Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

युनिव्हर्सिटी अ‍ॅडमिशब ब्रायबरी अमेरिकेला नवी नाही.
हो, युसीएलए ब्रायबरी मध्ये पालकांना हाऊस अरेस्ट, ते काही दिवस तुरुंग, ते काही महिने तुरुंग, ते पैसे भरुन सुटका, ते प्रेसिडेंशिअल पार्डन असे ज्याच्या त्याच्या आर्थिक कुवती नुसार प्रकार झालेले आहेत. जुनं नाही हे फार. हे असे प्रकार वारंवार अमेरिकेतही होताना दिसतात म्हणून सगळेच भ्रष्ट!!! करुन हातावर हात धरुन विद्यापिठे बसत नाहीत. तोंड देखली का होईना त्वरित कारवाई होते. राजिनामे घेतले जातात. अकांऊंटेबिलिटी मंत्रीच दाखवत नसेल तर मग प्रश्नच मिटला.

<<<
कुणी बिहार प्रोटेस्ट चे व्हिडिओ बघताय का
अशक्य धमाल सुरुये तिकडे
>>>

आशुचॅम्प हो,
आताच मला बायकोने सुद्धा याच शब्दात सांगितले.
ही एक तिने fwd केली.
आता अजून येतील फीडमध्ये..

https://www.instagram.com/reel/DbHF424zdDy/?igsh=dm0za3F5aDA1NnZt

पण आता किमान आम्ही तरुण मुलं एकत्र येतोय. कदाचित पुढे काहीतरी चांगलं घडवू. >>> सही! अगदी सकारात्मक शेवट. आवडला लेख आयामचा, अल्पना! तू इतरत्र दिलेल्या काही लेखांच्या लिंक्स पूर्वीही वाचल्या होत्या. लिखाण आवडते मला त्याचे.

या आंदोलनाच्या क्लिप्स मधे विशीतील पोरांच्या वागण्यात जे स्वाभाविक असते ते सगळे आहे, आणि जेन झी च्या बाबतीत तर ते आणखी उघड आहे - आक्रमकता, बेडरपणा, कसलीही पोचपाच न ठेवता लिहीलेल्या आणि दिलेल्या स्लोगन्स, भाबडेपणा आणि तितकाच स्वाभाविक खोडकरपणा - सगळे यात दिसते. एका बाजूला अमानुष मारहाणीमुळे कळवळणारे, रडणारे विद्यार्थी बघून वाईट वाटते, तर आंदोलनाशी काहीही संबंध नसलेल्या गोष्टी अ‍ॅम्प्लिफाय करण्यात त्यांचा भाबडेपणा दिसतो, तर पोलिसांनी कोंबलेल्या बसच्या खिडकीतून उड्या मारून पळून जाताना पाहतानाही तितकेच हसू येते. हे माझे वाक्य नाही पण असेच वागणार्‍या मुलांबद्दल वाचलेले - They are not being criminals, they are being kids/teenagers. सरकारने उलट यांच्याशी संवाद साधायला हवा. इतर काही नाही तरी २०१९ चा निकाल फिरवायची ताकद यांच्यात आहे हे लक्षात घेउन.

आता या आंदोलनात फक्त विद्यार्थीच नाहीत हे नक्की. अशी आंदोलने लोकप्रिय होऊ लागताच इतर अनेक लोक त्यात घुसतात. अशा कोणी घुसखोरांनी हे मुद्दाम चिघळावे म्हणून पोलिसांवर हल्ले केले आणि मग चिडून पोलिसांनी मारहाण सुरू केली, त्यात हे विद्यार्थी at the wrong place at the wrong time होते, असेही असू शकते. एक दोन पोलिसांच्या मुलाखती पाहिल्या, ज्या सिन्सियर वाटल्या - त्यांना जमाव मारत होता, त्यांच्याही चेहर्‍यावर, अंगावर जखमा होत्या. जमाव पोलिसांना मारतानाच्या क्लिप्स आहेत.

पण त्यापेक्षा जास्त क्लिप्स पोलिस पोरांना/पोरींना मारतानाच्या आहेत. त्या पाहूनही अनेकांना हे देशद्रोही वगैरे आहेत असे कसे वाटू शकते हे समजण्यापलीकडचे आहे. का त्यांच्या सोमि फीड मधे या त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत? त्यांना फक्त सोयीस्कर क्लिप्स येतात? ती ही शक्यता आहे.

पेपर फुटी वर आंदोलन करता करता स्वतःला अल्फाबेटच्या शेवटच्या अक्षराची समजणारी ही जनरेशन पार भरकटली हेच gen Z ?? देशाचे तुकडे तुकडे होण्याची स्वप्न बघणारी मंडळी पण सामील, त्यात आचकट विचकट हिडीस नाचणारी नर की मादी याच भान नसणारी पण सामील त्यात कारण नसताना हिंदु जन भावना दुखवणारे पण सामील त्यात फॉरेन फंडींग ने ४ टाईम 2000 हजार लोकांना दारु शारू सोबत पोसणारा पण सामील
काय च्या काय वाट लावलीय मूळ विषयच राहिला बाजूला
भले काँग्रेसच्या जमान्या पासुन पेपर फुटो क्रांती दिसतेय आत्ताच इस्लाम कुर्वाळणाऱ्या लोकांना
अश्या झुरळ लोकांना जागा दाखवलीच पाहिजे गटार हे एकमेव स्थान!

https://www.instagram.com/reel/DbH-14ioa9B/?igsh=bjY4N3VxdmxoenUy

पावडरची धमकी देणारा पोलिस.
मला हा तसा साधा वाटला.
या प्रोटेस्ट मुळे आपल्याला काम लागले म्हणून वैतागलेला आणि खोटी धमकी देणारा वाटला. त्यांना तेवढ्यापुरते घाबरवायला आणि घरी पाठवायला. म्हणून ती मुलेही ते ओळखून कूल react करत होते.

आश्चिगची पोस्ट आवडली.

मला असं वाटतं की वर्षानुवर्षं आंदोलनं, मोर्चे, दंगे, घोषणा हे प्रकार सुरू आहेत. आपण सगळ्यांनीच हे अनुभवलं आहे.
GenZ पुन्हा तेच करत असतील तर काय फायदा? यापेक्षा out of box thinking करण्याची गरज आहे. याचा राजीनामा, त्याचा राजीनामा असले जुनेपुराणे साचे वापरण्यापेक्षा सरकारकडे ठोस मुद्दे घेऊन चर्चा करावी. It will be more productive instead of being destructive and using it for political narrative.

माझ्यामते धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यापेक्षा त्याच्या डोक्यावर बसून सिस्टीम क्लीन करायला लावा. कारण पेपरफुटी ही समस्या कोणाच्या राजीनाम्यानं नष्ट होण्यातली नाही. वर्षानुवर्षे ही सिस्टीम बनली आहे आणि ती बनण्यामागे मानवी स्वभाव, हाव, पैसे खाण्याची वृत्ती, यशासाठी शॉर्टकट्स शोधण्याची तयारी, समाजात ठरावीक डिग्रीजना असलेलं महत्त्व अशी अनेक कारणं आहेत. त्यामुळे ही सिस्टिम नाहीशी करायची तर सर्वांगानं समूळ विचार होण्याची गरज आहे. त्यावर तात्पुरता, वरवरचा असा काहीही उपाय नाही. सरकारनंही आडमुठी भुमिका सोडून विद्यार्थ्यांशी खुला संवाद साधावा आणि विद्यार्थ्यांनीही पेपरफुटी समस्येचा समूळ नाश कसा करता येईल यावर आपले विचार मांडावेत. एक विधायक कार्य करण्यावर भर द्यावा. दोन्ही बाजूचे राजकारण विसरून देशातील नव्या पिढीच्या हिताचे निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करावे.

ये नया भारत है. सोच बदलो दुनिया बदलेगी.

सुबोध खरे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर सतत जो हल्ला केला जात आहे, ही माझ्यामते झुंडशाही आहे.>>>>
सहमत, खरे त्यांची बाजू संयमीत पणे मांडत होते.

काल रात्री सोनम वांगचूक यांनी उपोषण माघे घेतले, हे एक बरं झालं. आत्ता झुरळाणी पण चर्चेला गेलं पाहिजे.
दुसऱ्यांदा जेंव्हा परीक्षा झाली तेंव्हा Air force ची विमान वापरली होती पण ही ठिगळ झाली. Air force काय प्रत्येक वेळेस येणार नाही.
त्यापेक्षा इतर देशात खास करून चीन मध्ये परीक्षा कशा घेतल्या जातात याचा अभ्यास करून उपाय योजना करायला पाहिजे.

संयमित! बsssssरं!
मग प्रशासकांकडे तक्रार करा. भूक हरताळ ही करू शकता. तिकडे कोणीतरी संसदेवर... आपलं प्रशासकांच्या घरावर... मोर्चा काढणार आहे, तो काढू शकता. बाकी वैधानिक इशारा: गन लॉज बद्दल माहिती काढून जा. लाठीपेक्षा ते लय डेंजर!

मामी + आश्चिग

+१०,०००

हल्लीच एक व्हिडिओ बघायला मिळाला, इथे व्हिडिओ चिकटवता येणार नाही म्हणून त्या व्हिडिओचे transcript बनवून इथे देतो आहे.

Revolutions are romantic until they destroy countries. The world keeps asking why India never erupts the way others do. Why no Arab Spring? Why no colour revolution? Why no sudden collapse?
The answer is uncomfortable and deeply strategic. India is bored with revolution. It has already seen what chaos looks like: Partition, Emergency, insurgencies, economic collapse in 1991.
India doesn't mythologise upheaval. It remembers the cost. While other societies still chase the fantasy of instant change, India has learned something brutal: **Revolutions don't empower people. They replace elites, usually with worse ones.**
That boredom is not apathy. It's experience. Protests happen—loud ones, angry ones—but they rarely turn into regime-ending movements. Why? Because Indians don't believe collapse leads to justice. They believe collapse leads to years of survival mode.
So instead of tearing the system down, they suffocate it slowly:
* Votes
* Courts
* Bureaucracy
* Federal pressure
* Time
This drives foreign observers mad. They expect fire; India gives delay. They expect slogans; India gives fatigue. And that fatigue is stability.
A society that has outlived empires, ideologies, and economic disasters doesn't gamble everything on rage. India doesn't fear change; it fears starting from zero again. That's why revolutions don't sell here. Drama doesn't scale here, and chaos doesn't win elections here.
India's strength isn't blind loyalty to the state. It's skepticism toward fantasies. Other nations are still addicted to the idea of burning everything down. India already knows what rises from the ashes—usually, nothing better.
That's why India bends, but doesn't break. Complains, but doesn't implode. Argues endlessly, but keeps moving forward.
Boredom with revolution isn't weakness. It's a civilization that has learned the price of chaos and decided it's not worth paying again.

पटायला पाहिजेच असा आग्रह नाही पण आवडले म्हणून शेअर केले.

खर्‍यांनी सांगितलेलं आहे की केंब्रिज का ऑक्सफर्ड घेत असलेल्या कुठल्या इंटरनॅशनल परिक्षांचे पेपर पण फुटलेले आहेत. मग आपलं ते काय विशेष! त्यांचे पण फुटतात. ही त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. त्यामुळे आपण संयमित आनंद मानू.

डोक्यावर बसून सिस्टीम क्लीन करायला लावायचं म्हणजे नक्की काय करायचा?>>> हे irrelevant आहे. महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रधान चा राजीनामा घ्यायला लावू नका.

२०२४ चा पेपर फुटीचा आरोपी निर्दोष सुटला आहे आज. CBI त्याच्या विरूध्द पुरावा सापडला नाही म्हणे.

रात्री महामानव फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करणार होते दोषींना कठोर शिक्षा देण्यासाठी. (की त्यांना लवकर क्लीन चिट देण्यासाठी).

https://www.instagram.com/reel/DbJImwmJlkO/?igsh=MXNhY2piZGp2MDBwcw==

"प्रधान चा राजीनामा मागू नका" भक्त अशा आविर्भावात म्हणतात जणू काही प्रधान ने शिक्षण क्षेत्रात जागतिक क्रांती केलीय आणि त्याच्या वाचून काहीच करता येणार नाही.

प्रधानाचा राजीनामा प्रातिनिधिक आणि प्रायश्चित म्हणून गरजेचा आहे, एक optic असावे की हे सरकार पण infaliable नाही, अकाउंटेबल आहे, जनता सर्वतोपरी आहे त्यामुळे ह्या आंदोलनात प्रधानाच्या राजीनाम्याशिवाय मजा नाही.

Additionally, having said that, ते एक ऑप्टिक असेल हे पण महत्वाचे आहे समजून घेणे.

पोरांच्या भविष्याचा विचार करता exam ecosystem कशी जास्तीत जास्त फूल प्रूफ होईल, करता येईल ह्यावर पण आंदोलनातूनच suggestions आलेली बरी वाटतील. टेक्नॉलॉजी वापर, फिजिकल पेपर मूव्हमेंट बाद करणे जे काही असेल ते subject एक्स्पर्ट जनतेने आंदोलनातच बसून फायनल करावे अन् सरकारच्या समोर ठेवलेल्या अटीत हा पण एक क्लाउस आहे म्हणून वट मंजूर करवून घ्यावेत

दिल्ली पोलिस facial recognition software वापरत आहेत आंदोलनातल्या मुलांना शोधायला. DU नी मुलांना जंतर मंतर ला जावू नका असा आदेश काढलाय बहूतेक.
आज माझी एक मैत्रिण, समिना दलवाई चालली आहे जंतर मंतर ला. आयमच्या दोघी मैत्रिणी पण जाणार होत्या.
हे एक अजून पोस्टर त्याच्या मैत्रिणीने बनवलेले...
IMG-20260723-WA0012.jpg

प्रधान राहिला काय किंवा त्याजागी कोणी आला काय पेपर फुटू नयेत हे महत्त्वाचं. जोवर ते फुटण्याची आणि त्यातून फायदा होण्याची शक्यता आहे तोवर हे होत रहाणार. अर्थात कोणतीही सिस्टीम फुलप्रुफ नसणारच आहे. त्यातूनही कोणाला काही पळवाटा सापडू शकतात. त्यासाठी कायदे मजबूत करावेत म्हणजे धाक राहील.

एक ऑप्शन असा की परीक्षेसाठी एकच पेपर न काढता सेट ऑफ (समजा) २० पेपर तयार केले आणि ते रँडमली परिक्षार्थींना दिले. एका कोणाला २ नंबरचा, एकीला १९ नंबरचा पेपर येईल. नक्की कोणता येणार हे माहीत नाही. परीक्षा ऑनलाईन घेतली तर प्रश्न पूर्ण मिक्समॅच करून देता येतील. हे करणं अशक्य नाही.

अजून विचार केला तर अजून काही ऑप्शन्स मिळू शकतात.

नेहरूंनी बनवलेली सिस्टिम क्लीन करायला वेळ लागेल अशी फुसकुली अजून सोडली नाही का ? 2021 पासून नीटचा गोंधळ सुरू आहे, त्यावर काय उपाययोजना केली ? आता जी पुनर्परीक्षा घेतली तेव्हा हवाईदलाची मदत घ्यावी लागली, टेलिग्रामवर बंदी घालायला लागली मग कपाळाची सुधारणा ?
हे आंदोलन आता आरक्षणाकडे वळवले जात आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये फूट पडावी.

गेल्या वेळाच्या नीट पेपरफुटी मध्ये अटक केलेल्या लोकांना सोडून दिलं गेलं आहे कारण CBI त्यांच्यावर पुरावा अभावी चार्ज शीट फाइल करू शकली नाही.
पंतप्रधानांनी गेल्या 2-4 वर्षात किमान 7-8 वेळा तरी वेगवेगळ्या पेपरफुटींवर कार्यवाही करणार असे वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या भाषणात सांगितलं होतं.
तरीही या ही वर्षी पेपर फुटला. CBSE परिक्षा पेपर तपासणी मध्ये मध्ये गोंधळ झाला. आणि हे सगळं शिक्षण मंत्रालयाच्या आखत्यारीत येतं. शिक्षण मंत्री फेल झालेत म्हणून त्यांचा राजीनामा.

प्रधान च्या डोक्यावर कोण बसणार? आणि त्यासाठी कायद्यात काय तरतूद? आणि प्रधान गेली ६ वर्षे शिक्षण मंत्री आहे. त्या आधी ७ वर्षे तो पेट्रोलियम मंत्री होता एक वर्षे पोलाद.

प्रधानाचा राजीनामा प्रातिनिधिक आणि प्रायश्चित म्हणून गरजेचा आहे,>> +100
जेव्हा कुठलाही मोठा घोटाळा/चूक होते, तेव्हा मुख्य व्यक्तीने स्वतः हून जबाबदारी घेणे गरजेचे आहे.
' सब चलता है/ कुछ भी चलता है.. ' ही मानसिकता सोडणे गरजेचे आहे.
जनतेला जब द्यावा लागणार हे माहित असेल ते तरच पुढच्या वेळी दबाव राहू शकतो.

अकाउंटंबिलिटी? ती कशाशी खातात ?

उत्तराखंडमधील डेहराडून येथील 'वीर माधो सिंह भंडारी उत्तराखंड टेक्निकल युनिव्हर्सिटी' (UTU) मधील अभियांत्रिकीचे (BTech) दोन पेपर परीक्षापूर्वीच व्हॉट्सॲप ग्रुपवर लीक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विद्यापीठाने दोन्ही विषयांच्या परीक्षा रद्द केल्या असून एका सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कविता कोणाची असेल बरं?

जब कर्तव्य ने पुकारा तो कदम कदम बढ़ गये
जब गूंज उठा नारा 'भारत माँ की जय'
तब जीवन का मोह छोड़ प्राण पुष्प चढ़ गये
कदम कदम बढ़ गये
टोलियाँ की टोलियाँ जब चल पड़ी यौवन की
तो चौखट चरमरा गये सिंहासन हिल गये
प्रजातंत्र के पहरेदार सारे भेदभाव तोड़
सारे अभिनिवेश छोड़, मंजिलों पर मिल गये
चुनौती की हर पंक्ति को सब एक साथ पढ़ गये
कदम कदम बढ़ गये
सारा देश बोल उठा जिंदाबाद
तो दहल उठे तानाशाह
भृकुटियां तन गई
लाठियाँ बरस पड़ी सीनों पर माथे पर

५० ग्राम पावडरवाल्या पोलिस कॉन्स्टेबल पवन सांगळेची चौकशी होणार आहे. तूर्तास त्याची बदली कंट्रोल रूमला करण्यात आली आहे.
दरम्यान मुंबई पोलिसांनी ज्यांच्या विरोधात एफ आय आर नोंदवलेत अशा तरुणांची संख्या जवळपास १५०० झाली आहे. यांना धमकावलं जातंय, पोलिस स्टेशनच्या खेपा मारायला लावल्या जाताहेत आणि लाइव्ह लोकेशन शेअर करा असं सांगितलं जातंय ते वेगळंच.

याआधी प्रत्यक्षात ड्रग प्लांट केल्याचे प्रकार झाले आहेत
https://www.ndtv.com/india-news/on-cctv-cops-seen-planting-drugs-on-man-...
हेही मुंबई पोलिस

--
दिल्ली - तीन तरुणांवर पेलेट गन्स मुळे झालेल्या जखमांसाठी उपचार सुरू आहेत.

--
उच्च शिक्षण सचिवाची बदली पंचायत राज मंत्रालयात झाली. नरेश गंगवार नवे उच्च शिक्षण सचिव.
Naresh Pal Gangwar's wife, mother and son collectively received over ₹1.16 crore in National Horticulture Board subsidies while he served as Secretary, Animal Husbandry & Fisheries. ही गेल्या महिन्यातलीच बातमी आहे.

Pages