न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

Submitted by अनिलभाई on 1 December, 2009 - 13:07

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २३ जानेवारी २०१०

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ए.वे.ए.ठी चा पत्ता.
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : २३ जानेवारी २०१० सकाळी ११.३०

वृत्तांत ह्या पानापासुन पुढे. http://www.maayboli.com/node/12363?page=20
विनय देसाई ह्याचा वृत्तांत. आता गाजले की बारा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडे, बाळ, रडू नकोस. तुझ्यासाठी एक गटग आहे की डीसीमध्ये. तिथे तू वाटल्यास दोन दोन पदार्थ घेऊन ये. Proud

मैत्रेयी, नंबर मिळाला. धन्यवाद. Happy

सही तिरामिसू !!!!

मजा करा गटग ला.... भरपूर खा आणि भरपूर गप्पा मारा...
मै.. ह्यावेळी तुझा पदार्थ वेळेवर बाहेर काढ.. आणि अतिथी देवो भव म्हणत बाकीच्यांना आधी खायला दे... Proud

"पहा ते मागच्या गटग ला मी काढलेले फोटो आणि बघा माझी आठवण येते का...... " Proud

रच्याकने.. शोनू नाही येणारे गटगला ?????

पग्या मला वाटल तु कविता करतोय्स..

पहा ते मागच्या वेळी काढलेले फोटो, बघा माझी आठवण येते का...
तिरामिसू खा, उरलेल घरी न्यायला विसरु नका, बघा माझी आठवण येते का...
मै तिचा पदार्थ लपवुन ठेवेल, पण तुम्ही त्याकडे बरोब्बर लक्ष थेवा, बघा माझी आठवण येते का... Proud

चला माणूस खाणार नाहिये तिरामिसू.. खाल्ल तर त्याला घरी चालत जावा लागेल Wink

पहा ते मागच्या गटग ला मी काढलेले फोटो आणि बघा माझी आठवण येते का... >>

Lol भारी... त्या गाण्यातल्या त्या ओळी म्हणजे चेष्टेसाठी एक मस्त विषय आहे. पराग, निदान एखादा शिकाऊ फोटोग्राफर तरी पाठवून दे..

उरलेल घरी न्यायला विसरु नका >>> रूनीने केलेलं तिरामिसू चांगलं होणार नाही असं म्हणायचय का तुला ??? ते उरेलच कसं ????????
रूनी.. बघ बघ.. काय बोलतायत तुझ्याबद्दल.. नेऊ नकोस आता तिरामिसू.. Proud

अरे माणुस आहे कि.. माणसा कॅमेरा विसरलास तर घरी पाठवण्यात येइल. हुकुमावरुन.

पग्या, आग ओतनेका काम मत करो.. तुला तिरामिसूचा फोटु पाठवुन देउ. Wink

अग कौतुक करतोय तुझ्या नवर्‍याच.. छान फोटु काढतो ना तो.. आणि मला हुकुम मिळाला तसा मी पोस्टला बाई. Proud माझ काय बी घेण देण न्हाय ह्यात.

माणूस,
दाढीचे खुंट वाढवायचे आहेत.. लक्षात ठेव...

रेसिपी एन्जे बी बी वरुन Happy

परदेसाई | 22 January, 2010 - 11:31
हे कां ... कूं.. काय चाललंय... ? उद्या ए.वे.ए. ठि. त्यामुळे तयारीला गेले सगळे.....

दाढीचे खुंट वाढवायचे आहेत.. लक्षात ठेवा...

विनय

प्रतिसाद रॉबीनहूड | 22 January, 2010 - 11:33
दाढीचे खुंट वाढवायचे आहेत.. लक्षात ठेवा...
विनय
>>
हो हो रात्रीच चेहर्‍याला पाणी लावून ठेवावे लागेल म्हणजे मोड आल्यासारखे सकाळी खुंट फुटतील....

प्रतिसाद सिंडरेला | 22 January, 2010 - 11:36
आज दिवसभर पाणी लावुन रात्री चेहरा फडक्यात घट्टा बांधुन ठेवला तर जास्त चांगले येतील

प्रतिसाद मृण्मयी | 22 January, 2010 - 11:38
>>>>फडक्यात घट्टा बांधुन .. उबदार जागी.

प्रतिसाद अमृता | 22 January, 2010 - 11:40
ओवन लाउन त्यात तोंड ठेवा. थंडी आहे ना सध्या..

प्रतिसाद परदेसाई | 22 January, 2010 - 11:40
नशीब रात्रभर तोंडावर झिरोचा बल्ब लावायला सांगितलं नाही

प्रतिसाद सायो | 22 January, 2010 - 11:41
रात्रीच चेहर्‍याला पाणी लावून ठेवावे लागेल म्हणजे मोड आल्यासारखे सकाळी खुंट फुटतील.
रात्री चेहरा फडक्यात घट्टा बांधुन ठेवला तर जास्त चांगले येतील>>>>>> याईक्स..... माझे दोन आणे. चेहर्‍याला पाणी लावून, फडक्यात घट्ट बांधून उबदार जागी त्यावर वजन (बत्ता वगैरे) ठेवल्यास सकाळी चांगले रिझल्ट्स मिळतात.

प्रतिसाद सिंडरेला | 22 January, 2010 - 11:44 नवीन
१०० डिग्रीला अवन तापवा आणि तोंड फडक्यात घट्ट बांधून त्यावर वजन ठेवुन अवनमधे झोपा रात्रभर. बल्ब लावायची गरज नाही. काटकसर करा.

Rofl

अग बाईमाणसाला असं वाटत असेल की आता माणसाने तिचे आणि तिचेच फोटू काढावे. इतर पण बाईमाणसांचे त्याने फोटू काढले तर कसं आवडेल तिला Happy ..आधीची गोष्ट वेगळी होती .. Proud

उद्या सगळ्यांच्या दाढीच परीक्षण कोण करणार आहे??

फचिन आणि चमन.. सुचना नीट वाचुन या.. बेस्ट खूंट असणार्‍यास पेशल बक्षिस देण्यत येइल. Proud

असं काही नाहीये .. माझं फोटो काढण्याबद्दल काही म्हणणे नाहीए.. ते घरी पाठवण्याबद्दल ..मी बिचारी पहिल्यांदा येणार आणि तुम्ही घरी पाठवणार.. Sad

आज दिवसभर पाणी लावुन रात्री चेहरा फडक्यात घट्टा बांधुन ठेवला तर जास्त चांगले येतील


नको त्या लोकानी अव्यापारेषु व्यापार केल्यास असे होते..

imagesCAP9B6WP.jpg

अगदी शेवट्च्या क्षणाला लिहीतेय त्याबद्दल माफ करा. पण माझ्या प्रॉजेक्ट रिलिजमुळे मला उद्या कॉलवर रहावे लागणार आहे. मधे मधे Conference calls आहेत. उद्या सन्ध्याकाळी सम्पेल hopefully. हीच गडबड चालु असल्यामुळे मी इथे काही नक्की सान्गु शकले नाही. माझी मैत्रिण मायबोलीकर नाहीये पण तिला ईथे यायला आवडल असत. मला हा ए.वे.ए.ठी. चुकल्याची खन्त राहिल नक्की.
काय करणार प्रश्ण पोटाचा पडला ना?
पुढल्या वेळी नक्की जमवीन.

सकाळ्पासून मी नव्हते तर एवढ्या पोष्टी...
दाढीला मोड/खुंट आणण्याची पद्धत फार आवडली Lol
सिंडे हाजीर तो वजीर.
बाईमाणुस तुम्ही फार मनावर घेवु नका या बाकीच्या काकवांचे बोलण. (मी काकु नाही) Happy

Pages