क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

काल पहिल्या डावाच्यावेळी फलंदाजी खूपच अवघड वाटत होती.
चेंडू गुडलेंग्थवरूनही उसळत होते. आर्चर आणि बर्जर ह्यांना खेळणे अवघड जात होते फलंदाजांना.
वैभव सुर्यवंशीच्या विस्फोटक खेळीने दुसर्‍या डावात खेळपट्टीचा परिणाम जाणवला नाही.

काल पहिल्या डावाच्यावेळी फलंदाजी खूपच अवघड वाटत होती.
चेंडू गुडलेंग्थवरूनही उसळत होते. आर्चर आणि बर्जर ह्यांना खेळणे अवघड जात होते फलंदाजांना.
>>
गेले तीन दिवस पाऊस असल्यानी पिच झाकलेलं होतं.
त्या मॉइश्चर मुळे सुरुवातीला बाऊन्स अन् इव्हन होता.
नंतर कंडीशन बदलली.

त्यामुळेच नाणेफेक जिंकून पहिली बॉलिंग घेतली RR नी

घालवत होती मॅच LSG
ऋषभ पंत होता शेवटपर्यंत म्हणून काढली
शेवटच्या ओव्हरला पहिल्या दोन बॉल वर भारी फोर मारले..

“अरे यंदा IPL चा वेगळा धागा काढला नाही का कुणी?” - मला फोन वरून काढता नाही आला.

काल रॉयल्सनी छान काढली मॅच. आर्चर- देशपांडे च्या १९-२० ओव्हर्स एकदम जबरदस्त!!

आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांपैकी अशोक शर्मा, हर्ष दुबे आणि कार्तिक त्यागी, मोहसीन खान आश्वासक वाटले. हैद्राबाद शिवम मावी la का खेळवत नाहीये कळत नाही. तो चांगला गोलंदाज आहे. मयंक यादव पण नाही खेळला अजून

अभिषेक ची जादू काही चालेना. विश्वचषकातील त्याचा फॉर्म तसाच कायम आहे. अजूनही तो खेळताना संभ्रमीत वाटतोय.

काल रॉयल्सनी छान काढली मॅच. आर्चर- देशपांडे च्या १९-२० ओव्हर्स एकदम जबरदस्त!!
>>
+1

काल डेव्हिड चा झंझावात अफाट होता.
पण त्याचा धमाका सुरू व्हायच्या आधी रजत १५ बॉल मधे ४० करून दुसऱ्या बाजूला उभा होता त्याला डायरेक्ट शेवटच्याच ओव्हर मधे परत बॅटिंग मिळाली अन् बिचाऱ्याच्या ५० काही पूर्ण झाल्या नाहीत...

काल पडिक्कल अन् सर्फराज दोघांच्या बाबतीत एक गोष्ट जाणवली. ५० झाल्यावर लगेच अतरंगी शॉट खेळण्याची रिस्क घेऊन आऊट झाले.
पडिक्कल गेल्याचा काही फरक पडला नाही कारण टीम चांगल्या स्थितीत होती. पण सर्फराज वर संघाची मदार असताना त्यानी असा शॉट तेंव्हा ट्राय करणं टोटली अनावश्यक वाटलं...

पट्टीदार नि सर्फराझ मधल्या फळीत असेच खेळत राहिले तर त्यांना बाहेर ठेवणे गंभीर नि आगरकरला कठीण होईल. अशक्य नाही म्हणत कारण श्रेयस ला गेल्या वर्षी बाहेर ठेवलाच होता.

कोणी बघतेय का मॅच?
१ ओवर १३

Four

Wicket

धमाल चालू आहे..
४ बॉल ९ हवेत आणि मिलर समोरच्याला एंड वर आहे

दोन ओवर 36 हवे असताना सिराज ने 23 रन दिले..

कुलदीपने फलंदाजीत आपला अनुभव दाखवला.. सिंगल काढला
आता ३ बॉल ८ हवेत

अरे हो.. बॉलर आहे प्रसिद्ध कृष्णा

कसला सिक्स मारला....
बॉल स्टेडियम च्या बाहेर

२ बॉल २
कु प्रसिद्ध कृष्णा

या आयपीएल चा Longest Six 106m

सिंगल मिळत होता.
घेतला नाही.
घ्यायला हवा होता...
आता 1 बॉल 2 हवेत

रन आउट झाला
मारता नाही आला
चोकर आफ्रिकन खेळाडू

चांगला एफर्ट बॉल होता पण तो..
सगळा गेम प्रेशरचा असतो
आणि वेड्याने स्वतःवर ओढवून घेतले

नाईन्टीज किडना क्लूजनर आठवला असेल..

काल बंगलोर एअरपोर्ट वर LSG टीम दिसली. गेट मधून बाहेर पडून बस मधे बसून हॉटेल ला पोचेपर्यंत ऑलमोस्ट पॅरलल जात होतो.

गेट मधून बस कडे जाताना लँगर, शमी, मार्श, पूरन, मार्करम, नॉर्टये, दिग्वेश, बडोनी अन् पंत दिसले
अर्जुन दिसला नाही पण सौ. अर्जुन अन् सारा मात्र दिसल्या (LSG ची मागची मॅच GT सोबत होती)

अरे वाह बरेच प्लेअर दिसले..

हैदराबाद टीम अचानक या दोन गोलंदाजांच्या एन्ट्रीने स्पर्धेत उतरली आहे असे वाटू लागलेय.. पहिल्या ओवरची जास्त हवा झाली पण त्याचसोबत हुसेनने नंतर जे व्हेरिशन दाखवले ते सुद्धा कमाल होते. मजा येईल यांच्या पुढच्या मॅच बघायला..

*अचानक या दोन गोलंदाजांच्या एन्ट्रीने स्पर्धेत उतरली आहे...* होय, खरं तर नवीन नांव नुसती ऐकीव न राहता त्यांचं कसब प्रत्यक्ष पहायची त्यांच्या करिअरच्या सुरवातीलाच संधी मिळते, हेच तर आयपीएलचं मोठ्ठं वैशिष्ट्य आहे ! व, त्या नवोदितांना अनुभवी खेळाडूंबरोबर व विरुद्ध खेळण्याची संधी मिळते हे दुसरे वैशिष्ट्य ! अर्थात, पैसे, मनोरंजन, प्रसिद्धी ....इ.इ. वैशिष्ट्यं तर आहेतच !!!

ट्वेंटीचा वर्ल्डकप संघ यापुढे फॉर्मनुसार बदलत राहणार..
एखाद्या बुमराहला जोपर्यंत फिट आहे तोपर्यंत कोणी धक्का देऊ शकणार नाही.
एखाद्या वेगवान अष्टपैलू पांड्याला कॉम्पिटिशन करायला फार कोणी नसणार.
बाकी कोणाची खात्री नाही.

पट्टीदार वेगळ्याच पिचेस्वर खेळतोय असे वाटत राहते.
मुंबई नि टायटन्स अजून जुन्याच फॉर्मुलामधे अडकलेले वाटतात.
हरले तरी चेन्नई चे बदलते रुप बघायला आवडते आहे. धोनी आल्यावर परत गाडी आधीच्या रूळावर येईल.

पांड्या कर्णधार झाल्यापासून मुंबईचा संघ एकसंध वाटलाच नाहीये. एखादा चॅम्पियन संघ हरतानाही जो लढायचा जजबा दिसतो तो या काळात मुंबईच्या संघात दिसलाच नाही. बॉडी लँग्वेज बघूनच हे जाणवते.

रोहीत शर्माला कर्णधारापदावरून काढणे मुंबईची विनाशकाले विपरीत बुध्दी होती. भारताच्या लीडरशिप ग्रूपमधून पांड्या जाणीवपूर्वक दूर ठेवतात पण दीड शहाण्या मुंबईने रोहीत शर्माला तडकाफडकी काढून त्याला कर्णधार करायचा वादग्रस्त निर्णय घेतला जो नंतर हास्यास्पद ठरला.

कारण त्यानंतर मुंबई इडियन्सचा औरा जणू संपलाच. पण दुसरीकडे रोहीत शर्माने मात्र भारताला एकही सामना न गमावता ट्वेंटी वर्ल्डकप आणून दिला. अगदी तशीच चॅम्पियन ट्रॉफी आणून दिली. त्याची लीगसी पुढे नेत सूर्यानेही ट्वेंटी वर्ल्डकप आणून दिला.

पण मुंबई मॅनेजमेंट पुन्हा कर्णधार बदल करेल याची शक्यता कमी. आपली चुकी ते कधी मान्य करणार नाहीत. स्वतःला मोठे बिजनेस माईंड समजतात हे. पण साधे इमोशनल quotient, टीम स्पिरीट अश्या बेसिक टर्मचे महत्व यांना समजले नाही.

आमच्याकडे मुलगी संध्याकाळी खेळून आली. रोहीत शर्मा नसल्याने लगेच जेवली आणि झोपून गेली.
आजचा मुंबईचा सामना तिच्यासाठी अस्तित्वातच नव्हता.

पहिल्या सामन्याला तिला मी सांगितले होते की त्याला सामनावीर मिळायची शक्यता आहे. तर पूर्ण प्रेझेंटेशन बघून काढलेले.

*तेंडुलकर जयवर्धने हे मिळून अंबानीला चांगलाच चुना फासताहेत.* - ' व्हाईट वॉश ' ला मराठीत ' चुना फासणे ' असं देखील म्हणतात का ? कारण, प्रचलित अर्थाने, तेंडुलकर, जयवर्धने हे चुना फासणारे व अंबानी चुना फासून घेणारे अजिबात वाटत नाहीत ! Wink

काल वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहिला. काय प्रचंड आत्मविश्वास या वयात ! सहजसुंदर , आक्रमक व ओघवती फलंदाजीची शैली !! पोरगं बरीच वर्षं लोकांची वाहवा मिळवत ज्या संघात खेळेल त्या संघाचं भलं करेल, हे निश्चित !! शुभेच्छा !

बर्गरने सोडलेला कॅच रॉयल्सना महागात पडला आणि केकेआरला पहिला विजय देऊन गेला.
Submitted by फेरफटका on 19 April, 2026 - 19:01

खरं तर केकेआर ला रियन पराग ने जिंकले, जडेजा पूर्ण भारत गोलंदाजी करत असताना त्याची चौथी ओव्हर करून घेतली असती तर बिश्नोईंची १५ धावांची ओव्हर कदाचित आलीच नसती, ३-८-२ असे समीकरण असूनही जडेजाला चौथी ओव्हर का दिली नाही याचे राहून राहून आश्चर्य वाटत होते.

“ जडेजा पूर्ण भारत गोलंदाजी करत असताना त्याची चौथी ओव्हर करून घेतली असती तर बिश्नोईंची १५ धावांची ओव्हर कदाचित आलीच नसती” - खरंय. त्या मॅच-अपच्या नादात अश्या बर्याच कॉमन सेन्स गोष्टी निसटून जातात हल्ली.

आज मुंबई-गुजराथ!

“ वैभव सूर्यवंशीचा खेळ पाहिला. काय प्रचंड आत्मविश्वास या वयात” +१

त्याचा आत्मविश्वास आणि ताकदवान फटकेबाजी, दोन्ही कमाल आहे.

मुंबई हारल्यावर वाईट वाटतं पण नंतर दुसरं मन बोलतं हारू दे समजू दे त्यांना रोहितला कॅप्टन पदावरून काढण्याचा निर्णय किती चुकीचा होता.

Pages