Submitted by मानव पृथ्वीकर on 2 April, 2025 - 05:31
कायप्पावर, फेसबुक किंवा इतरत्र अनेकदा काहीच्या काही वाटावे असे निनावी लिखाण फिरत असते.
त्यातील काही खास वाटले तर आणि निनावी असले तरच शेअर करण्यास हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पण सद्गुरू नाही मिळाला तर
पण सद्गुरू नाही मिळाला तर उंटाच्या पार्श्वभागाचा xx घेण्याचे धंदे.
xx ह्या पार्श्वभागाचा या शब्दाऐवजी हव्या होत्या ना?
योगी९००
योगी९००
असल्या फॉर्वर्ड्समधे रंगवलेला
असल्या फॉर्वर्ड्समधे रंगवलेला जो 'काळ सुखाचा' असतो, त्याच बालपणी, घरी एक गोष्टींचं पुस्तक होतं. त्यात ही उंटाची गोष्ट, 'व्यवहारचातुर्य' ह्या सदराखाली वाचली होती. त्याच्यात हा असला काही अर्थ लपल्याचं त्या लेखकाला सुद्धा माहित नव्हतं. आता त्या पुस्तकातल्या कुठल्या गोष्टी असल्या चमत्कारिक तात्पर्यांच्या आधारावर परत वाचायला लागतील कुणास ठाऊक!
… सगळी धडपड उंटांच्या
… सगळी धडपड उंटांच्या सुखासाठी चालली असती तर ते तसेही सुखातच होते की ..
+ १
😄
आपला देश लाख वाईट असेल पण
आपला देश लाख वाईट असेल पण जोपर्यंत,
खच्चून भरलेल्या लोकलच्या डब्यात दुसऱ्याच्या कडेवरच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन कोणीतरी खिडकीबाहेरची गंमत दाखवतं,
लेटमार्क लागू नये म्हणून धावणाऱ्या एखाद्याला दरवाजातले चार हात उचलून आत ओढून घेतात,
पुलावरच्या गर्दीत कुणीतरी टाकून दिलेला, हात पाय नसलेला भिकारी कुणाच्याही पायाखाली येत नाही, लोक त्याला पायही न लावता पुढे निघून जातात,
प्लॅटफॉर्मच्या कडेला उभं असलेल्या कुणालातरी कुणीतरी झपकन मागे ओढतं, क्षणात एखादी लोकल धडधडत निघून जाते,
तोपर्यंत ह्या देशात जन्मल्याचा मला पश्चाताप होणार नाही,
दुचाकीवरून जाणाऱ्या एखाद्याची फाटकी टिफिन बॅग तुटून पडले आणि मागून येणारी मर्सिडीज तिला शिताफीने चकवून पुढे जाते, एखादा दुचाकीवाला थांबून ती उचलतो, पाहिल्याला देतो, दोघेही हसून निघून जातात,
खोदलेल्या रस्त्यावर एखादी दुचाकी घसरते, चारजण त्याला बसते करतात, पाणी पाजतात, थांबून कोणीच राहत नाही पण लगेच निघूनही जात नाही, शक्यतो कुणाला फार लागत नाही,
चढावर एखादा आपली बंद पडलेली मोटारसायकल ढकलत असतो, मागून कुणीतरी येतो, पाय लावतो, त्याला गॅरेज गाठून देतो, गाडी सुरू होते,
तोपर्यंत हा देश बंद पडेल असं मला वाटत नाही.
इथे लोकं कायदे मोडतात, पण सगळेच बेपर्वा नसतात. बेशिस्त असतात पण सगळेच बेशरम नसतात. माणसं भांडतात पण शक्यतो बंदुका काढत नाहीत, चार जण रस्त्यावर भांडतात तेंव्हा दहा जण समजावत असतात,
नियम वाकवले जातात पण किती वाकवायचे ह्याची चौकट शक्यतो पाळली जाते. प्रचंड स्पर्धा असलेल्या ह्या देशात माना पिरगळल्या जातात पण शक्यतो गळे कापले जात नाहीत. लोकं जगतात, जगण्याचा हक्क नाकारला जात नाही.
आणि हे जगणं स्वीकारलेले लोक हळूहळू ह्या देशाला चांगलं, अजून चांगलं करत नेतील हा विश्वास आहे तोपर्यंत ह्या देशात जगण्याला शाप म्हणावं असं मला वाटत नाही.
भारत ही पृथ्वीवरची सगळ्यात छान जागा नसेलही, भारतीय ही जगातली सगळ्यात चांगली ओळख नसेलही, भारतीय सरकार हे जगातलं सगळ्यात चांगलं सरकार नसेलही,
पण मी कोण आहे?
मी माणूस म्हणून सगळ्यात छान आहे? माणूस म्हणून माझे वागणे आदर्श आहे? नागरिक म्हणून माझे वागणे निर्दोष आहे?
माझ्यापुरते ह्याचे उत्तर नाही असेच आहे आणि म्हणूनच मला मिळालेला देश, समाज आणि सरकार माझ्या लायकीनुसार मिळाले आहे असे मी समजतो.
ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला सुधारणे, मागण्याच्या आधी देणे, बोलण्याच्या आधी करून दाखवणे, रडण्याचा आधी चार लोकांना जगवून दाखवणे.
जोपर्यंत हे तुम्हांला जमत नाही तोपर्यंत ना हा देश सुधारेल, ना इतर कुठला देश तुम्हांला बोलावेल..
कारण आपली किंमत आपल्याला माहीत नसली तरी जगाला माहीत असते, दोन्ही अर्थानी..
-शैलेंद्र कवाडे.
हा आहे अद्दल का का फॉ.
हा आहे अस्सल का का फॉ.
>>
नियम वाकवले जातात पण किती वाकवायचे ह्याची चौकट शक्यतो पाळली जाते. प्रचंड स्पर्धा असलेल्या ह्या देशात माना पिरगळल्या जातात पण शक्यतो गळे कापले जात नाहीत. लोकं जगतात, जगण्याचा हक्क नाकारला जात नाही.
>>
हे वाचून तर अगदी आनंदाश्रू आले हो डोळ्यात.
हा आहे अस्सल का का फॉ.
हा आहे अस्सल का का फॉ.
+ १
चित्ती असो द्यावे … वगैरे 😀
*"लक्झरी"..(सुखसौख्य) ??*
*"लक्झरी"..(सुखसौख्य) ??*
अमेरिकेतील सर्वात महागड्या हॉस्पिटलमधून उपचार घेता येणे म्हणजे लक्झरी नाही तर..!लक्झरी म्हणजे *निरोगी असणे..!!*
*लक्झरी* म्हणजे क्रूझवर जाणे असे नाही, किंवा प्रसिद्ध शेफने तयार केलेले अन्न खाणे नव्हे..!
लक्झरी म्हणजे *आपल्या शेतात, अंगणात किंवा परसात उगवलेल्या ताज्या भाज्या खाता येणे..!!*
*लक्झरी* म्हणजे तुमच्या घरात लिफ्ट असणे असे नव्हे..!
लक्झरी म्हणजे *विनाकष्ट 3- 4 मजले चढण्याची क्षमता असणे..!!*
*लक्झरी* म्हणजे मोठे रेफ्रिजरेटर घेण्याची क्षमता असणे असे नाही तर..!
लक्झरी म्हणजे *घरचे शिजवलेले अन्न दिवसातून 3 वेळा खाण्याची उपलब्धता आणि क्षमता असणे..!!*
*लक्झरी* म्हणजे मोठमोठे दागिने नुसतेच अंगावर मिरविणे नव्हे तर...!
लक्झरी म्हणजे *सोन्यासारखे झळकणारे आरोग्यपूर्ण स्मितहास्य आणि निरोगी त्वचा असणे..!!*
*लक्झरी* म्हणजे होम थिएटर सिस्टीम असणे अन त्यावर हिमालयीन मोहीम पाहणे नव्हे..!
लक्झरी म्हणजे *एखाद्या पहाडी मोहिमेचा शारीरिक अनुभव घेता येणे..!!*
60 च्या दशकात स्कूटर असणे लक्झरी होती..
70 च्या दशकात टेलिव्हिजन असणे लक्झरी होती..
80 च्या दशकात टेलिफोन ही लक्झरी होती..
90 च्या दशकात संगणक एक लक्झरी होती..
*मग आता सध्या लक्झरी म्हणजे काय..?*
तर आता *लक्झरी* म्हणजे..?
*निरोगी असणे..*
*प्रामाणिक असणे..*
*आनंदी असणे..!*
*आनंदी वैवाहिक जीवन असणे..*
*प्रेमळ कुटुंब असणे..*
*प्रेमळ मित्रांची साथ असणे..*
*नातीगोती सोबत असणे..*
*प्रदूषित नसलेल्या ठिकाणी राहण्याचे ठिकाण असणे..*
*ट्रेक करणे..*
*गड किल्ले भटकणे..*
*निसर्गात फिरणे..*
*अशा सर्व गोष्टी दुर्मिळ झाल्या आहेत आणि..*
ह्या दुर्मिळ गोष्टी आपणांपाशी असणे हीच खरी आजची : *लक्झरी..!!*
*संकलन-*
*निसर्ग उपचार तज्ञ*
*डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.*
*आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक*
*संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९*
(अशी आरोग्यविषयक माहिती नियमितपणे आपल्या वॉट्स्ॲपवर हवी असल्यास 'Arogya' असे टाईप करुन 97 30 629 669 या नंबरवर वॉट्स्ॲप मेसेज करावा. आपणास आमच्या 'आरोग्य माहीती घ्या' या ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात येईल)
निनावी फॉर्वर्डस फक्त करायचीत
निनावी फॉर्वर्डस फक्त करायचीत ना?
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड कायच्या काय वाटत नाही.
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड पटला
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड पटला
निनावी फॉर्वर्डस फक्त करायचीत
निनावी फॉर्वर्डस फक्त करायचीत ना?>>
हो. कृपया फक्त निनावी फॉरवर्ड्स इथे द्यावेत.
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड कायच्या काय वाटत नाही.>> +१
*आयआयटी कुणासाठी?*
*आयआयटी कुणासाठी?*
“आयआयटी भारतासाठी नाही, अमेरिकेसाठी उभारत आहेत”.
आयआयटीचे विद्यार्थी रात्रंदिवस दिवा लावून अभ्यास करतात,
पण भारतासाठी नाही.
आपल्या कराच्या पैशातून ते अमेरिकन साम्राज्य उभारत आहेत.
१९४७ पूर्वी आपण ईस्ट इंडिया कंपनीची सेवा केली,
आणि आता आपण वेस्ट कोस्ट कंपनीपुढे नतमस्तक आहोत.
हे कोणी स्पष्ट सांगितले नाही, ते मी सांगतो.
सरकार एका आयआयटी विद्यार्थ्यावर
४ वर्षांच्या बीटेक अभ्यासक्रमादरम्यान
सुमारे १०–१५ लाख रुपये खर्च करते.
आर्थिक वर्ष २०२४–२५ साठी आयआयटींचं एकूण बजेट?
₹९,६६० कोटी!
विद्यार्थी त्यापैकी फारच थोडं शुल्क भरतात.
बर्याच जणांना शिष्यवृत्तीमुळे काहीच भरावं लागत नाही.
बाकी पैसे कोण भरतो?
तुम्ही...
म्हणजेच आपण!
आणि मग येतो विश्वासघात!
आयआयटीचे ३०–३६% पदवीधर
परदेशात स्थायिक होतात.
JEE मधील टॉप १०० रँकर्सपैकी
सुमारे ६२% अमेरिका किंवा युरोपमध्ये स्थायिक होतात.
भारतामध्ये राहिलेले ७०% जण
परदेशी बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करतात :
Google, Amazon, Microsoft, McKinsey, इ.
आणि...
DRDO, ISRO किंवा BARC मध्ये सामील होणारे
केवळ २–३% इतकेच!
राष्ट्रनिर्मिती?
कोणालाच पर्वा नाही.
आयआयटीचं स्वप्न आता जगासाठी मजूर निर्यात करण्याचं पाईपलाईन बनलं आहे.
तरीही प्रत्येक प्रजासत्ताक दिनी
आपण छातीठोकपणे आयआयटींबद्दल बोलतो,
जणू ते भारताचे किरीटमणी आहेत.
पण कोणी विचारत नाही :
हेच का अब्दुल कलाम, भाभा, विक्रम साराभाई यांचं स्वप्न होतं?
ही संस्थानं टाळ्यांसाठी बांधली नव्हती.
त्या बनल्या होत्या अणुसंशोधनासाठी,
ग्रामीण विद्युतीकरणासाठी,
आणि भारताच्या सार्वभौमतेच्या रक्षणासाठी!
आणि आता त्या
कॅलिफोर्नियातील भागधारकांच्या नफ्याचं रक्षण करतात.
तुम्हाला आकडा हवा आहे?
अमेरिकेतला सॉफ्टवेअर इंजिनिअर वर्षाला ₹१.५ कोटी कमावतो.
तर ISRO मधला एंट्री लेव्हल सायंटिस्ट वर्षाला फक्त ₹१२ लाख.
हे त्या त्या राष्ट्रातील महागाई दरानुसार असतं, हे लक्षात घ्यावं.
हे मेंदूंचं पलायन नाही.
हे राज्य-प्रायोजित "बौद्धिक मालमत्ता धुवून नेणे" आहे.
आपण प्रशिक्षणासाठी पैसे देतो.
पण बुद्धी पश्चिमेकडे विकली जाते.
कारण त्यांना भारतात नोकरी (त्यांच्या आवडीची व इच्छुक पैशाची) मिळत नाही.
आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काय मिळतं?
सुंदर पिचाईसोबत एक सेल्फी!
किंवा एखाद्या भारतीय CEO चं अमेरिकन कंपनीतलं यश पाहून LinkedIn पोस्ट!
आपण केवळ जिभल्या चाटत राहायचं!
हेच मेंदू
जर HAL, BHEL, भारत इलेक्ट्रॉनिक्स यांचं नेतृत्व करीत असते तर?
आपण हा प्रश्न विचारत नाही.
कारण आतून आपण अजूनही वसाहतवादी आहोत –
फक्त आता चांगला पगार घेतो.
१९४७ पूर्वी आपण कापूस आणि हिरे निर्यात करीत होतो.
आता आपण बुद्धी निर्यात करतो.
आणि ते साजरं करतो.
का?
कारण आपण वैयक्तिक यशाला
राष्ट्रीय अभिमान समजतो.
मग धोरण कुठे आहे?
सार्वजनिक निधीतून शिकलेल्या विद्यार्थ्यांसाठी १० वर्षांची राष्ट्रीय सेवा बंधनकारक का नाही?
अन्यथा चारपट खर्च वसूल करावा.
राष्ट्रीय संस्थांमधून परदेशी कंपन्यांना थेट भरती कां करू दिली जाते?
भारतीय क्षेत्रात गुंतवणूक न करता?
कोणी म्हणत का नाही ?
पुरे झालं!
राष्ट्रीय मेंदू- धारणा योजना तयार करा.
भारतात सेवा करणं हे शिक्षा नसून
सन्मान मानलं जावं.
हे "विकसित भारत" नाही.
हे आहे "आउटसोर्स्ड भारत"!
तुम्ही कर भरता.
तुम्ही त्यांची स्वप्नं उभारता.
ते दुसर्या देशाला उभारतात.
आणि ज्या देशाने त्यांना जन्म दिला?
तो मात्र फक्त टाळ्या वाजवित उभा असतो.
कुठवर चालायचं हे?
बाप (आईपण) मोठ्या फुशारकीने सांगतो--
"माझा /माझी *****अमेरिकेत आहे.
युके/ जपान/ फ्रान्स/ जर्मनी/ **** मध्ये आहे.
त्याला/ तिला **** कोटी पगार आहे.
बाप/आई जेव्हा आजारी असते// मरतो....
तेव्हा...
त्या मुलाला/ मुलीला भेटायला वेळ नसतो.
असे सुख, अशी संतती काय कामाची?
थू तुमच्या अशा जगण्यावर
आय आय टी/ आय आय एम / मेडिकल मधून सुशिक्षित (?) झालेल्यांनो,
विचार करा
ह्म्म्म… खरे आहे. तितकेच
ह्म्म्म… खरे आहे. तितकेच हेही खरे आहे की इथले सरकार/उद्योग हुशार डोक्यांना इथेच रोखण्यात अपयशी ठरताहेत.
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड चांगला आहे.
राष्ट्रीय सेवा करा की
राष्ट्रीय सेवा
करा की बंधनकारक. अमेरिकेने अडवलं आहे का? १५ वर्षे झाली देश स्वतंत्र्य झाल्याला. अजुन का नाही केलं?
ढेरे डॉक्टरांचा फॉरवर्ड आवडला नाही. कारण माझ्या लक्झरीची व्याख्या ते करत आहेत. माझ्या आनंदाची व्याख्या त्यांना करायला द्यायचा परवाना मी दिलेला नाही. मला घरात लिफ्ट लावणे ही लक्झरी वाटत असेल, त्याने आनंद मिळत असेल, लक्झरी सोडा ती माझी गरज असेल तर त्याला हीन लेखून मग चांगल्या आरोग्याचे गुणगान करायची काही एक जरुरी नाही.
'जो जे वांछिल तो ते लाहो.' पिरिएड!
'ढेर्या जे वांछिल ते जग लाहो' असं नाही ते.
मला त्यांच्या दृष्टीने आरोग्यपूर्ण जगायचं नसेल तर ते कोण सांगणारे. मी आनंदात आहे. पिरिएड!
~देवांग पटेल
~देवांग पटेल
मेरी मर्ज़ी
मैं चाहे ये करूँ, मैं चाहे वो करूँ
मैं चाहे यहाँ जाऊँ, मैं चाहे वहाँ जाऊँ
गोरे को मैं कहूँ काला
जीजा को मैं बोलूँ साला
नदी को मैं बोलूँ नाला
चाबी बिना खोलूँ ताला
मेरे बारे में कुछ कहना नहीं
चुपचाप बैठे रहो बोलना नहीं
मुझे समझाना मत झूठ सही
चाहे पी जाऊँ मैं चाय-काफी डाल के दही
मेरी मर्ज़ी
हर चौराहे पर मैं अपनी मूर्ति लगवाऊँ
न्यूज़ पेपर काट के अपना सूट मैं बनवाऊँ
हॉस्पिटल में जा के मैं ज़ोरों से चिल्लाऊँ
पहलवान को गोद में ले के लोरी सुनाऊँ
दो-सौ तीन-सौ चार-सौ के छपवाऊँ नकली नोट
आलू टमाटर को मारूँ क्रिकेट के शॉट
स्विमिंग पूल में तैरने जाऊँ पहन के कुर्ता धोती
बड़ी लाटरी लगे कभी तो रखूँ सूरत रोती
मुझे अब रोको नहीं, मुझे अब टोको नहीं
मेरा कहा सुन के, तुम ऐसे अब चौंको नहीं
नकली दाढ़ी मूँछ लगा के बन जाऊँ मैं चोर
अपने घर में चोरी करके खूब मचाऊँ शोर
पानी पे मैं राशन रखूँ मुफ्त में बेचूँ तेल
कंकर पत्थर धूल डाल कर सबको दे दूँ भेल
मैं चाहे ये करूँ, मैं चाहे वो करूँ
मेरी मर्ज़ी
मेरी मर्ज़ी
मैं अपनी शादी में ना जाऊँ मेरी मर्ज़ी
मैं पैरों से तबले बजवाऊँ मेरी मर्ज़ी
मैं बीच सड़क बिस्तर लगवाऊँ मेरी मर्ज़ी
मैं कुतुब मीनार पे घर बनवाऊँ मेरी मर्ज़ी
टाई की जगह पे मैं बांधू लम्बा काला नाग
सफ़ेद कुर्ते पर लगवाऊँ बूट पॉलिश के दाग
त्योहारों में पहन के निकलूँ मैं जूतों का हार
बैलों के पीछे लगवाऊँ मैं तो मोटर कार
रसगुल्ले में मिर्ची डालूँ, दूध में डालूँ व्हिस्की
अपनी घरवाली से पूछूँ, तू है बीवी किसकी
तांगे वाले से उड़वाऊँ बोईंग जंबो जेट
भिखारी को भीख में दे दूँ, दो बेडरूम का फ्लैट
मुझे अब रोको नहीं, मुझे अब टोको नहीं
मेरा कहा सुन के तुम, ऐसे अब चौंको नहीं
हलवाई को नाई कह दूँ, धोबी को मैं माली
फिल्म फालतू देख के मैं तो खूब बजाऊँ ताली
सर पे अपने मोज़े पहनूँ, हाथ में पहनूँ बूट
पेट्रोल के संग ऑइल मिला के मारूँ दो-दो घूँट
मैं चाहे ये करूँ...
मेरी मर्ज़ी
मैं सूट के संग पहनूँगा साड़ी मेरी मर्ज़ी
मैं बांधूँ कुछ अपने पिछवाड़े मेरी मर्ज़ी
मैं भूतों की तस्वीरें खींचूँ मेरी मर्ज़ी
मैं शरबत से खेतों को सींचूँ मेरी मर्ज़ी
न्यूज़ रीडर को मैं बोलूँ गाओ तुम कव्वाली
लेक्चर दे कोई तो कह दूँ चुप हो जा मवाली
रिश्वत लेने वालों से मैं माँगूँ कन्सेशन
डॉक्टर के हाथों पे मारूँ घोड़े का इंजेक्शन
झूठ बोल कर चोरों को पहनाऊँगा चोली
देश के संग गद्दारों को मारूँगा मैं गोली
काला धन लेने वालों को दूँगा नकली नोट
ढोंगी समाजसेवक को ना दूँगा अपना वोट
मुझे अब रोको नहीं, मुझे अब टोको नहीं
मेरा कहा सुन के तुम, ऐसे अब चौंको नहीं
कोई दंगा करे जो उसको लगवाऊँगा जेल
फाँसी देकर आतंकवाद का ख़तम करूँगा खेल
मैं जीवन का ये गाना मेरी मर्ज़ी से गाऊँ
मैं अपनी मर्ज़ी से जीयूँ, मर्ज़ी से मर जाऊँ
मैं चाहे ये करूँ...
मेरी मर्ज़ी
ऐ लफड़े झगड़े गायब हो जा मेरी मर्ज़ी
ऐ देश के दुश्मन तू चुप हो जा मेरी मर्ज़ी
ऐ भारत देश तू आगे हो जा मेरी मर्ज़ी
ऐ मेरी मर्ज़ी तू सच हो जा मेरी मर्ज़ी
मैं चाहे ये करूँ...
मारूँगा मैं सौ जूते जो लगाओगे लांछन
मर जाओगे खुद ही जो सच्चे को दोगे टेंशन
भूले से भी लेना नहीं तुम मेरा नाम
गाना मेरा सुनो और करो अपना काम
मेरी मर्ज़ी
अब मेरे को नहीं गाना है
मेरी मर्ज़ी. पिरीयड.
अमित +१. दुसरं म्हणजे लक्झरी
अमित +१. दुसरं म्हणजे लक्झरी शब्दाचा डिक्शनरी अर्थ पाहिला तर त्यांनी सांगितलेलं काहीच जुळत नाही. त्या गोष्टींना लक्झरी म्हणण्यापेक्षा sustainable lifestyle म्हणा.
ज्याची त्याची लक्झरी....
ज्याची त्याची लक्झरी.....बस्स...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
माझा पण अर्धा आणा:
माझा पण अर्धा आणा:
लक्झरी अब जरूनत बन गयी है..
जरूरत अब लक्झरी बन गयी है..
… लक्झरी अब ज़रूरत बन गयी है…
… लक्झरी अब ज़रूरत बन गयी है….
शब्बीर कुमार की कोण तो प्रतिरफी , त्याच्या आवाजात ऐकू आले. …मुहब्बत अब तिजारत बन गई है …. चालीसह ! 😀
तुम्ही म्हणताय तो मोहम्मद
तुम्ही म्हणताय तो मोहम्मद अजिझ तर नव्हे?
याचा गायक अन्वर...
गायक, गायिका, संगीत दिग्दर्शक याबाबतीत मी कच्चा लिंबु आहे, पण तुम्ही लिहिले तेच गाणे डोक्यात ठेवून मी लिहिलं.
मोहम्मद अजिझ ?
मोहम्मद अजिझ ? अन्वर ?
असेल.
तेव्हां या प्रतिरफी, प्रतिलतांची लाटच आली होती
BTW, चुलीवरचे जेवण, पाटावरचे वाटण वगैरे कढ काढणाऱ्या काकाफॉ पब्लिकला २-४ महिने सक्तीने कोंदट घरात धुराच्या चुलीवर १२-१४ लोकांचा रोजचा तिन्हींठाव साग्रसंगीत स्वयंपाक करायला लावायचे हिंसक स्वप्न आहे. पाट-वरवंटा, जातं, उखळ-मुसळ वापरण्याचा मनमुराद आनंद घ्या म्हणावं
BTW, चुलीवरचे जेवण, पाटावरचे
BTW, चुलीवरचे जेवण, पाटावरचे वाटण वगैरे कढ काढणाऱ्या काकाफॉ पब्लिकला २-४ महिने सक्तीने कोंदट घरात धुराच्या चुलीवर १२-१४ लोकांचा रोजचा तिन्हींठाव साग्रसंगीत स्वयंपाक करायला लावायचे हिंसक स्वप्न आहे. >>>
>>>>BTW, चुलीवरचे जेवण,
>>>>BTW, चुलीवरचे जेवण, पाटावरचे वाटण वगैरे कढ काढणाऱ्या काकाफॉ पब्लिकला २-४ महिने सक्तीने कोंदट घरात धुराच्या चुलीवर १२-१४ लोकांचा रोजचा तिन्हींठाव साग्रसंगीत स्वयंपाक करायला लावायचे हिंसक स्वप्न आहे. पाट-वरवंटा, जातं, उखळ-मुसळ वापरण्याचा मनमुराद आनंद घ्या म्हणावं

चुलीवरचे जेवण, पाटावरचे वाटण
चुलीवरचे जेवण, पाटावरचे वाटण वगैरे कढ काढणाऱ्या काकाफॉ पब्लिकला २-४ महिने सक्तीने कोंदट घरात धुराच्या चुलीवर १२-१४ लोकांचा रोजचा तिन्हींठाव साग्रसंगीत स्वयंपाक करायला लावायचे हिंसक स्वप्न आहे.
>>>> १००++. आणि विहिरीवरून हंडे भरून आणायला लावायचे. शक्यतो पावसाळ्यात हा मुहूर्त गाठूया का?
मेस्सीचा फसलेला डाव.
मेस्सीचा फसलेला डाव.
काही दिवसापूर्वी फुटबॉलचा महान दिग्गज खेळाडू क्रिस्तीयानो रोनाल्डो याने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. आणि ही भेट फुटबॉलचा दुसरा दिग्गज खेळाडू लिओनेल मेस्सी याच्यासह संपूर्ण जगाने बघितली.
मेस्सी आणि रोनाल्डो हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी समजले जातात. रोनाल्डोने डोनाल्ड ट्रम्प या शक्तिशाली नेत्याची भेट घेतल्यामुळे, मेस्सीला डोनाल्ड ट्रम्प यांच्या पेक्षा जास्त शक्तिशाली नेत्याची भेट घेऊन रोनाल्डोवर कुरघोडी करायची होती आणि आपण ट्रम्प यांच्यापेक्षा शक्तीशाली नेत्याची भेट घेऊ शकतो हे दाखवायचं होतं. त्यामुळे त्याच्यापुढे केवळ मोदीजींना भेटण्याचा एकमेव पर्याय उपलब्ध होता. कारण डोनाल्ड ट्रम्प हे जरी शक्तिशाली नेते असले तरी, संपूर्ण जगात दबदबा आणि आदर असणारे एकमेव नेते आहेत ते म्हणजे विश्वगुरु मोदीजी. कारण सध्या संपूर्ण जगात मोदीजींचा डंका वाजत आहे. जगातील इतर कोणताही नेता मोदीजींच्या आसपास देखील नाही. असो.
तर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन भारत दौऱ्याच्या नावाखाली मोदीजींची भेट घेण्यासाठी मेस्सी भारतात आला. परंतु वेळेत नं पोहचल्यामुळे मोदीजींची आणि त्याची भेट होऊ शकली नाही.
रोनाल्डोने घेतलेल्या ट्रम्प भेटीपेक्षा मोठी भेट घेण्याचा मेस्सीचा डाव अशाप्रकारे फसला. आणि एक मेस्सीचाहता म्हणून मनाला अतीव वेदना झाल्या. आशा करुयात की, येणाऱ्या काळात त्याची इच्छा पूर्ण होवो.
- एक मेस्सीप्रेमी
संघोट्यांच्या अपप्रचाराला हे
संघोट्यांच्या अपप्रचाराला हे माझे उत्तर..
अहो मोहनकाका! पुड्या सोडणे बंद करा..
अब्जावधी चरख्यांच्या फेऱ्यांनी मिळालेल्या स्वातंत्र्याची गोष्ट.. जरूर वाचा.
लॅंकशायर इंग्लंड मधील मोठे औद्योगिक केंद्र, जिथल्या कापड गिरण्या महात्मा गांधींच्या चरखा आंदोलनामुळे बंद पडल्या. आणि जेव्हा गांधींनी तिथे जाण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ब्रिटिश अधिकारी घाबरून गेले.
लॅंकाशायर शहर गांधींच्या रक्तासाठी तहानलेले होते.
ब्रिटीशांना माहीत होते की महात्मा गांधी तिथे गेले, तर त्यांचे माॅब लिचिंग केलं जाईल.
●●
पंधरा वर्षांपासून महात्मा गांधींनी भारतात परदेशी कपड्यांविरुद्ध आंदोलन उभं केलं होतं. परदेशी कपडे म्हणजे वाईट, गुलामीचं प्रतीक, ते घालणं म्हणजे पाप आणि देशद्रोह, अशी भावना त्यांनी निर्माण केली.
अशी परिस्थिती निर्माण झाली की लोक आपले सूट, शर्ट, कोट, धोतरं, पँट घेऊन येत आणि चौकात मोठ्या होळ्यांमध्ये जाळत. कापडाच्या दुकानांबाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते उभे राहत. लोकांना कपडे खरेदी करू नका म्हणून विनवणी करत.
ते दुकानाच्या दारात झोपत. “तुम्हाला खरेदी करायचीच असेल, तर आमच्या छातीवर पाय ठेवून जा” असं म्हणत.
ना धरणे, ना मोर्चा, ना घोषणा, ना हल्ला.
या, तुमचे कपडे जाळा.
मग घालायचं काय?
खादी घाला.
आपल्या हाताने कातलेली.
●●
गांधी खादीचे ब्रँड अॅम्बेसेडर झाले.
मुलाखत देताना ते चरखा कातत.
कोणाला भेटताना चरखा कातत.
सभेच्या मंचावरही चरखा कातत.
स्वागत करताना सूताची माळ घालत.
त्यांचे फोटो कुठल्याही कारणासाठी छापले गेले, तरी ते चरख्यासोबतच असायचे.
चरखा राष्ट्रदेव झाला आणि सूत कातणं म्हणजे त्याची पूजा.
प्रत्येक गांधीवादी सकाळी उठायचा, चरखा कातायचा आणि त्याच कापडाचे कपडे घालायचा.
खादी म्हणजे एक नवीन चीवर बनलं होतं.
जसं बुद्धाचे शिष्य त्यांच्या चीवरावरून ओळखले जात, तसं प्रत्येक देशभक्त खादीवरून ओळखला जायचा.
हे सगळं गांधींचं वेड होतं का?
●●
महात्मा गांधी समजून घ्यायचे असतील, तर गांधींसारखा विचार करावं लागेल.
त्यांना इतिहासही माहीत होता आणि अर्थशास्त्रही.
त्यांना माहीत होतं की इंग्रज भारतात राज्य करण्यासाठी आले नव्हते.
वसाहतवाद म्हणजे मुळात व्यापार असतो.
कारभार हे फक्त त्याचं साधन असतं.
देश चालवायला जितका खर्च होतो, त्यापेक्षा जास्त उत्पन्न कर आणि व्यापारातून मिळालं पाहिजे.
नफा झाला पाहिजे.
नफा झाला नाही तर काय होतं?
घाट्याचा सौदा होता म्हणून तर ब्रिटिशांनी अफगाणिस्तान सोडून दिला.
शीखांना हरवलं, म्हणून पंजाब ठेवला, पण काश्मीर डोगऱ्यांना विकला.
तिबेटकडे मोठ्या मोहिमा केल्या नाहीत, पण सुगौली करारात नेपाळकडून सुपीक तराईचा प्रदेश घेतला.
मग भारतात त्यांचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत कोणते होते?
कापडाचा बाजार,
मीठावरचा कर,
दारूची दुकाने.
●●
समजा एखाद्या देशातून 100 रुपये मिळतात आणि देश चालवायला 80 रुपये खर्च होतात.
तर फक्त 30 रुपयांचा फटका बसला, तरी सगळा व्यवसाय तोट्यात जाईल.
धंदा चालू ठेवणंच परवडणार नाही.
भारत ब्रिटिश कापडांचा 40 टक्क्यांहून अधिक बाजार होता.
1920–21 मध्ये हा बाजार 102 कोटींचा होता.
1922 मध्ये तो 57 कोटींवर घसरला.
मीठावरील कर भारत सरकारच्या महसुलाच्या 8 टक्के होता.
दांडी यात्रेनंतर, 1931 पर्यंत तो फक्त 1.5 टक्के राहिला.
संपूर्ण देशात सविनय कायदेभंगामुळे बेकायदेशीर मीठ विकलं जात होतं.
लोक खादी घालत होते.
दारूची दुकाने वेढली जात होती.
देशभर जेल भरून गेले होते.
सरकारची दहशत कमी होत होती.
आता दर हजार लोकांमागे जास्त अधिकारी, जास्त पोलीस, जास्त पोलीस ठाणी ठेवावी लागत होती.
खर्च वाढला, नफा कमी झाला.
●●
सततच्या तोट्यामुळे लॅंकशायरच्या गिरण्या बंद पडू लागल्या.
२४ तास चालणाऱ्या गिरण्यांत आधी कामाचे दिवस कमी झाले,
मग आठवड्यात फक्त ३ दिवस,
आणि शेवटी टाळेबंदी.
तेथील कामगारांची हालत खराब झाली.
संप, दंगे, अराजक सुरू झालं.
ब्रिटिश वृत्तपत्रे यासाठी गांधींनाच जबाबदार धरत होती.
लॅंकशायर मधील ब्रिटिश कामगार गांधींच्या रक्तासाठी तहानलेले होते.
सरकार घाबरलेलं होतं.
●●
गांधींना चर्चेसाठी लंडनला बोलावलं गेलं.
त्यांना बकरीच्या दुधाचा चहा दिला गेला.
विन्स्टन चर्चिल बकिंगहॅम पॅलेसच्या पायऱ्या चढणाऱ्या या अर्धनग्न फकिराकडे पाहून दात ओठ खात होता.
तेव्हा महात्मा गांधी म्हणाले..
“मला लॅंकशायरच्या गिरणी कामगारांना भेटायचं आहे.”
●●
कडेकोट सुरक्षेत त्यांना तिथे नेण्यात आलं.
रुथ बोर्डमन आणि डोरोथी डोनेलन यांनी अनेक वर्षांनंतर या संदर्भातील आठवण लिहिली आहे..
“तो लहानसा माणूस आला.
मी माझ्या आईकडे पाहून म्हणाले,
‘आई, हे गांधी कोण?’
आई म्हणाली, ‘तोच तो माणूस आहे.’
मी म्हणाले,
‘तो काही महत्त्वाचा वाटत नाही. तो तर फार गरीब दिसतो. त्याच्याकडे नीट कपडेही नाहीत. पायांच्या मध्ये पांढरंसं काहीतरी होतं, मोठ्या नॅपीसारखं. खांद्यावर काहीतरी गुंडाळलेलं होतं. पायात काहीच नाही, फक्त चप्पल! मला भीती वाटली.’
मी म्हणाले,
‘आई, यांच्या पायात बूटही नाहीत!’”
●●
कामगारांनी आपल्या सर्वात मोठ्या शत्रूला पाहिलं.
पण त्याला मारलं नाही...
ते त्याच्या जवळ बसले...
आपल्या तक्रारी सांगितल्या...
आपल्या अडचणी मांडल्या...
बहिष्कार थांबवण्याची विनंती केली...
गांधी ऐकत राहिले...
त्यांनी या बद्दल दुःख व्यक्त केलं...
आणि त्या गिरणी कामगारांना सांगितलं की ते त्यांच्यावर प्रेम करतात...
पण ते म्हणाले..
“तुम्ही गरीब आहात, हे मला माहीत आहे.
पण माझ्या भारतातील लोक त्याहूनही खूप गरीब आहेत.
एखाद्या गरीबाच्या छातीवर पाय ठेवून त्याला महाग वस्तू खरेदी करायला आपण कसं भाग पाडू शकता?”
या संवादाने गिरणी कामगारांच्या महात्मा गांधींबाबतची मनातील कटुता नाहीशी झाली.
त्या गिरणी कामगारांच्या बायका त्यांना घेरून उभ्या राहिल्या...
त्यांच्याशी हसल्या, बोलल्या, खायला दिलं.
हसत, आशीर्वाद देत महात्मा गांधींनी त्यांना निरोप दिला.
दहा वर्षे ब्रिटिश वृत्तपत्रांनी तयार केलेला खलनायक,
तिथून संत बनून परतला.
●●
ब्रिटनला दिलासा मिळाला नाही.
पहिल्या महायुद्धानंतर पौंडाची किंमत टिकवण्यासाठी ब्रिटन आपला खजिना रिकामा करत होता.
त्यात 1929 ची महामंदी आली.
आणि भारत.. जो त्यांचा मुकुटमणी होता, सर्वात मोठा बाजार आणि उत्पन्नाचा स्रोत.. तोट्यात जात होता.
1935 च्या सुधारणा आल्या ...
प्रांतिक स्वायत्तता भारतीयांकडे दिल्या गेल्या.. .
पण हट्टी स्वभावाच्या महात्मा गांधींना पूर्ण स्वराज्य हवं होतं...
दुसरं महायुद्ध सुरू झालं.
ब्रिटनला भारत आणि काँग्रेसची मदत हवी होती.
महात्मा गांधींनी १९४२चे ‘भारत छोडो’ आंदोलन सुरू केलं.
युरोपमध्ये हिटलर, पूर्वेकडे जपानशी ब्रिटन अस्तित्वाची लढाई लढत होता.
आणि भारतात महात्मा गांधींचे लोक उठाव करत होते.
मुकुटमणी भारत, आता मुकुटावरचं ओझं बनला होता.
●●
हे सगळं झालं
अब्जावधी चरख्यांच्या फेऱ्यांमुळे,
महात्मा गांधींनी घडवलेलं...
मोहनकाका सारखे लोक म्हणतात स्वातंत्र्य चरख्यामुळे मिळालं नाही...
पण स्वातंत्र्य पिस्तुलामुळेही मिळालं नाही...
ते मिळालं..
संपूर्ण व्यवस्थेला दिलेल्या सततच्या विरोधामुळे,
चरख्याच्या फिरण्यामुळे,
मुठभर मिठामुळे,
आर्थिक पातळीवर दिलेल्या सातत्यपूर्ण आघातामुळे...
लाखो करोडो लोकांच्या छोट्या छोट्या योगदानामुळे...
https://www.facebook.com/share/1G5a98TFJj/
का का फॉची सुरुवातच
का का फॉची सुरुवातच कॉन्फिडन्टली चुकीची केलेली आहे.
परदेशी कपड्यांची होळी १९०५ साली सावरकरांनी फर्गसन कॉलेजमध्ये केली. गांधीजी तेव्हा दक्षिण आफ्रिकेत होते.
बाकी चरखा गांधीजींनी प्रसिद्ध केला आणि स्वदेशीचा वापर ही सामान्यातल्या सामान्य माणसालाही आपण स्वातंत्र्यासाठी काहीतरी करतोय असं समाधान देणारी गोष्ट होती याबद्दल काही विवाद नाही.
पण भारतातलं इंग्रजांचं उत्पन्न फक्त कापडाच्या विक्रीवर अवलंबून असायला ते काय फॅबइंडिया होते की काय?
बकरीच्या दुधाच्या चहाचं मधेच काय आणि?
माझेमन यांच्याशी सहमत, पण
माझेमन यांच्याशी सहमत, पण सिरीयस चर्चा इथे अस्थानी होईल
त्या पोस्टमधे चुका असल्या तरी ती जनरल सिरीयस पोस्ट आहे आणि काही खर्या गोष्टीही आहेत. इथे अफाट व लॉजिक रानोमाळ हरवलेल्या पोस्टी अपेक्षित आहेत 
Pages