चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे शाहरुख मिमिक्री करताना बहुतांश जण जे बकरीसारखे करतात ते मला फार इरिटेटिंग वाटते. >> अनेकांना त्याची बकरीची मिमिक्री इरीटेटींग वाटत असेल.

एखाद्या पिक्चरमधे दुसर्‍या पिक्चरचा किंवा त्यातील लोकप्रिय संवादाचा संदर्भ चांगल्या पद्धतीने वापरतात त्याला बहुतेक होमाज/ओमाज म्हणतात (homage). इंग्लिश रिव्यूज मधे शब्द वाचला आहे. स्पेलिंग होमेज सारखेच असले तरी शब्द कदाचित फ्रेंच मधून आला असेल.

परवा "वध" पाहताना हे आठवले. एका सीन मधे संजय मिश्रा पोलिस स्टेशनमधे येतो आणि तेथील एका पोलिसाच्या टेबलसमोर उभा राहून त्याच्याशी बोलतो. तेव्हा तो पोलिस त्याला खुर्चीकडे बोट दाखवून बसायला सांगतो आणि वर विचारतो "जब तक बैठने के लिये न कहा जाये, बैठोगे नही क्या?" Happy

अजून एक उदाहरण

डाय हार्ड विथ अ व्हेन्जंन्स - मधला सबवे सीन.
https://www.youtube.com/watch?v=O8aLn5-Vn0M&t=150s

त्याचा फ्रेण्ड्स मधे वापरलेला संदर्भ. हे लोक डाय हार्ड फॅन्स असतात. हा वरच्याला ओमाज असण्याइतका क्लिअर नाही पण मला नेहमी वाटतो.
https://www.youtube.com/watch?v=hddFd5ltdvM

मी बास्टर्डस आधी बघितलेला आणि हांस लांडा च्या रोल चा इतका इफेक्ट झालेला की दियागो अनचेंड मध्ये तो कधीही धोका देणारे आणि व्हिलन होणार असे शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होते Happy

है जवानी तो इश्क होना है

डेव्हिड धवनचा शेवटचा सिनेमा
निदान शेवटचा म्हणून तरी काही वेगळं दाखवलं असेल तर शपथ. आपल्याच बऱ्याचशा किंवा तत्सम इतर सिनेमांची ठिगळं जोडली आहेत. शेवटचा म्हणून हा सिनेमा करण्यापेक्षा नसता केला तरी चाललं असतं

ज्याला कुणाला हा पिक्चर संपूर्ण बघता आला त्याला पद्मपुरस्काराने सन्मानित करावं. >>>> थिएटर ला बघितला होता. पुरस्कार घ्यायला कोठे येऊ?>>>> मी पण Rofl त्यात १ खूप सुंदर गाणं आहे, ओ रे कांची, अगदी लय आहे त्याला. सन सननसन आणि रॉशनी से भरे भरे गाणी कमाल आहेत. अगदी डबड्या सिनेम्यात पण काहीतरी बरं असतं ते असं.
तिला ही बुजगावणे पोझिशन सार्थकी लागावी म्हणून दोन किमी अंतरावर लांब सोडून पळत यायला लावतात, तोवर हा असाच तिष्ठत उभा!>>> Rofl

मलाही रोशनी से भरे भरे आणि रात का नशा आवडतात ऐकायला. निदान उपनगरांची राणी वगैरे पुरस्कार मिळू शकेल का या अचिव्हमेंटबद्दल?

काल धर्मेंद्र-आशा पारेख जोडीचे आया सावन झुमके व शिकार हे दोन चित्रपट एकामागोमाग पाहिले. दोन्ही १९६८-६९ मधले आहेत. धर्मेंद्र दोन्हीत दिलखेचक दिसतो. आशा पारेख आया सावन… मध्ये अधुन मधुन सुसह्य दिसलीय. पण तिचे मार्केट तेव्हा धर्मेंद्रपेक्षा चढे असावे, श्रेयनामावलीत तिचे नाव धर्मेंद्रच्या वर आहे. त्या काळात या गोष्टीला महत्व होते असे वाचलेय.

आया सावन.. मध्ये निरुपा रॉय आहे. मुलगा(च) तान्हा असताना त्याला सोडायचे आणि नंतर शोधत बसायचे हा तिचा पुरातन रोल तिने यातही प्रेमाने निभावलाय. गाणी सुंदर आहेत.

शिकारमध्ये पोस्टरवर संजिवकुमार पाहुन थोडे आश्चर्य वाटले म्हणुन चित्रपट पाहिला. सुरवात पाहिल्यावर लक्षात आले हल्लीच दोन तिन वर्षांपुर्वी पाहिलाय. निट आठवत नव्हता म्हणुन पुर्ण बघितला. संजिवला चॅलेंजिन्ग वगैरे रोल नाहीय, त्याजागी कोणीही असु शकला असता. पण संजिव असल्यामुळे जे आहे त्यातही त्याने जान भरलीय.

दोन्ही चित्रपटात आशा पारेखचा कपडेपट तिच्या बहिणीने सांभाळलाय. नेहमीचेच आशा पारेख पेशल कपडे आहेत, काही वेगळेपण नाही. साड्यांमध्ये प्लेन पांढरी सिन्थेटिक साडी, तिला रंगीत किनार व त्याच रंगाचा पदर हे दोन तिनदा रिपीट केलेय. छान दिसल्यात या साड्या. बोटीवरच्या एका गाण्यात ती व अरुणा इराणी साड्यांमध्ये खुप सुंदर दिसल्यात.

शिकारमध्ये हेलनला पुर्ण चित्रपटभर रोल आहे आणि तिचा कपडेपट भानु अथैय्याने सांभाळलाय. अतिशय सुंदर वेस्टर्न ड्रेसेस बघायला मिळाले.

धर्मेंद्रला कोणी कपडे चढवले याचा उल्लेख नाही. पण जे आहेत ते छान आहेत. शर्टांचे रंग व स्टाईल इतर चित्रपटातही रिपिट झालेत. त्याला सगळेच शोभलेय.

राजेश खन्नाच्या चित्रपटात त्याच्या कपडेपट सांभाळणार्‍याचे नाव वाचल्याचे आठवते.

शिकारमध्ये भरपुर गाणी आहेत आणि सगळीच रफीची गाजलेली गाणी. एकच महेंद्र कपुरचे आहे व सोबत कृष्णा कल्ले. ते तितके गाजले नाही.

दोन दिवस आधी अमिताभ- माला सिन्हाचा संजोग पाहिला. टिपिकल साउथ चित्रपट. कलेक्टर झालेली हिरोइन त्या पदाची शान सांभाळते पण नवरा समोर आला की दरवेळेस ढेपाळते. अनिताभ तेव्हा यंग अंग्री मॅन झाला नव्हता. त्याच्याजागी दुसरा कोणी असता तरी फरक पडला नसता. पण एकदोन प्रसम्ग मिळालेत चांगले.

यातला एक प्रसंग मागे खुप व्हायरल झालेला. अमिताभ, त्याची बायको आणि माला सिन्हा व तिचा मुलगा एकाच वेळेस एकाच देवळात जातात आणि ऑफिसातला जॉनी वॉकर त्यांना एकमेकांसमोरुन जाताना पाहतो. ही गोष्ट तो ऑफिसात एकाला सांगतो, ती गोष्ट पुर्ण ऑफिस फिरत त्याच्याकडे येते तेव्हा त्या प्रसंगाचे रुप पुर्ण बदललेले असते.

वध सुरू केला. हा मराठीत पाहिल्यासारखा वाटत राहीलं. नीना गुप्ता पन्नाशीनंतर सुसाट सुटली आहे. पंचायत असो, हा सिनेमा असो, बर्‍याच सिरीयल्स, पिक्चर्सची नावे आठवत नाहीत, पण भारी काम करते. मराठीत नीना कुळकर्णींनी पण चाळिशीनंतर एकदमच कात टाकलेली. संजय मिश्राचा प्रश्न नाही. तो हफ्ता वसुलीला येतो त्याचं नाव माहिती नाही, पण अशी टपोरी, किळसवाणी कॅरेक्टर्स हातखंडा करतो. पिक्चर बघण्यासाठी सलग वेळ मिळावा ही माबोचरणी प्रार्थना.

वध झाला बघून. छान आहे. पण प्रत्यक्षात वध झाल्यानंतर तो वेगळ्या उंचीला जात नाही.
द्वंद्व म्हणावं तर पश्चात्ताप नाहीच. पुढे फिल्मी वळणाने जातो, पण एंगेजिंग आहे. बघणेबल आहे. खूप चांगला होऊ शकला असता ती संधी गमावली असे वाटले. मराठी वेगळा आहे.

वध १ मला जास्त आवडला नव्हता. २ आवडला होता.

परवा अशीच राजीव रायची वर्षभरापुर्वीची मुलाखत पाहिली. सत्तरीत त्याने नवा सिमेना बनवला ‘झोरा’ नावाचा. २० वर्षाने त्याने सिनेमा बनवला कारण त्याच्या आयुष्यात बरंच काही दु:खद घडलं होतं वगैरे मोठी मुलाखत होती. त्याने सिनेमाबद्दल पण का बनवला , कसा बनवला वगैरे सांगितले होते म्हणुन युट्युबवर पाहिला. तर अ त्यंत म्हणजे अ तीसामान्य सिनेमा. पहिली ५ मिनीटे, मधली ५ मिनीटे व खूनी कोण पहायला शेवटची ५ मिनिटी पाहिला , तो ही जास्तच वेळ झाला कारण हा सिनेमा शुन्य मिनिटाच्या वर पहाण्यासारखा नाही.

द्वंद्व म्हणावं तर पश्चात्ताप नाहीच. पुढे फिल्मी वळणाने जातो, पण एंगेजिंग आहे. बघणेबल आहे >>> इंटरेस्टिंग. मला तोपर्यंत पापभीरू टाइप दाखवलेला पंडित/मास्तर एकदम दारू सिगारेट वगैरे सरावाने घेत असल्यासारखा दाखवलाय ते आश्चर्य वाटले होते. पण त्याच्या पोलिसांबरोबरच्या काड्या आवडल्या होत्या Happy

मै वापस आउंगा थोडा पाहिला. चांगला आहे पण खूप स्लो आहे. तरूणपणीचा नासिर आवडला नाही. एकतर शर्वरीपुढे तो पोरगेलासा वाटतो. शर्वरीचे काम चांगले वाटते. दलजीत दोसांज चा भाग चांगला आहे. एकूण साधारण तासभरच पाहिला आहे आत्तापर्यंत - पंजाबच्या फाळणीची घोषणा आणि लोकांची प्रतिक्रिया इथपर्यंत.

किसमिस यारा लाये मस्कारा गाणे मस्त आहे.

दारू सिगारेटचं आता लक्षात नाही. मिस झालं असावं.
नायक म्हणून म्हातारा शिक्षक, त्याची बायको नायिका. खलनायक पण असाधारण नाही, भोवताली दिसणारे गुंड हे खूप आवडलं होतं. उत्तम सिनेमा बनवण्यासाठी बडी स्टारकास्ट, बजेटची गरज नाही असा विचार मनात आला होता. मग..

डिस्क्लेमर
तपास करणार्‍या पोलिसाचं सीक्रेट हाती लागतं हा योगायोग खट्टू करून गेला. जसा दृश्यम १ एकदम अस्सल होता, तसं काहीतरी पहायला मिळेल ही अपेक्षा होती किंवा अशा पापभीरू माणसाचं द्वंद्व (कारण घरात तो मांसाहार कर्तो तेव्हां दोघांचे हावभाव दाखवले होते, त्याचा पुढे रिलेव्हन्स नाही.)

त्या सिक्रेटचा क्लू अगदी सुरूवातीला होता पिक्चर मधे. अर्थात त्याने "जॉनरा" मिक्स झाला हे बरोबर. एका पापभीरू माणसाचं द्वंद्व त्याने त्याच्या चौकटीतच सोडवणे आणि एकदम एखाद्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य व्यक्तीचा प्रॉब्लेम पोलिस, गुंड यांच्यातील घटनांमुळे आपोआप सोडवला जाणे (गाय रिची चे पिक्चर्स किंवा देल्ही बेली) हे दोन्ही मिक्स झाले आहे.

पण मुख्य कलाकारांच्या कामामुळे आवडला तरीही. तो वसुली वाला सौरभ सचदेवा. अ‍ॅनिमल आणि सतलज मधे दिसला होता. सतलज मधे चांगले आहे काम त्याचे. आणखी कशात तरी मुंबईचा ७०ज मधला क्राइम बॉसही दाखवला होता. तेथेही तो सूट झाला होता.

एका पापभीरू माणसाचं द्वंद्व त्याने त्याच्या चौकटीतच सोडवणे आणि एकदम एखाद्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य व्यक्तीचा प्रॉब्लेम पोलिस, गुंड यांच्यातील घटनांमुळे आपोआप सोडवला जाणे (गाय रिची चे पिक्चर्स किंवा देल्ही बेली) हे दोन्ही मिक्स झाले आहे. >> बरोबर.

सौरभ सचदेवा हा चेहरा आता माहितीचा झाला आहे. डिसगस्टींग गाय असतो नेहमी.

मग सतलज मधे आवडेल तो तुम्हाला. त्यात वेगळा आहे रोल त्याचा. भारतात तो पिक्चर सहज उपलब्ध नाही माहीत आहे. आणखी एक क्राइम बॉस रोल म्हणालो तो सेक्रीड गेम्स मधला सुलेमान असावा. टॉप लेव्हलचा गँगस्टर जसा इतरांशी व सामान्य लोकांशी वागताना आब राखून वागेल तसा तो त्याने चांगला रंगवला होता. नक्की तोच का आणखी नंतर आलेल्या सिरीज मधे दुसरा एखादा रोल पाहिला ते लक्षात नाही.

नवाजुद्दीन सिद्दीकी पण सुरूवातीला चेहरा लक्षात होता. कुठे बघितलाय हे आठवायचं नाही. कहानी नंतर इन्स्पेक्टर खान म्हणून लक्षात राहिला होता. तसाच वाटतो हा अ‍ॅक्टर पण. आता नाव लक्षात राहील.

The most we want is what we most can't have, and what we most can't have, is what we already had and lost.." ओडिसी पाहिला. भन्नाट आहे. तरी काही ठिकाणी जाम हसू आले. खास करून शेवटाला ती एक बया त्याचे पाय धुवायला लागते आणि हाच तो असे तिला समजते ते पाहून मला करण जोहरचा k३g आणि त्यातली फरीदा जलाल आठवली Proud आणि ती दासी मेरा ओडिसियस बाबा .. बाबा तू आ गया बाबा.. असे म्हणेल की काय असे वाटले. Proud अजून विच वाला सीन पण हसूच आले. IMAX वरती फार भारी वाटला. लढाई आणि पार्श्वसंगीत अफलातून आहे. युद्ध सीन मधली उत्कंठा आणि त्यातले बॅकग्राऊंड ह्याचा असा काही मिलाफ आहे की बाप रे बाप. परत एकदा नक्कीच बघेन.

मैं वापस आऊंगा बघितला नेटफ्लिक्स वर. उत्तम चित्रपट. पटकथा खूप प्रभावीपणे गुंफली आहे. फाळणीचे प्रसंग अंगावर येतात पण मांडणी अतिशय उत्तम आहे.
संवाद कधीकधी नीट ऐकू येत नाहीत. Subtitles मुळे कळतात. नसीरुद्दीनचा प्रश्नच नाही. वर फारेंड यांनी म्हणल्याप्रमाणे तरुण अभिनेता फिका पडतो अभिनयात. संथ वाटू शकतो पण गुंतवून ठेवतो.

ओडीसी पाहिला.

खऱ्या अनलॉग ७० एमएम सेल्युलॉईड वरून प्रोजेक्ट केलेला.
त्यामुळे झालं काय की लो इल्लुमिनेशन जाणवत होता तो या ग्रीक सारख्या उन्हाळ संस्कृतीचे जरासे ढगाळ चित्रण केल्यासारखे वाटू लागला. एकूण मजा आली पण कलर करेक्शन अजून जोरकसपणे व्हायला हवे होते असे वाटले.

जाणवलेल्या गोष्टी:

चित्रपट डायलॉगने वाचवचा भरलेला वाटला.. म्हणजे जे आहेत ते कधी कधी एवढे मारक ठरताहेत की ते कमी करायला हवेत असे वाटले.
काही गोष्टी खूप मस्त दाखवल्या आहेत. म्हणजे चित्रपटात जादू असूनही, प्रचंड वास्तववादाचा सगळीकडे केलेला प्रचंड परिणामकारक वापर. म्हणजे मर्त्य माणसे अक्षरश: शिटी मर्त्य माणसांसारखे माणसेच वाटतात. एकही देव आला नाही हे फार चांगले दाखवले आहे. जे अवास्तव आहे ते ही तसेच अफाट रंजक पणाने न येता रॉ आले आहे ते आवडले.

एनी हॅथवेचा अभिनय अजिबात आवडला नाही. एक पोरगी उगाच मधे मधे येत असते मार्ग दाखवायला आणि फिलर्स म्हणून तिचा तर काडीचाही उपयोग नाही.

ते आंधळेबुवा वगैरे प्रकार केले नसते, शेवटची फाइटिंग आणि राजकारण जरा अजून ब्लिवेबल केली असती तर हा चित्रपट खूप आवडला असता.

संगीत अतिशय उल्लेखनीय वाटले.

७० mm सेल्युलॉईड >> भारीच.

एक पोरगी उगाच मधे मधे येत असते मार्ग दाखवायला आणि फिलर्स म्हणून तिचा तर काडीचाही उपयोग नाही. >>> तुम्हाला असे वाटले असेल तर तुम्हाला चित्रपट कळलाच नाही असे म्हणावे लागेल.

The Gates प्राईमवर पाहिला. डिसेंट थ्रिलर आहे. ३ सभ्य मुलं एका श्रीमंत remote gated community मधुन शॉर्टकट घेतात आणि एका खुनाचे साक्षीदार होतात. त्यानंतरचा पाठलाग, पळापळ वगैरे बरंच चांगलं जमलंय. James Van Der Beek चा हा शेवटचा सिनेमा.
(ओडीसी पहायला काय मुहुर्तच मिळेना).

एक पोरगी उगाच मधे मधे येत असते मार्ग दाखवायला आणि फिलर्स म्हणून तिचा तर काडीचाही उपयोग नाही.>> हाय रे कर्मा..

गव्हर्नर चित्रपट छान आहे. त्याला इतकं कमी रेटिंग का मिळालं ते कळलं नाही. भारताच्या ९१ मधल्या आर्थिक परिस्थिती वर असून पूर्ण वेळ खिळवून ठेवणारा आहे.

>> तुम्हाला असे वाटले असेल तर तुम्हाला चित्रपट कळलाच नाही असे म्हणावे लागेल. <<

असे असू शकते कारण मी शक्यतो चित्रपट पाहत नाही आणि पाहिलाच तर बहुतेक वेळा त्यातल्या इंटरनल लॉजिक मधे आपले लॉजिक विलीन करून फटाकदिशी बुडता येत नाही. शिवाय ते सिंबल, जक्सट्रापोझिशन्स वगैरे तर माझ्या साफ डोक्यावरूनच जातात. दोनेक लिटर कोक पेप्सी मारल्यामुळे, आणि चि.गृहातल्या थंड अंधारामुळे बहुतेकवेळा कळ लागलेली असते, त्यात इंटरवल नावाची भानगडच इकडे नसल्यामुळे एखादा कमी हॅपनिंग असलेला प्रसंग कधी येतोय याची वाट पाहणे होत कथेकडे दुर्लक्ष होते. मग असा प्रसंग आलाच खरोखर मुतारीत एका हाताने स्टबल खाजवत कितीही विचार केला तर चित्रपटाचे सौंदर्यशास्त्र कळत नाही किंवा अर्थनिर्णयन करता येत नाही. काय करावे?

Pages