काय ऐकताय?

Submitted by निनाद on 29 September, 2015 - 08:16

काय ऐकताय हा धागा आहे आहेच...
पण तो वाहता असल्याने त्यावर आलेली अनेक गाणी वाहून गेली. म्हणून हा न वाहता धागा!

अर्थात येथे पुर्वी प्रमाणे कोणतीही गाणी चालतील. हिंदी, मराठी, किंवा इतर भाषेतली गाणी.
अभिजात संगीताचे स्वर किंवा अगदी पॉप रॉक पण चालेल.

मुखडा लिहा किंवा पुर्ण गाणे द्या शिवाय
ऐकायला आणि पाहायला साऊंड क्लाऊड किंवा युट्युब दुवे दिले तर अजून बहार!
हवे तर गाण्यातले काय आवडले, का आवडले तेही लिहा.

तेव्हा रसिकहो येऊ द्या तुमच्या मनात आणि कानात असलेली आवडती गाणी!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केनेडी गाण्याचे बोल

ऐ जिंदगी तेरी खातिर
ऐ जिंदगी तेरी खातिर
क्या क्या किया गया
तुझसे एक रोज मिलने की खातिर
उम्र भर तनहा यहां
जिया गया
ऐ जिंदगी तेरी खातिर
ऐ जिंदगी तेरी खातिर
क्या क्या आ गया।

एकदम गिचिड मिचिड प्ले लिस्ट झाली आहे सध्या - जॉनर, भाषा, मूड यांचे लेटेस्ट + व्हिंटेज असे विचित्र कडबोळे… जसा मूड तसे गाणे.

♣ कळा ज्या लागल्या जीवा … लताबाई आणि भा.रा. तांबे, राग देसकार.

♣ आन मिलो आन मिलो शाम साँवरे, आन मिलो - timeless

♣ अल्फ अल्ला अल्फ अल्ला - repeat.

♣ एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ दस ग्यारा बारा तेरा … तेरा करूँ दिन गिन-गिन के इंतज़ार, आजा पिया आई बहार @ तेज़ाब

♣ ब्रज वाला रे श्रीनाथजी ने खम्मा रे खम्मा - ये यावर्षी अफाट गाजलं गरबा सॉंग म्हणून, श्रीनाथ बावाचे एक भजन.

♣ तुम से बढकर दुनिया में ना देखा कोई और @ कामचोर - इंदीवर आणि राजेश रौशन. धुन चोरलेली आहे पण आहे फार गोड.

♣ Love Me Tender - Elvis, ऑटाफे.

♣ गोमू संगतीनं माझ्या तू येशील का? … न्हाय sss

मेहेदी हसनचं 'अब के हम बिछडे, तो शायद कभी ख्वाबों में मिले'

https://youtu.be/Uyv0hMg_i5c?si=eUF3T4H2X4dxTu3Y

राग भुपेश्वरी. 'मालवून टाक दीप' याच रागात आहे. जे सतत आठवत राहतं.

मध्यंतरी एका कार्यक्रमात हे खूप पूर्वी रेडिओवर सतत लागणारं गाणं अचानक ऐकण्याचा योग आला. अगदी विस्मृतीत गेलं होतं. मग झपाटल्यागत तेच सतत ऐकत बसले. कसलं गोड गाणं आहे.

https://youtu.be/voG6tQtkEqA?si=WhGlhrV_niZCpanl

Songs jo phir yaad aaye
Aye Mohabbat Tere Anjaam Pe Rona Aaya - Sithara
https://www.youtube.com/watch?v=DFZ8C8jcgFo
केवळ सारंगी आणि हार्मोनियम साठी ऐका,
थोडे खाली गेलात तर बेगम अख्तर पण ऐकायला मिळेल.

फटाक्यांचे आवाज
हे काय माझ्यासाठी सार्कास्तिक आहे का ?

होय केकू ते सुफी 'तू झूम' मस्त आहे. मी नेहमी ऐकते.
https://www.youtube.com/watch?v=raYnzbIyOfE&list=RDraYnzbIyOfE&start_rad...
हे सुद्धा ऐका. ईश्वराला प्रियकर मानून केलेली प्रार्थना आणि भक्ती खरच सुंदर आहे.

जो आये तुम्हारी बज्म मे दीवाना हो जाये
ये अच्छी पर्दादारी है ये अच्छी राजदारी है Happy

सामो
आभार.
ऐकली. मजा आली. दिवाळीची सुरवात मस्त झाली आहे.

केकू, ऐकलं. सारंगी आणि हार्मोनियम अफाट सुंदर आहे.

गायकी मात्र अगदीच सुमार.

बेगम त्या गझलेत एक नाट्य उभं करतात - पहिल्या ओळीत "मी आता खमकी आहे" हे उसने अवसान, आवाज धारधार! आणि दुसर्‍या ओळीत ते अवसान गळून हळवा होणारा आवाज. खूम मजा येते तो खेळ ऐकताना. तो खेळ त्या गायिकेच्या लाडीक आवाजात साफ हरवला आहे.

करेक्ट गायन फार सुमार असल्याने केकूंची ती लिंक ऐकवली नाही. लगेच बंद केली.

'घन घन माला नभी दाटल्या
या गाण्यात अभिनेते विष्णूपंत जोग (गुंड्याभाऊ), हार्मोनियमवर गाण्याचे संगीतकार वसंत पवार आणि कोरस मधे लहान मुलगा म्हणजे अशोक पत्की हे दिसतात.

Ji Chahe Tu Sheesha Ban Ja Singer:Abida Parveen

तुझी इच्छा असेल तर तू काच (शीशा) बन, तुझी इच्छा असेल तर तू प्याला (पैमाना) बन
काच किंवा प्याला बनून काय फायदा? त्याऐवजी तू दारू (मई) बन, तू मदिरालय (मयखाना) बन

https://youtu.be/ocL0tj3g77Q?si=17CwQlQ0mIEkf4fW

Pages