चित्रपट कसा वाटला १३

Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25

२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.

मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी शक्य आहे रॉय. चित्रपट बघताना हे माझ्या मनात आले नाही तरीही शक्यता नाकारता येत नाहीये मलाही. पिक्चर ही एक इमेजच असते शेवटी हेही माहीत आहे कुठेतरी. मी रिव्ह्यू देव, दानव अशी कुठलीही जजमेंट मनात न ठेवता लिहिला आहे तरीही सत्य जे असेल ते असेलच.

"खूबसूरत"

पहिला. गंमत म्हणजे आज इमर्जन्सीची आठवण काढताहेत लोक संविधान रक्षा दिवस का काय की ते "मनवून".

खूबसूरत मधे चव्हाण, इंदिरा, इमर्जन्सीवर बेधडक नाव घेऊन खुसखुशीत संवाद आहेत. हे सेन्सर झाले नाहीत हे विशेष.

मस्त चित्रपट आहे!

रॉय, यावरून जरा शोधाशोध केली आणि इंटरेस्टिंग फॅक्ट. खूबसूरत रिलीज झाला त्याच सुमाराच १९८० च्या निवडणुका झाल्या. इंदिरा गांधींचे सरकार पुन्हा बनले ते त्याआसपास पण काही दिवसांनी. तेव्हा हे सगळे सेन्सॉर मधून पास होणे शक्य असावे. कारण तोपर्यंत सेन्सॉर बोर्ड अजून जनता पक्षाचा प्रभाव असलेलाच असेल. दुसरे एक कारण असेही असेल की आणीबाणीमधल्या स्ट्रिक्ट सेन्सॉरशिप नंतर जेव्हा सरकार बदलले, तेव्हा हे रिलॅक्स केले गेले असेल, त्यातही आणीबाणीच्या विरोधात असल्यामुळे. नंतर अमिताभच्या इन्लिलाब मधे "विरोधी" नेत्यांवर टीका (आणि त्यांची हत्या) सेन्सॉर मधून पास झाली तसेच.

अजून एक वर्षाने आला असता तर कदाचित चित्र वेगळे दिसले असते.

खूबसूरत म्हणजे कुठल्याही अर्थाने राजकीय आशय न मांडणारा आणि मला नाही वाटत की सिंबोलीकाली देखील तसे करणारा चित्रपट आहे. तरी देखील असे कंटेम्पररी संवाद सहजपणे चित्रपटात असणे ही खरेतर मस्त गोष्ट आहे.
आताचा कम्फर्ट सिनेमा एवढा कॉन्शियस झालेला आहे की तो हे सगळे पूर्णपणे टाळू बघतो अगदी अंधाधून सारखा सिनेमा देखील. हे सगळे ऑप्रेसिंग खरेतर खूपच डिप्रेसिंग झाले आहे.

तरी देखील असे कंटेम्पररी संवाद सहजपणे चित्रपटात असणे ही खरेतर मस्त गोष्ट आहे. >>>
आताचा कम्फर्ट सिनेमा एवढा कॉन्शियस झालेला आहे की तो हे सगळे पूर्णपणे टाळू बघतो >>> दोन्हीशी सहमत.

हालचाल ठीकठाक है सारखे गाणे आता आले तर काय रणधुमाळी होईल! ते लिहीणारा, सादर करणारा, पिक्चरचा दिग्दर्शक सर्वांचा आगापीछा कसा सोरोस ते सोनिया रेंज मधे पोहोचतो ते काढून दाखवले जाईल. मग आत्ताच असे गाणे का येत आहे हे गंभीरपणे समजून घ्यायची गरज आहे म्हणून एखाद्या अंकलचा लेख येईल.

पण मला आता असे वाटत आहे की खूबसूरत राजकीय सिनेमा आहे का? म्हणजे मला आता तसे वाटायला लागले आहे. अधिक शोध घेतला असता अनेकांना तसे वाटते. निर्मला म्हणजे इंदिरा गांधी / आणीबाणीची सत्ता, आणि मंजू म्हणजे स्वातंत्र्य व प्रतिकार. कुटुंब टिकवणारी गोष्ट म्हणजे कडक शिस्त नव्हे, तर प्रेम आणि मैत्री. हाच त्या रूपकाचा खरा गाभा. असे काही.

च्यायला, आता तर अजूनच जास्त आवडायला लागला आहे.

Very interesting! आता त्या दृष्टीकोनातून पुन्हा पाहायला हवा. ऋषिकेश मुखर्जी असे काही करतील याचे चान्सेस कमी आहेत पण गुलजारने केले असेल.

च्यायला या लॉजिकने तर राजा हरीश्चंद्र सुद्धा नेहरू होते म्हणावे लागेल. मग तो आधी का आलेला असेना.

शोलेतले "भले अहिंसा भी कोई चीज होती है " म्हणणारे पात्र म्हणजे महात्मा गांधी. ठाकूर हे गोळविलकर/ सावरकर/ हेडगेवार वा तत्सम. जय वीरू म्हणजे अमित शहा - मोदी. गब्बरसिंग काँग्रेस.
कुठलाही पिक्चर राजकीय दिसू लागेल. अध्यात्मिक सुद्धा दिसेल. सामाजिक सुद्धा दिसेल.

भीगे होठ तेरे हे गाणं अध्यात्मिक आहे असं कुणी म्हटलं तर ते ही खरंच वाटेल.

इथे अवांतर आहे, पण मोह आवरला नाही.

भीगे होंठ तेरे हे गाणं ऐकायला जरी अतिशय रोमँटिक आणि बोल्ड वाटत असलं, तरी भारतीय अध्यात्माच्या चष्म्यातून पाहिलं तर हा थेट जीवात्मा आणि परमात्मा यांच्यातील मीलनाचा एक महान ग्रंथ आहे! थोडं विनोदी वाटेल, पण यातील लॉजिक इतकं ठोस आहे की तुम्ही थक्क व्हाल. जीवात्मा परमात्मा संबंधी कुठल्या साहित्यिक कलाकृतीशी साधर्म्य असेल तर योगायोग समजावा.
या गाण्यातील प्रत्येक ओळीचा अध्यात्मिक आणि ब्रह्मज्ञानाचा अर्थ समजून घेऊया.

भीगे होंठ तेरे, प्यासा दिल मेरा
लगे अब्र सा, हाँ, मुझे तन तेरा

इथे दिल म्हणजे वासनायुक्त मन नाही, तर तो आहे 'जीवात्मा', जो अनेक जन्मांपासून ईश्वरी प्रेमासाठी तहानलेला आहे (प्यासा दिल).
भीगे होंठ आणि अब्र (ढग) हे ईश्वराच्या कृपेचे प्रतीक आहेत. जीवात्मा देवाला म्हणतोय, "हे भगवंता, तुझं अस्तित्व एका महाप्रचंड ढगासारखं आहे, जे माझं अज्ञान मिटवण्यासाठी आणि मला तृप्त करण्यासाठी बरसण्यास तयार आहे." याला तृष्णा आणि ईश्वरी वर्षाव (The Spiritual Thirst) तत्व म्हणतात.

जम के बरसा दे, मुझ पर घटाएँ
तू ही मेरी प्यास, तू ही मेरा जाम

जाम म्हणजे कोणतीही दारू नसून, तो सूफी संतांनी गायलेला इश्क-ए-हकीकी चा (ईश्वरी प्रेमाचा) प्याला आहे. भक्त म्हणतो, "हे देवा, तुझ्या कृपेची सावली (घटाएँ) माझ्यावर अशी बरसू दे की मी या संसाररूपी मायेतून मुक्त होऊन तुझ्याच प्रेमाच्या नशेत (जाम) चूर होऊन जाईन."

कभी मेरे साथ कोई रात गुज़ार
तुझे सुबह तक मैं करूँ प्यार

अध्यात्मात 'रात्र' हे अज्ञानाचे आणि संसाराचे प्रतीक आहे, तर सकाळ (सुबह) हे आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. आत्मज्ञान अर्थात एनलाईटमेंट. इंग्रजी हेच संस्कृत. भक्त भगवंताला आळवणी करतो, "हे ईश्वरा, माझ्या या अज्ञानाच्या रात्रीत (आयुष्यात) तू माझ्यासोबत राहा, जेणेकरून तुझ्या भक्तीच्या जोरावर मी जेव्हा 'सकाळ' बघेन (म्हणजे मला मोक्ष मिळेल), तोपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच साधना करेन."

हे कडवे काय सांगते?
मोक्षाची रात्र आणि ज्ञानयोग अर्थात The Night of Enlightenment योग आहे हा.

साँसें आँच तेरी, तन आग तेरा
छीने नींद मेरी, लूटे चैन मेरा

जेव्हा योगी ध्यान करतो, तेव्हा त्याच्या शरीरात कुंडलिनी शक्ती जागृत होते, ज्याला अग्नी (आँच/आग) म्हटले जाते. या ईश्वरी ऊर्जेमुळे भक्ताची नींद अर्थात मोहाची झोप उडते आणि सांसारिक सुखांमधला चैन अर्थात आराम लुटला जातो. हे खूप गहिरं आहे. हे कडवं म्हणजे कुंडलिनी जागृत होत असताना शरीरात होणाऱ्या बदलांचे अचूक वर्णन आहे!

काला जादू करें लंबे बाल तेरे
आँखें झील तेरी, डोरे लाल तेरे

लंबे बाल आणि काला जादू म्हणजे दुसरं काही नसून या जगाची माया आहे, ज्याने माणसाला गुंतवून ठेवलं आहे. देवाचे डोळे झील अर्थात तलावासारखे अथांग आहेत, ज्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेलं आहे आणि डोरे लाल हे विश्वाच्या निर्मितीच्या वेळेस असलेल्या रुद्र रूपाचे ऊर्जेचे दर्शन घडवतात.

या दोन कडव्यात कवीने आपल्याला काय सांगितले आहे?
कुंडलिनी जागरण आणि माया !!

पुढच्या कडव्यात कवी आपल्याला काय सांगतो? मौन आणि समाधी अवस्था !
कसे ते पाहूयात.

आँखें कह रही, जो ना हम कहें
उसे सुन ले तू, जो ना लब कहे

हाच तर मौन योग आहे. अध्यात्मात सर्वोच्च भक्ती शब्दांच्या पलीकडे असते. जेव्हा भक्त आणि ईश्वर एकमेकांसमोर येतात, तेव्हा ओठांची म्हणजेच लब गरज उरत नाही. आत्मा थेट परमात्म्याशी मौन संवाद'द्वारे जोडला जातो. ऋषी मुनींनी या अवस्थेला शब्दातीत अवस्था असे म्हटलेले आहे.

तू ना सोए आज, मैं ना सोऊँ आज
तुझे देखूँ आज

याला म्हणतात जगायला विसरून समाधी लागणे . इथे भक्त देवाशी एकरूप झाला आहे. हे देवा, आज तूही जागृत राहा तुझी कृपा असू दे आणि मीही अज्ञानाच्या झोपेतून जागा राहतो. आज मला फक्त आणि फक्त तुझं विश्वरूप दर्शन घ्यायचं आहे (तुझे देखूँ आज). आचार्य रजनीशांनी समाधीबद्दल जे वर्णन केलं आहे ते इथे परफेक्ट लागू होतं.

पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकाल, तेव्हा मल्लिका शेरावत आणि इम्रान हाश्मीला विसरून जा. डोळे बंद करा आणि समजा की तुम्ही जीवात्मा आणि परमात्म्याच्या अभेद्य मीलनाचे एक महान स्तोत्र ऐकत आहात! अनुभूती नक्कीच अलौकिक असेल.

वो ओ ओ ओ ओ
याचा अर्थ आता समजलाच असेल. तो सांगायची गरज आहे का?

खडकी दापोडी Lol

हम आपके है कौन मी बघितलाच नाहीये, दीदी तेरा देवर दिवाना गाणं बघून मला बघावासा वाटला नाही. त्यापेक्षा तो ज्या पिक्चरवरून बेतला आहे तो सचिन, साधना सिंगचा बघायचा आहे मला.

खूबसुरत आहाहा एकदम.

वा राज वा!
सर्व शूफी कव्वाल्या अध्यात्मिक आहेत.
जाब we मेट हा पूर्ण सिनेमा आणि त्यातील अवीट गाणी विशेषतः तुमसे ही .... गाणे अध्यात्मिक आहेत.

खूबसूरत मधे चव्हाण, इंदिरा, इमर्जन्सीवर बेधडक नाव घेऊन खुसखुशीत संवाद आहेत. हे सेन्सर झाले नाहीत हे विशेष.
>>>> आंधी अख्खा पिक्चर बॅन झाला होता ना आणिबाणीत?

राज अज्ञानी हे कुठल्यातरी ज्येष्ठांच्या ग्रुपवर फॉरवर्ड करून टाका. अगदी काकाफॉ मटेरियल आहे. आणि कहो ना कहो वर सुफी निरूपण लिहायला घ्या.

खुबसुरत मलाही फार आवडतो. रेखाच्या करियरमधला टर्निंग पॉइन्ट. arrived म्हणतात तसे तिच्या बाबतीत या चित्रपटाने केले. खुबसुरतने तिचा लुक पुर्ण बदलला. पुढे घेतलेल्या दोन वेण्यांची खुप फॅशन आलेली तेव्हा. त्यानंतर तिच्या चित्रपटांची लाटच आली. पुढे जाऊन श्रीदेवी युग सुरु होईपर्यंत रेखा टॉपची हिरोइन होती.

ब्लास्ट - नेटफ्लिक्स
मल्याळम - हिंदी डब
मस्त आहे फुल ऍक्शन पॅक इंटरेनमनेंट. हिरोईन पण मस्त आहे आणि तिची आई सुद्धा मस्त आहे. पूर्ण कराटे फॅमिली दाखवली आहे. दृश्यम फिलिंग येते. बॅकग्राऊंड म्युजिक भारी आहे. सर्व फाईट मस्त घेतल्या आहेत. पिक्चर नेटफ्लिक्सवर ट्रेडिंग आहे. जुना व्हायच्या आत बघून घ्या.

अगं खूप वेळा इथे ऑब्सेशन सिनेमाबद्दल पोस्ट लिहिली आणि दर वेळी एरर मेसेज आला. म्हणून मला वाटलं धाग्याची प्रतिसाद लिमिट संपली की काय Lol

तर मी ओब्सेशन थिएटरला जाऊन बघितला कारण रिव्ह्युज सगळीकडे चांगले येत होते. घरी तसंही हॉरर मुव्हीची फारशी मजा येत नाही आणि थिएटरला लागून बरेच दिवस झाले होते म्हटलं तिकिटं नक्की मिळणार. मी आणि मुलगी गेलो बघायला आणि इट वॉज वर्थ ! Happy

जंपस्केअर करणारे १-२ च सीन्स आहेत पण ज ब री आहेत. बाकी विचित्र ताण आणणारे बरेच आहेत. एका मुलाचं आयुष्य आपल्या क्रशचं आपल्यावर सगळ्यात जास्त प्रेम असावं या इच्छेपायी एकदम विकृतरीत्या बदलून जातं. सगळं काल्पनिक आहे माहित असून आपण गुंतत जातो त्यात. त्या मुलीने जो काही अभिनय केलाय त्याला तोड नाहीये, बहुधा काहीच स्पेशल इफेक्टस वगैरे नाहीयेत. तिच्या चेहेर्‍यावरचे हावभाव, नजर, बॉडी लँग्वेज यावरच तिचं पूर्ण कॅरेक्टर उभं केलंय. सिनेमात बहुतेक सीन्स रात्रीचे किंवा अंधुक उजेडातले आहेत. त्यामुळे एक सतत डार्क, अनकंफर्टॅबल मूड बनून राहतो. काहीही घडलं नाही तरी पुढच्या क्षणी काहीतरी विचित्र होणार असं वाटत राहतं. हाच त्या सिनेमाचा प्लस पॉईंट आहे. ज्यांना अशा प्रकारचे डार्क, हॉरर, थ्रिलर आवडतात त्यांना आवडेल.

Citizen Vigilante सिटिझन व्हिजिलँटी किंवा टे.

डोंबिवली फास्ट सर्वांनी पाहिलाच असेल. हा बराच सॉफ्ट होता. तसेच शेवट थोडा चिकित्सक केला होता. पण केरला स्टोरी, कश्मीर फाईल्स, बंगाल फाईल्स सारखे सिनेमे माझ्यासारखे पूर्ण वेळ बघू शकत नाहीत. खरे तर बघायचा नसतो, पण खूप चर्चा झाली कि काय आहे म्हणून उत्सुकता निर्माण होते. कश्मीर फाईल्स ची हिंसा अंगावर येते.

कश्मीर फाईल्स हा थोडा वेगळा सिनेमा आहे. कारण काश्मीर मधे पंडीतांवर अन्याय झाला हे सत्य आहे. अन्याय नाही function at() { [native code] }याचार. पण त्यामागच्या कहाण्या काय याचं सत्य प्रत्येकाचं वेगळं असतं. काश्मीर राज्यात बहुसंख्यंकांनी अल्पसंख्यंकांवर function at() { [native code] }याचार झाले आहेत.

विषय आहे तो सिनेमा बनवताना निव्वळ भडक हाताळणी, बीभत्स हिंसा आणि डोकी भडकवणारी स्क्रीप्ट आणि संवाद यांचा. हे सिनेमे एकतर्फी असतात. आता हे लोन युरोपमधे पोहोचले आहे. इथे विषय स्थलांतरीतांचा, खरं तर बेकायदा स्थलातरीतांचा आहे. दोन्ही प्रकारच्या घटना ऐकू येतात. जर्मनीत भारतियांवर हल्ले होतात. (हे युट्यूबवर पाहिलेले आहे. आता लोंक उपलब्ध नाही.) आयर्लंडमधे हल्ले होतात. अलिकडे एन्युकेशन कन्सल्टंटस आयर्लंमधे जाऊ नका असे सल्ले देतात. तर काही स्थलांतरीतांकडून हल्ले होत असतात. याच्या खरेखोटेपणात जायचे नाही. वर लिहीलेल्या सिनेमाबद्दल ऐकलं आणि शोधून मिळवून पहायचा प्रयत्न केला. काही मिनिटेच पाहू शकलो. अ‍ॅलन मस्कने अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होतेय म्हणून हा मूव्ही एक्स वर रिलीज केला होता.. आता सिनेमाबद्दल थोडक्यात. (स्वतंत्र धागा काढला नाही कारण पूर्ण पाहू शकत नाही.)

सिटिझन व्हिजिलँटी कि पडद्यावरचा न्याय?
अभिव्यक्तिस्वातंत्र्य, प्रचार आणि समाजाची जबाबदारी

अलीकडच्या काळात जगभरात अशा चित्रपटांची एक विशिष्ट परंपरा दिसून येते, ज्यात एखाद्या समाजघटकाकडून होणारे गुन्हे, हिंसा किंवा कटकारस्थान यांचे चित्रण केले जाते आणि त्याच्या पार्श्वभूमीवर एक सामान्य नागरिक स्वतःच न्यायदान करू लागतो. Citizen Vigilante (उच्चार नेमका ठाऊक नाही) असो किंवा भारतातील द केरळा स्टोरी, कश्मीर फाईल्स यांसारखे चित्रपट. आशय, गुणवत्ता आणि तथ्य वेगळं असेल पण या सर्वांमध्ये एक समान धागा दिसतो. काय?

तो म्हणजे समाज धोक्यात आहे आणि व्यवस्था अपयशी ठरली आहे. म्हणून आता नागरिकांनीच निर्णायक भूमिका घ्यावी. ही रिव्हेंज फॅण्टसी भारतातून तिकडे गेलीय का? कि आपल्याकडेच उधार उसनवार आहे? याला Vigilante narrative म्हणतात असे समजले. हेच नाव सिनेमाला दिलेय म्हणजे हेतू बघा किती स्पष्ट आहे. ज्यांना असे सिनेमे आवडतात, त्यांनी माफ करावे.

हा सरळ सरळ फिअर प्रपोगंडा आहे. अमूक खतरेमे ची ही गोरी आवृत्ती आहे. डोंबिवली फास्टचा नायक किमान मोराल पॅनिक , सणकी होता. त्याला सणक आली होती. पण जेव्हां सिनेमा आयडेंटिटी पॉलिटिक्स करू लागतो तेव्हां ते घातक समाजशास्त्रीय हत्यार बनतं. दंगे उसळवण्याची क्षमता यात आहे. इकडे भारतात युरोपिअन लोकांना मॅच्युअर्ड समजलं जातं. पण एक्स वर (अ‍ॅलन मस्कची कृपा) सिनेमा बघून लोक भारावून जात आहेत हे धक्कादायक पक्षी चिंताजनक आहे.

अशा चित्रपटांचे समर्थक म्हणतात की ते दडपलेली सत्ये समोर आणतात. विरोधक म्हणतात की ते निवडक सत्य दाखवतात.

कोणत्याही समाजात गुन्हे एका धर्माचे, जातीचे किंवा समुदायाचे मक्तेदारीचे नसतात. स्त्रियांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक, संघटित हिंसा किंवा दहशतवाद यांसारख्या घटनांमध्ये वेगवेगळ्या समाजघटकांतील लोक आढळतात. पण एखादा चित्रपट सातत्याने एका विशिष्ट समुदायालाच धोक्याचे प्रतीक म्हणून रंगवू लागला, तर प्रेक्षकांच्या मनात त्या संपूर्ण समूहाविषयी संशय, भीती किंवा द्वेष निर्माण होण्याचा धोका वाढतो. हे दानवीकरण झाले. ऑथरिंग.

याहून गंभीर बाब म्हणजे अनेक चित्रपटांत न्यायव्यवस्था, पोलीस आणि कायद्याची प्रक्रिया निष्प्रभ दाखवली जाते. (युरोपात आपल्यापेक्षा चांगली कायदा सुव्यवस्था आहे, न्यायवुअवस्था वेगवान आहे हा माझा समज आहे.).

शेवटी नायक स्वतःच हिंसेच्या मार्गाने न्याय मिळवतो. हा यांचा vigilantism!
जर प्रत्येकाने स्वतःच न्याय द्यायला सुरुवात केली, तर जंगलराजच येणार.

अशा चित्रपटांवर बंदीच घालावी असं बिल्कुल म्हणायचं नाही. पण या निमित्ताने हा कळीचा प्रश्न उद्भवला आहे.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य लोकशाहीचे मूलभूत मूल्य आहे, मान्य!
कलाकारांना कठोर, अस्वस्थ करणारे किंवा अप्रिय विषय मांडण्याचाही अधिकार आहे. मान्यच!
पण हा अधिकार निरंकुश नसतो. हे मान्य असायला हरकतनसावी.

जगातील जवळपास सर्व लोकशाही देश द्वेषपूर्ण भाषण, हिंसेसाठी थेट चिथावणी किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या अभिव्यक्तीवर काही ना काही मर्यादा मान्य करतात.

याच संदर्भात काही देशांनी अशा चित्रपटांना प्रमाणपत्र नाकारणे किंवा प्रदर्शनावर निर्बंध घालणे हा निर्णय घेतलेला दिसतो. यामुळे अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर प्रश्न उपस्थित होतात, हे खरे आहे. पण दुसरी बाजू अशीही आहे की समाजात आधीच तणावाचे वातावरण असेल, तर अत्यंत भडक आशय असलेल्या चित्रपटामुळे हिंसा पेटण्याचा धोका प्रशासनाला वास्तव वाटू शकतो. अशा वेळी घेतलेले काही प्रतिबंधात्मक उपाय हे सार्वजनिक सुव्यवस्थेचे संरक्षण असू शकतात.

उदारमतवादासमोर एक प्रश्न उभा ठाकला आहे. पूर्ण स्वातंत्र्य आणि / कि सामाजिक जबाबदारी यांचा समतोल नेमका कुठे साधायचा?

जॉन स्टुअर्ट मिल यांनी मांडलेल्या हार्म पिन्सिपल नुसार व्यक्तिस्वातंत्र्यावर मर्यादा घालण्याचे समर्थन तेव्हाच करता येते, जेव्हा दुसऱ्याला प्रत्यक्ष हानी होण्याचा गंभीर धोका निर्माण होतो. पण चित्रपटामुळे हिंसा होईल की नाही, याचे मोजमाप करणे अत्यंत कठीण असते. त्यामुळे प्रत्येक वेळी एकच नियम लागू पडत नाही.

प्रश्न केवळ एखादा चित्रपट खरा आहे की खोटा आहे, हा नाही/नसतो. त्याचे समाजात काय परिणाम होतील ?
चित्रपट प्रेक्षकाला विचार करायला भाग पाडतो की रागाने पेटवतो?
प्रश्न विचारतो की पूर्वग्रह पक्का करतो?
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढवतो की झुंडशाहीला निमंत्रण देतो? या प्रश्नांची उत्तरेच त्या कलाकृतीचे व्यापक सामाजिक मूल्य ठरवतात.

लोकशाहीत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे संरक्षण आवश्यक आहे. पण लोकशाहीचे संरक्षणही तितकेच आवश्यक आहे. एखाद्या चित्रपटाला विरोध करणे म्हणजे अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा विरोध असे नेहमीच नसते; आणि एखाद्या चित्रपटाचे समर्थन करणे म्हणजे त्यातील प्रत्येक संदेशाचे समर्थन असेही नसते. या दोन टोकांमधील विवेकपूर्ण जागाच लोकशाहीची खरी कसोटी आहे.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा दुरूपयोग करून लोकशाहीच संपुष्टात आणण्यासाठी आवाहन केले, एखाद्या समूहाला नष्ट करा असे भडकाऊ आवाहन केले, तर अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे समर्थनच करायचे का?
त र त म भा व नावाची वस्तू असते. मेलेला सिंह आणि चार विद्यार्थी ही गोष्ट आठवते.

राज,

आपले मत पटले पण हे असेच आहे कायम. आर्ट/ कला ही कायम काहीतरी मेसेजिंग द्यायला वापरली गेली आहे अनादी अनंत काळापासून.

https://youtu.be/nZj1SBUTfok?si=XexDUYO2g4tj9miA

ह्या यूट्यूब व्हिडिओ मध्ये उत्पल दत्त सारखा दादा माणूस म्हणतोय की सिनेमा/ कलेचे बुद्धिजीवीकरण करणे व्यर्थ आहे ! पुढे तो म्हणतो की त्याच्यासाठी ४० वर्षे पूर्ण सिनेमा हे एक पॉलिटिकल प्रोपगंडा मेसेजिंगचे शस्त्र होते, पुढे चालून तो म्हणतोय की प्रोपगंडा यशस्वी होण्यासाठी तो मासेस पर्यंत पोचणे गरजेचे असते त्यासाठी कमर्शिअल सिनेमाच लागतो. आर्ट फिल्म उपयोगी नसतात.

अमिताभच्या अँग्री यंग मॅन इमेजमुळे त्या पिढीत बंडखोरी/ क्रांती/ व्यवस्थेविरुद्ध भावना किंवा समाजवादी संवेदना तरुणाई मध्ये एक पॉलिटिकल मेसेजिंग म्हणून रुजली असेल का ?

आज जगभरात उजवी विचारसरणी जोरावर आहे, भारत, अमेरिका आपण बघतोय पण जर्मनी, युके अगदी जपान मध्ये तेच थोड्याफार फरकाने रशिया, पोलंड तेच, अर्जेंटिनाचा खावियेर मिले पण तेच, अशा अवस्थेत कमर्शिअल सिनेमा हा पॉलिटिकल मेसेजिंगला वापरला जाणे साहजिक का ते विचार आपल्याला वैयक्तिक भावत नाहीत म्हणून सिनेमातून पॉलिटिकल मेसेजिंग एकंदरीत वाईट असे आपण कंफर्टेबल पोझिशनिंग घेतोय ?

ह्या प्रश्नासहित खाली बसतो.

जाता जाता - उजवे उजवे का असतात हा अभ्यास एक मजेशीर प्रवास असतो. सहसा नावडते विचार कॅन्सल कल्चर मध्ये घोळवून न घेता बघितले प्रिस्मॅटिक view ने तर मौज वाटते ह्यांच्या थॉट प्रोसेस पाहून.

वर उल्लेख केलेले सिनेमे "चांगले" कमर्शियल सिनेमे होते. सिटीझन व्हिजिलांटा वीस मिनिटं जरी पाहिला तरी हा नक्की कोणत्या कॅटेगरीत आहे हे लक्षात येईल.

Pages