Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
*ह्या धोरणाने हे ठरवले होते
*ह्या धोरणाने हे ठरवले होते म्हणे * - अशा धोरणानुसारच खेळ व्हावा म्हणून सर्व संघांच्या ' सपोर्ट स्टाफ ' मध्ये एक तरी अनुभवी आर्थिक सल्लागार नेमणे आता सक्तीचे केले जाणार, अशी वदंता आहे !
झिम्बांबवेने लंकेला पण हरवलं
झिम्बांबवेने लंकेला पण हरवलं बघितली काय कालची मॅच. झिम्बांब्वे पगलू
काल ऑस्ट्रेलिया का एवढी जोरात
काल ऑस्ट्रेलिया का एवढी जोरात खेळली? मी जर त्यांचा कॅप्टन असतो तर मुद्दामून हारलो असतो. म्हणजे लोकांच्या लक्षात येईल की हे मुद्दामून हारताहेत एव्हडे खराब खेळलो असतो. हारल्यावर आम्ही सगळे मैदानावर आलो असतो हिरव्या जरशा काढून फेकल्या असत्या आणि पिवळ्या घातल्या असत्या. आणि एक मोठा बोर्ड घेऊन गेलो असतो सी यू सून इन २०२७, वी विल कम बॅक वैगरे वैगरे.
पाक विरुद्ध न्यूझीलंड सामना
पाक विरुद्ध न्यूझीलंड सामना पावसामुळे रद्द ?
दोन्ही संघ आता 1 - 1 गुण घेऊन टेन्शनमध्ये !!
उद्या आपली आता सगळ्यात कठीण
उद्या आपली आता सगळ्यात कठीण परीक्षा !!!
77 - 3 द आफ्रिका ( 10 ओव्हर )
77 - 3 द आफ्रिका ( 10 ओव्हर ) !!
99-3 in 11 overs
99-3 in 11 overs
डिकॉक आणि रिकल्टन यांना काय
डिकॉक आणि रिकल्टन यांना काय झालंय. आयपीएल आता तोंडावर आले आणि दोघेही खेळत नाहीयेत. मुंबई इंडियन्सचा फॅन म्हणून काळजी वाटते. हा मॉर्नी मॉर्कल नक्की कोणाच्या बाजूने आहे आज. आतल्या खबऱ्या देत नाही ना त्यांना.
मिलर नी 2024 च्या फायनल चा
मिलर नी 2024 च्या फायनल चा पूर्णपणे वचपा काढला, मॅच winning खेळी
अंगेन गात्रं नयनेन वक्त्रं,
अंगेन गात्रं नयनेन वक्त्रं, न्यायेन राज्यं लवणेन भोज्यम्॥
26 - 3 !!!!! द आफ्रिका होती
26 - 3 !!!!! द आफ्रिका होती 20- 3, हम भी कुछ कम नही ! आता नंतरही त्यांच्यासारखेच खेळा !!!
दुबेने १५ बॉल १५ सिक्स मारून
दुबेने १५ बॉल १५ सिक्स मारून मॅच जिंकवली.
हम भी कुछ कम नही >>
हम भी कुछ कम नही >>
द. आफ्रिकेने आज आपली बिनपाण्याने हजामत केली.
मी मागेच बोललो होतो भारतीय
मी मागेच बोललो होतो भारतीय प्रेक्षकांना गाजर दाखवताहेत. उद्यापासून दूध का दूध और पानी का पानी. usa वैगरे छोट्या टीमसोबत जिंकतील नाही असं नाही पण पुढे कठीण आहे.
Submitted by बोकलत on 6 February, 2026 - 21:51>>>> चिते की चाल बाझ की नजर और बोकलत का क्रिकेट ज्ञान कभी संदेह मत करो कभी भी मात दे सकते है.
आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 17
आयसीसी स्पर्धांमध्ये सलग 17 सामने जिंकल्यावर आपण आज हरलो ते पुन्हा त्याच मैदानावर
आजची आपली एकमेव चमकदार
आजची आपली एकमेव चमकदार कामगिरी -
बुमराहची गोलंदाजी - 4 - 15 - 3 !!!
असो. अजून दोन सामने आहेत . 17 विजयानंतर एखादा असा पराभव यायचाच वाट्याला !
आपण आपल्या दोन्ही मॅचेस जिंकू
आपण आपल्या दोन्ही मॅचेस जिंकू, ते आपल्या हातात आहे. इतके अवघड नाही.
पण विंडीज vs झिंबाब्वे सामना जिंकणाऱ्याने आफ्रिकेला सुद्धा हरवले आणि तीन संघांचे 4 पॉइंट अशी स्थिती झाली तर मग रनरेटवर आपण मागे पडू.
ठीक आहे.. तेव्हाचे तेव्हा बघू
शेवटचा सामना आपलाच आहे.
गेल्या १७ अपराजित
गेल्या १७ अपराजित सामन्यांनंतर (१६ विजय, एक बिन-निकाली), आज भारताने सामना गमावला. एक अपवाद म्हणून त्याकडे बघता येईल.
पण दोन गोष्टींचा विचार व्हायला हवा. ह्या स्पर्धेत अजूनपर्यंत बॅटिंग युनिट एकत्रपणे क्लिक झालं नाहीये. प्रत्येक सामन्यात कुणीतरी एकाने चमकदार कामगिरी करून आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली आणि मग बॉलर्सने एकत्रित चमकदार कामगिरी करून मॅचेस जिंकून दिल्या. आज पहिल्यांदाच चेस करण्याची वेळ आल्यावर बॅटिंग युनिट अपयशी ठरलं. ह्यातून ते उसळी मारून वर येतील अशी अपेक्षा आहे.
दुसरा मुद्दा सिलेक्शन चा. बुमराह, अर्शदीप आणि वरूण ह्या तीनच प्रमुख बॉलर्सना घेऊन इतकी मोठी मॅच इंडिया का खेळली? अक्षर आणि कुलदीप ला बाहेर ठेवून सुंदरला खेळवण्यात काय पॉइंट होता? त्याने २ ओव्हर्स टाकल्या ज्यात काही भेदकता नव्हती आणि बॅटिंगमधे इतरांबरोबरच तो अयशस्वी ठरला. टेस्टमधे नंबर ३ (विषयांतर होतंय, कल्पना आहे मला), टी २० मधे नंबर ५ वर बॅटींग आणि चौथा बॉलर म्हणून खेळवायला वॉशिंग्टन सुंदर म्हणजे काही जॅक कॅलिस नाहीये. चार फ्रंटलाईन बॉलर्स, पाचवा हार्दिक आणि लागलंच तर दुबे / अभिषेक हे ठीक आहे. बॅटींगच्या बाबतीत इतका कॉन्झर्व्हेटीव्ह असलेला भारतीय थिंक टँक बॉलिंगच्या बाबतीत इतके प्रयोग का करतो, कुणास ठाऊक!
आज दणकून हरलो.
आज दणकून हरलो.
पण अक्षरला बसवून सुंदर खेळवायचा निर्णय चुकला होता.
त्याहून मोठी चूक म्हणजे त्याला पुढे पाठवणे. बरे पाठवला तर त्याने काउंटर अटॅक करून पहिल्या बॉलपासून मारायला हवे होते. खरे तर ती त्याची क्षमता नाही. पण जर तो सेट होऊन मग मारणार असेल तर तिथे दुबेला पाठवायला हवे होते. जे बॉल सेट व्हायला सुंदरने वापरले ते दुबेने वापरले असते आणि मग लाँच झाला असता.
सुरुवातीचे तीन विकेट काढल्यावर नंतर जी मिलर आणि ब्रेविसची पार्टनरशिप झाली तिने मॅच दूर नेली, ती निर्णायक ठरली. वरून चक्रवर्ती फेल जाताच आपल्याकडे पार्टनरशिप ब्रेक करायला प्लान बी नव्हता. कारण पॉवरप्ले मध्येच अर्षदीप तीन आणि बुमराह दोन ओवर संपवल्या होत्या. जे सहसा आपण करत नाही. जर सुंदरला खेळवत होते तर त्याला तिथे वापरायला हवे होते. अक्षरला आपण पॉवर प्ले संपल्यावर लगेच वापरतो आणि बरेचदा तो पहिल्या दोन ओवरला एखादी विकेट काढून देतो. ते सुद्धा आज मिस केले. आज काही गोष्टी वेगळ्या केल्या त्या जमल्या नाहीत.
आज विंडीज vs झिंबाब्वे सामना
आज विंडीज vs झिंबाब्वे सामना प्रत्यक्ष बघायला जाणार आहे. स्टेडियममध्ये मॅच बघायची ही माझी पहिलीच वेळ. हा सामना एकतर्फी होऊ नये, जरा चुरशीचा व्हावा, अशी अपेक्षा आहे. बघू काय होते ते.
*अक्षर आणि कुलदीप ला बाहेर
*अक्षर आणि कुलदीप ला बाहेर ठेवून सुंदरला खेळवण्यात काय पॉइंट * - मलाही हे खूप खटकलं. ( सुंदर हा एकंदरीतच टी 20 साठी खास खेळाडू नाही, विशेषत: इतके विपुल पर्याय उपलब्ध असताना, हे आपलं माझं बाळबोध मत ). बूमराने 19व्या ओव्हरमध्ये (जेव्हा फलंदाजांकडून हाणामारी क्षम्यच नाही तर अपेक्षित होती ), फक्त 4 धावा देऊन एक विकेट मिळवली; 20 व्या ओव्हरमध्ये पंड्याने 19 धावा दिल्या ! पंड्याचं संघातलं स्थानही गृहीत धरलंच पाहिजे असंही नाही, हेही माझं बाळबोध मत.
अहो, आपल्या पोरांचं डेअरिंग तर बघा ! प्रत्यक्ष अहमदाबादला, तेंही चक्क ' नरेंद्र मोदी ' स्टेडियमवर , मॅच हरून दाखवलं की नाही त्या जय शहाला !!

https://www.espncricinfo.com
https://www.espncricinfo.com/story/hosts-india-not-feeling-at-home-at-al...
वर्ल्डकप भारतात असला तरी खेळपट्ट्या या आयसीसी बनवते. त्यामुळे आयपीएल आणि द्विपक्षीय मालिकात चमकणारी भारतीय फलंदाजी त्यावर ढेपाळू लागली आहे. कारण अशा कंडिशनवर त्यांनी सराव केला नाहीये.
१) ह्याच स्पर्धेतल्या आधीच्या
*....चमकणारी भारतीय फलंदाजी त्यावर ढेपाळू लागली आहे.* -
१) ह्याच स्पर्धेतल्या आधीच्या सामन्यांतल्या विकेट पण आयसीसीनेच बनवल्या होत्या ना २ ) एवढ्या मोठ्या जागतिक दर्जाच्या स्पर्धेतील फलंदाजी व आयपीएल, द्विपक्षीय मालिका यातील फलंदाजी , ह्यात दबाव व विरुद्ध गोलंदाजीचा दर्जा, विविधता व तयारी यामुळे फरक तर पडणारच ना.
मला वाटतं, कालच्या एका सामन्यामुळे आपल्या फलंदाजीबद्दल साशंक होण्याचं कारण नाहीं; आपली संघ निवड मात्र जरा अधिक काळजीपूर्वक करायला हवी, हे खरं
भारत - द. आफ्रिका
भारत - द. आफ्रिका सामन्यासाठीची स्टार स्पो र्ट्सची जाहिरात
ह्याच स्पर्धेतल्या आधीच्या
ह्याच स्पर्धेतल्या आधीच्या सामन्यांतल्या विकेट पण आयसीसीनेच बनवल्या होत्या ना
>>>
हो मग कुठल्या सामन्यात आपली फलंदाजी चमकली आहे. सगळीकडे अडखळतो आहोत, अडचणीत सापडलो आहोत..
पुढचे दोन तुलनेत सोपे सामने आहेत. गेले वर्षभर जी धूमधडाकेबाज फलंदाजी चालू होती ती पुन्हा कधी होते याची वाट बघू नये. तर शांतपणे प्लान बी सी यांचा विचार करून नव्याने डावपेच आखावेत.
कोणताही देशाने बिनदिक्कत,
कोणताही देशाने बिनदिक्कत, सर्व संघाना लीलया हरवत मोठ्या स्पर्धा जिंकण्याचे दिवस आता इतिहासजमा झाले आहेत. पूर्ण तयारीने स्पर्धेत येऊन, प्रत्येक सामन्यात शिकत व सुधारत जो संघ जिद्दीने खेळेल, तोच विजयाच्या जवळ पोहोचेल. आपल्या तरुण संघाकडे ती जिद्द व आवश्यक प्रतिभा आहे, ही जमेची बाजू आहे. स्पर्धेत सतत अजिंक्यच रहाण्याची गॅरंटी कोणत्याच संघाबद्दल नाही !
आपली फलंदाजी जशी गेले वर्षभर
आपली फलंदाजी जशी गेले वर्षभर होत होती आणि ज्या गँगस्टर एप्रोच मुळे आपण या स्पर्धेआधी हॉट फेवरेट वाटत होतो तितके पहिल्या राऊंड नंतर सुपर एट सुरू होण्याआधी वाटत नव्हतो.
भाऊ स्वतःचीच समजूत काढताहेत.
भाऊ स्वतःचीच समजूत काढताहेत.
आपली टीम अजिबात फॉर्मात नाही,
आपली टीम अजिबात फॉर्मात नाही, उरलेले दोन्हीं सामने पण आपण हरलो तर मला.नवल वाटणार नाही, पण आपली टीम मॅनेजमेंट ते समजून घेत काही डावपेचात बदल करायला तयार नाही, आणि इथले समर्थक पण असेच आहेत
फॉर्मात कशी नाही किंवा नव्हती
फॉर्मात कशी नाही किंवा नव्हती..
सातत्याने इतके सामने जिंकत होतोच आपण..
Pages