आताच ही पोस्ट धुरंदर धाग्यावर टाकली
>
धुरंदर नेटफ्लिक्स वर आला आहे. पण मला नाही वाटत मी त्यावर तो पुन्हा बघेन.
पहिले कारण म्हणजे या पिक्चरला फार रिपीट व्हॅल्यू आहे असे मला वाटत नाही.
दुसरे म्हणजे छोट्या पडद्यावर तो बोर होईल कारण जे सीन थिएटरमध्ये तेव्हाच्या मूडला बघायला छान वाटले त्यातील फोलपणा घरी उठून दिसेल.
जलजला'मधलं सोनं नंतर वसईच्या किल्ल्यात आणून ठेवलं असेल. >>> श्रद्धा
"अरे भाई ये वीरझारा क्या होता है? अंग्रेज लोग जब येरझारा घालते है. >>>>अगदी अगदी
मी पण इमॅजून पाहीलं
सोनं लुटायचा अजेंडा मिटिंग मध्ये येतो. ईष्ट इंड्या कंपनीचा पीएम गोल्ड माईन, फर्नेस वगैरे बोलणे चालू करतो >>>
हो तो कर्झन (आता पुन्हा बघावा लागेल ) विमानात बसताना म्हणतो , सायमन , डायर टुमने भौत अच्च्चा काम किया, सोना लुटा, ऐसे ही हम सोने लुटेंगे, मै तुमारा प्रमोशन कर दूंगा " ब्रिटीश एकमेकांशी तोडक्या मोडक्या हिंदीत का बोलतात ? ते काय मराठी लोक थोडीच आहेत आपसात हिइंदीत बोलायला.
माझे मन , संभा, सेपरेट धाग्यात सगळ्यांनी लिहूयात का ?
गेला महीनाभर फीड मधे फक्त धुरंधरच्या पोस्टी, व्हिडीओज येत होते. त्यामुळे अपेक्षा कुठच्या कुठे पोहोचल्या होत्या. आता बॉर्डर २ च्या बाबत तसेच होतेय. सेमच लोक आहेत दोन्हींकडे. म्हणून आता बॉर्डर थेटरमधे पाहणं रद्द केलंय. त्या ऐवजी मयसभा पाहीन पाहिला तर नाहीतर तो ही ओटीटीवरच.
'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर जिओ हॉटस्टारवर 'सर्वम माया' (Sarvam Maya) हा मूळचा मल्याळम सिनेमा बघण्याची शिफारस करतो! तो मराठी सहित सात भाषांत उपलब्ध असला तरी शक्यतो हिंदीत बघावा, मला एकदा बघायला चांगला वाटला आहे!
खूप काही अभिनव प्रयोग वगैरे ह्यात केलेला नाहीये पण बरेचसे मल्याळम चित्रपट चांगले असले तरी ते भयानक संथ असल्यामुळे (किंवा कळकट्ट पात्रांमुळे) कंटाळवाणे वाटतात तसे इथे होत नाही. त्यामुळे प्लेबॅक स्पीड न वाढवताही (गाणी पळवत) बघता येईल. आणि हो, ह्यातली 'माया''(रिया शिबू) कशी वाटली ते हा चित्रपट पाहिल्यास किंवा आधी पाहिला असल्यास अवश्य कळवा 🙂
Submitted by संजय भावे on 30 January, 2026 - 23:29
संजय भावे धन्यवाद. उद्या परवा दोन दिवस रेल्वे प्रवासात जाणार असल्यामुळे पाहण्यासारखे सगळे डाऊनलोड करतेय. सर्वम माया केला डालो. अजुन काही असतील
तर सुचवा.
@ साधना.
लगेच आठवलेले तीन चांगले चित्रपट आत्ता सांगतो, बाकी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरची 'हिस्ट्री' बघून त्यातले कुठले चांगले वाटले ते मग कळवतो 🙂
१) 'पासंगा-२' (Pasanga 2 - मूळचा तामिळ) ह्याची कथा पण चांगली आहे आणि सुरिया आणि अमला पॉल ची जोडी नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या भूमिकेत छान वाटली. (नर्मविनोदी, फील गुड मुव्ही, Child psychology)
हा सिनेमा 'अॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे.
२) 'हर दिन दिवाली' (Prati Roju Pandage - मूळचा तेलुगू) साई धरम तेज, राशी खन्ना आणि सत्यराज. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही)
हा हिंदीत 'अॅमेझॉन प्राईम (MX Player)' वर Free आणि 'युट्युब' वर आहे. पण जिओ हॉटस्टारवर फक्त तेलुगूत आहे.
३) 'श्रीनिवासा कल्याणम' (Srinivasa Kalyanam - मूळचा तेलुगू) नितीन आणि राशी खन्ना. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही)
हा हिंदीत 'अॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे.
हे तिन्ही चित्रपट मस्त आहेत पण ते अगदी नवीन नसल्याने कदाचित तुम्हीव आधी पाहिले असू शकतात.
Submitted by संजय भावे on 31 January, 2026 - 02:08
मराठी स्थळ चित्रपटात एक सीन होता. त्या हिरोईनचा प्रोफेसर लेक्चर देताना मोठमोठी आदर्शवादी तत्वे झाडतो पण प्रत्यक्षात स्वतःची वेळ आल्यावर मात्र जुनाट विचारांचा निघतो. तो सीन या चित्रपटावरून प्रेरित असावा असे वाटते. अश्या प्रेमातील फसवणुकीने सुरुवात होत पुढे जाऊन त्या मुलीचे दुसरीकडे लग्न ठरते. तिचा नवरा शांत, समजूतदार, प्रेमळ आणि जबाबदार व्यक्ती दाखवला आहे. पण ते लग्न ठरेपर्यंतच..
लग्नानंतर एका छोट्याशा कारणावरून तो तिच्यावर चिडतो आणि तिच्या एक कानफटात मारतो. पण मुळात तो प्रेमळ आणि समजूतदार असल्याने त्याच संध्याकाळी तिला सॉरी म्हणून पिक्चरला आणि डिनरला देखील घेऊन जातो.
आणि मग हे वारंवार आणि रोजच घडू लागते. कानाखाली खा, आणि भरपाई म्हणून बाहेर जेवून या. आणि यात माहेरचा काहीच सपोर्ट मिळत नाही. इतका मार तर चालतो म्हणतात.
आणि एके दिवशी कहाणीत ट्विस्ट येतो. तो मारायला जाणार इतक्यात ती त्याचा हात पकडते आणि त्याच्या छातीवर एक लाथ मारते. नवरा दहा बाय बारा फूट दूर जाऊन कोसळतो. ती हे ऑनलाइन बघून शिकली असते आणि घरी दिवस-रात्र याचा सराव केला असतो.
इथून पुढे पिक्चरच बदलतो. नवरा बायकोला दबकून राहतो आणि आपली पुरुषप्रधान सत्ता परत मिळवायला स्वतः देखील कराटे शिकायला लागतो. यात त्यांचे एक तुंबळ युद्ध देखील होते. ते सुद्धा विथ कॉमेन्ट्री. फार धमाल झाले आहे. त्यात कोण जिंकते आणि कोण हरते आणि त्याही पुढे चित्रपट कसा सरकतो, शेवट गोड होतो की रोमँटिक की फिल्मी की स्वाभिमानी वगैरे उत्तरे चित्रपटातच शोधा.
ता.क. – यात नवरा झालेला कलाकार Basil Joseph मस्त ऍक्टर आहे. बिलकुल हिरो मटेरियल वाटत नाही. पण फार सहज अभिनय करतो. आता याचे अजून चित्रपट शोधत आहे. कदाचित असेच हटके असतील. साऊथ डब चित्रपट बघायला सुरुवात केल्यापासून जणू एक नवे दालन उघडले आहे
माझा काका मयसभा पाहून आला काल. त्याला मायबोलीचं सदस्यत्व घे आणि फर्स्ट हॅण्ड लिही असा आग्रह केला होता. पण असो. त्याने खरडलेलं त्याच्या वतीने इथे सर्वांसाठी देतेय. (मी पाहिलेला नाही, मला माहीत नाही).
मयसभा हा तुंबाड पेक्षा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. तुंबाड मधे गोष्ट सांगण्याची दिग्दर्शकाची शैली आहे त्याच्या जवळ जाणारीच शैली आहे, पण सिनेमाची जातकुळी (जॉन्रा ) वेगळी आहे. हा सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. सॅम्युएल बेकेट किंवा आंद्रे तार्कोव्हस्की च्या नाटकाच्या शैलीशी मिळताजुळता आहे. त्यातही तार्कोव्हस्की च्या जास्त जवळ जातो पण तितकी खोली नाही.
हा एक प्रयोग आहे. इथे दिग्दर्शकाला चित्रपट चालवण्याचं टेन्शन नसतं. तो बस कलाकृती बनवत असतो. ती फसेल किंवा चांगली होईल याची त्याला चिंता नसते. असे झपाटलेले दिग्दर्शक पूर्वी असायचे. आताच्या काळात टाईम फ्रेम असल्याने कलाकारांच्या गैरहजेरीत सीन्स शूट केले जातात. त्यामुळे हकनाक सीजीआय चा वापर होतो. यामुळे पडद्यावरचा छायाप्रकाशाचा खेळ दुर्मिळ झाला आहे. सिनेमा म्हणजे कॅमेर्याची भाषा. तीच दुर्मिळ झाली आहे. हा अनुभव राही अनिल बर्वे देतो.
या प्रकारच्या मांडणीला आपण Surreal Cinema असं नाव देऊ. जुन्या काळात हा प्रकार होता.
Surreal म्हणजे वास्तवासारखं दिसतं ,पण वास्तवासारखं वाटत नाही . स्वप्न, भ्रम, प्रतीकं, रूपकं अशा तर्कबाह्य गोष्टी. मृगजळ आहे शब्द मराठीत. थोडक्यात तुम्ही पडद्यावर बघताय तेच आहे कि वेगळं हा विचार प्रेक्षकाला सुद्धा करावा लागणार आहे. त्यामुळे हा सर्वांसाठी नसलेला पिक्चर आहे. त्यामुळं कमर्शियल सिनेमा आवडणार्यांनी अजिबात वाट वाकडी करू नये.
हा अनुभव आहे. तो घ्यायचा असेल तर जा. यात भावनेचा कल्लोळ नाही, तुम्ही पात्रांशी कनेक्ट होत नाही. तुम्ही एका दृश्यात तटस्थ निरीक्षक म्हणून बसवलेले आहात. तुम्ही कुठेही सिनेमाच्या फ्लो मधे "आत" येत नाही आहात. दिग्दर्शक तुम्हाला कुठेच स्पून फीडींग करत नाही. तो तुम्हाला कामाला लावतो. ज्यांना ही सवय नाही त्यांना वेळ वाया गेला असे वाटेल.
इथे प्रेक्षक बुद्धीमान असणे नसणे याचा संबंध नाही. आवड आणि निवड महत्वाची. कुणाला आवाज मासिक वाचायला आवडते, कुणाला रहस्यकथा आवडतात, कुणाला धारपांच्या कथा आवडतात तर कुणाला नवल मधल्या गूढ कथा, संदेह कथा आवडतात कुणाला कूट कथा आवडतात. अशा हटके प्रकारासाठी नवल मासिक चालवले जात होते. राही बर्वे हा तसा माणूस आहे.
मयसभा हॉरर अजिबात नाही. तो थ्रिलर ही नाही. एका बंदीस्त जागेत मोजकी पात्रे आहेत. यात माणसांपेक्षा त्यांच्या भूमिका महत्वाच्या आहे. ४० किलो सोनं लपवलेलं आहे. लालसा इथेही आहे.
पण जे काही चालू आहे ते खरं आहे कि पात्राच्या डोक्यात चाललंय हे प्रेक्षकाला समजत नाही. क्लायमॅक्स कमर्शियलस पिक्चर सारखा नाही. त्यामुळे शेवटी हायपॉईण्ट येत नाही. हा निगेटिव्ह पॉईण्ट आहे. पण राही बर्वेचा हट्ट समजा .
सिनेमाचं नावच मयसभा आहे. म्हणजे दृष्टीभ्रम निर्माण करण्यात राही बर्वे यशस्वी ठरला आहे कि नाही हे महत्वाचं आहे.
काहीही सांगणे म्हणजे स्पॉयलर आहे. त्यामुळे अशा प्रकारचा चमत्कारिक सिनेमा आवडणार असेल, ९० मिनिटे बसण्याची क्षमता असेल तर अनुभव घ्या.
मयसभा पाहिला.
यंदाच्या पुणे फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या सिनेमाचा शो होता पण तेव्हा बघायचा राहून गेलेला तो आज बघितला.
राही अनिल बर्वेंची 'आदिमायेचे' म्हणून एक चांगली मराठी कादंबरी काही वर्षांपूर्वी वाचली होती, त्यातला काही भाग या सिनेमात आलेला आहे, हे बघतेवेळी आठवायला/ कळायला कळलं. अप्रूप वाटलं. (कादंबरीत एखादा प्रसंग वाचतेवेळी आपल्या मनात आपण जो सीन क्रिएट केलेला असतो, सिनेमात अभिनेता तोच प्रसंग सादर करतो तेव्हा त्याच्या ताकदीनुसार किती काय काय बदलून जातं. ही म्हणजे एकप्रकारची जादूच आहे म्हणायची. ती कादंबरी अजून एकदा चाळून बघावी लागेल.)
संपूर्ण सिनेमा एका भग्न थिएटरमध्ये घडतो. चार पात्रं, त्यांचे मनोव्यापार. अभिनय सगळ्यांचा उत्कृष्ट. सरप्राइज एलिमेंट्स एकदम ओरिजनल. अनावश्यक असं काहीही नाही. हळूहळू भिनत जाणारा सिनेमा, असा प्रकार.
जावेद जाफरींनी उभा केलेला 'परमेश्वर खन्ना' हा या सिनेमाचा सगळ्यात मोठ्ठा शॉक आहे. मन थाऱ्यावर नसलेली ही व्यक्तिरेखा आहे. ही सनकी व्यक्तिरेखा, तिचे विविध लेयर्स जाफरींनी फारच जबरदस्त रितीने सादर केले आहेत. या माणसात एवढं कॅलिबर आहे हे माहिती नव्हतं.
तर एकूण आवडलाच.
तेरे इश्क में - नेटफ्लिक्सवर. क्रीती सॅनन आणि धनुष, प्रकाश राज.
इतका वाह्यात, आचरट, अतिरंजित, महामूर्ख, हिंसक आणि कैच्याकै आहे की अजिबात बघू नका. एकतर धनुष आणि क्रीती जोडी म्हणून अजिबात चांगले दिसत नाहीयेत. तिचा बांधा, उंची आणि त्याची कुपोषित बारीक चण. ती सतत लखलखते याच्यासमोर, तो फारच कृश आणि निस्तेज दिसला आहे. तेही सोडून देऊ. पण कथानक अतिशय आचरट आणि विचित्र आहे. बऱ्याचदा विकृती, चुकीचे निर्णय, व्यसनं आणि हिंसा यांना ग्लोरिफाय केले आहे. क्रीती सायकॉलॉजीत डॉक्टरेट करण्यासाठी कॉलेजमधला सगळ्यात रागीट, उठसूठ बस जाळणारा, कुणालाही रक्तबंबाळ करणारा, व्हॅलेंटाईनला मुद्दाम आगी लावणारा एक समाजकंटक मुलगा स्वतःचा प्रॉजेक्ट म्हणून निवडते. तो सुधारला की तिला डॉक्टरेट मिळणार असते.
दोघांचे रूपच नाही तर क्लास, गुण, बुद्धी, शिक्षण, बॅकग्राऊंड यांत जमीन अस्मानचा फरक असतो. तो तिच्यावर भाळून तिचं ऐकत जातो. मारामारी कमी करतो म्हणजे तिची पीएचडी व्हावी. मुळात तो विकृतच आहे. त्याला सोडविण्यासाठी त्याचे बाबा नियमितपणे पोलिस स्टेशनमध्ये जाणं येणं करत असतात. ते इतके वारंवार की आपण मुलांना शाळेतून घेऊन येतो इतकं कॅज्युअल. तिला खुश करण्यासाठी तो एक दोनदा मार्टिन ल्युथर किंग की जय आणि महात्मा गांधी की जय म्हणून एक थापड खाऊन परत मारत नाही. मूर्खपणा १.
तरीही सगळे त्याला समजून घेऊन सांभाळून घेत असतात. अतिशय दरिद्री आणि नापाश्या असतो. तिच्या बाबाला IAS व्हायचं वचन देतो तेव्हा UPSC चा लॉंग फॉर्म Uttar Pradesh Secondary college म्हणतो, इतका ढ. पास व्हायला तीन वर्षे लागतात तोवर तिचं लग्नं ठरतं. तर तिच्या फियान्सेवर पेट्रोल टाकून धमक्या देत, पूर्ण तंबूला आग लाव, गोळाबारूद फेक करत असतो. तिचं प्रेम नसतंच त्याच्यावर. मग तिला तळतळाट दे वगैरे. महामूर्खपणा -२५. विकृती-१००.
ती तिकडे डॉक्टर झालेली असते. मग ह्याचा बाप याच्यासाठी तिच्याघरी लाचार होतो. स्वतःचा मुलगा नालायक आहे ते नाही पण तिच्या बापाला उद्दाम दाखवले आहे. बाप मरतो तर त्यातही दोष तिचाच. त्याचे अंत्यसंस्कार करायला जातो तर तिथला रॅंडम ब्राह्मण मुक्ती कधीही सहजासहजी मिळत नाही, तिला लाचार कर वगैरे उपदेश देतो. मुक्ती तिचं नाव आहे आणि कुठल्याकुठे enlightenment शी जोडले आहे. महामूर्खपणा - १५०
तिच्या लग्नात जाऊन तळतळाट देऊन अजून एकदा गोंधळ घालतो. तुला मुलगा झाला तर तुला कळेल प्यार में अपयशी मुलगोंकी आईबाबा होणे का दुःख क्या होता है. बोबडीच वळली कीबोर्डची. मग एकदम पायलट होतो. तोही हिंदुस्थान का नंबर एक. हा नक्कीच साऊथचा रिमेक असेल. चपलेने हाणावे एकेकाला.
मी मुद्दाम लिहितेय कारण तुम्हाला कळावे की किती दळभद्री आहे. अजून ऐका. मग ती सरदारजी नवऱ्यासोबत लग्न करत नाही आणि दारूडी होते. इतकी प्यायला लागते की cirrhosis of liver हा आजार होतो, तरीही थांबत नाही. नंतर ती प्रेग्नंट आहे हे कळतं तरीही दारूसिगारेट चालूच. नाकातोंडातून रक्त येते, तेव्हा पेट्रोल पिते. तिला पोटातील बाळाबद्दल काहीच वाटत नाही इतकी आत्मघातकी आहे.
महामूर्खपणा - २००, विकृती -१०००.
हा तोवर आयुष्यात कुठल्याकुठे जातो म्हणे आणि त्याच्या शापाने तिची ही गत होते. ती प्रेग्नंट सुद्धा त्याने तू झालीस तर तुला कळेल ( संदर्भ# वरचं बोबडी वाक्य) म्हणून झालेली असते. त्या सरदारजीला काहीच से नाही. मग ती मुलाला जन्म देताना मरते आणि हा तिला कसाबसा हॉस्पिटल मधे सोडून फायटर प्लेन मधे बसून पाकिस्तानी सबमरिनवर कामाकाझी - कामाकाझी खेळतो. तिला बाळ होतं ते सरदारजी बाबाला द्यायचं ठरतं. ती मरणार असतेच, म्हणून हाही शहीद होतो. इकडे तो काशीचा उपटसुंभ ब्राह्मण दोघांचं श्राद्ध करतो. हा त्याच्या प्रेमाचा विजय.
आता कळाले का, का नाही बघायचा?! वेळ वाचवल्याबद्दल प्रत्येकी अकरा - अकरा रूपयांचा लिफाफा पाठवा विपूत.
सर्वम माया (२०२५)
जियो हॉटस्टार
मल्याळम – हिंदी डबड
हिरो नास्तिक दाखवला आहे तर त्याचे बाबा पुजारी. त्यात याचे वडिलांशी काही कारणाने मतभेद आहेत. हा नास्तिक असल्याने पारंपारिक व्यवसाय सोडून आपल्यातील गिटार वाजवायच्या कलेला न्याय द्यायला स्ट्रगल करत आहे. वडिलांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून घरी येतो. पण स्ट्रगल चालू असल्याने खिशात पैसे नाहीत. मग नाईलाजाने पोटापाण्यासाठी टेम्पररी पुजारी बनतो.
पुढे एक घटना घडते आणि याला एका मुलीचे भूत दिसायला लागते. भूत सुंदर आणि प्रेमळ असते. फक्त एक गोची असते की तिला आपण जिवंतपणी कोण होतो हे काहीच आठवत नसते. मग हा तिच्या मुक्तीचे प्रयत्न करतो, तर ती याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवायला मदत करते. पण कुठलेही भुताखेताचे चमत्कार करून नाही तर केवळ एक मैत्रीण म्हणून त्याला समजून घेऊन, त्याला कॉन्फिडन्स देऊन. हाच चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे.
भूत सहृदयी असले की पिक्चर मनोरंजक वाटतोच. पण ते यात कुठेही उथळ होत नाही. किंबहुना इमोशनल अँगल फार छान जुळून आला आहे. दोघांतील नाते खुलताना मस्त दाखवले आहे. आपल्याला सुद्धा ते भूत हळूहळूच आवडायला लागते. तिला स्वतःचे आयुष्य न आठवणे याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. त्यामुळे शेवटाला मन भरून येणे आणि फील गुड वाटणे एकत्रच होते. यात जो एक गिटारचा पीस वाजतो तो फार आवडला. स्पेशली शेवटी वाजतो तेव्हा मनात उतरतो.
वर उल्लेख केलेला जय जय जय जय हे आणि हा सर्वम माया दोन्ही जरूर बघा. म्हटले तर दोघांचा जॉनर वेगळा आहे पण दोघांतील सकारात्मकता भावली
तेरे इश्क मे
अस्मिता +७८६
फारच इंटेन्स लव्हस्टोरी आहे. ती तशीच लेखणीतून उतरावी म्हणून दारू पिऊन पटकथा लिहिली आहे. आणि ते समर्थपणे पेलू शकेल अश्या धनुषला कास्ट केले आहे. आणि कृतीची निवड यासाठीच केली आहे की दोघांतील फरक जास्तीत जास्त ठळक व्हावा.
तिचा चित्रपटात एक अतिशय युनिक डायलॉग आहे,
हम जैसे लडकीयोंका यही प्रॉब्लेम होता है. हम सपनो का राजकुमार धुंडते है. कोई मजदुर नही.. और जब हमे वो राजकुमार मिल जाता है तो हमे ऊस मे वो नमक नही दिखाई देता. जो नमक हमे मजदूर के पसीने मे दिखता है..
हेच चित्रपटाचे सार आहे!
अरे हो ऋ , तो "नमक" वाला संवाद राहिलाच. पण तेही हिंसेला ग्लोरिफाय करण्यासाठीच आहे. तो फक्त गरीब नाही, तो अतिशय हिंसक वृत्तीचा आहे. मग त्यात त्याला समजून घेताना कमी पडण्याची अपराधी भावना का ? विचित्रच वाटलं तेही. वेगवेगळ्या संवादातून सगळे अधोरेखित केले आहे पण तिचं त्याच्यावर प्रेम नाही आणि त्याची गुन्हेगारी वृत्ती आहे त्याचं काहीच नाही. त्यात त्याला शिक्षा होतानाही दिसत नाही. त्यामुळे फार खटकले. वर त्याला पायलट करून शहीद हिरो केले आहे तेही. मला संपूर्ण चित्रपटाचाच राग आला आहे.
मूर्खपणा -> महामूर्खपणा -> विकृती - हे रँकिंग धमाल आहे
हा नक्कीच साऊथचा रिमेक असेल. चपलेने हाणावे एकेकाला. >>> इथे वैताग टोकाला पोहोचलेला जाणवतोय. सहसा तेलुगु पिक्चरमधे असला आचरटपणा ग्लोरिफाय केलेला असतो. धनुषचा असेल तर तमिळ असेल मूळचा. तेथे इतके असते का माहीत नाही.
तिला खुश करण्यासाठी तो एक दोनदा मार्टिन ल्युथर किंग की जय आणि महात्मा गांधी की जय >>> अरे एकदा गांधी म्हंटले की मार्टिन ल्यूथर किंग त्यात कव्हर झाला की.
क्रीती सायकॉलॉजीत डॉक्टरेट करण्यासाठी कॉलेजमधला >>> हे ११ वी ते डॉक्टरेट सगळे एकाच ठिकाणी असलेले कॉलेज कोणते असावे?
हिंदुस्थानका नंबर वन पायलट वाचल्यावर तर फुटलो. असे सगळ्या प्रोफेशन्स मधे नॅशनल रँकिंग असते का? महसूल अधिकारी नं १, कृषि उत्पन्न बाजर समिती उपसभापती नं १, हिंदुस्थानचा नं १ आमदार वगैरे.
बाकी टेम्परामेण्टच्या दृष्टीने त्या कॅरेक्टरला आदर्श प्रोफेशन पायलट आहे! आणि तो कमर्शियल पायलट होतो की असल्या नगाला मिलिटरीत घेतात?
लग्नही करत नाही आणि दारूही प्यायला लागते, ते ही हा पायलट झालेला असताना. लॉजिक रानोमाळ हरवेलेले दिसते. हा बकवास आहे तर आता पायलट झालाय. तिला याच्यात इंटरेस्ट नाही तर लग्न कशाला मोडले. आणि लग्न मोडले तर मग दारू कशाला प्यायला लागली.
पिक्चरमधे हीरोला व्हिलनला मारायला इतर लोक मदत करतात. इथे उलटेच दिसते.
तिचे याच्यावर प्रेम नाही इथेच विषय संपला. त्या रोलमधे हीरो आहे म्हणून त्याचे कारनामे ग्लोरिफाय करणे वगैरे ही सडक्या डोक्याची कामे आहेत.
हो, ते नमक मी उपरोधानेच लिहिले होते.
नमक असे असेल तर आमच्या शाहरुखच्या अळणी लव्हस्टोरीच बऱ्या
बाकी चुकीच्या गोष्टींना ग्लोरिफाय केलेच आहे.
मी आला तेव्हाच बघितलेला पण कोणाला सांगावेसे वाटले नाही
कृती आवडत असली तरी हा धनुषसाठी बघितला होता. त्याचे काम नेहमी भारी असते. वाह्यात तर चित्रपट निघाला.
त्याचे असे आकाशातले विमान बघून डायरेक्ट पायलट होणे पाहिले आणि जब तक है जान आठवला होता. पण तरी ते ठीक आहे. अतर्क्य गोष्टी असायला हरकत नसावी. वाह्यात नसाव्यात. प्रेमाच्या नावावर तर बिलकुल नसाव्यात.
हम जैसे लडकीयोंका यही प्रॉब्लेम होता है. हम सपनो का राजकुमार धुंडते है. कोई मजदुर नही.. और जब हमे वो राजकुमार मिल जाता है तो हमे ऊस मे वो नमक नही दिखाई देता. जो नमक हमे मजदूर के पसीने मे दिखता है..
हेच चित्रपटाचे सार आहे!
>>> हे सार कसे काय? या संवादाचा आणि पिक्चरच्या स्टोरीचा काहीच संबंध दिसत नाहीये.
ऋ , अगदी. विचित्र आणि विकृत कथानक आहे. ही लव्ह स्टोरी नाहीच. आत्मघातकी आहेत दोघेही.
फा,
कृषि उत्पन्न बाजर समिती उपसभापती नं १, >>>
११ वी ते डॉक्टरेट सगळे एकाच ठिकाणी असलेले कॉलेज कोणते असावे >>> तिथला प्राचार्य सुद्धा जोकर वाटतो. तोही ह्याला घाबरून असतो.
हीरो आहे म्हणून त्याचे कारनामे ग्लोरिफाय करणे वगैरे ही सडक्या डोक्याची कामे आहेत. >>> अनुमोदन. असे हिरो नसलेलेच बरे, सगळेच हुकलेल्या हिरोसाठी आधी एकदम हुशार असलेली हिरोईन सुद्धा हुकत, हुकत जाते. मग दोघेही पूर्ण हुकून एकाच पेजवर येऊन एकदाचे मरून जातात. कैच्याकै!
मला प्रेग्नंट व लिव्हरचा आजार असलेल्या स्त्रीने दारू प्यायलेली दाखवल्याने, नंतर पेट्रोल प्यायल्याने, ब्लास्ट मधे अडकल्याने, पोटावर दाब येत असताना त्याला लोटांगण घालून "माझ्यासोबत राहा" अशा विनवणी करताना खालून सगळे रक्त येऊन कपडे ओलेचिंब झालेले पाहून - अतिशय चिडचिड झाली. खालून काही नोट आलेली दिसली नाही, प्रेक्षकांसाठी. हे असे करणं धोक्याचे आहे वगैरे.
तो "नमक" वाला संवाद म्हणजे मी मोठ्या घरची असल्याने तुझा कष्टकरी "स्वर्गीय प्यार" समजू शकले नाही असे काहीतरी. सरदारजी एकदम सज्जन व सुसंस्कृत होता त्याच्यात तिला ते घाम येणारे कष्टकरी "नमक इस्क"का सापडले नाही. लेकरू त्याचेच बरे. मीठ मात्र याचं. असे हे पश्चात्तापदग्ध वगैरे. त्यामुळे तर नक्कीच साऊथचा रिमेक वाटतो. तेथे काही तरी विकृत करून ग्लोरिफाय करतात आणि स्त्री प्रेक्षकांना ऑकवर्ड करणारी हीन भावना व पुरूष हिरोला देवत्व देण्याची काही तरी परंपरा आहे.
चिकवावेड्या मुलामुलींना सूचना
चिकवावेड्या मुलामुलींना सूचना 'धुरंधर' नेटफ्लिक्सवर आला आहे. मी स्वतः 'धु' देऊन खात्री करून घेतली आहे. लाभ घ्यावा!
माम
माम

एकदा बघितला आवडला झालं. परत
एकदा बघितला आवडला झालं. परत नाही बघायचा पेशंस!
हो, मलाही तसंच वाटतंय - शिवाय
हो, मलाही तसंच वाटतंय - शिवाय लहान स्क्रीनवर बोअर होईल अशीही शंका आहे मला.
)
(पण मुलगी म्हटल्याबद्दल थ्यांक्यू आणि इश्शं!
त्याच्यामुळे इग्नोअर पण करता
त्याच्यामुळे इग्नोअर पण करता येत नाहीये. दखल घ्यावीच लागतेय.
मला आवडेल बघायला परत. सलग
मला आवडेल बघायला परत. सलग बघेन असे नाही पण इंटरेस्ट आहेच.
आताच ही पोस्ट धुरंदर धाग्यावर
आताच ही पोस्ट धुरंदर धाग्यावर टाकली
>
धुरंदर नेटफ्लिक्स वर आला आहे. पण मला नाही वाटत मी त्यावर तो पुन्हा बघेन.
पहिले कारण म्हणजे या पिक्चरला फार रिपीट व्हॅल्यू आहे असे मला वाटत नाही.
दुसरे म्हणजे छोट्या पडद्यावर तो बोर होईल कारण जे सीन थिएटरमध्ये तेव्हाच्या मूडला बघायला छान वाटले त्यातील फोलपणा घरी उठून दिसेल.
जलजला'मधलं सोनं नंतर वसईच्या
जलजला'मधलं सोनं नंतर वसईच्या किल्ल्यात आणून ठेवलं असेल. >>> श्रद्धा
"अरे भाई ये वीरझारा क्या होता है? अंग्रेज लोग जब येरझारा घालते है. >>>>अगदी अगदी
मी पण इमॅजून पाहीलं
सोनं लुटायचा अजेंडा मिटिंग मध्ये येतो. ईष्ट इंड्या कंपनीचा पीएम गोल्ड माईन, फर्नेस वगैरे बोलणे चालू करतो >>>
हो तो कर्झन (आता पुन्हा बघावा लागेल ) विमानात बसताना म्हणतो , सायमन , डायर टुमने भौत अच्च्चा काम किया, सोना लुटा, ऐसे ही हम सोने लुटेंगे, मै तुमारा प्रमोशन कर दूंगा " ब्रिटीश एकमेकांशी तोडक्या मोडक्या हिंदीत का बोलतात ? ते काय मराठी लोक थोडीच आहेत आपसात हिइंदीत बोलायला.
माझे मन , संभा, सेपरेट धाग्यात सगळ्यांनी लिहूयात का ?
मोहब्बते च्या सगळ्या पोस्टी
मोहब्बते च्या सगळ्या पोस्टी

साधना >> घराचं डिझाईन
गेला महीनाभर फीड मधे फक्त
गेला महीनाभर फीड मधे फक्त धुरंधरच्या पोस्टी, व्हिडीओज येत होते. त्यामुळे अपेक्षा कुठच्या कुठे पोहोचल्या होत्या. आता बॉर्डर २ च्या बाबत तसेच होतेय. सेमच लोक आहेत दोन्हींकडे. म्हणून आता बॉर्डर थेटरमधे पाहणं रद्द केलंय. त्या ऐवजी मयसभा पाहीन पाहिला तर नाहीतर तो ही ओटीटीवरच.
>>>"माझे मन , संभा, सेपरेट
>>>"माझे मन , संभा, सेपरेट धाग्यात सगळ्यांनी लिहूयात का ?">>>
नेकी और पुछ पुछ... 😀
जरुर लिहुयात!
'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत
'फील गुड' मुव्हीज बघायला आवडत असतील तर जिओ हॉटस्टारवर 'सर्वम माया' (Sarvam Maya) हा मूळचा मल्याळम सिनेमा बघण्याची शिफारस करतो! तो मराठी सहित सात भाषांत उपलब्ध असला तरी शक्यतो हिंदीत बघावा, मला एकदा बघायला चांगला वाटला आहे!
खूप काही अभिनव प्रयोग वगैरे ह्यात केलेला नाहीये पण बरेचसे मल्याळम चित्रपट चांगले असले तरी ते भयानक संथ असल्यामुळे (किंवा कळकट्ट पात्रांमुळे) कंटाळवाणे वाटतात तसे इथे होत नाही. त्यामुळे प्लेबॅक स्पीड न वाढवताही (गाणी पळवत) बघता येईल. आणि हो, ह्यातली 'माया''(रिया शिबू) कशी वाटली ते हा चित्रपट पाहिल्यास किंवा आधी पाहिला असल्यास अवश्य कळवा 🙂
संजय भावे धन्यवाद. उद्या
संजय भावे धन्यवाद. उद्या परवा दोन दिवस रेल्वे प्रवासात जाणार असल्यामुळे पाहण्यासारखे सगळे डाऊनलोड करतेय. सर्वम माया केला डालो. अजुन काही असतील
तर सुचवा.
@ साधना.
@ साधना.
लगेच आठवलेले तीन चांगले चित्रपट आत्ता सांगतो, बाकी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरची 'हिस्ट्री' बघून त्यातले कुठले चांगले वाटले ते मग कळवतो 🙂
१) 'पासंगा-२' (Pasanga 2 - मूळचा तामिळ) ह्याची कथा पण चांगली आहे आणि सुरिया आणि अमला पॉल ची जोडी नेहमीपेक्षा अगदी वेगळ्या भूमिकेत छान वाटली. (नर्मविनोदी, फील गुड मुव्ही, Child psychology)
हा सिनेमा 'अॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे.
२) 'हर दिन दिवाली' (Prati Roju Pandage - मूळचा तेलुगू) साई धरम तेज, राशी खन्ना आणि सत्यराज. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही)
हा हिंदीत 'अॅमेझॉन प्राईम (MX Player)' वर Free आणि 'युट्युब' वर आहे. पण जिओ हॉटस्टारवर फक्त तेलुगूत आहे.
३) 'श्रीनिवासा कल्याणम' (Srinivasa Kalyanam - मूळचा तेलुगू) नितीन आणि राशी खन्ना. (फॅमिली व्हॅल्यूज, फील गुड मुव्ही)
हा हिंदीत 'अॅमेझॉन प्राईम' आणि 'युट्युब' वर आहे.
हे तिन्ही चित्रपट मस्त आहेत पण ते अगदी नवीन नसल्याने कदाचित तुम्हीव आधी पाहिले असू शकतात.
जय जय जय जय हे
जय जय जय जय हे
जियो हॉटस्टार – ओरिजनल मल्याळम – हिंदी डबड
धमाल आणि हटके चित्रपट आहे.
मराठी स्थळ चित्रपटात एक सीन होता. त्या हिरोईनचा प्रोफेसर लेक्चर देताना मोठमोठी आदर्शवादी तत्वे झाडतो पण प्रत्यक्षात स्वतःची वेळ आल्यावर मात्र जुनाट विचारांचा निघतो. तो सीन या चित्रपटावरून प्रेरित असावा असे वाटते. अश्या प्रेमातील फसवणुकीने सुरुवात होत पुढे जाऊन त्या मुलीचे दुसरीकडे लग्न ठरते. तिचा नवरा शांत, समजूतदार, प्रेमळ आणि जबाबदार व्यक्ती दाखवला आहे. पण ते लग्न ठरेपर्यंतच..
लग्नानंतर एका छोट्याशा कारणावरून तो तिच्यावर चिडतो आणि तिच्या एक कानफटात मारतो. पण मुळात तो प्रेमळ आणि समजूतदार असल्याने त्याच संध्याकाळी तिला सॉरी म्हणून पिक्चरला आणि डिनरला देखील घेऊन जातो.
आणि मग हे वारंवार आणि रोजच घडू लागते. कानाखाली खा, आणि भरपाई म्हणून बाहेर जेवून या. आणि यात माहेरचा काहीच सपोर्ट मिळत नाही. इतका मार तर चालतो म्हणतात.
आणि एके दिवशी कहाणीत ट्विस्ट येतो. तो मारायला जाणार इतक्यात ती त्याचा हात पकडते आणि त्याच्या छातीवर एक लाथ मारते. नवरा दहा बाय बारा फूट दूर जाऊन कोसळतो. ती हे ऑनलाइन बघून शिकली असते आणि घरी दिवस-रात्र याचा सराव केला असतो.
इथून पुढे पिक्चरच बदलतो. नवरा बायकोला दबकून राहतो आणि आपली पुरुषप्रधान सत्ता परत मिळवायला स्वतः देखील कराटे शिकायला लागतो. यात त्यांचे एक तुंबळ युद्ध देखील होते. ते सुद्धा विथ कॉमेन्ट्री. फार धमाल झाले आहे. त्यात कोण जिंकते आणि कोण हरते आणि त्याही पुढे चित्रपट कसा सरकतो, शेवट गोड होतो की रोमँटिक की फिल्मी की स्वाभिमानी वगैरे उत्तरे चित्रपटातच शोधा.
ता.क. – यात नवरा झालेला कलाकार Basil Joseph मस्त ऍक्टर आहे. बिलकुल हिरो मटेरियल वाटत नाही. पण फार सहज अभिनय करतो. आता याचे अजून चित्रपट शोधत आहे. कदाचित असेच हटके असतील. साऊथ डब चित्रपट बघायला सुरुवात केल्यापासून जणू एक नवे दालन उघडले आहे
संजय भावे धन्यवाद. तिनही
संजय भावे धन्यवाद. तिनही डालो करुन ठेवलेत.
सभा - धन्यवाद रेकोज साठी.
सभा - धन्यवाद रेकोज साठी.
माझा काका मयसभा पाहून आला काल
माझा काका मयसभा पाहून आला काल. त्याला मायबोलीचं सदस्यत्व घे आणि फर्स्ट हॅण्ड लिही असा आग्रह केला होता. पण असो. त्याने खरडलेलं त्याच्या वतीने इथे सर्वांसाठी देतेय. (मी पाहिलेला नाही, मला माहीत नाही).
मयसभा हा तुंबाड पेक्षा पूर्णपणे वेगळा सिनेमा आहे. तुंबाड मधे गोष्ट सांगण्याची दिग्दर्शकाची शैली आहे त्याच्या जवळ जाणारीच शैली आहे, पण सिनेमाची जातकुळी (जॉन्रा ) वेगळी आहे. हा सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. सॅम्युएल बेकेट किंवा आंद्रे तार्कोव्हस्की च्या नाटकाच्या शैलीशी मिळताजुळता आहे. त्यातही तार्कोव्हस्की च्या जास्त जवळ जातो पण तितकी खोली नाही.
हा एक प्रयोग आहे. इथे दिग्दर्शकाला चित्रपट चालवण्याचं टेन्शन नसतं. तो बस कलाकृती बनवत असतो. ती फसेल किंवा चांगली होईल याची त्याला चिंता नसते. असे झपाटलेले दिग्दर्शक पूर्वी असायचे. आताच्या काळात टाईम फ्रेम असल्याने कलाकारांच्या गैरहजेरीत सीन्स शूट केले जातात. त्यामुळे हकनाक सीजीआय चा वापर होतो. यामुळे पडद्यावरचा छायाप्रकाशाचा खेळ दुर्मिळ झाला आहे. सिनेमा म्हणजे कॅमेर्याची भाषा. तीच दुर्मिळ झाली आहे. हा अनुभव राही अनिल बर्वे देतो.
या प्रकारच्या मांडणीला आपण Surreal Cinema असं नाव देऊ. जुन्या काळात हा प्रकार होता.
Surreal म्हणजे वास्तवासारखं दिसतं ,पण वास्तवासारखं वाटत नाही . स्वप्न, भ्रम, प्रतीकं, रूपकं अशा तर्कबाह्य गोष्टी. मृगजळ आहे शब्द मराठीत. थोडक्यात तुम्ही पडद्यावर बघताय तेच आहे कि वेगळं हा विचार प्रेक्षकाला सुद्धा करावा लागणार आहे. त्यामुळे हा सर्वांसाठी नसलेला पिक्चर आहे. त्यामुळं कमर्शियल सिनेमा आवडणार्यांनी अजिबात वाट वाकडी करू नये.
हा अनुभव आहे. तो घ्यायचा असेल तर जा. यात भावनेचा कल्लोळ नाही, तुम्ही पात्रांशी कनेक्ट होत नाही. तुम्ही एका दृश्यात तटस्थ निरीक्षक म्हणून बसवलेले आहात. तुम्ही कुठेही सिनेमाच्या फ्लो मधे "आत" येत नाही आहात. दिग्दर्शक तुम्हाला कुठेच स्पून फीडींग करत नाही. तो तुम्हाला कामाला लावतो. ज्यांना ही सवय नाही त्यांना वेळ वाया गेला असे वाटेल.
इथे प्रेक्षक बुद्धीमान असणे नसणे याचा संबंध नाही. आवड आणि निवड महत्वाची. कुणाला आवाज मासिक वाचायला आवडते, कुणाला रहस्यकथा आवडतात, कुणाला धारपांच्या कथा आवडतात तर कुणाला नवल मधल्या गूढ कथा, संदेह कथा आवडतात कुणाला कूट कथा आवडतात. अशा हटके प्रकारासाठी नवल मासिक चालवले जात होते. राही बर्वे हा तसा माणूस आहे.
मयसभा हॉरर अजिबात नाही. तो थ्रिलर ही नाही. एका बंदीस्त जागेत मोजकी पात्रे आहेत. यात माणसांपेक्षा त्यांच्या भूमिका महत्वाच्या आहे. ४० किलो सोनं लपवलेलं आहे. लालसा इथेही आहे.
पण जे काही चालू आहे ते खरं आहे कि पात्राच्या डोक्यात चाललंय हे प्रेक्षकाला समजत नाही. क्लायमॅक्स कमर्शियलस पिक्चर सारखा नाही. त्यामुळे शेवटी हायपॉईण्ट येत नाही. हा निगेटिव्ह पॉईण्ट आहे. पण राही बर्वेचा हट्ट समजा .
सिनेमाचं नावच मयसभा आहे. म्हणजे दृष्टीभ्रम निर्माण करण्यात राही बर्वे यशस्वी ठरला आहे कि नाही हे महत्वाचं आहे.
काहीही सांगणे म्हणजे स्पॉयलर आहे. त्यामुळे अशा प्रकारचा चमत्कारिक सिनेमा आवडणार असेल, ९० मिनिटे बसण्याची क्षमता असेल तर अनुभव घ्या.
माझेमन, हॉवर्ड रोआकचा उल्लेख
माझेमन, हॉवर्ड रोआकचा उल्लेख वाचून छान वाटलं. कॉलेजला असताना फाऊंटनहेड वाचलं होतं.
मयसभा पाहिला.
मयसभा पाहिला.
यंदाच्या पुणे फिल्म फेस्टिव्हल्समध्ये या सिनेमाचा शो होता पण तेव्हा बघायचा राहून गेलेला तो आज बघितला.
राही अनिल बर्वेंची 'आदिमायेचे' म्हणून एक चांगली मराठी कादंबरी काही वर्षांपूर्वी वाचली होती, त्यातला काही भाग या सिनेमात आलेला आहे, हे बघतेवेळी आठवायला/ कळायला कळलं. अप्रूप वाटलं. (कादंबरीत एखादा प्रसंग वाचतेवेळी आपल्या मनात आपण जो सीन क्रिएट केलेला असतो, सिनेमात अभिनेता तोच प्रसंग सादर करतो तेव्हा त्याच्या ताकदीनुसार किती काय काय बदलून जातं. ही म्हणजे एकप्रकारची जादूच आहे म्हणायची. ती कादंबरी अजून एकदा चाळून बघावी लागेल.)
संपूर्ण सिनेमा एका भग्न थिएटरमध्ये घडतो. चार पात्रं, त्यांचे मनोव्यापार. अभिनय सगळ्यांचा उत्कृष्ट. सरप्राइज एलिमेंट्स एकदम ओरिजनल. अनावश्यक असं काहीही नाही. हळूहळू भिनत जाणारा सिनेमा, असा प्रकार.
जावेद जाफरींनी उभा केलेला 'परमेश्वर खन्ना' हा या सिनेमाचा सगळ्यात मोठ्ठा शॉक आहे. मन थाऱ्यावर नसलेली ही व्यक्तिरेखा आहे. ही सनकी व्यक्तिरेखा, तिचे विविध लेयर्स जाफरींनी फारच जबरदस्त रितीने सादर केले आहेत. या माणसात एवढं कॅलिबर आहे हे माहिती नव्हतं.
तर एकूण आवडलाच.
तेरे इश्क में - नेटफ्लिक्सवर.
तेरे इश्क में - नेटफ्लिक्सवर. क्रीती सॅनन आणि धनुष, प्रकाश राज.
इतका वाह्यात, आचरट, अतिरंजित, महामूर्ख, हिंसक आणि कैच्याकै आहे की अजिबात बघू नका. एकतर धनुष आणि क्रीती जोडी म्हणून अजिबात चांगले दिसत नाहीयेत. तिचा बांधा, उंची आणि त्याची कुपोषित बारीक चण. ती सतत लखलखते याच्यासमोर, तो फारच कृश आणि निस्तेज दिसला आहे. तेही सोडून देऊ. पण कथानक अतिशय आचरट आणि विचित्र आहे. बऱ्याचदा विकृती, चुकीचे निर्णय, व्यसनं आणि हिंसा यांना ग्लोरिफाय केले आहे. क्रीती सायकॉलॉजीत डॉक्टरेट करण्यासाठी कॉलेजमधला सगळ्यात रागीट, उठसूठ बस जाळणारा, कुणालाही रक्तबंबाळ करणारा, व्हॅलेंटाईनला मुद्दाम आगी लावणारा एक समाजकंटक मुलगा स्वतःचा प्रॉजेक्ट म्हणून निवडते. तो सुधारला की तिला डॉक्टरेट मिळणार असते.
दोघांचे रूपच नाही तर क्लास, गुण, बुद्धी, शिक्षण, बॅकग्राऊंड यांत जमीन अस्मानचा फरक असतो. तो तिच्यावर भाळून तिचं ऐकत जातो. मारामारी कमी करतो म्हणजे तिची पीएचडी व्हावी. मुळात तो विकृतच आहे. त्याला सोडविण्यासाठी त्याचे बाबा नियमितपणे पोलिस स्टेशनमध्ये जाणं येणं करत असतात. ते इतके वारंवार की आपण मुलांना शाळेतून घेऊन येतो इतकं कॅज्युअल. तिला खुश करण्यासाठी तो एक दोनदा मार्टिन ल्युथर किंग की जय आणि महात्मा गांधी की जय म्हणून एक थापड खाऊन परत मारत नाही. मूर्खपणा १.
तरीही सगळे त्याला समजून घेऊन सांभाळून घेत असतात. अतिशय दरिद्री आणि नापाश्या असतो. तिच्या बाबाला IAS व्हायचं वचन देतो तेव्हा UPSC चा लॉंग फॉर्म Uttar Pradesh Secondary college म्हणतो, इतका ढ. पास व्हायला तीन वर्षे लागतात तोवर तिचं लग्नं ठरतं. तर तिच्या फियान्सेवर पेट्रोल टाकून धमक्या देत, पूर्ण तंबूला आग लाव, गोळाबारूद फेक करत असतो. तिचं प्रेम नसतंच त्याच्यावर. मग तिला तळतळाट दे वगैरे. महामूर्खपणा -२५. विकृती-१००.
ती तिकडे डॉक्टर झालेली असते. मग ह्याचा बाप याच्यासाठी तिच्याघरी लाचार होतो. स्वतःचा मुलगा नालायक आहे ते नाही पण तिच्या बापाला उद्दाम दाखवले आहे. बाप मरतो तर त्यातही दोष तिचाच. त्याचे अंत्यसंस्कार करायला जातो तर तिथला रॅंडम ब्राह्मण मुक्ती कधीही सहजासहजी मिळत नाही, तिला लाचार कर वगैरे उपदेश देतो. मुक्ती तिचं नाव आहे आणि कुठल्याकुठे enlightenment शी जोडले आहे. महामूर्खपणा - १५०
तिच्या लग्नात जाऊन तळतळाट देऊन अजून एकदा गोंधळ घालतो. तुला मुलगा झाला तर तुला कळेल प्यार में अपयशी मुलगोंकी आईबाबा होणे का दुःख क्या होता है. बोबडीच वळली कीबोर्डची.
मग एकदम पायलट होतो. तोही हिंदुस्थान का नंबर एक. हा नक्कीच साऊथचा रिमेक असेल. चपलेने हाणावे एकेकाला.
मी मुद्दाम लिहितेय कारण तुम्हाला कळावे की किती दळभद्री आहे. अजून ऐका. मग ती सरदारजी नवऱ्यासोबत लग्न करत नाही आणि दारूडी होते. इतकी प्यायला लागते की cirrhosis of liver हा आजार होतो, तरीही थांबत नाही. नंतर ती प्रेग्नंट आहे हे कळतं तरीही दारूसिगारेट चालूच. नाकातोंडातून रक्त येते, तेव्हा पेट्रोल पिते. तिला पोटातील बाळाबद्दल काहीच वाटत नाही इतकी आत्मघातकी आहे.
महामूर्खपणा - २००, विकृती -१०००.
हा तोवर आयुष्यात कुठल्याकुठे जातो म्हणे आणि त्याच्या शापाने तिची ही गत होते. ती प्रेग्नंट सुद्धा त्याने तू झालीस तर तुला कळेल ( संदर्भ# वरचं बोबडी वाक्य) म्हणून झालेली असते. त्या सरदारजीला काहीच से नाही. मग ती मुलाला जन्म देताना मरते आणि हा तिला कसाबसा हॉस्पिटल मधे सोडून फायटर प्लेन मधे बसून पाकिस्तानी सबमरिनवर कामाकाझी - कामाकाझी खेळतो. तिला बाळ होतं ते सरदारजी बाबाला द्यायचं ठरतं. ती मरणार असतेच, म्हणून हाही शहीद होतो. इकडे तो काशीचा उपटसुंभ ब्राह्मण दोघांचं श्राद्ध करतो. हा त्याच्या प्रेमाचा विजय.
आता कळाले का, का नाही बघायचा?! वेळ वाचवल्याबद्दल प्रत्येकी अकरा - अकरा रूपयांचा लिफाफा पाठवा विपूत.
सर्वम माया (२०२५)
सर्वम माया (२०२५)
जियो हॉटस्टार
मल्याळम – हिंदी डबड
हिरो नास्तिक दाखवला आहे तर त्याचे बाबा पुजारी. त्यात याचे वडिलांशी काही कारणाने मतभेद आहेत. हा नास्तिक असल्याने पारंपारिक व्यवसाय सोडून आपल्यातील गिटार वाजवायच्या कलेला न्याय द्यायला स्ट्रगल करत आहे. वडिलांच्या 70 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणून घरी येतो. पण स्ट्रगल चालू असल्याने खिशात पैसे नाहीत. मग नाईलाजाने पोटापाण्यासाठी टेम्पररी पुजारी बनतो.
पुढे एक घटना घडते आणि याला एका मुलीचे भूत दिसायला लागते. भूत सुंदर आणि प्रेमळ असते. फक्त एक गोची असते की तिला आपण जिवंतपणी कोण होतो हे काहीच आठवत नसते. मग हा तिच्या मुक्तीचे प्रयत्न करतो, तर ती याच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सोडवायला मदत करते. पण कुठलेही भुताखेताचे चमत्कार करून नाही तर केवळ एक मैत्रीण म्हणून त्याला समजून घेऊन, त्याला कॉन्फिडन्स देऊन. हाच चित्रपटाचा प्लस पॉइंट आहे.
भूत सहृदयी असले की पिक्चर मनोरंजक वाटतोच. पण ते यात कुठेही उथळ होत नाही. किंबहुना इमोशनल अँगल फार छान जुळून आला आहे. दोघांतील नाते खुलताना मस्त दाखवले आहे. आपल्याला सुद्धा ते भूत हळूहळूच आवडायला लागते. तिला स्वतःचे आयुष्य न आठवणे याबद्दल सहानुभूती वाटायला लागते. त्यामुळे शेवटाला मन भरून येणे आणि फील गुड वाटणे एकत्रच होते. यात जो एक गिटारचा पीस वाजतो तो फार आवडला. स्पेशली शेवटी वाजतो तेव्हा मनात उतरतो.
वर उल्लेख केलेला जय जय जय जय हे आणि हा सर्वम माया दोन्ही जरूर बघा. म्हटले तर दोघांचा जॉनर वेगळा आहे पण दोघांतील सकारात्मकता भावली
मयसभा आणि किष्किंधा कांडम
मयसभा आणि किष्किंधा कांडम दोन्ही इंटरेस्टिंग वाटत आहेत. धन्यवाद संप्रति आणि साधना.
तेरे इश्क मे
तेरे इश्क मे
अस्मिता +७८६
फारच इंटेन्स लव्हस्टोरी आहे. ती तशीच लेखणीतून उतरावी म्हणून दारू पिऊन पटकथा लिहिली आहे. आणि ते समर्थपणे पेलू शकेल अश्या धनुषला कास्ट केले आहे. आणि कृतीची निवड यासाठीच केली आहे की दोघांतील फरक जास्तीत जास्त ठळक व्हावा.
तिचा चित्रपटात एक अतिशय युनिक डायलॉग आहे,
हम जैसे लडकीयोंका यही प्रॉब्लेम होता है. हम सपनो का राजकुमार धुंडते है. कोई मजदुर नही.. और जब हमे वो राजकुमार मिल जाता है तो हमे ऊस मे वो नमक नही दिखाई देता. जो नमक हमे मजदूर के पसीने मे दिखता है..
हेच चित्रपटाचे सार आहे!
रानभुली क्वोरा मराठी वरील
रानभुली क्वोरा मराठी वरील चैतन्य संप्रती आपले काका आहेत का, मयसभा सिनेमाबद्दल लिहिले आहे.
अरे हो ऋ , तो "नमक" वाला
अरे हो ऋ , तो "नमक" वाला संवाद राहिलाच. पण तेही हिंसेला ग्लोरिफाय करण्यासाठीच आहे. तो फक्त गरीब नाही, तो अतिशय हिंसक वृत्तीचा आहे. मग त्यात त्याला समजून घेताना कमी पडण्याची अपराधी भावना का ? विचित्रच वाटलं तेही. वेगवेगळ्या संवादातून सगळे अधोरेखित केले आहे पण तिचं त्याच्यावर प्रेम नाही आणि त्याची गुन्हेगारी वृत्ती आहे त्याचं काहीच नाही. त्यात त्याला शिक्षा होतानाही दिसत नाही. त्यामुळे फार खटकले. वर त्याला पायलट करून शहीद हिरो केले आहे तेही. मला संपूर्ण चित्रपटाचाच राग आला आहे.
मूर्खपणा -> महामूर्खपणा ->
मूर्खपणा -> महामूर्खपणा -> विकृती - हे रँकिंग धमाल आहे
हा नक्कीच साऊथचा रिमेक असेल. चपलेने हाणावे एकेकाला. >>>
इथे वैताग टोकाला पोहोचलेला जाणवतोय. सहसा तेलुगु पिक्चरमधे असला आचरटपणा ग्लोरिफाय केलेला असतो. धनुषचा असेल तर तमिळ असेल मूळचा. तेथे इतके असते का माहीत नाही.
तिला खुश करण्यासाठी तो एक दोनदा मार्टिन ल्युथर किंग की जय आणि महात्मा गांधी की जय >>>
अरे एकदा गांधी म्हंटले की मार्टिन ल्यूथर किंग त्यात कव्हर झाला की.
क्रीती सायकॉलॉजीत डॉक्टरेट करण्यासाठी कॉलेजमधला >>> हे ११ वी ते डॉक्टरेट सगळे एकाच ठिकाणी असलेले कॉलेज कोणते असावे?
हिंदुस्थानका नंबर वन पायलट वाचल्यावर तर फुटलो. असे सगळ्या प्रोफेशन्स मधे नॅशनल रँकिंग असते का? महसूल अधिकारी नं १, कृषि उत्पन्न बाजर समिती उपसभापती नं १, हिंदुस्थानचा नं १ आमदार वगैरे.
बाकी टेम्परामेण्टच्या दृष्टीने त्या कॅरेक्टरला आदर्श प्रोफेशन पायलट आहे! आणि तो कमर्शियल पायलट होतो की असल्या नगाला मिलिटरीत घेतात?
लग्नही करत नाही आणि दारूही प्यायला लागते, ते ही हा पायलट झालेला असताना. लॉजिक रानोमाळ हरवेलेले दिसते. हा बकवास आहे तर आता पायलट झालाय. तिला याच्यात इंटरेस्ट नाही तर लग्न कशाला मोडले. आणि लग्न मोडले तर मग दारू कशाला प्यायला लागली.
पिक्चरमधे हीरोला व्हिलनला मारायला इतर लोक मदत करतात. इथे उलटेच दिसते.
तिचे याच्यावर प्रेम नाही इथेच विषय संपला. त्या रोलमधे हीरो आहे म्हणून त्याचे कारनामे ग्लोरिफाय करणे वगैरे ही सडक्या डोक्याची कामे आहेत.
हो, ते नमक मी उपरोधानेच
हो, ते नमक मी उपरोधानेच लिहिले होते.

नमक असे असेल तर आमच्या शाहरुखच्या अळणी लव्हस्टोरीच बऱ्या
बाकी चुकीच्या गोष्टींना ग्लोरिफाय केलेच आहे.
मी आला तेव्हाच बघितलेला पण कोणाला सांगावेसे वाटले नाही
कृती आवडत असली तरी हा धनुषसाठी बघितला होता. त्याचे काम नेहमी भारी असते. वाह्यात तर चित्रपट निघाला.
त्याचे असे आकाशातले विमान बघून डायरेक्ट पायलट होणे पाहिले आणि जब तक है जान आठवला होता. पण तरी ते ठीक आहे. अतर्क्य गोष्टी असायला हरकत नसावी. वाह्यात नसाव्यात. प्रेमाच्या नावावर तर बिलकुल नसाव्यात.
हम जैसे लडकीयोंका यही
हम जैसे लडकीयोंका यही प्रॉब्लेम होता है. हम सपनो का राजकुमार धुंडते है. कोई मजदुर नही.. और जब हमे वो राजकुमार मिल जाता है तो हमे ऊस मे वो नमक नही दिखाई देता. जो नमक हमे मजदूर के पसीने मे दिखता है..
हेच चित्रपटाचे सार आहे!
>>> हे सार कसे काय? या संवादाचा आणि पिक्चरच्या स्टोरीचा काहीच संबंध दिसत नाहीये.
ऋ , अगदी. विचित्र आणि विकृत
ऋ , अगदी. विचित्र आणि विकृत कथानक आहे. ही लव्ह स्टोरी नाहीच. आत्मघातकी आहेत दोघेही.
फा,
तिथला प्राचार्य सुद्धा जोकर वाटतो. तोही ह्याला घाबरून असतो.
कृषि उत्पन्न बाजर समिती उपसभापती नं १, >>>
११ वी ते डॉक्टरेट सगळे एकाच ठिकाणी असलेले कॉलेज कोणते असावे >>>
हीरो आहे म्हणून त्याचे कारनामे ग्लोरिफाय करणे वगैरे ही सडक्या डोक्याची कामे आहेत. >>>
अनुमोदन. असे हिरो नसलेलेच बरे, सगळेच हुकलेल्या हिरोसाठी आधी एकदम हुशार असलेली हिरोईन सुद्धा हुकत, हुकत जाते. मग दोघेही पूर्ण हुकून एकाच पेजवर येऊन एकदाचे मरून जातात. कैच्याकै!

Pages