीचा पण फोटो नाहिये... गेलास तु आता माणसा Proud

मस्त मेनु दिसतोय.

१. समोसे घरी केले होते? अगदी एकसारखे छान दिसतायत.
२. बटाटेवडे कोणी आणले होते?

उगाचच भोचकपणा म्हणा. Happy

माणसा, पदार्थांचे फोटो मस्त आलेत रे.. बाकीचे इ-मेल केलेले फोटो घरी बघावे लागतील..

फ़चिन तुला सिनिअर लोक असे म्हणता आहेत..
>> अहो मायबोलीवर सिनिअर... कदाचित मी तिथे उपस्थित असणारा सर्वात ज्युनिअर होतो. Proud

साखि आणि बॉस्टनचे काहीतरी आहे हां खरंच.. तिरामिस्सुचा फोटो कसा काय नाही? ह्या जीटीजीचा तो स्टार आयटम होता.

सामोसे आणि बटाटेवडे मी आणि भाईंनी अर्धे अर्धे शेअर केले होते..

बरं फचिन, तू बालकांमधे सिनियर! ग्लु वाईन बरीच तळाला गेलीय. जनतेच्या आगमनानंतर कितव्या मिनिटाचा फोटो आहे तो?

बघितले सगळे फोटो. मस्तच काढलेत माणसाने. बाई माणूस कोण म्हणे ? बाकी सगळे फोटो बघितल्यावर (त्यातल्या त्यात) भ मे म्हणजे बाई असे माझे स्प आणि प्रा मत झालेय Proud

>>>फोटो फक्त ए.वे.ए.ठी.ला हजर असणार्‍यांसाठी आहेत.
हो तर! मनानं मी तिथेच असल्याचं माहिती होतं सागरला. म्हणून मला फोटो मिळाले.

Pages