Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सब याद किया जायेगा
सब याद किया जायेगा
ही ओळ काल नासुरीद्दिन शहाच्या ओठावर आली.
ही ओळ कुणी लिहिली आहे,
माझ्या कडेही एक कविता आहे,
पण ती मी शेअर करत नाहीये.
अवांतर CJP ही बीजेपीची B टीम आहे.
अग्रीड!
हे चालले पुन्हा बात चीत करायला.
OpP India अचानक फीड मधै दिसू
OpP India अचानक फीड मधै दिसू लागलं. दोन दिवस सिरीयसली बघितलं पण. लगेच लक्षात आलं आणि डोन्ट रिकमेंड चॅनल केलं. तर इतरत्र पिच्छा सुरू झाला आहे. आता अभिजीत दीपके आणि कुठल्या तरी हिरॉइन चा काय संबंध आहे अशी प्रश्नार्थक स्टोरी चालवली आहे. या लेवलला पोहोचले.
अभिजीत दीपकेच्या आप कनेक्शन, सोप्या मागण्या यामुळे समर्थन करावेसे वाटत नाही. पण असा दुष्प्रचार केला तर माझ्यासारखे पण सपोर्ट देतील.
सर्वत्र चालू असलेल्या अमानुष हिंसेचा निषेध आहे. पण सत्तेत निर्लज्ज लोक आहेत. एव्हढा विरोध होऊनही फरक न पडण्याची ही चौथी वेळ आहे.
रोहित वेमुला, कन्हैया, किसान आंदोलन आणि आताचे प्रती नवनिर्माण आंदोलन. जर कोडगेपणा दिसत असेल तर निवडणूक जिंकण्यासाठी सीक्रेट (ओपन) तंत्र हाताशी आहे हे कन्फर्म होतेय. नाहीतर इंदिरा गांधी सुद्धा मतपेटीला घाबरत होत्या.
यांना बहुतेक परग्रहवासी मतदान करत असावेत. जर आंदोलन पसरलं आणि राजीनामा दिला नाही तर अवघड आहे. कुणाला आवडो वा न आवडो.
https://youtu.be/jroNn_HF3tk
https://youtu.be/jroNn_HF3tk?si=cwv3-7a1pqhS6Klv
सोनम वांगचुक ला लवकर बरे व्हा
सोनम वांगचुक ला लवकर बरे व्हा अशा शुभेच्छा मोदीजीनी ट्विट करून दिल्यात
ऑ हा तर चायनीज हस्तक देशद्रोही असल्याच्या बोंबा तर भक्त मारत होते
आता हा कुठला मास्टर स्ट्रोक असावा बरे
जगत गुरु लवकरच पत्रकार परिषद
जगत गुरु लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत.
देशभरातले लोक स्वीगी झोमॅटो इ
देशभरातले लोक स्वीगी झोमॅटो इ. वरून जंतरमंतरवरच्या आंदोलकांसाठी खाणं पाठवत होते.
ते पोलीस पळवू लागलेत.
# चौकीदार ही चोर है
अग अग म्हशी
अग अग म्हशी
हे पहा चालले CJP दुदू दुदू बात चीत करायला.
शी जिनपिंगवर लाठीचार्ज करणार
शी जिनपिंगवर लाठीचार्ज करणार का?
सतीश मानेशिंदे मुलांच्या साठी
सतीश मानेशिंदे मुलांच्या साठी केस लढायला तयार आहेत.
तेंडुलकर, सलमान खान ह्यांना अचानक पान्हा फुटला !!
सोमी वर वाचले की ह्या मुलांनी मेलोनी ला काही insta वर लिहिले म्हणे . काय ते?
जगत गुरु लवकरच पत्रकार परिषद
जगत गुरु लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत.> >>>
https://www.lokmat.com
https://www.lokmat.com/national/big-news-cjp-meeting-constitution-club-j...
जगत गुरुंचा मास्टर स्ट्रोक
Nadda takes SAAURAV DAS
Nadda takes SAAURAV DAS AND RANKA ON GRAND RIDE.
आतापर्यंत सोशल मीडियावरच
आतापर्यंत सोशल मीडियावरच विद्यार्थी अन्यायाविरोधात लढताहेत, तर आरक्षणाविरोधात बोला , अशा कमेंट्स दिसत होत्या.
आता याचा उगमही भाजपच्या थिंक टँकमधून झालाय याची खात्री पटली

नेहमीप्रमाणे आंदोलकांत फूट पाडण्याचे प्रयत्न.
या आंदोलनात सगळ्या ( अ ति श्रीमंत सोडले) तर वर्गातले आणि जातीधर्माची मुलं आहेत. त्यांत आरक्षाण वि. जनरल अशी फूट पाडायचा बेत.
ही मुलं टीव्ही न्युज पाहत नाहीत. पाहिली तरी त्यांचं खरं रूप मुलांना माहीत आहे.
माझा मुलगा आज पुण्यात
माझा मुलगा आज पुण्यात झालेल्या आंदोलन आणि निषेध मोर्चा यामध्ये सहभागी व्हायला गेला होता
त्याची निरीक्षणे
१. कुठल्याही राजकीय पक्षाचे अस्तित्व जाणवले नाही, कुठलाही नेता किंवा नगरसेवक मिरवत नव्हता
२. आयोजकांनी कुठल्याही प्रकारे आक्रमकता, तोडफोड, नासधूस करण्यास सक्त मनाई केली होती, तसे कोणी करताना आढळल्यास तत्काळ बाहेर काढण्यात येईल असे बजावले
३. तसेच घोषणाही फक्त नीट आणि पेपर फुटी संदर्भात असायला हव्यात , बाकी कुठल्याही धार्मिक जातीय घोषणा देऊ नका सांगितले
तरी काही जण जय भीम च्या घोषणा देत होते त्यांना थांबवले
४. मुलाने पोस्टर बनवायला मदत केली, त्याला तिथे एक मुलगी भेटली तिच्या मैत्रीणीने पेपर फुटीनंतर आत्महत्या केली होती. तिच्यासाठी म्हणून त्यांचा सगळा ग्रुप आलेला होता
५. पोलिसांनी कुठेही अरेरावी केली नाही, उलट वाहतूक नियंत्रण करून मोर्चा सुरळीत होईल असे पाहिले
६. पाण्याची चोख व्यवस्था होती पण आयोजकांनी कोणीही कचरा करू नये असे बजावले होते त्यामुळे सर्वांनी रिकाम्या बाटल्या बॅगेत भरून घरी नेल्या, कचरा किंवा अन्य काहीही घाण केली नाही
७. आयोजकांनी दिल्लीत काय सुरू आहे, कसा घटनाक्रम झाला ते नीट सांगितले, प्रश्नांना उत्तरे दिली, मुलाच्या मते ते बरेच जेन्यूईन वाटले, सगळेच तसे नव्हते, काहीजण उगाच मिरवत होते पण तेवढे असणारच असं त्याचे म्हणणे
८. जोरदार पाऊस पडूनही सगळे घोषणा देत चालत राहिले, मोर्चा 2 वाजता होता पण बहुसंख्य पुणेकर 4 नंतर सामील झाले
पुणेकर 4 च्या आत कोणालाच जुमानत नाहीत हा त्याचा टोला
९. अंदाजे 3000 पेक्षा जास्त जण आले होते
१०. वृत्तपत्र प्रतिनिधीना मुलाने आणि बाकीच्यांनी आम्ही का आलो हे सांगितले आणि त्याला आशा आहे हे कुठेतरी छापून येईल
मी आज सकाळी इथे दिलेली आणि
मी आज सकाळी इथे दिलेली आणि आता मागच्या पानावर गेलेली कविता खुद्द मोदीजींनी केली होती (असं ते म्हणतात)
https://x.com/modiarchive/status/1805447708972663141?lang=en
In 1974, during the Navnirman Andolan in Gujarat, Narendra Modi witnessed firsthand the power of students' voices in effecting change in the nation. As a Yuva Pracharak of the RSS, he was deputed to the Akhil Bharatiya Vidyarthi Parishad to voice the youth movement through his fiery speeches.
हे नवनिर्माण आंदोलन सुद्धा विद्यार्थ्यांचंच होतं बरं का. त्यात विरोधी पक्ष सामील झाले. मोदी तेव्हा विद्यार्थी होते की नाही, हे त्यांच्या डिग्रीइतकंच टॉप सिक्रेट आहे.
आजच्या इंडियन एक्स्प्रेसमध्ये भाजप प्रवक्त्याचा opposition must not use young as fodder अशा शीर्षकाचा लेख आला आहे.
@आशुचँप
@आशुचँप
ये हुई न बात ! ह्याला म्हणतात आयोजन आणि मुद्द्याला नैष्ठिकपणे समर्थन देणे, ही शिस्त अजून वाढीला लागली पाहिजे, तुमच्या ज्युनिअर चॅम्पियनला आमच्या तर्फे खूप खूप भरभरून मनापासून शुभेच्छा सांगा, काय जाणे उद्याचे नेतृत्व पण असू शकेल तो फॉर ऑल वी नो !
>>>>पुणेकर 4 च्या आत कोणालाच
>>>>पुणेकर 4 च्या आत कोणालाच जुमानत नाहीत हा त्याचा टोला Happy

अल्पना, आशुचँप ग्रेट आहात
अल्पना, आशुचँप ग्रेट आहात तुम्ही.
माझी हिंमत नसती झाली मुलाला परवानगी द्यायची. (त्याने मागितली नसती आणि सरळ जाऊन आल्यावरच सांगितलं असतं हा भाग वेगळा)
आशुचँप, तुमचे आणि तुमच्या
आशुचँप, तुमचे आणि तुमच्या लेकाचे कौतुक!
छान!
छान!
आम्ही का आलो चे काय उत्तर होते?
ज्या सदस्यांची पुढची पिढी
ज्या सदस्यांची पुढची पिढी आंदोलनात भाग घेत आहे त्यांना शुभेच्छा आणी आपल्या मुलांचे unfiltered अनुभव इथे शेयर केल्याबद्दल सदस्यांना धन्यवाद. टीव्ही किंवा सोमीवरच्या बातम्यांपेक्षा हे जास्त मोलाचे आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देणारे तसेच हे आंदोलन निरर्थक आहे असे मत असणारे दोन्हीही गट इथे असू शकतील. आपापली मते मांडायचा अधिकार सर्वांनाच असायला हवा, मग ती मते आपल्याला कितीही अमान्य असतील तरीही. केवळ विरोधी मत व्यक्त केले म्हणून खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे, एकेरी उल्लेख करणे हे अयोग्य आहे.
हे आंदोलन आता decentralized आणी organic होत आहे असे दिसते, वांगचुक यांच्या उपोषण सोडण्याचा फरक पडला नाही. उद्या प्रत्यक्ष दिपकेच भाजपात सामील होउन केंद्रात मंत्री झाले तरीही जेन झी ऐकणार नाही. मेस फी वाढी वरून सुरु झालेले नवनिर्माण आंदोलन देशभर पसरले , किंवा मग गिरणी कामगार संप ठाकरे आणी दत्ता सामंत यांच्याही हाताबाहेर गेले त्याची आठवण झाली.
बाकी सीजेपीला ना कधी सपोर्ट
बाकी सीजेपीला ना कधी सपोर्ट केला ना वांगचूकला पण सरकारविरुध्द बोलणारा प्रत्येकजण देशद्रोही अन कुटील हेतूचा आहे ह्या भावनेनेच केलेला प्रत्येक हल्ला भडवेगिरीचे लक्षण आहे. स्तुती करणारा सोनम अगदी भारी होता, जरा विरोधी बोलला की त्याची सगळी पाळेमुळे खणून काढायची प्रवृत्ती बेक्कार आहे. सीजेपीचा दीपके आपचा कार्यकर्ता होता म्हणून चालत नाही, राघव चढ्ढा मात्र प्रेमाने घेतला जातो. दिपके अमेरिकेत होता तर तिकडून फंडींग घेऊन आला मग सरकारातील मंत्र्यांची मुले अमेरिकेत शिकताना कुणासाठी फंडींग गोळा करतात? सुरुवातीला ऑनलाईन बिनलाईन आंदोलन काही नसते, नुसते लाईक ठोकून काही होत नसते, र्स्त्यावर कितीजण उतरणार असे हिणवणाऱ्यांना दिल्लीतले २० जुलै नंतरचे आंदोलन म्हणजे थोबाडीत मारणारा जेनझीचा प्रतिसाद होता.
परिस्थिती अंगावर शेकायली की सगळ्यांची आठवण येते. कायदा, सुव्यवस्था, संविधान, देश, संसद ह्यांचे पावित्र्य, महती गाणाऱ्यासाठी....
आंदोलन जरी जेनझींचे असले तरी आम्ही जवळपास त्यांच्या पालकांच्या वयातले....आम्हीही लहान असताना आंदोलने बघितली आहेत. गावोगावी फिरणाऱ्या रथयात्रा नंतर झालेली कारसेवा बघितली आहे. मुल्ला मुलायम सिंगाच्या मुघल सेनेने झाडलेल्या गोळ्या आणि त्यात म्रुत्युमुखी पडलेल्या कोठारी बंधूंच्या बलिदानाचे पोवाडे चौकाचौकात स्पीकरवर ऐकलेले आहेत. "व्यर्थ न हो बलिदान" "याद करो कुर्बानी" च्या घोषणा ऐकलेल्या आहेत. कोठारी बंधू कसे "पाठ दाखवऊन परत येणार नाही " म्हणत रामलल्लांच्या सेवेस गेले, अजून दोन मुले असती तर त्यांनाही रामासाठी अर्पण केले आहे हे त्यांच्या वडिलांचे गहिवर आणणारे भाषण कित्येकदा ऐकले आहे. आंदोलनात मृत्युमुखी पडणारे मेले नाहीत तर बलिदान, शहीद, अमर, रामकार्य, धर्मयुध्द, तपस्या, राष्ट्रयज्ञातक्या समिधा अशा शब्दावलींने गौरवले गेले आहेत. त्यांनंतर पाडलेली बाबरी मशीद अन गोध्राच्या दंगली ह्या सरकारविरुध्द जनक्षोभ होत्या अन त्या जनक्षोभातून सत्तेत आलेले, आण्णा हजारेंच्या उपोषणातून अन त्यांनी केलेल्या आरोपामुळे निर्माण झालेल्या जनक्षोभातून सत्तेत आलेल्या लोकांनी इतरांना कायदा, सुव्यवस्था अन संविधानाचे पवित्र्य लोकांना शिकवण्याची गरज नाही. सत्य, प्रामाणीकपणा, कायदा अन संविधान तुमच्या घरचे बटीक नाहियेत.
सीजेपीचे आंदोलन हे कशाही परिस्थीत सुरु झाले अन कसेही असले तरी सुरुवातीसच त्याची दखल घेऊन त्यांना थांबवण्यासाठी काहीतरी करायला हवे होते. त्याउलट त्यांच्या विषयीच अपप्रचार सुरु केला. त्यातूनच प्रसिध्दी मिळवत दिपकेचे भारतात आगमन, वांगचूकची अन त्याची भेट, त्यानंतर प्रमुख शहरात केली गेलेली आंदोलने आणि त्यांनतर त्या आंदोलनात सहभागी झालेले लोक पाहता जंतरमंतरवरील आंदोलनापर्यंत सर्वच ठिकाणी त्यांना सरकारकडून थांबवण्याचा कोणताही प्रभावी प्रयत्न झालेला नसल्याने कधीकधी सरकारचीच ही युवाविरोध विकेंद्रीत करण्याची चाल आहे की काय अशीही शंका येत होती. वांगचूकच्या उपोषणानंतरही मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काही हजार युवांच्या मोर्चाला हॅन्डल करुन एखाददुसरी मागणी मान्य करुन सगळेच थांबेल असेही वाटत होते परंतु प्रचंड संख्येने दिल्लीत दाखल झालेल्या जेन झी ने सगळेच अंदाज चुकवले. फक्त शिक्षणमंत्र्यांना अन त्यांनी राबवलेल्या परीक्षापध्दतीला असणारा विरोध, पूर्ण सरकारला विरोध ह्यात कधी बदलला हेच कळले नाही. आता वांगचूकना उपोषण स्थळावरुन उचलतानाही वापरलेली पध्दत अधिकच्या जनक्षोभाला कारण ठरलीये. त्यांनी आता उपोषण सोडले आहे, कदाचित मंत्रींमंडळाची चर्चा करुन धर्मेन्द्र प्रधानांचाही राजिनामा होईल उद्या परवा पण सीजेपी ला स्वत:च जेनझींचे नेतृत्व स्वीकारायची वेळ आणली गेली आहे. त्यांना आणि वांगचूकला अपेक्षित असणारी संसदीय मार्गाने लढाई हवी असेल तर राहुल गांधी हेच तर नाव शिल्लक राहते. नाहीतर दुसरा मार्ग हा पुन्हा आंदोलन हाच उरतो.
विद्यार्थ्यांवर, तरुणाईंवर केले गेलेले पोलीसी लाठीमार अन अत्याचार निघृण आहेतच पण पोलीसांवर आणि तरुणांवर ही वेळ कशी आणि का आणली गेली हेही बघितले पाहिजे. त्या कृतींचा अगदी मांजराला सुध्दा कोंडी केली की ते फिस्कारुन येते ह्याची माहिती नव्हती काय? आताही जंतरमंतर भागातले नेट, मेट्रो दुकाने बंद करवून काय साध्य करताहेत? की त्यामुळे आंदोलनात सहहागी नसणार्या लोकांनाही आंदोलन विरोधी मत बनवायला भाग पाडले जात आहे? आंदोलन हाच जर प्रोब्लेम असला तर सध्या राजीनामा द्यायला प्रधानाला किंवा सरकारला काय जड आहे? इअतकी स्गळी व्यवस्था राबवून, सर्वानाच त्यात व्यग्र ठेऊन प्रचंड गोंधळाची स्थिती निर्माण करण्यात सरकारचाही मोठा हात आहे. आपले मूल चॉकलेटसाठी रडत असले, आदळापट करत असले तर त्याला एक लहानसा तुकडा देऊन त्यावेळी गप्प करण्याची आईची पध्दत सरकारने राबवली असती तर फारसे काही बिघडले नसते. आज पोराला चॉकलेट दिले तर उद्या तो आक्खा बार मागेल, परवा दुकान मागेल, तेरवा फैक्टरी मागेल असले स्पेक्युलेशन्स मांडण्यापेक्षा अन पोरांवर संस्कार, त्याच्या सवयी, त्याचे जेनेटिक्स आदीविषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही हेही सरकारला कळायला हवे.
असो.. ह्यानिमित्ताने ऐक्टीव्ह जेन झी बघायला मिळाली, लहानपणी कसे पोलिसांना चुकवत कारसेवक अयोध्येत दाखल झाले आणी घुमटावर चढले ह्यांच्या गाथा ऐकल्या होत्या आता अशीच आजची तरुणाई पोलिसांना तुमचे उइनिफॉर्म, नेमप्लेटस वर प्रश्न विचारताहेत, धर्म, जात, वय, लिंग, शिक्षण, ठिकाण आदि न विचारता एकमेकांना मदत करत भारतातल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणांहून एकत्र येत काही एका कारणासाठी बोलताहेत, लढताहेत, जखमी होताहेत अन पुन्हा येताहेत ते कारण त्यांच्या स्वत:च्या हक्काचे आहे, त्यांच्या भविष्यासाठी निगडीत आहे हेपण प्रचंड आशादायक आहे. एखाद्या मंदिरासाठी आंदोलन करणारी तरुणाई आज पालक झालीय, त्यांना आज त्यांच्या शिक्शःअणासाठी, हक्कासाठी लढणाऱ्या तरुणांना हतोत्साहीत करण्याचा, विरोध करण्याचा कोणताच अधिकार नाहिये हे जितके लवकर लक्षात येईल तितके चांगले.
अभय - अतिशय सुंदर संतुलित
अभय - अतिशय सुंदर संतुलित लिखाण
आणि हेच लिहायला आलो होतो
अमित यांच्या प्रशांचे उत्तर
का जायचं होतं माझ्या मुलाला आंदोलनात???
मी त्याला म्हणलं तू आतासशी 12 वी झाला आहेस, तू इंजिनिअरिंग ला जाणारेस तुझा नीट शी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही
आपल्याला कसलीच पेपरफुटीची झळ लागली नाही
तरी तुला का जायचं आहे??
त्यावर त्याने जे उत्तर दिले त्याबद्दल मला इतका अभिमान वाटला त्याचा
तो म्हणाला आज माझा काही संबंध नाही मी कशाला पडू यात म्हणून घरी बसून राहिलो तर उद्या आमच्यावर, माझ्यावर वेळ येईल तेव्हा आमच्याबरोबर कोणी येणार नाही
प्रत्येकजण हे आमचं नाही म्हणेल आणि मग कोणीच विरोधात उभे राहू शकणार नाही
दुसरे असे की मला माहिती आहे या आंदोलनाने फार मेजर काही साध्य होणार नाहीये, तरीही आम्हाला जायचं आहे कारण आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्हाला गृहीत धरू नका, पुढे जाऊन जेव्हा केव्हा असे परत घडेल तेव्हा आम्ही जेनझी काय करू शकतो याचा एक डेमो आम्ही देत आहोत
तुम्ही चुकीचे वागलात तर आम्ही तुमच्या डोक्यावर बसू
हा थोडक्यात त्याच्या बोलण्याचा सारांश
देवशपथ मला मुळीच अपेक्षा नव्हती की ही पिढी इतका विचार करत असेल म्हणून
तुमच्या ज्युनिअर चॅम्पियनला
तुमच्या ज्युनिअर चॅम्पियनला आमच्या तर्फे खूप खूप भरभरून मनापासून शुभेच्छा सांगा, काय जाणे उद्याचे नेतृत्व पण असू शकेल तो फॉर ऑल वी नो !>>>
धन्यवाद जेम्स
माझी हिंमत नसती झाली मुलाला परवानगी द्यायची>>>
मलाही थोडी भीती वाटली, खोटे का बोला
जखमी होण्याची नाही तर पोलीस केस लागून करियर बरबाद होण्याची
पण ज्या पद्धतीने तो बोलला त्यानंतर त्याला जाऊ नको म्हणणे फार मोठा दुटप्पीपणा ठरला असता
Submitted by आशुचँप on 24
Submitted by आशुचँप on 24 July, 2026 - 20:08
आशू - तुमच्या मुलाला आम्ही तुमच्या लॅब बरोबर मोठे होताना पाहिलय. त्याचे विचार वाचून देश चांगल्या हातात आहे याची खात्री पटत आहे. प्रत्येक पिढीला वाटते की आपणच शेवटची जबाबदार पिढी आहे आणि पुढची पिढी बेजबाबदार आहे पण मुळात हे त्यांच्या पॅरेंटिंग चे अपयश आहे. तुमच्या मुलाबरोबर तुम्हाला आणि त्याच्या आई ला देखील कुडोस.
परफेक्ट! बेस्ट उत्तर!
परफेक्ट!
बेस्ट उत्तर!
त्याला आईस्क्रीम खायला घेऊन जा आज.
आशुचँप, भारी वाटलं वाचून.
<तो म्हणाला आज माझा काही संबंध नाही मी कशाला पडू यात म्हणून घरी बसून राहिलो तर उद्या आमच्यावर, माझ्यावर वेळ येईल तेव्हा आमच्याबरोबर कोणी येणार नाही
प्रत्येकजण हे आमचं नाही म्हणेल आणि मग कोणीच विरोधात उभे राहू शकणार नाही
दुसरे असे की मला माहिती आहे या आंदोलनाने फार मेजर काही साध्य होणार नाहीये, तरीही आम्हाला जायचं आहे कारण आम्हाला दाखवून द्यायचं आहे की आम्हाला गृहीत धरू नका, पुढे जाऊन जेव्हा केव्हा असे परत घडेल तेव्हा आम्ही जेनझी काय करू शकतो याचा एक डेमो आम्ही देत आहोत >
किती स्वच्छ आणि स्पष्ट विचार आहेत.
आशुचँप, भारी वाटलं वाचून.
तुम्हा सगळ्यांचंही कौतुक.
याचे मीम्स व्हायरल झालेत. त्यातलाच एक विचार वर आलाय.
The safest time to stand against injustice is when it is happening to someone else. Waiting until it reaches you is waiting too long
https://www.facebook.com/share/r/1ELYsFHCNm/
"First They Came" is a
"First They Came" is a postwar confessional poem by German Lutheran pastor Martin Niemöller (1892–1984) that reflects on complicity and silence during the Nazi era. The poem warns that if people fail to speak out for others, no one will remain to speak for them when their own turn comes.
zzzzzzzzzzzzzz
First they came for the Communists
And I did not speak out
Because I was not a Communist
Then they came for the Socialists
And I did not speak out
Because I was not a Socialist
Then they came for the trade unionists
And I did not speak out
Because I was not a trade unionist
Then they came for the Jews
And I did not speak out
Because I was not a Jew
Then they came for me
And there was no one left
To speak out for me
Pastor Martin Niemöller
मला पण हीच कविता आठवलेली.
मला पण हीच कविता आठवलेली.
आशुचॅम्प,
आशुचॅम्प,
अल्पना,
तुमचं आणि मुलांचं कौतुक...
Pages