क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

119- 3 ( 14 ओव्हर्स ). 240 जवळ जवळ अशक्य ! बघू किती करतात ते !

एक मन म्हणतेय,
१९६ मारायला हरकत नाही या संघाला
ज्या प्रकारचे क्रिकेट हे गेले वर्षभर खेळत आले आहेत ते पाहता..

तर दुसरे मन म्हणतेय,
१९६ मारणे सोपे नाही या संघाला
ज्या प्रकारचे क्रिकेट हे हा वर्ल्डकप खेळत आला आहे ते पाहता..

देवा पहिलेच मन जिंकव !!

*देवा पहिलेच मन जिंकव !!* - खेळात राजकारणी नकोत; आपली पोरं आपल्याला जिंकून देतीलच मैदानात , देवभाऊंना त्यांचं काम करुंदे मंत्रालयात ! Wink

जिंकले !!!!!
संजू सॅमसन नाबाद 97 !!
कठीण समय येता, कोण कामास येतो !!! सलाम, संजू !!

जिंकले!!
सॅमसनची दिमाखदार खेळी!

पण मजा आली आज.. धमाल जिंकलो..
संजूसाठी फार आनंद झाला. क्रिकेटमध्ये असे एखाद्या खेळाडू सोबत घडले की होतोच.. मग तो आपल्या देशाचा नसला तरी होतो.

*संजूसाठी फार आनंद झाला. * +१
किती वेळ आत - बाहेर होत , जिद्दीने स्वतःला सिद्ध करत रहायचं !!! केरळच्या राष्ट्रीय पातळीवरच्या बहुधा ह्या एकमेव क्रिकेटरला शेवटी मोक्याच्या वेळी सार्थक वाटावं अशी स्वतःला न्याय देणारी खेळी करून दाखवता आली ! त्याला खूप खूप शुभेच्छा !!

Hi My Cricket Loving Friends!
Chin up!

I still am totally confident that india is going to win the ICC Men's T20 world cup 2026 despite a heavy demoralising loss to South Africa!

You know why?
Because...

*You only need to include a mallu in the team for India to win a world cup. He doesn't even have to play a single match.

_See the proof:_

1975 - No malayali
1979 - No malayali
1983 - Sunil Walson
1987 - No malayali
1992 - No malayali
1996 - No malayali
1999 - No malayali
2003 - No malayali
2007 - No malayali
2007 - S Sreeshanth
2009 - No malayali
2010 - No malayali
2011 - S Sreeshanth
2012 - No malayali
2014 - No malayali
2015 - No malayali
2016 - No malayali
2019 - No malayali
2021 - No malayali
2022 - No malayali
2023 - No malayali
2024 - Sanju Samson

That's why Sanju Samson is in this squad too!*
Moreover, this time he played a match too!*

CUP THO PAKKA!

_Especially Dedicated to all my Malayali Friends!*_

आज आपण जिंकलो तरीही माझ्या मते रिंकू टीममध्ये हवाच हवा. हवे तेव्हा षटकार मारू शकतो आणि क्षेत्ररक्षणही चांगले करतो. तिलक वर्मा किंवा दुबेला बाहेर बसवावे लागेल. त्यांची आज काही चूक नव्हती पण रिंकूची उपयुक्तता जास्त आहे.

आपण हा सामना जिंकणार. आपले वरचे तिघे पण खेळणार अभिषेक संजू आणि ईशान.
Submitted by बोकलत on 1 March, 2026 - 20:48>>> बोकलत जेव्हा एखादं स्टेटमेंट देतो ना ते फक्त साधं स्टेटमेंट राहत नाही. त्याचा शब्द हा जणू काही अंतिम निर्णयच! तो बोलतो तेव्हा वातावरणातच एक वेगळी शांतता पसरते, कारण सगळ्यांना माहित असतं, आता हे बदलणं शक्य नाही.

*आता हे बदलणं शक्य नाही.* तुम्ही मात्र असेच भारताच्या बाजूने खंबीर उभे रहा,.बदलू नका !!! Wink

रिंकू आत हवा का याचा विचार मी सुद्धा काल करत होतो.
फॉर्म पाहता तो अभिषेक शर्माच्या जागी येऊ शकतो.
संजू ईशान तिलक सूर्य असा फलंदाजीचा क्रम राहील. प्रत्येक जण या नंबरवर सेट आहे.

शिवम दुबे गोलंदाज म्हणून कामाचा नसला तरी फलंदाज म्हणून मस्त आहे. नेहमी दबाव न घेता कूल क्रिकेट खेळतो. प्रेशर सिच्युएशनमध्ये सुद्धा मोठे शॉट सहज खेळतो. कारण सिक्स फोर मारायची स्टाईल सहज आणि इतरांपेक्षा वेगळी आहे. फलंदाजीत वरायटी आणतो. त्याला बिलकुल धक्का देऊ नका.

मला राग येतो सूर्यकुमार यादव चा.
नेहमीच भरवश्याच्या म्हशीला टोणगा अन त्याच्या चेहर्‍यावर खंत देखील दिसत नाही.

भारतवर्षात विश्वचषकाचं वार्तांकन करायला मिळणार म्हणून आनंदात स्वर्गातून निघालो, तर आता मध्यपूर्वेतला धुमाकूळ रिपोर्ट करायचा आदेश देवांनी पाठवलाय ! नारायण... नारायण !!!
20191222_220545_0.jpg

अभिशेकची एक खेळी ड्यू आहे. इंग्लंडविरुद्ध मुंबईमधे मेच आहे जिथे त्यांनाच चोप चोप चोपला होता त्याने. पुनरावृत्ती होईल का ?

"अभिशेकची एक खेळी ड्यू आहे. * - सेमीसाठी संघ निवड ही एकंदरीतच गंभीर, सूर्या व संबंधितांसाठी मोठ्ठी कसोटीच आहे व त्याचा अभिषेकची निवड हाही भाग आहेच; प्रश्न त्याच्या प्रतिभेचा, उच्च दर्जाचा नसून, फॉर्म व पर्यायांची उपलब्धता हा आहे. तो संघात यावा व त्याला साजेसा खेळ त्याने करून दाखवावा, ही सदिच्छा !!!

"अभिशेकची एक खेळी ड्यू आहे." - ड्यू आहे, पण त्याआधी काही दानं योग्य जागी पडायला हवी असं मला वाटतं. त्याचा आत्मविश्वास सद्ध्या डळमळीत झाल्यासारखा वाटतोय - त्याचे शॉट्स, फिल्डिंग, देहबोली बघता - जर खेळाडू चा आत्मविश्वास शाबूत असला, तो नेट्समधे चांगला खेळत असला, सुरूवात होतेय, पण मोठी खेळी यायच्या आधीच चांगल्या बॉलवर किंवा एखाद्या ब्रिलियंट फिल्डिंगमुळे आऊट होत असेल, तर ती मोठी खेळी 'अराऊंड द कॉर्नर' असते. अभिषेक च्या बाबतीत ही मोठी खेळी ज......रा लांब आहे असं वाटतं. हा माझा अंदाज चुकला तर मला आनंदच होईल.

एक खेळी ड्यू आहे हे ठिकठाक फॉर्म आणि चांगल्या स्टेट ऑफ माईंड मध्ये असलेल्या पण बाद व्हायला एकच बॉल पुरत असल्याने त्या लौकिकाला साजेशी मोठी खेळी न आलेल्या फलंदाजाबद्दल वाटते.
अभिषेक ज्या चक्रात अडकला आहे त्याला एक खेळी ड्यु आहे म्हणू शकत नाही. पण या चक्रातून बाहेर पडताना त्याची एक तुफान खेळी येऊ शकते. किंवा नाहीही येऊ शकते. पण आली तर ती मॅच तोच आपल्याला जिंकवून देईल. पण आता तो एक जुगारच आहे.
मला इंग्लंडची भीती नाही. आफ्रिकेची आहे. तेव्हा फायनललाच आली तर उत्तम. अर्थात त्याला खेळवणे गरजेचे.

माझ्यामते अभिशेकला हात लावू नये. रिंकू असाही काही खेळला नाहिये कि अभिशेकच्या जागी (ओपनर म्हणून नाही) यायलाच हवा (जसे किशनच्या बाबतीमधे होत होते). अभिशेक सुटला तर इंग्लंड न आफ्रिका दोन्ही गुमान परत जातील हे उघड आहे.

रणजी फायनल मधे जेके नी पहिल्या डावात जे केले ते म्हणजे कर्नाटकाला त्यांच्या सेमी फायनलच्या मॅचची शिक्क्षा होती Happy

सहसा आपण विनिंग टीम बदलत नाही. त्यामुळे अभिषेक ला काढतील अस वाटतं नाही. पण त्याचा आत्मविश्वास बघता त्याला बसवायला पाहिजे. बॅटिंग तर करतच नाही पण फील्डिंग करताना पण catch सोडलेत. आपण जिंकलो म्हणून ते झाकून गेलं नाहीतर सूर्या, गंभीर नंतर तोच टार्गेटवर असला असता.
नसेलच काढायचं तर त्याला चक दे आणि सनी देओलचा कोणताही सिनेमा दाखवायला पाहिजे.

Pages