गर्भारपण आणि आहार

Submitted by admin on 3 July, 2008 - 22:13

गर्भारपण आणि त्यात घ्यायची आहाराची काळजी याबद्दलचं हितगुज.

(डॉ. सुबोध खरे यांनी लिहिलेले काही प्रतिसाद इथे संकलीत केले आहेत. नवीन प्रश्न विचारण्यापूर्वी कृपया हा लेख पूर्ण वाचा. - वेमा.)

मी एक डॉक्टर (रेडियोलॉजिस्ट) असून गेली २४ वर्षे सोनोग्राफी करीत आलो आहे. यात गरोदर स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. माझ्या कुवतीनुसार आणि माहितीनुसार मला जमेल तसे आपल्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न करीत आहे.

हे लेख आधी वाचा:
गर्भारपण आणि काळजी -१
गर्भारपण आणि काळजी २ -आहार विहार

काही साधारण सल्ला
१) गरोदर पण हे आजारपण नाही. आपल्या आई, आजी, पणजी यांनीं कोणत्याही आधुनिक सोयी नसताना मुलांना जन्म देऊन वंश आपल्यापर्यंत आला याचा अर्थ हाच कि बहुतेक आधुनिक सोयींची गर्भारपणात आवश्यकता नाही. सोनोग्राफी किंवा इतर चाचण्या या "अत्यावश्यक" नाहीत. त्या विमा उतरवण्या सारख्या आहेत. आपण विमा उतरवला नाहीत तर आपण उद्या मरता असे नाही. या चाचण्या एक म्हणजे आपल्या मानसिक समाधानासाठी आहेत आणि दुसरे म्हणजे जर गर्भारपणात काही समस्या उद्भवली तर त्याचे वेळेत निदान आणि इलाज होऊ शकतो.
२) ज्या भगिनी मायबोली किंवा तत्सम सामाजिक स्थळावर येऊ शकतात त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची नक्कीच नाही. म्हणजेचा आपल्याला मिळणारा आहार हा अत्यंत निकृष्ट दर्ज्याचा नक्कीच नाही. गर्भ हा एखाद्या पम्पासारखा असतो. पंपाला विहिरीत किती पाणी आहे याच्याशी घेणे देणे नाही.जोवर पाण्याची पातळी अगदी खदखदत होत नाही तोवर पंप आपले पाणी खेचत राहतो. त्याचप्रमाणे आपल्या शरीरात पोषक द्रव्याची अत्यंत गंभीर अशी कमतरता होत नाही तोवर गर्भाला आपले पोषण मिळत राहते. त्यामुळे सर्व गरोदर भगिनींनी आपल्या गर्भाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल चिंता करणे सोडून द्यावे.
३) जोवर आपल्या मनात भय निर्माण होत नाही तोवर आपण त्यांच्या वस्तू विकत घेणार नाही या विपणन( मार्केटिंग) च्या मुलतत्वा प्रमाणे सर्व कंपन्या आपल्या बाळाचे पोषण नीट होते कि नाही याबद्दल होणार्या मातांच्या मनात संभ्रम निर्माण करतात. म्हणजे मग त्यांना आपली आहार पूरक द्रव्ये विकणे सोपे होते.
४) गरोदरपणात स्त्रीचे ९ महिन्यात १२ किलो पर्यंत वजन वाढते. यात सरासरी मुलाचे ३ किलो, वार(प्लासेन्ता) २ किलो, गर्भजल २ किलो आणि गर्भाशय २ किलो असे ६ किलो आणि आईचे ३ किलो असे वितरण आहे. १२ किलोच्या पेक्षा जास्त वाढलेले वजन हे आईच्या अंगावर चढते ( आणि नंतर ते कधीच उतरत नाही असा अनुभव आहे). एक लक्षात ठेवा अंबानींच्या घरी ५ किलोची मुले जन्माला येत नाहीत. तेंव्हा आपले वजन वाढले नाही तर आपल्या डॉक्टरन भेटा. जर सोनोग्राफीत मुलाचे वजन व्यवस्थित वाढत असेल तर काळजी करण्याचे कारण नाही. ( माझ्या बायकोचे दोन्ही गर्भारपणात फक्त ५ आणि ६ किलोने वजन वाढले होते आणि दोन्ही मुलांची व्यवस्थित वेळेस प्रसूती झाली आणि मुलांची वजने उत्तम होती.
५) गर्भारपणात प्रवास करणे किती सुरक्षित आहे?-- यावर आपल्याला वेगवेगळे डॉक्टर वेग वेगळा सल्ला देताना आढळतील. पण परत एकच गोष्ट
मी सांगू इच्छितो. गरोदर पण हे आजारपण नाही. पहिले ३ महिने थोडी जास्त काळजी घ्यावी. जर रक्तस्त्राव झाला तर ताबडतोब प्रवास बंद करावा आणि आपल्या डॉक्टर न भेटावे. अन्यथा जवळ अंतराचा (१०-१५ किमी पर्यंत) प्रवास करणे निषिद्ध नाही. लांबचा प्रवास (>५०० किमी )नक्किच टाळावा.
यात सुद्धा सर्वात सुरक्षित प्रवास हा रेल्वेचा कारण रेल्वेत बसणारीला खड्डे आणि गतीरोधकाचा(स्पीड ब्रेकर) हादरा बसत नाही. रेल्वे एकदम धक्क्याने चालू होत नाही कि जोरात ब्रेक लावून थांबत नाही. लोकल मध्ये सुरुवातीला आपल्या डॉक्टरांकडून आपण गरोदर आहोत हे सर्टीफिकेट घेऊन अपंग आणि व्यंग लोकांच्या डब्यातून निस्स्न्कोच्पणे प्रवास करावा.(पोट दिसायला लागल्यावर आपल्याला कोणीही सर्टीफिकेट मागणार नाही. यानंतर सुरक्षित म्हणजे बसचा प्रवास- कारण बसची चाके मोठी असल्याने लहान सहन खड्डे कमी लागतात. सर्वात वाईट म्हणजे रिक्षा कारण तीन चाकांपैकी एक चाक नक्की खड्यात जाते. त्यापेक्षा आपली दुचाकी जास्त सुरक्षित असते. पण आपल्याला चक्कर येत असेल तर वाहन चालवणे टाळावे.
६) गर्भारपणात सुरुवातीला काही जणींना फार मळमळते अगदी पोटात पाणी ठरत नाही. अशा वेळेला डॉक्टरांच्या सल्ल्याने उलट्या थांबवण्यासाठी गोळ्या (गर्भारपणात सुरक्षित असलेल्या) घेऊ शकता. पण तरीही पहिले तीन महिने जोवर मुलाचे अवयव तयार होत असतात(organogenesis) आपण जितक्या कमी गोळ्या घ्याल तितके चांगले. यात फोलिक आम्ल चा समावेश नाही. फोलिक एसिड हे एक ब गटातील जीवनसत्त्व आहे आणि ते ५ मिलि ग्राम रोज असे घेतात. हे मुलाच्या मेंदूच्या वाढीस मदत करते. ते याहून जास्त घेतल्यास आपल्या लघवीतून टाकून दिले जाते(,त्याचा दुष्परिणाम काहीच नाही).
पहिल्या तीन महिन्यात गर्भाचे वजन १०० ग्राम च्या आसपास पोहोचते तेंव्हा आपला आहार अगदी शून्य असेल तरीही गर्भाला काहीही फरक पडत नाही
तेंव्हा आपल्या बाळाचे पोषण कसे होईल याची चिंता करणे सोडून द्या.

हे नक्की वाचा
१) गरोदरपणात पाय का दुखतात ?--
हृदयाकडून पाया कडे जाणारया रक्त वाहिन्या पोटामध्ये दुभंगून त्यातला एक हिस्सा हा पोटातील अवयवांकडे जातो आणि दुसरा सरळ पायाकडे जातो. यातील पोटाच्या अवयवांकडे जाणारया रक्तवाहिन्यांपैकी गर्भाशयाची रक्त वाहिनी मोठी होऊन गर्भाशयाचा रक्तपुरवठा वाढवला जातो. हा रक्त पुरवठा अधिक वाढवण्यासाठी पायाच्या रक्त वाहिन्या आकुंचन पावतात आणि गर्भाशयाच्या रक्त वाहिन्या प्रेसरण पावतात. जेणेकरून येणारे बरेचसे रक्त गर्भाशयाला (आणि पर्यायाने वाढणाऱ्या गर्भाला) पुरवले जावे. यामुळे पायाच्या स्नायुंना होणारा रक्त पुरवठा ( आणि त्यात असलेले कैल्शियम) कमी होतो. याला उपाय म्हणून पायाच्या रक्तवाहिन्या जर प्रसरण पावल्या तर गर्भाशयाचा रक्त पुरवठा कमी होईल. यामुळे आपले डॉक्टर आपल्याला कैल्शियमच्या गोळ्या देतात जेणेकरून आपल्या रक्तातील कैल्शियम वाढेल आणि पाय दुखणे कमी होईल. संध्याकाळी नवर्याकडून किंवा सासूकडून पाय चेपून घेणे हाही यावर एक उपाय आहे.( भगिनींनी आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करून पाहावा)
२) गर्भजल -- गर्भाला होणारा रक्त पुरवठा कमी झाला तर त्याच्या मूत्रपिंडाला रक्त पुरवठा कमी होतो आणि त्यामुळे गर्भाची लाघवी कमी होते आणि पर्यायाने गर्भजल कमी होते. तेंव्हा गर्भजल कमी होणे हि साधी गोष्ट नाही. त्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नारळ पाणी किंवा इतर तत्सम पदार्थ घेऊन गर्भजल वाढत नाही. रोज एक नारळाचे पाणी प्यायल्याने (नारळवाल्याला फायदा होतो) गरोदर स्त्रीला फायदा होतो हे सिद्ध करणे कठीण आहे. किंवा त्याने कमी असलेले गर्भजल वाढते हे हि खरे नाही.
३) पोट दिसत नाही -- आपले पोट दिसणे याचा गर्भाच्या वाढीशी संबंध नाही तो आपल्या शरीराच्या ठेवणीशी आहे. आपल्या पोटाचे स्नायू जितके शक्तीचे(मसल टोन) असतात तितके पोट कमी दिसते. लठ्ठ किंवा आडव्या अंगाच्या स्त्रियांचे पोट लवकर दिसते. पहिल्या बाळंतपणात पोट कमी दिसते. (दुसर्या बाळंत पणात बऱ्याचशा स्त्रिया अंग कमावून असल्याने). बाळाचे वजन साधारण पाच महिन्याला ६०० ग्राम, सहा महिन्याला १२०० ग्रॅम आणि सात महिन्याला २ किलो च्या आसपास असते. त्यामुळे सहा महिनेपर्यंत पोट दिसत नाही हि अगदी नैसर्गिक गोष्ट आहे त्याचा बाऊ करू नये.
"गर्भ नीट पोसला जात नसेल ते बघून घे" असा दीड शहाणपणाचा सल्ला देणाऱ्या " अनुभवी" स्त्रिया कमी नाहीत. आपल्या अशा बोलण्याने त्या होणार्या आईला किती मानसिक तणावाला सामोरे जावे लागेल हा सारासार विचार नसतो.
४) सूर्य व चंद्र ग्रहण-- यात बाहेर गेल्याने गर्भावर परिणाम होतो या जुन्या (गैर)समजुती किंवा अंधश्रद्धा असल्याने त्याबद्दल जास्त न बोलणे श्रेयस्कर आहे. आपण कधी ग्रहणात बाहेर फिरल्याने गाईचे वासरू किंवा शेळीचे करडू जन्मजात व्यंग असलेले पाहिले आहे काय? मग हि गोष्ट मानव नावाच्या प्राण्यात होईल असे कसे समजावे. आपण न धड पुढे, न धड मागे असे अधांतरी झालो आहोत. ( म्हणजे काल मी अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बैठकीला जाणार होतो पण मध्येच मांजर आडवे गेले म्हणून गेलो नाही या सारखे आहे)
५) बाळंत पणात होणार्या मळमळ आणि उलट्या यावर -- आले किसून त्यात लिंबाचा रस, साखरसाधे मीठ आणि चवीपुरते सैंधव/ पादेलोण मिसळून बाटलीत भरून ठेवावे आणि दर थोड्यावेळाने घेत राहावे. याचा कोणताही दुष्परिणाम होत नाही शिवाय हा पारंपारिक उपचार डॉ. शरदिनी डहाणूकर यांनी के ई एम रुग्णालयात प्रयोग करून सिद्ध केला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा घटक आले हा असून त्याने आपला CTZ (केमोरीसेप्टर ट्रिगर झोन) आणि उल्तीचे केंद्र यांना शांत करण्याचे गुण आहेत असे आढळून आले आहे. इतर सर्व घटक हे प्रामुख्याने ते चविष्ट करण्यासाठी उपयुक्त आहेत. लिम्बात "क" जीवनसत्त्व सुद्धा आहे. आवळा सुपारी सुद्धा गुणकारी आढळून आली आहे ती सुद्धा त्यातील आल्याच्या रसामुळे तेंव्हा यातील आपल्याला जे आवडते ते निर्धास्तपणे घेतले तर चालेल. डॉक्टर आपल्याला DOXINATE च्या गोळ्या लिहून देतात यासुद्धा सुरक्षितच आहेत. परंतु एक मूलमंत्र म्हणजे पहिल्या तीन महिन्यात होता होईल तितकि औषधे टाळावीत.

गरोदरपणातील आहार

हा एक जिव्हाळ्याचा आणि ज्वलंत असा दोन्ही विषय आहे यावर बरीच उलट सुलट मते आहेत आणि डॉक्टरनमध्ये सुध्धा मतभेद आहेत तेंव्हा त्या वादात पडताना मी साधारण अशी मते मांडत आहे ज्यावर साधारणपणे तज्ञांचे एकमत आहे.
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.
काही मुलभूत विधाने -- १) गरोदरपणात पहिले तीन महिने गर्भाचे अवयव तयार होत असतात. अवयव म्हणजे केवळ हात पाय नव्हे तर मेंदू हृदय यकृत से महत्त्वाचे अवयव. यामुळे या काळात बाहेरचे चमचमीत अन्न टाळावे कारण या काळात आपले पोट बिघडले तर त्यामुळे आणि त्यानंतर घ्यायला लागणाऱ्या औषधाने आपल्या गर्भावर परिणाम होऊ नये यासाठी. याचा अर्थ चमचमीत खायचेच नाही असा मुळीच नाही. आपल्याला भेळ शेवपुरी पाव भाजी, चिकन मटण आवडते तर ते पदार्थ घरी करून खावे. एक तर बाहेरील तेलाच्या आणि पदार्थांच्या दर्ज्याची खात्री देत येत नाही आणि त्यांच्या स्वच्छते बद्दल न बोलणे ठीक.
२) अमुक पदार्थ खा आणि तमुक खाऊ नका असे कोणतेही निर्बंध नाहीत. पण अति सर्वत्र वर्जयेत या नात्याने अतिरेक टाळा.
पपई किंवा तत्सम पदार्थ खाल्यामुळे गर्भपात होतो याला कोणताही शास्त्राधार नाही. मी गेली अनेक वर्षे गरोदर कुमारिका वरील उपाय थकले कि गर्भपातासाठी डोक्टरांकडे येताना पाहत आलो आहे.
३) फळे आणि सुकामेवा हा जरूर आणि जितका जमेल तितका खावा. (सुकामेवा उष्ण पडेल या वर ज्यांचा विश्वास आहे त्यांनी खाऊ नका).
४) दुध पिण्यास कोणताही प्रतिबंध नाही. आपल्याला पचेल ते खावे.
५) तेलकट किंवा तळलेल्या पदार्थांनी ऐसिडीटी होते कारण गरोदर स्त्रीच्या शरीरात गर्भाच्या सहय्य्तेसाठी प्रोजेस्टीरोन हे द्रव्य तयार होत असते त्यामुळे गर्भाला त्रास न व्हावा यासाठी आपल्या जठरातून आतड्यात अन्न उतरण्यासाठी वेळ लागतो( gastric emptying time) यामुळे अन्न जठरात जास्त वेळ राहून आपल्याला ऐसिडीटी आणि जळजळ होते. यास्तव असे पदार्थ(खायचेच असले तर) सायंकाळी खाऊ नयेत अन्यथा रात्री आडवे पडल्यावर अन्न आणि आम्ल घशाशी येत राहते. (दुर्दैवाने आपले सर्व चमचमीत पदार्थ तळलेलेच असतात).
६) पोळी भात भाकरी यापैकी आपल्याला जे आवडेल ते खावे. त्यात कोणतेही पथ्य नाही.
७) आपल्या आई वडिलांना मधुमेह असेल किंवा आपले वजन गरोदर पानाच्या अगोदर जर जास्त असेल तर आपल्याला गरोदर पणात होणारा मधुमेह होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून पहिल्या महिन्यापासून काळजी घेणे आवश्यक आहे.
८) "आता तुला दोन जीवांसाठी खायचे आहे" यासारखा चुकीचा सल्ला नसेल. कारण अगोदर म्हटल्याप्रमाणे पहिल्या पाच महिन्यात गर्भाचे वजन फक्त ५०० ग्राम ने वाढते आणि आपले वजन सुमारे ५० किलो असेल तर दुप्पट खाल्ल्यामुळे (१०१ टक्क्यासाठी २०० टक्के खाणे) काय होईल ते आपण लक्षात घेणे आवश्यक आहे. अगदी पूर्ण दिवसांचे मूल सुद्धा ३ किलोचेच असते जेंव्हा आईचे वजन ६० किलो (किंवा जास्त) तेंव्हा सुद्धा १०५ टक्क्या साठी २०० टक्के खाल्ले तर काय होईल? अशा सल्ल्यामुळेच बहुसंख्य बायका गर्भारपणात अंग "जमवून" बसतात जे नंतर कधीच उतरत नाही. (माझे शरीर वातूळच आहे. मी काहीच खात नाही मी नुसता तुपाचा वास घेतला तरी माझे वजन वाढते अशा सर्व सबबी मी ऐकत आलो आहे. )
९) पानात उरलेले अन्न टाकायचे नाही हा सल्ला योग्य असला तरीही पानात आधीच भरपूर घेऊ नये हा सल्ला कोणी ऐकताना दिसत नाही.
१०) आपल्या काही ग्रॅम ते ३ किलोच्या गर्भाला किती पोषक द्रव्ये लागतील याचा आपण अंदाज घ्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल कि आपण खातो आहे ते बाळासाठी नक्कीच पुरेसे आहे. तेंव्हा मायबोलीवर ज्या भगिनी हे लिखाण वाचत आहेत ( म्हणजेच ज्यांच्या कडे संगणक आहे) त्यांच्या बाळाला कोणत्याही अन्न द्रव्याची कमतरता भासेल याची सुतराम शक्यता नाही. त्यामुळे गर्भाला पोषणद्रव्ये व्यवस्थित मिळतात कि नाही हि चिंता नसावी.
११)कोणताही पदार्थ आवडतो म्हणून पोट भरेस्तोवर खाउ नये. अहो डॉक्टर भूकच इतकी लागते कि सहनच होत नाही. डोहाळेच लागतात इ.कारणे देऊन आपण खात गेलात तर आपले वजन १०-१२ किलो ऐवजी २० ते ३० किलोने वाढेल आणि मग आपल्याला पाठ दुखी कंबरदुखी अशा तर्हेच्या व्याधीना शेवटच्या तीन महिन्यात सामोरे जावे लागेल. ( वि. सु.--आपण वजन किती वाढवायचे आहे हे प्रत्येक भगिनीने ठरवावे तो सल्ला देणारा मी पामर कोण?)
१२) ज्यांना भूक फार लागते त्यांनी भरपूर फळे खावीत म्हणजे भूकही भागेल आणि शरीराला आवश्यक सुक्ष्मद्रव्येहि भरपूर मिळतील.
१३) क्रमांक ८ चा सल्ला प्रसूत झालेल्या स्त्रियांसाठीही तितकाच लागू असतो. जन्माला आलेल्या बाळाचे वजन ३ किलो असते हे वजन ५ महिन्याला दुप्पट म्हणजे ६ किलो असावे आणि १ वर्षाला तिप्पट म्हणजे ९ किलो असावे. म्हणजे मुलाला दुध पाजण्यासाठी आपण दुप्पट खाल्ले तर आपला आकार दुप्पट होईल हे गृहीत धरा. मुलीचे वजन जर भरपूर वाढले नाही तर बाळंतपण व्यवस्थित केले नाही असा आक्षेप येईल या भीतीने अनेक आया आपल्या मुलीला जबरदस्तीने डिंकाचे लाडू शतावरी घातलेली मलई युक्त खीर भरपूर खाऊ घालतात. ( हे सर्व माझे स्वतःचे अनुभव आहेत). हे पदार्थ खायला घातले कि भरपूर दुध येईल हा एक गैरसमज आहे. अगदी रस्त्यावर राहणाऱ्या स्त्रिया मुलांना एक वर्ष पर्यंत व्यवस्थित दुध पाजत असतात तेंव्हा ज्या स्त्रीला व्यवस्थित आहार मिळत आहे तिला दुध कमी येईल अशी शक्यता सुतराम नाही. हा सर्व त्यांच्या मनाचा खेळ असतो. गाईला दुध कमी आल्याने वासरू हाडाडले असे आपण कधी ऐकले आहे काय? मग मनुष्यप्राण्यात असे होईल हे का गृहीत धरायचे? बाल अन्न बनवणार्या आणि गरोदर स्त्रियांसाठी पोषक आहार बनवणार्या कंपन्यांचा हा चावटपणा आहे. नवीन आयांच्या मनात शंका निर्माण करायची म्हणजे मग आपल्या वस्तू विकणे सोपे जाते.
१४) नवजात मुलाच्या जठराची क्षमता फक्त ३० मिली असते आणि ४ महिन्याच्या बाळाची फक्त ५० मिली तेंव्हा कोणत्याही स्त्रीला दोन्ही बाजूना मिळून ५० मिली दुध येणार नाही असे होतच नाही. हा संभ्रम वरील कंपन्यानी आपल्या फायद्यासाठी निर्माण केलेला असतो. याला खतपाणी आळशी बायका देताना आढळतात. रात्री उठून मुलाला दुध पाज्ण्यापेक्षा बाटली तोंडात देणे त्यांना सोयीचे वाटते वर अग माझं दुध त्याला पुरत नव्हत मग काय करणार लक्टोजन द्यायला सुरुवात केली. मुलाला दुध पुरत नव्हतं हे आपणच ठरवलं मग काय बोलणार.

डॉक्टर आहारात सुधारणा करा आणि केवळ सप्लिमेंट वर अवलंबून राहू नका असे सांगतात याचा अर्थ काय ते नीट समजून घ्या. जीवन सत्त्वांचा शोध लागायच्या अगोदर ती अस्तित्वात नव्हती का? म्हणजे आजही अशी शक्यता आहे कि अशी काही सूक्ष्म द्रव्ये आपल्या पोषणासाठी आवश्यक आहेत ज्यांचा शोध लागायचा आहे. म्हणजे ज्या गोष्टी आहारात मिळतील त्या गोष्टी जीवन सत्त्व किंवा टोनिक च्या गोळ्यात मिळणार नाहीत. शेवटी या सर्व गोष्टी तुमच्या शरीराला दिलेला तात्पुरता टेकू आहे. मूळ शरीराची बांधणी मजबूत करायला हवी यासाठी चौरस आहार आवश्यक आहे.
कुपोषण आणि अर्ध पोषण यात फरक आहे (UNDER NOURISHMENT AND MALNOURISHMENT). अर्ध पोषण म्हणजे सर्व घटकांचा अभाव पण कुपोषण म्हणजे असमतोल आहार ज्यात आपल्याला मिळणारे कर्ब,चरबी आणी काही वेळेस प्रथिने पूर्ण प्रमाणात मिळतात पण जीवनसत्त्वे आणी खनिजे नाहीत. म्हणजेच माणूस लठठ असेल तरी निरोगी असेलच असे नाही. गरोदरपणात डॉक्टर तुम्हाला या सूक्ष्म घटकांच्या गोळ्या देतात त्या गर्भाला काही कमी पडू नये यासाठी आणी त्या ९ महिन्यात उगाच धोका नको यासाठी. पण मूळ मुद्दा कुपोषणाचा. जर त्याकडे लक्ष दिले नाही तर पुढच्या गरोदरपणात तो परत वर येतोच. पहिल्या ३ महिन्यात फक्त जीवन सत्त्वे (यात फोलिक एसिड येते) दिली जातात कारण पहिल्या ३ महिन्यात लोहाचा मुलावर कुपरीणाम होऊ शकतो असे आढळले आहे. म्हणून लोह हे ३ महिन्यानंतर दिले जाते.

व्यायाम आपल्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार करा. ते आपल्या प्रकृती आणी इतर बाबी पाहून चांगले सांगू शकतील.
असे जालावर सांगणे म्हणजे उंटावरून शेळ्या हाकणे होईल. सबब क्षमस्व. तरीही व्यायाम जरूर करा कारण गरोदरपण हे आजारपण नाही शरीर लवचिक ठेवण्यासाठी, गर्भाच्या चांगल्या पोषणासाठी आणी सुलभ प्रसूती होण्यासाठी व्यायाम हा आवश्यक आहेच.

-डॉ. सुबोध खरे
वि सु :-- मी एक स्त्रीरोग तज्ञ नाही तेंव्हा भगिनींनी आप आपल्या स्त्रीरोग तज्ञांच्या सल्ल्यानुसार वागणे आवश्यक आहे.

यापूर्वीची चर्चा इथे वाचा

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जर डॉक्टरांनी चिंतेचे कारण नाही सांगितले तर मग कशाला चिंता करताय?

तसेही हा विषय इथे लिहिण्यापेक्षा डॉ.च्या रूममध्ये बोललेलाच बरा.

इतर सगळे विषय चालतात का? प्रेग्नंसी संबंधी चालु शकतात ना? त्याच्याशीच थोडाफार संबंधीत होता म्हणुन विचारलं बर का? तेही मी आधी माफी मागुनच सुरुवात केली होती.......... इतर बहुतेक प्रश्न इथे बोलल्यामुळे सुटतात माझे म्हणुन बराच धीर करुन विचार करुनच विचारले....तरीही कुणाला खटकल असेल तर विषयांतराबद्द्ल पुन्हा माफी मागते.....

शिल्पा, मुद्दा फक्त तुम्ही इथे हा प्रश्न लिहिण्यचाच नाहिये. पण तुमच्या "अघोरी" वागण्याचादेखील आहे!!

तुमची नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे. त्यामुळे मुळातच तुमची प्रकृती नाजुक असेल. असे असताना तुम्ही जर उष्ण पदार्थ खाऊन पहाणे, पपई खाणे वगैरे करत असाल तर यामधे तुम्हाला काही अनपेक्षित असा त्रास होउ शकतो हे लक्षात घ्या ना!!आणि हा त्रास तुम्हालाच नव्हे तर तुमच्या बाळाला देखील होउ शकतोच ना?? अगदीच स्पष्ट आणि रोकठोक भाषेत सांगायचे झालेच तर तुम्ही अजून "बाळंतीण" या सदरात आहात, आणि तुमचे गर्भाशय अजून प्रसूतीपूर्व परिस्थितीमधे आलेले नाही. अशा वेळेस तुम्ही पीरीयड्स येण्यासाठी जर काही प्रयोग केले आणि काही त्रास झाला तर???

अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स हे आपल्या स्त्रीरोगतज्ञाच्या सल्ल्यानेच सोडवावेत. इथे फार तर तुम्हाला कुणी त्याचे स्वानुभव सांगू शकेल किंवा थेरॉटिकल उत्तर देऊ शकेल. मात्र तुमचा डॉक्टर हा तुम्हाला तपासून त्यावर निदान करून आणि आधीचे सर्व रिपोर्ट्स वाचूनच तुम्हाला योग्य तो सल्ला देऊ शकेल. त्यानी जर तुम्हाला समाधान्कारक उत्तर दिले नाही तर तसे उत्तर मिळेपर्यंत तुम्ही त्याना प्रश्न विचारत राहिले पाहिजे.

आणि जर तुम्ही डॉक्टराशी चर्चा केलेलीच असेल तर त्याच्याच सल्ल्याप्रमाणे वागणे जास्त ठिक! कारण, उद्या तुम्ही कुणाच्याही सल्ल्याने काही खाऊन पिऊन जर काही त्रास झाला तर डॉक्टरच बघणार आहेत ना??

इथे विषयांतर होतय म्हणून तुम्हाला कुणी बोलत नाहिये किंवा कुणाला खटकत देखील नाही. मात्र इतके नाजुक प्रश्नासाठी पब्लिक फोरमवरती सल्ला मागणे (सल्ला देणारी व्यक्ती कोण आहे हे माहित नसताना) हे मात्र चुकीचं वाटतय. कृपया यावर विचार करा!!!

इथे फार तर तुम्हाला कुणी त्याचे स्वानुभव सांगू शकेल किंवा थेरॉटिकल उत्तर देऊ शकेल.>>>>>
मला फार तर इतकच अपेक्षित आहे/होत, त्याचा एवढा इशु करायची गरज नव्हती खर तर, ज्यांना खरच उत्तर द्यावेसे वाटले त्यांनी प्रश्नावर आक्षेप न घेता उत्तर दिलेले आहे. मी फक्त शंका विचारली, बहुतेक माझा प्रश्न नीट कळलेला दिसत नाही काही जणींना, मी फक्त अस होऊ शकत का? असा साधा सरळ कॉमन प्रश्न विचारलेला आहे. असो माझ्यामुळे बर्‍याच जणींना त्रास झाला, त्याबद्द्ल क्षमस्व.

मला नाही वाटत इथे कुणाला त्रास झाला. मला सुद्धा तुमचे उपाय वाचून आश्चर्य वाटले आणि चिडचिड झाली. हे असं पपई खाणे वगैरे प्रकार आपल्या अरोग्याशी खेळणे नाही का ? डॉ.नी सांगितलेय ना काही नाही मग थोडी वाट बघा. अगदीच वाटले तर दुसर्‍या एखाद्या तज्ञांना दाखवा.

इथे 'आर्मपिट काळे पडलेत काय करु' असे विषय चालतात आणि प्रेग/मंथली कोर्सविषयी विचारलेले नाही चालत ? उगीच काहीतरी.

नशीब माझ बाई!!एक तरि कोणी थोड फार तरी माझ्या बाजुन आहे तर, अग ते गरम खाण वगैरे मी याच वेळी आजुबाजुच्या बायकांच्या सांगण्यावरुन थोडफार केल ग, मला ही तितकस पटल नाही, डॉ. गोळ्या देत होती (गावी वगैरे जायचय म्हणुन), पण फुल प्रेग्नंसीमध्ये नी नंतर थोडे दि. गोळ्या खाऊन कंटाळा आला म्हणुन जरा घरगुती/आयुर्वेदीक (असतात अस ऐकलय, खर-खोट माहित नाही) उपाय शोधत होती इतकच, पण इथे म्हण्जे त्या शेजारच्या अर्धशिक्षित बायकांपेक्षा अतिच झाल. जाउदे उगाच इथे प्रश्न विचारला अस वाटतय...

शिल्पा, ती पोस्ट लिहिणार्‍यांना मी ओळखते (आणि त्या पण मला चांगलच ओळखुन आहेत :फिदी:) म्हणून हक्काने सांगितलं झालं.

अर्धशिक्षित बायकांपेक्षा अती कोण करतय ह्यावर जरा तुच विचार कर.

शिल्पा,
प्रकृतीशी खेळ करु नये असं सुचवेन, डॉक्टरी सल्ल्यानुसार वागणेच उचित ठरेल. गावी जाण्यासाठी हॉर्मोनल गोळ्या वगैरे खाणे जरुरी आहे का? स्वतःच्या आणि बाळाच्या प्रकृती काळजी घ्यायला हवी.

मला फार तर इतकच अपेक्षित आहे/होत, त्याचा एवढा इशु करायची गरज नव्हती खर तर, ज्यांना खरच उत्तर द्यावेसे वाटले त्यांनी प्रश्नावर आक्षेप न घेता उत्तर दिलेले आहे.>>> पुन्हा तुमचंच तेच चालू आहे!!! इशु हा प्रेग्नन्सी किंवा मंथली प्रॉब्लेमविषयी प्रश्न विचारण्याचा नाहिये. प्रश्न हा तुम्ही तुमच्या आरोग्याशी जो खेळ चालवला आहे त्याचा आहे.

अग ते गरम खाण वगैरे मी याच वेळी आजुबाजुच्या बायकांच्या सांगण्यावरुन थोडफार केल ग, मला ही तितकस पटल नाही, डॉ. गोळ्या देत होती (गावी वगैरे जायचय म्हणुन), पण फुल प्रेग्नंसीमध्ये नी नंतर थोडे दि. गोळ्या खाऊन कंटाळा आला म्हणुन जरा घरगुती/आयुर्वेदीक (असतात अस ऐकलय, खर-खोट माहित नाही) उपाय शोधत होती इतकच, पण इथे म्हण्जे त्या शेजारच्या अर्धशिक्षित बायकांपेक्षा अतिच झाल. जाउदे उगाच इथे प्रश्न विचारला अस वाटतय...>>>> आणि नेमकं हेच तुमचं चुकतय असं तुम्हाला वाटत नाही का?? तुम्हाला डॉक्टरने दिलेल्या गोळ्या खायचा चक्क कंटाळा आला म्हणून तुम्ही ऐकीव उपायावर विश्वास ठेवून वागताय??? तेही तुमच्या मंथली पीरीयड्ससारख्या अतिसंवेदनशील गोष्टीमधे???? आता अर्धशिक्षित कुणाला म्हणायचे???? आयुर्वेदिक औषधे म्हणजे रस्त्याच्या कडेला तंबू मांडून बसलेले वैदू वाटले का तुम्हाला??? तुम्हाला न तपासता औषधे देण्यासाठी!!! कुठल्याही आयुर्वेदिक तज्ञाकडे जर तुम्ही गेलात तर औषधे लिहून देण्याआधी ते तुम्हाला काय प्रश्न विचारतात हे माहित आहे का??

मला वाटतं तुम्ही इथे प्रश्न विचारून खरेच चांगले केलेत. कृपया यापूढे अशा ऐकीव गोष्टीवर अथवा सल्ल्यावर भर देऊ नका. तुम्हाला फक्त गावालाच जायचे आहे. त्यामुळे मंथली पीरीयड्ससाठी असे अघोरी उपाय करू नका. गावाला जाऊन जर पीरीयड्स आले तर काय फार मोठे नुकसान होणार आहे का?? पण असे काहीतरी खाऊन वगैरे तुमच्या सिस्टीमशी खेळू नका. कारण उद्या तुम्हाला अति ब्लीडिंग अथवा अन्य काही त्रास झाला तर काय कराल??

मंथली पीरीयड्स ही अत्यंत नॉर्मल गोष्ट आहे असे मानून चला.. आज आले तर आज उद्या आले तर उद्या. उगाच त्याचे इतके टेन्शन घेऊ नका.

इथे 'आर्मपिट काळे पडलेत काय करु' असे विषय चालतात आणि प्रेग/मंथली कोर्सविषयी विचारलेले नाही चालत ? उगीच काहीतरी.
>> अनुमोदन!

आणि रैनानं सांगितलेल्या शब्दात इतरांनाही नाही का सांगता येणार?

एक वेगळा प्रश्नः
पपई खाल्ल्यानं खरच असं काही होतं का? मला हे सगळं myth आहे असं वाटायचं!

शिल्पा८५,
समजा कोणी तुम्हाला सांगितले की ग्लासभर शेळीचे दूध साडेचार काळ्या मि-या आणि 45 दाणे साखरेचे घालून अनश्यापोटी घ्या, माझ्या दोन बाळंतपणानंतर मी हेच केलं होतं किंवा लेंडीपिंपळीचा रस आवळ्याबरोबर घ्या, गेल्या गणपतीत पाळी पुढे ढकलण्यासाठी मला ह्या उपचारांचा उपयोग झाला होता तर त्या उपचारांची विश्वासार्हता न तपासता तुम्ही खरंच तसं करणार आहात का?

तुम्ही इथल्या अनुभवी लोकांकडून सल्ला हवाय म्हणता तर इथे लिहीणा-या किती आयडींना वैयक्तिकरीत्या ओळखता? तुमची प्रसूती कशी झाली, त्यासाठी काही उपचार केले होते का, प्रसूतीपुर्वी आणि नंतर घेतलेली औषधे ह्याची काहीही माहिती नसताना त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन करावं असं तुम्हाला वाटतं का?

सिंडी आणि नानबा, काळे पडलेले आर्मपिट्स आणि त्यावरचे उपाय बाह्य उपचारात मोडतात. ऐकिव माहितीवर हे उपचार करण्यात धोका कमी असतो. त्यातही त्वचेवर पुरळ उठणे, लाल होणे इत्यादी धोके आहेतच.
वर आलेला गर्भाशयासारख्या नाजूक अवयवांसंदर्भातला प्रश्न लाजिरवाणा वाटला म्हणून नाही तर त्यावर मिळणा-या प्रतिसादांची आणि सल्ल्यांची विश्वासार्हता यासंदर्भातच मी ' पब्लिक फोरमवर लिहीताय याची जाण ठेवा' अशी पोस्ट लिहीली आहे. त्यात काय कठोरपणे लिहीले आहे मला कळले नाही आणि बाकीही आलेले प्रतिसाद हे आक्षेपार्ह भाषेत आहेत असे मला वाटत नाही.

बाप रे मंजु इतक्या रात्री पोस्ट लिहिलीस. मला वाटले 'असे खाजगी' प्रश्न पब्लिक फोरमवर लिहु नये असे तू म्हणते आहेस. नंतर आलेली प्रिंसेसची पोस्ट पण साधारण तशीच वाटली मला. असो, तुम्ही दुखावल्या वगैरे गेला असाल तर सांगा बर्का Wink

त्यात काय कठोरपणे लिहीले आहे मला कळले नाही आणि बाकीही आलेले प्रतिसाद हे आक्षेपार्ह भाषेत आहेत असे मला वाटत नाही.>> हेच मलादेखील समजत नाहीये आत्ता. मी तर मला काय म्हणायचय हे स्पष्टच लिहिले होते की!!!

अर्थातच मला तसेच म्हणयचे होते. असले खाजगी प्रश्न पब्लिक फोरम वर विचारावेत असे व्मला वाटत नाही. स्त्रीची पाळी अन त्याविषयी चर्चा तज्ञाशीच झालेली बरी, हे माझे ठाम मत आहे.

नंदिनी किंवा मंजुडी किंवा मी स्वतः खडसावलेल्या भाषेत लिहिले आहे असे मला वाटत नाही. श्रद्धाची पोस्ट कडक शब्दात आहे पण तिचेही मत कुणी आरोग्याशी खेळण्यापेक्षा डॉ ला विचारलेले बरे असेच वाटले, जे बरोबर आहे.

आर्मपिट्स बद्दल काय बोलताय ते माहिती नाही. त्यामुळे त्याबद्दल नो कमेंट्स.

आयुष्यात पहिल्यांदाच औषधांना कंटाळुन घरगुती उपायांकडे वळली, कदाचित चुकलेही असतील, पण ते चुकलेत हे सांगण्याची पद्धत नाही आवडली, समजावण्यापेक्षा थट्टा/ मस्करीच करण्याकडेच जास्त कल दिसला.
तुम्ही इथल्या अनुभवी लोकांकडून सल्ला हवाय म्हणता तर इथे लिहीणा-या किती आयडींना वैयक्तिकरीत्या ओळखता?>>>
इथेही सल्ला/मार्गदर्शनासाठी ओळखच लागते का? इतर महीला मडळात/ग्रुपमध्ये जशी पार्सलिटी असते की फक्त मैत्रिणींना/ओळखिच्यांनाच महत्व, आदर, मान दिला जातो नी अनोळखी, नवख्याना वेगळी वागणुक दिली जाते, टर उडवली जाते तसच इथेही असेल असे वाटले नव्हते, खुप आपलेपणाने प्रश्न विचारला होता. पुर्ण प्रेग्नंसीमधे मला माबोकरांची खुपच मदत झाली तेव्हाही माझ्या ओळखीच कोणीच नव्हते नी कोणी तशी जाणीवही करुन दिली नव्हती, सगळे आपण होऊन मदत करत होते विपुतुनही, त्यामुळे कोणी वैयक्तिकरीत्या ओळखीच नसल तरी जवळचीच वाटायची सगळी, आयडीवरुन(नियमित केलेल्या पोस्टवरुन) अनुभव, ज्ञान समजायच. काही अडचण आली तरी नातेवाईकांआधी माबोकर आठवतात, एखादा प्रश्न, प्रॉब्लेम विचारल्यावर मी त्या त्या आवडत्या आयडिंच्या पोस्टची वाट पहायची, पण आज इथे एवढी खिल्ली केलेली पाहुन मात्र खुप वाईट वाटतेय.
असो, हि चर्चा इथेच थांबवावी हि विनंती, मी माझे सगळे शब्द मागे घेते. माफि असावी, अ‍ॅडमिन आणि इतर सभासद.

पण शिल्पा, तुला पॉईंट कळला का? खिल्ली, टर, मस्करी (जी झाली असं तुला वाटतंय) ते सगळं बाजूला ठेव आणि बघ बरं.
मुद्दा इतकाच होता, की हा विषय नाजूक आहे. यासाठी तुझे डॉक्टरच उत्तम सल्ला देतील. ऐकीव सल्ले, माहिती याने शरीराची न भरून येणारी हानी होऊ शकते. बास.

हा बाफ अनेक जण वाचतात. हा पब्लिक आहे. तू विचारलेल्या शंका अजून कोणालातरी असतील आणि इथले सल्ले ऐकून तिनेही तसेच केले आणि काही दुष्परिणाम झाले तर? त्यामुळे सावधान केले सगळ्यांनी, इतकेच. सांगायची पद्धत प्रत्येकीची निराळी असू शकेल, पण हेतू वाईट नाही.

गर्भारपण हा अतिशय नाजूक आणि महत्त्वाचा विषय आहे. डॉक्टरचा सल्ला हा १००% घेऊन मग पूरक म्हणून इथे चर्चा करतात. इथले सल्ले कळकळीचे आणि प्रामाणिक असतात, पण ते ऑनलाईन दिलेले असल्याने, कोणतीही कृती करण्यापूर्वी डॉक्टर नाहीतर घरातल्या मोठ्या स्त्रीया- आई, आजी, सासूबाई वगैरेंचा सल्ला घेणे जास्त उचित.

व्वा छान पोस्ट
पन इतक्यास संयमित भाषेत त्या आयडीला सांग्ता आले अस्ते की नंदिनी रैना ह्यांनी चांगल्या सयमित भाशेत लिहिल्यात पोस्ट शिल्पा तु बाकीच्या कुजकट कडक बोलनार्‍या लोकांकदे लक्श देउ नकोस डोक्टर्ला नक्की दाखव ग बाई
कट्ट्याव्र ये ग शिल्पा

मी एवढच म्हणेन शिल्पा की काळजी करू नका, डॉक्टर म्हणाले आहेत तर खरच करु नका आणि इथली सगळी चर्चा विसरुन जा. खुप वेळा टेन्शन मुळे रेग्युलर सायकल बिघडते. 'be happy n be positive'.

आयला, इतक्या गम्भिर अन नाजुक विषयावर पोस्टाव का काही? :विचारग्रस्त चेहरा:
जाऊदे, होईल ते जाईल, पोस्टावच! Happy

शिल्पा, सर्वप्रथम अभिनन्दन Happy
तुम्ही काही प्रश्न विचारलेत, त्यावर उत्तरे आली, त्या उत्तरातील आत्यन्तिक महत्वाचे "तथ्य" तेव्हढे घ्या, नि बाकी सोडून द्या! कसे?
अ‍ॅलोपॅथि असो वा आयुर्वेद असो, शक्यतो शरिराच्या नैसर्गिक घटनाक्रमास व प्रतिकारशक्तीस अतिऊतेजन् देणे वा अडथळा आणणे, असे काही न करण्याकडेच डॉक्टर्सचा कल असतो हे महत्वाचे सूत्र लक्षात असुद्यात Happy

वर कोणीतरी विचारलेय पपईने खरच परिणाम होतो की मिथ्स आहेत? तर माझ्या माहितीत, व आई/लिम्बी कडून ऐकलेल्या सर्व गोष्टीत "पपई" "मिरी" व तत्सम उष्ण पदार्थ जर गरोदर असताना लिमिट्स्च्या बाहेर खाण्यात आले तर त्याचे दूरगामी दू:ष्परिणाम होतात, व वेगवेगळ्ञा केस मधे वेगवेगळ्या रितीने दृगोच्चर होतात. तेव्हा ते त्याकाळात टाळलेलेच बरे! नन्तरही टाळावेच!

मात्र, बाळन्तपणानन्तरही, खाण्यापिण्याबाबत आयुर्वेदात पथ्ये सान्गितली आहेत ती पाळावित. अनेक आहेत, डॉक्टरला विचारुनच करावी, पण एक मजेशीर उदाहरण सान्गतो (नुकतेच कळले मला, जेव्हा माझ्या पुतणीस मुलगा झाला), साधा भात खायचा, तर नव्या तान्दुळाचा न खाता जुन्या तान्दुळाचा खावा असा अलिखित नियम सर्वदूर पाळला जातो! सर्वदूर म्हणायचे कारण कोकणात देखिल व लिम्बीच्या देशावरील गावाकडेही! का? तर नव्या तान्दुळाने पोटात थन्डी होते, वा तो तान्दुळ थण्ड पडतो! (म्हणेज नेम्के काय होते???? काय की - शिवाय मला अ‍ॅलोपॅथी वा आयुर्वेद यातिल साठमारी इथे अपेक्षित नाही, कारण डॉक्टर सान्गतात, तेल्/मालिश करु नका, धुरी देऊ नका, काय वाट्टेल ते खा, तर आमच्या आधीच्या सगळ्या पिढ्या नेमके त्याच्या उलट तेच करुन शिल्लक हेत, मग नक्की खरे काय? - वेगळा बीबी उघडा! Proud )
तर मुद्दा हे पथ्य/आहाराचा, यातिल महत्वाचा भाग म्हणजे मुल अन्गावर पिते असल्यास, आई जे जे खाते-पिते त्याचे दूधाद्वारे ते ते परिणाम बाळास देखिल भोगावे लागतात! (कृपया सिद्धबिद्ध करायची आव्हाने कुणी देऊ नये, पटले तर घ्या, नसेल तर सोडून द्या)
अन यामुळेच, वर बर्‍याच पोस्ट मधील स्त्री आयड्यान्ना शिल्पा यान्चे उपाय वाचून धक्का बसल्यासारखे जाणवते ते त्याबाबतच्या काळजीनेच असेल.
शेवटी काय? एक जीव जन्मास घालणे म्हणजे काही लुटुपुटुचा भातुकलीचा खेळ नाही! सावधपणे करावे!
इथे विचारले, ते चान्गलेच केले! इथेच विचारायला हवे होते
अन इथेच हडसुन खडसावुन उत्तरेही मिळतील, ती देखिल समजुन घ्यायला हवित असे मला वाटते! Happy

नमस्ते,
मला पाचवा महिना लागलाय्.थायराइद (Thyroid) ४.८ आहे.doctor said ki ४.४ ला thyroid treatment
घ्यावि लागते.याचा बाळावर काय परिणाम होइल? मला खुप थकल्यासारख होते.help me

नमस्कार
आम्ही दुसर्‍या मुलासाठी प्रयत्न करत आहे पहीली मुलगी आहे
आज ३६ वा दिवस आहे एमसी सायकलचा मला अजुन एमसी आली नाही ब्राउन डीस्चार्ज होतो आहे
डॉ कडे जायला नकोसे वाटते एवडेतेवडे कारन घेउन तुम्ही कुनी सांगणार का ग

शिल्पा याना जरा कडक भाषेत सुनावण्यात आले ते त्यांच्याबद्दल असलेल्या आस्थेमधून असे मला वाटते.काही लोकाना व्यवसायानुरूप अ‍ॅरोगन्ट भाषा वापरण्याची सवय असते. काहीना आपण दुसर्‍याला कसे वेड्यात काढतोय याचाही आसुरी आनन्द असतो. लिम्बू यांचे पोस्ट पोक्त वाटले. पपईचा उल्लेख आलाय म्हणून आठवले पूर्वी खेड्यात गर्भपाताची सुरक्षित औषधे मिळत नसत, गर्भपात चोरून लपूनच केले जायचे त्यात कच्ची पपई खायला द्यायचीही एक 'ट्रीटमेन्ट' असे. त्यातून गर्भपात होत असे की नाही माहीत नाही पण बर्‍याच्दा प्राणावरही बेतत असे....
तात्पर्य हल्ली या विषयावर सुलभ वैद्यकीय मदत उपलब्ध असल्याने असले प्रयोग करू नयेत असे मलाही वाटते....

माझाही एक प्रश्न :
मला आत्ता ५वा महिना सुरु आहे . तर इथून पुढे गर्भाचे वजन आणि उंची वाढेल असे डॉ. नी सान्गितले.मग बाळाचे वजन इथून पुढे आपोआप वाढते की आपल्याला सुध्दा ते वजन वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतात? म्हणजे आहारात काही विशेष बदल करावे लागतात का ? आणि पोट मोठे झालेले साधारण कोणत्या महिन्यापासून दिसते ? की ते व्यक्तीपरत्वे (म्हणजे तिचे वजन , उन्ची या अनुषंगाने ) वेगवेगळया महिन्यांमध्ये दिसते ??
आणि मला या दिवसात विशेषकरून कशा प्रकारचे कपडे वापरावेत याबद्दल पण माहिती हवी आहे.

प्रेग्नंट असताना दुध आणि मध घेतलेले चालते का? माझ्या इथलि एक अमेरिकन आ़ज्जीने सांगितले कि कॉन्स्टिपेशन साठि चांगले असते म्हणुन

प्रेग्नन्सीच्या बेसिक माहीतीसाठी या साईट्स रेफर करा. (फक्त कुठलीही वेगळी गोष्ट करताना अर्थातच डॉक्टरचा सल्ला घ्यावा.)
http://www.whattoexpect.com/what-to-expect/landing-page.aspx
http://www.babycenter.com/

प्रिया तुमच्या बर्‍याचशा प्रश्नांची उत्तरे या वेबसाईट्सवर मिळतील.
जादू, कॉन्स्टीपेशनसाठी दूध व मध उपयुक्त आहे का मला माहीत नाही. मी असे ऐकले आहे की रात्री झोपताना कोमट दुधात तुपाचे थेंब घालून प्यावेत, ते चांगले असते.
पण प्रेग्नन्सीमध्ये दुध व मध कदाचित चालत असावेत. (पूजेसाठी असते ते) पंचामृत घ्यायला सांगतात की.

एक प्रेमाची सूचना. माबो व्यतिरिक्त इतर बेबी साइट्स/ फोरम वरील आयडींपासून संभाळून रहावे. परवा
हाँग काँग मध्ये एक विचित्र घट्ना घड्ली. त्या बाईने ऑनलाइन फोरम वर मैत्री साधून विश्वास संपादन केला होता. अश्या काही आय्डीज ना प्रत्यक्ष भेटू नका एकटीने तर नाहीच नाही. अश्या वेळी आपले मन हळवे अस्ते व परदेशात कोणी मैत्रीण झाली तर बरेच असे वाट्ते तरीही काळजी घ्या.

बादवे इथे एक ऑन लाइन डोजे करता येइल का? किती छान वाटेल.

मि ५ आथवदे ५ दिवसचि प्रेगन्न्त आहे. मि London, UK मधे अहे मल वअन्श वेल चे पुस्तक कुथे मिलेन.

Pages