क्रिकेट - १०

Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56

जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.

इथे जुना धागा आहे...

https://www.maayboli.com/node/86160

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मी सुद्धा प्रॉपर गोलंदाज याच मताचा होतो. पण तेव्हा आपल्या फलंदाजीवर थोडा फाजील आत्मविश्वास होता जो सध्याची आपली फलंदाजीची स्थिती पाहता डळमळीत झाला आहे.

काल दुबे फलंदाजीला आला नाही. पण जेव्हा सातवा फलंदाज वापरला जात नाही तेव्हाही त्याच्या असण्याचा फायदा झालेला असतोच. फलंदाजीत डेप्थ असल्याने पुढचे फलंदाज तितकेच खुलून खेळलेले असतात. त्यामुळे सातव्या फलंदाजाचे योगदान तो किती वेळा फलंदाजीला आला यात मोजू नये. सध्याची आपली स्थिती पाहता त्याची गरज आहेच.

पण आता हेच गोलंदाजी युनिट असेल तर मग त्यावर उपाय काय त्याचा विचार करा.

1) अक्षर आणि स्पेशली पांड्या यांनी आपली गोलंदाजी आणखी जबाबदारीने टाकायला हवी. जेणेकरून कर्णधाराला सहाव्या गोलंदाजाचा विचार करावा लागणार नाही याची जबाबदारी त्यांनीच उचलावी.

2) कर्णधाराची भूमिका आणि तो गोलंदाजी बदल कसे करतो हे महत्वाचे. आफ्रिका सामन्यात आपण ते वेगळे करायला गेलेलो जे चुकले होते. बुमराह आणि अर्शदीप यांच्या पाच ओवर संपवल्या होत्या. ते करू नये कारण एक extra विकेट मिळाली तरी त्याचा फायदा होत नाही जेव्हा मागून कोणीतरी मारायला सुरुवात करते आणि तुमच्याकडचे ऑप्शन तुम्ही आधीच खर्च केलेले असतात. वरुनचा अभ्यास आता बरेच जणांनी केला असणारच. त्यामुळे त्याला समोरच्या संघातील कोणी चांगले खेळत आहे हे लक्षात येताच त्याला थांबवावे आणि विकेट गेल्यावर नवीन फलंदाजासमोर पुन्हा आणावे.

गेल्या वर्ल्डकपला 6 गोलंदाज असले तरी जडेजा असून नसल्यासारखा होता इतके वाईट फॉर्म मध्ये होता. अंतिम सामन्यात सुद्धा त्याने एकच ओवर टाकल्याने अक्षरची ती कुप्रसिद्ध ओवर आली ज्यात गेम आफ्रिकेकडे झुकला होता. पण त्यानंतरही बुमराह अर्शदीप पांड्या वापरून शेवटच्या ओवर प्रतिस्पर्धी संघाला कसा चोक करायचा याचा आपला प्लान रेडी असल्याने आपण अगदीच गळपटळो नाहीत.

असो बॉलिंग स्ट्रेटेजी मुळातच आपली हीच होती वर्षभर. आफ्रिकेच्या सामन्याला वेगळे का केले माहित नाही. आता पुन्हा पूर्वपदावर आले.

आणि हो दुबे हवा संघात. निव्वळ फलंदाज म्हणून तरी हवा. त्याची फलंदाजी आणि सिक्स हिटिंग इतरांपेक्षा वेगळ्या शैलीची आहे. त्यामुळे फलंदाजीत तो व्हरायटी आणतो.

संजू अजूनही वैयक्तिक परफॉर्मन्स पाहता खात्रीशीर आणि कॉन्फिडंट वाटत नाही. पण टॅक्टिकल मूव म्हणून त्याचे ओपनर येणे योग्य होते. तसेही सध्या सगळेच गडबडलेले आहेत. पण तिलक वर्माला न काढता रिंकूच्या जागी आला हे सुद्धा चांगले केले. तिलक वर्मा फ्लोटर म्हणून कुठेही वापरू शकतो असा आहे. विश्वास तर आता यांच्यावरच ठेवावा लागणार..

*त्यामुळे सातव्या फलंदाजाचे योगदान तो किती वेळा फलंदाजीला आला यात मोजू नये. सध्याची आपली स्थिती पाहता त्याची गरज आहेच.* +१. आपल्या बेलगाम शैलीने खेळणारा, विरुद्ध संघावर सतत ज्याच्याबद्दल दबाव राहू शकतो असा एक तरी ' ठार वेडा ' ( चांगल्या अर्थाने )फलंदाज संघात असणं टी 20 त तरी खूप फायदेशीर ठरत असावं. दुबे त्या भूमिकेत फिट्ट बसतो !

पावसाने घोळ नाही घातला आणि आज पाक किमान ६४-६५ धावांच्या फरकाने किंवा ७ षटके राखून जिंकला तरच उपांत्य फेरी गाठू शकतो.
परंतू अहमदाबाद येथील अंतीम सामन्याची तिकीटविक्री सुरु असल्याने पाकिस्तान जिंकण्याची शक्यता वाटत नाही.

भारतासाठी जर तर काही नाही. वेस्ट इंडीज सोबत जिंका किंवा गाशा गुंडाळा हे दोनच पर्याय.

काल सॅटनरने फर्ग्युसन किंवा हेन्रीला १८ वे षटक का दिले नसावे? १९ वे पण स्वतः टाकले. त्या दोन षटकात ३८ धावा गेल्या. आणि शेवटच्या षटकात केवळ ५ धावांचे उद्दीष्ट राहिले इंग्रजांसाठी.

“ काल सॅटनरने फर्ग्युसन किंवा हेन्रीला १८ वे षटक का दिले नसावे?” - माझ्या दृष्टीने ते फार मोठं ब्लंडर होतं. जरी फिलिप्सने त्याआधी चांगली बॉलिंग केली असली तरी इतक्या क्रिटिकल पॉइंटला, २ फ्रंटलाईन बॉलर्स च्या प्रत्येकी २ ओव्हर्स शिल्लक असताना फिलिप्सला ती ओव्हर दिली, त्यात २२ रन्स गेल्या आणि मॅच फिरली.

<<< अहमदाबाद येथील अंतीम सामन्याची तिकीटविक्री सुरु असल्याने पाकिस्तान जिंकण्याची शक्यता वाटत नाही.
>>>>

वर्ल्डकप आहे हे.. आयपीएल नाही Happy

वर्ल्डकप आहे हे.. आयपीएल नाही>>>

छे! मी कुठे म्हटले आयपीएल आहे ते.

पाकिस्तान अंतिम सामन्यात आला तर सामना कोलंबोत होईल आणि अहमदाबादची तिकिटे काय करणार मग?

अंतिम सामन्यात पाकिस्तान खेळणार नाही हे गृहित असणार ना अहमदाबादची तिकीट विक्री सुरु करण्याआधी.

इथे तिकीट विक्री जोरात सुरु आहे. मग पाकिस्तान अंतिम फेरीत आल्यावर तिकिटे परत करून पैसे परत करावे लागतील.

https://in.bookmyshow.com/sports/icc-men-s-t20-world-cup-2026-final/ET00...


<<< अहमदाबाद येथील अंतीम सामन्याची तिकीटविक्री सुरु असल्याने पाकिस्तान जिंकण्याची शक्यता वाटत नाही.

>>>><

वर मी कोट केलेल्या वाक्याचा अर्थ असा होतो की निकाल आधीच फिक्स आहे
म्हणून म्हटले वर्ल्ड कप आहे तो आयपीएल नाही.

आणि पैसे परत करणे इतके काही अवघड नाही.
ऑनलाइन शॉपिंग सगळी रिफंड पॉलिसी वरच चालते..

वर मी कोट केलेल्या वाक्याचा अर्थ असा होतो की निकाल आधीच फिक्स आहे>>

निकाल फिक्स आहे हे मला कळत नाही. पण हे आयपीएल नाही हे मला कळते. आणि आयपीएल फिक्स असते हे ही मला माहिती नाही.

आणि पैसे परत करणे इतके काही अवघड नाही.
ऑनलाइन शॉपिंग सगळी रिफंड पॉलिसी वरच चालते..>>>>
रिफंड मिळतात हे मला माहिती आहे परंतू सामना अहमदाबाद वरून कोलंबोला जाऊ शकतो हे माहिती असतानाही जवळपास ७०% पेक्षा जास्त तिकिटांचे बुकिंग झाल्याचे दिसतेय. आणि कोलंबोसाठी अंतिम सामन्याचे बुकिंग का बरे सुरु नसावे?

निकाल फिक्स आहे हे मला कळत नाही.
>>>
मग त्या वाक्याला काही अर्थ उरत नाही कारण त्याचा अर्थ तोच होतो की पाकिस्तानी येणार नाही हे आधीच फिक्स आहे म्हणून तिकीट विक्री चालू आहे.

रिफंड करता येतात हे तुम्हाला माहित आहे तर हा प्रश्नच पडू नये की बुकिंग का चालू आहे.
उलट त्या पैशावर महिनाभराचा इंटरेस्ट मिळेल Happy

कोलंबोला बुकिंग चालू नाही कारण पाकिस्तान फायनल यायची शक्यता कमी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा पोलिसी संबंधित निर्णय आहे. शक्यता कमी असताना त्यांना आधीच बुकिंग सुरू करायची नसेल.

इकडे बुकिंग सुरू केली म्हणजे पाकिस्तान येणार नाही हे नक्की असा अर्थ काढणे चुकीचे

मग त्या वाक्याला काही अर्थ उरत नाही कारण त्याचा अर्थ तोच होतो की पाकिस्तानी येणार नाही हे आधीच फिक्स आहे म्हणून तिकीट विक्री चालू आहे.>>>
ते निरर्थक असेलही! मला एवढे कळतही नाही. पण मग कोलंबोलाही अंतिम सामन्याची तिकिट विक्री सुरु असायला हवी एवढेच मला वाटते.

श्रीलंका स्वतः बाहेर पडल्यावर कोलंबोला पाकिस्तान क्रिकेटप्रेमींसाठी का अँडव्हान्स तिकीट विक्री सुरू करतील?

भारतात तिकीट विक्री सुरू झाली कारण भारत स्वतः अंतिम सामन्यात येण्याची शक्यता आहे अजून

मला पर्सनली वाटते की पाकिस्तानी यावी आणि भारत पाक फायनल व्हावी.
यामुळे दोन गोष्टी होतील.
एक म्हणजे पाकिस्तान समोर आपला रेकॉर्ड चांगला आहे. दुसरे म्हणजे अहमदाबादला खेळावे लागणार नाही.
आपले वर्ल्डकप जिंकायचे चांसेस वाढतील

कोलंबोला बुकिंग चालू नाही कारण पाकिस्तान फायनल यायची शक्यता कमी आहे.>>>

"Cricket is a game of glorious uncertainties" असे म्हणतात.

मग सर्व विषयांत पारंगत असे जाणकार असे कसे गृहित धरू शकतात?

अहो श्रीलंका स्वतः नाही पाकिस्तान आहे.. दुसऱ्या देशातील क्रिकेट प्रेमींसाठी शक्यता कमी असताना ते आधीच तिकीट बुकिंग का चालू करतील?

आणि भारत स्वतः याची शक्यता जास्त असताना अहमदाबादला बुकिंग चालू आहे ते मात्र तुम्हाला आश्चर्याचे वाटत आहे. तुम्ही वरचे वाक्य म्हणून आपलेच म्हणणे खोडत आहात Happy

श्रीलंका स्वतः बाहेर पडल्यावर कोलंबोला पाकिस्तान क्रिकेटप्रेमींसाठी का अँडव्हान्स तिकीट विक्री सुरू करतील?>>>

लंका सोन्याची होती तरी लंकेच्या क्रिकेट बोर्डाला पैश्याचे वावडे नसावे. त्यांनाही चार पैश्यावर इंटरेस्ट मिळाला असता ना?

उलट भारत-पाकिस्तान अंतिम सामन्याची शक्यता असताना जास्त बुकिंग होऊ शकेल ना?

त्यांनाही चार पैश्यावर इंटरेस्ट मिळाला असता ना?
>>>

लंकेत असे किती भारत पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी असतील?
आणि त्यातही पाकिस्तान फायनल यायची शक्यता कमी असताना ते अँडव्हान्स तिकीट बुक का करतील? कारण तसेही त्यांना ती नंतर मिळेलच..

आपल्याकडे मात्र तशी सिच्युएशन नाही..
आज बुक नाही केली तर उद्या कदाचित मिळणार नाही

<<<< मग सर्व विषयांत पारंगत असे जाणकार असे कसे गृहित धरू शकतात?
>>>>

सॉरी हे वाक्य मिस केले होते.
धन्यवाद आणि शुभ सकाळ.

माझे मुद्दे मांडून संपले.
आता आजच्या सामन्यावर फोकस करूया.....

सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीलंका बाद होण्यापुर्वीच अहमदाबादची तिकीट विक्री सुरु झाली आहे. श्रीलंका २५ तारखेला स्पर्धेबाहेर पडली.

श्रीलंका फायनलला आली असती तरी भारत फायनल मध्ये गेल्यास सामना भारतातच होणार होता.

चला पुढे जाऊया.

पाकिस्तानला ६४ धावांनी जिंकायचे आहे किंवा साधारण १३ ओवर मध्ये चेस करायचे आहे.

आव्हान अवघड आहे!
श्रीलंकेचा कॉलेप्स घडवावा लागणार. हे मात्र होऊ शकते.

आता तर लंका एवढी गचाळ गोलंदाजी आणि गचाळ क्षेत्ररक्षण करतेय आणि इतके कॅच सोडतेय की त्यांना काही पडलीच नाहीये.. की पाकिस्तानने सेटिंग लावली आहे..

156 - 0 ( 14 ओव्हर्स )
*पाकिस्तानला ६४ धावांनी जिंकायचे आहे किंवा साधारण १३ ओवर मध्ये चेस करायचे आहे.* - असं असेल तर टॉस जिंकूनही पाकला प्रथम फलंदाजी देणं श्रीलंकेला योग्य वाटलं ?

१७६-० ते २१२-८
शेवटच्या २६ चेंडूत ८ विकेट गेल्या.

श्रीलंकेला एक सेमीफायनल मिळणार. ICC ला श्रीलंकेत फायनलपण खूप फायदा देणार. सगळा पैशांचा खेळ दिसतो आहे. फक्त २७ रन्स ३६ चेंडूत. पाकिस्तान मॅच जिंकेल पण टुर्नामेंटमधून बाहेर पडेल.

2003 चा वर्ल्ड कप. आपली सुरवात ढेपाळत झाली. नेदरलँडविरुद्ध आपला पहिला सामना स्पर्धेतला सगळ्यात बोरिंग सामना म्हणून घोषित करण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपल्याला सडकून हाणला. भरपूर टीका झाल्या पण नंतर झिम्बांब्वेविरुद्ध आपण जिंकलो आणि ‘हरा’रेमध्ये जिंकलो रे अश्या माथ्याची बातमी आलेली आजही आठवते. तिथून जी काय विजयी घौडदौड सुरू झाली की विचारू नका. आणि तो ऐतिहासिक दिवस उजाडला.
१ मार्च २००३. पाकिस्तानविरुद्धचा सामना! त्या दिवसाचं थरार, तो ताण, ते भावनिक क्षण प्रत्येक चेंडूवर धडधडणारी हृदयं! त्या सामन्याबद्दल कितीही लिहिलं तरी कमीच आहे. तो विजय फक्त सामना नव्हता, तो अभिमानाचा क्षण होता. तर आजपण १ मार्च आहे आणि भारताचा आज क्वॉटरफायनल सामना आहे. त्यावर्षी जो विजयरथ अपूर्ण राहिला होता तो या वर्षी आजच्या दिवसाचा मुहूर्त साधून पुढे जाऊन ट्रॉफी उचलूनच पूर्ण व्हावा.

Pages