चित्रपट कसा वाटला १२

Submitted by धनि on 4 August, 2025 - 10:36

२००० झाले पण Lol

मागचा धागा
https://www.maayboli.com/node/86233?page=66#new

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूर्ण करू शकलो नाही इतका भंगार आणि बकवास आहे
>>> म्हणून त्यांना फुगवलेले स्टॅटिस्टिक्स पब्लिश करून पॅनिक क्रिएट करावी लागली तर. आता पिक्चर तर पडेल पण पोलिस स्टेशनच्या चकरा मारत बसाव्या लागणार आहेत लेखकांना.

फुगवलेल्या स्टॅटिस्टिक्सवरून केरला स्टोरीला कोर्टाच्या चकरा पडल्या होत्या ते आठवलं. पण त्यांनी पैसे वसूल केले होते. फक्त केरळमध्ये तेवढा हा चित्रपट दणकून आपटला होता.

https://www.youtube.com/watch?v=LBEbnrH2HdM

ज्युरासिक पार्कची ही क्लिप समोर आली आणि पहिल्या भागाच्या आठवणी ताज्या झाल्या. खरंच हा चित्रपट अजरामर आहे. दुसरा भाग सुद्धा त्या प्रभावाखाली पाहिला. काही काही दृश्यात रिपीटेशन जाणवलं. पण तक्रारी नव्हत्या. ती कल्पना अजून तिसर्‍या भागात सुद्धा पाहिली. मग कंटाळा आला. लेटेस्ट तर बघवलाच नाही. आताही दोन तीन भाग आहेत, पण दर वेळी बघूनही क्लिक करवत नाही.

बंटी और बबलीची क्लिप पण अशीच समोर आलेली. शेवटी दुसर्‍या भागाची हिंट दिलेली. बरं झालं दुसरा भाग आला नाही. नाहीतर चव गेली असती. स्त्री च्य शेवटी दुसर्‍या भागाची हिंट होती. पण अजिबत जमला नाही दुसरा भाग. कहानीचं तेच.

पहिल्या भाग भन्नाट कल्पना असते. पॅशन असतं. जुनून (मराठीत काय ? ) असतो . पण दुसर्‍या भागात पहिल्या भागाचं ओझं असतं. धंदा असतो. हिंट दिल्याने दुसरा भाग बनवायचं प्रेशर असतं. तीच कल्पना पुढे नेताना पहिल्याइतके धक्के बसत नाहीत. फक्त प्पहिल्या भागाचं गिर्‍हाईक पैसा देईल एव्हढंच बघतात. पहिल्या पेक्षा दुसरा भाग चांगला किंवा त्याच्याइतकाच चांगला असं उदाहरण आहे का ?

एले - तुम्ही मधे बॉर्डर-२ बद्दल लिहीलं होतं ना? बहुधा तुमचीच पोस्ट होती. तेव्हा मी याच इफेक्टचे कारण दिले होते उत्सुकता नसण्याला.

पहिल्या पेक्षा चांगला होता का हे सब्जेक्टिव्ह असेल, पण किमान मुन्नाभाई एमबीबीस इतकाच चांगला लगे रहो मुन्नाभाई होता. ते एक उदाहरण लक्षात आहे. पण अपवादच असतील.

बरोबर. मुन्नाभाई सिरीज विसरलो होतो. हे दुर्मिळ उदाहरण आहे.

बॉर्डर २ नाही , गदर २ ने फसवलं असं वाटलं होतं. पण पब्लीक टाळ्या शिट्ट्या मारत होतं. त्यामुळं आपली आवड नमेकी कुठल्या कॅटॅगरीत बसते हेच समजेना.

ओ ते इंग्रजी झाले. एले बहुधा देशी पिक्चर्स बद्दल बोलत आहेत. आणि तेथे हे दुर्मिळच आहेत Happy इंग्रजीत दोन्ही प्रकारची भरपूर उदाहरणे आहेत. इण्डियाना जोन्स, मिशन इम्पॉसिबल, ओशन सिरीज, लॉर्ड ऑफ द रिंग्ज, स्टार वॉर्स ई. मला बघताना कंटाळा आला पण लोकप्रियतेवरून धरले तर मार्व्हल व डीसी वाले बरेच आहेत. ट्रान्सफॉर्मर्स ही आणखी तिसरीच फ्रॅण्चायजी असावी.

पहिल्याच्या लेव्हलला न आलेले ही आहेत - कार्स, फाइण्डिंग नीमो->डोरी, मास्क, डम्ब अ‍ॅण्ड डम्बर, मीट द पेरेण्ट्स ई.

जुरासिक सिरीज मात्र माझी खूप आवडती आहे. मी खूप वेळा पाहिले आहेत ते सगळे पिक्चर्स. सर्वात नवीन एकदाच पाहिला आहे - जुरासिक वर्ल्ड रिबर्थ. तो कायच्या काय आहे आणि एकूण उतरती कळा आहे हे बरोबर. तरी ख्रिस प्रॅट वाले दोन चांगले होते.

हो!
मराठीत असं एकतरी सिक्वेल चे उदाहरण आहे का? चांगलं वाईट राहू द्या. सिक्वेल आठवेना.
बाई पण भारी देवा, आणि बाई पण खूपच भारी देवा.. असं काही!
अरे आहेत! लांजेकरचा कचरा आठवला!

मराठीत सगळे सिक्वलच आहेत. छुपे असल्याने आपल्याला कळत नाही इतकंच.
उदा. हळद रूसली, कुंकू हसलं, हिरवं कुंकू, वहिनीच्या बांगड्या, भरला मळवट रक्ताने, थांब लक्ष्मी कुंकू लावते, कुंकू लावते माहेरचे, गृहलक्ष्मी - यातून बाहेर निघायचं नाही आणि स्वतःच पुन्हा "बंदिवान मी ह्या संसारी" म्हणायचं. हे अशे सिक्वेल आहेत ज्याचे ओरिजनल कधी आलेच नाही. Proud हे आपले डायनासोरच आहेत, ज्यांच्यावर उल्का पडलीच नाहीये.

बाई पण भारी देवा, आणि बाई पण खूपच भारी देवा.. असं काही! >>> Lol

मराठीत सगळे सिक्वलच आहेत. छुपे असल्याने आपल्याला कळत नाही इतकंच. >>> Lol

मराठीत पहिलाच धड निघायची मारामार Happy

लय भारीचा दुसरा भाग आला होता ना? लक्षात नाही. टाइमपासचाही आला होता बहुतेक. मला पहिलाही बकवास वाटला होता.

मुन्नाभाई पहिला ऑल टाईम ग्रेट मूवी होता.
जरी दुसरा त्यापेक्षा कमी भारी म्हटले तरी त्याच्या तोडीला काढणे हे कमाल होते.

हॅरी पॉटर मला पहिला भाग मी लहान असल्याने आवडला होता. नंतर बोअर होत गेलो आणि बघायचे सोडले. घरचे मात्र पारायणे करत लाऊन बसायचे त्यामुळे अध्येमध्ये नजर जायची. त्यांना वैतागून काही म्हटले की मग तू पुस्तक वाच पुस्तक वाच करायचे. बरे पुस्तके सुद्धा खर्चा करून आणली होती त्यांनी. पण ती इंग्लिश असल्याने माझ्या काहीच कामाची नव्हती. त्यामुळे थोडीशी चीडच येते कुठे हरी पॉटर हे नाव जरी वाचले तरी..

हे आपले डायनासोरच आहेत, ज्यांच्यावर उल्का पडलीच नाहीये. >>> १००++

तिकडे हिंदीतही सुरज बडजात्या प्रेम सिरीज आहे की. भाग्यश्रीचा मुलगा चित्रपटात येऊन पडला तरी सल्लूभाय प्रेम करतोच आहे.

हे आपले डायनासोरच आहेत, ज्यांच्यावर उल्का पडलीच नाहीये. >>
छुपे असल्याने आपल्याला कळत नाही इतकंच >> Lol
नवरा माझा नवसाचा. >> सही जवाब! हा एकदम फ्रँचायझी टाईप सिक्वेल आहे.

>>चीडच येते कुठे हरी पॉटर हे नाव जरी वाचले तरी. >> पुस्तके वाच. इंग्रजी नको तर मराठीतही आहेत, वाचायची नसतील तर ऐक. कधी ते माहित नाही, पण एक सिरीज पण येऊ घातली आहे. ती बघ. तुला आवडेल याची पूर्ण खात्री आहे तेव्हा वाचच.

हे आपले डायनासोरच आहेत, ज्यांच्यावर उल्का पडलीच नाहीये >>> Lol हे मस्त आहे. आता मराठी सिरीजमधूनही येतात.

पुस्तके वाच >> अरे याच वाक्याची जास्त चीड येते.
पिक्चर कधीतरी पहिल्या भागापासून बघायचे आहेत. कदाचित एखाद्या कलाकृती बाबत मनात उगाच अढी बसलेली असते त्यातलाही प्रकार असू शकतो. एक संधी पुन्हा जरूर द्यावी.

कारण पहिला भाग आवडलेला. आणि अजून एक goblet of fire अश्या नावाचा भाग एक्झामच्या आदल्या दिवशी थिएटरमध्ये बघायला गेलो असल्याने आवडलेला.

पण नंतर कुठल्या तरी भागात सगळे डार्क डार्क अंधाराचे सीन बघितले आणि त्यात आमच्या घरचे इंग्लिश मध्ये बघायचे त्यामुळेही असेल.. बघायला बोअर झाले आणि मनात अढी बसली.

हॅरी पॉटर मी पण पुस्तकं वाचायची टाळाटाळ केली होती, काय ते लहान पोरांचं वाचायचं म्हणून, दुसरं म्हणजे इंग्लीश ,हिंदी वाचताना एव्हढं कम्फर्टेबल नसतं. पण या सिरीजची तीन पुस्तकं वाचली आणि आपण फार काहीच्या काही मतं बनवून (पूर्वग्रह ?) चांगल्या मनोरंजनाला मुकतो हे लक्षात आलं.

नवरा माझा नवसाचा हा सिक्वेल आहे. पण तो थकलेल्यांचा दुसरा भाग आहे. लय भारीचा ऑफिशियल सिक्वेल नव्हता. कथानक वेगळं आणि माऊली नाव होतं.

हळद रूसली, कुंकू हसलं, हिरवं कुंकू, वहिनीच्या बांगड्या, भरला मळवट रक्ताने, थांब लक्ष्मी कुंकू लावते, कुंकू लावते माहेरचे, गृहलक्ष्मी >> हेच हिंदीत हरवले सापडले / बीस साल बाद बदला फ्रँचाईजीचे वेगवेगळे सिनेमे असायचे आता ते अधि़कृतपणे सिक्वेल म्हणून येऊ शकतात तर दुसर्‍या भागात कथाच वेगळी असते.

हाऊसफुल्ल, टाईमपास आणि नाना पाटेकर अनिल कपूर अक्षयकुमार ची सिरीज, गोलमाल या मी बघितल्या नाहीत. एखाद दुसरा भाग पाहिला असेल. ते तीन तासाचे स्कीट वाटतात.

हल्लीच रिलीज झाला

साडे माडे तीन चा सिक्वेल
पुन्हा एकदा साडे माडे तीन

काय योगायोग असतात हे आपण सोशल मीडीयावर म्हणू शकत नाही. कारण मायबोलीवर सिक्वेलची चर्चा सुरू झाली आणि हॉटस्टार वर "किस किस को प्यार करू " चा सिक्वेल आला पण. आता पर्यंत इथे कुणी लिंक दिली कि युट्यूबवर त्याच हिरो / हिरॉइनचे व्हिडीओ दिसत.

कपिल शर्मा हा मोहन शर्मा झालाय. त्याचं सानिया या मुसलमान मुलीवर प्रेम आहे. दोघांच्या घरून शादीला विरोध आहे. मोहनच्या घरच्यांनी मीराच्या वडलांना ती खानदानची बहू बनेल असा शब्द दिलाय. तर सानिया च्या घरच्यांनी मेहमूदला सानिया तुलाच मिळेल असा शद्ब दिलाय. मोहन सानियाच्या वडलांना गुपचूप भेटून मेहमूद बनायला तयार आहे असं सांगतो. तिकडे खरा मेहमूद काय करेल म्हणून तिचे वडील आधी नाही म्हणतात पण नंतर होकार देतात. सानियाला सर्प्राईज देऊ म्हणून मोहन हाच मेहमूद आहे हे सांगत नाहीत.

लग्न झाल्यावर कळतं कि सानिया पळून गेलीये आणि तिने तिच्या जागी रूहीला बसवलं होतं. आता सगळे म्हणतात कि हीच तुझी बायको. रूही म्हणते माझे तीन तीन तलाक झालेत आता जर तू तलाक दिलास तर मी ट्रेनखाली जीव देईन.

मोहन तिला थांबवतो. आणि बाहेर येऊन सानियाला फोन करत असतो इतक्यात त्याच्या डोक्यात दांडकं पडतं. तो बेशुद्ध होतो. सकाळी बघतो तर त्याची बायको म्हणून मीरा चहा घेऊन आलेली असते. मोहन ही काय भानगड विचारतो तर आई सांगते कि तू बेशुद्ध झाल्यावर तुला व्हीलचेअरवर बसवून सात फेरे घेतलेत. आता मीरच तुझी बायको. तेव्हां मोहन नकार देतो.आता मीरा ट्रेनखाली जीव द्यायची धमकी देते.

इकडे सानियाचा फोन येतो. ती गोव्याला जाऊन ख्रिश्चन झालेली असते आणि तिने मोहनचं मायकेल असं नाव चर्चमधे रजिस्टार केलेलं असतं. तिथे सामूदायिक विवाह असतो. गोव्याला ये म्हणून ती फोन कट करते कारण चालू राहिला तर घरचे ट्रेस करतील.

तो हबी नावाच्या सरदारजी मित्राला गोव्याचं तिकीट काढायला सांगतो. पण तो मोहनच्या घरच्यांच्या समोर पचकतो. ते मीराला पण गोव्याला घेऊन जा सांगतात. त्यानंतर तो सानियाच्या घरी जिथे रूही असते तिथे पोहोचतो. तो हात धुवायला जातो तेव्हां हबीचा फोन येतो.. हबीला वाटतं मीरा आहे म्हणून तो रूहीला सांगतो क तुमच्या दोघांची गोव्याची तिकीटं काढली आहेत.

आटा गोंधळ निस्तरण्यासाठी हबीने रूहीला घेऊन जायचं, मोहनने मीराला न्यायचं. आणि तिथे दोघींना हबीने सांभाळायचं आणि हा सानियाशी लग्न करणार असा प्लान असतो. पण कॅबवाला दोघींंना घेऊन नेमका त्याच चर्च मधे येतो. दोघींपासून लपण्यासाठी हा नॅन्सी नावाची संभाव्य वअस, तिचा नवरा लग्न न करता पळून गेल्याने बेशुद्ध पडलेली असते , तिला सीपीआर देतो. कारण दोघी तिथे पोहोचलेल्या असतात त्यांच्यापासून तोंड लपवण्यासाठी सीपीआर द्यावा लागतो. इकडे या दोघी कौतुकाने बघत असतात कि काही जोडपी कशी कुठेही सुरू होतात आणि आपल्या हजबंडने कसं किस सुद्धा नाही केलेलं. दोघींचं हे दु:खंही सेमच निघतं. त्या दोघी तिथेच उभ्या असल्याने त्याला नॅन्सी सोबत चर्च मधे जाऊन लग्न करावं लागतं. हे तिसरं लग्न होतं ..

इकडे हबी गोव्यात दोघींना घेऊन फिरत असतो आणि त्या दोघी त्याला हबी म्हणून हाक मारत असतात ते बघून बेटी बचाव समितीची बंगाली कार्यकर्ती " जेरेमी लिव्हर" हबी वर नजर ठेवू लागते. नॅन्सीशी लग्न झाल्यावर तिची आई हबीला सागते कि तू आता बेस्ट मॅन म्हणून तिला कार पर्यंत सोड. तो नॅन्सीला घेऊन कारकडे निघालेला असतो तेव्हां बेटी बचाव वाले म्हणतात तिसरं लग्न ? या सरदारला धडा शिकवायला पाहीजे....
तर असा चित्रपट बघण्यची तयारी असेल तर वेलकम टू तीन तासाचा कपिल शर्मा शो !

कपिल शर्मा शो च बरा आहे त्याच्या मुव्हिज पेक्षा..अपवाद त्याच्या मधे आलेल्या डिलिव्हरी बॉयच्या कॅरेक्टरचा मुव्हि होता त्याचा.

बाप रे किस किसको प्यार करू चा धांडोळा वाचताना दम लागला , उरलेला नंतर वाचते .

अस्मिता - तुझ्या कमेंट्स फार भारी आहेत , लय हासले .

या वीकेंडला हॅरी पॉटर सुरू केले आणि ब्रिंज watch करत एपिसोड बघावे तसे पाहिले तीन चित्रपट संपवून चौथा सुरू केला Happy

खरे तर आठच्या आठ संपवले असते जर क्रिकेट वर्ल्डकप सुरू झाला नसता किंवा बायकोपोरगी नसती.
कारण मी पहिल्यापासून सलग आठ बघणार आहे हे समजताच ते देखील इथून तिथून प्रकट झाले आणि तिघे एकत्र उपलब्ध असतानाच बघायचे असे ठरले आहे. तरी येत्या वीकेंडला संपवू.

ओवरऑल मजा येत आहे आणि महत्वाचे म्हणजे इमोशनली कनेक्ट सुद्धा होता येत आहे. त्यामुळे तिघे एकत्र उपलब्ध नसताना देखील मध्येच काही दुसरे बघावेसे वाटत नाहीये. छान झाले बघायला घेतले.

प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद !
पाच भाग संपवले आज !

घरीही पुस्तक वाचायचा सल्ला, अमुक तमुक कॅरेक्टर पुस्तकाशी compare कॉमेन्ट्री, आणि अध्येमध्ये मंत्रांचे डायलॉग ऐकावे लागतात. पण तेवढे चालवून घ्यावे लागते नाहीतर सस्पेन्स फोडायची धमकी मिळते Proud

तरीही पुस्तकाबाबत म्हणाल तर एखाद्या इंग्लिश बाईने ते लिहिताना भारतातल्या मराठी मिडीयममधील इंग्लिशमध्ये काठावर पास होणाऱ्या वाचकाला डोळ्यासमोर ठेवून लिहिले असेल याची शक्यता कमीच.. किंवा त्याचे सोपे इंग्लिश वर्जन आहे का कल्पना नाही. तरी एकदा पूर्ण सिरीज संपल्यावर पुस्तके चाळून बघेन नक्की. तेवढेच पैसे वसूल होतील समजून..

बाकी मी आजवर कुठलेच असे पुस्तक वाचले नाही ज्यावर चित्रपट सुद्धा बनला आहे. त्यामुळे जे लोक कुठल्याही चित्रपटापेक्षा पुस्तक भारी आहे असे डायलॉग मारतात ते नेहमी आपण पुस्तक सुद्धा वाचले आहे म्हणून फुशारकी मारत असतात असेही माझे एक पूर्वग्रहदूषित मत असते Happy

Pages