काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>>>>मग घालायचं काय?
हा उत्तम प्रश्न विचारलात Wink आमचे नशीब.
>>>>खादी म्हणजे एक नवीन चीवर बनलं होतं.
चीवर म्हणजे?
-------------------------
ए आय - चीवर (Chivar): संन्याशाचे वस्त्र, भगवे वस्त्र, बौद्ध भिक्षूंचे वस्त्र. मराठीत 'चीवर' या शब्दाचा थेट अर्थ 'भगवे वस्त्र' किंवा 'संन्याशाचे/भिक्षूचे वस्त्र' असा होतो, जो संस्कृतमधून आलेला शब्द आहे आणि विशेषतः बौद्ध भिक्षूंच्या वस्त्रांसाठी वापरला जातो,

*थोडं हसुया*

*काही अतिसुंदर(?) विचार*

1: अंगात दम असणं चांगलं,
पण तो सारखा लागणं अत्यंत वाईट

2: तारुण्यात न घसरलेला पाय उतारवयात नक्की घसरतो...
बाथरूममध्ये......!

3: कुणी उशिरापर्यंत झोपलेलं मी बघूच शकत नाही,
म्हणून मीच रोज उशिरा उठतो....

4: भांडण करताना ते विकोपाला जाणार नसेल तर ते करण्यात काहीच अर्थ नाही....

5: मराठी माणसांनी मराठीतूनच "कॉन्व्हरसेशन" केले पाहिजे....

6: स्वर्गात जायचे असेल तर आईचे पाय दाबून झोपत जा.. मग ती आई तुमची असो वा तुमच्या पोरांची..

7: काही लोक खरेदीला गेल्यावर कधीच डिस्काउंट मागत नाहीत. फक्त दुकानातून बाहेर जायची ॲक्टिंग करतात.

8: रडल्यानंतर मन मोकळं होवो ना होवो पण.. नाक मात्र नक्की मोकळं होत..

9: तुम्ही कितीही महागातली सुपरफास्ट बाईक मुलांना घेऊन दिली तरी.. ती ॲक्टिवा च्या मागेच चालणार..

10: कुंडली खरं तर सासू अन् सुनेची जुळली पाहिजे. मुलगा बिचारा कुणाशीही adjust करून घेतो..

11: लग्नात मुलीचे मामा अन् नवरी सोबत असलेली करवली.. या दोघांच्या attitude ची बरोबरी कोणीच करू शकत नाही..

12: जिथे मारामारी करणं शक्य नाही.. तिथे टोमणे तरी मारूनच यायचं.. सोडायचं नाही अजिबात..

13: पोट आणि Ego कमी असेल तर.. माणूस कोणालाही मिठी मारू शकतो..

14: गाढ झोपेत काहीच ऐकू न येणाऱ्या लोकांना.. "तिकडे सरक" हा शब्द कसा काय ऐकू जातो..?

15: जर तुम्हाला तुमचं घर लहान वाटत असेल.. तर एखाद्या दिवशी फरशी पुसून बघा.

फोटोत दिसणारा हा म्हातारा व्यक्ती नीट पहा..याचे नाव आहे डाॅ.जावेद अहमद..!
मुळचा पाकिस्तानी असणारा हा जावेद अमेरीकेच्या व्हर्जीनिया राज्यातील एका प्रसिद्ध रूग्णालयात स्त्रीरोग आणि प्रसुती तज्ञ विभागाचा (Obstetricians and gynecologists Dept) प्रमुख डाॅक्टर म्हणुन काम करत होता.

आता अमेरिकेत या जिहाद्याने नेमका कोणत्या प्रकारे त्याचा दीन मुकम्मल केला ते निट वाचा..

हा डॉक्टर त्याच्याकडे उपचारासाठी येणाऱ्या गर्भवती महिलांवर उपचार करण्याच्या नावाखाली त्यांची गर्भावस्था अजुन गुंतागुंतीची करून ठेवायचा त्यामुळे त्यांची सामान्य प्रसुती होणे अशक्य होत असे.
मग हाच त्या महीलांना सीझेरीयन शस्त्रक्रियेच्या नावाखाली ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन सीजेरीयनने त्यांची प्रसुती करायचा पण त्यासोबतच गुपचुप Hysterectomy Surgery (गर्भाशय काढून टाकण्याची शस्त्रक्रिया) सुद्धा करायचा...
इतकेच नाही तर त्याच्याकडे स्त्री निगडीत (PCOS,PID..etc) सामान्य आजारांच्या उपचारांसाठी येणाऱ्या महीला/मुलींना कायमचे वंध्यत्व येणारी किंवा गर्भाशय खराब करणारी औषधे द्यायचा..

सोप्या भाषेत पोलिसांनी पकडण्याआधि त्याने त्याच्या कारकीर्दीत अमेरीकतील जितक्या गैरमुस्लिम महीला रूग्णांची सीजेरीयन शस्त्रक्रिया किंवा इतर कुठले उपचार केले असतील त्या सगळ्या महिलांना भविष्यात कधिही गर्भधारणा होणार नाही आणि त्यातल्या कितीतरी तर सध्या कँसरने बाधित झाल्यामुळे पूर्ण आयुष्यही जगु शकणार नाहीत...आणि त्या डाॅक्टरकडुन उपचार घेतलेल्या या अशा महीलांचा आकडा हजारोंमध्ये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे..

पोलिस तपासात असे आढळले आहे की,खुप वेळा तो वापरत असलेल्या नियमबाह्य औषधांच्या तक्रारी त्याच्या सहकारी डाॅक्टरांनी रूग्णालय प्रशासनाकडे केल्या होत्या पण रूग्णालय त्या तक्रारींकडे सपशेल दुर्लक्ष करत होते कारण हा डॉक्टर त्या रुग्णालयासाठी दरवर्षी तब्बल १ कोटी ८० लाख डाॅलर्सपेक्षा जास्त कमाई करून द्यायचा!

शेवटी असंख्य महिला रुग्णांनी या डॉक्टरविरुद्ध पोलिसांकडे तक्रार करून गुन्हे दाखल केले तेव्हा चौकशी करण्यात आली आणि तपासात हा दोषी आढळला तेव्हा कोर्टाने त्याला ५९ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे..जो मोजुन २० वर्षेही ती शिक्षा भोगण्यासाठी जगु शकणार नाही !

कदाचित त्याचा हेतु पूर्ण झाला म्हणून तो आनंदाने शिक्षा भोगता भोगता..राह-ए-ईमान मधील शहीदांच्या रांगेत उभा राहुन जन्नतच्या तिकीटाची वाट पाहील..

पण त्याने ज्या हजारो स्त्रीयांचे "स्त्रीत्व" हीरावुन घेतले त्या निष्पापांचे काय??
काय दोष होता त्यांचा??
त्या काफ़ीर आहेत अल्लाहला देव मानत नाहीत हा दोष??
की शत्रुबोध नसल्याने विकृत मानसिकता असणाऱ्या मजहबी नरपिशाचांकडे उपचार घेण्यासाठी गेल्या हा दोष???

स्वतःच्या कौमची नृशंस मानसिकता माहित असल्यानेच शरीयत कायद्यात भयानक शिक्षा लिहीलेल्या असाव्यात..आणि या हरामखोरांना त्यांच्याच कायद्याने शिक्षा द्यायला हवी..

पण थांबा....!!

ही घटना अमेरीकेत घडली आपला काही संबंध नाही..आपल्याकडचे अब्दुल डाॅक्टर फक्त बाॅम्ब बनवणारेच आहेत अशा भ्रमात राहु नका...

कारण या डॉ. जावेद अहमद सारख्या जिहाद्यांचे जाळे नुसते भारतातच नाही तर जिथे जिथे गैरमुस्लिम लोकसंख्या असलेल्या श्रीलंका,नेपाळ,युरोप,रशिया अमेरीकेसारख्या सगळ्याच देशांमध्ये पसरलेले आहे.. जे नकळतपणे काफिर महिलांना कुठल्या ना कुठल्या मार्गाने कायमचे वंध्यत्व आणि काफ़ीर पुरूषांना कायमचे नंपुसकत्व देत आहेत....!!

विचार करा आजकाल लाखो नवविवाहित जोडप्यांना पुत्रसुख मिळत नाहीये..आपण म्हणतो जीवनशैली बदलली,अन्न नासलंय,लग्नाआधि घेतलेल्या गर्भ निरोधक गोळ्यांचा परिणाम आहे..वगैरे वगैरे!!

या गोष्टी काही अंशी खऱ्या असल्या तरी या सगळ्यांमागे विकृत जिहादी मानसिकतेची एक वेगळीच अज्ञात शक्ती कार्यरत आहे..

श्रीलंकेत गर्भनिरोधक आणि नंपुसकत्व आणणाऱ्या औषधांचे दोन अवैध कंटेनर काही दिवसांपूर्वी धरले गेले होते..तपासात ती औषधे भारत आणि नेपाळमध्ये पाठवली जाणार होती असे आढळले आहे...
आणि एकदा भारतात आल्यावर तुमचा
भाजीवाला,चहावाला,हाॅटेलवाला,ऑनलाईन डिलीव्हरी वाला,फळवाला किंवा दुधवाल्या मार्फत ती तुमच्या पोटात कशी घालायची त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा राबतेच आहे!!!!

(कशी ते पुराव्यांसह पुढच्या पोस्टमध्ये...)

तोपर्यंत..
पूर्ण नाव -डाॅक्टर जावेद परवेज़ अहमद
हाॅस्पिटल-चेसापीक हाॅस्पिटल व्हर्जीनिया,
आतापर्यंत 600 पेक्षा जास्त बाधित महीला आढळल्या आहेत.

९ वर्षांचा संघर्ष - #तारा_शाहदेव यांची न्यायासाठीची लढाई
#Love_Jihad खोटी ओळख, जबरदस्ती धर्मांतराचा दबाव, मारहाण आणि मानसिक छळ…
ही कथा आहे धैर्याची, आत्मसन्मानाची आणि न्यायावरच्या विश्वासाची.
#तारा_शाहदेव - राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज खेळाडू
२०१४ साली त्यांचा विवाह #रंजीत_कोहली या नावाने ओळख करून दिलेल्या व्यक्तीशी झाला. मात्र लग्नानंतर त्यांना समजले की त्यांच्या पतीने आपली धार्मिक ओळख लपवली होती. तो प्रत्यक्षात #रकिबुल_हसन होता आणि त्याने खोटी ओळख सांगून लग्न केले होते.
यानंतर तारा यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. रकिबुल हसन, त्याची आई खुशर आणि मुसताक अहमद (जे त्या वेळी व्हिजिलन्स विभागात रजिस्ट्रार पदावर होते) यांनी त्यांना जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला.
#तारा यांनी नकार दिल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली, मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला. तरीही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. अखेरीस त्यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्या कठीण परिस्थितीत त्यांनी हार न मानता न्यायासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला.
दीर्घ ९ वर्षांच्या संघर्षानंतर, २०२३ मध्ये सीबीआय न्यायालयाने निकाल दिला. रकिबुल हसन याला जन्मठेपेची शिक्षा, त्याच्या आईला १० वर्षांची शिक्षा आणि मुसताक अहमद याला १५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.
तारा शाहदेव यांनी ९ वर्षे धैर्याने लढा दिला. त्यांच्या या संघर्षाने अनेक महिलांना अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची आणि निर्भयपणे न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली आहे.
#TaraShahdev #LoveJihad #keralastory #TheKeralaStory #bollywood #jharkhand #hindu #newsfeed #marathi #maharashtra #politics #CrimeNews #marathimulgi #MarathiNews #TrendingNow

तारा सहदेव यांची केस खरी आहे. ओळख लपवून लग्न करून नंतर धर्मांतरासाठी दबाव आणला गेला होता हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे हे काकाफॉमध्ये कसे येईल?

लव्ह जिहादच्या धाग्यावर (जो नंतर डिलीट झाला) त्यामध्ये मी २-४ केसेसची माहिती दिली होती त्यात हे ही उदाहरण दिले होते.
कृपया लक्षात घ्यावे की प्रत्येक आंतरधर्मीय लग्न आणि त्या अनुषंगाने झालेली धर्मांतरं याला मी लव्ह जिहाद मानत नाही. त्याची बरीच करणे असू शकतात जी या धाग्याशी संबंधित नाहीत.

पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स , चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll

वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,
पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो ll२ll

चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो ll३ll

हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,
आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ४ll

पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो ,
पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो ll५ll

पुलाव, बिर्याणी, फ़्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,
पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..?? ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो ll६ll

पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll

दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,
पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार
विसरलो ll८ll

सँलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,
पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll

इटालिअन पिझ्झा, पास्ताची अन तेलात लोळणाऱ्या पंजाबी भाज्यांची चटक लागली,
आणि आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll

मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले आणि फ्रेश लेमन ज्यूस, सोडा किंवा लस्सी का नाही.?? म्हणून विचारू लागलो ll११ll

साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली अन स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नँपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो
पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll

फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो...

किल्ली.. Lol
खूप दिवसांनी असा गळेकाढू फॉरवर्ड वाचायला मिळाला...

Lol शेवटी (जाणुन बुजून) असे लिहिणे हे कॉन्स्पिरसी थिअरी सुचवतेय.

यात 'मुरावळ्या ऐवजी कॅडबरी खायला शिकलो' हवे होते.

पिझ्झा पास्ता चा उध्दार आहेच ना
त्याशिवाय भारतीय संस्कृती बुडत नाही म्हणे
भाडीपा च्या standup मध्ये तो सारंग म्हणाला होता त्यांची खाद्य संस्कृती धोक्यात आहे
आपल्याकडे कुकर मध्ये पास्ता, केक वगैरे बनवतात.
स्ट्रीट वर मिळणारे तंदुरी फ्लेवर चे पिझ्झे पाहून इटालियन ला चक्कर येईल

वा! बर्‍याच दिवसांनी दवणीय फॉरवर्ड Happy

आशा पल्लवित झाल्या होत्या >> किल्ली, कोण ही आशा?

Submitted by किल्ली on 3 March, 2026 - 07:41>>> या फॉरवर्डचा णिषेध...णिषेध...णिषेध.... सर्व पक्वान्नांच्या जंत्रीत एकदाही मत्स्याहाराचा उल्लेख (जाणूनबुजून) केलेला नाही आहे.

"बारबेक्यूमधे बासा कट्याने(फोर्क) खायला शिकलो, पण करलीचे काटे कसे अलगद काढायचे ते विसरलो."

ही लाईन ॲड केल्याशिवाय फॉरवर्ड कराल, तर गरुड पुराणानुसार नरकात एक वेगळी सजा मिळेल. 😏

छान फॉरवर्ड येतात इथे
एखाद्या पीळ गृपात इथले काकाफॉ फेकून मारायला मजा येईल>>> बरेचदा माझ्याही डोक्यात इथले काकाफॉ फॅमिली ग्रूपात स्पॅम करायचं मनात येतं, पण त्याने ते सर्वजण मला काय झालयं हे पहायला माझ्या घरी धाव घेण्याचा भयंकर धोका मला अधिक भेडसावतो, त्या ऐवजी ग्रूप म्यूट + आरकाईव्ह असलेलाच बरा. काय करायचं ते फॉरवर्ड करा.

ह्या! काकाफॉ लिहीणारे विसरले असतील. आम्ही नाही विसरलो.

आम्ही सार, फ्रुट पंच, सॉफ्ट ड्रिंक, नुडल्स, शेवयाची खीर, फ्राईड राईस, बिर्याणी सगळ्यांना उदार मनाने आश्रय देतो. ब्रेडचे तुकडे एकाच हाताने करतो नी ब्रेडला पण शाही तुकडा म्हणून पेश करतो. गुलाबजाम, बुंदी नी रबडी (चीज)केक खातो. आमच्या वाढत्या कटीबंधाला विचारा.

भाडीपा च्या standup मध्ये तो सारंग म्हणाला होता त्यांची खाद्य संस्कृती धोक्यात आहे
>> तर काय.

फ्रेश काकाफॉ किल्ली!

पण हे सगळं वाचून मला आता फारच गिल्ट येतोय, नाही नाही, अपराधी वाटतंय!

इथेच थांबतो; ग्रहण सुरु आहे. या काळात, आपलं ते हे, या पर्वकाळात मायबोलीवर जास्त लिहू नये म्हणे!

दान करायला हल्ली क्युआरकोड यायला लागले? काय सांगता येत नाही.
आमच्या इथल्या हिंदू टेंपल मध्ये दक्षिणा द्यायला एनएफसी डिव्हाईस आहे. कॅश नाही, सुट्टे नाहीत... कारण नको. क्रेडिट कार्डावर पण देवाला पैसे पोचतात हल्ली. पाडा एखादं कडवं.
सँटा परेड मध्ये ही 'फायर फायटर टॉय ड्राईव्ह'ला १० -१० डॉलर प्रीसेट केलेली डिव्हायसेस पोलला बांधुन फिरतात. फोन टॅप करा! झालं.

मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नँपकीनने XX, XX पुसायला शिकलो
पण पाण्याने खळखळून XX धुवायला मात्र विसरलो

इथे योग्य ते बदल केल्यास त्यात एका नव्या फॉरवर्डचे पोटेन्शियल दडलेले आहे.

हो
मध्यंतरी बँक डिटेल्स येत
आता डिजिटल दानपेटी

काही रेस्टॉरंट्सचे वॉचमेन, वॅले हे सुद्धा खिशात प्रिंटेड क्यूआरकोड ठेवायला लागले टिप घ्यायला. सुट्टे नसतात लोकांकडे म्हणुन.

Pages