गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोड आलेली कडधान्य ४ वाजता साठी एकदम मस्त!! हवा तर त्यात कांदा, टोमॅटो, चाट मसाला, मीठ, लिंबु पिळुन खा.>>
कल्पना खूपच छान आहे. आजच मूग,मटकी भिजवते.
केळ्यामुळे पायात गोळे येणं कमी होतं असं अलिकडेच कळलं म्हणुन दिवसाला १ केळं खावं.

गोळ्या येण्याचा (इतर काही कारणांसहित) संबंध मॅग्नेशियम आणि कॅल्शियमशी आहे. व्हिटॅमिन्स नक्की घ्या डॉक्टरला विचारुन. अर्थात सगळे देतातच.

धन्यवाद सर्वांचे
prenatal chalu aahet DUET DHA.

आणि नानबा Happy तुमच्या बोलण्याने आई ची आठ्वण आली पट्कन.

मनापासुन आभार सगळ्यांचे ...

मोड आलेली कडधान्य प्रकृतीला बेस्ट असली तरी पोटाला झेपताहेत का ते बघा. अपचनाचा, गॅसेसचा त्रास होऊ शकतो न शिजवलेल्या कडधान्यामुळे.

प्रोटीन्ससाठी सातूचं पीठ, मेतकूट-भात, मिश्र कडधान्याचे भिजवून केलेले दोसे/धिरडी/इडल्या/ढोकळे असे पदार्थ मधल्या वेळात खाता येतील. राजमा, छोले, चणे शक्यतोवर रात्रीच्या जेवणात टाळावे.

व्हे प्रोटीनबद्दल इथे कुणी लिहिलेले दिसत नाही. प्रेग्नन्सीत खायची इच्छा होत नसल्याने जर डाळी,मांसाहार कमी घेतला जात असेल तर व्हे प्रोटीन खूपच उपयुक्त आहे. एका स्कूपमध्ये २२ ते २५ ग्रॅ. प्रोटीन असते. तयार शेक्स आणून पिण्यापेक्षा ड्राय व्हे प्रोटीन पावडरचा डबा आणणे सोयीचे पडते. व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉकलेट अशा वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये मिळते. अमेरिकेत टारगेट, वॉलमार्ट च्या औषधांच्या सेक्शनजवळ हेल्थ फूड मध्ये मिळेल. इएएस किंवा बॉडी फॉर्ट्रेस कंपन्यांचे सहज मिळायला हवे.
व्हे प्रोटीन कसे निवडून घ्यावे ह्यावर व्हिवा-लोकसत्तात आलेला हा लेख.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=359...

व्हे प्रोटीनची जाहिरात मुख्यत्वे अ‍ॅथलीट्स साठी केली जात असली तरी आहारात प्रथिने कमी असणार्‍या कुणीही ते घ्यायला हरकत नाही. मी स्वतः पूर्ण प्रेग्नन्सीभर घेतले होते ( भारतातल्या माझ्या एका मैत्रिणीच्या सल्ल्यावरुन माझ्या डॉक्टरांना विचारुन ) त्यानंतर वजन कमी करताना ही घेत होते. आता ही अधून मधून घेतेच.

प्रिया अभिनंदन.

रोज एक शहाळ्याचे पाणी प्यावे त्याने ही स्किन सुन्दर होते बाळाची व पोटॅशियम चा सोर्स आहे ते.
भाज्या व फळे वाढ्वायला हवे. साजूक तूप थोडेसेच पण खावे. ( खूप तूप खाल्ल्याने वजन वाढेल.)
हाय हील्स घालत असलीस आजिबात बंद कर. ( अगदी आजी बाइचा सल्ला पण हे नऊ महिने का रिस्क घ्या)
फोलिक अ‍ॅसीड सप्लिमेन्ट्स बद्दल डॉ. ला विचार. आल्दबेस्ट.

प्रिया९९ तुझे अभिनंदन...
तु जर या भागातली सगळी पाने वाचून काढ्लीस तर त्याचा फार उपयोग होईल..
तुझ्याकडे " वंशवेल " पुस्तक आहे ना, मग ते अगदी व्यवस्थित वाचून काढ .. जेणेकरून तुलाच तुझ्या आहाराचा आढावा येइल. माझ्याकडे गितांजली शाह यांचे गर्भसंस्कार आणि वंशवेल आहे. वंशवेल पुस्तकाचे तर मी अक्षरशः पारायण केले आहे ,अजुनही करते. नक्की उपयोग होतो.

मी तर मला जेव्हापासून सहजलेले तेव्हापासून सात आठ काळे मनुके आणि दोन बदाम रात्री भिजवून ठेवायची आणि न चुकता सकाळी खायायची. नंतर दूध प्यायची. दिवसातून एखादे तरी फळ खावे. दिवसातून दोनदा लिंबू रस घातलेली कोशिंबीर आवर्जून खावी.

तु डॉ. कडे गेलीच असशील , त्यांनी औषधे देखील दिली असतील पण खरच एक सांगू का.. ती औषधे तर वेळेवरतर घे पण तुझा आहार पण तितका चौकस घे म्हणजे तुला त्याचा आता तर फायदा होईलच पण पुढे पण उपयोगी पडेल...

नेहमी आनंदी रहात रहा , आणि मायबोलि वाचत रहा.. म्हणजे प्रश्नच नाही.

ऑल द बेस्ट

धन्यवाद सर्वन्ना... सगळे पोस्ट्स वाचुन खूप छान माहिती मिळते आहे.
माझाही प्रश्नः
शतावरी कल्प कधीपासुन घ्यावा? लॅक्टेशन साठी घ्यायचा असतो न तो?? मला पण कोणितरी सुचवलं होतं, पण डॉ.नी एकदम्च खोडुन काढलं. Sad
मी २१ वीक्स प्रेग्नेन्ट आहे.

शहाळ्याचं पाणी आवडत असेल तर जरुर प्यावं दिवसातून एकदा. त्याने अ‍ॅसिडीटी, घशाशी येणं, जळजळ कमी व्हायला मदत होईल. पण बाळाची स्कीन सुंदर वगैरे होते असं अजिबात नाही हा स्वानुभव.

उसळी, डाळी वगैरे शक्यतो दुपारी खाल्लेल्या बरं. रात्री पचायला जड आहेत. आवडत असेल तर Soyamilk घेतलेलं चांगल. 'http://www.whattoexpect.com/what-to-expect/landing-page.aspx' , 'http://babyfit.sparkpeople.com/pregnancy-resource-center.asp' इकडे दर आठवड्याला बाळाची कशी growth होते हे छान कळतं.
शहाळ्याचं पाणी मिळत नसेल तर substitute म्हणुन काय घेता येईल? can मधलं शहाळ्याचं पाणी पिऊ नये असचं सगळे सांगतात.

मी Boston, Massachusetts,USA मधे आहे तर १५ तारखेचे ग्रहण पाळावे काय?
असल्यास काय करावे ते सांगु शकाल काय कोणी?

मला (३१ week pregnant) दोन दिवसापुर्वी gestational diabetese असल्याचे कळले. या आठवड्यात Registered Dietician बरोबर appointment पण आहे. इथे पुर्वी झालेली चर्चा वाचली आहे. तरी सुद्धा आपल्या पद्धतिच्या खाण्याबद्दल काहि प्रश्न आहेत. खाली दिलेल्या भाज्या/डाळी जेवणात include केल्या तर चालतील का?

भाज्या - मुळा, कोबी, गाजर, काकडी, बीटरूट;
डाळी - छोले, राजमा, मसूर, हिरवा/ पाढरा वाटाणा;

कोबी, गाजर, बीटरूट नको. त्यापेक्षा पालेभाज्या, भेंडी, वांगं असं चालतं. (एकदा तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

पिन्कु,गाजर ,त्या,कन्द मूळ प्रकारातल्या भाज्या यात बर्याच प्रमाणात साखर , कर्बोदके असतात .याचा वापर टाळ

सोयाबीन, पनीर, उसळी यांच प्रमाण वाढव. भात कमी कर. पोळ्यापण एका वेळेला २ छोट्या पेक्षा जास्त खाऊ नकोस.

मी वाचल्याप्रमाणे सोयाबीन इज नॉट गुड फॉर हेल्थ. सोयाबीन मुळे थायरॉईड रिलेटेड प्रोब्लेम होऊ शकतात. लहान मुलांना सोया प्रॉडक्ट देणं म्हणजे त्यांना गर्भनिरोधक गोळ्या देण्यासारख आहे असं वाचलेलं.
मला सोयामिल्क खूपच आवडतं- त्यामुळे सोडताना खूप वाईट वाटलं.
रिलेव्हंट लिंक्स पोस्टवते - किंवा शक्य झाल्यास वेगळा लेखच लिहिते.

मी सोयाच्या बाजूनं असणार्‍यांचही मत वाचलं आणि विरुद्ध असणार्‍यांचं पण.
जेव्हा मी दोन्ही weigh केलं - तेव्हा मी स्वतः सोया खाणार नाही अशा मताची झाले. (आधीच मी हायपोथायरॉईड आहे - बाकीचे हार्मोन्सही धुमाकुळ घालतच असतात - त्यामुळे ज्याची खात्री नाही त्याच्या वाटेला जाऊन प्रोब्लेम्स वाढवून घेऊ नयेत- असं मला वाटलं)

मला मुख्य वाटलेले मुद्दे म्हणजे
अ. थायरॉईडची गडबड
ब. इस्ट्रोजिन जास्त होतं
क. नैसर्गिक अवस्थेत सापडणारं सोया खाण्याच्या लायकीचं नसतं - त्यामुळे त्याच्यावर जी काही प्रक्रिया होते - त्यामुळे सोया स्वतःही जेनेटिकली मॉडिफाय होतं (जेनेटिकली मॉडिफाय होण्याचे स्वतःचेही अनेक तोटे असतात) + त्याला खाण्यायोग्य बनवण्यासाठीची इतर प्रोसेस.
ड. काही मिनरल्स (ह्यात लोहही आलं)चं अ‍ॅब्सॉर्प्शन नीट होत नाही शरीराकडून सोया खाल्यावर.

तसं तर अमेरिकेत कोकही विकतात शाळेत! त्याचे दुष्परिणामही दिसतात आपल्याला.

असो! सोयाबद्दल तुम्हीच वाचा आणि ठरवा:
http://www.healingdaily.com/detoxification-diet/soy.htm
http://www.skrewtips.com/2009/08/27/soy-good-bad/
http://www.sunherb.com/is_soy_good_for_you.htm
http://planetgreen.discovery.com/food-health/soybean-good-fact-fiction.html
http://www.soyonlineservice.co.nz/

मृण्मयी , तोषवी , सायलींमी उत्तराबद्दल धन्यवाद.

नानबा, सोयबीन वरचा तुमचा लेख अजुन वाचायचा आहे. माहितीबद्दल धन्यवाद.

Namaskar,
Mi aaj joint zali aahe. Mala first time preganant rahanyachi symptoms kay astat va te saglyana janvatat ka. Pregnancy Test Kiti divsani karta yete tyabaddal koni sangel ka? Mala ya sarvavar detail sangal ka?

अमृता, पीरीयड्स मिस झाले (साधारण चार पाच दिवस पुढे गेले) की तुम्ही घरी टेस्ट करून बघू शकता. बाकी "सिम्प्टम्स" असे काही नसतात. उलटी चक्कर वगैरे फिल्मी गोश्टीपेक्षाही पीरीयड्सवर लक्ष ठेवा.

"सिम्प्टम्स" असे काही नसतात >>> ओ हो असतात. अगदी उलटी चक्कर नाही झाले तरी लक्षणं दिसतात बर्‍याच जणींना. babycenter.com वर बघा.

Thank you, Nandini, Cindrela
Periods Miss zayanantarch preganancy confirm hou shakate. Pregnant rahanyasati konti Mdeicine astat ka?

इथल्या भगिनिंना नमस्कार. गेल्या महीन्यात मुलगी झाली Happy खुप मदत मिळाली इथुन. मोरल सपोर्ट.
माझ्या एका बहीणीला थोडा प्रॉब्लेम होता तो इथे डीस्कस कर असे ती म्हनाली म्हनुन विचारते आहे. तिला पिरियड तर आले आहे पन सगळे प्रेग्नसी सीम्टम पन आहे. म्हनजे उलट्या वगैरे. तर ती प्रेग्नंट असु शकेल का? मागच्या वेळी तिने कॉपर टी बसवुनही दिवस गेले होते , पिरियडही येत होते पन खुप उलट्या झाल्यामुळे दवाखान्यात गेली , एक महीना पित्ताच्या गोळ्या खाल्या व नंतर सोनोग्राफीत कळले की तीन महीन्यांची गरोदर होती म्हनुन! तर आता ती रीस्क घेउ इच्चीत नाही , काही दिवसांनी डॉ. कडे जाइन पन असं असु शकतं का ?

माझ्या दुसर्या मुलाच्या वेळी मी पंचकर्म करुन घेतले होते (दिवस रहाण्याअगोदर). शिवाय, नियमित नारळ पाणी, शतावरी कल्प-केशरसहीत इ. इ. घेतले होते. पहिल्या मुलाच्यावेळी अमेरिकेत असल्यामुळे हे काही केले नव्ह्ते.पण माझा पहिला मुलगा गोरापान आहे आणि दुसरा सावळा! Happy
ह्यावरुन मी नक्की म्हणेन की, केवळ जीन्स् मुळेच बाळाचा वर्ण ठरतो. तुम्ही काय खाता यावर नाही. चांगले खाल्ले पाहिजे याबाबत दुमत नाही, पण अमुक खाल्ले की अमुक होइल हे चुकीचे आहे.
एक dietician म्हणाली होती, "food is not magic" , हे पटले.

Pages