Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सतलज हा सिनेमा चित्रपटगृहांत
सतलज हा सिनेमा चित्रपटगृहांत रिलीज होऊ शकला नाही. झी ५ वर आला आणि २४ तासांत गायब झाला.

संतोष हा चित्रपटही असाच भारतात दाखवला जाऊ शकत नाही.
आणीबाणी अजून संपली नाही का?
सतलज सिनेमा मी रिलिज झाला
सतलज सिनेमा मी रिलिज झाला त्याच दिवशी बघितला म्हणून मिळाला.
You can not fight with system.
तेरा मिनिटे पाहिला सतलज.
तेरा मिनिटे पाहिला सतलज.
पंजाब भागात दहा वर्षे जाऊन येऊन होतो. सुरूवातीला भीती वाटायची. चंदीगढला एका लायब्ररीत एक पुस्तक वाचलं होतं. दहशतवाद होता त्या काळचे अनुभव संकलित केलेले होते. अधून मधून प्रकरणं वाचली. खूप अस्वस्थ करणारं होतं. मुळात दंगली घडवून माणसं मारून राजकीय पोळी शेकणार्यांच्या बद्दल प्रचंड राग आहे. या पुस्तकामुळे पंजाबात नेमकं काय घडलं, आपल्यापर्यंत काय आलं किंवा येऊ दिलं हे लक्षात आलं. शीख समाजाच्या या जखमा काळाने भरून काढल्या. या सिनेमाने खपल्या निघतील का?
कि नेमकं त्यांच्यासोबत काय झालं याला वाचा फुटतेय यामुळे जखमांवर फुंकर घातली जाईल हे ठरवणं अवघड आहे. माचिस पूर्ण पाहिला नाही.
सतलज अंगावर येणारी मांडणी आहे. ताण आहे सुरूवातीपासून. डाऊनलोड करून घ्यावा नाहीतर इथूनही उडेल.
https://www.youtube.com/watch?v=wolnomga660
उडालाय
उडालाय
सतलज मी सुरू केला आहे काल.
"सतलज" मी सुरू केला आहे काल. येथे दिसतोय. पूर्ण पाहून लिहेन. मलाही फेसबुकवर बंदी आल्याचे फॉरवर्ड आले होते, माहितीही नव्हता खरेतर. पण बंदी वाचून मुद्दाम सुरू केला.
राज, धन्यवाद. थोडीफार कल्पना आली.
माचीस बघतांना सुद्धा त्रास
माचीस बघतांना सुद्धा त्रास झाला होता. तो तर commercial fiction होता.
सतलज खऱ्या व्यक्तीवर आणि त्या वेळच्या genocide वर आहे. खूपच त्रास होतो बघतांना.
मै वापस आऊंगा
मै वापस आऊंगा
कुणी बघितला आहे का?
मी पाहणार आहे. मला इम्तियाज
मी पाहणार आहे. मला इम्तियाज अली आवडतो म्हणून. त्या करताच मुलाखती पाहिल्या त्याच्या.
अत्यंत सुंदर चित्रपट आहे .
अत्यंत सुंदर चित्रपट आहे .
प्रत्येक फ्रेम त्यातील गोष्ट कथा मांडणी उत्कृष्ट आहे
प्रत्येकगाण्याचे अर्थ तर खूपच छान आहे
नक्कीच बघा
अत्यंत सुंदर असा अनुभव देऊन जातो.
एक सजेशन आहे जिथे साऊंड
एक सजेशन आहे जिथे साऊंड सिस्टिम छान आहे अशा चित्रपटगृहात पहा. मला पीव्हीआर मध्ये आवडलं, सिटी प्राईड नाही. शिवाय सिटी प्राइड ला subtitles पण आहेत ते फार इरिटेटिंग आहे.
मी पण इम्तियाझ आली चा फॅन
मी पण इम्तियाझ आली चा फॅन आहे, "जब we मेट" गा माझा आवडता सिनेमा. नंतर Rock star आणि तमाशा. अजिबात न आबडलेला म्हणजे Highway,
जब we मेट हा एक सर्वाब्ग सुंदर आणि "परिपूर्ण चित्रपट" आहे. माझ्या टॉप ten मधला नंबर एक!
मा-बहन - नेटफ्लिक्स पाहिला.
मा-बहन - नेटफ्लिक्स पाहिला. मला आवडला. ब्लॅक कॉमेडी आहे. तृप्ती डिमरी आणि माधुरी दिक्षित - दोघींनी छान कामं केली आहेत.
https://theplaylist.net/armie
https://theplaylist.net/armie-hammer-reportedly-was-in-tears-after-seein...
“The first time he saw it, he was in tears,” a source in Hammer’s camp told Puck. “And not tears of joy. He called me and said, ‘Fuck. This is hateful, disgusting.’”
According to the same insider, Hammer knew the film “certainly leaned toward the right,” but did not expect the final version to be so extreme. “Uwe works in a very frantic way,” the source said. “It’s not like he sent him a hundred-page script. When he saw the final product, he was, ‘That was not the movie I thought we made,’ and he freaked the fuck out.”
तासभर पाहून थांबवला दादी कि
तासभर पाहून थांबवला दादी कि शादी.
कथनक कूर्मगतीने पुढे सरकतं. कपिल शर्मा असल्याने विनोदी असेल ही अपेक्षा फोल ठरते. एक गैरसमज आणि पुढे त्यातून होणारी गुंतागुंत ना धड फार्सिकल अंगाने जाते, ना हलकीफुलकी कॉमेडी. सिनेमा तरीही प्रसन्न आहे. काही प्रसंग नक्की चांगले आहेत.
पण असे सोनेमे तोपर्यंतच चांगले वाटतात जोपर्यंत प्रेक्षकाला इंप्रेस करणारे संवाद आणि हाताळणी असेल. तत्वज्ञान म्हणून टाकलेले संवाद प्रेक्षकाने कुठे ना कुठे वाचलेले/ऐकलेले/पाहिलेले असतील तर त्यातला जोर निघून जातो. अजून एक तास शिल्लक आहे.
काल जिथून सोडला तिथून पुढे
काल जिथून सोडला तिथून पुढे पहायला सुरूवात केला.
द रेनमेकर (मराठीतलं नाटक कोणतं गाजलेलं?) , बावर्ची, मेरी पॉपिन्स, साऊड ऑफ म्युजिक या सिनेमात काय कॉमन आहे?
नॅनी मॅकफी पाहिलेला नाही, पण ऐकलंय. तो ही बहुतेक असाच. तुटलेलं कुटुंब, त्यात आलेली एक रहस्यमय व्यक्ती.
यात थोडे थोडे व्हेरिएशन्स येऊ शकतात. ती व्यक्ती नातेसंबंध सुधारते, फँमिली पुन्हा भावनिक दृष्ट्या एकत्र येते. त्या गूढ व्यक्तीचा खुलासा होतो किंवा नाही होत. याच थीम वर राजेश खन्नाचा रोटी पण आलाय. दुश्मन पण आलाय आणि बावर्ची पण.
संजय दत्तचा खूबसूरत, थोडा सा रूमानी हो जाये हे थेट रेनमेकर वरून आलेले. बावर्ची बंगाली कथेवरून आला असला तरी थीम तीच आहे.
दादी कि शादी हा या थीमवरचा लेटेस्ट सिनेमा आहे. मध्यंतरानंतर भावनिकदृष्ट्या बांधून ठेवतो. संवादात ऊनपाऊस, जुनं फर्निचर, अवतार, स्वर्ग असे अनेक सिनेमे आठवतात. राजा परांजपेंचा असाच एक आहे. पण मिश्रण उत्तम जमलंय.
नाहीतर आताच्या सिनेमात इमोशनल कनेक्टच्या नावाखाली मेलोड्रामाचा function at() { [native code] }इरेक असतो. कभी खुषी कभी गम सारखे सिनेमे ज्यात एक सीन रडवणारा एक हसवणारा याचा ओव्हरडोस झाला होता. कलाकारांनी पण स्टेरॉईड्स घेऊन अभिनय केल्यासारख्या पाट्या टाकल्यात. भयंकर कृत्रिम, बेगडी पणामुळेच असले सिनेमे बघणं बंद केलं. यात ही गोष्ट टाळली आहे.
तसेच फील गुड सिनेमातला भाबडेपणाही टाळला आहे. वरून व्यवहारी पण आतून मृदू ही स्वप्नवत माणसं यात नाहीत. स्वार्थाची पुटं चढलेली ती गळून पडताहेत. मधेमधे रामप्रसाद की तेरहवीची आठवण झाली.
यातली गूढ व्यक्ती कपिल शर्मा नसून तो कर्नल आहे. ज्यामुळं फॅमिली एकत्र जमते ते निमित्त म्हणजे दादी कि शादी आहे. नीतूसिंगने खूप छान काम केलंय. तिच्या मुलीने म्हणजे रिद्धिमा कपूरने इतकी वर्षे काम केलं नाही तेच योग्य होतं. कपिल शर्मा ठीकठाक. हिरॉईन मात्र ठसठशीत चेहर्याची आणि चुलबुली आहे. अशा हिरॉईन्स दिसतच नाहीत. सगळ्या एका छापातून काढल्यासारख्या वाटतात. नाहीतर क्रीती सेनन सारख्या चकचकीत पुतळ्यासारख्या. वाणी कपूर तर हिरॉईन वाटतच नाही.
बाकी कलाकार अनोळखी आहेत. पण कामं छान झालीत. त्यांनी जान आणली. गाण्यांची बाजू कमजोर आहे. साऊंड ऑफ म्युझिकची ट्रीटमेंट असती तर ट्रीट झाली असती कानाला पण. संधी दवडली. हल्ली संगीत श्रवणीय नसतंच. शेवट पाहिला नाही. अंदाज आला.
"सतलुज" पाहिला. जबरदस्त
"सतलुज" पाहिला. जबरदस्त चित्रपट आहे. सर्वांनी पाहायला हवा. शेवटी अगदी हृदय पिळवटून निघते. मी आता सगळंच लिहिणार आहे बहुतेक. स्पॉयलर्स असतील. त्यांनी सतलुजच लिहिले होते हिंदी नामावलीत म्हणून मी तेच लिहिले.
जसवंत सिंह कालरा नावाचा साधासा बॅंकेतील कर्मचारी आणि मानवी हक्कांसाठी लढणारा कार्यकर्ता ( दलजित दोसांजी) याच्या धैर्याची आणि शौर्याची कथा आहे. कथेची सुरुवातच त्याचा बेपत्ता मित्र आणि नंतर त्या मित्राला शोधण्यासाठी वेडी झालेली त्याची आई - तिला शोधताना होते. आधी पोलीसांची मदत घेण्याचा प्रयत्न करतात पण उडवून लावलं जातं, मग जंग जंग पछाडण्यात सरळ अंतिम संस्कार ज्या स्मशानात होतात तेथे पोचतात, सगळी बेवारस प्रेतं आहे असे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिलेली असतात. त्यांची नावासहित नोंदणी केलेली त्यांना त्या स्मशानातील यादीत सापडते. तेथून कळत जातं की अशी पंचवीस हजार लोक बेपत्ता आहेत व त्यांना त्यांच्या घरचे लोक शोधत आहेत आणि एकीकडे बेवारस म्हणून शेकडो मृतदेहांची विल्हेवाट लावली जाते आहे.
हे सगळे दहशतवाद कमी करण्यासाठी "मारलेले" , खलिस्तानी चळवळींविरूद्ध "मारलेले" असं काहीतरी करत मोठ्या हुद्द्यावर पोचलेले साधे हवालदार आणि पोलिसांची पूर्ण सिस्टिम ह्यात गुंतलेली आहे असे लक्षात येते. एकीकडे आईवडील तरूण मुलाला शोधून हतबल आक्रोश करत आहेत, त्यांना तुमचा मुलगा दहशतवादी होता म्हणून त्यांची जमापुंजी खंडणी सारखी वसूल करायची किंवा तुमचा मुलगा दहशतवाद्यांनी पळवून नेला आहे आहे त्याला सोडविण्यासाठी पैसा द्या म्हणून पिळवणूक करायची. अशी कितीतरी जिनोसाईड कित्येक वर्षे ज्यांना सद्ररक्षणाय, खलनिग्रहणाय नेमले आहे त्यांनीच. बहुतेक प्रेतं तीस वर्षांच्या आतील तरूणांची नाहीतर त्यांच्या शोधात असलेल्या बायका, मुलं, म्हातारी कुणीही. इतका दुराचार तोही इतकी वर्षे चालला. कसलाही वचक नसलेली, माणुसकी नसलेली पंजाब पोलिसची वरपर्यंत गुंतलेली यंत्रणा.
याचा जाब विचारण्यासाठी उभा राहून स्वतःची बायको, चिमणी मुलं, आईवडील धोक्यात आलेलं असताना कॅनडाचे असायलम न घेता येथेच राहून काम तडीस नेण्याची जिद्द आणि जिवाची पर्वा न करण्याची हिंमत असलेला जसवंत. हा खरा धुरंधर होता म्हणून ह्या वर बॅन आला.
शेवटी जसवंतसिंहलाच धमक्या यायला लागतात, त्याच्या मित्राने ह्याला कल्पना दिली असल्याने पन्नास पोलिस घरात शिरून - सुग्गा नावाचा डिजी तेथेच साग रोटी खावून पूर्ण कुटुंबाचा खून करून जातो. दुसऱ्या दिवशी सहा प्रेतं. कसलाही वचक नाही!!
वारंवार निदर्शने करून दिल्ली सरकारचे, पूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्यात हा यशस्वी होतो, तेव्हा ह्यालाच किडनॅप करतात. तेव्हा सिबिआय ऑफिसर म्हणून अर्जुन रामपालची एन्ट्री होते. दलजित आणि अर्जुन दोघेही हिरो वाटले. दोघांनी अतिशय तळमळीने काम केले आहे, कॅरेक्टर्स एकदम पोचतात. जसवंतसिंहच्या तपासात सुद्धा अनेक गोष्टी समोर येतात आणि पंजाब पोलिसची खरी प्रतिमा जगासमोर येते.
जसवंतसिंह - was a real unsung hero! /\ त्याचं म्हणणं - संपूर्ण जगातील अंधकार दूर करण्याची ताकद माझ्यात नसेलही पण धैर्याने लढत राहिलो तर किमान एका समईच्या ज्योतीसारखा माझ्या आसपासचा अंधकार दूर होईल. प्रत्येकाने आपला दिवा पेटवला की जग उजळून निघेलच. एवढंच तर करायचं आहे आपल्याला. आपल्या लोकांसाठी - सगळे आपलेच आहेत. पोलिसांची माझं काही शत्रुत्व नाही पण ही शेकडो बेवारस प्रेतं - त्यांच्या घरचे लोक ह्यांना उत्तर देणं ज्यांचं कर्तव्य आहे त्यांच्याकडून न्याय हवा आहे.
त्याचे इतके हाल हाल करून मारले जाते, डोळ्यात पाणी आलं. नंतर माश्यांनी पटकन खाऊन प्रेत सापडू नये म्हणून मोठ्या जखमा करून पुलावरून सतलज नदीत त्याला ढकलून दिले जाते. त्याचं प्रेत कधीही मिळाले नाही. हे सगळे उघडकीस येण्यासाठी बऱ्याच संघर्षातून समुद्र सिंह ( अर्जुन रामपाल) स्वतः जातो. जसवंत सिंहची बायको न घाबरता नवऱ्याची लढाई नीतिमूल्यांच्या वारसा पुढे चालवते. फारच हृदयद्रावक कथा आहे. सर्वांची कामं उत्तम झाली आहेत. पिक्चर मधे अवास्तव हिंसाचार नाही, जो आहे तो नेमका आहे.
बरेचसे अभिनेते कुठे कुठे पाहिले आहेत. कोहरा ह्या सिरीज मधला सुग्गा, बिट्टा - ओरिजनली गिल - कंवलजीत सिंह सर्वांचीच कामं खरी वाटतात. चित्रपट एकदम नेमका पोचतो, उगाच फाफटपसारा नाही किंवा प्रेक्षकांना मुद्दाम ठरवून रडवणं नाही. सत्यच एवढं तेजस्वी आहे की बाकीच्या बेगडी झळाळीची गरज या नायकाला नाही. बराचसा सिनेमा पंजाबी आहे, नंतर हिंदी होत जातो तरीही कळतं पण लक्ष देऊन ऐकावं लागतं. माझा काही भाग हुकला असेल कदाचित.
चित्रपटावर बॅन आणण्यासारखं यात काही नाही, मुळीच पटलं नाही. दाबून ठेवल्याने सत्य बदलणार नाही, एवढी दुर्बळ लोकशाही असेल तर तिचा सर्वनाश आधीच झाला आहे. आपल्या चुकांची जबाबदारी घेणं, त्या पुन्हा होणार नाहीत हे बघणं, मानवी हक्कांसाठी संवेदनशील असणं सर्वांचेच कर्तव्य आहे. बॅन आणणं ही शुद्ध पळवाट आहे!! अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला तर आहेच, मानवी मुल्यांची पायमल्ली सुद्धा झाली आहे.
हा चित्रपट जरूर पाहा. एका unsung hero साठी. तो अज्ञात राहायला नको म्हणून.
धन्यवाद या रिव्ह्यू साठी.
धन्यवाद या रिव्ह्यू साठी. नंतर पुढे सुरू केला नाही.
आता पाहीन.
पंजाब पोलिसांच्या काही महासंचालकांना दहशतवाद संपवला म्हणून सुपरहिरोचा दर्जा मिळाला होता.
त्या वेळी हे फेक हिरो आहेत असा आक्रोश पंजाबच्या वाचनालयात वाचला होता. नेमकं प्रकरण माहीत नव्हंतं, पण ती वाक्यं लक्षात राहिली.
१९९५ च्या आसपास का राज? कारण
१९९५ च्या आसपास का राज? कारण ते खरं आहे, तसा उल्लेख आहे. या सिनेमाचे नावही पंजाब ९५ असं काही तरी होतं, ते बदलून सतलुज केले होते आणि नंतर सिनेमाच बंद पाडला. आपल्याच निरपराध लोकांना मारून ते सहा महिन्यांत वरच्या पदावर गेले होते. आणि हे सगळं बाहेर पडणं जवळजवळ अशक्य करून ठेवले होते. ज्या पोलिसांना हे पटत नव्हते त्यांना कुटुंबासगट संपवलेले दाखवले आहे. पूर्ण यंत्रणा सडलेली होती आणि कुठलीही माणुसकी नावाला सुद्धा दिसली नाही. पोलिसच असे असतील तर दहशतवाद्यांची काय गरज !
चित्रपट जवळजवळ पंजाबीतच वाटला, आणि माझ्याकडे सबटायटल्स अव्हेलेबेल नव्हते. घरातही सारखं कुणीतरी मधेमधे बोलत होते, कामं चालू होती एकीकडे. शेवटचा अर्धा मी निवांत पाहिला आणि तो जास्त समजला.
उडता पंजाबही अशीच पंजाबची
उडता पंजाबही अशीच पंजाबची किडलेली सिस्टिम दाखवतो. पंजाबात खरेच काय सुरु आहे देव जाणे.
बॅन का केला कळले नाही. यात जे घडले ते २०१४ च्या आधीचे आहे. आताच्या सरकारला का त्रास व्हावा? त्यांना उलट बरे वाटायला हवे.
बरोबर . ९१ पासून पंजाबात जात
बरोबर . ९१ पासून पंजाबात जात होतो. ९५ च्या आसपासच वाचलेलं. त्या आधी सैन्यातून शीख का पळाले याचा अंदाज आता येतो.
मी सिनेमा बघताना इतकी गुंतून
मी सिनेमा बघताना इतकी गुंतून गेले होते, की भाषा लक्षातच आली नाही.
मलाही अडथळा आला. मग सबटायटल्स
मलाही अडथळा आला. मग सबटायटल्स ऑन केले.
ओटीटी वर सिनेमा बघताना मराठीत सुद्धा संवाद समजत नाहीत.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=L-Mh1xeYl0Q
पाहिला मी ही सतलज. जबरदस्त
पाहिला मी ही सतलज. जबरदस्त पिक्चर आहे. खिळवून ठेवतो पूर्ण. अस्मिता - पिक्चर बद्दल छान लिहीले आहेस पण जसवंत सिंग बद्दल स्पॉईलर आहे लेखात. दलजीत, अर्जुन रामपाल, जसवंतच्या बायकोचे काम केलेली, सुग्गाचे काम केलेला, कंवलजीत आणि तो शेवटी दाखवलेला साक्षीदार ("पाताल लोक" मधे जे खून करायला आलेले चौघे दाखवले आहेत त्यातला एक) सर्वांची कामे चांगली आहेत. खटकलेला एकच रोल म्हणजे शेवटी बिट्टाच्या जागी नवीन पोलिस प्रमुख येतो तो. त्याचे आडनाव वर्मा आहे पण बोलण्यात स्पष्ट तमिळ टोन आहे. वर्मा तेलुगु असू शकतात पण त्यांचे हिंदी असे नसते. त्या कलाकाराचे नाव विसरलो पण तमिळ पिक्चर्स मधे नेहमी असतो.
यात सध्याच्या सरकारला अडचणीत आणणारे काहीच नाही. त्यामुळे ते कारण बंदी आणण्याचे नसेल.
दुसरे म्हणजे यातील हत्यांचा उल्लेख 'जेनोसाइड' असा केला आहे. सहसा जेनोसाइड हा शब्द एखाद्या गटाच्या लोकांच्या हत्या दुसर्या व त्यांच्यापेक्षा धर्म, पंथ, भाषा ई वेगळे असणार्या लोकांनी केलेल्या हत्यांबद्दल वापरला जातो. इथे मारले गेलेलेही पंजाबी आणि बहुतांश शीख आहेत आणि मारणारेही. किमान या पिक्चर मधे या दोन्हींपैकी कोणीच इतर दाखवलेले नाहीत. त्यांना मारण्याचे मोटिवेशनही फक्त एन्काउण्टर्सची संख्या वाढवून करीयर मधे प्रगती आणि पैसे कमावणे हे आहे. त्यांच्या गुन्ह्यांचे गांभीर्य त्याने कमी होत नाही पण अशा कृत्यांकरता जेनोसाइड म्हंटलेले कधी पाहिले नाही.
मी झी५ वर पाहिला. इंग्रजी सबटायटल्स लावून.
रवांडा किलिंग्ज पण जिनोसाईड
रवांडा किलिंग्ज पण जिनोसाईड म्हणुन गाजलं होतं ना? ते ख्रिस्ती होते बहुतेक. लक्षात नाही.
हो असेल - मला म्हणायचे आहे की
हो असेल - मला म्हणायचे आहे की सहसा त्यात मारणारे आणि मारले गेलेले वेगळे असतात. रवांडा मधे बहुधा दोन वेगळ्या ट्राइब्ज होत्या.
यात सगळेच पंजाबी शीख.
जेनोसाईड वापरलेलं मलाही थोडे
जेनोसाईड वापरलेलं मलाही थोडे वेगळे वाटले कारण तसं वाटलं नाही. पण संवाद त्या शब्दाचा वापर करताना दिसले. आणि मारणारेही शीखच होते. रादर सगळेच. "massacre" शब्द जास्त योग्य होता या प्रकारच्या हत्याकांडाला.
वर्मा बाहुबलीतला राजा - शिवगामीचा नवरा किंवा चाची ४२० मधला स्वयंपाकी. त्याला छोटासा रोल आहे ते तरी बरं. हिंदी खटकले मलाही त्याचे, सरळ साऊथ इंडियन म्हणायचे होते.
सगळेच कलाकार कुठे कुठे बघितले आहेत. त्याचा तो मित्र सुद्धा वध आणि धडक २ व्हिलन होता आणि तो हिरव्या डोळ्यांचा एका पिक्चर मधे अतिरेकी होता. नावं माहीत नाहीत. पाताल लोकचा दुसरा सिझन पाहिला नाही. सुग्गा मात्र कोहरा १ मधे होता असं वाटलं.
चाची ४२० मधला स्वयंपाकी
चाची ४२० मधला स्वयंपाकी
>>
नासर
जे ब्बात ॲन्की, म्हणून गूगल
जे ब्बात ॲन्की, म्हणून गूगल केले नाही.
सत्य उघडकीस येऊन नोकरी जाऊ नये म्हणून याला सगळे "बाबाबुबु" असंच बोलायचं असतं म्हणून याचं नाव बाबाबुबुच ठेवलं होतं मी.
चाची ४२० एक अफाटच सिनेमा होता. नासरची नोकरी जाते म्हणून त्याला कमल हसन सासरच्या घरात चिकटवायला जातो तर तेथे सैंया हमारे है मांसाहारी वरून सुद्धा मोठी चर्चा होत असते. हा मुसलमान त्यात नॉनव्हेज खाणारा म्हणून अमरिश पुरीला चालणार नसतो पण हा पडला गरीब आणि सरळ, त्याला खोटं बोलता येत नाही म्हणून सरळ मुका आहे असं सांगतात. तिकडे ओम पुरी गायत्री मंत्र म्हणून दाखव म्हंटले तर हा अल्ला हो अकबर टाईप म्हणतो.
अस्मिता+१
अस्मिता+१
आमच्याकडेपण त्याला बाबाबुबु असंच म्हणतात. नासर कुठेही दिसला की बाबाबुबु इथे पण असा जोक मारला जातो.
Pages