काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किल्ली Lol

जेवणापूर्वी "वदनी कवळ" कसे घेणार? जेवण म्हणजेच वदनी कवळ ना?

आणि वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक हे काय आहे?

तरी चीज आणि बर्गर नाही यात. अशा फॉरवर्ड मधे पिझा आणि बर्गर नेहमी एकत्र येतात.

कडव्यांना नंबर्स दिले आहेत!!

.. किल्ली, खूप दिवसांनी असा गळेकाढू फॉरवर्ड वाचायला मिळाला..

+ १

…अशा फॉरवर्ड मधे पिझा आणि बर्गर नेहमी एकत्र येतात…. 😂

नो नो नो. “पिझ्झे” आणि “बर्गरं” असतयं ते. त्यांचा आणि ते खाणाऱ्यांचा उद्धार केल्याशिवाय काकाफॉ अंकल्स/आंटीज् ना जेवण जात नाही.

स्त्रियांना कधीही रडू देऊ नका...
स्त्रीच्या अश्रूपेक्षा महागडे काहीही नाही
जेव्हा एक अश्रूचा थेंब बाहेर येतो तेव्हा
तो प्रथम 'लोरियल' आयलाइनर (रु. 650) आणि 'डायर' मस्करा (रु. 2500) मध्ये मिसळतो.
मग तो गालाखाली वळवल्यावर .'D&G' ब्लशर (रु. 2500) मध्ये मिसळतो.
आणि शेवटी जेव्हा तो ओठांना स्पर्श करतो. तेव्हा ‘मेबेलाइन' लिपस्टिक (रु. 850) मध्ये मिसळतो
याचा अर्थ...एक अश्रू 6500 रुपयांची नासाडी करतो...
त्यामुळे महिलांना रडवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही
प्लीज त्यांना रडवू नका.

सार्वजनिक आणि राष्ट्रीय हितासाठी जारी!

कालच एक video का पोस्ट पाहिला त्यात होतं की सायको पॅ थ स्त्रिया ज्या असतात त्या make up न करता फिरतात Lol

मग काय तर
हे सगळं पिझ्झा बर्गर लिपस्टिक कॅटेगरी आहे फॉरवर्ड्स ची

ह्या!! फॉरवर्डमध्ये पण ममवपणा दिसून येतो. dior चा mascara २५०० ला मिळाला तर सस्त्यात मिळाला म्हणून बायका एकाच्या ऐवजी दोन घेतील.

वरचे दोन्ही किती क्लिशे मिसाजनिस्ट वगैरे कायसे असले तरी हसू आलेच! >>> आजकाल सर्वत्र लोक आपल्या राजकीय व सामाजिक बिलिफ्स शी मॅच होणार्‍या विनोदांवरच हसतात. विनोद चांगला असेल तर हसायला काय हरकत आहे? Happy

उदा: हे पाहिले तेव्हा जाम हसलो होतो हे आठवते. पण आजकाल अनेक पार्टी पूपर्स लगेच समाजकल्याण खाते(*) उघडतात
https://www.instagram.com/reel/Ck9Erf_D9QD/

* हे भरत ना उद्देशून अजिबात नाही. अस्मिताने त्यांच्या संदर्भात दुसरीकडे व वेगळ्या (आणि चांगल्या) अर्थाने वापरलेला शब्द प्रचंड आवडल्यामुळे वापरला आहे Happy अस्मिता - तुझा मूव्ही रेको चा रेट २ रू आहे. शब्द पुनर्वापराचा माहीत नाही.

शब्द पुनर्वापराचे पाच रुपये आहेत, अचानक वाढले. Lol तुझे दहा रुपये झालेत, एकदा टिपापा आणि आता काकाफॉ. खात्यावर लिहितेय. Lol

हो, मलाही पटतं तेच. आपण हसलो म्हणजे सहमत आहोत असे नाही किंवा आपली नीतिमूल्ये तीच आहेत असे नाही. क्षणिक भावना असते ती. त्यामुळे आलं हसू की हसायचं. कुणाला चीप वाटले तर वाटो. पार्टीपूपर्स सगळीकडे आहेत, किंवा लोक हसताना, गप्पा मारताना खिदळताना पाहून ते न बघवल्याने मुद्दाम वाकड्यात शिरून असे खाते उघडणारेही आहेत. त्यांना नशिबी हास्य ही सुंदर (child like) भावना नाही म्हणायचं आणि बसायचं. माझं निरीक्षण असंही आहे की जेव्हा खरंच सिरियस काही असेल तेव्हा हे लोक व्यक्त होत नाहीत फक्त बिब्बा घालायला खुसपट काढतात. वॅल्यूज नसून फक्त सेलेक्टिव्ह नाटकं!

हल्लीच रेणुका शहाणेची मुलाखत पाहिली त्यात ती म्हंटली- मी बऱ्याच कॉमेडी शोना आमंत्रित असते किंवा प्रमोशनसाठी जाते मग ते जे स्किट करतील त्यावर अगदी साध्या, उथळ गोष्टींवर सुद्धा हसते. कारण ते मनापासून बोलत आहेत, मला हसवायचा प्रयत्न करत आहेत ह्याचं मला कौतुक आहे आणि मला हसायला आवडतं. मला तिचे उत्तर फार आवडले. विद्वान आहे ती, पण उगाच गंभीर नाही. प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे.
आपल्याकडे हसणाऱ्यांना आणि हसवणाऱ्यांना गंभीर लोकांपेक्षा कमी लेखण्याची किंवा ढ/ उथळ समजण्याची एक चुकीची परंपरा आहे. हे सुद्धा तिने म्हटले.

रील>>> चपखल आहे. Happy

अस्मिता, सहमत आहे. आपण हसलो म्हणजे तो विनोद आपल्याला आवडला, इतकेच. त्यातल्या अर्थाशी सहमत असायची गरज नाही.

रेणुका शहाणेचा अ‍ॅप्रोच आवडला.

नो नो नो. “पिझ्झे” आणि “बर्गरं” असतयं ते. त्यांचा आणि ते खाणाऱ्यांचा उद्धार केल्याशिवाय काकाफॉ अंकल्स/आंटीज् ना जेवण जात नाही. >>> Lol

हो. तुम्हा तिघांचेही म्हणणे बरोबर आहे.

पण समाजकल्याण व्यतिरिक्त दुसराही अँगल आहे, तो सांगण्याचा प्रयत्न करतो (यातुन सगळेच जातात असे नाही):
मार्केट आहे म्हणुन काही विनोदांचा एवढा पाऊस पडत असतो बहुतेक समूहांमध्ये, त्यांचा अतिरेक झाला असतो. (तिथे फक्त हेच सुरू असते नाही पण हे असे विनोद हिरीरीने केले/शेअर केले जातात.)
त्यातही काही विनोद नविन, कलाटणी टाइप, हजरजबाबीपणा वगैरे असतील तर हसु येते, त्यांना दाद देता येते.
कुणी म्हटलं आज बरं नाही तर बाटलीचा फोटो देऊन "दोन पेग घे बरं वाटेल". स्त्री सदस्याने म्हटलं आज उशीर झाला स्वयंपाकाला तर तिचा नवरा असेल समूहात तर त्याला टॅग करून "भांडी घासली नाहीस का रे वेळेवर?" नसेल तर तिलाच "जास्त भांडी टाकली होती का नवऱ्याला?" वगैरे पासुन सुरवात असते आणि असे फॉरवर्ड्सही असतात. हे वर्षानुवर्षे सतत सुरू असतं. त्यामुळे एकंदरीत अशा विनोदांबद्दलची संवेदना(? योग्य शब्द सुचेना) कमी होते. अगदीच अनपेक्षित विनोद असल्या शिवाय किंवा प्रेझेंटेंशन खास असल्याशिवाय हसु येत नाही आणि ते क्वचितच येतात.

मी तीन चार ऍक्टिव्ह समूहात आहे, तिथे "नवरा-बायको आणि दारूवर नाविन्यपूर्ण विनोद करून दाखवा आणि हजार रुपये बक्षीस मिळवा" अशा ऑफर्स देत असतो. Proud
नेहमींच्या टिपिकल विनोदांवर कधी 'मग पुढं काय झालं ऐका' म्हणुन उत्तरार्ध लिहुन प्रतिविनोद करतो', कधी या विनोदांच्या अतिरेकावर विनोद करतो.

… आपण हसलो म्हणजे सहमत आहोत असे नाही किंवा आपली नीतिमूल्ये तीच आहेत असे नाही...

+ १

स्वत: टुकार विनोद करता येणे आणि त्यावर हसता येणे दोन्ही वेगवेगळ्या सिद्धी आहेत. दोन्हींसाठी प्रयत्न चालू आहेत- असतात 😀

खूप दिवसांनी या धाग्यावर डोकावणं झालं. आणि चीज झालं.
छान विषय, छान चर्चा, सर्वांच्याच पोस्टस दमदार आहेत. फारेण्ड, अस्मिता, मानव सर्वांना +१

मानव मला पण असेच होते. एकाच एका विनोदाचे दळण खूप काळ दळले गेले कि नको वाटतं. एका व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर काही जण मला माहिती आहेत ज्यांनी आयुष्यात एकही पुस्तक वाचलेले नसेल ( अभ्यासाचे सोडून). पण चॅट मधे पुल, वपू यांचे दणादण संदर्भ देत हसत सुटतात. आपल्याला माहीती आहे असंच दाखवायचं असतं. थोडक्यात काही विनोद हे आपलं स्टँडर्ड उंचावण्यासाठी करायचे असतात या समजा पोटी करतात कि कसे हे समजत नाही, खरंच हसू आलेलं असतं का याचा तपास करायला पाहीजे.

Happy ओके, लक्षात आले मानवदादा. आणि राभुच्या दळणाबाबत वाक्यालाही अनुमोदन. हसू येत नाही. अनिंद्य Lol

मी जनरली -

Woke culture kills comedy and cancel culture kills art ! Some people are too sensitive or aggressive in funny or light hearted situations and completely ignorant and apathetic in serious situations. The whole thing feels like an act ! I don't mind real people, but partypoopers are usually fake and insecure, they just want drama.
असं हल्ली सोशल मीडिया वर जनरली पाहायला मिळतं. चर्चा सुरू झाल्यामुळे या अनुषंगाने मी माझे इकडचे- तिकडचे तुकड्यातुकड्यातले विचार/ निरीक्षण लिहून टाकले. Happy

मला हसू आलं की मी हसतो.
पण हसू कधी यायचं हे परिस्थितीवर अवलंबून असतेच असते. मानव वर सांगतोय तसा ग्रुप असेल तर मला नवरा बायको जोक वर अजिबात हसू येत नाही. पण तोच जोक मला आवडणाऱ्या लोकांनी परिस्थिती प्रमाणे हजरजबाबीपणे केला तर कधी हसू येऊ ही शकतं. सोशल प्रेशर म्हणून कुठे असेल तर हसावं लागलं तर हसल्यासारखं करतो. मग तिकडून उठायचं बघतो.
सेन्सिटिव्ह, मायनॉरिटी, क्लिशे जोकवर तुक देतो. थोडक्यात अस्मिता आणि फा शी कंडीशन ओन्ली सहमत. मिसजनिस्ट जोकवर शक्यतो हसत नाही. कारण ते हास्यास्पद असूच नये. वोक आणि कॅन्सल कल्चर थोडाफार अंगात आहे, ते बाणवतो ही!

टुकार शाब्दिक विनोदावर पाचकळ पीपू जोकवर हसतोच हसतो. कारण हसू येतच. सोफेस्टिकेटेड लोकांना हसू आलं नाहीसं वाटल्यावर मुद्दाम हसतो ही. पुणेकर चालवणे हे क्रियापद युद्धात तलवार चालवण्यासारखे करतात तसं मी हसणे चालवतो का काय!

Happy तसं आपल्याला हसू आलं की हसावं आणि नाही आलं की नाही हे तर वैयक्तिक गॉस्पेल ट्रूथ आहे. "पापू" ना नावं ठेवू द्या जरा! "पू" वर हसा खुशाल, तेच तर म्हणतेय. तिसरी क तर तिसरी क, मी हसू आलं की हसलेली आहेच की. कृत्रिम बंधनात राहायचं नाही. Sticking to your truth than following the trends/ guidelines/ judgement/ standards and having fun. पण मी वरच्या पोस्टीत लिहिलेय त्या पहिल्या वाक्यात "कलेक्टिव्हली" तथ्य आहे. एक गट/ समाजमन म्हणून!

मला हसू येणं कमी झालं आहे. मला हसवा.
रोज कपडे धुण्याच्या दोरीला उलटे लटकलेले रील्स बनवा. सोमी वर टाका, मला पाठवा. हसू न आलेले विनोद उलगडून सांगा. हसू आलं नाही कि मी न हसू आलेल्या विनोदांचे ब्रोकन अ‍ॅरो रजनी स्टाईलने उलटे फिरवून सर्वत्र सोडत असतो. मला मी मी माझे मला माझ्याकडून असे मिसाईल्स पकडून फिरवायचे आहेत. एकदा मी चाळीसचा होतो तेव्हां मला विनोदाचं वैराग्य आलं होतं पक्षी मी मॅच्युअर्ड झालो होतो, आता मी पुन्हा सोळा वर्षांचा झाल्याने मला खूप हसायचे आहे. कृपया मला गडाबडा लोळवा. फक्त हसवून हो.

मस्त चर्चा. मानव - हो जेथे तेच तेच जोक्स पुन्हा पुन्हा केले जातात किंवा राभूंनी लिहीले तसे एकाच विनोदाचे दळण दळले जात असेल तेथे ते बोअर होतात. घिसेपिटे झालेल्या विनोदांवर न हसणे स्वाभाविक आहे. पण अशा केसेस मधे सुद्धा पूर्वी कधी न ऐकलेला एखादा विनोद आला तर हसू येतेच.

एखाद्या विषयावरचे विनोद आवडत नाहीत म्हणून ते "नॉट फनी" वाटणे - यातही काही वाद नाही. माझीही त्याबाबतीत कोठेतरी रेड लाइन आहे.

मी फक्त इतकेच म्हणतोय की विनोदावर हसणे आणि त्यातील अर्थाशी/मताशी सहमत असणे हे एकच नाही.

बाकी वोक कल्चर ई बद्दल सहमत. लोकांचे स्वातंत्र्य, हक्क ई बद्दल जागरूक असणे व त्याबाजूने मते असणे वेगळे, आणि आपले सामाजिक भान इतके झेन लेव्हलला पोहोचले आहे की त्याच्या तुलनेत अगदी घटनेने लोकांना दिलेले हक्क व स्वातंत्र्येही दुय्यम आहेत असे वाटणे वेगळे. वोक पब्लिक मधे असला एक उच्च गट आहे. किंवा कॉमन सेन्स रानोमाळ हरवलेला असणे. एका खुन्याबद्दल बोलताना अमेरिकेच्या अध्यक्षाला नंतर "मी त्याला इल्लिगल म्हणायला नको होते" असे आवर्जून सांगायची वेळ येणे असले प्रकार यातूनच होतात.

वरचा परिच्छेद आणि सगळी पोस्टच फारच पर्फेक्ट वाटली. हेच म्हणतेय. अनुमोदन. Happy आणि थॅंक्यूच.

दळणाशिवाय आपणही आपलं जग मोठं होतं, अवेअरनेस येत जातो तसे बरेचदा सेन्सिटिव्ह गोष्टींवर हसत नाही, बाऊन्ड्रीज असतातच. हसू येतच नाही. हे जगही सगळ्यांसाठी वेगवेगळ्या वेगाने आणि वेगवेगळ्या वातावरणाने वाढत असते. पण एखादी गोष्ट "मला" आवडली नाही म्हणून मी एखादा गट पाडून ती सरसकट रद्दबातल करणं हे पटत नाही. ते हल्ली वाढल्याने तुझ्या लिंक मधल्या उदाहरणाप्रमाणे प्रमाणे विनोदासाठी जाहीर माफी मागावी लागतेय ते पटत नाही.

गेल्या वेळी एक गोष्ट राहून गेली सांगायची.
काही काही व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप्सवर आपण असतो, पण तिथे काही जणांचं टोळकं झालेलं असतं. ते इतरांकडे लक्षच देत नाहीत. कुणी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर नाही कि हाय हॅलो ला प्रतिसाद नाही कि महत्वाच्या निवेदनाला प्रतिसाद नाही. दिवसभर यांच्या आपसातल्या गप्पा चालतात. काही काठावरचे लोक मग बळंच त्यात सहभागी होतात. असे ग्रुप्स गेल्या महीन्याभरापर्यंत एक एक करून सोडून दिले.

सोडल्यानंतर मात्र लगेचच फोन येतात. काही जण मेसेज करतात. ज्या ग्रुप्स मधे तुम्हाला भानच नव्हते तिथे कुणी न राहण्या न राहण्याने काय फरक पडतो ? किमान हाय , हॅलो केल्यावर तरी प्रतिसाद द्यावा ना ?

त्यांच्या विरुद्ध मताचे टोकाचे काहीच्या काही फॉरवर्डस करून मग ग्रूप सोडल्यास हा प्रश्न येणार नाही.

*मी जिवंत आहे...!*

*एका पार्टीत अनेक नामवंत व्यक्ती उपस्थित होत्या. तिथे एक वयोवृद्ध गृहस्थ काठीच्या साहाय्याने मंचावर आले आणि आपल्या जागेवर बसले.*

*होस्टने विचारले, “आपण अजूनही डॉक्टरकडे वारंवार जाता का?”*

*वृद्ध हसून म्हणाले, “हो, मी तर नियमित जातो!”*

*होस्टने विचारले, “का?”*

*वृद्ध म्हणाले, “रुग्णांनीच डॉक्टरकडे जायला हवं, तेव्हाच तर डॉक्टर जिवंत राहील!”*

*श्रोत्यांनी त्यांची ही हजरजबाबी ऐकून टाळ्यांचा कडकडाट केला.*

*पुन्हा होस्टने विचारले, “मग आपण फार्मासिस्टकडेही जाता का?”*

*वृद्ध हसून म्हणाले, “नक्कीच! फार्मासिस्टलाही तर जगायचंय ना!”*

*आता अजूनच जोरात टाळ्या वाजल्या.*

*होस्ट हसत म्हणाले, “मग फार्मासिस्टने दिलेली औषधं घेतात का?”*

*वृद्ध उत्तरले, “नाही! औषधं तर बहुतेक वेळा फेकून देतो… मलाही तर जिवंत राहायचंय!”*

*यावर तर सगळा हॉल खदखदून हसला.*

*शेवटी होस्ट म्हणाले, “या मुलाखतीसाठी तुमचं मनःपूर्वक आभार.”*

*वृद्ध उत्तरले, “स्वागत आहे! मला माहित आहे, तुम्हालाही तर जिवंत राहायचंय ना!”*

*श्रोते एवढे हसले की बराच वेळ टाळ्यांचा गजर होत राहिला.*

*पुन्हा एक प्रश्न विचारण्यात आला, “आपण आपल्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्येही अ‍ॅक्टिव्ह आहात का?”*

*वृद्ध म्हणाले, “हो, मधूनमधून मेसेज पाठवत राहतो, जेणेकरून सगळ्यांना वाटावं की मी जिवंत आहे! नाहीतर लोक समजतील की मी गेलो आणि ग्रुप अ‍ॅडमिन मला ग्रुपमधून काढून टाकेल!”*

*म्हणतात, हा विनोद जगातला सर्वात मजेशीर विनोद मानला गेला, कारण सर्वांना जगायचंय!*

*म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो, हसत राहा, मेसेज पाठवत राहा, आणि आपल्या माणसांशी जोडलेले राहा! माणूस घाणे होऊ नका,लोकांचे मेसेज फक्त वाचू नका,काहीतरी पाठवत रहा.*

*लोकांना सतत कळत राहिलं पाहिजे की आपण जिवंत आहोत, आनंदी आहोत आणि तंदुरुस्त आहोत — शरीरानंही आणि मनानंही!*

*जगायचं असेल… तर जिंदादिलपणा हवा!*
*मैत्री जपा, आनंदी रहा*
*मनमोकळेपणाने बोलत रहा*

*आपला दिवस सुखाचा जावो, मन प्रसन्न राहो.*

अरे हो! हा फॉरवर्ड काल-परवाच मला कोणत्यातरी ग्रुपात आलेला.

---

स्वगत: वामन राव, वय झालं की काय बॉ आपलं, हे असले फॉरवर्ड यायला लागलेत... अन् आपण ते वाचतोही आहोत!

सावधान दोस्तांनो
(खासकरून विवाहित मित्रांनी लक्ष देऊन वाचा.)
काही दिवसांपूर्वी मला एक फ्रेंड रिक्वेस्ट आली.
ती कोण्यातरी प्रिया जोशी नावाने होती. जास्त करुन मला तर पुरुष मंडळींच्याच रिक्वेस्टी येत असतात.
पण ह्या वेळी एका मुलीने रिक्वेस्ट पाठवली त्यामुळे मी आश्चर्यचकीत होणं सहाजिक होतं.
एक्सेप्ट करायच्या आधी सवयीप्रमाणे मी, तिचं प्रोफाईल चेक केलं तर समजलं की अजुनपर्यंत तिच्या मित्र यादीत कोणीच नाहीये.
थोडी शंका आली की कोणाचं फेक अकाउंट तर नसेल?
नंतर विचार केला की असंही असू शकतं की फेसबुकने ह्या यूजरला नवं समजुन माझ्यासोबत मैत्री करण्यासाठी सजेस्ट केलं असावं. प्रोफाइल फोटोची जागा रिकामी बघुन, मी अंदाज लावला बहुतेक नवीन असेल व तिला फोटो अपलोड करता येत नसेल किंवा संकोचली असेल. तर शेवटी, मी तिची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली.
सगळ्यात पहिले तिच्याकडनं धन्यवाद म्हणुन मेसेज आला. मग माझ्या सगळ्या स्टेटसवर लाईक आणी कमेंट्स मिळायला सुरुवात झाली.
आपल्या पोस्टींची कदर करणारी ही नविन मैत्रीण मिळाली म्हणून मी खूप आनंदीत झालो.
हा प्रकार पुढं-पुढं वाढत गेला व आता मला माझ्या वैयक्तीक आयुष्याविषयी प्रश्न यायला लागले. मला काय आवडतं काय नाही याविषयी विचारपूस व्हायला लागली.
आतातर ती थोड्याफार रोमँटिक शायरी पण पोस्ट करायला लागली होती.
एक दिवस ह्या बाईसाहेबाने विचारलं : तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम करता का?
मी लगेच म्हणालो: हो तर.
ती गप्प बसली.
दुसऱ्या दिवशी तिनं विचारलं : तुमची सुंदर असेल ना ?
ह्यावेळेसही मी तेच उत्तर दिलं: हो खूपच सुंदर आहे.
त्याच्या पुढल्या दिवशी म्हणाली : तुमची बायको स्वयंपाक चांगला बनवते का ?
" खूपच रुचकर आणि जबरदस्त " मी उत्तर दिलं ".
मग काही दिवस ती गायब झाली.
अचानक काल सकाळी तिनं इनबॉक्सला लिहलं "मी जळगावात आलेय. तुम्ही मला भेटणार का?
मी म्हणालो : जरुर भेटेन की.
"तर मग ठीक आहे फन सिनेमाला या. आपली भेटही होईल आणि राबता पिक्चर पण पाहणं होईल.
मी म्हणालो, नको मॅडम तुम्हीच माझ्या घरी या. तुम्हाला भेटून माझ्या बायकोलाही आनंद होईल. माझ्या बायकोच्या हातचा स्वयंपाक सुद्घा चाखून बघा.
म्हणाली : नाही, मी तुमच्या मॅडमसमोर येणार नाही, तुम्हाला यायचं तर या.
मी तिला माझ्या घरी बोलवायचा खूप प्रयत्न केला. पण ती सारखं सारखं फन सिनेमाला यायचाच हट्ट करत राहीली व मी माझ्या घरी.
ती चिडली व म्हणाली : ठीक आहे मी परत जाते आहे. तुम्ही भेकड घरातच बसा.
मी तिला परत समजावयचा बराच प्रयत्न केला आणी सार्वजनिक ठिकाणी भेटायचे धोकेही सांगितले पण तिनं ऐकलं नाही.
शेवटी हार मानून मी म्हणालो: मला भेटायचं तर माझ्या कुटुंबियांसमोर भेट अन्यथा घरी जा.
ती ऑफलाइन झाली. सायंकाळी घरी पोहचलो तर डायनिंग टेबलावर भन्नाट अशी खुर्मा-पुरी, श्रीखंड वगैरे तयार होतं.
मी बायकोला विचारलं: आज कोणी येतं आहे का आपल्या घरी जेवायला?
बायको म्हणाली: प्रिया जोशी येतेय.
काय?
ती तिला कुठं भेटली? तू तिला कसं ओळखतेस?
"जरा धीर धरा साहेब, ती मीच होते. तुम्ही, माझ्या गुप्तहेरी मिशनच्या परिक्षेत पास झालात. यावं, माझे खरे जोडीदार, माझे सच्चे जीवनसाथी जेवण थंड होतंय.
-चान्स मिळाल्यावर बायकोचा मोबाईल चेक केला नसता तर आज ही पोस्ट करायच्या लायक राहीलो नसतो राव .

Pages