Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तो 'रोजा'मध्ये होता. लष्करी
तो 'रोजा'मध्ये होता. लष्करी अधिकारी. मस्त होतं ते काम त्याचं.
धनि अगदी.
धनि
अगदी.
काम चांगलेच करतो तो.
अल्फा बघणाऱ्यांसाठी बक्षीस
अल्फा बघणाऱ्यांसाठी बक्षीस योजना आहे हे खरे आहे का?
चाची ४२० सिनेमा अफाटच आवडता
चाची ४२० सिनेमा अफाटच आवडता आहे! एकदम ऑटाफे!
चाची ४२० सिनेमा अफाटच आवडता
चाची ४२० सिनेमा अफाटच आवडता आहे! एकदम ऑटाफे!…
+ 111
दुर्दैवाने “हिन्दी”तला चाची ४२० कुठल्याच OTT वर उपलब्ध नाहीए.
गुलज़ार चे संवाद हाच तर बेस्ट पार्ट आहे, वर दोन्ही पुरी (अमरीश + ओम) ती मजा हिंदीतच.
@ बाबाबुबु
.. सिराज, आय मीन शिवराज शर्मा जी, आप बोल नहीं सकते, मंत्र कैसे पढेंगे ?? 😀
बाबाबुबु >> +१ मी बाहुबली
बाबाबुबु >> +१ मी बाहुबली बघताना म्हणालो होतो - अरे हा तो आपला बाबाबुबु
"किस उल्लू के पठ्ठे ने इसे
"किस उल्लू के पठ्ठे ने इसे पानी मे फेंका?"
"इस....उल्ली के पठ्ठी ने"
उल्ली के पठ्ठी
उल्ली के पठ्ठी 😀
… अच्छे महाराज भी तो मिल सकते हैं …
… सेठ जी, इस चाची का चरित्र कुछ ठीक नहीं है.. 😜
ये मेरे पांव है!
मैं आपके पांव छुता हुं, म्हणतो तर ह्याला पावभाजीचे पांव वाटतात. परेश रावल आणि कमल हसन!
चाची केवढी दांडगी भर बाजारात काठीने हाणून डान्सही करते, डॉक्टरला जमत नाही तो इंग्रजी बोलतो गुंडांना. ह्या वयातही चाची आकर्षक असल्याने सगळे पुरुष तिच्याच मागे. अमरिश पुरीला उचलून हॉस्पिटलमध्ये नेऊन जीव वाचवते, अमरिश पुरीला उचलणं कुणाला शक्य आहे. तो पण चाची म्हंटले की रोमॅन्टिक व्हायला लागतो.
बाबाबुबु म्हणणारे व चाचीचे बरेच फॅन्स सापडले. मलाही हिंदी व्हर्जन सापडलं नाही अनिंद्य.
पाव म्हणजे तशरीफ.
पाव म्हणजे तशरीफ.
नासिर यांचा चाची 420 रोल फेमस
नासिर यांचा चाची 420 मधील रोल फेमस आहे. पण बाबाबुबू वरून इतके लोक ओळखतात कल्पना नव्हती. कदाचित त्याआधी आलेल्या बॉम्बे चित्रपटामुळे असेल कारण माझ्या डोक्यातली त्यांची पहिली ओळख त्यातली आहे. तो चित्रपट फार भारी होता अशातला भाग नाही. पण मुंबई दंगलीवर असल्याने तेव्हा स्पेशल होता.
परेश रावलचा हरीभाई… अब मैं
परेश रावलचा हरीभाई… अब मैं “विंडो” हो गया ना, मेरी घरवाली मर गई तो. जय, चाची से मेरा मिलन करवा दे.
आणि चावटपणा म्हणजे दर वेळी चाची ला समोरून धडकतो तेव्हां मोठ्याने होणारा “पॉमपॉम” आवाज … 😂 प्रचंड हसायला येते मला
थोडा आचरटही आहे पिक्चर. कोणती
ऋ- मी बॉम्बे कधी पाहिलाच नाही, राहून गेला त्यामुळे बाबाबुबु.
अरेरे कुणाला "मोरूची मावशी"
अरेरे कुणाला "मोरूची मावशी" ची आठवण झाली नाही.
विजय चव्हाण चा अजरामर मावशीचा रोल.
https://www.youtube.com/watch?v=eCOeRK9N7QM
आणि जुना मराठी सिनेमाही आहे. आचार्य अत्रे चा अभिनय.
बघतो लिंकमिळाली तर.
ओरिजिनल "चार्लीज आंट" बहुतेक फ्रेंच प्रहसन.
झाली हो. काल गाडीत "जागो गोरी
झाली हो. काल गाडीत "जागो गोरी गोरी जागो" मुद्दाम लावलं, मुलं धुरंधरला कंटाळलीत माझ्यामुळे. मुलगी म्हणाली, "ढुरंढर" सोडून काही चालेल. तर मुलं लगबगीने चाचीचे श्रेय रॉबिन विल्यम्सच्या मिसेस डाऊटफायरला देऊ लागली पण मी देऊ दिले नाही, "मोरूची मावशी" ओरिजनल आहे असे सांगितले आणि मिसेस डाऊटफायरने मोरूच्या मावशीला श्रेय दिले आहे आणि चाची ४२० ने पण.
Tang Ting Tinga ( Moruchi
Tang Ting Tinga ( Moruchi Mavshi )
https://www.youtube.com/watch?v=IVRyYX3yRSs
मिसेस मिसफायर पण आला होता.
मिसेस मिसफायर पण आला होता.
चाची बेस्ट आहे. खासकरून ओम
चाची बेस्ट आहे. खासकरून ओम पुरी जे काही मागे लागतो ते फार भारी आहे.
आणि one liners
आणि एक फार सुंदर गाणे.. एक वो दिन भी थे एक ये दिन भी है..
चाची च्या बर्याच आठवणी
चाची च्या बर्याच आठवणी लिहिल्या गेल्या इथे. सगळ्याच मस्त आहेत. चाची म्हणून आल्यावरचे कमल हसन आणि तब्बू चे काही हळूवार सीन्स पण खूप छान आहेत. मला अजून एक आठवलेला म्हणजे ओम पुरी, कमल हसन चा पाठलाग करत असताना त्या पिंपांमागे लपतो आणि तितक्यात तो हमाल येऊन ते पिंप घेऊन जातो तो.
नासर ला अगदी पहिल्यांदा रोजा त पाहिलं होतं (वावे ने लिहिलंय वर). त्यातला तो मधू ला मदत करणारा, पण अरविंदस्वामीच्या बदल्यात function at() { [native code] }इरेक्यांना सोडायला लागल्यामुळे हताश झालेला कर्नल त्याने खूप छान रंगवला होता.
एक वो दिन भी थे एक ये दिन भी
एक वो दिन भी थे एक ये दिन भी है >>> १००++
कमल हसनच्या बर्याचशा
कमल हसनच्या बर्याचशा पिक्चर्स मधे चावट संवाद असतात. पहिल्यांदा ऐकले तेव्हां आँ झालेलं.
कमल हसन?
नंतर सवय झाली. दादा कोंडकेंपेक्षा देखणा असल्याने चालून गेले,
म्हणजे देखण्या माणसाने काहीही केलं तरी चालतं.
बॅकरूम्स पाहिला.
बॅकरूम्स पाहिला.
कन्सेप्ट चांगली वाटली, पण एकूण चित्रपट ओके च आहे.
एका फर्निचर स्टोअरचा मालक बायकोने घराबाहेर काढल्यानंतर त्याच दुकानात राहू लागतो. दारूच्या व्यसनामुळे तो एका काउन्सेलिंग थेरपिस्टचीही मदत घेत असतो. एका रात्री त्याला स्टोअरमध्ये एक विचित्र शोध लागतो, एका भिंतीतून आत गेलं की जिथे एका वेगळ्याच जगात प्रवेश होतो. हळूहळू तो त्या जगात अधिक रमू लागतो आणि त्याला परत यावंसं वाटत नाही. पण ते जग नॉर्मल नसतं.
जे लोक तो हरवला म्हणून त्याच्या मागावर येतात किंवा त्या रहस्याचा छडा लावण्याचा प्रयत्न करतात, ते एकतर मरतात किंवा कायमचे त्या जगाचाच भाग बनून राहतात... There is no exit!
ते जग एक रूपक आहे, त्या अंतहीन, बाहेर पडता न येणाऱ्या खोल्या म्हणजे नैराश्य, व्यसन, एकटेपणा किंवा वास्तवापासून पलायन यांचं प्रतीक! अजून कोणी बघितला असेल तर विस्कटा
इक्का नेटफ्लिक्सवर - अगदीच
इक्का नेटफ्लिक्सवर - अगदीच सुमार. सनी देवलला काहीच अभिनय आला नाहीये. अजिबात प्रभाव पडत नाही. अक्षय खन्नाला “धुरंधर मधे केलास तसाच अभिनय कर नाहीतर पैसे देणार नाही“ असे सांगितले असावे म्हणुन त्याने रागावुन, वेगळे करायला वाव नाही दिला म्हणुन जरा जास्तच ओठ आवळुन अ ती रागावलेला डकैत केलाय. कथा बंडल, संवाद बंडल, उगाच भावनीक ड्रामा जो सनी देवलला अगदीच जमला नाही.
त्यापेक्षा “सिस्टीम‘ ठीक होता.
म्हणून याचं नाव बाबाबुबुच
म्हणून याचं नाव बाबाबुबुच ठेवलं होतं मी.
>>
सेम
चाची ४२० यूट्यूब वर होता
मुलीला दाखवला होता दीड दोन वर्षांपूर्वी
मोरूची मावशी वरून आण्टी नंबर वन छापला होता
चाची ची गोष्ट जास्त डाऊटफायर मार्गानी जाते
मराठीत याच थीम वर नाटक होतं, स्वरूपकुमार रोल करायचा मिसेस डिसूझा चा...
नासर निखिल आडवाणीच्या डी डे
नासर निखिल आडवाणीच्या डी डे मधे रॉ चीफ च्या रोल मधे पण होता
सिस्टम थोडा पाहिला. चांगला
सिस्टम थोडा पाहिला. चांगला वाटतोय.
आषुतोष गोवारीकर आदिनाथ कोठारे आणि सोनाक्षी सिन्हा या दोन बाळांचा पप्पा आहे.
सिस्टम व्यवस्थित आहे.
सिस्टम व्यवस्थित आहे. आउअटस्टँडींग नाही.
दोन घटका बांधून ठेवतो, नात्यातला आणि एथिक्सचा संघर्ष बेगडी आहे.
चित्रपट जवळजवळ पंजाबीतच वाटला
चित्रपट जवळजवळ पंजाबीतच वाटला, आणि माझ्याकडे सबटायटल्स अव्हेलेबेल नव्हते. घरातही सारखं कुणीतरी मधेमधे बोलत होते, कामं चालू होती एकीकडे. शेवटचा अर्धा मी निवांत पाहिला आणि तो जास्त समजला.
<<<
हो, एग्झॅक्ट्ली, त्यामुळे माझा पेशन्स संपला थोड्याच् वेळात, इतकं ठेट पंजाबी नाही कळत, यश चोप्रा स्टाइल हिन्दी भेसळ पंजाबी समजते
यातलं हे गाणं आवडलं.https:/
यातलं हे गाणं आवडलं.
https://www.maayboli.com/node/88530
धमाल-४ अरारारारारा आहे.
धमाल-४ अरारारारारा आहे. तासाभरानंतर उठुन निघुन आले. बालीश गोष्टी पण चांगल्या असतील त्याच्यापेक्षा.
Pages