Submitted by कृष्णा on 13 October, 2025 - 07:56
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
जुना धागा २००० पार होऊ लागला म्हणून हा नविन धागा.
इथे जुना धागा आहे...
हुश्श्...
हुश्श्...
(No subject)
इंग्लंड, मानलं !! सलाम !
इंग्लंड, मानलं !! सलाम !
भारत, अभिनंदन !!!!!
छान सामना झाला,सेमीला शोभेसा ! फायनलसाठी शुभेच्छा !!
हा वर्ल्ड कप सुरू व्हायच्या
हा वर्ल्ड कप सुरू व्हायच्या आधी अभिषेक शर्मा आणि वरुण चक्रवर्ती आपलेच नाही तर जगातले नंबर वन फलंदाज आणि गोलंदाज होते.
आता त्यांना फायनलमध्ये खेळवावे की नाही हा प्रश्न आहे!
काय खेळ आहे हा क्रिकेट
वरून जागी कुलदीप हा बदल तर होईलच असे वाटत आहे.
अभिषेक जागी प्रिय रिंकू यास खेळवावे का हा निर्णय घ्यावा लागेल.
खरच बदल करायची गरज आहे का पण
खरच बदल करायची गरज आहे का पण ? बाकीचे सगळे फलंदाज नि गोलंदाज चोख कामगिरी करत असतील तर सेटल झालेले काँबो बदलण्यात काय हशिल आहे ? वर्ल्ड कपच्या आधी हे दोघे सामने जिंकून देतच होते. रिंकू जिथे खेळतो तिथे तेव्हढेच गँबल आहे नि वरूण ने मह्त्वाची विकेट काढलीच हेही आहेच. ह्या पिचवर आर्चर सुद्धा साठच्या वर धावा देऊन गेलाय. हे माझे मत.
मॅन ऑफ द मॅच संजू, बुम्रा नि अक्षर ह्यांना मिळून द्यायला हवे होते. तिघांन्हीही महत्वाच्या मोमेंट्स कॅपचर केल्यात. वानखेडेवर परत पांड्याचा जयजयकात एकायला गंमत वाटली.
अहमदाबादला फायनल ठेवण्याचा अट्टाहास बंद करायला हवा.
“ अहमदाबादला फायनल ठेवण्याचा
“ अहमदाबादला फायनल ठेवण्याचा अट्टाहास बंद करायला हवा.” - खरंय. वानखेडेची व्हाईब भारतात इतरत्र कुठेही नाही. फायनल ला वानखेडेच हवं.
“ मॅन ऑफ द मॅच संजू, बुम्रा नि अक्षर ह्यांना मिळून द्यायला हवे होते.” +१
मला वाटत नाही की फायनलमधे (इंज्युरीचा अपवाद वगळता) काही बदल होतील संघात. अभिषेक ऐवजी किशन ला ओपन करू दिलं आणि खाली कुलदीप ला आणलं तर सहा बॉलिंग ऑप्शन्स मिळू शकतात आणि मधल्या ओव्हर्समधे विकेट्स घेऊन प्रेशरही टाकता येऊ शकतं. पण ही कविकल्पनाच ठरेल.
काहीच बदल करणार नाहीत, पण
काहीच बदल करणार नाहीत, पण वरुण chya जागी कुलदीप la घ्यायला हवे
बदल फायद्याचा असेल तर करावा.
बदल फायद्याचा असेल तर करावा.
अपयशी खेळाडूंचे ओझे सातत्याने इतर खेळाडूंवर पडत असेल तर त्याचा फटका बसेपर्यंत वाट बघू नये.
विचार करा बदल नको म्हणत संजूच संघात आला नसता तर...
बाकी विनिंग कॉम्बिनेशन ही थोडी फसवी टर्म आहे. जर तुम्हाला लाईक टू लाईक रिप्लेसमेंट मिळत असेल तर तुमचे "विनिंग कॉम्बिनेशन" बदलत नाही. जी भूमिका वरून निभावत होता तीच कुलदीप निभावेल. इतरांच्या भूमिकांना धक्का बसणार नाही. थोडक्यात हा बदल घडल्यास इतरांना काही ॲडजस्टमेंट करावी लागणार नाही.
हेच अभिषेक जागी रिंकू ही वरवर पाहता लाईक टू लाईक रिप्लेसमेंट वाटत नसली तरीही संजू ईशान ओपनिंगला आणि त्यानंतर तिलक सूर्या यात देखील कोणाची भूमिका बदलत नाही. कारण संजू संघात येण्याआधी आपले हेच कॉम्बिनेशन होते. त्यामुळे अभिषेक जागी रिंकू आला असे न समजता अभिषेक जागी संजू आला असे याकडे बघा.
वरूनचा कॉन्फिडन्स फार लूज झाला आहे. त्याचा न्यूझीलंड सोबतचा आधीचा रेकॉर्ड चेक केला नाही. सध्या करूही नये. आताचा वरून वेगळाच भासत आहे. आणि अहमदाबादला फार टर्न सुद्धा मिळत नाही. तसेच त्याला पर्यायी गोलंदाज सुद्धा कोणी साधारण नाही तर कुलदीप सारखा गोलंदाज बेंचवर बसला आहे.
असो हे दोघे खेळलेच तर माझ्यासाठी तो वाईज डिसिजन न ठरता जुगार ठरेल. पण त्याचसोबत आपण हा जुगार जिंकावा अशीच इच्छा राहील. शेवटी वर्ल्डकप घरातच राहिला पाहिजे हे महत्वाचे.
बरोबर की चूक माहीत नाही, पण
बरोबर की चूक माहीत नाही, पण मला वाटतं -
1 फायनल सामन्यासाठी खेळपट्टी व विरुद्ध संघाच्या खास शक्ती /मर्मस्थळासाठी जर काही बदल अत्यावश्यक असेल, तरच करावा ;
2 काल सूर्या बाद झाला तो फटका केवळ धावसंख्या वाढवण्याच्या प्रयत्नात केला म्हणूनच समर्थनीय म्हणता येईल. पण, दुबेचा रन- आऊट अजिबात समर्थनीय नव्हता. फायनलमध्ये हे टाळलंच पाहिजे;
3 आपल्याकडे फिरकीच्या विभागात बुमरासारखा हुकमी गोलंदाज नाही, हे कटु सत्य स्वीकारून गोलंदाज वापरणं ही तारेवरची कसरत सूर्याला करावी लागणार आहे; त्याकरता न्यूझीलंडच्या प्रत्येक फलंदाजाला कोणता गोलंदाज प्रामुख्याने वापरायचा , हे गणित अभ्यासपूर्वक ठरवावं लागेल;
4 दुबेला वर फलंदाजीला पाठवणं प्रयोग म्हणुन ठीक होतं पण त्याला परिस्थितीनुसार पंड्याच्या आधी/नंतरच खेळवणं योग्य वाटतं;
5 अभिषेकला खेळवला तर त्याला सलामीलाच खेळवावा, तिथेच तो क्लिक होण्याची शक्यता अधिक वाटते;
6 अर्शदीप उजव्या फलंदाजाना रोखताना खूपच वाइड चेंडू टाकतो; डावपेच म्हणून हे ठीक असलं , तरीही त्यामुळे खेळावरची पकड सुटत जाते, यांचंही भान ठेवणं गरजेचं आहे.
बाकी, आपली पोरं मस्त खेळताहेत. शुभेच्छा तर आहेतच !
अहो, झाले की नाही तुमचे टी 20चे कॉमेंट्स व सल्ले लिहून ? आत्ता येईलच तो कचऱ्याचा डबा न्यायला !!
काल दुबे चे प्रयत्न थोडे कमी
काल दुबे चे प्रयत्न थोडे कमी पडले म्हणून आपण सामना ७ धावांनी जिंकलो. सामन्यातला बॉल बहुतेक त्याचा असेल म्हणून त्याला कमीत कमी एक ओव्हर तरी द्यावी लागत असेल.
>>अहमदाबादला फायनल ठेवण्याचा अट्टाहास बंद करायला हवा
ही फायनल हरलो तर ते स्टेडियम तोडून तिथे दुसरे काहीही बनणार नाही असे काहीतरी करायला लागेल.
*...म्हणून त्याला कमीत कमी एक
*...म्हणून त्याला कमीत कमी एक ओव्हर तरी द्यावी लागत असेल.*
पण सिरीयसली, अक्षरची एक ओव्हर शिल्लक असतानाही काल दुबेला कां चेंडू दिला, हा प्रश्नच आहे ( जरी निकालात फरक पडणार नव्हता, तरीही ) !
दुबे wide yorker टाकेल ज्यावर
दुबे wide yorker टाकेल ज्यावर ५ सिक्स मारता येणार नाहीत असा काहीसा विचार असेल.
जर शेवटच्या ओव्हरला १४–१५ धावा हव्या असत्या तर मात्र अक्षरकडेच गेले असते.
जिंकण्याचा मोह नाही
जिंकण्याचा मोह नाही
हारण्याचे भय नाही
*दुबे wide yorker टाकेल
*दुबे wide yorker टाकेल ज्यावर ५ सिक्स मारता येणार नाहीत असा काहीसा विचार असेल.* - असं करताना भल्या भल्या गोलंदाजांचे चेंडू ' वाईड ' किंवा ' फुल टॉस ' होतात; दुबेला शेवटची ओव्हर देऊन आपण ती स्ट्रॅटीजी वापरली असती, तर ती ओव्हर ८-९ चेंडूची होऊन आपण उद्याच्या सामन्यात नक्कीच नसतो !! नशीब, दुबेने तसं न करता फक्त 22 धावांच देऊन ती ओव्हर फक्त 6 चेंडूतच संपवली !!
एकदा त्याने दोन चांगले बॉल
एकदा त्याने दोन चांगले बॉल टाकून सामना जिंकला की मग पुढच्या बॉलवर मारलेल्या सिक्सना काही अर्थ नसतो. तेव्हा बरेचदा बॉलर काही एक्स्ट्रा एफर्ट न लावता, कुठलेही प्लान न करता, नो वाईड जाऊ नये एवढेच बघत असतो आणि फलंदाजावर सुद्धा प्रेशर नसते. त्यामुळे फक्त ७ धावानी जिंकले याचा अर्थ फक्त एक सिक्स कमी पडला असे काढू शकत नाही.
मला वरच्या पोस्टमधलं लॉजिक
मला वरच्या पोस्टमधलं लॉजिक खरंच कळलं नाही !
१८वी ओव्हर बुमराहने टाकली हा
१८वी ओव्हर बुमराहने टाकली हा मास्टरस्ट्रोक होता. इंग्लंडला १९वी अपेक्षित असेल. हार्दिकने एक षटकार देऊनही १९व्या ओव्हरमध्ये फक्त ९ धावा दिल्या. त्यामुळे २०व्या ओव्हरचे टेन्शन अपेक्षित नव्हते. पण १ल्या बॉलवर runout झाला नसता तर प्रकरण महागात पडू शकले असे. दुबे ह्या लेव्हलचा बॉलर नाही हे मान्य करावेच लागेल.
आता फायनलकडे लक्ष. वरुणच्या जागी कुलदीप, अभिषेकच्या जागी रिंकू (सलामीला ईशान), आणि अर्शदीपच्या जागी सिराज हवेत टीममध्ये. Horses for courses. फॉर्म नसलेले खेळाडू फायनलमध्ये जड होतील. हा न्यूझीलंडसाठी पण surprise फॅक्टर असेल.
अर्शदीपच्या जागी सिराज >>> हे
अर्शदीपच्या जागी सिराज >>> हे का मध्येच? अर्शदिप तर महत्वाचा बॉलर आहे.
अभिषेक च्या जागी रिंकू la
अभिषेक च्या जागी रिंकू la घेण्यात अर्थ नाही, आपली गोलंदाजी कमजोर आहे, 1 extra गोलंदाज हवा,त्यामुळे सुंदर ला घ्यायला हवे आणि वरुण च्या जागी सिराज la, म्हणजे तो पॉवरप्ले मध्ये टाकू शकेल
टीम अशी असावी बॅटिंग क्रमानुसार
1 संजू
2 ईशान
3 अक्षर
4 सूर्या
5 तिलक
6 दुबे
7 हार्दिक
8 सुंदर
9 अर्शदीप
10 बुमराह
11 सिराज
सूर्या आणि तिलक 4 आणि 5 वरच योग्य आहे
भारतीय संघाला शुभेच्छा!!
भारतीय संघाला शुभेच्छा!!
कप मुक्कामी ठेवा इथेच!
माझा कयास - सेमीचाच आपला संघ
माझा कयास - सेमीचाच आपला संघ फायनलही खेळेल; झालाच बदल, तर वरुणच्या जागी कुलदीप येईल.
( *आपली गोलंदाजी कमजोर आहे * +1 . पण extra गोलंदाज हा त्यावर खरंच उपाय होऊ शकतो का, हा खरा प्रश्न आहे . )
अंतिम सामना रंगतदार व्हावा, सरस संघ जिंकावा व आपण सरस ठरावं , ही प्रार्थना !
टॉस कोण जिंकतो त्याच्यावर
टॉस कोण जिंकतो त्याच्यावर बरेच काही अवलंबून आहे, असं वाटतंय मलातरी.
सिराज wicket taking गोलंदाज
सिराज wicket taking गोलंदाज आहे. अर्शदीप सध्या conservative बोलिंग करत आहे. म्हणून माझ्या मते सिराजला खेळवले पाहिजे.
अर्शदीप पॉवर प्ले मध्ये
अर्शदीप पॉवर प्ले मध्ये स्विंग घेऊन येतो पण महत्वाचे म्हणजे तो बुमराह सोबत डेथ बॉलर म्हणून बेस्ट पार्टनर आहे. आपला टारगेट डिफेंड करताना गेम प्लान या जोडीवरच अवलंबून असतो. आणि ते निराश करत नाहीत.
*सिराज wicket taking गोलंदाज
*सिराज wicket taking गोलंदाज आहे.* - मान्य. पण स्पर्धेत अर्शदिपला सातत्याने खेळवत आहेत व तो खूप प्रभावी नसला, तरी उपयुक्तही ठरतो आहे. आता त्याच्या जागी अंतिम सामन्यात सिराजला खेळवतील ही शक्यता म्हणूनच वाटत नाही..अर्थात, ' सरप्राइज एलिमेंट ' म्हणून हा बदल चांगलाही ठरू शकतो.
आठवतं, आपलं लग्न ठरलं तेव्हा आईला मी म्हटलं, तुम्ही चांगले ऑल राउंडर आहात; मग वडिलांनी तिला समजावलं होतं, ' म्हणजे, तो मोठ्ठा भोपळा आहे !! '
शर्माची ड्यू असलेली खेळी आज
शर्माची ड्यू असलेली खेळी आज येणार आहे.
आपण टॉस हरलो. आपली बॉलिंग
आपण टॉस हरलो. आपली बॉलिंग बघता, आता कठीण आहे. पण एखादा चमत्कार झाला तर कदाचित जिंकूपण.
Inshallah आता तीच इच्छा आहे.
Inshallah आता तीच इच्छा आहे.
अभिषेक आणि वरून दोघांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आज सार्थ ठरवून दाखवावा
संजूने क्लास इनिंगची हॅट्रिक मारावी आणि सूर्याने तळपावे.
स्पर्धेच्या सुरुवातीला सुद्धा
स्पर्धेच्या सुरुवातीला सुद्धा फेवरेट टीम भारतच होती
आणि आजही भारतच आहे
कदाचित फेवरेट असण्याची टक्केवारी कमी झाली असेल.. पण फेवरेट आपणच आहोत
आवरा यांना
आवरा यांना


आज पण २५० मारतील नाहीतर
संजू अभिषेक ईशान हे तिघे बाद नाही झाले तर गिअर चेंज होणारच नाही..
Pages