काहीच्या काही फॉरवरर्ड्स - २

Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31

कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.

हा पहिल्या भागाचा दुवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१.जर्सी गाय ही डुक्कर व गाढव यांचा संयोग आहे!
(Great).........
२. पारवे येऊ नयेत म्हणून गच्चीतील फुलांच्या कुंड्यांमध्य दालचिनी टाका!

भन्नाट!

नया है वह

"सुनीता विलियम्स यांचे धक्कादायक खुलासे"
अंतराळात नऊ महिने घालविल्यानंतर अंतराळवीर सुनीता विलियम्स यांनी पत्रकारांशी केलेले वक्तव्य सध्या संपूर्ण जगभर चर्चेचा विषय ठरत आहे.
"माझं अंतराळात अडकणं हे देवाची इच्छा असल्यासारखं वाटत होतं. जेव्हा मला अंतराळात २० दिवस झाले होते, तेव्हा मी जणू मृत्यूशी सामना करत होते. अन्न व पाण्याचा साठा कमी होत चालल्यावर मला वाटलं की आता पुढे कसं जगायचं? त्याच वेळी मला सनातन धर्मातील चैत्र नवरात्रीच्या उपवासाची आठवण झाली. त्या दिवसापासून मी संध्याकाळी थोडं अन्न व पाणी घेत असे आणि सकाळी थोडंसं पाणी. एक महिना असा गेला आणि मी निरोगी आणि आनंदी होते. मला वाटू लागलं की मी आणखी काही काळ तग धरू शकते.
"मृत्यूची वाट पाहत असताना मी संगणक उघडला आणि विचार केला की बायबल वाचावं. मी ते आधी अनेक वेळा वाचलं होतं, त्यामुळे एका पानानंतर मला कंटाळा आला. मग मला पुन्हा एकदा रामायण आणि भगवद्गीता वाचायची इच्छा झाली (आता वाटतं की त्यातून मला काहीशा शक्तीची अनुभूती झाली). मी त्याचं इंग्रजी भाषांतर डाउनलोड केलं आणि वाचायला सुरुवात केली. १०-१५ पाने वाचल्यावर मी थक्क झाले. त्यातील भ्रूणविज्ञान, खोल समुद्र आणि आकाश याबद्दलचं वर्णन अद्भुत होतं. मला वाटलं की हे जगाला सांगितलं पाहिजे.
"अंतराळातून पाहिलं तर सूर्य चिखलाच्या तळ्यात बसल्यासारखा दिसतो. कधी कधी मला वरून काही आवाज येत, जणू काही मंत्रोच्चार चालू आहेत, आणि मला वाटलं की हे संस्कृत किंवा हिंदीत आहेत. माझा सहप्रवासी बॅरी विलमोर म्हणाला की हे सगळं मी दररोज रामायण आणि भगवद्गीता वाचते म्हणून होतंय. त्यानंतर मी रामायण आणि गीतेचं सखोल वाचन करायचं ठरवलं. ती एक अद्वितीय अनुभूती होती. मी लगेच एलन मस्कला फोन करून हे सांगितलं.
"आता तुम्ही थक्क व्हाल – काही दिवस आम्ही इतके घाबरलो होतो कारण आमच्या अंतराळ स्थानकाच्या दिशेने प्रचंड उल्का धडधडत येत होत्या. आमच्याकडे काही उपाय नव्हता, म्हणून आम्ही देवाला प्रार्थना केली. आणि एका चमत्कारीक प्रकारे काही लहान गोलाकार प्रकाशकण (जणू काही तारे) खाली उतरले आणि त्या सर्व उल्कांचा नाश केला. आम्ही ते पाहिलं तेव्हा असं वाटलं की जणू आम्ही त्यांच्यावर तारे फेकतोय. हे आमच्यासाठी आश्चर्यकारक होतं. नासाने या घटनेवर अधिक संशोधन करण्याचे आश्वासन दिलं आहे.
"आठ महिन्यांत मी संपूर्ण रामायण आणि भगवद्गीता वाचली. मला जाणवू लागलं की आता मी पृथ्वीवर परतू शकते. माझ्यात एक विलक्षण आत्मविश्वास निर्माण झाला.
"एप्रिल महिन्यात, सूर्यास्ताच्या वेळी, सिंहासारख्या एका जीवासोबत माताजी व त्रिशूल घेतलेली एक आकृती पृथ्वीवर उतरतानासारखी दिसली. ती आकृती पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केल्यानंतर अदृश्य झाली. ती कुठून आली हे समजत नव्हतं, म्हणून मी आणि बॅरी विलमोर तिचं निरीक्षण करत होतो. असं वाटलं की ती आकाशाच्या एखाद्या विशेष थरातून खाली आली. त्यामुळे मला समजलं की आकाशाचे एकापेक्षा जास्त थर असतात. कितीही विचार केल्यावरही आम्हाला हे उमगलं नाही की हे उडणारे घोडे कुठे गेले? नंतर मला न्यू यॉर्क टाईम्समधील एक अहवाल दिसला – त्यात हडसन नदीवर चंद्रकोर दिसली होती आणि २ मार्चपासून सनातनी उपवास सुरू झाल्याची बातमी होती. त्यानंतर नांगलमध्ये हे निरीक्षण सुरू होतं. नंतर आम्हाला जाणवलं की आता पृथ्वीवर उपवास संपवण्याची वेळ झाली होती. मला वाटतं की ते देवाच्या आशीर्वादाने येणारे देवदूत होते.
"आता मला वाटतं की सनातन धर्मातील भगवद्गीता खरी आहे. आता माझं संशोधन वेदांच्या विज्ञानावर आधारित असेल – भ्रूणविज्ञान, खोल समुद्राचं विज्ञान. मला खगोलशास्त्राविषयी सर्व काही शिकायचं आहे. नासामध्ये वेदांच्या अलौकिक शक्तींवर संशोधन करणाऱ्या नवीन विभागाची स्थापना करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे."

…आकाशाच्या एखाद्या विशेष थरातून खाली आली. त्यामुळे मला समजलं की आकाशाचे एकापेक्षा जास्त थर असतात. …

Trained Astronauts ना एकदम पहिल्या इयत्तेत पाठवले की हो ! 😀

.. कितीही विचार केल्यावरही आम्हाला हे उमगलं नाही की हे उडणारे घोडे कुठे गेले…..

घोडे ?
सिंहाचे घोडे कधी, कसे झाले ?

एक पे रैने का जी. घोडा बोलो नै तो माताजी का सिंह बोलो 😀

बँकेतून बाहेर पडताना मला आठवलं की गाडीची चावी बँकेत विसरलेय. परत जाऊन सगळ्यांना विचारलं पण बँकेत चावी सापडली नाही. मग परत पर्स चाळली. अरे देवा! आठवलं की चावी तर गाडीतच राहिली होती!
धावतपळत पार्किंगमध्ये गेले, गाडी गायब! पोलिसांना फोन करून गाडीचा नंबर सांगितला आणि सांगितलं की चावी गाडीत राहिली होती आणि गाडी चोरी झाली आहे.
थोडे शुद्धीवर आले तेव्हा धडधडत्या मनाने पतीदेवांना फोन केला आणि थोडं अडखळत सांगितलं – "गाडी चोरी झालीये."
तिथून पतीदेव गरजले – "मी तुला बँकेत सोडून आलो होतो, तू गाडी घेऊनच गेली नव्हतीस."
देवाचे आभार मानले आणि पतीदेवांना सांगितलं की येऊन मला घेऊन जा.
पतीदेव म्हणाले – "घ्यायला तर येतो, पण आधी पोलिसांना पटवून देतो की तुझी गाडी मी चोरी केलेली नाही! एक तासापासून मला अडवून ठेवलंय त्यांनी."
म्हणून बांधवांनो, अशी वेळ टाळायची असेल तर फळं, मध, खजूर, तुप आणि खास करून बदाम फक्त स्वतः खाऊ नका, तर आपल्या बायकोलाही खायला द्या.
जनहितार्थ

व्हॉटस्ऍप लेखकाने ‘अवकाशातल्या स्ट्रेसफुल वातावरणाने मानवी मनात निर्माण होणारे भ्रम’ या नावाचा रिसर्च पेपर काढला असता तर गेला बाजार एक पीएचडी पदरात पाडून घेतली असती भारतात. (सर्व सिरीअस पीएचडी विद्यार्थ्यांनी व धारकांनी स्वतःला वगळावे.)

पीएचड्या कराव्याच पण सोबतच वेद/रामायण/गीताकालीन प्राचीन भारतीय शास्त्रीय शोध आणि त्याचे current time validation यासाठी नासा मधे एक कायमस्वरूपी डिपार्टमेंटच पाहिजे राव. काम संपता संपणार नाही रिसर्चचे.

अवकाशाची प्रतले सुटी-सुटी करणे, अंतरिक्षातील सिंहांचे घोडे करणे असे लोकोपयोगी प्रकल्पही राबवता येतील लगेहाथ. 😄

*ज्यांचा जन्म १९६०, १९६१, १९६२, १९६३, १९६४, १९६५ १९६६ १९६७ १९६८ १९६९ १९७०, १९७१, १९७२, १९७३, १९७४, १९७५, १९७६, १९७७, १९७८, १९७९, १९८०, १९८१, १९८२, १९८३, १९८४, १९८५ ,१९८६ , १९८७ , १९८८ , १९८९ , १९९० साली झाला आहे खास त्या पिढी साठी हा लेख*

ही पीढ़ी आता 3० ओलाडून ६२ कडे चाललीय, 'हया' आपल्या पिढीचं सगळ्यात मोठं यश म्हणजे या पिढीने खूप मोठा बदल पहिला आणि पचवला. आणि या पिढीची एक मोठी अडचण म्हणजे हि पिढी कायम उंबरठ्यावर राहिली.....

१,२,५,१०,२०,२५,५० पैसे बघीतलेली ही पीढीत पाहुणे कडून लाज न बाळगता पैसे घेत होती. शाई-बोरु/ पेन्सिल / पेन पासून सुरवात करून, ही पीढी आता, स्मार्ट फोन, लॕप्टाॕप, पीसी, उतारवयात सराईतपणे हाताळत आहे*.

ज्या पिढीच्या बालपणी सायकल सुद्धा एक चैन, असलेली, पण आता ह्या उतारवयात सराईतपणे स्कूटर, कार चालवणारी ही पिढी, अवखळ तर कधी गंभीर.... खूप भोगलेली आणि खूप सोसलेली, पण पूर्ण संस्कारित....

*टेप रेकॉर्डर, पॉकेट ट्रान्झिस्स्टर* ज्या पिढीसाठी खूप मोठी मिळकत होती.

*मार्कशीट* आणि *टिव्ही* च्या येण्यानी यांच्या बालपणाचा बळी घेतला नाही अशी ही शेवटची पिढी.

कुकरच्या रिंग्स, टायर, असल्या गोष्टी घेऊन लहानपणी *गाडी गाडी खेळणं* यात त्यांना काहीही कमीपणा वाटला नव्हता.

*'सळई जमिनीत रूतवत जाणं'* हा काही खेळ असू शकतो का ? पण होता.

*'कैऱ्या तोडणं'* ही यांच्या साठी चोरी नव्हती, आणि

कुठल्याही वेळी कुणाचंही *दार वाजवणं* या मध्ये कसलेही *एथीक्स* तुटत नव्हते.

*मित्राच्या आईने जेवू घालणं* यात कसलाही उपकाराचा भाव आणि *त्याच्या बाबांनी ओरडणं* यात कसलाही असूयेचा अभाव असणारी शेवटची पिढी.

वर्गात किवा शाळेत *स्वतःच्या बहिणीशी सुद्धा कुचरत बोलणारी* ही पिढी.

दोन दिवस जरी मित्र

शाळेत नाही आला तर

शाळा सुटल्या सुटल्या

दप्तरासकट

त्याच्या घरापर्यंत जाणारी

ती पीढी..

कुणाचेही बाबा शाळेत

आले की..मित्र कुठेही

खेळत असो .सत्तरच्या स्पीड ने *"तुझे बाबा आलेय चल लवकर* "

ही बातमी मित्रापर्य॔त पोहोचविणारी ती पिढी

पण गल्लीत *कुणाच्याही घरात कसलाही कार्यक्रम असलं* तरी वाट्टेल ते काम कसलाही विधिनिषेध न बाळगता करणारी ही पिढी.

*कपील, सुनिल गावसकर , वेंकट, प्रसनाच्या बोलिंग वर आणि पेस, भूपती, स्टेफी ग्राफ, अग्गासी, सॕम्प्रसच्या टेनिस वर तर राज, देव,दिलीप ते राजेश,अमिताभ आणि धर्मेंद्र,जितेंद्र बरोबर नंतर बऱ्याच नवीन कलाकारांवर, अगदी आमिर,सलमान, शाहरुख माधुरी,अनिल वर वाढलेली ही पिढी*

भाड्याने VCR आणुन ४-५ पिच्चर पैसे गोळा करून एकत्र पाहणाऱ्या मित्रांची ही पिढी.

*लक्ष्या-अशोक* च्या निर्व्याज विनोदावर हसलेली, *नाना, ओम पुरी, शबाना, स्मिता पाटील, गोविंदा, जग्गू दादा, वर्षा, सोनम, किमी ,सोनाली,* हे कलाकार पाहिलेली पिढी.

*'शिक्षकांचा मार खाणं'* यात काहीही गैर नाही फक्त घरी कळू नये कारण *'घरात परत धुतात'* ही भावना जपणारी पिढी.

ज्यांच्या शिक्षकांवर *आवाज चढवला नाही* अशी पिढी. हीत कितीही *धुतलं* तरी दसऱ्याला शिक्षकांना *सोनं देणारी* आणि आज इतक्या वर्षानी सुद्धा निवृत्त शिक्षक येताना दिसले तर लाज न बाळगता *खाली वाकून नमस्कार* करणारी पिढी. कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...

ना मोबाईल ना SMS ना व्हाट्सअप .... भेटण्या साठी आतुरतेने वाट पाहणारी पीढ़ी.

पंकज उधासच्या *_'तुने पैसा बहोत कमाया इस पैसेने देस छुडाया'_* या ओळीला डोळे पुसणारी,

दिवाळीच्या *पाच दिवसांची कथा* माहित असणारी

लिव्ह इन तर सोडाच, लव मॅरेज म्हणजे फार *मोठं डेरिंग* समजणारी ही पिढी, अहो शाळेत आणि महाविद्यालयात पण मुलींशी बोलणारी मुले ऍडव्हान्स समजली जाणारी पिढी.

पुन्हा डोळे झाकुया ?

दहा, वीस....... ऐंशी, नव्वद...........पुन्हा जुना आठवणीचा सुवर्ण काळ

*गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी.....असं न समजणारी सुज्ञ पिढी, कारण आजचे दिवस हेच उद्याच्या आठवणी असणार असं मानणारी ही पिढी ?*

धन्य ते जीवन जे खर जगण् आमचाही एक जमाना होता
पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता .पुढे ६ /७ वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे . जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही.
सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती,
मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी
भीती आमच्या आईवडिलांना कधी वाटलीच नाही.

(पुढे अजुन वरच्या एवढाच लांब मेसेज आहे, त्यात एवढ्या वेगवेगळ्या (आणि विचित्र) इमोजीज आहेत, त्या खोडत बसण्या ऐवजी पुढचा सगळा मेसेज कापला.)

जी "१९६० ते १९९० दरम्यान" ऐवजी मधली सगळी वर्षे लिहीत बसते तिच्या एवढ्या फुशारक्या!

पुर्वी बालवाडी हा प्रकारच नव्हता .पुढे ६ /७ वर्षानंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे >>> आँ?
इथे मी इमॅजिन करतेय की मुलं ६-७ वर्षांची झाल्यावर आपापली पाटी, पेन्सिल, खाऊ घेऊन दार उघडून घराबाहेर पडतायत आणि चालत शाळेला जातायत. ड्वाले पानावले. फार मनोरंजक कल्पना! कसं काय सुचतं असं? Lol

जर शाळेत गेलो नाही तरी कोणाला काही वाटायचे नाही >>> Rofl कुठे होते हे असले पालक? आमच्या घरी सांगायला पाहिजे हे. उगाच आम्हाला शाळेत सोडून यायचे.

rmd, त्यावेळी शाळेत वजाबाकी शिकवली नसेल.
कॉलेज ला सुट्टी असली तर् आठवणीत स्वप्न रंगवनारी पिढी ...>>> म्हणजे काय नक्की

हे फार भारी आहे. गहिवरून गेलो राव.
कॉलेज मध्ये एका मुलीला तिचा खाली पडलेला हातरुमाल उचलून दिला म्हणून एक रुपयाचा दंड भरलाय राव. मित्रांनी सोळा आणे वर्गणी काढून दंड भरला घरी काय सांगायची टाप.
एकदा लकी मध्ये मित्र घेऊन गेला. पहिल्यांदाच गेलो. इकडे तिकडे बघून कुणी ओळखीचे नाही हे बघून घेतले. मग महंमद का इस्माईल असे नॉन वेज नामधरी वेटरने समोर पेस्ट्रीने भरलेले ताट आणून ठेवले. अबब, पैसे कोण देणार आणि एव्हढे सगळे कोण खाणा? मित्र म्हणाला अरे वेड्या, तुला पाहिजे तेव्हढेच खा. बाकी वेटर घेऊन जाईल. पण ह्यात म्हणे अंडी असतात. देवाचे नाव घेऊन एक खाल्ले.
मग जूक बॉक्स माधे एक एक रुपया टाकून गाणी ऐकली. चहा वर चहा आणि गाण्य्यावर गाणी ढोसत राहिलो
सत्यकथा, सवाई गंधर्व, हुतुतुचचे सामने. विठ्ठलवाडी नि अरेण्येश्वरच्या सहली, मंगळागौर चोरून बघण, ये जो मुहब्बत है गाण्याची पारायणे, सिगारेट चा पहिला झुरका, ॐ समानाय स्वाहः म्हणून चाखलेला पहिला प्याला. आता मुलाला सांगितले की पूर्वी black and white TV होते तर मुलगा म्हणतो, "बाबा फेकू नका. रंग कुठे जातील?"
बेटा, रंग उडून गेले रे . राहिले ते विटके वस्त्र.
बायको म्हणते, "पायोनिअर डाईंग हाउस आहे, तिकडे टाका. नवीन रंग भरा, "
असं कधी होतं का?
गेले ते दिन गेले.

केकू Lol
"पायोनिअर डाईंग हाउस आहे, तिकडे जाऊन डाय करा."
असे हवे. म्हणजे तिकडे जाऊन रंग भरा म्हणतेय की तिकडे जाऊन मरा म्हणतेय हे गुलदस्त्यात.

Pages