क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

255 !! दुबे जिंदाबाद !!!
आपण 20 - 25 धावा वाढवून विजय अधिकही निश्चित करू शकलो असतो, पण घाई करून पटकन 3 विकेट घालवल्या व धांवगती मंदावली. असो, so far, so good !

*माझा अभिषेकचा अंदाज चुकला* - त्याच्याबद्दलचा गावसकरचाही साफ चुकला आहे: यू आर इन गुड कंपनी ! खरं तर, छातीठोकपणे 100% अंदाज बरोबर येणं हा क्रिकेटचा अपमानच म्हणावा लागेल ! Wink

७५-५ ! न्युझीलंड दबावाखाली कोसळले पण आपल्या गोलंदाजीचं श्रेय मात्र कमी नाहीं. बुमराह ग्रेट आहेच, पण आज अक्षरच्या ' आर्मर ' ने घेतलेली विकेट भारी होती !

अभिनंदन !!!!!
बुमराह ४-१५ !! अक्षर 3 विकेट्स !!
सर्वोत्तम संघ जिंकला !!!!

महिनाभर खूप झाली तुमची त्या कपाची नाटकं ! चला, आता हा कप उचला आणि कामाला लागा !!20190201_190757_0 (1).jpg

एकदमच वन साईडेड. १० ओव्हर्स आधीच निकाल लागला होता. धोनी आणि शर्मा पण वन साईडेड जिंकू शकत होते पण मुद्दामून त्यांनी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नेली. काय मजा नाही आली.

*...पण मुद्दामून त्यांनी शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच नेली. * Wink
मला कुणीतरी ह्या सामन्याचे तिकिटांचे अधिकृत दर पाठवले आहेत. त्यात,किमान तिकीट रु. 26,000/ दाखवलं आहे. खरं खोटं माहित नाही. पण खरं असेल तर मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत नेणं समर्थनीय वाटतं ! Wink

ट्वेंटी ट्वेंटी फॉरमॅट मधील गेल्या काही वर्षातील सर्वोत्तम संघाने अखेर सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकला. हा केवळ भारताचाच नाही तर क्रिकेटचा विजय झाला आहे.

भाऊ, Happy

आता २७ च्या कपापर्यन्त शांतता!
बाकी सुरुच असेल! Wink

*आता २७ च्या कपापर्यन्त शांतता!* - केवढा घोर अपमान करताय ट्रम्पतात्या , पुतिनदादा..... इत्यादीचा !!! Wink

केवढा घोर अपमान करताय ट्रम्पतात्या , पुतिनदादा..... इत्यादीचा !!! Wink>>>>

meme2.jpg

.

एशिया कप ने तिलकमधे जो कायापालट झालाय तोच संजूमधे ह्या वर्ल्ड कपमुळे झाला असू दे रे महाराजा ! Happy

परत बुमराला मॅन ऑफ द मॅच देणे खटकले. ते संजू, किशन नि कदाचित अक्षर ह्यांना जायला हवे होते. बोलर ऑफ द टूर्नामेंट चा मान बुमराचा होता.

यंदा आयपीएलवर बहिष्कार का? मस्त!
युद्धसदृश परिस्थिती असताना इंधन आणि इतर गोष्टी वाया घालवणं खरंच गरजेचं आहे का? आता यावर लगेच त्यातून रोजगार मिळतो लिहू नका. हॉटेलं, ढाबे बंद पडताहेत.
आणि आयपीएलचा आर्थिक फायदा ज्यांच्याकडे आधीच भरपूर पैसे आहेत, त्यांनाच जास्त होतो.

अरे आयपीएल धागा कोणी काढला नाही यावेळी
काढा कोणीतरी

आज आपला रोहीत शर्मा इन ऍक्शन दिसेल कितीतरी दिवसांनी

* यंदा आयपीएलवर बहिष्कार का? मस्त! * -

महिला मंडळांच्या शिखरपरिषदेत म्हणे ठराव झालाय - " यंदापासून नेमका आपल्या आवडत्या मालिकांच्या वेळीच टीव्हीवर चालणारा आयपीएलचा धुडगूस कुणीही घरात खपवून घ्यायचा नाहीं " !!20190305_103121.jpg

आपण प्रत्येक टूर्नामेंट जिंकत आलोय. चॅंपियन्स ट्रॉफी, आशिया कप, वर्ल्ड कप सारखे जिंकतच सुटलोय त्यामुळे आयपीएल ही आपल्याला पहिल्यासारखी महत्वाची वाटत नाही.

कालच आमच्या ग्रूपवर पोस्ट टाकली होती.
इतके सलग आयसीसी ट्रॉफी जिंकल्यावर आयपीएल उत्साह थोडा कमी वाटत आहे.
तरी उद्या मुंबईचा सामना आहे वानखेडेला. उद्याच काहीतरी आयपीएल सुरू झाल्याचा फील येईल..

खूप दिवसांनी काल रोहितला फलंदाजी करताना पाहून खूप छान वाटलं ! बाकी, आयपीएल चालूदे कसंही ! Wink

बाकी सगळे जाऊ दे पण रोहितला सामनावीर द्यायला हवे होते.
मी लेकीला सांगितलेले की रोहितला देतील म्हणून ती सगळे प्रेझेंटेशन बघत बसली आणि त्याचा अवॉर्ड घेताना व्हिडिओ काढायच्या तयारीत होती. तिचा पोपट झाला आणि शिव्या मला पडल्या Proud

रिकल्टन आणि रोहीत दोघे इक्वल नसते खेळले तर कदाचित रोहितला दिले असते. शार्दुल तीन विकेट काढून सुद्धा 220 इतक्या खूप धावा झालेल्याच. मुंबईचा विक्रमी चेस होता..

*कारण खेळी रोहीत स्पेशल एफर्टलेस होती.* .. व मॅजेस्टिक !!!
*..म्हणून ती सगळे प्रेझेंटेशन बघत बसली आणि त्याचा अवॉर्ड....* - तुमच्या लेकीला विचारा , तिच्या ' रोहित फॅन क्लब ' मध्ये मला घेतील का, अर्थात वयाची अट शिथिल करून !! Wink
शुभेच्छा!

हो बिनधास्त...
म्हणजे आपल्या तीन जनरेशन होतील.
मी आधीपासून होतोच.
आणि लेक माझ्या इन्फ्लियंसमुळे रोहीत फॅन झाली नाहीये हे विशेष. कारण त्या आधी मी तिच्यासमोर किंवा घरीही कधी इतके उघड केले नव्हते.

*धोनीच्या प्रभावाबाहेरचे खेळाडू आलेले जाणावले आहेत.* - धोनी बाहेर बसण्याचा प्रभावही त्यामुळेच काल जाणवला की काय !!! Wink

Pages