Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेव्हा मिडियाने कराची काबीज
जेव्हा मिडियाने कराची काबीज केली तेव्हा मी किती खुश झालो होतो!
दुसरे जास्त विनोदी आहेत
दुसरे जास्त विनोदी आहेत म्हणून.>>>
पुराव्यानिशी शाबीत
मोहॉक व्हॅली फॉर्म्युला :
मोहॉक व्हॅली फॉर्म्युला : आंदोलन दडपण्याची शास्त्रीय पद्धत
१.
कोणतेही आंदोलक, संपकरी हे काही परग्रहावरचे प्राणी नसतात. ते आपल्यातीलच असतात. आपल्यावर अन्याय झालेला आहे ही त्यांची भावना असते. आपल्या मागण्यांसाठी ते झगडत असतात.
मोहॉक व्हॅली सूत्रातील पहिला नियम हा आहे, की या आंदोलकांना ‘ते’ ठरवायचे. सामान्य जनता म्हणजे ‘आपण’. ‘आपल्या’ विरोधात ‘त्यांना’ उभे करायचे.
म्हणजे उदाहरणार्थ आंदोलक हे शिक्षक असतील, तर बाकीच्या समाजघटकांना त्यांच्याविरोधात उभे ठाकण्यास प्रवृत्त करायचे. आंदोलक हे व्यवस्थेत तोडफोड करणारे आहेत, समाजकंटक आहेत. ‘समाजा’साठी - म्हणजे उर्वरीत सामान्य नागरिक, उद्योजक, व्यावसायिक, कामगार, कामगारांची कुटुंबे, गृहिणी अशा सर्व वर्गांसाठी म्हणजेच आपल्यासाठी – धोकादायक आहेत, अशी प्रतिमा माध्यमांतील नॅरेटिव्ह नारायणांद्वारे तयार करायची. आंदोलक, संपकरी हे सामाजिक सौहार्दाचे वातावरणच नष्ट करू पाहात आहेत, असा समज निर्माण करायचा.
२.
मोहॉक व्हॅली सूत्रातील दुसरे सूत्र आहे - आंदोलकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे प्रतिमाहनन. आंदोलनाची शक्यता दिसताच पहिल्यांदा काय करायचे, तर त्यांच्या नेत्यांची बदनामी. ती कशी करायची, हे तमाम नॅरेटिव्ह नारायणांनी दाखवून दिलेले आहेच. आंदोलक १) लोकांना भडकावणारे, पेटविणारे आहेत. २) विकले गेलेले, विरोधकांच्या सांगण्यावरून काम करणारे आहेत. ३) देशद्रोही, जातीयवादी, अराजकतावादी, विध्वंसक आहेत. ४) सोरोसचे एजंट, डीप स्टेट वाले असे म्हटले तर अधिक उत्तम. ५) ते ‘राजकारण’ करतात, असे आपले सतत बोलत बसायचे. आणखी एक खास स्वदेशी गोष्ट. शेतकऱ्यांचे आंदोलन असेल, तर आंदोलक हे शेतकरी नाहीत. विद्यार्थ्यांचे असेल तर ते विद्यार्थी नाहीत, भाडे के टट्टू आहेत, असे म्हणायचे. शिवाय तिथे पाकिस्तानच्या, मुस्लिमांच्या, देशद्रोह्यांच्या समर्थनार्थ घोषणा झाल्या असे व्हिडिओ तयार करायचे. ते तर सर्वोत्तम.
३.
आंदोलक नेत्यांमागे मोजकेच लोक आहेत, हे सातत्याने, वारंवार समाजमनावर बिंबवायचे. मूठभर समाजकंटक उभे राहतात आणि सगळ्या समाजाला वेठीस धरतात, अशा आशयाचे वाक्य अनेक आंदोलनांत आपण ऐकलेले आहे. ते येते या सूत्रानुसारच.
४.
समाजातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, धर्मगुरू, लेखक, बँकर, उद्योजक, व्यापारी अशा विविध घटकांद्वारे आंदोलकांवर विविध मार्गांनी दबाव आणायचा. ऑनलाइन पत्रके काढायची. फेसबुकवर पोस्ट लिहायच्या. ट्विट तर आहेच. त्या सेलेब्रिटींना फार त्रास होऊ नये, म्हणून ट्विट आणि पोस्ट्सचा मजकूरही आयता पुरवायचा.
५.
मोहॉक व्हॅली सूत्रातील आणखी एक महत्त्वाची बाब आहे ती कायदा आणि सुव्यवस्थेची. जोवर एखादे आंदोलन शांततामय मार्गाने चाललेले असते, अहिंसक पद्धतीने चाललेले असते तोवर समोरची बाजू हतबल असते. अशा आंदोलनात नैतिक ताकद असते. असे शांततामय मार्गाने चाललेले आंदोलन कसेही करून हिंसक बनवायचे. यासाठी १) आंदोलकांवर नको नको त्या अटी लावून त्यांना चिडीला आणायचे. २) आंदोलकांच्या नेत्यांवर शाईफेक, चप्पलफेक करून त्यांच्या अनुयायांना रागास आणायचे. ३) आंदोलनस्थळी ‘आपली’ माणसे घुसवून राडे घडवून आणायचे. ४) आंदोलकांच्या मोर्चांना, धरण्यांना वगैरे विरोध करायचा, ऐनवेळी मोर्चाचे मार्ग बदलायचे, त्यांच्या नेत्यांना उचलायचे, असे काहीही करून त्यांच्याकडून हिंसक कृती होईल असे पाहायचे. ५) यानेही नाही जमले तर सरळ पोलिस सोडायचे त्यांच्यावर. आंदोलक त्याने चिडतात. दगडी मारू लागतात. पोलिस जखमी होतात. की बस्स. आंदोलक हे हिंसक आहेत म्हणून त्यांना आणखी झोडपायचे. आणि त्यास कोणी विरोध केला, तर म्हणायचे - कायदा आणि सुव्यवस्था पाहायला नको काय? काय अराजक पसरवायचे आहे काय?
६.
सगळ्या संघर्षाला विरोध करायचा. अन्याय होतोय म्हणून काय झाले, तुम्ही काय व्यवस्थेला जाब विचारणार काय? संघर्ष करणार काय? असे विचारायचे. संप, बंद वा उपोषण हा काही मार्ग नाही. शांततेने चर्चा करून समस्या सोडवली पाहिजे, असे नैतिक नाक उंच करायचे.
७.
आणि अखेर, संप, बंद, आंदोलन हे सारे फसलेले आहे. त्यातले राजकारण उघड पडले आहे. आंदोलकांत फूट पडली आहे, असे तावातावाने मांडायचे. कुजबूजत सांगायचे.
एवढे पुरते.
आज कोणास शंका आहे का याविषयी?
- रवी आमले, फेसबुकवर
मी हा धागा वाचत नव्हतो. एक तर
मी हा धागा वाचत नव्हतो. एक तर तो चालू घडामोडीमध्ये आहे. आणि नेहमीचे प्रतिसाद वाचून आणि लिहून कंटाळा आला होता.
आज सगळा धागा वाचला. मुंबईत दादर - चैत्यभूमीला गेले तीन दिवस आंदोलक जमत आहेत. माझा भाचा सोमवारी तिथे गेला होता. पोलिसांनी त्याला डिटेन करून काळा चौकी पोलिस स्टेशनमध्ये डिटेन केलं. अरेस्ट करतोय, असे सांगितले. मग रात्री उशिरा सोडले. त्यांची माहिती नोंदवून घेतली. तो कालही तिथे गेला होता आणि कदा चित आजही असेल.
आजचे व्हिडियो फेसबुक ट्विटरवर पाहिले. कालच्यापेक्षा आज जास्त गर्दी आहे. दादर स्टेशनमधला घोषणा देत जाणार्या मुलांचा व्हिडियो दिसला.
इथेही पोलिसांची दडपशाही हेच आणखी आणखी मुलांनी , तरुणांनी तिथे येण्याचे कारण आहे. सोमवार - मंगळवारच्या रात्री आंदोलकांना ईमेलने नोटिसेस आल्यात. पोलिस घरी जाऊन त्यांची चौकशी करताहेत किंवा आंदोलन स्थळी जाऊच देत नाहीएत. यात ज्यांचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झालेत, अशाही तरुणी आहेत.
बरं, हे आंदोलन म्हणजे एकत्र येऊन राहणे, घोषणा देणे इतकेच होते. मुंबई पोलिसांनी दिल्ली पोलिसांसारखी मारहाण केली नसली तरी घाबरवण्यासाठी अनेक प्रकार केलेत. त्याचा उलट परिणाम होतोय.
कुठेतरी वाचलं की या आंदोलनाने भीती तरुणांकडून सरकारकडे ट्रान्सफर केली आहे.
दिल्लीत आंदोलक तरुण पोलिसांचं उपरोधिक कौतुक करताहेत, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवताहेत. सोमवारी मार खाल्लेले मंगळवारी पुन्हा आले. त्यातला एक जण पोलिसांना म्हणाला, आज जरा हळू मारा, काल मारलेलं अजून दुखतंय.
जे सोमवारी आले नव्हते ते सोशल मीडियावर दृश्य बघून मंगळवारी आले. यात अगदी इतर राज्यांतूनही आलेत.
महाराष्ट्रातले एक ७८ वर्षांचे डॉक्टर तिथे गेलेत.
हे आंदोलन फक्त नीटपुरतं नाही. आंदोलकांचं म्हणणं ऐकूनच घ्यायचं नाही, त्यांना देशद्रोही ठरवायचं, मग ते चिरडायचं हा सरकारचा पॅटर्न झाला आहे. - सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचीही सरकार दखल घेत नाही म्हटल्यावर तिथे गर्दी वाढू लागली आणि त्यांना किडनॅप केल्याचा तर उलट परिणाम झाला.
आता अनेक राज्यांत - अगदी गुजरातमध्येही आंदोलनं सुरू झालीत आणि ती पक्षीय नाहीत.
गंमत म्हणजे महाराष्ट्र भाजप काँग्रेसच्या ऑफिसांवर आंदोलन करतोय.
सीजेपी आयोजक आणि त्यातल्या मुख्य चेहर्यांबद्दल माझं सुरुवातीला चांगलं असलेलं मत बदलत गेलं. अजूनही तसंच आहे. पण हे आंदोलन आता ऑर्गॅनिक झालं आहे.
राहुल गांधींनी या आंदोलनावर - त्यात झालेल्या पोलिसी अत्याचारांवर आज प्रेस कॉन्फरन्स केली आहे.
जे लोक अजूनही टीव्ही न्युज चॅनेल्स आणि वृत्तपत्रांतल्या बातम्याच वाचत असतील आणि त्यात आलेलंच बरोबर असं मानत आतील - कदाचित बाय चॉइस - त्यांच्यापर्यंत आंदोलनाचं आणि पोलिसी अत्याचारांचं खरं रूप पोचणार नाही.
जेन झी बद्दल कौतुक वाटलं. त्यांचा निर्भयपणा हेवा आणि आपलीच लाज वाटण्याजोगा आहे.
दरम्यान पोलिस ब्रुटालिटीवर
दरम्यान पोलिस ब्रुटालिटीवर सरन्यायाधीश म्हणालेत -dont waste our time . we are not interested in videos . we dont have time to watch.
सोनम वांगचूक यांनी उपोषण
सोनम वांगचूक यांनी उपोषण सोडण्यासाठी दोन अटी ठेवल्या आहेत. एक म्हणजे आंदोलकांवरचे गुन्हे माफ आणि दुसरी म्हणजे संसदेत चर्चा. तर झुरळ पार्टी अजूनही राजीनाम्यावरच ठाम आहे.
आंदोलनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणेच होईल असं काही नाही.
ते जन लोकपाल आंदोलनाच्या
ते जन लोकपाल आंदोलनाच्या वेळचे धागे वर काढा बरं.
या वृद्ध बाई फडणवीस
या वृद्ध बाई फडणवीस गडकरींच्या नागपुरातून खास आंदोलनात सामील व्हायला गेल्यात
https://www.facebook.com/share/v/1BQB7wHmBD/
आता त्या नीटची परीक्षा देणार आहेत का, असं विचारा
असे विचारणाऱ्यांनी सध्या
असे विचारणाऱ्यांनी सध्या तलवार म्यान केली आहे
दुसऱ्यांच्या मनात अल्टरनेट
दुसऱ्यांच्या मनात अल्टरनेट रियालिटी आहे. त्यात ते स्वतःच स्वतःला प्रश्न विचारतात त्याची वाटेल ती उत्तरे देतात आणि त्यातही महत्त्वाचे काही उरले तर गाळून उरलेला कचरा पाहतात मग स्वतःला नोबेल प्राईझ देतात आणि मग तो इकडे टाकतात.
अल्पना तुमचा मुलगा, त्याचा
अल्पना तुमचा मुलगा, त्याचा मित्र यांचे खूप कौतुक वाटते . या वयात इतकी सुजाणता. हॅट्स ऑफ ! या व अशा इतर जेन झी मुलांकडे बघून थोडीफार आशा वाटते .
मोदी, शाह, कायदा मंत्री
मोदी, शाह, कायदा मंत्री मेघवाल यांचे बूट अतिशय घाण असतात. ते चाटून पुसून साफ करण्यात सगळा वेळ जातो.

कुणाचा वेळ जातो ते तुम्हाला कळलंच असेल

https://x.com/BeingSalmanKhan
https://x.com/BeingSalmanKhan/status/2079980444469395837
इडी ची नोटीस लगेच बिळातुन बाहेर. आणि हे इतके लाचार झालेत नरेटिव ला यांची मदत घ्यावी लागतीय
<<<<
<<<<
मोहॉक व्हॅली फॉर्म्युला : आंदोलन दडपण्याची शास्त्रीय पद्धत
>>>>>
छान पोस्ट आहे.
ही पसरली पाहिजे. मी ढकलतो इथे तिथे..
जनतेने आता एक पाऊल पुढे राहायची गरज आहे.
लाठीमाराचं समर्थन करणाऱ्यांनी
लाठीमाराचं समर्थन करणाऱ्यांनी पाहू नये
दिल्ली न्यायालयासमोर वकील
https://www.facebook.com/share/v/1FKr5sPWcn/
खिळे लावलेल्या काठ्या, पेलेट गन्स, इलेक्ट्रीक शॉक. नो वॉर्निंग
खिळ्याचा विडॅइयो आहे
खिळ्याचा विडॅइयो आहे
पण त्यात पोलिस दिसत नाही
https://www.instagram.com/reel/DbDilJfM0wh/?igsh=OXZqcGRvdW1xYnpp
या आंदोलनाबाबत साशंक
या आंदोलनाबाबत साशंक असल्याने सुरूवातीला दोन चार पोस्टसनंतर फिरकलो नाही. इथे बरीच गरमागरमी झाली आहे.
अण्णांच्या आंदोलनांमुळे आता कुठल्याही आंदोलनाकडे शंकेखोर नजरेनेच पाहणार. त्या आंदोलनात केजरीवाल होते. तेव्हांही त्यांनी मंत्र्यांच्या घराला घेराओ घाला असे माईकवरून सांगितले होते. पंतप्रधानांच्या घराला घेराओ घालताना पोलिसांनी अडवले होते. मारहाण झाली का हे माहिती नाही. संसदेला घेराओ घालण्याचा प्रयत्न फेल झाला होता.
इथे केजरीवाल यांच्या पक्षाच्या आयटी सेलचा प्रमुख आहे. त्याच पद्धतीने आंदोलन जात आहे. त्या वेळी काँग्रेस सत्तेत होती. आज भाजप आहे. काँग्रेसने भ्रष्टाचाराचे टोक गाठल्याने लोकांच्यात नाराजी होती. भाजपने ताळतंत्रच ठेवला नाही म्हणून नाराजी आहे.
पण काही प्रश्न आहेत.
किसान आंंदोलन झाले. राकेश टिकैत हे जाट नेते त्या आंदोलनाचे मुखिया होते. आंदोलनात जाटांचा वाटा सिंहाचा होता. प्रत्यक्षात उप्र मधे जाटांनी भाजपला मतदान केले.
जरांगे पाटलांनी आंदोलन केले. भाजपलाच फायदा झाला.
या आंदोलनाfunction at() { [native code] }अ सौरभ दास हा भाजपचा नेता का आहे?
जनलोकपाल कधीच आले नाही. पण आंदोलनातून नेते तयार झाले. या आंदोलनातून असेच होईल का?
हे प्रश्न आहेत. उत्तरं काळ देईल.
मागच्या अनुभवावरून या आंदोलनापासून सुरक्षित अंतरावर आहे. मागच्या वेळीही होतोच.
गेल्या वेळी मायबोलीवर ज्यांनी अण्णांच्या आंदोलनाबाबत शंका घेतल्या होत्या त्यांनी कारणांसहीत लिहीलेले आहे.
१५ वर्षानंतर कुणीfunction at() { [native code] }अरी शंका घेण्याची प्रोसेस काय असे खुसपट काढटाfunction at() { [native code] }अ. त्यांनी ते धागे वाचले पाहीजेत. डीक्युमेंटेशनच आहे ते.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbDYIMBhPIx/?igsh=bjhjYTNnOW12MGY3
यांनी छान लक्षणे सांगितली आहेत अंधभक्त असण्याची.
जे नाही आहेत त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा आणि सावध राहा.
एकदा ओळखल्यावर शेवटचा सल्ला सुद्धा ऐका
त्यांच्याशी वाद घालू नका. दूर राहा.
https://x.com/i/status
https://x.com/i/status/2079470047039520894
खिळ्यांचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ . पोलिसांचे चेहरे बघण्यासारखे होते. गोदी मीडिया असती तर हा व्हिडिओ गायब झाला असता.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DbDfpcIMNwt/?igsh=N2ZpdWNjYXRzNGVw
महिलांशी गैरवर्तनाचे कित्येक घटना नजरेस पडत आहेत.
फारच वाह्यात प्रकार झाले आहेत.
या बदल्यात कुठे कुठे पलटून पोलिसांना उलटा मार पडला असेल तर ते स्वाभाविकच वाटत आहे. व्हिडिओ बघून चीड येते तर समोर असे घडताना बघून रक्त का नाही उसळणार. मला तर असल्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्यांची सुद्धा आता चीड येऊ लागली आहे.
https://x.com/i/status
.
काल परत आंदोलक आणि पोलीस
काल परत आंदोलक आणि पोलीस यांच्यात राडा झाला. पोरांणी पालिसांना झोडपून काढल्याच्या रील्स फिरत आहेत.
आजच्या फ्री प्रेस जर्नल मधली
आजच्या फ्री प्रेस जर्नल मधली बातमी.
आणि आता मला श्रेयवाद, भक्ती इत्यादी न वापरून एका प्रश्नाचे उत्तर द्या.
आंदोलन झाले, बढिया झाले, तरुणाई जागी झाली त्याहून बेस्ट, नीट म्हणता म्हणता बाकी सगळे मुद्दे आले, चालतंय, पोरांची ईच्छा असेल ती आणि हे असताना जर मी आंदोलनाकडून accountability मागितली तर मी चूक असेन का ?
सरकारला विचारलं का ? माझी अक्कल किती ? पोरांनी केले ते विचारणारा तू कोण ? इत्यादी वापरून मला कॅन्सल न करता साधे एक उत्तर मिळाले तर आनंद होईल.
आंदोलकांकडून accountability ची अपेक्षा करणे चूक असेल का ?
(No subject)
जेम्स तुम्ही जो प्रयत्न करताय
जेम्स तुम्ही जो प्रयत्न करताय तो तुम्ही मिळालेल्या पैश्याला अकाउंटेबल राहून करताय या बद्दल तुमचे अभिनंदन.
झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही त्यामुळे तुम्ही उत्तर समजून घ्याल ही आशा नाही. तुम्ही जो ऑप्टिक्स तयार करायचा प्रयत्न करताय त्याचे निराकारण करणे गरजेचे.
तुम्हाला समजेल असे उदाहरण देतो. तुम्ही घरात एक चौकीदार ठेवलाय तुम्ही विश्वासाने त्याला नेमले आहे. तोच चौकीदार एक दिवस तुमच्या १० वर्षांच्या मुलीचा विनयभंग करायचा प्रयत्न करतोय. तुम्ही ते पाहून विरोध करायला जाताय तो तुम्हाला लाठीने मारहाण करतो त्यामुळे तुम्ही चिडून त्याला बेदम मारहाण करता. यात त्याला मारण्या आधी तुम्ही तुमची किती मारायची अकाउंटेबिलिटी आहे ह्याचा हिशोब मांडणार का न्याय करणार?
या मुलांचे भविष्य अंधकारमय झालेय. वारंवार होतेय. जे करतायेत ते त्यांच्याकडे दुर्लक्ष करतायेत. वर त्याना मारहाण करतायेत. आणि तुम्ही त्यांच्याकडे अकाउंटेबिलिटी हिशोब मागताय?
धर्मेंद्र प्रधान सारखा माजलेला रेडा पेपर चेक करायच्या टेंडर मध्ये पैसे खाऊन बसलाय. स्वतःची मुलगी परदेशात शिकवतोय आणि इथल्या मुलांच्या भविष्याशी खेळतोय त्याची अकाउंटेबिलिटी मागून पहा तिकडेच तुम्हाला हाकलून देईन तो.
तुमच्या इतके लाचार सर्व जण नाहीत हे या देशाचे नशीब आहे. हिंदू धर्मात भिक्षा मागून पोट भरण्याचा राजमार्ग उपलब्ध आहे. समाजावर कृपा करून तो घ्या.
@चिडकू
@चिडकू
अतिशय शांतपणे सांगतोय, मला कॅन्सल करून काहीही मिळणार नाही त्यामुळे माझ्यावर ही असली शिक्क्यांची नक्षी मारणे बंदच करा.
मला कुठलेही ऑप्टिक तयार करण्यात अजिबात रस नाही, पण for posterity जर उद्या हे प्रश्न आलेच तर उत्तरे काय द्यायची ह्याचा एक विचार डोक्यात आला आणि त्या अनुषंगाने मी मांडणी केली, करतो आहे.
मी भीक मागून खायचं का कमवून हे माझं वैयक्तिक जीवन झालं पण एकंदरीत दरवेळी vindicative स्टेटमेंट करून मला टार्गेट करण्याचा किंवा भक्त म्हणून राईट ऑफ करण्याचा प्रयत्न तुम्ही पण बंद करा ही नम्र विनंती.
वर त्याना मारहाण करतायेत. आणि तुम्ही त्यांच्याकडे अकाउंटेबिलिटी हिशोब मागताय?
Accountability शब्द अस्थानी वाटत असेल तर मी माझ्या प्रश्नाची पुनर्बांधणी करतो. एखाद आंदोलन म्हणले का ते एखाद नेता किंवा नेतृत्व समूह लीड करतो. ह्या बाबतीत ते नेतृत्व दिपके, सौरव दास आणि विजेता दहिया होते. आंदोलनाचे सुरुवातीचे सपोर्ट जर एकमेकांच्या friction मध्ये आले तर ते आयते कोलीत असते भक्तांना/ सत्तेला. In such cases and during critical times of the agitation असे friction मूळ मुद्द्यावरून लक्ष भटवकू शकतात आणि ते नेमके होते आहे असे दिसते, त्यामुळे आंदोलनाला समर्थन देणारा किंवा तुम्ही जे धर्मेंद्र प्रधानला लिहिले आहे त्यात अजून चार पाच सुंदर संस्कृत शब्द जोडून भावना असणारा म्हणून जर माझी फिलिंग असली की बुवा दहियाने ट्विटर वर व्हिडिओ टाकून जे मी दीपकेला defend केले मला वाटले तो मला करेल इत्यादी इत्यादी बोलला आहे त्यावर दीपकेने किंवा सिजेपीने काही तरी mitigating ऍक्शन करून हे वादळ पेल्यात शमवावे आणि फोकस कायम ठेवावा किंवा तो हलवण्याचा विरोधकांचा ठेका मोडावा तर ते चूक कसे ?
परत एकदा शांतपणे सांगतो, मी भक्त नाही, माझ्यालेखी ती एक शीवी आहे आणि ती तुम्ही मला देऊ नये.
तुम्ही जालावर आल्यानंतर वितंडवाद घालायला विकिपीडिया वर वॉल्टेयर वाचला असेल, मी त्याची नाटके आणि मानवेंदनाथ रॉय (नाव ऐकले नसेल तर सर्च करा) वाचून मोठा झालो आहे. डोक्यात प्रकाश पडला तर पहा.
*निमित्त* *"प्रधाना’चं, पण
*निमित्त* *"प्रधाना’चं, पण खरं* *लक्ष्य ‘राजाच' !*
- भगवान दातार
bhagwandatar@gmail.com
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निमित्त करुन झुरळ पार्टी चा असा अचानक उद्रेक का झाला याचं एक वेगळंच विश्लेषण समोर आलं आहे. मूळ इंग्रजी पोस्टचा हा थोडा स्वैर मराठी तर्जुमा.
पोस्ट फॉरवर्ड होऊन आली असल्याने मूळ लेखक कोण हे समजलं नाही. पण मराठी वाचकांसाठी ती मुद्दाम देत आहे. शीर्षक आणि कन्क्लूजन अर्थात माझं.
दिल्लीत झुरळ पार्टीचं नुकतंच आंदोलन झालं. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते झालं असं म्हटलं जातंय.
समजा प्रधान यांचा राजीनामा मागणं क्षम्य धरलं तरी त्यासाठी एवढा आटापिटा आणि अट्टाहास कशासाठी ?
अगदी बोस्टन, जर्मनीमधून ही मागणी लावून धरली जावी आणि तीही आत्ताच , जून २०२६ मध्ये ? यामागचे कारण काय आहे ?
या मागणीचा पेपर फुटीशी काहीच संबंध नाही हे सत्य आहे. पेपरफूट हे निमित्त आहे.
शिक्षणात गुंतलेला पैसा हे याचं मूळ कारण आहे.
शिक्षणमंत्री प्रधान यांच्या टेबलवर सध्या तीन महत्वाचे विषय निर्णयासाठी पडून आहेत. येत्या एक दोन महिन्यात म्हणजे जुलै - ऑगस्ट मध्ये हे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
या निर्णयांमुळे संपूर्ण शिक्षण पद्धतीतच अमुलाग्र बदल होणार आहेत. हे निर्णय पुढील प्रमाणे -
१ ) NCERT
इयत्ता ९ वी ते १२ वी साठी आता नवी पाठ्यपुस्तके येणार आहेत.
गणिताच्या नव्या अभ्यासक्रमात वैदिक सूत्रांचा समावेश होणार आहे.
यातून आतापर्यंत जगाने लपविण्याचा प्रयत्न केलेली गोष्ट भारतीयांना कळेल. ती म्हणजे गणित भारतात जन्मले. गणित हा विषय भारताचा आहे.
युरोपला गणिताची ओळख झाली त्याआधी शेकडो वर्ष भारतात गणित माहित होते. गणितात भारताने आश्चर्यकारक प्रगती केली होती.
२ ) आर्य अन्य देशातून भारतात आले ही कथा आता अभ्यासक्रमातून हद्दपार होणार आहे. सिंधू - सरस्वती संस्कृती आता अभ्यासक्रमातून ठासून मांडली जाईल.
भारताचा खरा इतिहास आता शिकवला जाईल.
३) CBSE ने नुकतेच एक परिपत्रक काढले आहे. त्यानुसार आता ९ व्या वर्गापासून त्रिभाषा सूत्र लागु केले जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याला आता कोणत्याही दोन भारतीय भाषा शिकणे अनिवार्य असणार आहे.
४) के. राधाकृष्ण समितीने NTA परीक्षेसाठी काही सुधारणांची शिफारस केली आहे. त्यानुसार आता परीक्षांचे विकेंद्रीकरण होणार आहे.
तंत्रज्ञानावर सर्वाधिक भर असणार आहे.
आता चूक किंवा मानवी हस्तक्षेपाला जागा राहणार नाही.
या तिन्ही गोष्टी प्रत्यक्षात आल्या तर कोणाचे नुकसान होणार आहे ?
उत्तर स्पष्ट आहे-
१ - हार्वर्ड
२ - SOAS , लंडन.
३ - कोलंबिया
४ - शिकॅगो
या व्यवहारात सुमारे ५०० दशलक्ष डॉलर गुंतलेले आहेत.
यानंतर येतात ती परदेशी विद्यापीठे. इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया मधली.
ही विद्यापीठे भारतीय विद्यार्थ्यांकडून दरवर्षी ३.८ बिलियन डॉलर्स कमावतात. सुमारे १.८ मिलियन भारतीय विद्यार्थी या विद्यापीठातून शिक्षण घेत असतात.
जर भारतातली शिक्षण पध्दती पूर्णपणे भारतीय झाली, आत्मविश्वास वाढला व स्वगुणांची ओळख झाली तर या विद्यापीठांकडे जाणा-या पैशांचा ओघ आटेल.
त्यानंतर कोचिंग क्लासेस चा विषय येतो. हा आता फार मोठा उद्योग झाला आहे. कोचिंग क्लासेसमध्ये ५८००० कोटी रुपये गुंतलेले आहेत. २०२८ पर्यंत हा आकडा १,३३,९९५ कोटी रुपयांपर्यंत पर्यंत जाईल असा अंदाज आहे.
इंग्रजीच्या अतिप्रभावामुळे हे घडत आहे.
जर NTA. चे विकेंद्रीकरण झाले, भारतीय भाषांचा विकास झाला तर यातील आर्थिक गुंतवणुकीला हादरा बसेल. त्याची झळ पुढील संस्थांना बसेल.
Allen.
Aakash.
FIITJEE.
BYJU'S.
Resonance.
Drishti IAS
आणि अन्य हजारो कोचिंग क्लासेस.
जागतिक गुंतवणूकदारांनी या उद्योगात अक्षरशः हजारो कोटी रुपये गुंतवले आहेत.
ही गुंतवणूक काही कुठल्याही धर्मादाय कारणाने केलेली नाही, किंवा देशभक्तीने प्रेरित होऊन भारतीयांचे कल्याण व्हावे म्हणून केलेली नाही.
केवळ पैसा कमविण्यासाठीच ती केलेली आहे. गुंतवणूकदारांना त्यातून दामदुप्पट नफा हवा आहे.
या ठिकाणी NGO चा प्रवेश होतो. NGO चे जाळे अतिशय विस्तारलेले व पक्के आहे. त्यातून सुटणं कठीण आहे.
शिक्षण , त्याला मिळणारे अनुदान आणि कोचिंग यातून मिळणारा पैसा तोपर्यंतच मिळत राहील जोपर्यंत भारत बौध्दिकदृष्ट्या परावलंबी राहील.
शिक्षणातही भारताला आत्मनिर्भर करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे.
त्यादृष्टिने नवी शिक्षण नीती आकाराला येत आहे.
जर मुलांना त्यांचा खरा इतिहास शिकवायला सुरुवात केली तर सगळंच चित्र बदलेल. त्यामुळे या इकोसिस्टिमचा श्वास घुसमटायला लागला आहे.
परदेशातून मिळणा-या मदतीवर हे नॅरेटिव्ह चालू आहे.
हा निधीचा प्रवाह कधीही रोखला जाऊ शकतो.
यात गुतलेल्या पैशांचा सर्वसाधारण, वरवर अंदाज बांधला तरी ३ लाख कोटी त्यात गुंतले असल्याचे लक्षात येईल.
म्हणजे ३५ बिलियन डॉलरहून जास्त.
नव्या शिक्षण पध्दतीमुळे ही सगळी गुंतवणूक धोक्यात आली आहे.
त्यामुळे या उद्योगासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली आहे.
हे सगळं जाळं उद्ध्दस्त करायचं मोदींनी ठरवलय.
खरा विरोध त्याला आहे.
त्यामुळे त्यांच्या मानहानीच्या मीम्सना ऊत आला.
त्यामुळेच आंदोलनाचे नेते ६ जूनला भारतात उतरले.
झुरळ आंदोलक त्याच दिवशी दिल्लीत एकवटले.
नवं शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी. नवं धोरण लागु होण्यापूर्वी.
एकदा ते लागु झालं की मग मागे घेतलं जाणं कठीण आहे या सगळ्यांना माहित आहे.
म्हणून तर हा गोंधळ उडवून देण्याचा डाव आहे. भारताची सगळी शिक्षण पध्दती व यंत्रणा कुचकामी आहे असं चित्र निर्माण करण्याचा हा डाव आहे.
धर्मेंद्र प्रधान राहतील की नाही हा वेगळा मुद्दा आहे. पण प्रधान हे निमित्त आहे.
खरी लढाई धोरणाविरुध्द आहे.
त्यासाठी ही झुरळं अशी एकदम तुरुतुरु धावायला लागली.
त्यांचा फज्जा उडाला ही गोष्ट वेगळी. पण डाव तर त्यांनी मोठा छान टाकला होता.
गरीब भारतीय जनता फक्त वृत्तपत्रातले मथळे आणि वृत्तांत वाचण्यात दंग आहे. खरी लढाई कशासाठी चालू आहे याची बहुतेकांना गंधवार्ताही नाही. हे सर्व कशासाठी आणि का होतय!
निमित्त ‘प्रधाना’चं आहे, पण ‘राजा’ हेच खरं लक्ष्य आहे….
*जय रामकृष्ण हरि*
सुमीत यांचा धागा बंद पडला.
सुमीत यांचा धागा बंद पडला. तिथे ही बातमी आणि क्लिप द्यायची होती
https://www.instagram.com/p/DbHwi4mga7O/
मुंबई पोलिस - मैं डायरेक्ट ५०-५० ग्राम पावडर डाल देगा तुम्हारी जेब में
समीर वानखेडे यांची NCB मधून बदली काय झाली, मुंबई पोलिस ड्रगजचा धंदा करू लागले?
https://www.instagram.com/p/DbGxCTDkj2-/?img_index=1
बजरंग दल, गोरक्षक - सिव्हिल कपड्यातले पोलिस ( गुंड) कुठून आले असं लोक विचारत होते. ते पोलिसवालेच होते. आता आम्ही आलो आहोत. खरी गुंडगिरी काय असते, ते आम्ही दाखवतो तुम्हांला
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांच्या शिरपेचांत मानाचे तुरे
@आशुचॅम्प सकाळी सकाळी हे
@आशुचॅम्प सकाळी सकाळी हे कुठले बृहस्पती तुमच्या (का तुम्ही त्यांच्या) राशीला लागले म्हणायचे ?
ह्या च्युXला सांगा तुमच्या प्रिस्ट किंगने विद्यापीठे बांधली असती तर आज हे दशलक्ष, अब्ज इत्यादी भारतात राहिले असते.
दुसरे म्हणजे, संसदेत बसणाऱ्या ८०% लोकांनी जी स्वतःची "deemed University" नावाची पैसा छापण्याची यंत्रणा बनवून ठेवली आहे तिच्यावर आजपर्यंत ह्यांनी काय केले ?
निश्चलनीकरण करून म्हणे दहशतवादाचे कंबरडे मोडले. असेच जर शिक्षणावरचा सकल घरगुती उत्पन्नातला टक्का वाढवला असता खर्चात तर कशाला आंदोलने होतायत !
शिक्षणमंत्री प्रधान यांच्या
शिक्षणमंत्री प्रधान यांच्या टेबलवर सध्या तीन महत्वाचे विषय निर्णयासाठी पडून आहेत. येत्या एक दोन महिन्यात म्हणजे जुलै - ऑगस्ट मध्ये हे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.>> त्यावर त्यांच्यानंतर येणारा मंत्री निर्णय घेऊ शकत नाही?
माहितीसाठी विचारलं.
Pages