Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे शाहरुख मिमिक्री करताना
हे शाहरुख मिमिक्री करताना बहुतांश जण जे बकरीसारखे करतात ते मला फार इरिटेटिंग वाटते. >> अनेकांना त्याची बकरीची मिमिक्री इरीटेटींग वाटत असेल.
ओ ब्रदर (व्हेअर आर्ट दाऊ)² >
ओ ब्रदर (व्हेअर आर्ट दाऊ)² >>>>
हो हे ही चालेल.
कॉमी
कॉमी
एखाद्या पिक्चरमधे दुसर्या
एखाद्या पिक्चरमधे दुसर्या पिक्चरचा किंवा त्यातील लोकप्रिय संवादाचा संदर्भ चांगल्या पद्धतीने वापरतात त्याला बहुतेक होमाज/ओमाज म्हणतात (homage). इंग्लिश रिव्यूज मधे शब्द वाचला आहे. स्पेलिंग होमेज सारखेच असले तरी शब्द कदाचित फ्रेंच मधून आला असेल.
परवा "वध" पाहताना हे आठवले. एका सीन मधे संजय मिश्रा पोलिस स्टेशनमधे येतो आणि तेथील एका पोलिसाच्या टेबलसमोर उभा राहून त्याच्याशी बोलतो. तेव्हा तो पोलिस त्याला खुर्चीकडे बोट दाखवून बसायला सांगतो आणि वर विचारतो "जब तक बैठने के लिये न कहा जाये, बैठोगे नही क्या?"
अजून एक उदाहरण
डाय हार्ड विथ अ व्हेन्जंन्स - मधला सबवे सीन.
https://www.youtube.com/watch?v=O8aLn5-Vn0M&t=150s
त्याचा फ्रेण्ड्स मधे वापरलेला संदर्भ. हे लोक डाय हार्ड फॅन्स असतात. हा वरच्याला ओमाज असण्याइतका क्लिअर नाही पण मला नेहमी वाटतो.
https://www.youtube.com/watch?v=hddFd5ltdvM
मी बास्टर्डस आधी बघितलेला आणि
मी बास्टर्डस आधी बघितलेला आणि हांस लांडा च्या रोल चा इतका इफेक्ट झालेला की दियागो अनचेंड मध्ये तो कधीही धोका देणारे आणि व्हिलन होणार असे शेवटच्या क्षणापर्यंत वाटत होते
है जवानी तो इश्क होना है
है जवानी तो इश्क होना है
डेव्हिड धवनचा शेवटचा सिनेमा
निदान शेवटचा म्हणून तरी काही वेगळं दाखवलं असेल तर शपथ. आपल्याच बऱ्याचशा किंवा तत्सम इतर सिनेमांची ठिगळं जोडली आहेत. शेवटचा म्हणून हा सिनेमा करण्यापेक्षा नसता केला तरी चाललं असतं
ज्याला कुणाला हा पिक्चर
ज्याला कुणाला हा पिक्चर संपूर्ण बघता आला त्याला पद्मपुरस्काराने सन्मानित करावं. >>>> थिएटर ला बघितला होता. पुरस्कार घ्यायला कोठे येऊ?>>>> मी पण
त्यात १ खूप सुंदर गाणं आहे, ओ रे कांची, अगदी लय आहे त्याला. सन सननसन आणि रॉशनी से भरे भरे गाणी कमाल आहेत. अगदी डबड्या सिनेम्यात पण काहीतरी बरं असतं ते असं.
तिला ही बुजगावणे पोझिशन सार्थकी लागावी म्हणून दोन किमी अंतरावर लांब सोडून पळत यायला लावतात, तोवर हा असाच तिष्ठत उभा!>>>
मलाही रोशनी से भरे भरे आणि
मलाही रोशनी से भरे भरे आणि रात का नशा आवडतात ऐकायला. निदान उपनगरांची राणी वगैरे पुरस्कार मिळू शकेल का या अचिव्हमेंटबद्दल?
जब तक मोदी राज रहेगा
जब तक मोदी राज रहेगा
शाहरुख सुपर स्टार रहेगा।
अजून दीडशे वर्षे आहे.
अशोका ची गाणी गुलजारची आहेत
अशोका ची गाणी गुलजारची आहेत
अन् संगीत अनु मलिक चं
काल धर्मेंद्र-आशा पारेख
काल धर्मेंद्र-आशा पारेख जोडीचे आया सावन झुमके व शिकार हे दोन चित्रपट एकामागोमाग पाहिले. दोन्ही १९६८-६९ मधले आहेत. धर्मेंद्र दोन्हीत दिलखेचक दिसतो. आशा पारेख आया सावन… मध्ये अधुन मधुन सुसह्य दिसलीय. पण तिचे मार्केट तेव्हा धर्मेंद्रपेक्षा चढे असावे, श्रेयनामावलीत तिचे नाव धर्मेंद्रच्या वर आहे. त्या काळात या गोष्टीला महत्व होते असे वाचलेय.
आया सावन.. मध्ये निरुपा रॉय आहे. मुलगा(च) तान्हा असताना त्याला सोडायचे आणि नंतर शोधत बसायचे हा तिचा पुरातन रोल तिने यातही प्रेमाने निभावलाय. गाणी सुंदर आहेत.
शिकारमध्ये पोस्टरवर संजिवकुमार पाहुन थोडे आश्चर्य वाटले म्हणुन चित्रपट पाहिला. सुरवात पाहिल्यावर लक्षात आले हल्लीच दोन तिन वर्षांपुर्वी पाहिलाय. निट आठवत नव्हता म्हणुन पुर्ण बघितला. संजिवला चॅलेंजिन्ग वगैरे रोल नाहीय, त्याजागी कोणीही असु शकला असता. पण संजिव असल्यामुळे जे आहे त्यातही त्याने जान भरलीय.
दोन्ही चित्रपटात आशा पारेखचा कपडेपट तिच्या बहिणीने सांभाळलाय. नेहमीचेच आशा पारेख पेशल कपडे आहेत, काही वेगळेपण नाही. साड्यांमध्ये प्लेन पांढरी सिन्थेटिक साडी, तिला रंगीत किनार व त्याच रंगाचा पदर हे दोन तिनदा रिपीट केलेय. छान दिसल्यात या साड्या. बोटीवरच्या एका गाण्यात ती व अरुणा इराणी साड्यांमध्ये खुप सुंदर दिसल्यात.
शिकारमध्ये हेलनला पुर्ण चित्रपटभर रोल आहे आणि तिचा कपडेपट भानु अथैय्याने सांभाळलाय. अतिशय सुंदर वेस्टर्न ड्रेसेस बघायला मिळाले.
धर्मेंद्रला कोणी कपडे चढवले याचा उल्लेख नाही. पण जे आहेत ते छान आहेत. शर्टांचे रंग व स्टाईल इतर चित्रपटातही रिपिट झालेत. त्याला सगळेच शोभलेय.
राजेश खन्नाच्या चित्रपटात त्याच्या कपडेपट सांभाळणार्याचे नाव वाचल्याचे आठवते.
शिकारमध्ये भरपुर गाणी आहेत आणि सगळीच रफीची गाजलेली गाणी. एकच महेंद्र कपुरचे आहे व सोबत कृष्णा कल्ले. ते तितके गाजले नाही.
दोन दिवस आधी अमिताभ- माला सिन्हाचा संजोग पाहिला. टिपिकल साउथ चित्रपट. कलेक्टर झालेली हिरोइन त्या पदाची शान सांभाळते पण नवरा समोर आला की दरवेळेस ढेपाळते. अनिताभ तेव्हा यंग अंग्री मॅन झाला नव्हता. त्याच्याजागी दुसरा कोणी असता तरी फरक पडला नसता. पण एकदोन प्रसम्ग मिळालेत चांगले.
यातला एक प्रसंग मागे खुप व्हायरल झालेला. अमिताभ, त्याची बायको आणि माला सिन्हा व तिचा मुलगा एकाच वेळेस एकाच देवळात जातात आणि ऑफिसातला जॉनी वॉकर त्यांना एकमेकांसमोरुन जाताना पाहतो. ही गोष्ट तो ऑफिसात एकाला सांगतो, ती गोष्ट पुर्ण ऑफिस फिरत त्याच्याकडे येते तेव्हा त्या प्रसंगाचे रुप पुर्ण बदललेले असते.
Pages