Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जेम्स हि कसली फँटसी आहे तुमची
जेम्स हि कसली फँटसी आहे तुमची? नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे छाप. क्रेडिट कुणाला मिळतंय किंवा त्यावरून कुणी भांडतय म्हणून आम्ही चांगलं करणार नाही. इतक्या कद्रू वृत्तीने जर सोसायटीचे राजकारण केले तरी लोक जिन्यात ब्लॅंकेट टाकून पडी घेतात तुम्ही देशाचे राजकारण करायला निघालात.
आयटी सेल वाल्याना आवाहन आहे कि तुम्हाला ज्या अर्ग्युमेंट च्या मेथड शिकवल्यात त्या अत्यंत प्राथमिक शाळा चौथी पास लेव्हल आहेत. तुम्ही त्यांना विनंती करा कि आम्हाला सायंटिफिक मेथड चे ट्रेनिंग द्या. पण ते तुम्हाला देणार नाही कारण मग तुम्ही त्यांच्या अर्ग्युमेण्ट मधला मूर्खपणा उघड कराल. तुम्ही पण एन्लायटन व्हाल. हिंदू धर्माचे अध्यात्म संस्कृत येत नसेल तर ज्ञानेश्वर तुकाराम साध्या भाषेत आहेत. वाचा कधीतरी. उगाच सकाळी उठायचे व्हाट्सएप ग्रुप वर देतात टाकून ते पण आज काल चॅट जिपीटी फ्री प्लॅन वापरून हॅलुसीनेट झालेलं पण काळत नाही अश्या लोकांना तुम्ही तुमचे मॅनेजर केलय. आंदोलन करा जाऊन आणि तुमचा जो पदोपदी अपमान होतोय तो तरी बंद होईल. इतक्या वाईट परिस्थितीत मल्टीलेव्हल मार्केटिंग वाले किंवा कोल्ड कॉलिंग वाले पण काम करत नाही. कितीही पैसे दिले तरी.
जेम्स हि कसली फँटसी आहे तुमची
जेम्स हि कसली फँटसी आहे तुमची?
माझी कुठलीच फॅन्टसी नाही, किंवा मला राजकारण देशाचे करण्यात पण रस नाही. भक्ती करण्यात तर त्याहून नाही, social media वर क्रिएट होणारे ट्रेंड/ ऑप्टिक्स इथे फक्त डॉक्युमेंट करतोय. परत सांगतो
जे काही सुरू आहे ते अतिशय नीच आहे ह्यावर माझा वाद नाही, फक्त श्रेयवादी धुळवडीत पोरांचे वाईट होऊ नये म्हणून cautious आहे मी इतकेच.
बाकी मला आयटी सेल मधे वर्ग करणे इत्यादी काय ! ठीकच आहे, भक्तीभाविक कोडगेपणा नसला अंगात तरी जालीय शेलकेपणा अंगाला लावून न घेण्याइतका वैयक्तिक कोडगेपणा तर अंगात आहेच.
बाकी, कसंय राजकारण/ चळवळ/
बाकी, कसंय राजकारण/ चळवळ/ आंदोलन इत्यादींत अभ्यास करताना समकालीन घटना/ आंदोलने पाहताना विश्लेषण करताना ऐतिहासिक आंदोलने पण लक्षात घ्यावीच लागतात.
इंडिया अगेन्स्ट करपशन मध्ये भाजप अशीच शिरली होती, त्यावेळी करून झाले होते आमचे हे सगळे सवत रंडकी होईल अन् सोसायटी भांडणे इत्यादी लॉजिक !
पुढे काय काय झाले अन् होते आहे ते बघतोय की सगळेच ! सुषमा स्वराज फेर धरून नाचली होती की त्या आंदोलनात ढोलकीच्या तालावर ठेका घेऊन !
तुम्ही विसरले असाल, किंवा त्याकाळी अल्लड वयाचे असाल मी नाही.
"दीपक आप आय टी सेल मध्ये काम
"दीपक आप आय टी सेल मध्ये काम करत असे " हे असं लिहिलंय कि आप नव्हे जैशे मोहम्मद मध्ये काम करत होता
तो राघव चड्ढा आणि त्याच्याबरोबर आणि टोळी भाजपने चढवून घेतलीय ती पण आप ची होती हे सोयीस्कर विसरले डॉक्टर .
जंतर मंतर सोडून पावसाळी
जंतर मंतर सोडून पावसाळी सत्राच्या पहिल्याच दिवशी संसदेवर चालून जायचं आमंत्रण कुणी दिलं होतं?
पोलिसांवर दगडफेक करणारे काय नीटचे विद्यार्थी होते?
पोलीस खात्यातील लोक सुद्धा गरीब घरातीलच असतात. अडाणी अंबानींची पोरं कॉन्स्टेबल म्हणून जात नाही.
११८ पोलिस जखमी आले ते काय आपसात मारामारी करून?
त्यांच्या वर हल्ला करणारे कोण आहेत नीटचे विद्यार्थी का
संसदेत प्रवेश करून याना काय हवं होतं?
पोलिसांनी किमान बळाचा वापर करून त्यांना थांबवलं यात काहीही चूक नाही. त्याबद्दल पहिल्यापासून आरडाओरड करायचं ठरवलेलंच होतं. ट्रक भरून दगड काय पोलीस घेऊन आले होते? पोलिसांवर फेकलेले दगड ते परत फेकणारच. का त्यांनी गोळ्या घालायला हव्या होत्या?
इथे १८ वर्षाखालील मुले असतील तर त्यांच्या आईबापाची जबाबदारी नव्हती का त्यांना सांगणे कि बेकायदेशीर कृत्य केल्यास आयुष्यभराचे नुकसान होऊ शकेल आणि जर ते १८ वर्षावरील असतील तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी त्यांची नाही का?
केवळ त्यांना मारहाण झाली म्हणून आवाज उठवताय? पोलिसांनी काय करणे अपेक्षित आहे?
याचं उत्तर नाही.
केवळ धुळवड खेळायची म्हणून माझ्या वर काहीही आरोप करणार्यांनी आत्मचिंतन करून पाहावे. ( अर्थात ग्यांच्याकडून ती अपेक्षा नाहीच).
सार्केन आंदोलनाच्या अगोदरच सवोच्च न्यायालयात काय शपथपत्र दाखल करून सांगितलंय ते दुव्यासकट दिलंय. ते तम्ही वाचणार नाही हि खात्रीच होती.
फार जळजळ होते आहे त्याला काही इलाज नाही. अगदी खालच्या पातळीवर उतरून टीका करताय त्यावरून हे सिद्ध होतंच आहे _
पटना मध्ये प्रदर्शन सुरु आहे
पटना मध्ये प्रदर्शन सुरु आहे. बघतो आहे.
केवळ त्यांना मारहाण झाली
केवळ त्यांना मारहाण झाली म्हणून आवाज उठवताय>>>
केवळ???? अरे आंधळ्या जरा नीट बघ ते व्हिडिओ
ही जर केवळ मारहाण असेल तर भेटूया एकदा खणा नारळाने ओटी भरतो
एका मुलीच्या अयोग्य ठिकाणी काठी खुपसून मारताना चा व्हिडिओ आहे
बघितलास??
भाजपचे भाडोत्री गुंड देखील मारहाण करत होते ते बघितलास
लाज बाळग रे जरा तरी आयुष्यात
पण हे सगळे बघायला CJI ला
पण हे सगळे बघायला CJI ला वेळ नाही.
असे श्री सूर्य कांत म्हणाले!
बरोबर आहे त्यांनीच सुरू केलाय
बरोबर आहे त्यांनीच सुरू केलाय सगळा राडा कोक्रोच आणि परासाईत बोलून आता कशी बरे बाजू घ्यावी
सगळंच अवघड जागेचे दुखणे होऊन बसलंय
ट्रक भरून दगड काय पोलीस घेऊन
ट्रक भरून दगड काय पोलीस घेऊन आले होते?>> म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की दिल्लीच्या सगळ्यात जास्त सिक्युरिटी असलेल्या ठिकाणी, कुठे एरवी सुद्धा साधा ट्रक जावू शकत नाही तिथे चक्क दगड भरलेला ट्रक आंदोलनाच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी आंदोलक घेवून गेले आणि पोलिसांना कळलं सुद्धा नाही? नक्की दिल्ली पोलिसच आहेत ना हे? इतके अकार्यक्षम? आणि त्याभागात तर एरवीसुद्धा पोलिसांखेरीज राखीव दलाचे जवान पण असतात. त्यांना पण कळलं नाही आख्खा ट्रक तिथे आलेला?
अहो, पोलिसांनी तिथे मुलांना आधी जावू देवून मग परतीचे रस्ते बंद केले होते. डीटीसी बसेस वापरल्या होत्या रस्ते बंद करायला. चक्क कोंडून बाहेर पडू न देता मारत होते किंवा अश्रुधूर फेकत होते. आणि हो हे कुठले व्हिडिओ बघून नाही सांगत आहे मी. माझ्या १८ वर्षाच्या मुलाचा ( नुकताच महिनाभरापूर्वी १८ चा झालाय, चुकून १७ लिहिलं होतं ते एडिट केलं) आणि त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या साडेसतरा वर्षांच्या मित्राचा अनुभव सांगतेय.
आशुचॅम्प, यांना कितीही सांगितलं तरी बहुतेक फरक पडणार नाही. कशाला तुमचा वेळ घालवता आहात.
मी सुद्धा आत्ता लिहिलं आहे, परत परत लिहित बसणार नाही.
17 वर्षाच्या मुलाला अशा
17 वर्षाच्या मुलाला अशा ठिकाणी घेऊन जाणे कितपत शहाणपणाचे आहे हे मी आपल्या तारतम्यावरच सोडतो.
संसदेवर चालून जाणे या साठी जर देशद्रोहाचे कलाम पोलिसांनी लावले तर मुलाच्या आयुष्याचे नुकसान होऊ शकते.
Waging war against nation हे अत्यंत घातक कलम आहे. सामान्य माणसांसाठी कपिल सिब्बल अभिषेक मनू सिंघवी सारखे वकील उभे राहत नाहीत.
पोलिसांवर दगडफेक करायला त्या
पोलिसांवर दगडफेक करायला त्या भागात दगड कुठून आले? हे शोधून काढा!
पातळी सोडून दिलेल्या
पातळी सोडून दिलेल्या प्रतिसादाना फाट्यावर मारलेले आहे!
आशुचॅम्प, यांना कितीही
आशुचॅम्प, यांना कितीही सांगितलं तरी बहुतेक फरक पडणार नाही. >>
खरंय अत्यंत निर्लज कोडगा आहे हा खरे, हात पाय डोकं सगळं टेकलं याच्यापुढे
पोलिसांवर दगडफेक करायला त्या
पोलिसांवर दगडफेक करायला त्या भागात दगड कुठून आले? हे शोधून काढा!>>>
तुझ्या गुप्त सोर्सेस ने सांगितलं नाही का तुला
आश्चर्य आहे
साध्या वेशातील नक्की पोलिसच
साध्या वेशातील नक्की पोलिसच होते की अजून दुसरच कोण होते? लाठीच्या लांबीवरून बहुतेक अर्धी चड्डीवालेच असण्याची शक्यता आहे. कसं शोधायचं बरे...
जंतर मंतर सोडून पावसाळी
जंतर मंतर सोडून पावसाळी सत्राच्या पहिल्याच दिवशी संसदेवर चालून जायचं आमंत्रण कुणी दिलं होतं?>> आंदोलनाला आमंत्रण लागतं? सत्र बरखास्त झाल्यावर जायला हवं होतं का?
पोलिसांवर दगडफेक करणारे काय नीटचे विद्यार्थी होते?>> हा रचलेला बनाव नाही ह्याची खात्री आहे?
पोलीस खात्यातील लोक सुद्धा गरीब घरातीलच असतात. अडाणी अंबानींची पोरं कॉन्स्टेबल म्हणून जात नाही.>> ती मुलं नीट तरी कुठे देतात?
११८ पोलिस जखमी आले ते काय आपसात मारामारी करून?>> तो आकडा सरकारने दिला आहे. जखमी आंदोलनकर्त्यांचा खरा आकडा दिलाय?
त्यांच्या वर हल्ला करणारे कोण आहेत नीटचे विद्यार्थी का>> आंदोलनात विद्यार्थी आणि त्यांच्याबद्दल कणव असणारे लोकं असायची शक्यता नाहीय का?
संसदेत प्रवेश करून याना काय हवं होतं? >> जंतर मंतर वर त्यांना कुणी भेटलं असतं तर ते नसते गेले संसदेपर्यंत.
पोलिसांनी किमान बळाचा वापर करून त्यांना थांबवलं यात काहीही चूक नाही. >> तो किमान बळाचा वापर होता?
त्याबद्दल पहिल्यापासून आरडाओरड करायचं ठरवलेलंच होतं. ट्रक भरून दगड काय पोलीस घेऊन आले होते? >> शक्यता तीच जास्त आहे.
पोलिसांवर फेकलेले दगड ते परत फेकणारच. >> वाचली होती लहानपणी माकड आणि टोपीवाल्याची गोष्ट.
का त्यांनी गोळ्या घालायला हव्या होत्या?>> हे होण अशक्य नाहीय.
इथे १८ वर्षाखालील मुले असतील तर त्यांच्या आईबापाची जबाबदारी नव्हती का त्यांना सांगणे कि बेकायदेशीर कृत्य केल्यास आयुष्यभराचे नुकसान होऊ शकेल आणि जर ते १८ वर्षावरील असतील तर स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी त्यांची नाही का?>> सगळी जबाबदारी कोवळ्या मुलांनी घ्यायची आणि निवडून आलेल्यांनी काय फक्त परदेश दौरे करायचे?
केवळ त्यांना मारहाण झाली म्हणून आवाज उठवताय? >> नको उठवायला?
पोलिसांनी काय करणे अपेक्षित आहे?>> गृहमंत्री आहेत ना त्यांनी काय करायचं ते सांगायला.
याचं उत्तर नाही.>> पेपर सोडवायचा प्रयत्न केलाय.
Waging war against nation>>>>
Waging war against nation>>>> अरे मोदी म्हणजे राष्ट्र नव्हे.
अरे मोदी म्हणजे राष्ट्र नव्हे
अरे मोदी म्हणजे राष्ट्र नव्हे.>>>
हे त्याच्या डोक्यात शिरणार नाही कधीच
होप्लेस केस आहे
मायबोलीवर खाजवून खरुज
मायबोलीवर खाजवून खरुज वाढवायचे काम खरजेचा किडा करतोय. सावध रहा.
पटना मध्ये उग्र निदर्शने चालू
पटना मध्ये उग्र निदर्शने चालू आहेत.
20th July, 2026.
20th July, 2026.
For the ones sitting in there rooms and stating that “the students deserved this”, I hope you reconsider your values and ethics in life.
I hope that the same system that you are blindly supporting fails you so bad one day that you’ll have nowhere to go.
Me and @aayam.depuri, reached the site around 8:25 AM, the jammers were already there and even more were being placed.
“Vande Mataram, Bharat Mata Ki Jai, Dharmendra Pradhan Istifa Do” — these slogans echoing everywhere. The crowd was split into groups due to the jammers causing miscommunication and therefore large scale different groups started protesting and marched towards the Sansad.
Around 11 AM, the first lathi charge emerges, people panic, students brutally injured, women stripped off, old aged people beaten, children injured, and what not.
You would get beaten up even if you were standing on the sidewalk doing nothing. Tear gas bombs everywhere. The forces treated the students like terrorists.
A tear gas bomb literally exploded on my right side not even a metre away, thankfully the crowd did not panic and rather acted wisely. On our search for a safe spot, we found the Indian Youth Congress office and were ensured not once but multiple times that we are safe here along with more than 50+ protesters.
An hour and a half passes by, the police shoots 3 tear gas bombs inside the residence and we were suffocated inside the room and trapped there but thankfully there was a backdoor and we escaped.
The situation started getting worse, we see females being beaten up, molested via officers, children being treated like animals, disrespectful statements by the officers.
We saw some ladies so traumatised that they probably developed a mental disorder because of the highly intense circumstances and were walking saying “humko mat maro please” even when there was no one nearby.
The police does not care, the government is afraid and idk why are people still speaking against the movement.
But this is all.
This was on insta story by Dev Sharma. आयाम चा साडेसतरा वर्षाचा मित्र जो त्याच्यासोबत परवा तिथे होता. देव लोअर मीडल क्लास घरातला मुलगा आहे. त्याच्या वडिलांचे केबल टीव्ही चे काम आहे. शाळेत स्टुडंट कॉन्सिल चा प्रेसिडेंट होता. खूप चांगला रॅपर आहे. स्वतःच्या पुढच्या शिक्षणासाठी म्हणून सध्या एक वर्ष गॅप घेवून ट्युशन घेवून पैसे जमा करतोय. CUET मधल्या स्कोअर वर दिल्लीतल्या कोणत्याही टॉप कॉलेजात प्युअर सायन्स ला प्रवेश मिळेल इतका हुशार मुलगा आहे हा.
पोलिसांवर पेप्पर स्प्रे कुणी
पोलिसांवर पेप्पर स्प्रे कुणी केला?
संसदेवर चालून जाणार हे अमेरिकी लोकांना कसं माहिती झालं की त्यांनी अमेरिकी नागरिकांना सावध राहण्यासाठी 5 दैवस अगोदरच चेतावणी दिली होती.
हे सर्व संपूर्ण सुनियोजित होतं.
काहीही करून सरकारला संकटात आणायचं.
सरकारला जाब विचारणे एक गोष्ट आहे आणि संसदेवर चालून जाणं वेगळं आहे.
तेथे असणार्यांपैकी बहुसंख्य विद्यार्थी नाहीतच. बरेचसे बाहेरून आलेले/ आणलेले आहेत. त्यांच्या पोटापाण्याचा खर्च कोण करतंय.
एक माणसाच्या कचोरी बिर्याणी चहा नाश्ता जेवणाचा खर्च 400 रुपये रोज धरला आणि रोजचे 3000 लोक तेथे आहेत हे गृहीत धरले तर 12 लाख रुपये रोज कोण खर्च करतंय?
हे काही कोणी विद्यार्थी करत नाही!
370 परत लागू करा सारख्या घोषणा देणारे कोण लोक आहेत?
आंदोलनकर्ते कोण आहेत हे लक्षात आल्यावर श्री सोनम वांगचुक यांनी त्यातुन बाहेर पडायचे निर्णय घेतला एवढेच नव्हे तर प्रधान यांचा राजीनामा घेण्याचे कलमही कधीं टाकले!
CJP वाल्यानी त्यांचा वापर करून आता त्यांना टाकून दिले आहे हे स्पष्ट दिसतंय.
कालपर्यंत येथल्या टोळीला ते वंदनीय होते आज अनुल्लेखाने मारत आहेत.
अच्छा है!
ह्याला चावी कुणी दिली?
ह्याला चावी कुणी दिली?
ती संपल्या शिवाय हा थांबणार नाही.
अरे खरे, व्हिडिओ बघत जा
अरे खरे, व्हिडिओ बघत जा
कित्येक लोकांनी झोमॅटो स्विगी वरून जेवण पाठवलं आहे शेवटी आंदोलन करणाऱ्या लोकांनी व्हिडिओ टाकला अजून जेवण नका पाठवू, आणि यात फक्त दिल्लीचे नव्हते तर बाकी राज्यातूनही लोकांनी स्वयंफुरतीने पाठवलं
https://www.instagram.com/reel/DbCpZi7swZZ/?igsh=MWhuZnVmZ200OG55YQ==
हे बघ जरा आंधळ्या
पण हे तुला दिसणार नाहीच, एकदा डोळ्यावर जी पट्टी लावली आहेस ती काढ एकदा
वाहवा
वाहवा
मनोज जरांगे पाटील पण पोचले जंतर मंतर ला!
उत्तम आहे!
आज आता दिल्लीतली 16 मेट्रो
आज आता दिल्लीतली 16 मेट्रो स्टेशन बंद केली आहेत. लोक आंदोलनात जावू नये म्हणून.
(No subject)
सुबोध खरे ही खरोखर अंधभक्तीची
सुबोध खरे ही खरोखर अंधभक्तीची होपलेस केस आहे. तातडीने उपचाराची गरज आहे.
आधी म्हणाले मी दोन वेळा नीट दिली, नंतर वाभाडे निघतील हे लक्षात आल्यावर म्हणाले की नीट समकक्ष परीक्षा दिली.
अकरा वर्षांपूर्वी आशुचाम्प
अकरा वर्षांपूर्वी आशुचाम्प यांनी माबो आयडींमध्ये एवढा विखार का???? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी एक धागा काढला होता. आता त्यांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा करूया.
Pages