Submitted by धनि on 7 April, 2026 - 09:25
२००० होऊन गेले म्हणून नवीन धागा.
मागच्या धाग्याची लिंक
https://www.maayboli.com/node/87006?page=66
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
@ प्रल्हाद टिपानिया
@ प्रल्हाद टिपानिया
हे कबीर भजने अगदी तल्लीन होऊन गातात. सोबतीला त्यांचा भाऊ, एकतारा आणि असलाच तर डफ.. बस्स.
अनेक वर्षे हा माणूस दर हिवाळ्यात कबीर समारोह भरवत होता. झपाटलेला, हेच खरे.
@ अंगूर, रंगबिरंगी, नरम गरम, छोटी सी बात...
सगळेच आवडते, कितीही वेळा बघता येतील असे चित्रपट. मस्त चर्चा.
माँ बहन अर्धा बघून झाला. मला
माँ बहन अर्धा बघून झाला. मला आवडतो आहे.
त्यात एका सीन मध्ये हँड ऑफ गॉडचा संदर्भ आला आहे तो अफलातून आहे. मूळ मायकलेंजलोच्या द क्रिएशन ऑफ अॅडम चित्रात तो हँड ऑफ गॉड मानवाची निर्मिती झालेली दाखवतो तर इथे तसल्याच दिसणार्या कृतीतून मृत्यू ओढवलेला दाखवलेला आहे. हे विडंबन अगदीच जमून आलंय.
रंगबिरंगी मधेच उत्पल दत्त
रंगबिरंगी मधेच उत्पल दत्त च्या पात्राच नाव धुरन्धर भाटवडेकर असत ना? तस असेल तर पहिला धुरन्धर उत्पल दत्त च.
संजीवकुमार आणि मौशुमी चटर्जी
संजीवकुमार आणि मौशुमी चटर्जी या जोडीच्या पिक्चरचं नाव कुणाला आठवतंय का?
दोघं नवरा बायको असतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत असतं. दोघे आपापल्या कामांची अदलाबदली करतात. तो.
त्यातच संजीवकुमारला श्रीकृष्ण प्रसन्न होतो का?
पहिला इतनी सी बात
पहिला इतनी सी बात
दुसरा यही है जिंदगी
कॉमेडी ऑफ एरर्सवरुन प्रेरीत
कॉमेडी ऑफ एरर्सवरुन प्रेरीत होऊन किशोर कुमार व असित सेनचा दो दुनी चार आधी येऊन गेलाय. गीते व संवाद त्यातही गुलजारचेच होते. जुन्यातले काही अंगुरमध्ये आलेय पण अंगुर एकमेवाद्वितीयच.. सलग दोनदा पाहिला तरी मला तितकेच हसायला येते ह्याचे मलाच आश्चर्य वाटते.
धन्यवाद भरत,
धन्यवाद भरत,
हे बहुतेक लागोपाठ दाखवलेत दूरदर्शनवर. कदाचित मतमोजणीच्या वेळी.
दो दुनी चार बघितला आहे.
दो दुनी चार बघितला आहे. त्यातील 'हवाओ पे लिख दो' खूप सुमधुर गाणं आहे.
पण अंगूर तो अंगूरच!
शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स
शेक्सपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स वरून दो दुनी चार, अंगूर आणि सर्कस आले.
तसेच अजून आठवणारे काही.
ऑथेल्लो - ओंकारा
हम्लेट - हैदर
मक्बेथ - मकबूल
किंग लियर - बाघबान (म्हणता येईल थोडाफार)
रोमिओ ज्युलिएट - अनेक! रामलीला, एक दुजे के लिये काही उदाहरणे
ट्वेल्थ नाईट - कामापुरता मामा हा मराठी चित्रपट थोडा याच्यावर बेतला होता
टायटस अंड्रोनिकस - अगदी हुबेहूब नाही पण आपल्या खानदानाचं शिरकाण झालेलं पाहून संताप आणि शोकावेगात भयानक बदला घेणारा आणि शेवटी मरणारा नायक अनेक हिंदी चित्रपटात बघायला मिळतो.
अजून कुठले चित्रपट आठवतात?
तसेच जेन ऑस्टिनच्या कादंबर्यांवरून बेतलेले
Sense and sensibility - तमिळ कांदुकोंडेन कांदुकोंडेन
Pride and prejudice - Bride and Prejudice, सिरियल तृष्णा
Emma - आयेशा (सोनम कपूर होती यात)
साऊंड ऑफ म्युझिक- परिचय तर
साऊंड ऑफ म्युझिक- परिचय तर आहेच, पण बाहेरून आलेल्या व्यक्तीने कुटुंबातील माणसांना/ त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध सुधारणे ही साधारण थीम धरली तर बावर्ची, हम हैं राही प्यार के आणि हीरो नं. वन. अजूनही असतील.
मला एक जुना मराठी चित्रपट
मला एक जुना मराठी चित्रपट "आराम हराम आहे" बघायचा आहे. कुठे बघायला मिळेल?
यु ट्युब वर नाहीये.
मायकल हा मायकल जॅक्सन वरचा
मायकल हा मायकल जॅक्सन वरचा चित्रपट पाहिला. घरीच पाहिला. खूपच आवडला वगैरे नाही पण चांगला वाटला. मायकल जॅक्सनचा पुतण्याच मायकल झाला आहे. मला पिक्चर खूप भारी न वाटण्याचे कारण त्याची क्रिएटिव्ह प्रोसेस फारच कमी दाखवली आहे व जुन्या गाण्यांचे रिक्रिएशन जास्त दाखवलं. जे चांगले जमले आहे अर्थात तरीही अजून काही तरी हवं होतं कथेकडून. बाबांनी (ज्योसेफ) लहानपणी भरपूर शोषण व मारहाण केली. सरळ पट्ट्यानी बडवून काढायचे, चित्रपटात फक्त मायकललाच मारहाण दिसली पण सर्वांनाच केली असेल. अगदी आठव्या वर्षापासून शोज आणि प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. पण तो इतर भावंडांपेक्षा कसा वेगळा होता, त्यानेच हे सगळं साम्राज्य उभं केलं हे लक्षात येते. कुठेतरी एकाकी आणि हळवा होता. अतिशय मृदू भाषी व्यक्तिमत्त्व, रिस्पेक्टफुल आणि प्रेमळही.
पण एकाकीपणा किंवा अब्यूजमधून rhinoplasty करत करत नाक कसे केले, त्वचेचा रंग आजारामुळे पांढरा कसा होत गेला, एकाकीपणामुळे exotic pets - जिराफ, चिंपांझी, अजगर वगैरे घरात आणून त्यांच्याशीच खेळत असायचा. पुष्कळ वेळा मला त्याची चेहरेपट्टी, कोरलेल्या भुवया, रेखीव चेहरा हे फेमिनिन वाटले. अतिशय देखणा वाटला. सगळ्या बहिणी सुद्धा फार रेखीव, आई सुंदर. छान वाटले पाहायला.
वडिलांनी आयुष्यभर अब्यूज करूनही आईने प्रोटेक्ट केले नाही. तशीच बघत बसली. लेकीच्या माहेरा माय सासरी नांदते व्हर्जन आहे हेही. नंतर तिला पस्तावा झाला पण मायकलच्या मनात तिच्याविषयी किंवा कुणाविषयीच कसलेही किल्मिष नव्हते. हे फार छान पण अतिशय आटोपशीर दाखवलं आहे. तो एक माणूस म्हणून कसा होता हे तुकड्यात आहे आणि गाणी मात्र भारंभार आहेत. अर्थात तेच त्याचं विश्व होतं. थ्रिलर, बीट ईट वगैरे पाहायला मजा आली. नेव्हरलॅंडची उभारणी कशी झाली याचंही थोडंफार आलं आहे. मला त्याची बरीच माहिती होती पण सखोल वगैरे नाही. काही गोष्टी नव्या वाटल्या. पेप्सीच्या कमर्शियलच्या वेळी केसांवर ठिणगी पडून मस्तक जळाले, फार भयंकर घटना. तरीही वडिलांनी टूर पूर्ण कर म्हणून दबाव आणला. शेवटी वडिलांना फायर केले आणि तो स्वतंत्र झाला. आई व भावंडांशी संबंध एकदम सलोख्याचे होते तरीही कुठेतरी एकटाच होता मायकल जॅक्सन. अजून एक भाग येणार आहे म्हणे याचा. त्यात पुढचे आयुष्य असेल यात अगदी तीस पस्तीस वर्षे आयुष्य कव्हर केलं आहे. काही तरी पूर्ण आणि अखंड पाहिल्याचे समाधान मिळाले नाही. पण फॅन असाल तर जरूर पाहा.
मायकल ओटीटी वर आला का..
मायकल ओटीटी वर आला का.. बघायचा आहेच
त्याची वेगळीच क्रेझ लहानपणी अनुभवली आहे. मी स्वतःही आजही त्याचे They Don't Care About Us गाणे महिन्या दोन महिन्याने ऐकत असतो.. सध्या तर त्या ओळी वेगळ्याच हिट करत आहेत.
आमच्या आयपीटिव्हीवर आला आहे ऋ
आमच्या आयपीटिव्हीवर आला आहे ऋ. भारतातही येईल किंवा आला असेल किंवा रेंट भरून पाहता येईल. गाणी मीही पुन्हा पुन्हा ऐकते बरीच.
नेटफ्लिक्सवरची मायकल जॅक्सनची
नेटफ्लिक्सवरची मायकल जॅक्सनची चाईल्ड अॅब्युझ वरची डॉक्युमेन्ट्री पाहून हा सिनेमा न पहाण्याचा निर्णय घेतलेला आहे.
@ अस्मिता ओके,
@ अस्मिता ओके,
ओटीटीवर हिंदी डब आला तर बरे. मला पहिल्यांदा बघताना इंग्लिश समजून घेत बघणे त्रासदायक वाटते.
सामो,
मायकल जॅक्सन बाबत दुसरी बाजू सुद्धा चर्चेत आहे. ज्यानुसार Epstein फाईल सारखी कांड त्याने फोडू नये म्हणून त्यालाच अडकवून त्याचा गेम केला. आणि यावर विश्वास ठेवणारे देखील बरेच आहेत. खरे खोटे मला माझ्या लेव्हलला कधीच समजणार नाहीच. पण तसे असल्यास ते फार दुर्दैवी ठरेल. म्हणून मला एका बाजूवर विश्वास ठेवून त्याचा द्वेष करावासा वाटत नाही.
काल बघितला. ठीक ठाक आहे.
काल Disclosure Day बघितला. ठीक ठाक आहे. अपेक्षा खूप होत्या. पण... मधूनच काही ब्राईट स्पॉट आहेत. पण एकूण निराशा झाली. एमिली ब्कंट आणि कॉलीन फर्थ यांच्या अभिनयाने सिनेमा सुसह्य झाला. मुख्य विषय आहे एलिअनस! आणि सरकार त्याबद्दल चा पुरावा कशाप्रकारे दाबून ठेवत आहे.
जर कुणाला ह्या विषयात रुची असेल तर त्यांनी अवश्य पहावा.
नेटफ्लिक्सवरची मायकल जॅक्सनची
नेटफ्लिक्सवरची मायकल जॅक्सनची चाईल्ड अॅब्युझ वरची डॉक्युमेन्ट्री पाहून हा सिनेमा न पहाण्याचा निर्णय घेतलेला आहे.>>> सेम, त्यामुळेच मलाही फार बघावासा वाटला नाही...त्याच्या कलेबाबत मात्र उत्तुन्ग आणी या सम हाच दुसरा होणे नाही हे मात्र जाणवते.
>>>>>मला एका बाजूवर विश्वास
>>>>>मला एका बाजूवर विश्वास ठेवून त्याचा द्वेष करावासा वाटत नाही
त्या डॉक्युमेंटरीत त्या १२ वर्षाच्या मुलाने , ग्राफिक डिटेल्स दिलीयेत. भयानक ग्राफिक डिटेल्स.
मायकल म्हणतोय त्यात की त्याला लहान मुलांबरोबर झोपायला आवडतं आणि मग तो सारवासारव करतोय - म्हणजे कुकीज, दूध देउन, टक इन करायला वगैरे.
काल परत कितव्यादा तरी रेखाचा
काल परत कितव्यादा तरी रेखाचा "खुबसुरत " पाहिला...सुरेख गाणी आणी रेखाने व्यापुन टाकलेला असला तरी त्या काळात इतर साइड कॅरेक्टरला ही फार छान वाव मिळायचा.
रेखाचा कपडेपट अप्रतिम आहे.. साड्या सुरेख आहेत, बहिणीच्या लग्नात चक्क काळी साडी नेसलीये हे जरा अनकन्व्हेशनल टेक पण आहेत..
तेच खुप वर्शानी आलेल्या हिन्दी साइड प्रभाव असलेल्या हम आपके है कौन मधे अतिबेसिक आणी एकदम खडकी दापोडी कपडेपट घेतलाय..सुरज बडजात्याचा रन्गाचा कॅनव्हास ३री फ लेव्हल..
सगळा हिन्दी साइडर पण खानदानी मामला...नवरा-नवरी एकमेकाना न बघताच लग्न होते हे एकदम टिपिकल त्यावेळेचे नॉर्म..( आमचे नेबर आणी खुप छान फॅमिली फ्रेन्ड जबलपुरचे त्या काका-काकुनी नवर्याला थेट लग्नातच बघितल) तेच नवरिची बहिण येवुन अगदी छान ४-६ महिने तरी मुक्काम करते हे एक वेगळच!!
सारे नियम तोड दो गाण्यात रेखाने कुर्ता जॅकेट ..थेट चुपके चुपकेच्या अमिताभची स्टाइल केलिये.
मी मायकल जॅक्सनवरची केस चालू
मी मायकल जॅक्सनवरची केस चालू असताना पाहिले होते न्यूज वर. आधी घृणास्पद वाटलं नंतर बराच उहापोह पाहून माझं मत बदलले. ऋ ने लिहिलेय तसेच काहीसे. ही डॉक्युमेंटरी मात्र मी पाहिली नाही अजून. तो खरंच संवेदनशील आणि प्रेमळ वाटतो पण. कलाकार मनस्वी आणि विचित्र असतात हेही आहे. ते काही समाजाच्या चौकटीत बसत नाहीत. हा तर जगद्विख्यात "किंग ऑफ पॉप" होता. काही गोष्टी गूढ राहणार आहेत कायमच!
एपस्टिन फाईल्स बद्दल वाचून मात्र दोन- तीन दिवस अस्वस्थ वाटून मला दुखणंच आलं होतं. मी लहान मुलांचं शोषण बघूच शकत नाही. सगळ्यात डार्क गुन्हा वाटतो.
डिस्क्लोजर डे आणि ओडिसी दोन्ही पाहायचे आहेत. ट्रेलर आवडलं नव्हतं दोन्हीचेही.
खूबसुरत माझा ऑटाफे आहे. पाठच आहे. हमतो सब करते है निर्मल आनंद के लिये!
>>>मात्र दोन- तीन दिवस
>>>मात्र दोन- तीन दिवस अस्वस्थ वाटून मला दुखणंच आलं होतं. मी लहान मुलांचं शोषण बघूच शकत नाही. सगळ्यात डार्क गुन्हा वाटतो.
सर्वात हिनिअस आहे. खरे आहे.
कोणत्याही दुर्बळ घटकाच्या दुर्बलतेचा गैर्फायदा घेउन केलेले कृष्ण्कृत्य हे भ्याडपणाचेच आणि किळसवाणेच. मग ते मुके प्राणी असोत, लहान बालके अथवा अति वृद्ध व्यक्ती किंवा मतीमंद आदि लोकांचे शोषण असो.
हम आपके है कौन मधे अतिबेसिक
हम आपके है कौन मधे अतिबेसिक आणी एकदम खडकी दापोडी कपडेपट घेतलाय..सुरज बडजात्याचा रन्गाचा कॅनव्हास ३री फ लेव्हल.. >>> १००++
अतिबेसिक आणी एकदम खडकी दापोडी
अतिबेसिक आणी एकदम खडकी दापोडी >>>
किती दिवसांनी हे विशेषण ऐकले! लहानपणी आमच्या आजूबाजूला सर्रास वापरले जायचे.
मायकेल जॅक्सन मला कधीच इंटरेस्टिंग वाटलेला नाही. मी त्याची गाणी बरीच नंतर ऐकली. तोपर्यंत त्याच्या गाण्यांची हिंदीतील भिकार ("खडकी-दापोडी"
) नक्कल अनेकदा आली कितीतरी पिक्चर मधे. तीही कधी आवडली नव्हतीच. त्यामुळे या पिक्चरबद्द्ल फारसे कुतूहल नाही. त्याने केलेल्या अॅब्यूज बद्दल वरवर ऐकले आहे. ते ही एक कारण आहेच.
मी लहान मुलांचं शोषण बघूच शकत
मी लहान मुलांचं शोषण बघूच शकत नाही. सगळ्यात डार्क गुन्हा वाटतो.>>> +१ त्यामुळेच मी खुप चान्गली आहे हे वाचुनही "राख" पण नाही बघु शकले..
मी लहान मुलांचं शोषण बघूच शकत
मी लहान मुलांचं शोषण बघूच शकत नाही. सगळ्यात डार्क गुन्हा वाटतो. त्यामुळेच मी खुप चान्गली आहे हे वाचुनही "राख" पण नाही बघु शकले.. >>> १००++
मायकेल जॅक्सनची They don't really care about us आणि Earth song आवडायची. हे म्हणणारा माणूस चाईल्ड अब्यूज करतो हे ऐकून धक्का बसला होता. नंतर एकंदरीत ऐकण्यातून तो fade out होत गेला.
खूबसूरत पाहून खूप वर्षे झाली.
खूबसूरत पाहून खूप वर्षे झाली. तेव्हा त्यातली रेखा फार आवडली होती. ऑथर-बॅक्ड रोल म्हणतात तसाच तो रोल असला तरी. पण शशिकला, दीना पाठक, अशोक कुमार सगळेच मस्त होते. पिया बावरी गाणेही आवडते.
८०ज मधे स्मिता आणि शबानाचे खूप कौतुक होत असे. त्यातले बरेच बरोबरही होते. पण त्यामानाने रेखा खूप अंडररेटेड राहिली.
अस्मिता,
अस्मिता,
मला एक लॉजिक बरोबर वाटले.
४० वर्षांचा अफाट श्रीमंत आणि लोकप्रिय माणूस लहान मुलांबरोबर एकत्र बेड शेअर करतो.
आता कोणती गोष्ट जास्त शक्य आहे असे तुला वाटते :
१. तो एक असा ग्रूमर होता, ज्याने मुलांचा access रहावा म्हणून " अफाट श्रीमंत, थोडासा विक्षिप्त पण निरुपद्रवी, खूप कनवाळू, आणि किंचित विचित्र माणूस" अशी आपली प्रतिमा अत्यंत काळजीपूर्वक घडवून ठेवली होती.
२. तो लहान मुलासारखा खरोखर निष्पाप होता आणि त्याच्या मनात तिळमात्रही दुष्टपणा नव्हता.
पहिली शक्यता इतिहासात पुन्हा पुन्हा घडलेली आहे. दुसरी मात्र कधीच घडलेली नाही. ज्यांची कीर्ती आणि कर्तृत्व याच्यापेक्षा कितीतरी कमी होती, अशा पुरुषांनीही शोषणासाठी मुलांच्या सहवासात राहता यावे म्हणून वाट्टेल ते केले आहे. जेरी सॅन्डस्कीने एक ट्रबल्ड मुलांसाठी संस्था सुरू केली, अर्ल ब्रॅडली वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झाला, वगैरे. वगैरे.
त्यामुळे, जर तो बदकासारखा दिसतोय, क्वॅक क्वॅक ओरडतोय, आणि बदकासारखा चालतोय, तर त्याला बदक म्हणावे. या भाषांतराबद्दल क्षमस्व. पण आहे हे आहे.
लहानपणी ज्यांचे शोषण होते ते पुढे लैंगिक शोषण करण्याची शक्यता खूप असते असे बऱ्याच मानसशास्त्रीय आडाख्यांमध्ये दिसते. म्हणजे टेक्स्टबुक केसेस असतात या.
असो, नको त्या विषयाला हात घालून धाग्याचा विचका नको करायला. पण प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट असते हेच खरे.
मायकल जॅक्सनची मी आमच्या इथे
मायकल जॅक्सनची मी आमच्या इथे बरीच क्रेझ अनुभवली आहे. ईक्वीवॅलेंट टू जॅकी चॅन!
जेव्हा वॉकमन आणि गाणी कॅसेट मध्ये भरून घ्यायचा काळ होता तेव्हा आमच्या इकडची कॉलेजमधली मुले त्याची गाणी कॅसेटमध्ये भरून घ्यायची. त्यांच्यासोबत माझेही ऐकणे व्हायचे. मला स्वतःला ऐकायला आवडणारे आणि गायला जमणारे गाणे वर उल्लेखले आहे तेच.. हल्ली ते बरेच रीळमध्ये सुद्धा ऐकायला मिळते. त्या गाण्यातून त्याने सत्य सांगायचा प्रयत्न केला असा तर्क मांडला जातो. पण ते या धाग्यावर असो.. वेगळ्या धाग्यावर सुद्धा नको.
बाकी त्याच्या गाण्याइतकीच त्याच्या मूनवॉकची सुद्धा जबरदस्त क्रेझ होती. आमच्याइकडची मुले त्याचा सराव करायची. कोण चांगली करतो याची स्पर्धा लागायची.
आमच्याकडे मायकल जॅक्सनचा विषय निघाला की बायकोचे आणि माझे या सर्वच बाबतीत एकमत होते आणि दोघांचे अनुभव विश्व त्याच्या बाबतीत सेम आहे.
मायकल जॅक्सन वादाची
मायकल जॅक्सन वादाची डॉक्युमेंटरी मी पाहिली नाही. पण मला त्यावरून तलवार चित्रपट आठवला. तो सुद्धा बरेच प्रश्न मनात सोडून गेला. अस्वस्थ करून गेला. फार आवडला तरी पुन्हा बघायची हिंमत झाली नाही.
Pages