न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो,हो, रवा. Proud
आणि औरंगजेबाच्या दाढीकरता तो दाढीची अ‍ॅक्शन करुन शेवई शेवई म्हणत होता. Lol
त्या दुसर्‍या खेळात कुणाला तरी आपण झक्की आहोत हे ओळ्खायचं होतं. त्याने 'व्यक्ती जिवंत आहे का?' असा प्रश्न विचारल्यावर झक्कींनी आपल्या हाताची नाडी चाचपून खात्री करुन घेतली. Wink

सर्वप्रथम, स्नेहसंमेलनासाठी जागा मिळवल्याबद्दल मैत्रेयि यांचे आभार. श्री. पांडे सुद्धा टेबल लावणे इ. कामाला होते. तसेच घरी जायची वेळ झाल्यावर सर्वांनी सर्व आवरून ठेवले, कुणितरी केर काढला (विनय यांना व्हॅक्यूम चालवायचा होता, पण त्यांच्या उ. उ. वि. त ऐकलेले खरे मानून त्यांना संधि दिली नाही). त्यांना धन्यवाद.

सायो, वृत्तांत लिहिलात, चांगले केलेत.

मी खरे तर सर्वात आधी पोचलो होतो, पण गाडीत सीडी वर नेमके त्याच वेळी माझे आवडते गाणे लागले होते, (मौज्जा हि मौज्जा!) ते संपेस्तवर गाडीबाहेर जाता येत नाही!

ग्लू वाईन पूर्वीच वैद्यबुवांनी एका उंच बाटलीतून हनि व्होडका आणलेली होती. ते आपले घाबरून सांगत होते, अगदी हळू प्या, थोडी प्या, फार गरम होईल!! बिचारे. लहान आहेत, कल्पना नाही त्यांना. मी नि अनिलभाई असताना रुनिंची ग्लू वाईन होइस्तवर, नि सायो येइस्तवर व्होडका संपलेली, यात काय नवल?

मला पण नवीन माहिती मिळाली. बो-विश हे वि. कु. नाहीत (सगळे भारतीय मला सारखेच दिसतात, अमेरिकेत राहिल्याचा परिणाम. लोकांना वाटते माझी स्मरणशक्ति कमी झालीय्!). तसेच बो-विश हेच चमन! पण ते राजमलाई काहि नजरेस पडले नाही, नाहीतर मी लगेच ओळखले असते.

सगळेच पदार्थ मस्त झालेले, त्यातून रं पा. प्यायल्यावर भूक लागलेली. हादडले नि काय! थोडा अभ्यास केला तर एखादा संस्कृत श्लोक सापडेल, की सुट्टीच्या दिवशी खाल्लेल्या अन्नाचे दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. चरबी, साखर वाढत नाहीत, अपचन होत नाही.

आता पुनः केंव्हा एकदा सुट्टी मिळते, नि हनी व्होडका, ग्लू वाईन इ. मिळेल याची वाट पहात आहे.

बाकी पान आनणार्‍यांचे आभार. मौज्जा हि मौज्जा.

झक्की, तुम्ही एक लिहा की मस्त लांबलचक वृत्तांत. सगळ्यांनाच मजा येईल वाचायला.
शेवटी ते चार चार आणे जमवलेत की नाही?

अरे हो, भारतातील समस्त माबोकरणींची क्षमा मागतो. चार आणे म्हणजे काय हे तिथे जमलेल्या कुणालाहि माहित नसल्याने पैसे गोळा करता आले नाहीत, म्हणून झिपलॉक बॅगा आणल्या नाहीत. पुनः बघू.

>> त्याने 'व्यक्ती जिवंत आहे का?' असा प्रश्न विचारल्यावर झक्कींनी आपल्या हाताची नाडी चाचपून खात्री करुन घेतली.
Lol

सायो, झकास वृतांत. रुनीच्या कृपेने उशिरा येउन पण मला राजमलई मिळाली. किरणशी अर्धी वाटल्यामुळे चव कळलीच नाही.

सायो, चंट की टंच? Proud
तो अनारश्यावरुन लै मोठ्ठा विनोद झाला.
अनारश्याला क्लु म्हणुन माणासानी १) दिवाळी आणि पोटावर गरा गरा हाथ फिरवुन दाखवला. तरिही आम्हाला काही उमजेना म्हणुन पुढचा क्लु रवा असा दिला. आता आम्ही रव्याचे लाडु सांगुन बघितलं तरी चुकलं मग माझ्या मते अनारश्यावर तो पांढरा पदार्थ रवा असतो म्हणुन मी अनारसे उत्तर दिलं आणि बरोबर निघालं. थोडक्यात आम्हा दोघांना सारखीच चुकीची माहिती होती त्यामुळे उत्तर बरोबर आलं! हटकेश्वाराची लीला! दुसरं का? Wink
आजुन एक गंमत, शब्द होता औरंजेब, माणसाला का कोणास ठाऊक अफजलखान वाटलं आणि तो बोटं कापल्याची खुण (शाहिस्तेखान) करुन भाईंना "औरंगजेब" ओळखण्यास मदत करत होता! आता बोला? Lol

हटकेश्वराच खरखुर देवुळ आहे ही माहीती मिळाली. खुद्द मिसेस अ‍ॅडमिननी ही माहीती दिली असल्यामुळे ती नक्कीच खरी असली पाहीजे.
काही लोक विष्णुला हटकेश्वर तर काही लोक शंकराला हटकेश्वर मानतात हे ही कळल.
तेव्हा श्री हटकेश्वराय नमः म्हटल की दोन दोन देवाना नमस्कार पोचतो.. Happy

काही लोक विष्णुला हटकेश्वर तर काही लोक शंकराला हटकेश्वर मानतात हे ही कळल. << भाई नांव घ्यायला लाजताय काय 'माणसा'सारखे.... Happy

Happy चांगलेच लिहीता येते की... मी माणसाची हातवार्‍यांची भाषा असा एक नविन बी बी सुरु करावा म्हणतोय

तृप्ती, रुनी ने तुझ्याकरीता तिरामीत्सु पाठवला आहे, त्याला अजुन तरी मी हात नाही लावलेला... कधी पाहीजे बोल. फक्त त्यापुर्वी ही लिंक चेक कर

सायो, झक्की चांगला लिहिलात वृत्तांत.. देसाईंचा वाचायचाय अजून..
अगं चंट नाही, टंच होतं ते.. ते किरणने एका क्लुमध्ये ओळखलं. लोक गार पडले होते तेव्हा.. Proud

मी राजमलाई (जेवढी उरली होती तेवढी) रुनीच्या स्वाधीन केली.. पुढे तिने त्याचं काय केलं माहिती नाही.. Happy

शब्दवेध खेळात माझ्या बायकोने 'होडी' ह्या शब्दाला होडी हाच क्लु दिला तरी त्यांच्या ग्रुपला 'होडी' हा शब्द शेवटपर्यत ओळखता आला नाही. Happy
तोच शब्द देवुनही ओळखता न आल्यामुळे, हे कसले मायबोलीकर अशी खंत तिने व्यक्त केली. मायबोलीकर इतके हुशार नाहीत हे कळल्यावर मात्र नंतरच्या शब्दाला तिने वेगळा शब्द दिला तो मात्र त्याच्या ग्रुप ने पहील्याच फटक्यात ओळखला. Happy

फारच गोंधळात टाकता बुवा तुम्ही! अहो रुनी यांनी आणलेला पदार्थ तिरा मित्सू होता ना? त्यालाच राजमलाई म्हणता आहात का?

त्या राजमलाई बद्दल इतके ऐकले होते की ते उरेलच कसे? मला सांगितले नाही म्हणून.

तृप्तींचे नशीब, मी रुनींना तीनतीनदा विचारले, अहो कुणाला तरी द्यायचे आहे ना ते, का मी घेऊ आणखी? पण पॅन स्वछ करायचे असेल, तर मी चाटून पुसून खायला तयार आहे.!

फचिनने भारतातुन आणलेली राजमलाई सगळ्यांना वाटली ना. फच्या सायोचा वृत्तांत नीट वाच.

सायो, वृत्तांत एकदम मस्त!!!

>>टंच होतं ते.. ते किरणने एका क्लुमध्ये ओळखलं.>> हायला!!!
किरणने ओळखले ठिक आहे पण क्लु कुणी दिलेला टंच साठी?? माझ्या क्लु मुळे ओळखल बर त्याने >>>> अमृता, काय क्लू दिलेलास? Wink

ह्यालाच म्हणतात वाटते नवर्‍याला बायकोची भाषा पटकन समझते ..
तुझ्याकडे tips घ्यायला लवकर आले पाहिजे Wink

आणि टकाटक म्हंटल्याबरोब्बर आझा गुणी नवरा चित्कारला "टंच"

दुसर्‍या राउंडला त्याने क्लु दिला 'वाईट नजर' सगळे म्हणुन लागले ह्यांनाच कसे असे शब्द येतायत?? मी आणि बोविशने बरेच शब्द सांगितले मग तो म्हणाला आत दुसरा क्लु देतो पण आता आलच पाहिजे. क्लु होता 'ओवाळणे'
आइशप्पथ माझ्या डोक्यात धडाधड चक्र फिरु लागली.. वाईट नजर, ओवाळणे?? आणि ट्युब पेटली पण शब्दच आठवेना. मग माणसापेक्षा जरा बरे हातवारे करुन लोकांना सांगायचा प्रयत्न केला.
तेवढ्यात रुनीने मदत केली.. दृष्ट. Happy येsss

ह्यालाच म्हणतात वाटते नवर्‍याला बायकोची भाषा पटकन समझते ..>>> अहं, अस नाहिये कै ते... ह्यालाच म्हणतात बायको नवर्‍याला चांगलाच ओळखते... Wink

Pages