Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सॉरी, हे माझ्यापुरतं ठेवता
सॉरी, हे माझ्यापुरतं ठेवता येत नाही.
https://www.youtube.com/watch?v=ZVBr31HuOGU
… भगवान विष्णू त्या समयी
… भगवान विष्णू त्या समयी योगनिद्रेत असतात! …
लक्ष्मीला फिरायला तर जायचयं पण झोपलेल्या विष्णूला जागं करण्याची तिची टाप नाही हे फारफार आवडलं. त्या पूर्ण काकाफॉ मधलं real takeaway हेच आहे मिलॉर्ड.
>>>>>>>>पण झोपलेल्या विष्णूला
>>>>>>>>पण झोपलेल्या विष्णूला जागं करण्याची तिची टाप नाही हे फारफार आवडलं. त्या पूर्ण काकाफॉ मधलं real takeaway हेच आहे मिलॉर्ड.

हाहाहा
सगळेच प्रतिसाद भारी!
कुणी लिहलं आहे माहीत नाही...
कुणी लिहलं आहे माहीत नाही... पण खूप छान लिहलं आहे.
गरम गरम भुईमुगाच्या शेंगाची कढई समोर आणून ठेवतो....
कढईभोवती बसून शेंगा फोडून खायला सुरूवात करतो....
अशातच शेंगा फोडत असताना एखाद्या शेंगेतील शेंगदाणा हातातून खाली पडतो
आणि खालच्या
टरफलांमध्ये गायब होतो......
आपण मग तो बोटाने शोधायला
सुरूवात करतो......
अगदी अर्धा ते ऐक मिनिटाची ही क्रिया,
पण शेजारी कढईभर शेंगा असूनही त्या एका शेंगदाण्याला आपण शोधत बसतो.....
थोडेसे तरी वैतागतो.....
या नादात जवळ बसलेली व्यक्ती शेंगा जास्त संपवते.....
*आयुष्याचेदेखील* असेच आहे का ?? ?
पाटीभर *आनंद* शेजारी असूनही,
आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....
पाटीकडे लवकर कधी लक्ष जातच नाही.....
आणि जेव्हा पाटीकडे वळतो तेव्हा ती रिकामी झाल्याचे दिसून येते.....
*आयुष्य खूप सुंदर आहे....त्याला अनुभवा...गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा समोर असलेलं आयुष्य भरभरून जगा...*
नेहमी आनंदी राहा
हे का च्या का फॉरवर्ड वाले
हे का च्या का फॉरवर्ड वाले नेहमी
कुणी लिहलं आहे माहीत नाही... पण खूप छान लिहलं आहे...
अशीच सुरुवात का करतात?
म्हणजे, यांनाही हे आधी आलेलं असतां वरच्या डिस्क्लेमर शिवाय!
आपण ट्विस्ट देऊ याला.
आपण ट्विस्ट देऊ याला.
पाटीभर शेंगदाणे आपली वाट बघत असतात. पण आपण एकाग्र मनाने तो एक पडलेला दाणा शोधत असतो. तो जेव्हा मिळतो त्यावेळी आपल्या चेहर्यावरचा आनंद कधी आरशात जाऊन बघितला आहे? नसेल बघितलात तर पुढच्या वेळी नक्की बघा. अगदी 'आत्मस्तुतीचे कुंडल कानी, गर्व जडविला भाळा' मोमेंट असते ती. (का! का!!!
इति गुरू शिष्य संवादे जीवनोध्यायः समात्पः. ओम शांति: शांति: शांतिही.
Submitted by अमितव on 29
Submitted by अमितव on 29 October, 2025 - 20:49>> अमितव हा तुमचा मेसेज जर फॉरवर्ड मधे आला, तर तुमची काही खैर नाही माबो वर
(No subject)
अमितव मला शंका आहे की फावल्या
अमितव मला शंका आहे की फावल्या वेळात तूच असे फॉर्वर्डस लिहून ज्येनांच्या ग्रूपमध्ये पाठवतोस.
आता मलाही सुरसुरी आली लिहायची.
तो दाणा शोधताना एरवी ज्यांना आपण टिचकीने उडवून लावू अशी टरफलं निसतो आपण . त्या भानगडीत कधी बोटे घाण होतात तर कधी किडका, कुणीतरी टाकलेला दाणा दिसतो. आयुष्याचंही असंच असतं. सोन्यासारखी माणसं सोबत असताना आपण नको त्यांना जवळ करतो, आपल्या लोकांसाठी वेळ खर्च करण्याऐवजी मोठेपणा दाखवण्याच्या नादात त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. मागे वळून पाहताना आपला मूर्खपणा जाणवतो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
अमित आणि माझेमन
अमित आणि माझेमन

तुम्हीच लिहिता ना हे असले फॉरवर्डस?
अमितने तर अगदीच प्रोफेशनली लिहिला आहे
मला सोन्यासारखी माणसं म्हणजे
मला सोन्यासारखी माणसं म्हणजे टरफले का पाटीभर न सोललेले दाणे का खवट दाणे का हाताला लागणारी माती यात गोंधळ उडाला. पण फोकस... टारगेट ओडियांस हे फॉरवर्ड करून आता पर्यंत आयुर्वेद ते नूडल्स व्हाया विश्वगुरु गेला असेल.
हे वाचून माझे डोळे पाणावले.
हे वाचून माझे डोळे पाणावले.
इतकी वर्षे झाली तरी कॉलेजात जिने नकार दिला तिच्यात आपण गुंतून आहोत ही चूक लक्षात आली.
प्रामाणिक पणे हे पत्नीकडे कबूल केले व माफी मागितली.
तिला हे काकाफॉ दाखवले तर तीने खालची दोन वाक्ये दाखवली व म्हणाली की
'कळतात बरं आम्हाला बॉडी शेमिंग चे टोमणे"
पाटीभर *आनंद* शेजारी असूनही,
आपण वाटीभर आनंदासाठी झुरतो.....
'कळतात बरं आम्हाला बॉडी
'कळतात बरं आम्हाला बॉडी शेमिंग चे टोमणे"
>>>>
os आणि मशीन स्पेसिफिक इंटरप्रिटर नाही वापरला की हे असं होतं.
विकु खतरनाक!!!!
विकु
खतरनाक!!!!
(No subject)
बॉडी शेमिंग चे टोमणे
बॉडी शेमिंग चे टोमणे …
😀
पण मूळ फॉर्वर्ड फार आवडले.
पण मूळ फॉर्वर्ड फार आवडले.
अमित यांनी लावलेले चार चंद्रही मस्त.
>>>>>>तो दाणा शोधताना एरवी ज्यांना आपण टिचकीने उडवून लावू अशी टरफलं निसतो आपण . त्या भानगडीत कधी बोटे घाण होतात तर कधी किडका, कुणीतरी टाकलेला दाणा दिसतो.
उत्तम विवेचन.
आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट
आयुष्यातील १९ उंटांची गोष्ट
एका गावात एका व्यक्तीकडे १९ उंट होते.
एके दिवशी ती व्यक्ती मरण पावली.
त्याच्या मृत्यूनंतर मृत्यूपत्र वाचण्यात आले.
ज्यामध्ये असे लिहिले होते की..
माझ्या १९ उंटांपैकी अर्धा हिस्सा माझ्या मुलाला, १९ उंटांपैकी एक चतुर्थांश हिस्सा माझ्या मुलीला आणि १९ उंटांपैकी पाचवा हिस्सा माझ्या नोकराला द्यावा.
अर्थात ही वाटणी कशी व्हायची असा सर्वांचाच गोंधळ उडाला.
१९ उंटापैंकी अर्धा हिस्सा करायचा म्हणजे एक उंट कापावा लागेल.
त्यात एक कट झाला म्हणजे १८ बाकी राहीले.
त्यापैकी त्यात चतुर्थांश हिस्सा करायचा म्हणजे साडेचार होतात मग?
सगळेच खूप गोंधळले होते.
तेवढ्यात शेजारच्या गावातून एका शहाण्याला बोलावण्यात आले.
तो शहाणा त्याच्या उंटावर बसुन आला.
समस्या ऐकून घेतली. थोडा विचार केला.
मग म्हणाला ठिक आहे या १९ उंटांमध्ये माझा आणखी हा एक उंट मिसळा आणि वाटून द्या.
प्रत्येकाला वाटले की एक निघाला मरणासन्न वेडा! जो असे मृत्युपत्र तयार करून निघून गेला आणि आता हा दुसरा वेडा निघाला आहे.
तो म्हणतो की, त्यात अजून एक माझा उंट त्यांच्यामध्ये वाटून द्या.
तरीही मुद्दा मान्य करण्यात काय हरकत आहे. नुकसान तर नाही.
असा विचार करून सर्वांनी वाटणी करायचा निर्णय घेतला.
आता एकूण उंट १९+१=२० झाले.
२० उंटापैकी अर्धे मुलाला दिले.
उरले १० उंट.
२० उंटापैकी एक चतुर्थांश हिस्सा मुलीला म्हणजे ५ उंट तिला दिले.
२० उंटापैकी पाचवा हिस्सा म्हणजे ४ उंट नोकराला दिले.
असे एकूण १०+५+४=१९ होतात.
त्यात एक उंट वाचला. वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता. तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.
अशा प्रकारे १ उंट मिसळल्या नंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले.
त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या आयुष्यातही १९ उंट आहेत.
५-ज्ञानेंद्रिये.
(डोळा, नाक, जीभ, कान, त्वचा)
५ कर्मेद्रिंये.
(हात, पाय, जीभ, मूत्रमार्ग, गुद्द्वार)
५ पंचप्राण.
(व्यान, समान, अपान, उदाम व प्राण )
आणि...
४-अंतःकरण चतुष्टय.
(मन, बुद्धी, चित्त, अहंकार)
असे एकूण १९ उंट आहेत.
माणूस आयुष्यभर या १९ उंटांच्या वाटणीत अडकून राहतो.
आता त्यात अडकून न राहाता फक्त त्यात "गुरु " रुपी उंट त्यात जोडा.! अर्थात आयुष्यात चांगला, इमानदार व सच्चा "गुरु " रूपी उंट सोबत ठेवा.
जोपर्यंत गुरु रुपी उंट आपल्या आयुष्यात जोडत नाही. तोपर्यंत आपलेच पूर्वसुकृत आपल्याला सुख, शांती, समाधान आणि आनंद हे मिळू देणार नाही.
वडाची साल पिंपळाला ही म्हणही कमी पडेल. वडाची साल बोइंग विमानाला..
वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा
वाचलेला उंट जो ज्ञानी माणसाचा होता. तो त्याला परत देऊन टाकला व तो त्याच्या गावी घेऊन निघून गेला.
>>
हा मी आजवरचा पाहिलेला/वाचलेला पहिला उंटावरचा शहाणा आहे जो खरोखरच शहाणा निघाला.
जीभ दोनदा आली.. ते बदला.
जीभ दोनदा आली.. ते बदला.
आणि आपण मुलगा व्हावे, मुलगी व्हावे का नोकर? धर्म अर्थ काम मोक्ष वगैरे आश्रम जोडले असते तर निवड सोपी गेली असती.
उंटावरचा शहाणा >> +१
उंटावरचा शहाणा >> +१
अशा प्रकारे १ उंट मिसळल्या नंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले. >> इथे गोष्ट संपते. त्यापुढे जे आहे ती खरी काकाफॉ addition
म्हणून निअरेस्ट डेसीमल
म्हणून निअरेस्ट डेसीमल अप्रोक्सिमेशनचा क्लास बंक मारू नये. मग एक उंट न वाढवता एक तृतीयांश, चतुर्थांश, पंचमांश हिशेब जमला असता.
गुद्द्वार की गुदद्वार ?
गुद्द्वार की गुदद्वार ?
उदाम नाही उदान
वाटणीत ते नाही मिळालं तर
वाटणीत ते नाही मिळालं तर सकाळी बोंब होईल हो!
वाटणीत ते नाही मिळालं तर
वाटणीत ते नाही मिळालं तर सकाळी बोंब होईल हो!>>>>> त्यावरच सगळी मदार आहे
पण सद्गुरू नाही मिळाला तर
पण सद्गुरू नाही मिळाला तर उंटाच्या पार्श्वभागाचा xx घेण्याचे धंदे. त्यापेक्षा उंट भाड्याने द्यावे आणि येणारे पैसे काय त्या रिक्वायर्ड फ्रॅक्शनमधे वाटून घ्यावे.
बाकी अंतःकरण चतुष्ट्य अशी काही संकल्पना असते हे वाचून व अंतःकरण, मन आणि चित्त हे वायलं वायलं असतं असं समजल्यामुळे ज्ञानात अनमोल भर पडली. त्यातच मानस् असं ॲड केलं असतं तर इतर कशाची गरज नव्हती.
पंचप्राणात अडकून रहायचं नाही म्हणजे?
उंटावरचा शहाणा, मदार
अशा प्रकारे १ उंट मिसळल्या
अशा प्रकारे १ उंट मिसळल्या नंतर काय झाले तर त्यामुळे उरलेल्या १९ उंटाना सुख, शांती, समाधान आणि आनंदाने राहता आले. >>>> कसं काय ??
मुलं आणि नोकर शांतीने राहीले असतील .
आणि मुळात कोण सुखी राहणं अपेक्शीत आहे , ईन्द्रिय की माणूस ??
कसं काय ??
कसं काय ??
>>> व्हॅलिड पॉईंट स्वस्ति! ही सगळी धडपड उंटांच्या सुखासाठी चालली असती तर ते तसेही सुखातच होते की.
अंतःकरण, मन आणि चित्त हे
अंतःकरण, मन आणि चित्त हे वायलं वायलं असतं असं समजल्यामुळे ज्ञानात अनमोल भर पडली >> डायरेक्ट आदि शंकराचार्यांना चायलेंज!
Pages