Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30
जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.
हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj
आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/
कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...
क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>>>>>>Gen-Z आणि त्यांच्या
>>>>>>>Gen-Z आणि त्यांच्या अगदी आधीची पिढी Millennials, यांच्यात जगाकडे, स्वतःकडे, स्वतःच्या हक्कांकडे पाहण्याच्या दृष्टीकोनात जमीन अस्मानाचं अंतर आहे.
हे खरे आहे. अनुभव आहे.
(No subject)
एएनआय ने त्यांची भारत यांनी पोस्ट केलेल्या स्क्रीनशॉट ची ट्विट डिलीट केली.
एका पोलीसकर्मीचा व्हिडीओ
एका पोलीसकर्मीचा व्हिडीओ मिळाला म्हणून कारवाई. पण ज्यांनी अशा धमक्या दिल्या असतील असे कितीतरी असू शकतात. असो. 26 तारखेला मुंबईत मनसे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्यांचा संयुक्त मोर्चा आहे .
https://unique-features.com
https://unique-features.com/articles/anubhav/cjp-sansad-march-student-pr...
आयाम चा अनुभव युनिक फिचर्स च्या अनुभव मासिकाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे.
कधी कधी मला वाटतं कि राजु
कधी कधी मला वाटतं कि राजु परुळेकर हाच छुपा संघी आहे. बर्याचदा त्याने चलती नुसार विरोधकांची बाजु घेउन, त्यांना चाव्या देउन शेवटि भाजपाचा फायदा करुन दिलेला आहे..
>>जनलोकपाल कधीच आले नाही. पण आंदोलनातून नेते तयार झाले. या आंदोलनातून असेच होईल का?<<
अशी आंदोलनं राजकिय पोळी भाजण्याकरताच असतात हे सर्वश्रुत आहे. फायदा कोणाचा झालाच तर तो नेतेमंडळींचा होतो. सामान्य, मारखाणारी जनता तिथेच रहाते. सुरुवातीला केलेल्या मागण्या, कालांतराने मोडकळीस येतात (तुम्हि उल्लेख केलेला "जनलोकपाल"), मूळचे साथिदार, प्रवक्ते एकतर संघटना सोडतात किंवा हाकलले जातात..
सध्याची एजुकेशन रिफॉर्मची मागणी लाँग ओवर्ड्यु आहे. पण ती राबवताना, नियम कितीहि काटेकोर, वॉटरटाइट केले तरिहि त्यात लूपहोल्स निघतील. भ्रष्टाचार डिएनएत भिनलेला असल्याने सिस्टम कधीच फूल्प्रुफ होणार नाहि. हे तसं सिनिकल वाटतंय, पण नाईलाज आहे. सध्यातरी विरोधी पक्षात एकहि सक्षम नेता नाहि जो हा मुद्दा प्रामाणिकपणे, निस्वार्थि वृत्तीने पुढे नेइल. जे आहेत ते सगळे भाड्याचे तट्टु आहेत. भविष्यात धोका अशा नेत्यांपासुन आहे कि त्यांच्यामागे मेंढरा सारखे जाणार्या तरुण पिढीच्या भोळेपणा पासुन आहे, हा कळीचा मुद्दा आहे...
इतकेही आजच्या पिढीला भोळे
इतकेही आजच्या पिढीला भोळे समजू नका
माझ्या मते जेनझी रस्त्यावर उतरून काहीतरी भूमिका घेऊन सरकारला जाब विचारत आहे हेच भरपूर आहे
आधी वाटत होतं की हे कदाचित फक्त सोशल मीडियावर राहील पण गेल्या काही दिवसांत दिसले की वेळ आली तर ही पिढी रस्त्यावर उतरून लढा देऊ शकते
आता राहिला मुद्दा नीट, पेपर फुटी आणि प्रधान च्या राजीनाम्याचा
ज्यावर अगदी भाजपयानाचा जीव चाललंय
तर ते काही होईल असे वाटत नाही आता
कारण अशा अवघड वळणावर दिशा द्यायला जे समर्थ नेतृत्व लागते ते इथे कुठेच दिसत नाहीये
दिपके आणि वांगचुक रस्त्यावर उतरलेत पण ते यापुढच्या आंदोलनाला दिशा कितपत देतील याची शाश्वती नाही
पण तरीही मी म्हणतो हे आंदोलन यशस्वी झाले आहे
पाशवी बळाला सामोरे जात नव्या पिढीने जे धैर्य दाखवले आहे ते नक्कीच कौतुक करण्यासारखे आहे
एक मुद्दा घेऊन सरकारच्या सगळ्या डावपेचांना समोरे जात
त्यात अगदी चारित्र्यावर शिंतोडे पासून इथले जे यशस्वी कलाकार करत होते त्यांच्यासारखे हजारो हे आंदोलन कसे देशविघातक आहे, देशद्रोही आहे, हे विद्यार्थी नव्हेत पासून जे काही किटाळ उडवणे सुरू होतं त्यालाही तोंड दिले
मेन्स्ट्रीम मीडियाला हाकलुन लावताना मोबाईल च्या माध्यमातून जे काही घडत आहे ते जनतेपर्यंत पोचवले
एकमेकांना साथ देत घट्टपणे उभे राहिले, देशाच्या कानाकोपऱ्यातुन त्यांना मदत पोचवली गेली
हे सगळंच खूप आशादायक आहे
कुठलेच सरकार ने या नव्या पिढीला हलक्यात घेऊ नये
दर वेळीच इतक्याच संखतेने इतक्या तीव्रतेने सगळे लढतील असे नाही पण यांनी एक बेंचमार्क सेट केला आहे की वेळ पडली तर असे करता येते त्यासाठी कुणाची पर्वा करण्याची गरज नाही
he New Delhi Traders
he New Delhi Traders Association (NDTA) has directed all shops, offices, and restaurants in Connaught Place to shut down by 6:30 PM on July 23, 2026.
In an order issued today, the association said the decision was taken due to the "serious situation" prevailing in the area and on the advice of the NDMC Chairman and Vice Chairman. The move comes amid heightened security arrangements in central Delhi.
नेहमीप्रमाणे त्या भागातलं इंटरनेटही बंद करण्यात आलंय.
आश्चिगची पोस्ट फार चपखल आहे.
आश्चिगची पोस्ट फार चपखल आहे. अल्पना, आयामच्या मित्राने लिहीलेली पोस्टही इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
गेल्या एक दोन दिवसांत क्लिप्स पाहिल्या दिल्लीतल्या. फार वाईट वाटते तरूण पोरांना होत असलेली मारहाण पाहताना. "इनके कोई बच्चे नही है क्या?" विचारणारा तो मुलगा, मारहाणीमुळे फुटपाथ वर रडणारी मुलगी अशा अनेक इमेजेस विसरत नाहीत पटकन. ही मारहाण पोरांना केवळ एखाद्या लोकेशनवरून हटवायला केल्यासारखी दिसली नाही, जणू पोलिसांची यांच्याशी वैयक्तिक दुश्मनी असल्यासारखी वाटली. एकदा मुले मागे हटत आहे हे दिसल्यावर मारत राहण्याची गरज नव्हती. ही केवळ आदेशाची अंमलबजावणी नव्हती. तेथे आणखी काहीतरी चालू होते जे अजून पूर्णपणे समोर आलेले नाही.
पण ती कारणे काही का असेनात, कॉलेजमधल्या पोरांना इतकी ब्रूटल मारहाण झाली हे क्लिअर आहे. आंदोलनाविरूद्धचे कोणतेही मुद्दे याबद्दल गैरलागू आहेत.
अस्चिग मस्त पोस्ट आहे.
अस्चिग मस्त पोस्ट आहे.
इथेही काही लोक अचानक अकांउंटेबिलिटी मागू लागले आहेत त्यांनी अवश्य वाचावी ती पोस्ट.
आयामची पोस्ट वाचली! मनापासून मनातलं बोलतोय तो! छान मांडलंय
अकांउंटेबिलिटी मागू लागले
अकांउंटेबिलिटी मागू लागले आहेत त्यांनी अवश्य वाचावी ती पोस्ट.
वाचली, पटली, धन्यवाद. मला वाटते "अकाउंटबिलिटी" मी कुठल्या perspective मध्ये बोललो होतो हे मी पुरेसे स्पष्ट केले आहे त्यामुळे आता त्या कढीला ऊत आणून उपयोग नाही.
आयाम चा अनुभव युनिक फिचर्स
आयाम चा अनुभव युनिक फिचर्स च्या अनुभव मासिकाच्या पोर्टलवर प्रसिद्ध झाला आहे.>>>
अल्पना तुमच, तुमच्या मुलाच आणि त्याच्या मित्रच खूप कौतुक वाटत. हे भावी नागरिक भारताला सुदिन आणतील.
आस्चिग, मस्त पोस्ट. संपूर्ण
आस्चिग, मस्त पोस्ट. संपूर्ण अनुमोदन!
अल्पनाच्या आयामचं आणि भरतच्या भाच्याचं कौतुक. आंदोलनात सामील झालेल्या सगळ्यांचं कौतुक!
बाकी काय बोलावं समजत नाही. राज्यकर्ते असे, पोलीस तसे!
दिपके आणि वांगचुक रस्त्यावर
दिपके आणि वांगचुक रस्त्यावर उतरलेत पण ते यापुढच्या आंदोलनाला दिशा कितपत देतील याची शाश्वती नाही
पण तरीही मी म्हणतो हे आंदोलन यशस्वी झाले आहे>>> +१
कुठलेच सरकार ने या नव्या पिढीला हलक्यात घेऊ नये>>> हे ह्या आंदोलनाने अधोरेखित झालं.
अल्पना, आयामचा अनुभव वाचला.
अल्पना, आयामचा अनुभव वाचला. त्याचं , त्याच्या मित्रांचं आणि तुमचं खूप कौतुक . तो परत घरी येईपर्यंत जीव टांगणीला लागला असेल.
<पोलिसांनीच काही बॅरिकेडस बाजूला करून आम्हाला रस्ता मोकळा करून दिला. त्यांनी असं कसं केलं असं वाटत असतानाच त्याचं उत्तर मिळालं. सगळी मुलं पुढे गेल्यावर त्यांनी मागचे बॅरिकेड्स पुन्हा लावून रस्ता अडवला आणि अश्रुधुराचे गोळे फोडायला सुरवात केली. पुढेही रस्ता बंद केलेला होता. त्यामुळे आम्हाला अश्रुधुरापासून बचाव करायला मार्गच राहिला नाही. आम्हाला रस्त्यात कोंडून ठेवलं गेलं होतं. काहीजण बॅरिकेड्सवरून उड्या मारून अश्रुधुरापासून वाचण्याचा प्रयत्न करत होते. पण बॅरिकेडस ओलांडून जावं तर तिथेही लाठीहल्ला आणि अश्रुधूर होताच. सभोवताली सगळीकडे फक्त आणि फक्त अश्रुधूरच होता. तिथून बाहेर पडायला रस्ताच नव्हता. नंतर मला कळलं की खरं तर असे निषेधाचे मोर्चे किंवा सभा असेल तर जमावाला तिथून परत जाण्यासाठी एखादा तरी जायचा रस्ता मोकळा (एक्झिट रुट) ठेवावा लागतो. पण तिथे असा कोणताही रस्ताच नव्हता. मोठमोठ्या डिटीसीच्या बस उभ्या करून पोलिसांनी आजूबाजूचे सगळे रस्ते आणि छोट्या गल्ल्या अडवल्या होत्या. एक तर पुढे संसदेपर्यंत जा आणि मार खा किंवा जिथे आहात तिथे किमान अश्रुधूर तरी खाच, असं पोलिसांचं म्हणणं होतं. >
पोलिसांनी केलेल्या मारहाणीचं समर्थन करणार्यांनी हे वाचावं.
आता आंदोलनाला आरक्षणाच्या
आता आंदोलनाला आरक्षणाच्या मुद्द्याकडे ढकलण्यात येत आहे, अचानक फेसबुकवर भक्त मंडळींच्या आरक्षण विरोधी पोस्ट्स दिसू लागल्यात आणि cjp ने हा मुद्दा का घेतला नाही म्हणून कुजबुज सुरू करण्यात आलीं आहे
आयामचे कौतुक आणि अल्पना,
आयामचे कौतुक आणि अल्पना, तुमचेही!
आयाम च्या एका मैत्रिणीने
आयाम च्या एका मैत्रिणीने काढलं आहे हे चित्र. उद्या जातेय ती आंदोलनात हे घेवून. भाजपा मतदार असलेल्या घरातली मुलगी आहे ही.
त्या लेखात आयाम ने उल्लेख केलेली आता पुण्यात शिकायला गेलेली जी मुलगी तिथल्या आंदोलनात जातेय ती सुद्धा पारंपारिक भाजपा मतदारांच्या घरात वाढलेली मुलगी आहे. जेन झी ची मतं त्यांची स्वतःची असतात, पालक किंवा इतर कुणाच्या मताप्रमाणे नाही चालत ही मुलं.
सरकार जसं चुकलं तसे इथले आयडी
सरकार जसं चुकलं तसे इथले आयडी पण चुकत आहेत. खरे आणि बेफिकीर यांच्यावर एकदम खालच्या पातळीची टीका करत आहेत जे चूक आहे. आता कदाचित मला पण यात ओढतील पण चुकीचं काही घडत असेल तर आपण त्याच्याविरुद्ध बोलायला पाहिजे हे या आंदोलनातूच शिकलो.
भरत शेठ
भरत शेठ
हे घ्या
https://www.facebook.com/share/p/18jfkdEG9h/
. खरे आणि बेफिकीर यांच्यावर
. खरे आणि बेफिकीर यांच्यावर एकदम खालच्या पातळीची टीका करत
मला तर धमक्या मिळत आहेत
आणि आयाम पोस्ट मधील हे सुद्धा
आणि आयामच्या पोस्ट मधील हे सुद्धा वाचा
<
याचदरम्यान पोलिसांनी चक्क आम्ही होतो त्या इमारतीच्या आत अश्रुधुराचे बॉम्ब फेकायला सुरुवात केली. पहिला बॉम्ब गेटजवळ पडल्यावर आम्ही थोडे आतल्या दिशेला गेलो, तर दुसरा बॉम्ब तिथल्या राजीव गांधींच्या पुतळ्याशेजारी पडला. आम्ही त्या इमारतीच्या आत जायला लागलो, तसा त्या खोलीच्या दरवाज्यात पुढचा अश्रुधुराचा गोळा पडला. त्या खोलीत कोंडले जाऊन अश्रुधुराने चोक होतो की काय अशी भीती वाटू लागली, पण नशिबाने मागच्या दारातून आम्हा सर्वांना बाहेर पडता आलं
>
संतापजनक प्रकार आहे.
अश्रु धूर फेकणारा पोलिस असे निर्णय आयत्यावेळी काही स्वतः घेणार नाही. ना तिथला कोणी उपस्थित अधिकारी. हे सरळसरळ नक्षलवाद्यांशी लढावे असे युद्ध लढायचे ठरवून आले होते.
हा अनुभव इथे शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
ज्यांना लाज शिल्लक आहे त्यांचे डोळे उघडतील या आशेवर दाखवता येईल.
या मुलांनी या अनुभवाचे छोटे छोटे व्हिडिओ सुद्धा बनवावेत.
पण काळजी घेऊन...
अन्यथा आता हे सरकार बदला घ्यायला कुठल्या थराला जाईल हे सांगता येत नाही.
26 तारखेला मुंबईत मनसे -
26 तारखेला मुंबईत मनसे - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ह्यांचा संयुक्त मोर्चा आहे .
-------------------------------
ह्याना कसे माहित २६ परय्त आन्दोलन चालणार आहे
आयाम च्या एका मैत्रिणीने
आयाम च्या एका मैत्रिणीने काढलं आहे हे चित्र.
>>>
भारी आहे चित्र.. काय धमाल चालू आहे
जंगल मे मोर नाचा किसी ने ना
जंगल मे मोर नाचा किसी ने ना देखा .
ओके ! पंच लाईन
मी मायनॉरिटीमध्ये आहे याची
मी मायनॉरिटीमध्ये आहे याची कल्पना आहे, तरी मला जे वाटते ते लिहितो. सुबोध खरे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर सतत जो हल्ला केला जात आहे, ही माझ्यामते झुंडशाही आहे. खरे आणि बेफिकीर एका बाजूला आणि बरेचसे लोक दुसऱ्या बाजूला असे हे युद्ध चालू आहे.
<< सध्याची एजुकेशन रिफॉर्मची मागणी लाँग ओवर्ड्यु आहे. पण ती राबवताना, नियम कितीहि काटेकोर, वॉटरटाइट केले तरिहि त्यात लूपहोल्स निघतील. भ्रष्टाचार डिएनएत भिनलेला असल्याने सिस्टम कधीच फूल्प्रुफ होणार नाही. >> +१
ज्या पालकांना आपल्या मुलांसाठी शॉर्टकट मारायची इच्छा आहे आणि त्यासाठी ते पैसे खर्च करायला तयार आहेत, ते पालक आणि त्यांचे विद्यार्थी हे पण तितकेच जबाबदार आहेत. पण त्यांना का ही ही होणार नाही आणि हा प्रकार सुरूच राहणार आहे.
आयामचा लेख वाचला.
आयामचा लेख वाचला.
आयाम आणि त्याच्या मित्राच कौतुक!
कुणी बिहार प्रोटेस्ट चे
कुणी बिहार प्रोटेस्ट चे व्हिडिओ बघताय का
अशक्य धमाल सुरुये तिकडे
सुबोध खरे यांच्यावर वैयक्तिक
सुबोध खरे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर सतत जो हल्ला केला जात आहे, ही माझ्यामते झुंडशाही आहे. >>>
त्याच्या पोस्ट एकदा वाचा
मी सुरुवातीला त्याला अहो जहो काका वगैरे म्हणत होतो
पण नंतर त्याची सडकी मानसिकता दिसली तेव्हापासून त्याला बोललो जास्त
याला झुंडशाही नाही त्याच्याच औषधांचा त्याला डोस म्हणता येईल
बाहेर सोशल मीडियावर ज्यांनी ज्यांनी आंदोलनाला समर्थन दिले आहे त्यांना काय लेव्हल ला बोलले जात आहे हे याची कल्पना तुम्हाला असेलच, आई बहिणीवरून शिव्या ते धमक्या प्रचंड लेव्हलला ला झुंडशाही सुरू आहे
त्याचंच एक छोटेसे सॅम्पल खरे ला मिळालं असे म्हणतो
मला मुळीच खेद नाही त्याला असे बोलल्याचा
दुसरे जे विनोदी कलाकार आहेत त्यांचे सोडून द्या, फारसे बोलावे अशी व्यक्ती नाही ती
लूपहोल्स आणि वॉटर टाईट
लूपहोल्स आणि वॉटर टाईट सिस्टिम जगात कुठलीही नाही. कु ठ लि ही! कुठल्याही कायद्यातून... जगातील कुठल्याही देशातील... पळवाटा या असतातच. कुठल्याही पॉलिसीत लूपहोल असतातच. जगात कुठेही!
ते आहेत हे कारण देणे ही मखलाशी अंकल लोकांची पिढी करतच राहील पण कुठलीही पॉलिसी किती टक्के लोकांच्या भल्याची आहे ते बघुन राबविली जाते, तशीच राबवावे लागते. लूपहोल कमी करण्याचा प्रयत्न दीर्घकाळ करत राहिली, अॅटिट्युड, रोख हळूहळू बदलतो.
हे आंदोलनच हायजॅक होईल, यात राजकीयच आहे इ. इ. सांगून आता काहीच करू नका हे त्यावर उत्तर नाही. धडका देत राहिल्या, भिंतीवर १०० गोष्टी मारल्या की एक चिकटते.
हे जे तुम्ही निगेटिव्ह लिहित आहात त्याची मुलांना कल्पना नाही वाटत असेल तर तो भ्रम आहे. तुम्ही हे असे खच्चीकरण करणे थांबवा, नाही थांबवलंत तरी अर्थात फरक काही नाही पडणार आहे. फरक इतकाच पडणार आहे की, शेवटी तुम्ही चुकीच्या बाजुला उभे होतात हे फक्त तुम्हाला समजेल. तेव्हा उशीर झालेला असेल. असो.
स्टॅनफोर्ड आणि येल च्या
स्टॅनफोर्ड आणि येल च्या ॲडमिशन घोटाळ्यात क्रिमिनल केस झाली होती आणि पालकांना जेलची हवा खावी लागली होती. भारतात हे कधी होईल का? पेपर फुटी करणाऱ्या सगळ्यांना आणि सोबत पैसे देणाऱ्या पालकांनापण जेलची हवा लागू दे, अशी माझी इच्छा आहे.
बाकी आंदोलनाबाबत काही मत नाही. Not my circus, not my monkeys.
Pages