न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिंक पाठवली आहे सिंडी.
यात हजर असलेले खरे मायबोलीकर फक्त चारच मी, भाई, विनय आणि अजय. फक्त आम्ही लोकांनी मायबोलीचे टीशर्ट घातले होते त्यात माझ्या आणि भाईंच्या टीशर्टवर सुलेखन प्रकारात गायबैल/मायबोली लिहीले होते.

बाकीच्यांना पुढच्या ए वे ए ठिच्या वेळी घालायलाच लावले पाहिजेत माबोचे टीशर्ट.

माणूस तिरामिसू पर्यंत पोचेस्तोवर ते १/४ पण राहीले नव्हते आणि तो सगळ्यांना जावुन त्यात ५०० कॅलरीज आहेत तुम्ही खावु नका असे सांगत होता.

झक्कींनी मला तुम्हाला तिरामिसू नकोय ना, असे दोनदा विचारून त्यांचे "त्या" शहरवरचे प्रेम परत जाहीर केले.

बो विश/चमन म्हणजेच कथा लिहीणारा विशाल कुलकर्णी असे झक्कींचे म्हणणे होते.

चमनने सांगीतलेल्या खेळाचे नाव मायबोली हापसा (मायबोली नळ वरून प्रेरणा घेवुन) होते.

श्री व सौ अ‍ॅडमिनने आठवणीने फोन करून ससळ्यांची चौकशी केली व एप्रिलमधल्या डीसी गटगला येण्याचे आश्वासन दिले. सिंडीचाही फोन आला होता माझ्यासाठी तिरामिसू पाठव सांगायला. पग्याचा फोन आला होता हे इथे वाचुनच कळले.

चमनला त्याची कथा पूर्ण करण्यासाठी मी आणि सायोने धमकी दिली. त्याने पण ती सिरीयसली घेतलीये अस तो म्हणाला.

माझ्या नवर्‍याला ग्लुवाईन जरा जास्त झाली आहे अस (त्याचे वागणे बघुन) लाडवाक्कांचे म्हणणे पडले, त्यावर तो नेहमीच तसा असतो असे मला स्पष्टीकरण द्यावे लागले (म्हणजे नेहमीच ग्लुवाईन जास्त झालेला अस नाही).

१२-६ हा ६ तासांचा वेळ खूपच कमी पडल्याने हवे तस गॉसीप करता आले नाही याची खंत वाटली. Proud
पुढचे ए वे ए ठि मुक्कामी करायला हवे यावर शेवटी फचिन, मैत्रेयी, चमन आणि माझे एकमत झाले.

सौ भाईनी फचिनच्या लग्नाचे/ त्याला स्थळ सुचवायचे मनावर घेतलय असे त्या दोघांमधला संवाद ऐकुन कळले. मी फचिनला मायबोलीचा एक वेगळा मार्ग सुचवला होता त्याने तो अमान्य केला.

यावेळी स्वाती, माणूस, बाईमाणूस, किरण, अमृता या आधी न भेटलेल्या मायबोलीकरांची भेट झाली. अर्थात आपण आधी भेटलो नाही हे मायबोलीच्या कुठल्याच ए वे ए ठि मध्ये कधी जाणवत नाही.

माझ्या नवर्‍याला ग्लुवाईन जरा जास्त झाली आहे अस (त्याचे वागणे बघुन) लाडवाक्कांचे म्हणणे पडले, त्यावर तो नेहमीच तसा असतो असे मला स्पष्टीकरण द्यावे लागले >>>> हो हो स्मोकीला बघितलं आम्ही.. Proud

पुढचे ए वे ए ठि मुक्कामी करायला हवे यावर शेवटी फचिन, मैत्रेयी, चमन आणि माझे एकमत झाले. >>> डिसीचं मुक्कामीच आहे ना?

पग्याचा फोन आला होता हे इथे वाचुनच कळले. >>> इतका दंगा चालू होता तेव्हा.. की माझा फोन आला आहे हे सँटीला कळले हेच खूप झाले.. Happy

१२-६ हा ६ तासांचा वेळ खूपच कमी पडल्याने
वेळ ११:३० ची दिली होती. लोकच खूप उशीरा आले. म्हणून असे झाले. बरेच लोक इतक्या उशीरा आले की तोपर्यंत मला जे सांगायचे ते सांगून झाले होते. मग मी आपले पुनः नेहेमीसारखे तेच तेच रटाळ बोलत बसलो.

पुढच्या वेळी सर्वांनी वेळेव॑र हजर रहायला शिका. सोपे आहे ते. आजकाल इंटरनेटवरून तुम्हाला माहिती काढता येते, की जायचे तिथे पोचायला किती वेळ लागतो, त्याप्रमाणे घरून निघायचे. शिवाय रहदारी, गर्दी इ. बद्दलहि रेडियोवर सांगतच असतात.

मैत्रेयी झक्कास आयोजन केल्याबद्दल धन्यवाद !!!!
झक्की म्हणतायत ते बरोबर आहे, वेळेत यायला हवं सगळ्यांनी. पुढच्यावेळी २ दिवसाकरता हॉल घ्यावा का? आदल्या दिवशी झोपायलाच येऊ Proud

अरे मला लाजवू नका Happy खर तर मीच लिहायला हवे, ते राहून गेले होते. मला सगळे संयोजक वगैरे म्हणत असले तरी कामं सगळ्यांनीच केली आहेत. हॉल मधे खुर्च्या -टेबलांची अरेंजमेन्ट पासून ते क्लीनप आणि कचर्‍याची विल्हेवाट या सगळ्यात सगळे होते मदतीला. म्हणून जमलं! धन्यवाद लोकहो !!

अरे मला लाजवू नका <<< एवढं काय लाजायचं त्यात...

जातीवाचक शब्द प्रयोग करू नयेत.~ हुक्मावरोन <<< Lol Lol

अरे काय चाललंय काय Rofl
येणार आहे ना. वर लिष्ट मधे नाव आहे की. आमच्याच गाडीने येऊ असं आत्ता तरी म्हणत आहोत.

आत्ता तरी म्हणत आहोत.>>> त्वरा करा, त्वरा करा. बारातून निघणार्‍या गाडीचा लाभ घ्या. Wink

बारातून जाणार्‍या गाडीचा फायदा घेणारे लोकः

विनय, झक्की, वैद्यबुवा, भाई, स्वाती, सायो..

उरलेल्यांनी यायचं असेल तर या यादीवर शेपूट वाढवा...

Pages