काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जी "१९६० ते १९९० दरम्यान" ऐवजी मधली सगळी वर्षे लिहीत बसते तिच्या एवढ्या फुशारक्या! >>> Lol

त्यातले काही स्वल्पविराम गायब आहेत. ही व्यक्ती कधी कोडिंग करत असेल तर दहा वेळा प्रोग्रॅम चेक करावा लागत असेल. किंवा त्यालाही "कोडिंग न केलेली शेवटची पिढी...." वगैरे म्हणून मोकळे होतील.

बालवाडीलाच काय मराठी शाळेत सुद्धा गेले का शंका आहे व्याकरण पाहून.

६० मधे जन्मलेल्या व्यक्तीचे ८४-८५ मधे लग्न झाले व पुढे २-३ वर्षांत मुले झाली तर ते व त्यांची मुले या लॉजिकने एकाच "पिढी" मधे येतील.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?* >>> आणि सगळे कढ काढून पुन्हा हे वाक्य. याची तुलना केवळ "हमे बेफजूल बात करने की आदत तो है नहीं" म्हणणार्‍या बसंतीशीच होऊ शकते.

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी >> तसे १९६० चा जन्म असेल आणि विशीत दिवस गेले असतील तर हे वाक्य म्हणायला काय हरकत होती?

काही काही पटले पण Happy
>>>>>>>>> हीत कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी.
+१

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.

*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता. कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.
+१

*अमेरिकेस ठेच लागली आहे, भारतीय कधी शहाणे होतील ??*

*जेव्हा स्वयंपाकघर शांत झाले – अमेरिकेची खरी कहाणी*

कधी विचार केला आहे का…..
की एका शांत झालेल्या स्वयंपाकघराने संपूर्ण देशाचे भविष्य बदलू शकते?

अमेरिकेत तसे घडले.

1970 च्या दशकात बहुतेक घरांत आई-वडील, मुले, आजी-आजोबा एकत्र राहायचे.
संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलावर बसायचे.

घरातली पोळी, ब्रेड, सूप, पाय (pie) फक्त पोट भरत नव्हते, तर त्यांच्यातील नातीही घट्ट करत होते.

पण 1980 नंतर हळूहळू दृश्य बदलले.
फास्ट-फूड, टेक_अवे, रेस्टॉरंट यांनी त्यांच्या स्वयंपाकघरावर ताबा मिळवला.

आई-वडील कामात व्यस्त झाले, मुले पिझ्झा-बर्गरमध्ये रमली,
आणि आजोबांचा आवाज कमी झाला.

त्याच वेळी काही तज्ज्ञांनी चेतावणी दिली होती –
“जर तुमच्या घरातील जेवणाचे नियंत्रण कंपन्यांकडे गेले, आणि मुलं-वृद्धांची जबाबदारी सरकारवर टाकली,
तर कुटुंबे उद्ध्वस्त होतील.”

लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि
खरेच तसेच झाले.

1971 मध्ये अमेरिकेत 71% कुटुंबे “पारंपरिक” होती – आई, वडील आणि मुले एकत्र.
आज ती संख्या फक्त 20% आहे.

उरलेले काय? –
वृद्धाश्रमात गेलेले आजोबा-आजी, भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये एकटे जगणारे तरुण,
तुटलेली लग्नं, एकाकी पडलेली मुले.

घटस्फोटाचे प्रमाण पहिल्या लग्नात 50%,
दुसऱ्यात 67% आणि
तिसऱ्यात तब्बल 74%.

*अमेरिकेतील हा अपघात नाही.*

*ही किंमत आहे – शांत झालेल्या स्वयंपाकघराची आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या समाजाची !!*

कारण घरचे जेवण हे फक्त अन्न नाही.
ते ऊब आहे.
ते आईच्या हाताचा स्पर्श आहे.
ते दादांच्या गप्पा आहेत.
ते आजीच्या गोष्टी आहेत.
ते घराला “कुटुंब” बनवणारी जादू आहे.

पण आज जेवण स्विगी, झोमॅटो वरून येते,
आणि घर हळूहळू “गेस्टहाऊस” बनते.

*याचे दुसरे भयंकर रूप म्हणजे बिघडणारे आरोग्य !*

फास्ट-फूडच्या व्यसनामुळे अमेरिकेत स्थूलता, मधुमेह, हृदयरोग एवढ्या वेगाने वाढले की आज संपूर्ण आरोग्य उद्योग “आजारी पिढ्या”वर नफा कमावतो. पण अजून आपली वेळ गेलेली नाही.
*स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवे.*
*आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी.*

जगातल्या अनेक संस्कृतींनी हे सिद्ध केलंय.

जपानी अजूनही एकत्र स्वयंपाक करतात, जेवतात, म्हणून ते दीर्घायुषी आहेत.

भूमध्य समुद्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून त्यांची नाती मजबूत आहेत.

*अमेरिकेची ही कहाणी आपल्याला सावध करण्यासाठी आहे!!*

आज भारतातही बाहेरचे खाणे, फूड-डिलिव्हरी, व्यस्त जीवन —
सगळे तसे च सुरू आहे, अमेरिकेसारखे.

उद्या आपल्या घरातही स्वयंपाकघर शांत होऊ नये, म्हणून…

चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा.
कुटुंबाला टेबलावर आणा;
कारण शयनकक्ष घर देतो,
*पण स्वयंपाकघर कुटुंब घडविते.*

*आपल्या घराला कुटुंब बनवायचे आहे की, गेस्ट हाऊस हे आता आपणच ठरवा !!*

>>>>>भूमध्य समुद्रातील लोक जेवणाला पवित्र मानतात, म्हणून त्यांची नाती मजबूत आहेत.
म्हणजे नक्की कोणते लोक - इंग्रजीत?

स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवे
>>>>
ऑ? चूल पेटवण्यापर्यंत ठीक होते. थेट स्वयंपाकघर?
स्वयंपाकघर पेटवले तर तसेही कुटुंबच काय अख्खी अपार्टमेंट बिल्डिंग तुटण्याची शक्यता जास्त नाही का?

Screenshot_20250909_180409_WhatsApp.jpg

नमस्कार मंडळी,
यंदाच्या मायबोली गणेशोत्सवातील तुम्हाला आवडलेल्या शशक व पाककृतीला मतदान केलेत का? अजून नाही? मग लगेच खाली दिलेल्या लिंकवर जाऊन मतदान करा.
https://www.maayboli.com/node/87244

<<संध्याकाळी सगळे डायनिंग टेबलावर बसायचे.>>> यावरही माबोकर पिसं काढु शकतात याची लेखकाला कल्पना नाही.

<<घरातली पोळी, ब्रेड, सूप, पाय (pie)>> यावर काढु शकतात याची कल्पना आहे म्हणुन कंसात स्पष्ट केले आहे.

केकू Rofl
माझी बायको आनंदी बाई नाही ला सगळ्यात जास्त हसलो. Lol

स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवे.
आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी.*>>>>> अगदी मीम मटेरियल आहे
चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा.>>>>>> म्हणूनच यावर्षी चूल न पेटवता पदार्थ बनवायला सांगितले.

कुटुंबाला टेबलावर आणा;
कारण शयनकक्ष घर देतो,
*पण स्वयंपाकघर कुटुंब घडविते >>>>> Lol
आता पिसे काढली जातील यावर

अमितव , Biggrin हो , भारी loaded वाक्य आहे ते .
ते मागे एकदा आलेलं - किचनमधल्या calendar ची फडफडणारी पानं आणि सुकलेली तुळस - ते काकाफॉ आठवलं.

*स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवे.*
*आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी.* >>>> माझेमन , याचा संदर्भ वेगळा आहे.

स्वयंपाकघर पुन्हा पेटवायला हवे >>> Lol

पिझ्झा बर्गर वर विशेष राग असतो बरका या सगळ्यांचा.

कुटुंबाला टेबलावर आणा;
कारण शयनकक्ष घर देतो,
*पण स्वयंपाकघर कुटुंब घडविते
>>> लोडेड ! Lol लेखकाला कुटुंब शब्दाचा दुसरा अर्थ माहिती असता तर असं लिहिलं नसतं त्याने.

अरे एवढं कळत नाही का तुम्हाला?
नाना पाटेकरचा "बंबई बंबई बंबई बम्" गाणं असलेला तो चित्रपट पाहिला नाही का तुम्हा लोकांनी.
पूर्वी दोन एक खोली आणि एक स्वयंपाकघर असे घर असे.
घरचे सगळे पुढच्या खोलीत झोपत.

लेखकाला कुटुंब शब्दाचा दुसरा अर्थ माहिती असता तर असं लिहिलं नसतं त्याने. >>> Lol

समुद्रातील लोक, स्वयंपाकघर पेटवणे >>> Lol

पिझ्झा बर्गर वर विशेष राग असतो बरका या सगळ्यांचा. >>> Happy हो. मराठीमधे हे दोन शब्द एकत्र आले की ते वाक्य कधीही याबद्दल चांगले मत व्यक्त करणारे नसते Happy

घटस्फोटाचे प्रमाण पहिल्या लग्नात 50%,
दुसऱ्यात 67% आणि
तिसऱ्यात तब्बल 74%. >>>> फ्रेण्ड्समधला रॉस इतका प्रातिनिधिक आहे याची कल्पना नव्हती. तरी त्याची सख्खी बहीण प्रचंड स्वयंपाकवेडी असते.

हे घटस्फोटाच्या प्रमाण दरवेळी शंभर टक्केपेक्षा जास्त निघू लागले होते, हे काकाफॉ येऊन गेले आहे एकदा. मी आणि हर्पानी मोजले होते. Lol

कुटुंबाला टेबलावर आणा;
कारण शयनकक्ष घर देतो,
*पण स्वयंपाकघर कुटुंब घडविते
>>>> Lol

१०० % पेक्षा जास्त मध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम नाही. एकापेक्षा जास्त लग्ने झाली आणि एकापेक्षा जास्त घटस्फोट झाले तर ते सहज शक्य आहे.
यातील जोक मिस करायचा नाही, पण गणिती मेंदू हे लिहिल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाहीये इतकंच Proud

Lol हो, हो. ते आम्ही ताडले पण दुसऱ्या लग्न वाले पहिल्या लग्नातून डिव्होर्स न घेता रिपिटू लागले होते. Lol म्हणून अनावश्यक छडा लावावा लागला.

Lol म्हणजे प्रत्यक्षातील संख्या जास्त आहे की काय? म्हणजे परवा साउथ आफ्रिका ७२ मधे ऑल आउट झाले (टू बी प्रिसाइज ९ आउट) पण त्यातही इंग्लंडने तीन कॅचेस सोडले होते. नाहीतर आणखी वाईट अवस्था होती. तसे काहीतरी चित्र आहे का? लोकांनी डायव्होर्स न घेता पुढे लग्न केले केवळ हा डेटा व हे % कमी राहावे या सामाजिक काळजीने?

पण मुळात घरी स्वयंपाक करून खा मधे घटस्फोटाचे % कोठून शिरले? दोन्हीचे काही कोरिलेशन पोस्टमधे तरी नाही. उलट मला घटस्फोट आणि स्वयंपाक घरी बनवणे याचा कार्यकारणभाव उलटा लावलाय असेच वाटले.

(घटस्फोटात रिलेशनच शिल्लक नाही तर कोरिलेशन कोठून येणार अशी फाको करणारे लोक आता माबोवर फारसे राहिलेले नाहीत. याबद्दल एक उसासा)

1971 मध्ये अमेरिकेत 71% कुटुंबे “पारंपरिक” होती – आई, वडील आणि मुले एकत्र.
आज ती संख्या फक्त 20% आहे. >>> ही पोस्ट २०२० मधली असेल तर हे बरोबरच आहे. ७१ साली ७१%, २० साली २०%. अमित हे गणित कसे वाटते? हे जोईच्या "आत्ता तू २२ वर्षांचा आहेस, ती ४४ ची. तू जेव्हा ४४ चा होशील तेव्हा ती ८८ ची होईल" लेव्हलचे गणित आहे.

चूल पुन्हा पेटवा. जेवण बनवा.
कुटुंबाला टेबलावर आणा;

हे खरे तर,
कुटुंबाला पाटावर आणा;

असे हवे ना ?
पूर्वी आपल्यात पाटावर बसून जेवायची पद्धत होती, आता घरोघरी डायनिंग टेबल्स आली म्हणून घटस्फोट वाढले असेही काकाफॉ होईल !

पण 1980 नंतर हळूहळू दृश्य बदलले. >> हे काकाफॉ वाले कुठूनही कुठलीही तारीख काढतात. आम्ही म्हणतो तेच खरे, तुमचा डेटा चुकीचा आहे. तरी ...

मॅकडोनाल्डची स्थापना १९४० मध्ये झाली आणि त्याची कॉर्पोरेशन १९५५ मध्ये झाली.
बर्गर किंग १९५३
पिझ्झा हट १९५८
केएफसी १९३०

असे असताना १९८० येतेच कुठून ?

का विचारतो मी असे प्रश्न Lol Lol

पिझ्झा बर्गर वर विशेष राग असतो बरका या सगळ्यांचा. >>> Happy हो. मराठीमधे हे दोन शब्द एकत्र आले की ते वाक्य कधीही याबद्दल चांगले मत व्यक्त करणारे नसते >>> क्या बात! अचूक निरीक्षण.

आई - वडील कामात व्यस्त झाले >> हे वाक्य चुकीचं आहे. इथे काम म्हणजे व्यवसाय म्हणून गृहीत धरतो आहे. आधी व्यवसाय करणाऱ्या आई आणि वडिलांचं प्रमाण व्यस्त होतं, ते आता कमी व्यस्त होत चाललं आहे.

व्यग्र शब्द माहीत नसावा. धनीच्या वाक्याच्या चालीत म्हणतो, का काढतो मी असल्या चुका!!

Pages