Cockroach जनता पार्टी झिंदाबाद !

Submitted by ऋन्मेऽऽष on 20 May, 2026 - 16:30

जगभरातले जेन झी पेटून उठत आहेत.
आम्ही भारतीय झुरळे कसे मागे राहणार.
एक ठिणगी पडली आणि बघता बघता वणवा पेटला.

हे आमचे इंस्टाग्राम अकाऊंट
फक्त चार (४) दिवसात 8.5 मिलियन म्हणजे तब्बल 85 लाख फॉलोअर्स.
https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

आणि ही आमची वेबसाईट
https://cockroachjantaparty.org/

कुठल्या वेगळ्याच जगात राहत असाल आणि हे काय याची कल्पना नसल्यास धागा वाचत राहा...

क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पेपरफुटीबद्दल काय म्हणत आहेत हे मला माध्यमांमध्ये सहजपणे कोठे वाचायला मिळाले नाही
>>>>>>>

हो, याच्याशी मात्र सहमत आहे.
आपला मिडिया तसाही विकला गेलेला वाटतो मला.
देशाच्या समस्यांवर बोलणे किंवा सरकारला जाब विचारणे असले प्रकार तिकडे जणू होतच नाहीत.

>>> आपला मिडिया तसाही विकला गेलेला वाटतो मला.
देशाच्या समस्यांवर बोलणे किंवा सरकारला जाब विचारणे असले प्रकार तिकडे जणू होतच नाहीत.

बहुधा म्हणून तर असे पक्ष निर्माण होतात. आता कॉक्रोच जनता पार्टी सध्या एकंदरीत काय करत आहे?

(>>> क्रांती आता फार दूर नाही...
ऑफ द कॉकरोच बाय द कॉकरोच फॉर द कॉकरोच !)

ह्या मूळ धाग्यातील विधानाच्या अनुषंगाने विचारले.
=====

ते कंसातील विधान तुमचेच आहे की कॉक्रोच पार्टीच्या पदस्थांचे?

हे घ्या बेफी
त्यांचेच अकाउंट चेक करा
इथे त्यांचे थेट अपडेट्स मिळतील.
मी काही लिहिले ते माझे वाक्य की त्यांचे वाक्य असे गैरसमज राहणार नाहीत Happy

https://www.instagram.com/cockroachjantaparty?igsh=YjhvYnhrZWJsMWtj

ते मगाशी बघितले होते. तरुणांचे, तरुणांसाठी वगैरे हेडलाईन आहे आणि खाली फोटो आहेत.

ते सगळे (झिंदाबाद कॉक्रोच) सध्या काय करत आहेत?

हे ह्या धाग्यावर ideally धागाकर्त्याने लिहायला हवे ना? ते तीन, चारवेळा विचारले, पण कोणीच काही लिहिले नाही.

झिंदाबाद कॉक्रोच पार्टीचे आंदोलन सध्या कोणत्या वळणावर आहे व आता त्यांची उद्दिष्टे काय आहेत?

कोठे संदर्भ मिळाला तर अवश्य सांगा.

हे ह्या धाग्यावर ideally धागाकर्त्याने लिहायला हवे ना?
>>>>>

आयडीयली असे गरजेचे नाही.
कारण धागाकर्ता हा केवळ मायबोलीचा सभासद असतो. कॉकरोच किंवा कुठल्याही पार्टीचा कार्यकर्ता किंवा प्रवक्ता नाही.

उदाहरण म्हणून मायबोलीवरचा चालू घडामोडी मधील कुठलाही धागा घेता येईल. धाग्याच्या विषयाचे लेटेस्ट अपडेट धाग्याकर्त्याने वेळोवेळी पुरवावेत हे काही गरजेचे नसते.

अन्यथा त्या लॉजिकने उद्या मी मेलो तर मायबोलीवरून हा धागा उडवा अशी मागणी कराल Happy

त्याशिवाय तुमचा कुठलाही मुद्दा ग्राहय धरला जाणार नाही

हे म्हणजे ऑमलेटची पाककृती टाकण्यासाठी तुम्ही कोंबडीसारखे कुंथून अंडे टाकत नाही म्हणून बाद म्हणण्यासारखे झाले एकंदरीत

त्यांनी का राजीनामा द्यायचा? आणि दिला तर अशी कोणती सुधारणा होईल की जीमुळे पेपरफुटीमुळे नुकसान झालेल्यांचे नुकसान भरून येईल?

>>>>>>>

पहा: कायद्यानुसार असलेल्या शिक्षेचे अपुरेपण

>>> त्यांनी का राजीनामा द्यायचा?
>>>
हे लिहिताना लाज वाटत नाही का तुम्हाला?

नवीन Submitted by साजिरा on 2 July, 2026 - 22:42

मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने प्रश्न सुटेल असे वाटत नाही. मंत्री घरी बसतील. पुन्हा कधीतरी पेपर फुटू शकेल. कदाचित तेव्हाचेही मंत्री राजीनामा देतील. समस्या तशीच राहू शकेल. समजा मंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना हायकमांडने द्यायला लावला तर एक संदेश लोकांमध्ये जाईल की ह्यांच्यात नीतीमत्ता शिल्लक आहे. तरीही, समस्या तशीच राहू शकेल, पेपर फुटत राहू शकतील.
=====

कॉक्रोच पार्टीचे आंदोलन आता कोणत्या वळणावर आहे ते हिंदी, मराठी माध्यमांमधून तरी काही समजत नाही. हा धागा कॉक्रोच पार्टीची झिंदाबाद करणारा धागा आहे. येथे कोणीतरी त्याबद्दल सांगेल असे वाटते. उत्सुकता ह्यासाठी आहे की जो गवगवा झाला होता तो आता का होत नसावा!

सत्ताधारी पक्षाचे समर्थक "काहीही करू नका" मताचे आहेत का ? नाही तर मग तुमचे सगळे धारधार प्रश्न रडत अडखळत "काही तरी करा बुवा" म्हणणाऱ्याला का आहेत ?

खरंतर त्या मोटेगावकर आणि इतर मंडळींना पण सोडून द्यायला पाहिजे. त्यांनी नसता पेपर फोडला तर दुसऱ्या कोणीतरी फोडलाच असता. दुसर्यांनी नसता तर कोणीतरी तिसरा आलाच असता.
त्यांना अटक करून प्रश्न सुटेल असे वाटत नाही. त्यापेक्षा सगळे प्रवेश management कोट्यातूनच करायला पाहिजे.

दिपके पोलिसांना का शिव्या देतोय ? (एरवी पोलिसाचा शिव्या खाणे चार्टर्ड हक्क असला तर असू देत) पोलिसांना provoke करतोय तो असे चित्र निर्माण होते आहे.

आपण पोलिस आणि न्यायालय यांच्यावर वर्षाला कित्येक हजार करोड खर्च करतो. पण गुन्हे तरीही होत आहेतच. ते बंद झाले नाहीत. तर मग हा खर्च नक्की कश्याला आहे हे मला कोणी सांगेल का?

Following widespread outrage over a handwritten "guess paper" leak, the central government has officially cancelled the May 3, 2026 NEET-UG examination and implemented several sweeping legal, administrative, and logistical measures.
CBI Probe Ordered: The Ministry of Education handed over the comprehensive investigation to the Central Bureau of Investigation (CBI) to dismantle organized paper leak networks.
Mass Arrests: Multiple crackdowns across several states—including Rajasthan, Haryana, and Maharashtra—have led to the arrest of key kingpins and suspects associated with the exam mafia.
Parliamentary Accountability: The Parliamentary Standing Committee on Education has strictly demanded written action-taken reports from both the National Testing Agency (NTA) and the CBSE regarding loopholes in examination execution and command failures.
Revised Exam Schedule and Candidate Relief
Nationwide Re-test: A fresh pan-India NEET-UG re-examination is officially scheduled for June 21, 2026.

No Extra Fee: Over 22 lakh registered medical aspirants can appear for the re-test without any additional registration fees.
City Preference: To minimise candidate distress, Union Education Minister Dharmendra Pradhan announced that students are permitted to choose their preferred exam city for the re-test. Admit cards are being re-issued on the official NTA Portal.

Tightened Security Measures for the June 21 Re-test
Military Logistics: The government has roped in the Indian Air Force (IAF) to securely transport confidential question papers from printing presses directly to 18 key locations nationwide, eliminating transit leaks.

Paper Setters Isolation: Subject matter experts and paper setters have been placed under strict communication blackouts and isolation in undisclosed locations without phone or internet access.
Cyber Crackdown: The NTA and Ministry of Electronics and Information Technology are actively collaborating with tech giants (including Meta, Google, and Telegram) to instantly block channels attempting to fraudulently sell fake or simulated re-test question papers.

Long-term Structural Reforms
End of Pen-and-Paper Format: The Ministry of Education announced a complete policy shift to eliminate physical paper transit vulnerabilities. Starting from 2027, NEET will permanently migrate to a Computer-Based Test (CBT) format with heavy digital encryption safeguards.
Radhakrishnan Committee Implementation: The government has committed to fully enforcing all structural and data security recommendations laid out by the high-level expert committee headed by former ISRO Chief Dr. K. Radhakrishnan
.If you are an aspirant or parent looking to navigate these recent changes, let me know if you need help finding how to re-download your admit card, details on exam city center guidelines, or updates on the CBT transition protocol.

अजून काय काय करायला हवेय?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो याहून काय वेगळे करणार आहे?

Submitted by सुबोध खरे on 9 June, 2026 - 15:25

Following widespread outrage over a handwritten "guess paper" leak, the central government has officially cancelled the May 3, 2026 NEET-UG examinationand implemented several sweeping legal, administrative, and logistical measures.
CBI Probe Ordered: The Ministry of Education handed over the comprehensive investigation to the Central Bureau of Investigation (CBI) to dismantle organized paper leak networks.Mass Arrests: Multiple crackdowns across several states—including Rajasthan, Haryana, and Maharashtra—have led to the arrest of key kingpins and suspects associated with the exam mafia.
Parliamentary Accountability: The Parliamentary Standing Committee on Education has strictly demanded written action-taken reports from both the National Testing Agency (NTA) and the CBSE regarding loopholes in examination execution and command failures.Revised Exam Schedule and Candidate ReliefNationwide Re-test: A fresh pan-India NEET-UG re-examination is officially scheduled for June 21, 2026.

No Extra Fee: Over 22 lakh registered medical aspirants can appear for the re-test without any additional registration fees.City Preference: To minimise candidate distress, Union Education Minister Dharmendra Pradhan announced that students are permitted to choose their preferred exam city for the re-test. Admit cards are being re-issued on the official NTA Portal.

Tightened Security Measures for the June 21 Re-testMilitary Logistics: The government has roped in the Indian Air Force (IAF) to securely transport confidential question papers from printing presses directly to 18 key locations nationwide, eliminating transit leaks.Paper Setters Isolation: Subject matter experts and paper setters have been placed under strict communication blackouts and isolation in undisclosed locations without phone or internet access.Cyber Crackdown: The NTA and Ministry of Electronics and Information Technology are actively collaborating with tech giants (including Meta, Google, and Telegram) to instantly block channels attempting to fraudulently sell fake or simulated re-test question papers.

Long-term Structural ReformsEnd of Pen-and-Paper Format: The Ministry of Education announced a complete policy shift to eliminate physical paper transit vulnerabilities. Starting from 2027, NEET will permanently migrate to a Computer-Based Test (CBT) format with heavy digital encryption safeguards.Radhakrishnan Committee Implementation: The government has committed to fully enforcing all structural and data security recommendations laid out by the high-level expert committee headed by former ISRO Chief Dr. K. Radhakrishnan.If you are an aspirant or parent looking to navigate these recent changes, let me know if you need help finding how to re-download your admit card, details on exam city center guidelines, or updates on the CBT transition protocol.

अजून काय काय करायला हवेय?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो याहून काय वेगळे करणार आहे?

Submitted by सुबोध खरे on 9 June, 2026 - 15:25

चार आठवडयांनी यात अजून काय करायला हवं आहे याचे कोणी उत्तर देईल का?

आपण पोलिस आणि न्यायालय यांच्यावर वर्षाला कित्येक हजार करोड खर्च करतो. पण गुन्हे तरीही होत आहेतच. ते बंद झाले नाहीत. तर मग हा खर्च नक्की कश्याला आहे हे मला कोणी सांगेल का?

उद्या आशुतोष किंवा उन्मेष किंव चिमण ने आपल्या बायकोला मारहाण केली तर तो गुन्हा आहे का ? अर्थातच

चिमण ला तीन वर्षे खटला चालवून एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली.

म्हणून उन्मेष आपल्या बायकोला मारहाण करणार नाही असे होईल का?

आशुतोष दारू पिऊन गाडी चालवत असताना मध्येच फोन आला म्हणून तो खाली वाकला आणि त्यात त्याचे गाडी वरील नियंत्रण एक क्षणासाठी सुटले आणि शेजारच्या दुकानात त्याची गाडी शिरली आणि दुकानदाराचे ५० हजाराचे नुकसान झाले.

गुन्हा तर झालाच आहे

या सर्व ठिकाणी पोलीस आणि न्यायालयांनी काय करावे अशी आपली अपेक्षा आहे?

आपण म्हणत असला तर पोलीस न्यायालये बंद करून टाकू.

अकबरउद्दीन ओवैसी काय म्हणाले होते आठवत आहे का?
AIMIM MLA Akbaruddin Owaisi's notorious 2013 speech in Nirmal, Telangana, featured a highly controversial claim that if police forces were withdrawn for "15 minutes," his community would show the majority population what it could do. This inflammatory remark sparked massive political uproar and severe legal consequences

आपण पोलिस आणि न्यायालय यांच्यावर वर्षाला कित्येक हजार करोड खर्च करतो. पण गुन्हे तरीही होत आहेतच. ते बंद झाले नाहीत. तर मग हा खर्च नक्की कश्याला आहे हे मला कोणी सांगेल का?

देशाची गॉथम सिटी करून उपयोग नसतो प्रॅक्टीकली, कारण बॅटमॅन हे एक काल्पनिक पात्र आहे.

तर, अजूनही माझा मूळ प्रश्न अनुत्तरित राहतोय. दिपके पोलिसांना का शिव्या देतोय ? दिपके अमेरिकेहून आला, ना त्याला अरेस्ट केली ना हाणले किंवा "दमन" केले. त्याला पोलिस अधिकाऱ्यांचे प्रोटेक्शन मिळाले. दिपके पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात गेला, त्याने अर्ज केला की मला आंदोलन करायला परवानगी द्या, पोलिस म्हणाले घ्या , करा आंदोलन.

आंदोलन सुरू झाले, साड्या नेसून टकली पोरे धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागू लागले, लोकतांत्रिक, लोकशाहीवादी, उदारमतवादी आंदोलन, नीट मधे पेपर फुटला, विद्यार्थ्यांचे भविष्य खराब झाले, सरकारने जबाबदारी घ्यायला हवी, सपशेल मान्य, धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा आणि फेरपरीक्षा मुद्दा होता, परीक्षा झाली, गेलेले कोवळे जीव परत येऊ शकत नाहीत, दुर्दैव आपल्या उघड्या डोळ्यांनी हे तमाशे पाहावे लागतात.

मग हळूच आंदोलनात सोनम वांगचुक उतरतो, मागणी अजूनही धर्मेंद्रचा राजीनामा, ओके.

मग हळूच आंदोलनात योगेंद्र यादव उतरतात, नीट अन् विद्यार्थ्यांच्या जागी भलतेच बोलू लागतात !
का ?

मग हळूच सागरिका घोष आंदोलनात उतरतात, नीट, जीव मुकली पोरे, धर्मेंद्र बाजूला, वोट चोरी अजेंडा सुरू करतात
का ?

मृत विद्यार्थ्यांच्या बद्दल असलेली सहानुभूती आणि एक उस्फुर्त आंदोलन वापरून आपले अजेंडा रेटने सुरू करतात असे म्हणले तर एक फेन्स सीटर म्हणून मी चूक असेल का ?

इतके सगळे होऊन काल दिपके पोलिसांना शिव्या का देतो ?

चिमणला तीन वर्षे खटला चालवून एक वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली.
म्हणून उन्मेष आपल्या बायकोला मारहाण करणार नाही असे होईल का?
>>>

चिमणला शिक्षा करून ना उन्मेष त्याच्या बायकोला मारायचे सोडणार ना चिमणच्या बायकोच्या जखमा भरणार..
मग चिमणला शिक्षा करावीच का?
आणि शिक्षा करायचीच नसेल तर पोलिस आणि कोर्ट हवेतच का?

की पोलिस आणि कोर्ट फक्त सामान्य लोकांसाठी म्हणून गरजेचे आहेत?
राजकारणी नेत्यांना सर्व गुन्हे माफ आहेत असे म्हणायचे आहे!
कारण त्यांना शिक्षा तर कधी होत नाही. उलट त्यांना सरकारमध्ये उच्च पदे मिळतात.

तीच पदे आता त्यांच्याकडून काढून घ्यायची आहेत.

जेम्स वांड
तुमचा प्रॉब्लेम काय आहे? सर्वांनी एकत्र येऊन धक्का द्यायला पाहिजे. जे होतंय ते बरोबरच आहे. कारण लोकांमध्ये सर्वकश असंतोष आहे, कदाचित तुमच्या मते सध्याची राजवट वंदनीय आहे .असे असेल तर तुमची मते समजू शकतात,

खर तर ह्या सगळ्यासाठी नेहरु जबाबदार आहेत. उगाच शिक्षणसंस्था काढून ठेवल्या. त्यासाठी परीक्षा आल्या पेपरफुटी आली. त्यापेक्षा मंदिर, मशीद, चर्च इत्यादी (politically correct) बांधून लोकांना भक्तिमार्गाला लावायला हवे होते.

मंदिर आणि मशीद दोन्ही गरजेचे. तरच धर्माधारीत राजकारण खेळता येते.

कोकरोच पार्टी इंस्टाग्राम पेज वर जे युवा मला दिसतात त्यांच्या कॉमेंट वाचून लक्षात येते की ते या धार्मिक राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशाचा विचार करणारे आहेत.

भले कॉकरोच पार्टी पुढे जाऊन फ्रॉड निघेल
पण माझे लक्ष आहे ते युवा पिढीच्या विचारांवर..
त्यांना या द्वेषाच्या राजकारणातून बाहेर काढायला हवे..

कदाचित तुमच्या मते सध्याची राजवट वंदनीय आहे .असे असेल तर तुमची मते समजू शकतात

माझी मते तुम्ही ठरवणार का केशव ?

म्हणजे एकंदरीत मी जर हे म्हणले की मला वैयक्तिक दृष्ट्या हे आंदोलन भरकटलेले वाटते आहे तर लगेच मला उजवा, मोदीभक्त इत्यादी ठरवून गॅसलाईट करणार ? हीच का ती फ्री थिंकिंग, फ्री एक्स्प्रेशन परंपरा ? का माझ्या सामाजिक, जातीय, धार्मिक इत्यादी गोष्टींवर आगाऊ स्टिरिओटाईप बनवून बोलता आहात ? असे असल्यास स्पष्ट नमूद करा, मी चर्चेतून रेक्युज घेतो आपला.

आणि शांत संयत चर्चा करायची असेल तर हे असे गॅस लायटिंग करण्याची काही खास गरज नाहीये. धन्यवाद !

अरे बापरे,
Gaslighting वगैरे काही नाही.
Gaslighting is the manipulation of someone into questioning their perception of reality.
जे लोक मनोमन ह्या राजवटीला पाठींबा देतात तेच अशी खुसपटे काढत रहातात.
तुम्हाला प्रधान ह्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे असे वाटते कि नाही? आईन्सटाइनला पायलट करणारी आणि डार्विनला नाकारणारी शिक्षण पद्धती बदलायला पाहिजे असे वाटते कि नाही?
जर ह्याचे उत्तर हो असे असेल तर एकट्या दिपकेच्याने हे होणे नाहीये. त्या साठी सर्वांचा सहभाग पाहिजे. प्रधान केवळ टिप ऑफ आईसबर्ड आहे.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो याहून काय वेगळे करणार आहे?
>>

भक्तांनी हे वाक्य आपणच बोललोय हे लक्षात ठेवा
हेच वाक्य आपल्या नेत्यांना ऐकवा तेलंगणा आणि राजस्थान मध्ये हिंमत असेल तर
विचारा त्यांना का तुम्ही तिथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहात, दुसरा शिक्षण मंत्री नेमला तर तो असे काय वेगळे करणार आहे

आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचे पहावं वाकून ही म्हण भाजपे इतके कोणीच सार्थ करत नाहीत

हेच निलाजरे 2014 साली मोदीला सत्ता द्यावी म्हणून अशीच argument करत होते ते सोयीस्करपणे विसरलेत

दिपके पोलिसांना का शिव्या देतोय ? (एरवी पोलिसाचा शिव्या खाणे चार्टर्ड हक्क असला तर असू देत) पोलिसांना provoke करतोय तो असे चित्र निर्माण होते आहे.>>>>>
https://www.youtube.com/watch?v=mspccxjdKo0

सहा मिनिटांचा व्हिडिओ पाहिला. पोलिस विनाकारण मारहाण करत असतील तर ते चुकीचेच आहे.

भ्रष्टाचारी लोकांना पदे दिली जात आहेत आणि त्यांच्याविरोधात जे आंदोलन उभे करत आहेत त्यांना मारहाण होत असेल तर पोलिसांवर टीका होणे स्वाभाविकच आहे.

अर्थात पोलिसांना कोणाचे आदेश असतील हे सांगायला नकोच.

अजून काय काय करायला हवेय?

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन दुसरा शिक्षण मंत्री नेमला तरी तो याहून काय वेगळे करणार आहे?

>>>>>>>>>

मंत्र्यांनी राजीनामा दिल्याने प्रश्न सुटेल असे वाटत नाही. मंत्री घरी बसतील. पुन्हा कधीतरी पेपर फुटू शकेल. कदाचित तेव्हाचेही मंत्री राजीनामा देतील. समस्या तशीच राहू शकेल. समजा मंत्र्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना हायकमांडने द्यायला लावला तर एक संदेश लोकांमध्ये जाईल की ह्यांच्यात नीतीमत्ता शिल्लक आहे. तरीही, समस्या तशीच राहू शकेल, पेपर फुटत राहू शकतील.

>>>>>>>>>

असे म्हणणे असणाऱ्या व्यक्तीकडे नीतिमत्ता काही एक असेल असे वाटत नाही.

Pages